' जनसेवा दुग्ध मंदिर '

गेली कित्येक वर्षे मोठ्या दिमाखात उभ असलेल ' जनसेवा दुग्ध मंदिर ' , लक्ष्मी रोड पुणे हे बंद झाले अशी वार्ता कानावर चेपू माध्यमातून आहे.
अनेक वर्ष चविष्ट बेसन लाडू, खरवस, श्रीखंड वाडी आणि नंतर अनेक नाश्त्याचे पदार्थ येथे मिळत असत. गेल्या काही वर्षात इतर खाद्य पदार्थ द्यायची देखील येथे प्रथा पडली होती. परंतु हे जनसेवा बंद झालेले ऐकून वाईट वाटले.
जनासेवाची स्पेशा लिटी म्हणजे तिखट मिठाचा सांजा.खर तर हा मराठ मोळा घरगुती पदार्थ.
पण त्याच्या वर अतिक्रमण केले ते उडप्याच्या उप्पीट ने.
फार फर्मास डिश तिखट मिठाचा सांजा.
जनसेवाची खासियत म्हणजे तिथे मिळणारे फर्मास मसाला दुध...मटार कारंजी ..बटाट्याचा चिवडा ...
अशीच हळ हळ वाटली जेंव्हा लक्ष्मी रोड वरचे संतोष उपहार गृह व सदाशीव पेठेतले पेशवाई बंद पडले तेंव्हा...
संतोष मधली दही बटाटा पुरी चे डिश म्हणजे क्या बात..अजूनही जिभेवर चव रेंगाळत आहे.
अन पेशवाई सारखी मटार उसळ ची चव पण मस्त..
नारळाचे दुध घालून केलेली अतिशय चवदार उसळ व ब्रेड स्लाईस..मजा यायची चापायला
अरेरे ..वाईट झाले.
मराठी उपहार गृहे बंद पडण्या अनेक कारणा पैकी एक महत्वाचे कारण म्हणजे कामगार..
मराठी कामगार टिकत नाही..
उडप्यांचे तसे नसते.ते गावाकडून मुले आणतात व त्याना सांभाळतात ..
उडप्याच्या कोणत्याही उपहार गृहात गेले कि एक गोष्ट जाणवते ती म्हणजे १००% कामगार हे कानडी असतात. व ते त्या ठिकाणी वर्षानु वर्षे काम करीत असतात ..
आपल्या उपहार गृहातली काम करणारे मुले बहुतेक कोकणातून आलेली असत.
पण हल्ली प्रगतीचा आलेख वाढता असल्याने ती मुले पण ह्या व्यवसायात फिरकताना दिसत नाही..
कुठल्याही व्यवसायाचा आत्मा व यश हे तिथे काम करणा~या कामागारावर अवलंबून असते.
ह्या व्यसायाताल्या एका मित्राशी गप्पा मारताना त्याने संगीतले कि लहान उपहार गृहात २ माणसे अत्यंत महत्वाची.
एक आचारी व दुसरा मोरीवर काम करणारी मुले..जी डीशेस साफ करतात..
ह्याना जो पर्यंत मालक सांभाळून ठेवतो तो पर्यंत अडचणी येत नाहीत...
आमच्या एक मित्राचे एम आय डी सी त छोटे वर्क शॉप होते..हॉटेल मध्ये लई पैसा असे डोक्यात खूळ आले अन त्याने टपरी टाकली..
काही दिवस हॉटेल मस्त चालले पण जेंव्हा कामगार ्पळु लागले व शेवटी उष्ट्या प्लेटस उचलायची व धुवायची वेळ आली त्या वेळी
त्याच्या आईच्या xxxxx म्हणत टपरी बंद केली व परत जोब भादराण्याचे काम शॉप मध्ये सुरु केले ...

लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

तिथं जिलब्या मिळायच्या काय?

-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।

पुण्यात फारसा गेलो नसल्याने सदर दुकानाबद्दल ठाऊक नाही. परंतु एक रुचकर, चांगले पदार्थ देणारे हॉटेल बंद झाले, असे लेख वाचून वाटते. चालायचच.

उडप्याच्या हॉटेलातील मुले कानडे नव्हे तर तुळू भाषी असतात. शिवाय आता त्यांना त्यांच्याच भागात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांची आवक मंदावली आहे, असे एका शेट्टी मित्राकडून कळले आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

@' जनसेवा दुग्ध मंदिर ' , लक्ष्मी रोड पुणे हे बंद झाले अशी वार्ता कानावर चेपू माध्यमातून आहे. >>> आश्चर्य आहे... अधुन मधून जायचो..पण असं काही देखिल भासलं नव्हतं... उद्या जाऊन बघतोच आता.
आपली इथली मटार करंजी,पियुष,खरवस फेवरिट होतं...

मायला..मंडई जवळचं पुणेरीपण असच बंद पडलं. smiley तिथलं उप्पीटसांबार,सामोसासांबार काय अल्टि लागायचं...

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे. http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

मायला..मंडई जवळचं पुणेरीपण असच बंद पडलं. तिथलं उप्पीटसांबार,सामोसासांबार काय अल्टि लागायचं...

बंद केले.
सोमण बंधूंचे ते दुकान होते. तिन्ही भावांनी छानसे फ्लॅट घेतले, धाकट्या भावांच्या मुलींची लग्ने लावून दिली आणि आता आराम करत आहेत. मोठ्या सोमणांचे चिरंजीव परदेशात असतात. ह्या वयात आता कदाचीत येवढी धावपळ होत नसल्याने ते बंद केले असावे. अर्थात कोणाला चालवायला न देता सरळ बंदच केले हे एक बरे झाले.

बाकी जनसेवा बंद पडले म्हणजे पुण्याच्या खाद्य संस्कृतीलाच घरघर लागली म्हणा की. संध्याकाळी २ मेणबत्या लावून यायला हव्यात शनिवार वाड्याच्या प्रांगणात.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

ही बातमी खरी असेल तर फार हळहळ वाटते.

उपाध्ये यांचे 'जनसेवा दुग्ध मंदिर' म्हणजे हार्डकोअर मराठी माणसाचे (पुणेकरांचे) विरंगुळ्याचे स्थान होते.
मऊसूत पिवळाधमक सांजा, लुसलुशीत साबूदाणा खिचडी आणि दही, किंचित वेगळ्या चवीचा बटाटेवडा, पुदिन्याचा स्वाद तोंडात रेंगाळत ठेवणारी हिरवी चटणी, ब्रेड आणि मटार उसळ सगळे पदार्थ आठवणीत राहणारे. (मिसळ मात्र कायम गंडलेली)

जनसेवाचे एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त पुण्यातच मिळणारे 'पियूष' हे स्वादिष्ट पेय केवळ इथेच मिळायचे. कुचेष्टेखोर म्हणत, की पियूष म्हणजे निव्वळ श्रीखंडाचे पाणी. पण हे पियूष चवीला फार मस्त. जनसेवाचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे पुण्यात अगदी रात्रीच्या वेळी गेलात तरी मधुर ताक देणारी दोनच ठिकाणे १) सरपोतदारांचे पूना गेस्ट हाऊस २) जनसेवा दुग्ध मंदिर. रात्री नऊला जरी ताकाचा ग्लास मागवला तरी सकाळी घुसळल्याइतके ताजे आणि दाट ताक. मी कायम त्यांना टेस्ट केले, पण ताक कधीच आंबट, शिळे किंवा कडवट वासाचे नसे.

खाद्यपदार्थांबरोबरच जनसेवाच्या काऊंटरवरुन कुरकुरीत कडबोळी, मुगाचे लाडू, नाचणीचे लाडू, पातळ पोह्यांचा चिवडा अशा वस्तूंची हमखास खरेदी व्हायची. पुढचे दोन दिवस आनंदात जायचे.

