✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ७

च
चतुरंग यांनी
Mon, 11/17/2014 - 17:48  ·  लेख
लेख
मागच्या डावातल्या सिसिलिअन नंतर आनंदने पुन्हा एकदा बर्लिन डिफेन्स निवडलाय! हा मॅग्नुसचा बालेकिल्ला समजला जातो त्यामुळे आनंदने कोणते विरिएअशन सुट्टीच्या दिवसात तयार केले आहे हे बघायची उत्सुकता आहे. आनंद वेगाने खेळतोय त्यामुळे तयार होऊन आलाय हे नक्की. आज त्याला किमान बरोबरी करावीच लागेल अन्यथा सामन्याचे पारडे बरेचसे मॅग्नुसच्या बाजून झुकेल हे नक्की. चला डाव बघूयात.

Book traversal links for आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ७

  • ‹ आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ६
  • Up
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ८ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
21882 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

असो,

संजय क्षीरसागर
Mon, 11/17/2014 - 23:52 नवीन
ड्रॉचं प्रपोजल कसं देतात ते सांगू शकाल का?
  • Log in or register to post comments

आज खरंतर

चतुरंग
Mon, 11/17/2014 - 23:55 नवीन
दोघेही चांगले खेळले परंतु नंतर उगीचच्या उगीच डाव लांबवून कार्लसनने अखिलाडूपणाने त्याचे फ्रस्ट्रेशन आनंदला चेंबवण्यात काढले. आनंद उद्या उट्टं काढतोय बघा!! उद्या कार्लसन दाबून मार खाणार!!! :)
  • Log in or register to post comments

+१

रामपुरी
Tue, 11/18/2014 - 00:04 नवीन
डाव केव्हाच ड्रॉ झाला होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हुश्श

रमताराम
Mon, 11/17/2014 - 23:56 नवीन
आनंदने एक काम चांगले केले. अखेर कार्ल्यालाच ड्रॉ साठी मूव करायला लावली. अन्यथा हत्ती घोडा एक्स्चेंज मारून त्याला एकाहुन अधिक वेळा ड्रॉ घेता आला असता. पण मॉरल विक्टरीसाठी त्याने 'चल, तू मला थकवून हरवायच्या गमजा करतोस ना, चल बघू काय करतोस ते' असा च्यालेंज देत एक्स्चेंज न घेता डाव चालू ठेवला.
  • Log in or register to post comments

हत्ती घोडा

चतुरंग
Mon, 11/17/2014 - 23:58 नवीन
एक्सचेंज ड्रॉ होत नाही.. हत्ती राजाने मात होते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

:)

रमताराम
Tue, 11/18/2014 - 00:43 नवीन
:) थिअरेटिकली होते हो, पण 'आनंद' वर होण्याची शक्यता किती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

थिअरेटिकली नाही हो

चतुरंग
Tue, 11/18/2014 - 01:05 नवीन
चांगली प्रॅक्टिकली होते...सोपी असते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

धत्तेरे की

रमताराम
Tue, 11/18/2014 - 10:11 नवीन
चूक माझी आहे. घोड्याऐवजी हत्ती लिहलंय मी वर. हत्तीसह १००% असतेच की एक पट्टा धरून ठेवून सहज चेपता येते. घोड्यासह फक्त कोपरा गाठावा लागतो आणि तिथेही स्टेलमेटचा धोका मोठा असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नाही

चतुरंग
Tue, 11/18/2014 - 21:54 नवीन
एक घोडा आणि राजा यांनी मात होऊ शकत नाही, एक उंट आणि राजाने देखील नाही. म्हणून तर शेवटी एक घोडा राहिल्यावर बरोबरी मान्य झाली ना? नाहीतर आनंदने हत्तींची ती मारामारी होऊच दिली नसती. दोन घोडी आणी राजा किंवा दोन उंट आणि राजा यांनी मात होऊ शकते परंतु तेदेखील अतिशय कठिण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

थोडी सुधारणा

रामपुरी
Wed, 11/19/2014 - 05:22 नवीन
दोन उंट आणि राजाने मात अगदीच सोपी आहे. योग्य बचाव केल्यास दोन घोडे आणि राजाने ५० खेळ्यांचा नियम पाळून मात अशक्य आहे. अर्थात पटाच्या स्थितीवर ते अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

१००%

रामपुरी
Tue, 11/18/2014 - 01:58 नवीन
पण 'आनंद' वर होण्याची शक्यता १००%. कशीही पोझिशन असेल तरी जास्तीत जास्त १६ खेळ्यांमध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

माझ्यामते १६ खेळ्यांचा नियम

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 11/18/2014 - 12:03 नवीन
माझ्यामते १६ खेळ्यांचा नियम अधिकृत नाही. मिपाकरांनी भाषांतरित केलेली बुद्धिबळ नियमावली वाचावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

हा नियम नाही

रामपुरी
Tue, 11/18/2014 - 21:25 नवीन
हत्ती आणि राजा विरूद्ध राजा एवढेच पटावर असतील तर कितीही प्रतिकूल स्थिती मध्ये, अगदी अचूक खेळी करूनही जास्तीत जास्त १६ चालींमध्ये मात होऊ शकतो. जशी राजा आणि वजीर विरुद्ध राजा या स्थिती मध्ये जास्तीतजास्त नऊ चालीत मात होऊ शकते, राजा, उंट आणि घोडा विरुद्ध राजा या स्थिती मध्ये जास्तीतजास्त पस्तीस चालीत मात होऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मस्त एंडगेम

रामपुरी
Mon, 11/17/2014 - 23:57 नवीन
मागच्या डावाप्रमाणे यावेळी चूक न करता उंटाने प्यादी मारल्याने वाचला आज आनंद. पण मागच्या सामन्याप्रमाणे एंडगेम मध्ये कार्लसनसमोर हार मानली नाही यातच 'आनंद'.
  • Log in or register to post comments

समालोचन आवडल.

जेपी
Tue, 11/18/2014 - 06:55 नवीन
समालोचन आवडल. कार्लसनप्रमाणे इथ काही लोक आपलच घोड पुढे दामटवु लागेल ते पाहुन मजा *wink* स्वभावाला इलाज नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा