मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पीयूष

प्रमोदताम्बे .......................................... · · पाककृती
पीयूष साहित्य : सहा कप घट्ट व गोड मलईचे दही , एका लिंबाचा रस , दहा चमचे साखर , छोटा अर्धा चमचा जायफळाची पूड , चिमुटभर पिवळा खायचा रंग , छोटा अर्धा चमचा मीठ. कृती : दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करुन त्यात साधारण ३ वात्या दूध व २वाट्या पाणी घालुन पातळ करणे व मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे. लिंबाची एकदम चांगली चव येत असली तरी बर्‍याचवेळा लिंबाच्या कवटपणामुळे पियुषही कडू होते म्हणून १/२ चमचा व्हिनेगर वापरले तर कडूपणा येत नाही आणि चव पण एकदम बरोबर येते.

वाचने 14329 वाचनखूण प्रतिक्रिया 43

जेपी Sat, 01/31/2015 - 21:01
अरे वा !! आमच्या सरजींचा आवडता पदार्थ ,स्वॅप करुन पाहिला पाहिजे.

पैसा Sat, 01/31/2015 - 21:46
डिट्टेल पाकृ! हेच का ते जगप्रसिद्ध पीयुष!

In reply to by पैसा

सस्नेह Sat, 01/31/2015 - 21:53
हे क्काय पैतै, जग हे 'पु' ने सुरू होऊन 'पी'त संपते हे तुला सांगायची वेळ यावी ना *wink*

मुक्त विहारि Sat, 01/31/2015 - 22:42
असे असते काय हे पीतुष? हे म्हणजे श्रीखंडाच्या पाण्या सारखेच दिसत आहे. चव पण तशीच लागत असेल का?

In reply to by अत्रुप्त आत्मा

मुक्त विहारि Sun, 02/01/2015 - 03:56
...त्याला पी-यूष असं म्हणतात." + १... मी पण असेच ऐकुन असल्याने, ह्या पेयाच्या चवी पासून दूरच आहे.

दिपक.कुवेत Sun, 02/01/2015 - 00:15
आपल्याला जाम आवडतं हे पीयूष पण ते चील्ड पीण्यातच मजा आहे. पण करण्याची हि पद्धत योग्य आहे का? म्ह्णजे दहि वस्त्रगाळ करुन मग त्यात पाणी, साखर आणि बाकि घटक अ‍ॅड केल तर जास्त चांगलं लागेल ना? शीवाय दुधात लिंबु किंवा व्हिनेगर घालून दुध फाटणार नाहि??

In reply to by दिपक.कुवेत

सूड Mon, 02/02/2015 - 14:33
म्ह्णजे दहि वस्त्रगाळ करुन मग त्यात पाणी, साखर आणि बाकि घटक अ‍ॅड केल तर
मी हीच रेसिपी पाह्यली होती. सुती कापड पातेल्यावर बांधून त्यावर थोडं थोडं दही हातानं फेसायचं. ते वस्त्रगाळ होऊन पातेल्यात पडलं की परत तीच पद्धत. त्यांनी पाण्याचं प्रमाण पण सांगितलं होतं ते मी विसरलो. सगळं दही असं फेसून झालं की मग साखर, जायफळ (वेलदोडे नाही)पूड, केशर आणि पाणी घालून पुन्हा नीट फेटून घ्यायचं आणि थंड करुन सर्व्ह करायचं.

In reply to by सूड

पैसा Tue, 02/03/2015 - 20:57
पात्तळ केलेलं श्रीखंडच की रे! पुन्हा पाणी घालायचं असेल तर मग त्याचा चक्का कशाला करायचा म्हणते मी! तसा हा लस्सीचा भाऊच दिसतोय!

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर Sun, 03/08/2015 - 03:59
>>>>पुन्हा पाणी घालायचं असेल तर मग त्याचा चक्का कशाला करायचा म्हणते मी! दह्यातल्या पाण्यात आंबटपणा असतो. तो काढून टाकून साध पाणी (जे आंबट नसतं) त्यात मिसळलं की पियुष आंबट लागत नाही.

सिरुसेरि Sun, 02/01/2015 - 18:51
पियुष हे पेय जास्ती करून दादर मधल्या hotels मध्ये मिळते . त्या मानाने पुण्यात व इतर ठिकाणी जास्त मिळत नसावे .

In reply to by किसन शिंदे

सूड Tue, 02/03/2015 - 20:21
अर्रर्र!! अपमान करायचाच असेल तर दुसरा शब्द वापर बे!! हे म्हाग्रु ऐकण्यापेक्षा होरेत उडी मारलेली बरी !! ;)

In reply to by किसन शिंदे

ठाण्यातल्या गोखलेतही अफाट पियुष मिळते.
किस्ना एकदा कुटीर उद्योग (कौपिनेश्वरा शेजारी) पियुन पहा … एकदम जबरदस्त , ढासू , आजुबाजुनी कधी गेलो तरी आपोआप पाय तिकडे वळतात जे जे लोक पियुषला श्रीखंडाचे पाणी म्हणतात त्यांनी नक्की पियुन पहावे

बोका-ए-आझम Sun, 02/01/2015 - 23:02
दादरमधल्या या तिन्ही ठिकाणी पीयूष मिळते. रसिकांना प्रकाशचे जास्त आवडते असा अनुभव आहे. विशेषतः एक साबुदाणा वडा आणि मिसळ चापल्यावर पीयूष आपोअाप मागवले जाते आणि मग फक्त मराठी माणसाला देता येते अशी मस्त ढेकर येते!

In reply to by जागृती अ. घाडीगांवकर

श्रीरंग_जोशी Sun, 03/08/2015 - 05:37
मदत -मिपावर फोटो चिकटवणे पाकृ रोचक दिसत आहे. पीयुषबाबत खूप ऐकले आहे. पण आजवर आस्वाद घेण्याची संधी मिळाली नाही. जनसेवामध्ये जाऊन पिणार होतो पण दुर्दैवाने ते नाही राहिले.

प्रभाकर पेठकर Sun, 03/08/2015 - 15:16
पियुष अनेक ठिकाणी फार उत्कृष्ट मिळते. नक्कीच मिळत असणार कारण ते बनविणे फारसे कौशल्याचे नाही. पण पियुषाची सुरुवात मुंबईत दादर स्थानकासमोर श्री. पणशीकरांनी केली. आमच्या मनात त्यांच्या पियुषाची चव ही पुलंच्या 'यमीपेक्षा सातपट गोरी' अशी आहे. प्रत्येक पियुषाची चव 'त्या' पियुषाशी तुलना करूनच चांगली/वाईट किती चांगली वगैरे ठरविले जाते. असो. पणशीकरांकडे साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, पियुष आणि चॉकलेट बर्फी हे माझे आवडते पदार्थ होते.

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन गुरुवार, 03/26/2015 - 17:59
पीयूषच्या इतिहासाबद्दल धन्यवाद. मटार करंजीबद्दलही अशी माहिती शेअर करावी ही विनंती. कारण हाही पदार्थ तितका कॉमन नाहीये.

In reply to by सस्नेह

श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/26/2015 - 16:51
सदस्यत्व घेण्यापूर्वी अनेक लोक मिपावर वाचमात्रपणे पडिक असतात. मी पण असायचो. फक्त सक्रीय झाल्याखेरीज अनेक खाचाखोचा कळत नाहीत हे मात्र खरं.