✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एस. एस. सी., सी. बी. एस. ई, आय. सी. एस. ई.

व
वारा यांनी
Mon, 01/12/2015 - 12:43  ·  लेख
लेख
पिल्लु ला शाळेत अ‍ॅड्मिशन घेतोय. पण सध्या असलेल्या बर्याच ऑप्शन मधे कन्फ्युज झालोय. १) एस. एस. सी - ट्रेडीशनल अभ्यासक्रम, स्वतः शिकल्यामुळे पुर्ण माहीती आहे. फायदे - ट्युशन आहेत , पुस्तके महीतीतील, गाईड मिळतात, प्रश्नसंच मिळतात, मराठी मिडीयम फी कमी. तोटे - स्पर्धा परीक्षा साठी पुरेसा अभ्यासक्रम नाही, महाराष्ट्राबाहेर अभ्यासक्रम नाही, ईंग्लीश मिडीयम फी जास्त. अ‍ॅड्मीशन प्रोसेस लॉटरी पद्धतीने , कमी जागा विद्यार्थी जास्त. २) सी. बी. एस. ई - दिल्ली बोर्ड , माहीतीतील जवळपास कोणी नाही. फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम , भारतभर सर्व मोठ्या शहरात शाळा. तोटे - टुशन मिळत नाहीत, फी जास्त, पुर्ण हिंदी व ईंग्रजी अभ्यासक्रम मराठी विषय नाही, ऑब्जेक्टीव्ह पेपर असतात(एकीव माहीती). ३) आय. सी. एस. ई. - दिल्ली बेस्ड नॉन ग्व्हर्न्मेंट संस्था, पण ईंटर्नॅशनल रेक्ग्नेशन्. शिकवायची पद्धत वेगळी. माहीतीतील जवळपास कोणी नाही. फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम, ईंग्लीश विषय(समजणे) चांगला केला जातो. फी वरील दोहोंच्या मधे. तोटे - नॉन ग्व्हर्न्मेंट संस्था त्यामुळे भविश्यातील नुकसान माहीत नाही. आजकाल बरेच लोक (६० ते ८० टक्के %) सि. बी. एस. ई. कडे पळतायत, कारण माहीत नाही. क्रुपया तज्ञांनी मार्गदर्शन करावे. धन्यवाद ईन अ‍ॅडव्हान्स. अवांतर : अभ्यासक्रम तपासतोय पण बरच वेळखाउ काम आहे. सि.बी. एस. ई. ला ९वी मधेच ११वीच गणीत दिसतय.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
सल्ला
माहिती
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत

प्रतिक्रिया द्या
41467 वाचन

💬 प्रतिसाद (120)

प्रतिक्रिया

+१

सस्नेह
Mon, 01/19/2015 - 15:41 नवीन
म्राठी मातृभाषा म्हणून सोपी जाईल हे अगदी खरं. पण बारावीनंतर मराठीतून शिक्षण देणारी किती महाविद्यालये आहेत आणि ती व्यवसाय मिळवून देण्यास उपयुक्त आहेत का ? ICSE साधारण CBSE ला समांतर आहे. बिंधास घे अ‍ॅडमिशन .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हो हे ही खरंय..

