#मोदीइनअमेरीका
सगळ्यांना न्यूयॉर्कला येणे शक्य नव्हते, विशेष करून विद्यार्थ्यांना त्यामुळे १९ राज्यांमधल्या ४५ विद्यापिठांमधल्या भारतीय विद्यार्थी संघटनांनी थेटप्रक्षेपणा एकत्रित पहाण्याची विशेष व्यवस्था केली होती. तुमच्यातल्या अनेकांनी देखील हा कार्यक्रम इंटरनेटद्वारा पाहीलेला असू शकतो.
पहाटे चार वाजता बॉस्टनहून निघालो आणि पार्कींग वगैरे मिळून सव्वा आठच्या दरम्यान मॅडीसन स्क्वेअर गार्डनच्या बाहेरच्या आवारात पोचलो तर मैलभर किंवा त्याहूनही मोठी रांग! सुरवातीस मोठी रांग पाहून सुरक्षेतून वगैरे वेळेत पोचू का अशी शंका होती पण व्यवस्था चांगली होती हे अनुभव आल्यावर समजले!
१८,००० जागांचे हे स्टेडीयम भरले होते. त्यात अक्षरशः अबालवृद्ध, विविध भाषिक भारतीय, विविध धर्मिय, पंथीय दिसले. भारतात असताना भाजपाचे पारंपारीक समर्थक असलेले जसे यात होते तसे अगदी भाजपाचे पारंपारीक समर्थक नसलेले देखील होते. पण यातील प्रत्येकाला मोदींमुळे काही चांगले बदल घडतील अशी आशा किंबहूना खात्रीच आहे असे जाणवत होते.
आत प्रवेश केल्यावर प्रत्येक तिकीटास एक अशा पध्दतीने एक टिशर्ट देण्यात आला. लहानसे अमेरीकन आणि भारतीय झेंडे पण वाटणे चालले होते. त्या झेंड्यांमध्ये काठी/काडी नव्हती. का? तर सुरक्षा म्हणून! याची अंमळ गंमत वाटली! मोदी ११:३० ला येणार होते. त्या आधी आत बसलेल्या मोठ्या जनसमुदायास खिळवून ठेवण्यासाठी स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम झाले.
नंतर कविता कृष्णमुर्ती यांनी काही गाणी म्हणली. ह्यातील एका गाण्याच्या वेळेस एक अमेरीकन चित्रकाराने रंगाचे फराटे मारत ज्या पद्धतीने मोदींचे चित्र काढले ते प्रत्यक्ष बघताना खूपच आवडले. जनतेने त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. मिस अमेरीका २०१४४ निना दावुलूरी आणि अमेरीकेतील पब्लीक ब्रॉडकास्टींग स्टेशनचा वृत्त निवेदक हरी श्रीनिवासन हे कार्यक्रमाचे संयोजन करत होते. वातावरणात प्रचंड उत्साह दिसत होता.
मनोरंजनाचे कार्यक्रम झाल्यावर स्टेजवर अमेरीकन राजकीय नेत्यांना बोलावण्यात आले. त्यात जवळपास ३० सिनेटर्स, काँग्रेसमेन आणि साउथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर (भारतीय वंशाच्या) निकी हिली असे सर्व स्टेजवर आले. त्यांच्या उपस्थित मग मोदींचे स्वागत झाले!
नंतर अमेरीकन आणि भारतीय राष्ट्रगीताने अधिकृत कार्यक्रमाची सुरवात झाली.
मोदींच्या भाषणात एकाच वेळेस भारतीय, अनिवासी भारतीय आणि अमेरीकन राज्यकर्ते, धोरणकर्ते तसेच उद्योजक यांच्याशी संवाद करण्याचे कौशल्य जाणवले. भाषण केवळ गोडगोड नव्हते तर देश घडवण्यासाठी प्रत्येकाकडून सहकार्य मिळवण्याचे आवाहन त्यात होते. भाषण पूर्णपणे हिंदीत झाले. पण क्षणार्धात भाषांतर करून ते स्क्रीन वर सबटायटल म्हणून दाखवले जात होते. तसेच, स्वतः मोदी जनतेला भावेल अशा शब्दात बोलत असताना देखील त्यांच्या कौतूकाने ओतप्रोत भरलेल्या प्रसंगात देखील पाय जमिनीवरच ठेवून होते असे त्यांच्या हालचालींवरून समजू शकत होते.