बाकी पदार्थ सगळीकडे मिळतात, पण सांजा आणि पियूष मात्र आपल्या आस्वादातून नक्कीच अस्तंगत झाले. अरेरे!

पीयुष आजही ठाण्यात गोखले उपहार मध्ये ( गोखले रोड , ठाणे प. व कुटिरोद्योग , कोपीनेश्वर मंदिराच्या बाजुला ठाणे प. येथे अजुनही मिळते.

निश

पियुष डोंबिवलीत फडके रोड वर कुलकर्णी ह्यांच्या हॉटेलात प्यायचो. त्याची एकदम आठवण झाली.

आपले आमच्या पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.

+१, आयुष्यात पहिल्यांदा तिथंच या प्रकाराची चव घेतली होती, शेजारच्या दुकानातल्या गर्दीवर लक्ष ठेवत ठेवत.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

जनसेवा'बाबत आमची थोडी हळवी आठवण आहे.

सदैव आर्थिक तंगीत नि आजीच्या तकतकीने हैराण झालेले आमचे आजोब कधी दोन पैसे जास्तीचे हातात आले की आम्हा दोघा भावांना जनसेवा मधे घेऊन जात. आम्ही दोघे तिथे मिळणार्‍या केशर घातलेल्या खरवसावर ताव मारत असताना ते मात्र मस्त दहीसाखर खात असत. तेव्हा याचा अर्थ समजत नसला तरी आज एवढ्याशा आवडीसाठी त्यांना पुरेसे पैसे मिळण्याची वाट पहावी लागे नि ही लहानशी आवड - घरात दही असूनही - बाहेर जाऊन भागवावी लागे हे लक्षात आले की भडभडून येते. काही राजा माणसांना अतिशय कद्रू, असंवेदनशील जोडीदार का मिळतात याचा जेव्हा विचार मी करतो तेव्हा प्रथम आजोबांची जाड चष्मा घातलेली मूर्तीच प्रथम डोळ्यासमोर येते.

एखादं दुकान बंद होणं म्हणजे अशा काही आठवणी पुसल्या जाणं असाही अर्थ असतो हे एखाद्या फायद्या-तोट्याचा, गुंतवणूक-परतावा याच भाषेत बोलणार्‍या नव्या जगातल्या व्यावसायिकांना आता जाणवतही नाही. एक्स-वाय कार्टेशिअन प्रतलात प्रगतीचा आलेख मांडताना हा भावनिक गुंतवणुकीचा, बांधिलकीचा झेड अ‍ॅक्सिस केव्हाच विसरुन गेलो आहोत आपण. smiley

__________________________________________
Every 'ism' is a euphemism, every religion a contagion

एखादं दुकान बंद होणं म्हणजे अशा काही आठवणी पुसल्या जाणं असाही अर्थ असतो हे एखाद्या फायद्या-तोट्याचा, गुंतवणूक-परतावा याच भाषेत बोलणार्‍या नव्या जगातल्या व्यावसायिकांना आता जाणवतही नाही. एक्स-वाय कार्टेशिअन प्रतलात प्रगतीचा आलेख मांडताना हा भावनिक गुंतवणुकीचा, बांधिलकीचा झेड अ‍ॅक्सिस केव्हाच विसरुन गेलो आहोत आपण. Sad

छ्या !! तिथे समजा नवे दुकान आले आणि त्याने यांच्यापेक्षा जास्त धंदा केला तर भारताची जीडीपी तेवढ्या प्रमाणात वाढते येवढं साधं गणित समजत नाही तुम्हाला ? भावना वगैरे कुठल्या जमान्यातील कथा करता रमताराम... जिथे दुध पित होतात तिथे रम प्यायची तयारी ठेवा !! भारताच्या ग्रोथ स्टोरीवर विश्वास ठेवा.