पिलीयन रायडर
Mon, 01/19/2015 - 15:54 नवीन
हो हे ही खरंय.. अजुन एक सांगते.. माझा नवरा.. "मला मार्कांशी मतलब नाही.." वाला आहे.. पण माझं थोडं वेगळं मत आहे.. धरुन चालु की आपला मुलगा हा सामान्य मुलांमध्ये येतो. (Highest Possibility). म्हणजे तो फार हुषारही नाही आणि फार ढ सुद्धा नाही. आता सामान्य मुलं सामान्यतः नोकरी करतात (Again Highest Possibility). म्हणजे माझ्याही मुलाला उद्या पदवी मध्ये चांगले मार्क्स पाडुन चांगल्या ठिकाणी नोकरी करावी लागेल. (चांगले मार्क्स - चांगले कॉलेज - चांगली प्लेसमेंट - चांगली नोकरी) म्हणजेच मार्कांना अगदीच कमी लेखुन चालणार नाही. त्याला खुप समजलं असलं पण परीक्षेत लिहुन मार्क पडत नसतील तर त्याला परीक्षा देण्याची पद्धत सुद्धा शिकावीच लागेल. ते ही स्किलच आहे. म्हणजेच आज मला असा अभ्यासक्रम निवडावा लागेल जो ह्या वरच्या सर्व मुद्यांना सगळ्यात चांगला सपोर्ट करेल. हा फार सरधोपट विचार आहे. पुढे माझ्या मुलाची प्रगती पाहुन मला अंदाज येईलच की त्याचा कल काय, आवड कसली, बुद्धी किती वगैरे.. पण आज मला Highest Possibilities धरुनच विचार करावा लागेल. Worst Case सुद्धा विचारात घ्यावी लागेल की जर तो प्रचंड ढ निघाला तर काय. सध्या तसं वाटत नाही. तसं झालं तर उपायही वेगळे असतील..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

आपले मुद्दे बरोबर आणि

गणेशा
Mon, 01/19/2015 - 16:42 नवीन
आपले मुद्दे बरोबर आणि मुद्देसुद आहेत. माझे आणि आपले विचार वेगळे असले आणि मी icse बोर्ड कधीही प्रेफर करणार नसलो तरी तुमचे मुद्दे पटले. विशेषकरुन .. फ्रेंच लँग्वेज, नो क्लास आणि शेवटचा मुद्दा ही. तुम्हाला सद्यपरिस्थिती मध्ये ICSE योग्य वाटतय.. परवडत आहे.. आनी पालक म्हणुन तुम्ही मुलाला मदत करु शकेन असं वाटतय तर तेच हवे असते मुलांना. आणि हे सर्वार्थाने योग्य वाटते. मला माझ्या जवळपासच्या icse शाळांच्या फी कमीत कमी ७०-८० हजार आहे हे माहीती आहे. बालेवाडीतील एखादी शाळा ३०-४० हजार फी वाली मला माहीती आहे. मला मात्र तरीही मराठी - आणि कॉन्व्हेंट ssc कडेच माझा ओढा वाटतो आहे. तुम्ही खाली जे मार्कच लिहिलेले आहे, जसे तुमच्या मिस्टरांचे म्हणणे आहे तसेच माझे ही आहे, हा अगदी कमी नाही पण बरे असले तरी बस्स.. फक्त कला/खेळ पाहिजेच असे माझे मत. आणि कमी फी मध्ये शिस्तप्रिय आणि वेळ मिळु शकणारी शाळा म्हणुन मी खालील ३ शाळा निवडलयात पण अजुन कमित कमी १ १/२ वर्षे टाईम आहे पण मला बाळाला शाळेत घालायला. शाळा. १. मार इव्हान्युअस, पिंपळे गुरव २. ज्ञान प्रबोधीनी(मराठी), निगडी प्राधिकरण ( लांब आहे पण ही शाळा बघु) ३. निर्मल बेथनी, काळेवाडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तिन्ही शाळा फार वेगवेगळ्या

पिलीयन रायडर
Mon, 01/19/2015 - 17:31 नवीन
तिन्ही शाळा फार वेगवेगळ्या लोकेशनला आहेत.. जवळची शाळा चांगली.. ज्ञानप्रबोधिनी तर उत्तमच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

एक सांगायचं राहिलं..