कार्यक्रमानंतर अनेकांशी संवाद झाला तसेच फेसबूक अपडेट्स पाहीले. यातील अनेक जण हे कधीच भाजपाचे नव्हते, मोदींचे असण्याचा प्रश्नच नाही... पण तरी देखील यातील प्रत्येकास/प्रत्येकीस देशाला नेतॄत्व मिळाले असे वाटत होते. मोदींच्या खांद्यावर अपेक्षांचे मोठे ओझे आहे. त्यांच्या बोलण्यातून आणि जे काही बातम्यातून वाचले जात आहे त्यातून सतत काहीतरी वेगळा विचार आणि त्याबरोबर सक्रीयता दिसत आहे. जर हा आलेख सकारात्मक वाढत राहीला तर जनता केवळ मोदींवरच खुश होईल असे नाही तर जो काही राज्यकर्ते, सरकार या बद्दलचा भ्रमनिरास झालेला आहे, भारतीय व्यवस्थेबद्दल नैराश्य आले आहे, त्यातून बाहेर पडू शकेल असे वाटते. ते तसेच व्हावे अशी मनोमन प्रार्थना!
माझ्या दृष्टीने स्टेजवर झालेले मोदींचे स्वागत, हे कार्यक्रमाचे एकाअर्थी शिखर होते.
ज्या माणसाला मुळच्या त्याच्याच देशातील असलेल्या व्यक्तींनी राक्षस ठरवण्याचा प्रयत्न केला आणि अमेरीकेतील कधिही न वापरल्या गेलेल्या एका कायद्याचा वापर करत अमेरीकन सरकारला असलेला व्हिसा रद्द करायला लावला आणि जे अमेरीकन सरकारने देखील ऐकले, त्या माणसास आज त्याच्याच देशातील जनतेनी निर्विवाद बहुमताने निवडून दिल्यावर अमेरीकन राज्यकर्ते केवळ व्हिसाच देण्यास उभे नव्हते तर स्वागतासाठी एका कम्यिनिटी इव्हेंटमधे हजेरी लावत होते! ह्यात मोदींची प्रतिमा जशी स्पष्ट दिसत होती तशीच "मोदी भक्त" नाही तर मोदींनी घेतलेल्या आव्हानाचे आणि कार्याचे समर्थक असलेल्या अनिवासी भारतीयांचे अमेरीकेतील राजकीय सामर्थ्य देखील दिसू शकले.
हे केवळ "कालाय तस्मै नमः" आहे, का बारा वर्षे आतून बाहेरून सर्व निंदानालस्ती मुकाट्याने सहन करून, "अधिष्ठान, अहंकार, तशी विविध साधने, वेगळ्याला क्रिया नाना" आचरून, "पाचवे असलेले दैव" स्वकर्तुत्वाने मिळवले? हा एक चर्चचा मुद्दा होऊ शकतो. यात मोदी समर्थक अथवा विरोधक हा मुद्दा नाही. त्यांचे पंतप्रधान म्हणून कार्य जोखणे चालूच राहील आणि राहीले पाहीजे देखील! त्यांचे काही निर्णय आवडतील अथवा काही पटणार नाहीत... ते सर्व येणार काळ ठरवेल... पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे! वर्गीकरण
प्रतिक्रिया
कार्टून आवडले
आणि ड्यू.आय.डी प्रमोट करायचा
धन्यवाद
मोदी ह्यांनी भारतातून नर्सेस
हे खरं
@......निनाद......सहमत....!!!
व्हिसा मोदींना नाहीच
कोणाला नाकारला गेला होता?
भलत्याच अपेक्षा
हो.बरोबर
व्हिसा 'मोदींना' नाकारला गेला
हेच ते
किंचित फरक..
जागता पहारा
हेही तेच.
चला
@ विकास
ताक :-India is benefiting
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काँग्रेसी कुलदैवताची कुलंगडीधन्यवाद