***
आमच्याकडे कशावरही, कोणावरही, कितीही पिंका टाकून मिळतील.

फक्त पुण्यातच मिळणारे 'पियूष' हे स्वादिष्ट पेय केवळ इथेच मिळायचे.

गैरसमज आहे. माझ्या लहानपणापासून (१९६०) मुंबईत दादरला पणशीकरांकडे पियुष अनेकदा प्यायलो आहे.

पुण्यात प्रसिद्ध 'मस्तानी', ती मुंबईत नाही मिळायची.

सहमत ,
पण दादरलाच काय ठाकुरद्द्वारला ही , तसेच रत्नागिरीला विहार मधे ही पियुष साठच्या दशकात प्याल्याचे स्मरतेय.

------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !

पियूष हे पेय फक्त पुण्यातच मिळणारे असे म्हणताना माझ्यापुढे सध्याचा काळ अपेक्षित होता. पूर्वी कदाचित ते महाराष्ट्रात अनेक शहरांतही उपलब्ध असू शकेल. अर्थात माझ्या विधानात दुरुस्तीला वाव आहे. पियूष आजही पणशीकर, विहार किंवा अगदी पुण्यातल्या पुण्यात इतरत्र मिळते का, याबद्दल कुणी जरुर माहिती द्यावी, म्हणजे माझा गैरसमज दूर होण्यास मदत होईल.

मुंबईमध्ये आजही अनेक ठिकाणी उत्तम पियुष मिळेल.

दादरला प्रकाश, आस्वाद, पणशीकर तर गिरगावात प्रकाश आणि गोरेगावात सप्रे अशा अनेक ठिकाणी उत्तम पियुष मिळतं.

मुंबई कट्ट्याला भेटा, माझ्याकडून तुम्हाला पियुषपार्टी नक्की....

इत्यलम्

:davie: प्रास :davie:

लेखन मुसाफिरी
सांगीतिक आवड

यस्स ' फक्त पुण्यात मिळणारे पियूष' असे माझे वरील वाक्य रद्दबातल समजण्यात यावे. smiley

पुढच्या मुंबई कट्ट्यावर आपली वाट बघत आहे. smiley

इत्यलम्

:davie: प्रास :davie:

लेखन मुसाफिरी
सांगीतिक आवड

इतकी साधी चूक श्री. योगप्रभू यांच्याकडुन अपेक्षित नव्हती. त्यामुळे त्यांनीच सगळ्यांना पियुष पाजून प्रायश्चित्त घ्यावे असे सुचवतो.

बिपिन कार्यकर्ते

>

...तरी नशीब. पेयांतप्रायश्चित्त सुनावले नाहीत. smiley
बिका! प्रत्येकाची पियुषे वेगवेगळी असतात. आपल्याला ते झेपणार नाही.
पुण्यात सात्विक कट्टा झाल्यास पियूष पाजण्यावर विचार करण्यात येईल.
(प्रायोजक - मेसर्स अडगुलं अँड मडगुलं सन्स)

///(प्रायोजक - मेसर्स अडगुलं अँड मडगुलं सन्स) // हा. हा......
हे आवडले. पण मागे लिमिटेड लिहायला विसरू नका.......

smiley

I will frame you ! Then I will shoot you and lastly I will hang you..............................on a wall ! Yes I am a Photographer
...जयंत कुलकर्णी.

प्रासभाऊ, मुंबई कट्ट्याला ठाणेकर येत नाहीत, पुणेकर कुठून येणार ? भलतेच आशावादी की हो तुम्ही smiley

===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================

भाबड्या आशावादावर जग चालते मग प्रास चालला तर काय हरकत नाही? smiley

इत्यलम्

:davie: प्रास :davie:

लेखन मुसाफिरी
सांगीतिक आवड

तो निरागसता सप्ताह परत सुरु झाला काय हो ?

===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================

पुढचा कट्टा डोंबिवलीत आहे.. तेंव्हा पाहूया कोण कोण येतंय....

***************************************

- मन्या फेणे

हे आमंत्रण आहे की आवाहन की आव्हान ?

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

हे कधी ठरले बे? पुढचा कट्टा दादरच्या पण दक्षिणेला ठरला होता. आणि एखादा कट्टा पश्चिम लाईन वर पण.
डोंबिवलीचे त्यानंतर बघू smiley

===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================

पुढील कट्टा श्रीस्थानक येथे करावा असे सुचवून पाहतो.

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

आमचि अनुपस्थिति पकडावि. smiley

***************************************

- मन्या फेणे

धरू हं बाळ, नक्की धरू. तू पार पुण्याला* जा कट्टे करायला, इथे नको येउस smiley

*ते पण खोपोली बघत जा, घाटातून कशी दिसते ते smiley

===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================

अगदी बोरीवलीमधे शांतीवनला "तांबे'ज पल्लिनाथ" मध्ये सुंदर पियुष मिळते.

नडला त्याला फोडला आणि नंतरची देवाक काळजी...!!!

पियूष हे पेय फक्त पुण्यातच मिळणारे असे म्हणताना माझ्यापुढे सध्याचा काळ अपेक्षित होता.

मुंबई-पुण्यातच नाही तर, १९८५ पासून आजतागायत, मस्कतमध्येही, माझ्या एका मराठी मित्राच्या कॅफेटेरियात 'पियुष' मिळते आहे. हे सहज कळावे.

गैरसमज बरं का !! पियूष बदलापूरात काटदर्‍यांकडे अजूनही मिळतं.

...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे! smiley

जनसेवा गेले, असे कसे झाले हो अविनाशजी , अरेरे , जो जन्मला आला तो एक ना एक दिवस जाणारच ना ? आर्यन गेले, मिनर्वा गेले, अभिनव कलाला ही घरघर लागलीय ! आता फक्त
......आसवे अजुनी नयनात....अशा , अवस्थेत जगायचे..
एक सांस्कृतिक पुणेकर ..

------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !

बदल हा आयुष्याचा अविभाज्य हिस्सा आहे

जगातील अनेक (संस्कृती जतन करणार्‍या युरोपियन)देशांमध्ये ५०/१०० वर्षे जुनी घरे,हॉटेल्स कशी काय बंद होत नाहीत ?

tan(α)

जनसेवाचा खरवस लाजवाब असतो. लक्ष्मी रोडवर गेले की हमखास खर्वस खाण्याचा कार्यक्रम असायचा. पुरवठा मर्यादित असल्याने बर्‍याच वेळा "खरवस संपला" अशी पाटी अंगावर धाउन आल्यासारखी वाटायची.
पण असेल तर स्वतः तिथेच खाउन घरच्यांसाठी नेणे अटळ असायचे.
पण बर्‍याच वेळा ती पाटीच पहावी लागायची.

अरेरे

आजचे भविष्य : संध्याकाळी दु:खातिरेकाने जनसेवा बार मधे एखादा पेग जास्त होण्याची शक्यता वाटते

___________________________________
पोष्टण्याआधी थांबा,

पीयुष आज ही दौन्द म्ध्ये जोगलेकर यान्चे कडे मिळते

पंजाब्यांच्या नायतर उडप्यांच्या हाटिलात गर्दी कोण करतात? मराठी लोकच ना? तं मं मराठी हाटिल बंद पडलं म्हणून टिपं कशाला गाळताय?

जनसेवा एवढ्या उशिरा बंद पडले याचे खरे म्हणजे आश्चर्यच वाटते आहे.

वर्षानुवर्षे ते हॉटेल केवळ तिखटामिठाचा सांजा आणि खरवसावर जिवंत होते. कोणे एके काळी लोक चिवडा, चकली आणि दही कडबोळी खाण्यासाठी हॉटेलात जायची. अजुनही लोकांची आवडनिवड तशीच राहिली आहे अश्या भ्रमात राहुन जर कोणी हॉटेल चालवत असेल तर अजुन काय होणार? काळाबरोबर हे हॉटेल कधीच बदलले नाही. जरा १०-५ उडपी पदार्थ, बटाटेवडे. छोले भटुरे असले तत्सम पदार्थ अ‍ॅडवले असते तर हॉटेल चाललेही असते. पण आम्हाला फक्त शुद्ध महाराष्ट्रीयन पदार्थ विकण्याचा वृथा अभिमान दाखवायचा होता. बर महाराष्ट्रीयन पदार्थ तरी भरपुर ठेवायचे ना? तर तसे पण नाही.

एकदा संध्याकाळी ७.१५ ला हॉटेलात गेलो होतो. खरवस संपला होता. सांजा संपला होता. ढोकळा संपला होता. रत्ताळ्या आहे काय मग? असे विचारल्यावर "चिवडा " असे उत्तर आले. चिवडा? मी काय लाडु चिवडा खायला होटेलात जातो का? त्यानंतर मी परत हॉटेलात पाऊल टाकले नाही ही गोष्ट वेगळी. हा काउंटर वर जाउन त्यानंतर कैक वेळा खरवस आहे का म्हणुन विचारले आणि नाही हे उत्तर ऐकुन परतलो. थोडक्यात काय तर पदार्थ संपले म्हणुन सांगण्यात धन्यता वाटते. तिखटामिठाचा सांजा कुठल्याही दुकानातला संपु कसा शकतो? संपला असेल तर तयार करायला असा कितीक वेळ लागतो? संध्याकाळी ७.१५ ला सांजा संपला असेल तर आणी हाटेल ९ वाजेपर्यंत उघडे राहणार असेल तर सांजा नव्याने करायला काय हरकत आहे? (योगप्रभू म्हणतात त्याप्रमाणे ९ वाजता त्यांना मधुर ताक मिळाले असेल तर त्या अर्थी ९ वाजेपर्यंत हॉटेल उघडे राहत असणार. पण खरे सांगायचे तर मला ते ९ वाजेपर्यंत फारसे कधी उघडे दिसले नाही. ) अगदी रवा संपला असेल तर बाजारात जाउन (लक्ष्मी रोड पासुन बाजार असा कुठे म्हणा फतरा लांब आहे?) रवा आणून देखील सांजा करायला काय हरकत आहे?

वास्तविक लक्ष्मी रोड वर फारशी हॉटेलं नाहीत. लक्ष्मी रोडच्या समांतर असलेले बेडेकर (जे अगदी वर्षभरापुर्वीपर्यंत दुपारी २.३० / ३ ला मिसळा संपुन बंद व्हायचे). लक्ष्मी रोडच्या पार एका टोकाला असलेले द्वारिका, पार तुळशीबागेत असलेले अगत्य आणि अगदी आत्ताआत्ता सुरु झालेले भगत ताराचंद (आणि आधी त्याच जागेत असलेले मौर्य). याहुन फारशी हॉटेल्स नाहीत. मग एवढ्या गर्दीच्या ठिकाणी. भर रस्त्यावर, गजबजलेल्या बाजारात एक हॉटेल चालु शकत नाही? एखाद्याने एवढ्या मोक्याच्या जागी हॉटेल असले असते तर करोडो कमावले असते.

गणपतीच्या दिवसात लक्ष्मी रोडवर खच्चुन गर्दी असते/असायची. हॉटेल जरा जास्त वेळ उघडे ठेवले आणि जरा ४ पदार्थ विकायला ठेवले तर केवळ गणपतीच्या दिवसात ४-५ लाख कमावता येतील. पण परत तेच. पुणेरी बाणा. ठरलेल्या वेळेत शटर डाउन म्हणके डाउन. कधीही हे हॉटेल जास्त वेळ उघडे ठेवले गेले नाही. अश्या परिस्थितीत इतरांनी त्याचा फायदा घेउन आपले धंदे वाढवले तर मग विशेष ते काय आणि मग अश्या परिस्थितीत कमी नफ्यात हॉटेल चालवण्यापेक्षा जागा विकुन आधिक पैसा कमावण्याचे आमिष नक्कीच आकर्षक वाटेल.

********************************************

सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी

+१
परफेक्ट विश्लेषण केले आहेस मृत्युंजया..

बैलाचा डोळाच फोडला भाऊ!

ते बंद पडले नसून मालकाने रिटायरमेंट म्हणून बंद केले असावे आणि विकून (तरी) नफा कमावला असावा हीच त्यातल्या त्यात सदिच्छा.

मृत्युंजय भाऊ , हॉटेल पुण्यात होते ना ? मग तुमची दुसऱ्या धाग्यावरची चप्पल तुम्हीच एकदा बघून घ्या पाहू !!!
संदर्भ :- http://misalpav.com/node/21785#comment-400458

स्वगत :- तोच ना तू ? तूच ना तो ?? (वाचा अथवा ऐका:- माझी फिल्लमबाजी )

===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================

त्यांना आणि त्यांच्यामुळे पुण्याला आणि पुणेकरांना नाके मुरडणार्‍यांना इतकेच सांगु शकतो:

१. वरील वाक्य आणी त्यातील "आणि " महत्वाचे आहे. सबब सदर चप्पल तुम्हालाच सप्रेम भेट.

२. मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाहीत तसेच अस्मादिक थोडेफार पुणेकर असल्याकारणाने पुण्याबद्दल ४ शब्द बोलण्याचा आम्हाला पुर्ण अधिकार आहे. smiley

********************************************

सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी

मृत्युंजय, अगदी हेच मनात यायचे आधी. इतक्या कमी पदार्थांमुळे चाललेले हाटील बंद पडले यात वाईट वाटायला नको. उलट इतके वर्षे तरी चालले याचेच समाधान! कालानुरुप बदल व्हायला हवे होते. मी फारशी गेले नाही या ठिकाणी. ३ ते ४ वेळा जाऊन आले पण कशातही बदल नवेपण नव्हते. वाईट वाटून घ्यायचे असल्यास एवढ्याचसाठी की लक्षुमी रस्त्यावर खरेदी करत असताना फक्त भूक लागली म्हणून घरी परत किंवा दुसरीकडे जावे लागेल. smiley

एकदा म्हणायचं परदेशी - गोरे- लोकं जसं स्वत:च्या जुन्या, प्राचीन वस्तुंचे जतन करतात तसं आपण करत नाही ही दुखा:ची गोष्ट आहे, अन कोणी चुकुन केलंच जतन तर त्यांना वेळेप्रमाणे बदलत नाही म्हणुन नावं ठेवायची. हा दुटप्पीपणा आहे.

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

हा हा हा. खरच की! smiley

प्रतिसादाची गल्ली सपशेल चुकल्या गेली आहे.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

आश्चर्य वाटलं.. खरतरं नुकतच नूतनिकरण केलं होतं जनसेवाचं..
त्याआधी बंद पडलं असतं तर एवढं आश्चर्य वाटलं नसतं.. smiley

जनसेवाची आठवण म्हणजे..
मेनुकार्ड वरील पदार्थ आणि ते मिळण्याचे वार आणि वेळ यातून आत्ता कुठला नेमका पदार्थ मिळेल हे ओळखणे .. smiley
आणि (नूतनिकरणानंतर बहुतेक).. ऑर्डर दिल्यावर टेबलावर एक मोठा ठोकळ्यासरखा बोर्ड ठेवायचे.. त्यावरील नंबर बघून वेटर बरोबर ऑर्डरप्रमाणे पदार्थ आणून ठेवत .. चितळ्यांच्या टोकनसारखच काहीसं..

तेच का ते हॉटेल :

साबुदाणा खिचडी (मं.गु.श.) स. ९ ते ११ अथवा संपेपर्यंत.
खमंग काकडी (शु.श. वगळता) स. ९ ते ११ अथवा संपेपर्यंत.

असं काहीसं मेनूकार्ड असलेलं..?

हे मंगुश हॉटेल बंद झाल्याबद्दल वाईट वाटलं. टेस्ट चांगली होती.

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

हो तेच ते..

मी कालच कोल्हापुरला जाऊन आलो. मिपा वर वाचल्या प्रमाणे राजाभाऊंकडे भेळ हादडायला गेलो होतो. पण बाजुच्या दुकानातुन समजले की कामगार नसल्यामुळे दुकान बंद आहे. ते कायमचे बंद आहे की १-२ दिवसा पुरते बंद आहे ते समजले नाही. तसेच गणपतीपुळ्याला घनवटकरांकडे देखील याच करणामुळे जेवण मिळाले नाहि.

अगदी हेच म्हणते.
इतर गावांमध्येही अशी परिस्थिती असते असा अनुभव आहे.

या हाटेलात कधीही गेलेलो नाही. त्यामुळे व्यक्त होतेय ती बोच फारशी जाणवत नाहिये

ऋषिकेश
------------------
माझे मिपावरील लेखन इथे वाचा

"जनसेवा दुग्ध मंदिर" बंद पडले?
अरेरे

उपहारगृहाच्या व्यवसायात प्रकर्षाने जाणवते ते असे की 'पुढची पिढी' वडिलोपार्जित व्यवसायात (उपहारगृहाच्या) रस घेत नाहीत. त्यांचेही बरोबर असते. त्यांनी उच्चशिक्षण प्राप्त केलेले असते त्यामुळे उपहारगृह व्यवसायात त्यांना कमीपणा वाटतो. त्यापेक्षा, वरच्या हुद्यावरील एखादे पद पदरात पाडून किंवा अमेरिकेसारख्या (किंवा तत्सम परदेशात) प्रगत आणि प्रतिष्ठेच्या देशात नोकरी करणे तौलनिक दृष्ट्या अधिक समाधानकारक असते.

मागच्या ज्या पिढीने स्वकष्टाने व्यवसाय उभा केलेला असतो त्यांच्या समोर निवृत्तीचे दोन पर्याय उपलब्ध असतात. एक तर व्यवसाय कोणाला तरी चालवायला देऊन आपण नफ्यात भागिदारी घ्यायची. किंवा व्यवसाय विकून एक रकमी 'प्रॉव्हिडेंट फंड' मिळवायचा.
पहिल्या प्रकारात (व्यवसाय चालवायला देणे) समोरची पार्टी विश्वासू, प्रामाणिक पाहिजे. ती आपला व्यवसाय 'घशात' घालणार नाही ह्यासाठी सतत जागरूक राहणे हे उतारवयात जमत नाही. तसेच पूर्ण निवृत्तीचा आनंद मिळत नाही. त्यापेक्षा व्यवसाय विकून एकरकमी नफा कमवून तो एखाद्या सुरक्षित गुंतवणूकीत ठेवला तर ठराविक आणि आश्वस्त रक्कम नियमितपणे मिळत राहते आणि संपूर्ण निवृत्ती उपभोगता येते.
उपहारगृहाचा व्यवसाय शारीरिक आणि मानसिक बळाची मागणी करणारा आहे. साठीच्या पुढे दोन्ही आघाड्यांवर माणूस हतबल होतो आणि नाईलाजाने त्याला वरील निर्णय घ्यावा लागतो.

बदलत्या काळाबरोबर नवनविन पदार्थ सादर करणं, गिर्‍हाईकांच्या आवडिनिवडीनुसार आपली धोरणे बदलणं वगैरे मुद्यांशी सहमत आहे.

या क्षेत्रतील अधिकारी व्यक्तीचा प्रतिसाद, उगा फुकाच्या गप्पा न मारता, डाय्रेक मुद्द्याला हात. धन्यवाद काका.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.