पिलीयन रायडर
Mon, 01/19/2015 - 19:49 नवीन
एक सांगायचं राहिलं.. मलाही खेळ फार महत्वाचा वाटतो.. त्यामुळे शाळेला खेळाची परंपरा आहे का हे ही मी बघते.. तुम्ही एकदा मी वर दिलेली लिंक पहा.. आणि त्याहुनही हे पहा - http://www.cisce.org/pdf/ICSE-Class-X-Syllabus-Year-2014/1.Syllabus%20Regulations.pdf ह्यात तुम्हाला विषय कोण कोणते आहेत हे कळेल.. आणि ते निवडायचे कसे असतात वगैरे हे ही.. सहज माहिती म्ह्णुन देते.. सगळ्यांनाच उपयोगी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

ज्ञानप्रबोधिनीवाले चिंचवडच्या

असंका
Tue, 01/20/2015 - 18:16 नवीन
ज्ञानप्रबोधिनीवाले चिंचवडच्या पुढे रहात असाल तर अ‍ॅडमिशन देतील का? आम्हाला घर बदलावे लागले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

नाही मिळणार...

मितान
Tue, 01/20/2015 - 20:18 नवीन
नाही मिळणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

तुम्हाला निगडीच्या

श्रीगुरुजी
Tue, 01/20/2015 - 22:55 नवीन
तुम्हाला निगडीच्या ज्ञानप्रबोधिनीत मुलाला घालायची इच्छा आहे का पुण्यातील टिळक रस्त्यावरील ज्ञानप्रबोधिनीत? पुण्यातील या शाळेत माझी मुलगी आहे. त्यामुळे या शाळेचे सर्व फायदे-तोटे व धोरणे मला माहिती आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

होम लर्निंग

ऋषिकेश
Wed, 01/21/2015 - 14:22 नवीन
मी बहुदा माझ्या मुलीला पहिली ५-७ वर्षे "होम लर्निंग स्कुल" असलेला एक पर्याय निवडणार आहे -- मातृभाषेतून शिक्षण -- शासकीय मान्यता नाही त्याचबरोबर ठराविक फिक्स्ड अभ्यासक्रम नाही. -- मुलांच्या कला कलाने अभ्यासक्रम ठरतो आणि घेतला जातो -- सगळे शिक्षण स्वानुभवातून असते. इयत्ता २रीपर्यंत एकही विषय नाही की पाठ्यपुस्तक नाही -- मातृभाषेतून शिक्षण मात्र सुरूवातीपासून ४ भाषांची ओळख (बोलणे) तिची पहिली काही वर्षे स्वतःचे जग स्वतःच्या आवडी समजून घेत, स्वत:ला आवडेल त्या वेगात जावीत म्हणून हा पर्याय निवडत आहे. पाचवीपासून तिचा बेस प्रयोगशील शिक्षणातून पक्का झाल्याने कोणत्याही एसएससी शाळेत घालेन असे म्हणतोय.
  • Log in or register to post comments

होम लर्निंग म्हणजे काय? पालक

पिलीयन रायडर
Wed, 01/21/2015 - 14:35 नवीन
होम लर्निंग म्हणजे काय? पालक स्वतः शिकवणार का? आणि ह्यात जर मुल शाळेत जाणार नसेल तर इतर मुलांमध्ये मिसळणे, मित्र-मैत्रिणी बनवणे, सहली, गॅदरींग, स्पोर्ट्स डे असं सगळंच राहुन जाईल ना. मला व्यक्तिशः शाळा ह्याच गोष्टींसाठी महत्वाची वाटते. बाकी अभ्यासक्रम तर आपणही करुन घेऊ शकतोच. पण मुलं शाळेतल्या बाईंच वेगळ्या पद्धतीने ऐकतात, तसं आपलं ऐकत नाहीत हे एक माझं निरीक्षण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

नाही शाळेत जायचं पण शाळेला

ऋषिकेश
Wed, 01/21/2015 - 16:21 नवीन
नाही शाळेत जायचं पण शाळेला शासकीय मान्यता नाही व शासकीय अभ्यासक्रम नाही. शाळेत जाणार, मित्रमैत्रिणी असणार. सहल दर महिन्याला आहे :) गॅदरिंग आहे, मुलांनी केलेल्या वस्तु विकायची जत्रा सुद्धा आहे. स्पोर्ट्स डे नसला तरी वर्षभर चुरस निर्माण होईल अशी पॉइंट सिस्टिम आहे. शिवाय मुलं कधी शेतात जाऊन शेती समजून घेतात तर कधी गॅरेजमधे आठवडा काढून गाड्यांची मशीन्स. कधी काही छायाचित्र्कार येऊन १०-१२ दिवस निस्ते छायाचित्रणमय वातावरण असते तर कधी संगीताच्या संगतीत कित्येक दिवस जातात. दर आठवड्याला पालक व मुले मिळून स्वयंपाक करतात विषय, वेळापत्रक वगैरेचं बंधन प्राथमिक यत्तांना नसते. वेगळा प्रकार आहे पण शासकीय मान्यता नसल्याने रिस्कही आहेच. पुण्यात अशी ग्राममंगल म्हणून एक कोथरूडला शाळा आहे (अजूनही २-३ आहेत). मी त्या शाळेचा विचार करतो आहे. (ऑलमोस्ट नक्की केले आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पोर खर्या शाळेत जायला वैतागेल

टवाळ कार्टा
Wed, 01/21/2015 - 16:27 नवीन
पोर खर्या शाळेत जायला वैतागेल नंतर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

तीला खूपच आवडलं तर १०वीपर्यंत

ऋषिकेश
Wed, 01/21/2015 - 16:39 नवीन
तीला खूपच आवडलं तर १०वीपर्यंत शिकायची सोय आहे :) काही विद्यार्थी तसे बाहेरही पडले आहेत. त्यांनाच गाठून बोलायचे आहे म्हणून निर्णय नक्की करायला थांबलो आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अरे वा.. मला अजिबात माहिती

पिलीयन रायडर
Wed, 01/21/2015 - 16:29 नवीन
अरे वा.. मला अजिबात माहिती नव्हतं ह्याच्या बद्दल.. आता तर मी हा पर्याय निवडु शकत नाही कारण मी शाळा फायनल केली आहे.. पण हा पर्याय उत्तम आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

मस्त संकल्पना.मलाही अशा शाळेत

अजया
Wed, 01/21/2015 - 16:24 नवीन
मस्त संकल्पना.मलाही अशा शाळेत जायला आवडलं असतं.
  • Log in or register to post comments

शाळा बदल

कपिलमुनी
Wed, 01/21/2015 - 17:12 नवीन
बदली झाली देशांर्तगत जसा की पुणे ते चेन्नई / बेंगळुरू / दिल्ली तर अशा प्रसंगी कोणत्या शाळा सोयीच्या ? आणि भविष्यात २-३ वर्षासाठी सहकुटुंब परदेशी राहावे लागणार असेल तर आतापासून कोनत्या शाळेत अ‍ॅडमिशन घेतली पाहिजे ?
  • Log in or register to post comments

जिव्हाळ्याचा विषय....

मनिष
गुरुवार, 01/22/2015 - 00:05 नवीन
आम्हीही सध्या ह्याच स्थितीत आहोत. अर्थात, बोर्डापेक्षाही शाळा महत्वाची हे आमच्या मनात नक्की आहे. कित्येक जुन्या SSC शाळा ह्या नव्यानेच चालू झालेल्या 'XYZ International School' किंवा तत्सम शाळांपेक्षा निश्चितच सरस आहेत. त्यामुळे अशी कुठलीही CBSE/ICSE शाळा सगळ्या एस. एस. सी. शाळांपेक्षा चांगली असते हे मला अर्थातच पटत नाही. पुण्यात 'अक्षरनंदन' ही मराठी शाळा अतिशय चांगली आहे, किंवा जुन्या इंग्लिश मिडियम पैकी लॉयला, सेंट व्हिन्सेंट, सेंट मेरी, सेंट जोसेफ (पाषाण) ह्या एस. एस. सी. शाळा कित्येक नवीन CBSE/ICSE शाळांपेक्षा चांगल्या आहेत. हे असले, तरीही पिरा यांच्या ह्या मताशी मी बहुतांशी सहमत आहे. CBSE प्उस्तकांत मॅथ्स आणि सायन्स खूप नीट आणि सविस्तरपणे समजवले जातात. कित्येक १०+२ नंतरच्या प्रवेश परिक्षा ह्या CBSE पॅटर्नवर असल्यामुळे तसेच पुर्ण भारतभर भरपूर CBSE शाळा असल्यामुळे बहुतेकांची सध्या पसंती CBSE शाळांना असते. ह्यामुळेच कित्येक SSC शाळा आता CBSE होत आहेत किंवा CBSE ची पुस्तके वापरतात. केंद्रीय विद्यालय सोडले तर बाकी CBSE शाळांमध्ये प्रमाणित NCERT ची पुस्तके नसतात, शाळा स्वतःला सोयीस्कर अशा लेखकांची/प्रकाशनांची पुस्तके घ्यायला सांगतत. CBSE/ICSE शाळांमध्ये SSC सारखी एकच बालभारतीची पुस्तके नसतात. मी स्वतः SSC मधून ११ वीत गेलो तेंव्हा मला हे पहिल्यांदाच कळले होते, आणि मग जेंव्हा CBSE ची पुस्तके पाहिली तेंव्हा आपली SSC ची पुस्तके किती तोकडी होती हे जाणवले. आता SSC किंवा CBSE चा अभ्यासक्रम (syllabus) जवळपास सारखाच आहे, पण coverage आणि पुस्तकात तो कसा समजावून दिला आहे त्यात खूप फरक आहे. आता SSC ची पुस्तके खूप सुधारली असली तरीही CBSE सरस आहेत. पण....पुण्यात आजही मराठी निदान वैकल्पिक म्हणून शिकवणार्‍या CBSE शाळा बोटावर मोजण्या इतक्याच आहेत. कित्येक CBSE शाळा दुसरी-तिसरीत तोंडी मराठी शिकवतात, आणि मग मराठीशी फारसा संबंध नसतो. :( आम्हीही सध्या थोडे गोंधळलो आहेत - अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर फार ताण/होमवर्क नसणारी आणि पुस्तकाबाहेरही खूप शिक्षण असते ह्यावर ठाम विश्वास असणारी शाळा शोधतो आहे. मुलांना स्वतःला विचार करायला, प्रयोग करायला प्रोत्साहन देणारी आणि त्यांची individuality ('स्वत्व') जपणारी शाळा हवी आहे. 'अक्षरनंदन' बघितली, तिथून शिकलेली आणि वेगवेगळ्या व्यवसायात असलेली मुले/मुलीही माहिती आहेत आणि त्यातल्या काही जणांशी बोललोही आहे, खूप वेगळी आणि 'स्वत्व' गवसलेली मुले वाटली ती. २१-२२ वर्षाच्या मुलांनी बसवलेली नाटके पाहिली तर त्यांच्य विचारंची/बुद्धीची झेप लक्षात येते, पण मराठी मिडीयम असल्यामुळे बरीच काळजी वाटते - आम्ही दोघेही मराठी मिडीयम मध्ये शिकलो नाहीत. शिवाय ११वीत vernacular शाळेत शिकलेल्या मुलांचे हालही पाहिलेत (खूप चांगले cope-up केलेलेही माहित आहेत), तसेच अजून १० वर्षे महाराष्ट्रातच राहू ह्याचीही खात्री नाही. शिवाय तिथे बहुतेक सगळेच महाराष्ट्रीयन, त्यामुळे होणारे मोनो-कल्चर हेही मला फारसे चांगले वाटत नाही. त्यामुळे 'अक्षरनंदन' चा विचार बाजूला ठेवला. (अर्थात तिथे थेट पहिलीत अ‍ॅडमिशन मिळणेही अवघड आहे) अजूनही मला 'अक्षरनंदन' म्हटले की थोडी चलबिचल होते. SSC बोर्ड स्वीकारूनही त्यांनी स्वतःची वेगळी आणि अतिशय चांगली ओळख निर्माण केली आहे. कोणाला मराठी मिडीयम चालणार असेल, तर पुण्यात 'अक्षरनंदन' हा खूप चांगला पर्याय आहे. आमचा पिलू आता ५.५ वर्षांचा आहे, आणी त्याची सध्याची माँटेसरी खूपच छान आहे, 'शिकलेच पाहिजे' असा दबाव नसल्याने आणि तिथल्या अतिशय मोकळ्या वातावरणामुळे तो खूप काही शिकला आहे आणि खूप काही-काही बनवत अस्तो. त्यामुळेच आम्ही आत्तापर्यंत दुसर्‍या शाळेत टाकले नाही, पण ती आता संपेल आणि पहिलीसाठी योग्य शाळेचा शोध सुरू आहे. पण Nursery/Jr. KG मधेच बर्‍याच अ‍ॅडमिशन होत असल्याने आणि RTE मुळे पहिलीत अ‍ॅडमिशन फार कमी आहेत. थोडी relaxed असणारी, फार अभ्यास-अभ्यास न करणारी आणि उत्तम सुविधा असणार्‍या एका ICSE शाळेत अ‍ॅप्लाय केले आहे (त्यांची फी खूप जास्त असली तरीही), तिथे झाले तर फारच छान, नाहीतर मग कुठल्या शाळेत घालावे हा आमच्यापुढचा सध्याचा मोठ्ठा पेच आहे. आमच्या अपेक्षा साधारणपणे अशा आहेत -
  • फार ताण/होमवर्क नसणारी आणि पुस्तकाबाहेरही खूप शिक्षण असते ह्यावर ठाम विश्वास असणारी, मुलांना स्वतःला विचार करायला, प्रयोग करायला प्रोत्साहन देणारी आणि त्यांची individuality ('स्वत्व') जपणारी शाळा हवी आहे. त्यांना जरा मनमोकळेपने जगू द्यावे, निदान सातवी-आठवीपर्यंत तरी फार अभ्यासाचे ओझे नको. मलाही मार्कांशी फार घेणे-देणे नाही. खेळ आणि इतर उपक्रम भरपूर असावेत. बागकाम किंवा स्वयंपाक असल्यास फारच छान.
  • Co-ed आणि English मिडियम हवी पण तिथे निदान ६वी-७वी पर्यंत तरी मराठी शिकवावे. पुण्यातल्या कित्येक CBSE/ICSE शाळा खास उत्तर भारतियांसाठी उघडल्यात का असे वाटावे इतका मराठीचा दुस्वास करतात. आम्हाला convent ही नको आहेत. कॉस्मो संस्कृती चालेल्/आवडेल पण मराठीची लाज किंवा द्वेष नको.
  • CBSE बोर्ड असले तर आवडेल, पण ती अट नाही, शाळा चांगली असेल तर मग कुठलेही बोर्ड चालेल. पण बोर्ड हवे - शासकीय मान्यता नसलेल्या आणी अतिशय वेगल्या विचाराने चाललेल्या २-३ शाळा माहित आहेत, पण तेवढे धाडस नाही अजून! :( पण तो पर्याय अगदीच मोडीत नाही टाकला - कदाचित थोड्या अजून विचाराने आणि बायकोला पटवता आले, तर अशा शाळेत अ‍ॅडमिशन घेऊ कदाचित. पण मला स्वतःला एखाद्या बोर्डाच्या स्ट्रक्चर मधे राहून स्वतःचे वेगळेपण जपणारी शाळा जास्त आवडेल (अक्षरनंदन सरखी), तेवढे स्वातंत्र्य शाळांना निदान ७वी पर्यंत तरी नक्कीच असते. 'अमनसेतू' अशीच एक मुलखावेगळी ICSE शाळा आहे - ती सुध्दा आवडते, पण ती आम्ही राहतो त्याच्या दुसर्‍या टोकला आहे, त्यामुळे तोही पर्याय नाही! :(
तर, कोणाला बावधन, कोथरुड, कर्वे-रोड, बाणेर, पाषाण, औंध किंवा ह्याच्या जवळच्या परिसरात आमच्या अपेक्षात बसणार्‍या दुसर्‍या शाळा माहीत असतील तर अवश्य सुचवा, खूप मदत होईल. पिरा - तू/तुम्ही कुठली शाळा नक्की केली? व्यनी करणार का? ऋषिकेश भेटून बोलुया का? ग्राममंगल विषयी थोडा वाईटही फीडबॅक मिळाला आहे. पण मलाही आवडती शाळा तू म्हणतो तशीच वाटते - जरा निवांत आणि सविस्तर बोलायचे का?
  • Log in or register to post comments

१. अक्षरनंदन निर्विवाद चांगली

पिलीयन रायडर
गुरुवार, 01/22/2015 - 13:36 नवीन
१. अक्षरनंदन निर्विवाद चांगली शाळा आहे. पण आम्हाला खुप लांब पडतेय म्हणुन तो पर्याय नाईलाजाने सोडून दिला. शाळाअ घराजवळ हवी हा मुख्य मुद्दा होता. २. मराठी वातावरण हवे हे ही महत्वाचे. मला स्वतःलाही हिंदाळलेल्या आणि मराठीला महत्व न देणार्‍या शाळा आवडत नाहीत. ३. बोर्ड महत्वाचे आहेच.. मलाही मुलाला इंग्लिश मिडियम मध्ये घालायचे होते. आता SSC - इंग्लिश मिडीयम शाळा म्हणजे नावाला इंग्लिश मिडियम... शिवाय ह्याही शाळा अनुदानित नसल्याने शाळांचे नाव जरी मोठे असले तरी शिक्षक सतत बदलत असणार (आणी हा प्रॉब्लेम सगळीकडे असणार...) ४. माझ्यातही ऋषिकेश सारखी हिम्मत नाही.. :( त्यामुळे शासकिय मान्यता असलेले बोर्ड माझ्यासाठी मस्ट... आणि आता फायनली मला ह्याचा विचार करुन फार कंटाळा आलाय... जे होईल ते होइल असं ठरवुन अ‍ॅड्मिशन घेतली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

>>> जुन्या इंग्लिश मिडियम

खेडूत
गुरुवार, 01/22/2015 - 19:25 नवीन
>>> जुन्या इंग्लिश मिडियम पैकी लॉयला, सेंट व्हिन्सेंट, सेंट मेरी, सेंट जोसेफ (पाषाण) ह्या एस. एस. सी. शाळा कित्येक नवीन CBSE/ICSE शाळांपेक्षा चांगल्या आहेत. * यांपैकी सेंट मेरीज फक्त आयसीएसई वाली आहे ! बाकी अनेक मुद्द्यांशी सहमत . महाराष्ट्रात रहायची खात्री नसेल तर CBSE बरी म्हणजे नंतर त्रास होत नाही. महाराष्ट्रात नाही राहिले तरी दहावी ते बारावीला इथे परत येण्याचा प्लान असावा म्हणजे नंतर भटकंती टाळता येईल. याआधी म्हटलंच आहे त्याप्रमाणे परदेशी जावे लागणार असेल तर ICSE बरी. कारण तिकडे सहज प्रवेश मिळतो. प्रयोगशील शाळा चांगल्या असल्या तरी त्यांत सातत्य असण्याची खात्री नसते. 'त्या' शाळांत मिळणार्या विशेष गोष्टी बाहेर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करता येईल. त्यात जोखीम,नाही. मी गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकलो म्हणून आता मनपा शाळेत मुलांना पाठवणारे पण माहिती आहेत. तर दुसरीकडे विविध पंथ/ योग वाले शाळा काढतात. त्याची आश्रम पधधत वगैरे असते- पण एकूणच असले दु:साहस तर नकोच. आत्ता बरी वाटेल ती शाळा घेऊन पुढे पाचवीपर्यंत बदलता पण येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

सर्वोत्तम शाळा

संदीप डांगे
गुरुवार, 01/22/2015 - 01:08 नवीन
जी शाळा आई वडिलांना होमवर्क देत नसेल ती सर्वोत्तम शाळा, असे आमचे एक ठाम मत आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा