भाव चलित कुंडली आणि इतर षोडशवर्ग कुंडल्या ....

Primary tabs

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
25 Jun 2014 - 4:44 pm
गाभा: 

महत्वाची सुचना:
ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....
चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे.
त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद!!!

चर्चेचा विषय:
निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते??
लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ?

उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ?

लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते?
तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात?

उदा: नवमांश कुंडली कशी बघायची ?

कृपया विस्तार पूर्वक चर्चा येथे अपेक्षित आहे.
धन्यवाद!!!

प्रतिक्रिया

ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....

ज्योतिष हे शास्त्र नाही. बाकी चालू दया.

प्रचेतस's picture

25 Jun 2014 - 5:33 pm | प्रचेतस

आणि शास्त्रात नसलेले हे प्रकार अतिशय भंपक असतात.

तुषार काळभोर's picture

27 Jun 2014 - 6:00 pm | तुषार काळभोर

यू सी, द व्होल कंट्री ऑफ द सिस्टम इज जक्स्टापोजिशन्ड बाय द हीमोग्लोबीन इन द अ‍ॅट्मोस्फिअर बिकॉज यू आर अ सोफिस्टिकेटेड र्‍हिटोरिसिअन इन-टोक्सिकेटेड बाय द एक्झिब्युरन्स ऑफ युअर ओन व्हर्बोसिटी...

मार्कस ऑरेलियस's picture

25 Jun 2014 - 7:06 pm | मार्कस ऑरेलियस

ज्योतिष हे शास्त्र नाही

>>> आमच्या भावना दुखावल्या :D

निमिषराव तुम्ही घाबरु नका , आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ,ही घ्या उत्तरे

निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते??
>> ह्या प्रश्न्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या
काली फॉस-६- + कल्के फ्लुऑर-६ + सिलिका-६ तीन तीन गोळ्या एक / दोन वेळा
लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ?
>> ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या
काळी फॉस ६, ३० -------------- हया क्षारासारखा दुजा हितचिंतक नाही

उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ?
>>
ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या
काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम मूर ३० च्या पाच ग्रेनच्या वडया अर्धा ग्लास पाण्यात टाकून १०—१० मिनिटांनी एकएक चमचा मिश्रण नंतर १५—१५ मिनिटांनी त्सेक चमचा मिश्रण सातत्याने

लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते?
>>
ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या
Aethusea-------- Fool”s Parsley

तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात?
उदा: नवमांश कुंडली कशी बघायची ?
>>
ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या
Argentnum Nitricum ------ नावाचे एक औषध आहे,

साधी औषधे अमाप गुण देतील, सल्ला अवश्य घ्या काली फोस १२ ++ कल्के फ्लुओर १२ आणि फेरम फोस १२ असो.

:D

धन्या's picture

25 Jun 2014 - 7:26 pm | धन्या

आमच्या भावना दुखावल्या

फारच ब्वा नाजूक तुमच्या भावना. अगदी उठल्या बसल्या* दुखावतात.

* हे नेमकं काय आहे सांगायची गरज नसावी. ;)

बॅटमॅन's picture

25 Jun 2014 - 7:31 pm | बॅटमॅन

ळॉळ @ गिर्जाप्रसाद आणि

अश्लील धन्य ;)

मार्कस ऑरेलियस's picture

25 Jun 2014 - 7:32 pm | मार्कस ऑरेलियस

धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ... आमच्या होमिऑपॅथी ला शास्त्र मानत नाहीस , ज्योतिष शास्त्राला शास्त्र मानत नाहीस ...
थांबतुझ्यावर भानामतीच सोडतो ... हे घे ... ओम फट स्वाहा

a

थांबतुझ्यावर भानामतीच सोडतो ... हे घे ...

भानामती करणे हे वाईट कर्म आहे. त्याची चित्रगुप्ताच्या वहीत नोंद होऊन ते तुमच्या संचित कर्मात जमा होईल. अणि योग्य वेळ येताच या संचित कर्माचे क्रियमाण कर्मात रुपांतर होऊन त्याची फळे तुम्हाला भोगावी लागतील. एक लक्षात ठेवा, कर्माचा सिद्धांत कुणालाच सोडत नसतो.

मार्कस ऑरेलियस's picture

25 Jun 2014 - 7:42 pm | मार्कस ऑरेलियस

कर्माच्या सिध्दांताला .... सिध्दांत कर्मेला आम्ही काली फॉसीफोरम ६ ३० देतो ... शाबुदाण्याच्या पवित्र गोळ्यातुन ... मग तो बाधत नाही =))

प्रचेतस's picture

25 Jun 2014 - 7:48 pm | प्रचेतस

अरे काय हे,
निदान धागाकर्त्याच्या भावनांचा तरी विचार करा. =))

खर्‍या ज्योतिषाचा तोडग्यांवर विश्वास नसतो. त्याच्या दृष्टीने तोडगे हे थोतांड असते. एकदा ग्रहदशेचा फेरा आला की त्या व्यक्तीला तुमच्या शाबुदाण्याच्या पवित्र गोळ्यातुन दिलेले काली फॉसीफोरम ६ ३० ही वाचवू शकणार नाही.

च्यायला जे तोडग्यांनी, अंगारे-धुपारे, गंडे-तावित वापरुन किंवा कसलीशी पोथी वाचून बदलता येतं ते प्राक्तन कसलं :D

सूड's picture

25 Jun 2014 - 7:59 pm | सूड

>>काली फॉसीफोरम ६ ३०

ही कोणती पट्टी म्हणे गाण्याची? पाचेक महिन्यापूर्वी मी पांढरी सहावर सरगम आणि छोटे छोटे अलंकार वाजवत असे, आताशा सराव मोडलाय. ;)

मार्कस ऑरेलियस's picture

25 Jun 2014 - 8:00 pm | मार्कस ऑरेलियस

अरे मुढ बालका तुझा अजुन लक्षात आलेले नाही

काली फॉसीफोरम म्हणजे साक्षात आत्मतत्व !

त्याला कसली आलीये ग्रहदशा ? एकदा का ते घेतले की तुम्ही तद्रुपच होवुन जाता ...मग काय मज्जाच मजा ... नैन छिंदन्ति शस्त्राणि नैन दहति पावका: =))

धन्या's picture

25 Jun 2014 - 8:14 pm | धन्या

क्षमा असावी महाराज.

आमचे ज्ञान महाराष्ट्र शासनाच्या पाठयपुस्तक महामंडळाने छापलेल्या विज्ञानाच्या पुस्तकातील न्युटनच्या नियमांपुरतेच मर्यादीत आहे. नाही म्हणायला अभियांत्रिकीला असताना ओहमच्या नियमाचा अभ्यास केला होता. परंतू काम संगणकाच्या क्षेत्रात करत असल्यामुळे आता तोही विसरलो आहे.

आदूबाळ's picture

25 Jun 2014 - 9:29 pm | आदूबाळ

ओहमचा कसला आलाय नियम? सोsहमच्या नियमाचा अभ्यास करा.

सस्नेह's picture

25 Jun 2014 - 9:37 pm | सस्नेह

ओहम झीरो झाल्याशिवाय सोहम पर्यंत पोचूच शकणार नाही तुम्ही ! बेट !

S.प्रशांत's picture

25 Jun 2014 - 10:22 pm | S.प्रशांत

ओहमचा नियम वापरला नाही तर "भविष्य" अंधारात जाईल !!!

ओहम आणि सोहम राहू द्या बाजूला. मला हल्ली "कोहम" हा प्रश्न पडतो.
त्याचे उत्तर कुठल्या कुंडलीत पाहावे, लग्न कुंडली, भाव चलित कुंडली की नवमांश कुंडली?

हाडक्या's picture

25 Jun 2014 - 8:29 pm | हाडक्या

केला राव गंभीर धाग्याचा काश्मीर.. *lol*

बॅटमॅन's picture

25 Jun 2014 - 9:31 pm | बॅटमॅन

काली फॉसीफोरम म्हणजे कलकत्त्याला कालीघाटात मिळणारे औषध ए का =))

चित्रगुप्त's picture

26 Jun 2014 - 1:31 am | चित्रगुप्त

चेष्टा नाही राव ही. होमियोपाथी/ बायोकेमिक आणि ज्योतिष-शास्त्राचा संबंध आहे:
..,

आयुर्हित's picture

26 Jun 2014 - 1:45 am | आयुर्हित

पाश्चिमात्य पद्ध्तीप्रमाणे दिलेल्या तारखा आणि राशी यावरुन फक्त सुर्यराशी(सन साइन)विचारात घ्याव्यात, असे वाटते.

धन्या's picture

26 Jun 2014 - 9:57 am | धन्या

भारतीय वैदिक ज्योतिष हे भारतीय तिथींवरुन पाहिले जाते. तसेच व्यक्तीच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी रास असते ती रास त्या व्यक्तीची जन्म रास समजली जाते.

मात्र इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये जे दैनिक/साप्ताहिक/मासिक वगैरे भविष्य येते ते त्यामधल्या राशी या व्यक्तीच्या इंग्रजी महिन्याच्या जन्मतारखेवरुन ठरतात.

त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिष आणि पश्चिमात्य ज्योतिष यांच्यात सुसुत्रता असण्याची काही शक्यता असते का? तार्किकदृष्टया विचार करता ती तशी नसणार हे उघड आहे. मात्र काही सांगड घालणार्‍या बाबी असतील तर त्या जाणून घेण्यास उत्सुक आहे.

धन्या's picture

26 Jun 2014 - 10:00 am | धन्या

इथे ज्योतिष हा शब्द मी फलज्योतिष (astrology) अशा अर्थी वापरला आहे. Astronomy म्हणून नाही.

पश्चिमात्य ज्योतिषात जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय वैदिक ज्योतिषात ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिषात सर्वंकश विचार होतो असे वाटते.

फक्त जन्मराशीचा(चंद्रराशीचा)विचार करणे म्हणजे फक्त २१ घटक विचारात घेणे होय.

व्रुत्तपत्रे कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा ज्योतिष कोणी आणि कोणता आधार मानून वर्तवले आहे हे महत्वाचे आहे.
उदा: बेजान दारुवाला हे सुर्यराशि आधार मानुनच भविष्य वर्तवितात.

पश्चिमात्य ज्योतिषात जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय वैदिक ज्योतिषात ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिषात सर्वंकश विचार होतो असे वाटते.

फक्त जन्मराशीचा(चंद्रराशीचा)विचार करणे म्हणजे फक्त २१ घटक विचारात घेणे होय.

व्रुत्तपत्रे कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा ज्योतिष कोणी आणि कोणता आधार मानून वर्तवले आहे हे महत्वाचे आहे.
उदा: बेजान दारुवाला हे सुर्यराशि आधार मानुनच भविष्य वर्तवितात.

पश्चिमात्य ज्योतिषात जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय वैदिक ज्योतिषात ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिषात सर्वंकश विचार होतो असे वाटते.

फक्त जन्मराशीचा विचार करणे म्हणजे फक्त २१ घटक विचारात घेणे होय.

व्रुत्तपत्रे कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा ज्योतिष कोणी आणि कोणता आधार मानून वर्तवले आहे हे महत्वाचे आहे.
उदा: बेजान दारुवाला हे सुर्यराशी आधार मानुनच भविष्य वर्तवितात.

बॅटमॅन's picture

26 Jun 2014 - 12:08 pm | बॅटमॅन

बाकी काही म्हणा तुमच्या बिनबुडाच्या लिखाणाचे आपण फ्यान आहोत.

बाळ सप्रे's picture

26 Jun 2014 - 12:13 pm | बाळ सप्रे

एकंदरित वैदिक ज्योतिष ३० पट जास्त पॉवरफुल आहे (१०पट जास्त घटक गुणिले ३ प्रतिसाद) :-)

हाडक्या's picture

26 Jun 2014 - 2:32 pm | हाडक्या

हॅ हॅ हॅ .. साहेबांना माहित नाही अशी गोष्ट नाही बघा जगी.. 'शहाणे करून सोडावे जन' अगदी व्रत आहे हो यांचे.

Prajakta२१'s picture

26 Jun 2014 - 10:28 am | Prajakta२१

तसेच व्यक्तीच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी रास असते ती रास त्या व्यक्तीची जन्म रास नव्हे तर लग्न रास असते
आणि चंद्र ज्या राशीत असतो ती जन्म रास समजली जाते
साडेसाती किंवा ग्रहदशा ह्या जन्मराशीवरून ठरतात
भारतीय पद्धतीत लग्न रस आणि जन्म रास ह्या दोन्हींचे analysis करून भविष्य सांगतात

धन्या's picture

26 Jun 2014 - 12:49 pm | धन्या

धन्यवाद.

बरेच दिवस वापरात नसल्यामुळे माझे तेलुगू भाषा आणि ज्योतिष या विषयाचे (शास्त्र नव्हे!) ज्ञान विस्मरणात गेले आहे.

मार्कस ऑरेलियस's picture

26 Jun 2014 - 10:57 am | मार्कस ऑरेलियस

=))))

साध्या लग्नकुंडली वरून आणि सध्याची (गोचरि)ग्रहस्थितीवरून भविष्य सांगता आले पाहिजे .केवळ राजयोग आहे म्हणून काही प्रत्येकाच्या गळ्यात माळ घालायला हत्ती फिरत नसतात .इति वराहमिहिर .चांगली ग्रहस्थिती आल्यावर जातकाच्या परिस्थितीनुसार चांगल्या गोष्टी घडतात .याकरिता जातकाने महत्वाकांक्षा ठेवून पुढे प्रगती करण्याचे कष्ट सतत घ्यायला हवेत .दुसऱ्या पायरीवर असेल तर तो चौथ्यावर नेण्याचे काम ग्रह करतील .त्याने कष्ट करून नवव्या पायरीवर गेल्यास तो अकराव्यावर जाईल .

बाकी लग्न कुंडलीला भावचलित आणि नवमांशाप्रमाणे करून दशमातल्या डोक्यावरच्या ग्रहाला अष्टमात सरकवणे म्हणजे चण्याच्या पुडीला चपाट करून त्याचे विमान बनवण्याचा अट्टाहास होय .

उदा: नवमांश कुंडली कशी बघायची ?

यंदा कर्तव्य आहे की काय? :)

ज्योतिषावर धागा येणार। काहीजण त्याला शास्त्र मानणार॥
नेहमीची वादावादी होणार। राडा घडणार निश्चित॥

-दैवज्ञ ;)

काहीजण त्याला शास्त्र मानणार॥

शास्त्र मानणे हा चुकीचा शब्दप्रयोग आहे. काहींच्या मते ज्योतिष हे शास्त्र आहे आणि काहींच्या मते नाही. इथे शास्त्र "मानण्याचा" प्रश्नच येत नाही.

गप्रांव मेल्या!! मला शब्द सुचला नाही ओवी लिहीताना. धाग्याचं काश्मीर करा (हवं तर), प्रतिसादाचं नको. ;)

कपिलमुनी's picture

25 Jun 2014 - 8:34 pm | कपिलमुनी

डिस्क्लेमर टाकले असताना सुद्धा लोक इथे येउन गोंधळ घालतात.. नाही पटत तर धाग्याकडे दुर्लक्ष करावे.
ज्याचा भाव त्याचा देव !
बाकीच्यानी दगड म्हणा किंवा इतर काही.. पण दुसर्‍यांच्या धागास्वातंत्र्याचा आदर करावा

धन्या's picture

25 Jun 2014 - 8:43 pm | धन्या

पण दुसर्‍यांच्या धागास्वातंत्र्याचा आदर करावा

तो आहेच. मात्र

ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....
चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे.
त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही.

एकदा धागा टाकल्यावर चर्चा तर होणारच. या संस्थळाचे सदस्य म्हणून तो अधिकार प्रत्येकाला आहे. काही आक्षेपार्ह आढळल्यास संपादक मंडळ लिखाणास कात्री लावतेच की. जर विरोधी मते असणार्‍या लोकांनी मते मांडू नयेत अशी ईच्छा असेल तर "बंदिस्त समूह" असणारीही संकेतस्थळे आहेत. तिकडे आपले समूह बनवून "अहो रुपम अहो ध्वनी"चा घोष करावा.

प्यारे१'s picture

25 Jun 2014 - 9:03 pm | प्यारे१

हल्ली धन्यामागचा 'माणूस' बदलल्या बदलल्या सारखा वाटतोय. काय भानगड काय?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Jun 2014 - 4:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे

+१०००००००

संजय क्षीरसागर's picture

25 Jun 2014 - 9:13 pm | संजय क्षीरसागर

मुळात कुंडली हा बेसच निराधार असेल, तर मग ती भावचलित असली काय की लग्न कुंडली, सर्वच भाकीते अंदाजपंचे दाहोदरसे ठरणार. जर धाग्यावर चर्चा अपेक्षित असेल, तर ज्यावर इमारत बांधायची तो पाया भक्कम हवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2014 - 10:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपला नसेल पाया भक्कम त्यांचा आहे त्यांना लिहु द्या ना भो...!!!

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

25 Jun 2014 - 9:28 pm | बॅटमॅन

ढिशक्यांव ढिशक्यांव ढिशक्यांव!!!!

सरळमार्गी's picture

26 Jun 2014 - 8:38 am | सरळमार्गी

'मिसळ्पाव' हे संस्थळ ज्योतिषशास्त्र या विषयावर चर्चा करण्यासाठी नाही हे एव्हाना आपल्या लक्षात यायला हवे होते.
खास ज्योतिषशास्त्रासाठीचे असे काही नावाजलेले (गंभीर , शिस्तबद्ध ,सुनियंत्रित) चर्चा समुह आस्तित्वात आहेत ('मायबोली' नाही !), ज्या ठिकाणी फक्त ज्योतिषशास्त्र या विषयावरच चर्चा होते, आपले प्रश्न तिथे उपस्थित केल्यास चांगली अभ्यासपूर्ण उत्तरे नक्कीच मिळू शकतील. आपण विचारलेले प्रश्न या संस्थळावर आधिच विचारले गेले आहेत व त्यावर बरीच चर्चाही झालेली आहे , ती जरी वाचली तरी आपले शंका निरसन होईल.
ही संस्थळे ईंग्रजी भाषेत आहेत पण आपल्याला ती अडचण भासणार नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2014 - 10:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>'मिसळ्पाव' हे संस्थळ ज्योतिषशास्त्र या विषयावर चर्चा करण्यासाठी नाही

असं कै नै हं. मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही. चर्चा करणा-या जाणकारांनी चर्चा करत राहावी. कितीही विरोध होत असला तरी आपल्या विषयाला प्रतिसादाला पुढे न्यायचं. कोण काय म्हणतं आणि का म्हणतं. आपण लिहित राहावे असे वाटते. काही प्रश्नांंची उत्तर देता आली तर द्यावी नै तर आपण एकटेच वाचक आहोत असे समजून लिहित राहावे, असे वाटते. बाकी, लिहिणा-यांची मर्जी.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

26 Jun 2014 - 10:57 am | पैसा

+१

इरसाल's picture

27 Jun 2014 - 2:19 pm | इरसाल

+२ पण मी संपादक नाही हं !

मार्कस ऑरेलियस's picture

26 Jun 2014 - 11:11 am | मार्कस ऑरेलियस

मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही

>>> ह्यावर अत्यंत विनम्रपणे आक्षेप नोंदवत आहे ... परवाच एका धाग्यावर झालेले एका प्रश्नाचे संपादन अत्यंत एकांगी होते असे वाटले (http://www.misalpav.com/comment/590391#comment-590391)

टीका करण्याचा उद्देश नाहीये ... फक्त आपले विधान मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही हे पुर्ण सत्य नाही इतकेच नोंदवु इच्छितो !
-----------------------------------------------

प्लीज माझा आयडी डीलीट करु नका ...प्लीज प्लीज प्लीज

"मिपाला बर्‍याच विषयांचं वावडं आहे, पण ते असं उघडपणे बोलून दाखवायचं नसतं इतकंच."

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Jun 2014 - 8:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मिपावरील काही सदस्यांना ज्योतिष विषयाचे वावडे आहे. इतकेच नाही तर अशी लोकं ज्योतिषावर कुठलाही धागा आले की अक्षरश: चेकाळतात. विरोधाला विरोध नाही, पण धागा पूर्णपणे हायज्याक केला जातो. इतका की तिथे कुठल्याही प्रकारची चर्चाच होणे शक्य नाही.

हे म्हणजे साधारण रोडीजच्या ग्रुप डिस्कशन मध्ये लोकं (किंवा संसदेत खासदार) आरडओरडा करून इतरांना बोलूच देत नाहीत, त्याचे जालिय रूप वाटते.

पैसा's picture

26 Jun 2014 - 10:50 am | पैसा

शिनेर सदस्य धाग्यावर अवांतर करताना आणि एक ज्येष्ठ संपादक धुमाकूळ घालताना बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. *blush*

:/

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2014 - 10:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ज्योतिष हे शास्त्र आहे की नै, श्रद्धा अंधश्रद्धा, विज्ञान, अरे धन्या लिहू द्या रे लिहिणा-यांना.

-दिलीप बिरुटे

सर लिहिण्याला आक्षेप नाहीच. आक्षेप आहे तो विरोधी मते असणार्‍यांनी आपली मते मांडूच नयेत या पवित्र्याला.

कुणीही उठावं आणि केवळ काकतालिय न्यायाने खर्‍या ठरणार्‍या भाकितांना शास्त्र म्हणावे यालाही आमचा विरोध नाही. मात्र ते त्यांचे वैयक्तिक मत असावं. मिसळपावसारख्या मुक्त व्यासपीठावर अशी विधाने केल्यावर त्याला विरोध करुच नये हे म्हणणे पटत नाही.

विशेष म्हणजे धागाकर्ते धागा टाकल्यांनतर इकडे फिरकलेच नाहीत. धाग्यावरील आक्षेपांना त्यांनी उत्तर देणे ही तर खुप दुरची गोष्ट झाली.

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Jun 2014 - 11:42 am | llपुण्याचे पेशवेll

पूर्वी उधृत केलेले माझेच वाक्य पुन्हा लिहीतो "आपला तो संतुलित विचार आणि दुसर्‍याचा तो अतिरेक असतो".

@ निमिष,मला जोतिषात काही गती नाही. काही काही ज्योतिषी अचूक भविष्य वर्तवताना पाहीले आहेत. सनातन प्रभातमधे छापून आलेले एका गोपालकृष्णन किंवा तत्सम ज्योतिषाचे अंदाज ९५ % ठरल्याचे या इलेक्शनला अनुभवले. त्याबद्दल कुतुहल मात्र वाटते.

म्हैस's picture

26 Jun 2014 - 11:47 am | म्हैस

ज्योतिष हे शास्त्र नाही

ज्योतिष हे शास्त्र आहे. ज्योतिषी खोटे आहेत . बाकी चालू दे . as usual

स.मं.चा एक्स्लुझीव अधिकार आहे, तसाच धोरणाच्या मर्यादेत राहून चर्चा करण्याचा प्रत्येक सदस्याला अधिकार आहे. नाही तर एकमार्गी मतं रेटणार्‍या चर्चांचा उपयोग तो काय?

आपला नसेल पाया भक्कम त्यांचा आहे

तोच तर चर्चा विषय आहे. त्यांना पाया भक्कम आहे हे दाखवून देऊ द्या.

काही प्रश्नांंची उत्तर देता आली तर द्यावी नै तर आपण एकटेच वाचक आहोत असे समजून लिहित राहावे

मग डायरी आणि संकेतस्थळात फरक काय? योग्य प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत तर उगीच रेटून लिहीण्यात काय अर्थ आहे?

मार्कस ऑरेलियस's picture

26 Jun 2014 - 12:14 pm | मार्कस ऑरेलियस

त्यांना पाया भक्कम आहे हे दाखवून देऊ द्या.

>>> करेक्ट ! आम्हालाही इतकेच म्हणायचे आहे !

प्यारे१'s picture

26 Jun 2014 - 12:54 pm | प्यारे१

>>> योग्य प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत तर उगीच रेटून लिहीण्यात काय अर्थ आहे?

हे असंच लिहायचंय का

@@@ प्रश्नांची योग्य उत्तरं देता आली नाहीत तर उगीच रेटून लिहीण्यात काय अर्थ आहे? @@@
असं लिहायचंय?

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2014 - 12:41 pm | श्रीगुरुजी

>>> निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ?

बहुसंख्य ज्योतिषी राशी कुंडली बघूनच भविष्य सांगतात.

>>> उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ?

१२ व्या स्थानाचे

>>> लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते?

अर्थातच राशी कुंडली

>>> तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात?

नक्की माहिती नाही.

ज्ञानव's picture

30 Jun 2014 - 10:00 am | ज्ञानव

>>> निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ?

>>>बहुसंख्य ज्योतिषी राशी कुंडली बघूनच भविष्य सांगतात.

ग्रहांचे अंश हे ग्रहांचे स्थान ठरवतात जर चलित कुंडलीत ग्रह एक घर मागे पुढे होत असेल तर चलित कुंडलीत त्याचे जे घर आहे ते लक्षात घ्यावे लागते. पण नुसतेच चलित कि नवमाश, राशी चंद्र असे चालत नाही तर प्रश्नानुसार कुंडली बघतात असा अनुभव आहे. पण >>>बहुसंख्य ज्योतिषी राशी कुंडली बघूनच भविष्य सांगतात. हे हि तितकेच खरे.

>>> लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते?

>>>>अर्थातच राशी कुंडली

मुळात कुंडली एकच असते पण त्याची मांडणी वेगवेगळ्या प्रकारे असल्याने ज्योतिषाने स्वकष्टार्जित तारतम्य वापरून फलादेश द्यायचा असतो पण सामन्यतः शिष्य, वाचन आणि गुरूने जेवढे सांगितले तेव्हढेच डोके चालवतात आणि गोंधळ होतो.

>>> तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात?

>>>>नक्की माहिती नाही.

पास.

तुम्ही जर ज्योतिषाचा अभ्यास करत असाल तर मुळात तुमचा ज्योतिषी म्हणून त्या विषयाबाबत काय दृष्टीकोन आहे तेही मांडा म्हणजे उदा. "गुरु हा अर्थ कारणाचा कारक आहे" असे बरेच ज्योतिषी सांगतात ह्या वाक्याचा तुम्ही काय अर्थ लावता? किंवा एखादे तत्सम वाक्य तुम्ही उलगडून सांगा ज्याने माझ्या ज्ञानात ही भर पडेल.

सरळमार्गी's picture

26 Jun 2014 - 12:46 pm | सरळमार्गी

>>>> मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही.

बिरुटे साहेब मिपा ला वावडे नसेल हो पण मिपाकरा^ना बर्‍याच विषयाची आलर्जी आहे त्याचे काय?

>>> चर्चा करणा-या जाणकारांनी चर्चा करत राहावी. कितीही विरोध होत असला तरी आपल्या विषयाला प्रतिसादाला पुढे न्यायचं. कोण काय म्हणतं आणि का म्हणतं. आपण लिहित राहावे असे वाटते.

का म्हणून? जर चेष्टा ,कुचेष्टा, टिंगल, ट्वाळीच होणार असेल तरी ही ? एखाद्याने माहीती मिळवण्यासाठी व अनावश्यक प्रतिसादां बद्द्ल डिस्क्लेमर टाकून धागा काढला तरीही त्याची काय गत होते ते दिसतेय, मी म्हणत असलेल्या संस्थळावर संपादक मंडळाचे कडक नियंत्रण असते त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जात नाहीत. तसे इथे का होऊ शकत नाही?

संजय क्षीरसागर's picture

26 Jun 2014 - 2:17 pm | संजय क्षीरसागर

परा या सदस्यानं म्हटलं होतं की संकेतस्थळावरचं लेखन हे खिडकीत बसण्यासारखं आहे, मग कुणी शुकशुक केलं तर तक्रार करण्यात अर्थ नाही.

बाय द वे, लेखकानं किंवा कुणीही कुंडली, आणि भविष्यकालीन घटनांचं वर्तांकन यातला कार्यकारण नि:संदिग्धपणे दाखवून द्यावा.

कोणतंही वैज्ञानिक सत्य सिद्ध करायला : १) निर्वैयक्तिकता २) स्थल-काल निरपेक्षितता आणि ३) वारंवारिता हे तीन निकष आहेत. वैज्ञानिक निकषांवर जर तुम्ही कार्यकारण सिद्ध करु शकलात तर असल्या लेखनाला काही अर्थ आहे.

आणि आय चॅलेंज यू, ओन धिस फोरम, तुम्ही कुंडली आणि भविष्यकालीन घटनांचं वर्तांकन यातला कार्यकारणभाव वैज्ञानिक सत्यतेच्या निकषांवर सिद्ध करु शकत नाही.

कोणतंही वैज्ञानिक सत्य सिद्ध करायला : १) निर्वैयक्तिकता २) स्थल-काल निरपेक्षितता आणि ३) वारंवारिता हे तीन निकष आहेत. वैज्ञानिक निकषांवर जर तुम्ही कार्यकारण सिद्ध करु शकलात तर असल्या लेखनाला काही अर्थ आहे.

वैज्ञानिक सत्याची कसोटी इतक्या स्पष्ट आणि सोप्या शब्दांत मांडण्यासाठी धन्यवाद.

हे वैज्ञानीक कसोटीचं सत्य आहे. आणि त्यात एक अत्यंत (सर्वात?) महत्वाचा क्लॉज म्हणजे "इन गिव्हन कंडीशन्स". हा एक क्लॉज सत्याची कसोट्यांपासुन फारकत करतो.
वैज्ञानीक सत्य असं कसोट्यांवर तोलण्याइतपत पंगू नाहि. असो.

म्हैस's picture

26 Jun 2014 - 1:14 pm | म्हैस

का म्हणून? जर चेष्टा ,कुचेष्टा, टिंगल, ट्वाळीच होणार असेल तरी ही ? एखाद्याने माहीती मिळवण्यासाठी व अनावश्यक प्रतिसादां बद्द्ल डिस्क्लेमर टाकून धागा काढला तरीही त्याची काय गत होते ते दिसतेय, मी म्हणत असलेल्या संस्थळावर संपादक मंडळाचे कडक नियंत्रण असते त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जात नाहीत. तसे इथे का होऊ शकत नाही?

exactly . संपादकांच नियंत्रण नसल्यामुळे (किवा संपादक ) पक्षपात करतात ह्याचं चांगला उदाहरण माझ्याकडे आहे. आणि बर्याच लोकांना इथे कुठलीही गोष्ट समजून घेण्यात किवा चर्चा करण्यात रस नसून स्वताच्या अर्धवट , तोकड्या माहितीच्या आधारे किवा आपल्या अर्धवट अकलेच्या आधारे फक्त चेष्टा ,कुचेष्टा, टिंगल, ट्वाळीच करण्यात रस आहे.

ज्ञानव's picture

30 Jun 2014 - 10:04 am | ज्ञानव

+१

>>> निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ?
भारतात प्रामुख्याने क्षेत्र कुंडली (लग्न कुंडली) प्रचलित आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भावचलित कुंडली तयार करण्या साठी लागणारी भावसाधनाची कोष्टके सहजासहजी उपलब्ध नसणे, अशी कोष्टकें उपलब्ध नसल्यास बरीच आकडेमोड करावी लागते, ती करणे बर्‍याच जणांना जमत नाही. मात्र आज संगणकाच्या मदतीने ही गणिते सहज सोपी झाली आहेत.

राशीचक्राचे १२ भाग पाडून त्यांना १,, १२ भावात बसवणे या साठी सुमारे ३० पेक्षा जास्त पद्धती उपलब्ध आहेत. त्यापैकी ‘प्लॅसिड्स’ ही प्रणाली जास्त लोकप्रिय आहे, के.पी. मध्ये ‘प्लॅसिड्स’ प्रकाराने बनवलेली भावचलित कुंड्ली वापरतात. कृष्णमुर्तीनी (के.पी. चे जनक) ‘प्लॅसिड्स’ पद्धत स्विकारली कारण त्यावेळेला फक्त याच ‘प्लॅसिड्स’ पद्धतीची भावसाधन कोष्ट्के बाजारात सहजासहजी उपलब्ध होती (अशी कोष्ट्कें उपलब्ध असणे हेच ‘प्लॅसिड्स’ च्या लोकप्रिततेचे कारण आहे). कृष्णमुर्तीना आणखी काही वर्षांचे आयुर्मान लाभले असते तर त्यांनी निश्चितच दुसरी एखादी भावसाधन प्रणाली अवलंबली असती ( बहुदा ‘कोश’ ही जर्मन ज्योतिर्विदांनी तयार केलेली प्रणाली ) किंवा त्यांनी स्वत:च एखादी नविन प्रणाली निर्माण केली असती.

कोणती कुंडली वापरायची हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे कोणती कुंडली वापरायची ते ज्या त्या ज्योतिर्विदाने स्वत:च्या अनुभवाच्या आधाराने ठरवावे.

माझ्या मते भावचलित कुंडली वापरायची असेल तर महान गणिती ‘श्रीपती’ यांनी सुचवलेल्या पद्धतीने तयार केलेली भावचलित कुंडली वापरावी. ही वापरताना भावाच्या मध्या जवळचे ग्रह त्याच भावात व भावाच्या आरंभी वा शेवटी 5 अंशात असलेले ग्रह क्रमश: अलिकडच्या / पलिकडच्या भावात आहेत असे समजावे. हा नियम के.पी. मध्ये ही काही जण वापरतात.

>>> लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते?

चंद्र एका राशीत साधारणपणे अडिच दिवस असतो, म्हणजेच एखाद्या संपूर्ण दिवसात तो एकाच राशीत असणार (चंद्र ज्या दिवशी राशी बदलेल तो दिवस अपवाद्) म्हणजेच त्या दिवशी जन्मलेल्या सर्व बालकांची राशी कुंडली एका सारखी असणार , कारण त्या दिवसभरात बाकीचे सर्व ग्रह ही एकाच राशीत व त्याच अंशात असणार.(दुसरा एखादा ग्रह नेमका त्याच दिवशी राशी बदलत असेल तर तो दिवस अपवाद्) मग अशा राशी कुंडली वरुन वर्तवलेले भविष्य ही एक सारखेच असणार, प्रत्यक्षात तसे आढळत नाही.

याउलट जन्मलग्न साधारण पणे दर दोन तासाने बदलते म्हणजेच प्रत्येक दिवसात 12 जन्मकुंडल्या शक्य असतात, दिवसभरासाठी ची एकच एक राशी कुडली पेक्षा ही प्रत्येक 2 तासाची एक वेगळी कुंडली हि परिस्थिती बरी आहे. पण तरीही त्या दोन तासाच्या कालावधीत जन्मलेल्या बालकांच्या कुंडल्या एकच राहणार पर्यायाने अशा कुंडली वरुन वर्तवलेले भविष्य ही एक सारखेच असणार, प्रत्यक्षात तसे आढळत नाही.

त्याला उत्तर म्हणून कृष्णमुर्तीनी (के.पी. चे जनक) ‘सब’ ची कल्पना मांडून 360 अंशाच्या राशीचक्राचे 249 भाग केले , या ‘सब’ मुळे साधारण पणे दिड दोन मिनीटांच्या फरकाने जन्माला येणार्‍या बालकांच्या पत्रिका वेगळ्या होतात.
एव्हढे करुन ही सुक्ष्मता येत नाही हे लक्षात आल्यावर श्री एस पी खुल्लर यांनी कृष्णमुर्तीनी सुचवलेल्या ‘सब’ चे पुन्हा 9 भाग केले , त्यामुळे साधारण पणे काही सेकंदांच्या फरकाने जन्माला येणार्‍या बालकांच्या पत्रिका वेगळ्या होतात.

अर्थात श्री एस पी खुल्लर आणि कृष्णमुर्ती यांनी सुचवलेल्या या पद्धतींचा अवलंब करताना जातकाची जन्मवेळ ही तितकीच अचूक असायला हवी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे.

>>> तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात?

या ‘भाग कुंडल्या ‘ एक प्रकारचे ‘हारमोनिक' चार्ट्स आहेत. अशी प्रत्येक कुंडली जातकाच्या आयुष्याचा एखाद्या विषिष्ठ अंगाचाच विचार करण्यासाठी असते उदा: विवाह, संतान, आयुर्दाय , आरोग्य, धन, व्यवसाय, गतजन्म, पुढचा जन्म ई. या भाग कुंडल्या सखोल अभ्यास करण्याच्या हेतूने बनवलेल्या सुपर स्पेशॅलिटी ‘कुंडल्या आहेत. जसा फरक साधा जनरल डॉकटर आणि गायनॅकोलऑजीस्ट, ईएंटी सर्जन यांच्यात असतो तसाच फरक जन्मलग्न कुंडली व भाग कुंड्ल्यांत असतो.

या कुंडल्या बनवताना राशीचे 2,3,4.9 , 12 , 16, 32 असे करत 60, 120 व त्याही पलीकडे जाऊन सुक्ष्म भाग केले जातात. नाडि भविष्य कथनात 1/60 व 1/120 पद्ध्तीच्या पत्रिका वापरल्या गेल्याचे आढळते. याही पद्धतींचा अवलंब करताना जातकाची जन्मवेळ ही तितकीच अचूक असायला हवी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. उदा: नवमांश पत्रिका वापरायची असेल तर जातकाच्या जन्मवेळेतील चूक 13 मीनीटंपेक्षा जास्त असता कामा नये , अन्यथा नवमांश बदलेल व पर्यायाने नवमांश कुंडली बदलेल.

पण गंमत अशी की या मर्यादेचाच खुबिने उपयोग करुन घेऊन जातकची जन्मवेळ बरोबर आहे का ते ठरवता येते व चुक दुरुस्त करता येते. अर्थात हे कोणा येरा गबाळ्याचे (कुडमुड्या चे ) काम नाही हे ओघानेच आले.

दोन व्यक्ती एक सारख्या नसतात, अगदि जुळ्या मुलांत सुद्धा फरक असतो, मग त्यांच्या जन्मकुंडल्याही वेगळ्याच असायला हव्यात ना? त्यासाठीच तर हे एव्हढे सुक्ष्म गणित करावे लागते. पण हे एव्हढे सगळे गणिती व्याप करणे सगळ्यांनाच शक्य होते असे नाही.

आयुर्हित's picture

26 Jun 2014 - 4:18 pm | आयुर्हित

मानले आपल्याला, खुप छान प्रतिसाद दिल्याबद्दल!

आपल्याकडुन या विषयावर नवे लेखही येवू द्या, हि विनंति.

मूकवाचक's picture

26 Jun 2014 - 7:12 pm | मूकवाचक

+१

उत्तम प्रतिसाद.. ज्योतिषातील काहीही कळत नसले ( आणि इंटरेस्ट नसला ) तरी ही अभ्यासपूर्ण आणि समजायला तितकेच सोपे.

प्रश्न उरतो की इतके सगळे सायास करून त्याचा उपयोग काय ?
जन्माला आलेले मूल हिटलर, न्युटन, गांधी अथवा शिवराय होणार असे काही खात्रीलायकरित्या सांगता येणार असेल तर ठिक नाहीतर कामकरी ठोकळ्यांच्या मांदियाळीतले अजून एक आले आणि त्यावर या 'गणितज्ञानी' डोके फोड करून ते 'आयबीएम मध्ये काम करणार, नवी फोर्ड गाडी वयाच्या विसाव्या वर्षीच घेणार' वगैरे सूक्ष्म माहीती शोधण्यात त्यांचे ज्ञान व्यर्थ घालवावे हे काही पटत नाही.

उत्तम प्रतिसाद.. ज्योतिषातील काहीही कळत नसले ( आणि इंटरेस्ट नसला ) तरी ही अभ्यासपूर्ण आणि समजायला तितकेच सोपे.

सहमत आहे. ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही हा विषय बाजूला ठेवून या प्रतिसादाकडे पाहिले तर प्रतिसादकर्त्याने या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे हे जाणवते. असे अभ्यासू प्रतिसाद आले तर निकोप चर्चा व्हायला नक्कीच मदत होईल.

विरोधी मत असणार्‍यांनी प्रतिसाद देऊ नये अशा मुजोरी भाषेने धाग्याची सुरुवात करुन मुख्य विषय एक दोन वाक्यांत गुंडाळणार्‍या धागाकर्त्याने या प्रतिसादकर्त्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे.

रच्याकने, ते धागाकर्ते आहेत कुठे? :)

कंजूस's picture

26 Jun 2014 - 4:08 pm | कंजूस

पुढे सरकू द्याहो .

संजय क्षीरसागर's picture

27 Jun 2014 - 12:27 am | संजय क्षीरसागर

आता आपण सविस्तर प्रतिसाद दिलायं, तेव्हा बाजू लावून धराल अशी अपेक्षा करतो. मी जर निरुत्तर झालो तर खुल्या दिलानं मान्य करीन, पण तुम्हाला उत्तर देता आलं नाही तर ज्योतिषशास्त्र निरुपयोगी आहे हे मान्य करा.

माझे हितचिंतक चर्चा भरकटवणार नाहीत आणि सर्वांसाठी ती विधायक होईल; त्याचा सगळ्यांना लाभ होईल, अशी आशा करतो.
_____________________

अस्तित्वाची संरचना एखाद्या अमर्याद आणि व्यापक देहासारखी आहे. इथे प्रत्येक गोष्ट इतर प्रत्येक गोष्टीशी अनाकलनीय रितीनं जोडलेली आहे. Existence is an Organic Unity & it is a Terrific Mystery.

सूर्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, आपला निरंतर चालू असलेला श्वास अगणित वृक्षवल्लरींशी जोडलेला आहे, अरण्य पावसाशी आणि पृथ्वीशी जोडलेली आहेत; पाऊस अनेकानेक जलनीधींशी संलग्न आहे; त्या जलनीधींच्या अगम्य हालचालींचं चंद्राशी नातं आहे; चंद्र पृथ्वीशी एकसंध अंतर राखून आहे आणि वसुंधरा त्या चंद्रासमवेत असंख्य ग्रहमालिकांच्या अगम्य पसार्‍यातून, सूर्याशी समांतर आकर्षण ठेवत, अनंत काळ परिभ्रमण करते आहे.

आणि या रहस्यांचं रहस्य असं की हे सगळं स्वयंप्रेरित आहे. या अगाध आणि अद्भुत अस्तित्वाचा कर्ता-करविता कुणीही नाही. इथे उत्पत्ती, स्थिती आणि लय, स्वच्छंद आहे.

या गूढ रहस्यमयतेत प्रत्येक गोष्ट अस्तित्वातल्या इतर गोष्टीशी संलग्न असल्यानं, एका अकल्पनीय कॅलिडोस्कोपसारखी, अस्तित्वाची स्थिती हरक्षणी अगम्यपणे बदलते आहे.

कोणत्याही क्षणी सूर्य विझू शकतो, पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या बाहेर अनंत अंतराळात फेकली जाऊ शकते, कोणताही ग्रह, केव्हाही स्वतःची भ्रमण कक्षा सोडून पृथ्वीवर आदळू शकतो आणि पृथ्वी नामशेष होऊ शकते. कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही.

इतक्या अनंत, अगम्य, अनाकलनीय वैश्विक पसार्‍यात, एखाद्या छ जातकाच्या जन्माला (किंवा मृत्यूला) छ्दाम सुद्धा किंमत नाही. त्याच्या जन्म वेळची विविक्षित ग्रहस्थिती, कितीही काटेकोरपणे प्रस्थाप्तित केली, तरी मुळात इतक्या अफाट अस्तित्वात, हरक्षणी बदलणारी, इतकी अगम्य परम्युटेशन्स आणि काँबिनेशन्स आहेत की एकतर त्यांचा उलगडा होणच असंभव. आणि दुसरं म्हणजे, सगळी प्रक्रियाच इतकी व्यापक आणि डायनॅमिक आहे की, एका निष्कर्षाप्रत पोहोचण्यापूर्वी, तुम्ही विश्लेषण करायच्या आत, पुन्हा नवी स्थिती निर्माण होते!

______________________

तस्मात, जिथे अखिल अस्तित्वाच्या, अनेकानेक प्रक्रियाच एकमेकांशी जोडलेल्या आणि अनाकलनीय आहेत, तिथे यकःश्चित जातकाच्या व्यक्तिगत वर्तांकनाची कल्पनाच अज्ञानमूलक आहे. जर अस्तित्वाची Organic Unity ही वास्तविकता लक्षात आली तर व्यक्तिगत भविष्याचा वेध अशक्य आहे, हे सहज लक्षात येईल. कारण ज्या अस्तित्वाशी आपण एकसंध आहोत, खुद्द त्या अस्तित्वाचीच, सांप्रत स्थिती अनाकलनीय आहे... पुढच्या स्थितीची तर बातच सोडा!

स्पा's picture

27 Jun 2014 - 11:41 am | स्पा

सूर्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, आपला निरंतर चालू असलेला श्वास अगणित वृक्षवल्लरींशी जोडलेला आहे, अरण्य पावसाशी आणि पृथ्वीशी जोडलेली आहेत; पाऊस अनेकानेक जलनीधींशी संलग्न आहे; त्या जलनीधींच्या अगम्य हालचालींचं चंद्राशी नातं आहे; चंद्र पृथ्वीशी एकसंध अंतर राखून आहे आणि वसुंधरा त्या चंद्रासमवेत असंख्य ग्रहमालिकांच्या अगम्य पसार्‍यातून, सूर्याशी समांतर आकर्षण ठेवत, अनंत काळ परिभ्रमण करते आहे.

आणि या रहस्यांचं रहस्य असं की हे सगळं स्वयंप्रेरित आहे. या अगाध आणि अद्भुत अस्तित्वाचा कर्ता-करविता कुणीही नाही. इथे उत्पत्ती, स्थिती आणि लय, स्वच्छंद आहे.

या गूढ रहस्यमयतेत प्रत्येक गोष्ट अस्तित्वातल्या इतर गोष्टीशी संलग्न असल्यानं, एका अकल्पनीय कॅलिडोस्कोपसारखी, अस्तित्वाची स्थिती हरक्षणी अगम्यपणे बदलते आहे.

कोणत्याही क्षणी सूर्य विझू शकतो, पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या बाहेर अनंत अंतराळात फेकली जाऊ शकते, कोणताही ग्रह, केव्हाही स्वतःची भ्रमण कक्षा सोडून पृथ्वीवर आदळू शकतो आणि पृथ्वी नामशेष होऊ शकते. कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही.

सॉलिड प्रतिसाद , आवडेश

धन्या's picture

27 Jun 2014 - 2:42 pm | धन्या

यनिमित्ताने देऊळ चित्रपटातील मचाणावरीलच्या दृश्यातील आण्णांचे वाक्य आठवले, "माणूस म्हणजे काळाच्या पटावरील ठीपका आहे ठीपका".

नुकतेच मुंबईच्या नेहरु तारांगणला असणार्‍या शोमध्ये विश्वात पृथ्वीचे स्थान किती नगण्य आहे हे दाखवले जाते तेही आठवले. :)

मला एकच मुद्दा मांडायचा होता, तो म्हणजे आपण अस्तित्वाशी समरुप आहोत आणि जर त्या व्यापकतेचीच नियती अज्ञात आहे, तर `व्यक्तिगत नियती' असं काही असू शकत नाही.

सरळमार्गीनं, माझ्या इतक्या निर्विवाद प्रतिवादानंतर (मुद्दा बेशर्त मान्य करण्याऐवजी), असा स्टँड घेतल्यानं -

श्री आद्य शंकराचार्यांनी सुद्धा वादविवादा साठी तितक्याच तोलामोलाचे श्री मंडणमिश्र बघितले हो, एखाद्या चारघरी भिक्षुकी करुन पोटाची खळगी भरणार्‍या बाळंभटाशी नाही चर्चा करत बसले!

- आय हॅड टू गीव अप. अर्थात, त्यांनी ज्योतिषास्त्रातल्या दिग्गजांची नांव लिहून पुढे म्हटलंय :

ही मंड्ळी कदाचित आपल्या तोलामोलाची असावित असे मला वाट्ते (कदाचित शब्द यासाठीच वापरला की आपण या लोकांनाही भारी पडणार यात शंकाच नाही पण सामना अगदिच एकतर्फी होणार नाही असे वाटते) त्यांच्याशी चर्चा करण्यात समाधान आहे का एखाद्या नवख्या विद्यार्थ्याला चर्चेला बोलावून नामोहरम करण्यात आहे?

मी त्यांना भारी पडीन यात काही कौतुक नाही कारण जे लिहीलंय ती वस्तुस्थिती आहे. प्रतिसाद देण्याचा मूळ हेतू असा होता की सदस्यांना वस्तुस्थिती विशद व्हावी. एकदा ती झाली की मग इथला कुणीही सदस्य त्या विषयातल्या कुणाही दिग्गजाला निरुत्तर करेल. आणि संकेतस्थळावरच्या चर्चा अशाप्रकारे एका निश्चित निष्कर्शाप्रत यायला हव्या, तरच त्यांचा उपयोग आहे.

थोडक्यात, आपण स्वतःला अस्तित्वापासून कोणत्याही प्रकारे वेगळं करु शकत नाही, आणि अस्तित्वाला नियती नाही. तस्मात, व्यक्तिचं भविष्य हा अंदाजपंचे दाहोदरसेचा खेळ आहे. कुणीही अडलानडलेला छ जातक, तितक्याच अज्ञानी फ कडे जाऊन `अब मेरा क्या होगा काल्या?' विचारतो आणि एक निरर्थक कुंडलीनामक कागदी घोड्यावरुन, फ त्याला कल्पनेच्या दुनियेत घुमवतो. यापलिकडे ज्योतिषास्त्राला अर्थ नाही.

बाय द वे,

आपला नसेल पाया भक्कम त्यांचा आहे त्यांना लिहु द्या ना भो

असा प्रतिसाद देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेणं आहे; हे निदान जवाबदार मंडळींना तरी लक्षात (एव्हाना) यायला हवं. कारण ज्योतिर्विदांना निरुत्तर करणं फारसं अवघड नाही. पण त्याही पुढे जाऊन, पूर्वीच्या ऋषींमुनींनी केलेला ज्योतिषाचा अभ्यास, त्यांचा नेमका अध्यात्मिक निष्कर्श आणि त्यातून जगण्यासाठी मिळणारी दिशा, या सर्व गोष्टींवर सखोल चिंतन झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे, अशा प्रकारे निराधार विषयांना प्रोत्साहन देणं, सदस्यांची दिशाभूल आहे.

आदिजोशी's picture

27 Jun 2014 - 5:18 pm | आदिजोशी

या अगाध आणि अद्भुत अस्तित्वाचा कर्ता-करविता कुणीही नाही.

हे वाक्य इतक्या ठामपणे लिहिण्याइतका पुरावा सापडलेला नाही. म्हणून, या अगाध आणि अद्भुत अस्तित्वाचा कर्ता-करविता कोण आहे अथवा नाही हे माहिती नाही.

द्यावा लागेल. `असा कुणीही नाही' म्हणणारे Null Hypothesis च्या अदर एंडला आहेत. अर्थात, तुम्ही नीट विचारपूर्वक पुढचा प्रतिसाद देऊ शकलात तर तुमच्या लक्षात येईल की, तुमच्याकडे अस्तित्वाचा कर्ता-करविता आहे याचा कोणताही पुरावा नाही.

अर्धवटराव's picture

30 Jun 2014 - 8:30 am | अर्धवटराव

तो अस्तित्व स्वतःच कर्ता आहे.

आयुर्हित's picture

28 Jun 2014 - 2:03 pm | आयुर्हित

कोणत्याही क्षणी सूर्य विझू शकतो, पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या बाहेर अनंत अंतराळात फेकली जाऊ शकते, कोणताही ग्रह, केव्हाही स्वतःची भ्रमण कक्षा सोडून पृथ्वीवर आदळू शकतो आणि पृथ्वी नामशेष होऊ शकते. कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही.

संजय क्षीरसागरजी, उचलला कळफलक आणि लागले टंकायला? असे का करता आपण?

फक्त अज्ञानी लोकच असे लिहु शकतात.

सत्य असे आहे

१)सुर्य विझेल हे खरे आहे पण त्याला अजुन करोडो वर्षे जीवन आहे.
अभी तो मै जवान हु म्हणत आत्ताशी कोठे ४५६७००००००वर्षे(प्रुथ्वीवरील वर्ष)वय झाले आहे त्याचे, म्हणजे अजुन निम्मे आयुष्य बाकि आहे हो.

२)पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या बाहेर अनंत अंतराळात फेकली जाऊ शकते हे खरे करायचे असेल तर आन्तेरस (जेष्ठ नक्षत्र/ तारा) किंवा त्याच्यावस्तुमानाएवढे क्रुष्णविवर आपल्या सुर्यमालिकेत युरेनस ग्रहाच्या परिभ्रमण कक्षेच्या आत दाखल झाले पाहिजे, याचा अर्थ सध्या असलेल्या ५५० प्रकाशवर्षे अंतरावरुन प्रुथ्वीपासुन १८एयु अंतरावर यावे लागेल.

1 Astronomical Unit = 149,597,871 kilometers
1 light-year = 9,460,730,472,580,800 metres

Redgiants

३)कोणताही ग्रह, केव्हाही स्वतःची भ्रमण कक्षा सोडून पृथ्वीवर आदळू शकतो आणि पृथ्वी नामशेष होऊ शकते हे खरे ठरायचे असेल तर गुरु ग्रह किंवा सुर्य आधि नष्ट झाला असेल तरच शक्य आहे.

४)कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही. हे ही खरे ठरण्यासाठी त्याव्यक्तिचे आयुष्य संपले तर पाहीजे.

इतक्या अनंत, अगम्य, अनाकलनीय वैश्विक पसार्यात, एखाद्या छ जातकाच्या जन्माला (किंवा मृत्यूला) छ्दाम सुद्धा किंमत नाही. त्याच्या जन्म वेळची विविक्षित ग्रहस्थिती, कितीही काटेकोरपणे प्रस्थाप्तित केली, तरी मुळात इतक्या अफाट अस्तित्वात, हरक्षणी बदलणारी, इतकी अगम्य परम्युटेशन्स आणि काँबिनेशन्स आहेत की एकतर त्यांचा उलगडा होणच असंभव. आणि दुसरं म्हणजे, सगळी प्रक्रियाच इतकी व्यापक आणि डायनॅमिक आहे की, एका निष्कर्षाप्रत पोहोचण्यापूर्वी, तुम्ही विश्लेषण करायच्या आत, पुन्हा नवी स्थिती निर्माण होते!

हेच तर शक्य करुन दाखविले आहे ज्योतिषशास्त्राने!

तेव्हा पुढचे काही प्रश्न विचारण्यापुर्वी ज्योतिषशास्त्रावरची कमीत कमी विस पुस्तके नीट वाचून समजावून घ्यावेत हिच नम विनंति!

बॅटमॅन's picture

28 Jun 2014 - 2:07 pm | बॅटमॅन

आयुर्हितजी, डोक्यावर पडल्यागतच लिहावे असा काही नियम केला आहे काय आपण?

मूकवाचक's picture

28 Jun 2014 - 2:27 pm | मूकवाचक

ज्योतिष्याविषयी थोडी जरी सहानुभूती दाखवली, तर त्या सदस्याला लूत भरलेल्या कुत्र्यागत हाडहाड करायचे अशी शपथ घेतली आहे का तुम्हा लोकांनी?

ज्योतिषाच्या नावाखाली काय वाट्टेल ते लिहिले तरी त्याचे समर्थन करणे आणि त्याच्या विरुद्ध एक शब्द काढला तरी ढोंगी विज्ञानवादी इ.इ. हाडहाड करायचे या फ्याशनचे तुम्ही समर्थक आहात काय? सध्या अच्छे दिन आल्यामुळे स्यूडोसायन्सही प्युअर सायन्स होते असे वाटत असेल तर असूदे बॉ.

आयुर्हित's picture

28 Jun 2014 - 3:18 pm | आयुर्हित

बॅटमॅनजी, आजकाल असेच भास व्ह्यायला लागलेत वाटते! क्रुपया तज्ञांना दाखवुन लवकरात लवकर उपचार करुन घ्यावेत हि नम्र विनंति.तज्ञ काय म्हणाले यावर नविन धागाही येवु द्या!

नहितर माझ्या प्रतिसादात काय चुक आहे/डोक्यावर पडल्यागतच लिहिले आहे हे तरि कळू द्या सर्वांना!

ज्योतिषाने काय सिद्ध केले आहे याबद्दलचे तुमचे गैरसमज तेच दर्शवतात ओ. पण तुम्ही नाराज कशाला होता? जगात मूर्ख बनवणार्‍यांची कायमच चलती असते. मी किंवा अन्य कुणी काही बोलल्याने ज्योतिषांची दुकाने बंद थोडीच होणारेत?

मूकवाचक's picture

28 Jun 2014 - 4:37 pm | मूकवाचक

माझा प्रश्न ज्योतिष्य, सायन्स, स्युडोसायन्सविषयी नसून 'हाडहाड' करण्याविषयी होता. त्यातून संपादक मंडळाने ज्योतिष्य हा विषय मिपावर प्रतिबंधीत नाही असे स्पष्ट करूनही सातत्याने ज्योतिष्यविषयक लिहीणार्‍यांची मुस्कटदाबी करू पाहणे हा संपादक मंडळाचा अपमान आहे असा माझा तरी 'ग्रह' झालेला आहे. असो.

ज्योतिष विषयाबद्दल लिहिणे हे अलाउड आहे याचा अर्थ ज्योतिषावर टीका करणे ब्यान आहे हे आजच समजले. त्याला मुस्कटदाबी म्हणणे म्हणजे सशाने स्वतःच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यापैकी आहे. इतकीशी टीकाही सहन करता येत नसेल तर उ पयोग काय त्याचा? बरे, इतकं लिहून कुठल्या प्रश्नाला धड उत्तर नाही ते नाही, वर आणि मुक्ताफळे ऐकून घ्या. कोण सांगितलंय?

संपादक मंडळाने अपमान इ. स्वतः सांगितले तर ठीक, नपेक्षा तुमच्या प्रतिसादातून तुम्ही ज्योतिष नामक भाकडकथेचे समर्थक आहात असेच वाटू लागले आहे. पण काळजी नसावी, ज्योतिषांची दुकाने आमच्या क्षीण आवाजामुळे बंद होणार नाहीत.

या विषयावर एकदा ऑफिशिअल पोझिशन क्लीअर करूनच टाका आता संमं. ज्योतिष हा विषय वर्ज्य नाही हे समजले, त्याच्यावरची टीका वर्ज्य आहे की नाही तेही एकदाचे कळूदेच. म्हणजे मग कळेल अशा धाग्यांवर छानच, मस्तच, माझ्याही दशमस्थानात अकिलीस अन त्रयोदशस्थानात दुर्योधन आहे इ.इ. कमेंटी लिहायला बरे!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Jun 2014 - 1:51 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मी काय म्हणतो, ज्योतिष ही वर्ज्य नको आणि त्याचा विरोधही. पण जे काही करायचे ते त्या त्या धाग्यावर करा ना.

ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही यावर मिपावर खंडीभर धागे आहेत. पाहिजे तर अजुन एक काढावा, पण जिथे तशी चर्चा अपेक्षित नाही तिथे ती न करणे सहज शक्य व्हावे.

समजा मला क्रिकेट खेळ बकवास आहे किंबहुना तो खरा खेळ नाहीच आहे आणि तो खेळणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असे वाटते. म्हणून मी आणि माझ्यासारख्या 10-12 लोकांनी क्रिकेटच्या प्रत्येक धाग्यावर जाऊन दंगा घालणे कितपत सभ्यपणाचे ठरेल ?

Is it so hard to agree to disagree at least sometimes ?

विमे
एक फरक आहे. क्रिकेट बद्दल तुम्ही शिव्या घाला नाही तर ओव्या म्हणा माणसाच्या आयुष्यात फरक पडत नाही कारण माणसाची पुढची कोणतीही गोष्ट भारत जिंकला किंवा हरला (किंवा सामना "फिक्स" असेल तरीही) यावर अवलंबून नाही. परंतु एखादी उपचार पद्धती किंवा ज्योतिष यावर बर्याच माणसांचा पुढचा जीवनक्रम अवलंबून असण्याची "शक्यता" असते.आणि आपल्यापैकी कोणीही क्रिकेटचा सखोल अभ्यास केला आहे आणि त्यामुळे तुमचे जीवन समृद्ध होईल असा दावा केलेला नाही. यामुळे हि तुलना एका पातळीवरची नाही. एवढे असले तरीही ज्योतिषावर किती विश्वास ठेवायचा हे प्रत्येक माणसाने आपली तर तम बुद्धी वापरूनच ठरवायचे आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Jun 2014 - 1:20 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मान्य आहे. मुद्दाम जरा अतार्किक उदाहरण दिले होते. दुसरे काही उदाहरण दिले असते तर वेगळा वाद निर्माण होउ शकला असता. (क्रिकेट मुळे नुकसान झालेले लोकं पाहण्यात आहेत, पण तो मुद्दा अल्लग आहे :-) )

आपल्याला न पटण्याऱ्या धाग्याचे काश्मीर करणे हा काही मार्ग नाही. याच धाग्यावरील पहिल्या अनेक प्रतिक्रिया बघा. आणि हा प्रकार आजचा नाही, खूप जुना आहे. नावे बदलतात, स्टाईल सेम :-)

मला एक सांगा, येथे समाजसुधारणेच्या उदात्त हेतूने कंठशोष करणार्या किती लोकांना तशी खरीच इच्छा असेल ? इथे प्रबोधन करता तसे बाहेरही करा म्हणावे. नातेवाईकांत कुणाच्या लग्नाचे बघत असतील तर पत्रिका बघण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न करा म्हणावे.

खरेतर यातील किती लोकांनी स्वत:चे लग्न ठरवताना बघितल्या असतील देव जाणे. कारण आजही लग्नाच्या बाजारात 95%+ लोकं पत्रिका बघतात. मग जालावरच हे पुरोगामित्व कुठून आले ?

संजय क्षीरसागर's picture

1 Jul 2014 - 12:20 am | संजय क्षीरसागर

खरेतर यातील किती लोकांनी स्वत:चे लग्न ठरवताना बघितल्या असतील देव जाणे. कारण आजही लग्नाच्या बाजारात 95%+ लोकं पत्रिका बघतात. मग जालावरच हे पुरोगामित्व कुठून आले ?

मी अजूनही पत्नीची पत्रिका बघितली नाही. ज्याला व्यक्तीची पारख करता येते तो पत्रिकेसारख्या छदाम गोष्टीला विचारत नाही. माझ्या लग्नपत्रिकेवर देवाचा उल्लेख नाही. मी फक्त रविवार हा सगळ्यांना सोयीचा वार पाहून, अक्षरशः एकही विधी न करता, रजिस्टर्ड मॅरेज केलं आहे. आणि सगळं उत्तम चालू आहे.

मला एक सांगा, येथे समाजसुधारणेच्या उदात्त हेतूने कंठशोष करणार्या किती लोकांना तशी खरीच इच्छा असेल ?

अर्थात!

इथे प्रबोधन करता तसे बाहेरही करा म्हणावे. नातेवाईकांत कुणाच्या लग्नाचे बघत असतील तर पत्रिका बघण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न करा म्हणावे.

इथे आणि तिथे यात फरक काय? अंतरजाल हा प्रबोधनाचा मिडिया आहे. तुम्ही इथे बाष्कळ चर्चा चाललीये असा गैरसमज करुन घेऊ नका.

सूर्य विझणं, पृथ्वी परिभ्रमण कक्षेबाहेर फेकली जाणं, एखादा ग्रह पृथ्वीवर आदळणं यासरख्या घटना; दोन कारणांसाठी नमूद केल्या आहेत. एक, अस्तित्वाच्या व्यापकतेची कल्पना यावी आणि दोन, त्या मानवी नियंत्रणाच्या सर्वस्वी पलिकडे आहेत. थोडक्यात, कुंडलीसारख्या छ्दाम गोष्टीत त्या बसणं अशक्य आहे.

तुम्ही थोडा जरी विचार करु शकलात तर इतक्या दूर जाण्याचीही गरज नाही. रक्ताभिसरण, पचन, अनेकविध संप्रेरकांचे स्त्रवण, उत्सर्जन, मेंदू आणि मज्जासंस्थेचं कार्य यासारख्या देह जीवंत राहण्यासाठी असलेल्या अत्यंत बेसिक प्रक्रिया, जातकाच्या इच्छेपलिकडे आहेत.

आता अशी कल्पना करा की एखादी बस जातकाला एका विविक्षित वेळी उडवणार आहे. तर त्या बसचालकाच्याही उपरनिर्दिष्ट शारीरिक घटना, बसच्या मेकॅनिझमचं फेल्युअर, ऐन वेळी सदर जातक (ऊडवला जाण्यासाठी) नेमक्या जागी असणं, या सर्व गोष्टी जातकाच्या आणि ज्योतिष्याच्या इच्छेपलिकडे आहेत.

तस्मात, जातकाच्या जीवनात अमुक एक घटना विविक्षित वेळी घडेल हे ग्रह-तार्‍यांच्या भविष्यकालीन स्थितीवरुन, वर्तमानात विदित करणं हास्यास्पद आहे.

आता पुढे -

१) कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही.

ही वस्तुस्थिती हरेक क्षणी आहे. यावर तुम्ही म्हटलंय `हे ही खरे ठरण्यासाठी त्याव्यक्तिचे आयुष्य संपले तर पाहीजे.'

आयुष्य केव्हा संपेल हे सांगता येत नाही, हा मूळ मुद्दा आहे. जर पुढचा क्षणच अनिश्चित आहे तर भविष्यवाणीला अर्थ नाही. आणि तुम्ही म्हणतायं आयुष्य संपले तर पाहिजे! आयुष्य संपल्यावर काय करणार भविष्यवाणी?

२) आपण अस्तित्वाशी समरुप आहोत. आपण काहीही केलं तरी त्यापासून वेगळे होऊ शकत नाही. हे अस्तित्व इतकं व्यापक, अगाध आणि रहस्यमय आहे की ते एखाद्या यकःश्चित जातकाच्या कुंडलीवरनं, पुढल्या क्षणी काय रुप घेईल हे ठरवणं म्हणजे अज्ञानाची परिसिमा आहे.

शिवाय कुंडली ही अखिल अस्तित्वाशी तुलना करता एका नगण्य व्यक्तीच्या जन्मवेळेची, अत्यंत तोकडी आणि अंशमात्र पॅरामिटर्स असलेली भूतकालीन घटना आहे. आणि कुंडलीचा संदर्भ घेणं म्हणजे अस्तित्व हे सदरहू व्यक्तीच्या जन्मापासून सुरु झालं असं समजणं आहे. तस्मात, जातकाच्या जन्मापूर्वीचा अस्तित्वाचा अनंत कालावधी, सोयिस्करपणे विसरणं ही सुद्धा तितकीच मूढता आहे. त्यामुळे तुमचं हे विधान :

हेच तर शक्य करुन दाखविले आहे ज्योतिषशास्त्राने!

सर्वस्वी फोल आहे.

शेवटी आपण मला ज्योतिषशस्त्रावरची पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला आहे. त्यापेक्षा आपण ज्योतिषास्त्रावरची पुस्तकं वाचणं बंद केलंत तर वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक विचारसरणी विकसित होईल.

एकेक अंशापर्यँत जाऊन काय वेगळा शोध लावलेला नाही .त्यामुळे भावचलित अभ्यास निरर्थक वाटतो .

आपल्याकडे चतुर्थ सुख स्थान संसारी(विशेषत: स्त्रिया) लोकांसाठी आणि व्ययस्थान साधूसंतांसाठी फार महत्त्वाचे आहे .इथे अंशात्मक चा काही उपयोग नाही .चांगले /वाईट होतेच .
मुलगी सुखी होणार का हा प्रश्न सर्वाँना भेडसावत असतो .याचा निकाल लावायला एक लग्नकुंडली पुरेशी असते कशाला अंशात्मक खटाटोप करतात ?
पुरुषांच्या बाबतीत हा किती कष्ट घेईल ,किती जणांचा पोशिंदा /आधार होईल हे महत्वाचे आहे .अंशात्मक भविष्य काढून सतरंजीवर बसेल का गादीवर याचा काही उपयोग नाही .

जुळ्यांच्या कुंडलींचा अभ्यास हा शैक्षणिक उत्सुकतेपोटी केलेला प्रयत्न आहे .

मुक्त विहारि's picture

27 Jun 2014 - 7:49 am | मुक्त विहारि

ह्या साध्या प्रश्र्नाचे उत्तर कुणी देवू शकेल का?

सरळमार्गी's picture

27 Jun 2014 - 10:01 am | सरळमार्गी

माझा ज्योतिषशास्त्राचा थोडा म्हणजे अगदि प्राथमिक स्तरावरचा अभ्यास आहे, त्यादृष्टीने मी स्वत:ला अजून बिगरी ईयत्तेत आहे असेच समजतो, त्यामुळे आपण जे चर्चेचे विषय उपस्थित केले आहेत त्या विषयावर काही भाष्य करण्या इतकी माझी क्षमता नाही आणि लायकीही नाही. आपले काही लिखाण मी वाचले आहे त्यामुळे आपले चौफ्रर ज्ञान, व्यासंग किती दांडगा आहे याची मला कल्पना आहे त्यामुळे आपला हा चर्चेचा प्रस्ताव मला एकाद्या हिंदकेसरी पैलवानाने शड्डू ठोकून एखाद्या शाळकरी, शेंबड्या पोराला कुस्तीचे आमंत्रण दिल्यासारखे वाटले. आपल्याला अपेक्षित असलेली चर्चा करण्यास मी स्रर्वतोपरी असमर्थ आहे, क्षमस्व.

थोडासा लहान तोंडी मोठा घास असे वाटेल, आपल्याला काही सुचवावे अशी माझी लायकीही नाही पण तरीही हा थोडासा उध्द्टपणा करतोय (त्यासाठीही आगावूच क्षमा मागतो):

(1) माझा प्रतिसाद मूळ धागाकर्त्याच्या काही शंकांना माझ्या समजुती प्रमाणे उत्तर देणे हा होता. आपला चर्चा घडवून आणायचा उद्देश जरी स्त्युत्य असला तरि ह्या धाग्यावर तो करणे हे बरोबर नाही असे मला वाटते , त्यासाठी आपण दुसरा धागा काढावा असे नम्र पणे सुचवावेसे वाट्ते. मी अनेक चर्चा ग्रुप्स चा सभासद आहे , सर्वत्र एक नियम कसोशीनी पाळला जातो तो म्हणजे मूळ धाग्याच्या विषयाला व उद्देशाला धरुनच पुढले सर्व प्रतिसाद असावेत. मिपा वर दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही. संपादक मंडळाला कार्यबहुल्यामुळे कदाचित वेळ होत नसावा पण निदान आपल्या सारख्या विद्वान , सुसंस्कृत ,सर्वमान्य , वरिष्ठ सभासदांनी तरी स्वयंशिस्तीने हा नियम पाळावा असे मला मनापासून वाटते.

(2) आपला ज्योतिषशास्त्रा वर चर्चा करण्याचा उद्देश चांगला आहे हे मान्य ,पण म्हणून काय दिसेल त्या कोणाही लुंग्यासुग्याला (म्हणजे मी) चर्चेचे प्रस्ताव देत फिरणार का ? ज्याच्याशी चर्चा करायची तो निदान आपल्या बरोबरीचा तरी आहे ह्याची खात्री तरी नको का करुन घ्यायला , श्री आद्य शंकराचार्यांनी सुद्धा वादविवादा साठी तितक्याच तोलामोलाचे श्री मंडणमिश्र बघितले हो, एखाद्या चारघरी भिक्षुकी करुन पोटाची खळगी भरणार्‍या बाळंभटाशी नाही चर्चा करत बसले!

माझ्या अल्प माहीती प्रमाणे ,ज्योतिष या विषयातली अनेक ऋषीतुल्य व्यक्तीमत्वे सध्या हयात आहेत उदाहरणेंच द्यायची तर : पुण्यात श्री व.दा.भट , श्री जकातदार ,श्री मारटकर आहेत, मुंबईत श्री शरद उपाध्ये, श्री घोंडोपंत आपटे आहेत , ठाण्यात श्री सुनिल गोधळेकर आहेत, डोंबिवलीत श्री श्री श्र्री भट आहेत, नाशीक येथे श्री वाईकर आहेत, भोपाळ येथे श्री मदन त्रिवेदी , श्री हंसराज आहेत, रांची येथे श्री महापात्रा आहेत, बडोद्यात सौ कंकणा राठोड आहेत, नवी दिल्लीत श्री के एन राव ,सौ रिमा कोमार आहेत, इंदूर मध्ये श्री जयंत सोमण आहेत, चेन्नईत श्री के सुब्रमण्यम आहेत, हैद्रबादेत श्री पुन्नेश्वर राव ,श्री राजेंद्र निमजे (हे आय ए एस ऑफिसर आहेत) आहेत, प्रागज्योतिष्पुरात श्री संजय रथ आहेत, वाराणसी मध्ये श्री केवलराम आचार्य आहेत, अहमदबादेत श्री कनक बोस्मीया आहेत, मदुराईत श्री के भास्करन आहेत, अमेरिकेत श्री जेम्स ब्रहा , श्री रॉबर्ट स्वबोधा ,सौ लिझ ग्रीन , श्री पॉल व्होगन , श्री नोएल टील, सौ मार्था वेस्कॉट, सौ जेन हॅंपर, सौ ली लेहमन , श्री हार्त दी फऊ आहेत (जे सध्या भारतात नवी दिल्ली येथे आले आहेत) , लंडन मध्ये श्री जॉन फ्रावले आ, सौ कोमील्ला सूटन , सौ डोन्ना कनिंघॅम आहेत ,जर्मनी येथे श्री बाल्डुर रहेनोल्ड इबर्टीन आहेत, नेदर्लॅन्ड्स येथे सौ हमाकर झोंडॅग आहेत, द.कोरियात श्री टीन वीन आहेत ही मंड्ळी कदाचित आपल्या तोलामोलाची असावित असे मला वाट्ते (कदाचित शब्द यासाठीच वापरला की आपण या लोकांनाही भारी पडणार यात शंकाच नाही पण सामना अगदिच एकतर्फी होणार नाही असे वाटते) त्यांच्याशी चर्चा करण्यात समाधान आहे का एखाद्या नवख्या विद्यार्थ्याला चर्चेला बोलावून नामोहरम करण्यात आहे?

पुन्हा एकदा मी आपण दिलेला चर्चेचा प्रस्ताव स्विकारु शकत नाही , माझी तेव्हढी क्षमता नाही काय करणार> तेव्हा या बद्दल क्षमस्व.

बाळ सप्रे's picture

27 Jun 2014 - 11:14 am | बाळ सप्रे

सर्वत्र एक नियम कसोशीनी पाळला जातो तो म्हणजे मूळ धाग्याच्या विषयाला व उद्देशाला धरुनच पुढले सर्व प्रतिसाद असावेत. मिपा वर दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही.

इथे विषयाच्या मुळाशी जाउन प्रश्न विचारले गेले आहेत. अवांतर नव्हेत. जर त्याला उत्तर नसेल किंवा असे प्रश्न येउ नयेत असे वाटत असेल ज्योतिषविषयक एका क्लोजड ग्रुपची गरज आहे.. मिसळपावसारख्या खुल्या फोरमवर तशी अपेक्षा चुकिची आहे.

बाकी तुमच्या यादितल्या ऋषीतुल्यंपैकी कोणाकडुनही, वरील किंवा ज्योतिषविषयक इतर मूलभूत प्रश्नांवर समाधानकारक उत्तर ऐकण्यास आतुर आहे.. कुठल्याही फोरमवर!!

चांगला विचार आहे , मी यादी तर दिली आहे, या यादीतले सर्वच मान्यवर आहेत, प्रसिद्ध आहेत, बहुतेकांच्या स्वत:च्या वेबसाईटस, ब्लॉगज आहेत, काही फेसबुक वर आहेत, यादीतल्या 70% गुरुजनांनी ज्योतिषशास्त्रावर ग्रंथ लिहले आहे, ते बाजारात उपलब्ध आहेत, त्या ग्रंथांत त्यांचे परिचय आहेत, संपर्कासाठीचे पत्ते आहेत. गुगल केलेततरीही बरीच माहीती त्यांच्याबद्दल मीळू शकेल .' ऋषीतुल्यंपैकी कोणाकडुनही, वरील किंवा ज्योतिषविषयक इतर मूलभूत प्रश्नांवर समाधानकारक उत्तर ऐकण्यास आतुर आहे" हे मला सांगून काही उपयोग होणार नाही कारण मी थोडाच त्यांचा प्रतिनिधी म्हणून काम बघतोय ! आपण त्याच्याशी संपर्क साधू शकता, काय चर्चा करायची ती करु शकता, तुम्हाला कोणीही आडवलेले नाही. खरे ना ?

संजय क्षीरसागर's picture

27 Jun 2014 - 1:07 pm | संजय क्षीरसागर

इथे कुणीही भाव चलित किंवा लग्न कुंडली दाखववून, जातकाचं भवितव्य विचारत नाहीये. तस्मात, तज्ञ असण्याचा प्रश्नच नाही. तज्ञाचा अर्थ भविष्याच्या वर्तांकनातली अचूकता आहे आणि ऋषीतुल्यांकडे जाण्यापूर्वी, ज्या कुंडलीवरुन ते भविष्यवाणी करणार, ती कुंडलीच एक निरर्थक आकृती आहे काय? असा प्रश्न आहे.

ज्या विषयाचे आपण अभ्यासक आहात त्यात कुंडलीचा आणि भविष्याचा काय कार्य-कारण आहे, इतपत उत्तर तरी (चर्चेत भाग घेतल्यानं) आपल्याला माहिती असावं अशी अपेक्षा आहे.

जर एखादा मुका, दुसर्‍या बहिर्‍याला गाणं ऐकवत असेल, तर दोघांनाही मैफिल चांगली चाललीये असंच वाटत राहील. मुळात मुका गाऊ शकतो का (पक्षी, कुंडली या डिझाईनला काही अर्थ आहे का) आणि बहिरा ऐकू शकतो का (पक्षी, त्या निरर्थक कागदावरनं कुणीही ऋषीतुल्य काही अंदाज बांधू शकेल का?) या प्रश्नाला उत्तर देता यायला हवं.

ज्ञानव's picture

30 Jun 2014 - 10:20 am | ज्ञानव

जर मी बहिरा आहे तर मी मुक्याच्या गाण्याला का जावे? जावे तर जावे आणि तो मुकाच आहे म्हणून (मला तोंड दिले आहे म्हणून आणि ऐकू काही येतच नाही म्हणून) ओरडावे? ये हजम नाही हुआ दोस्त.

(बाकी उदाहरण दोघांना हि लागू आहे म्हणजे (पक्षी : ज्योतिषाचे समर्थक आणि विरोधक)

बाळ सप्रे's picture

27 Jun 2014 - 1:37 pm | बाळ सप्रे

यांच्या वेबसाईटस, ब्लॉगज , फेसबुक पान इ वरुन "आपण वर्तवलेले भविष्य अचूक कसे आले" अशा कथा सोडुन मूलभूत प्रश्नाला उत्तर देण्याच्या एखाद्या प्रयत्नाची लिंक देउ शकाल का आपण??

त्यांच्या वेबसाईटस, ब्लॉगज , फेसबुक पानावर त्यांनी काय लिहायचे हा त्यांचाच अधिकार आहे. त्यांनी काय लिहायचे काय नाही याची सक्ती तर करता येणार नाही. तसेच त्यांनी पूर्वी कोणाशी अशी चर्चा केली होती का, उत्तरे दिली होती का, त्याचा रिपोर्ट त्यांनी त्याच्या वेबसाईटस, ब्लॉगज , फेसबुक वर का नाही लिहला हे कशाला पाहीजे, तुम्हाला चर्चाच करायची आहे ना मग सरळ गाठा त्यांना , विचार तुमचे प्रश्न , करा चर्चा , घोडे कुठे आडलयं? ह्यातल्या बर्‍याच जणांचे निवासस्थानांचे, कार्यालयाचे पत्ते अगदि सहज उपलब्ध आहेत , तेव्हा त्यांना समक्ष भेटून चर्चा नाही का करता येणार ? त्यासाठी वेबसाईटस, ब्लॉगज , फेसबुक हेच कशाला पाहिजे ? असे इंटरनेट्च्या माध्यमातून , पड्द्या आडून आडून का ब्ररे ? तुमच्या जागी मी असतो तर लिंका द्या, हे द्या ,ते द्या , हे नाही अन ते नाही अशा लंगड्या सबबी नक्कीच सांगत बसलो नसतो. सरळ पत्ते हुडकून काढले असते, समक्ष भेटलो असतो ,चर्चा केली असती , आहे काय आणि नाही काय , हे मला जे वाटले ,जे सहज सुचवले.ते लिहले ते सुद्धा 'लिंका' द्या अशी मागणी माझाकडे केलीत म्हणून बर का तेव्हा राग मानू नका.

असे इंटरनेट्च्या माध्यमातून , पड्द्या आडून आडून का ब्ररे ?

अहो आजच्या काळातील ज्ञान संपादनाचे सर्वात मोठे माध्यम आहे ते.

आजच्या काळात असे आक्षेप घेणे हे अज्ञान लपवण्यासाठीच घडु शकते..

हे मान्य , ते तसे नाही असे मी कधीच म्हणालेलो नाही. माझा आक्षेप इंटरनेट व त्या माध्यमातून होणार्‍या ज्ञान संपादनाला नाहीच आपण गैरसमज करुन घेतलेला आहे. पण त्याच बरोबर इंटरनेट आले म्हणजे ज्ञान सपादनाचे इतर् सर्व मार्ग ब्ंद करा असे तर नाही ना? त्या ज्योतिर्विदांनी आपल्याला हवी असलेली माहीती इंटरनेट माध्यमातूनच द्यावी , आपल्याशी चर्चा ही इंटरनेट माध्यमातूनच करावी हा आग्रह का? मी पड्द्या आडून शब्दप्रयोग केला त्यात काय चूक आहे कारण कोणी कसलीही आयडि घेऊन , काहीही इमेल अड्रेस वापरुन , स्वतःचा चेहेरा व ओळख लपवून काही करु शकतो ते इंटरनेट या च्या माध्यमातूनच / पड्द्या आडूनच शक्य होते ना? जेव्हा एखादी स्वच्छ हेतू असलेली, सभ्य व्यक्ती प्रत्यक्ष भेट्ते तेव्हा नाव गाव कदाचित खोटे सांगेल पण तिला निदान चेहेरा तरी लपवता येणार नाही. इंटरनेटच्या माध्यमा पेक्षा ह्या प्रत्यक्ष भेटीत जास्त खुलेपणा, पारदर्शी पणा असेल नाही का?

चर्चे साठी मला धारे वर ध्ररुन काहीच साध्य होणार नाही हे एव्हाना आपल्या लक्षात यायला हवे होते . मी सुचवल्या प्रमाणे जर आपण या तज्ञांना , ग्रंथकारांना समक्ष भेटलात तर चांगली चर्चा होण्याची शक्यता आहे असे नाही का वाट्त आपल्याला?

सगळ्यात मह्त्वाची गोष्ट 'कोण हे बाळ सप्रे ?" अस प्रश्न त्यांनाही पडू शकतो बर का, तेव्हा तुमची ही क्रेडेन्शीअल्स एकदा तपासून बघा म्हणजे झाले (फक्त ती मला सांगत बसू नका, त्याचा मला काही उपयोग नाही) . मी आधीच्या एका प्रतिसादात म्हणाल्या प्रमाणे 'सामना' बरोबरीच्या प्रतिस्पर्ध्यात व्हायला हवा, उगाच कोणीही उठावे माझ्याशी चर्चा करा म्हणावे इतकी ही तज्ञ मंडळी रिकामटेकडी, वाटेवर पडलेली नाहीत.

मला वाट्ते आवश्यक तो सर्व खुलासा जो मला देणे शक्य होते तो दिला आहे , आता यावर आणखी काही चर्वण करणे म्हणजे एकतर 'वेड पांघरुन पेड्गाव ला जाणे ' असा अर्थ होइइल , सबब आणखी वितंडवाद नकोत हीच विनती.

बाळ सप्रे's picture

27 Jun 2014 - 4:37 pm | बाळ सप्रे

अंनिस/ नारळीकर यासारख्या लोकांनी जाहीरपणे विचारल्यावर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न देउ शकलेले लोक प्रत्यक्ष भेटल्यावर उत्तरे देउ शकतील हा तुमचा मुद्दा हास्यास्पद आहे.. तिथेही हे ऋषीतुल्य आम्हाला काही सिद्ध करायची गरज नाही असा पवित्रा घेतात .. हे माहित नसल्यासारख करणे म्हणजे
'वेड पांघरुन पेड्गाव ला जाणे '..

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jun 2014 - 3:36 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

बाळ सप्रे's picture

27 Jun 2014 - 11:24 am | बाळ सप्रे

बाकी तुमच्या यादितल्या धोंडोपंत आपटे यांनीदेखिल अवांतर म्हणत असल्या प्रश्नांपासुन पळ काढला आहे मिसळपाववर.. बाकी वेगळा धागा जरी काढला असेल कोणी तर चर्चेत कधी सहभागी होत नाहित ते..

कोणाला उत्तर द्यायचे कोणाला नाही, कोणाशी चर्चा करायची कोणाशी नाही हा धोडोंपंतांचा वैयक्तीक अधिकार आहे ,आणि तो त्यांनी वापरला असता त्यांच्यावर पळपूटेपणाचा आरोप करणे सभ्यतेचे लक्षण आहे असे मला वाटत नाही.

बाळ सप्रे's picture

27 Jun 2014 - 1:10 pm | बाळ सप्रे

त्यांनीदेखिल असेच प्रश्नकर्त्याला असभ्य ठरवले पण त्यामुळे उत्तर नसण्याचे सत्य लपुन राहिले नाही..

संजय क्षीरसागर's picture

27 Jun 2014 - 11:30 am | संजय क्षीरसागर

मी कुणी हिंदकेसरी मल्ल नाही आणि तुम्ही दिलेल्या दीर्घ प्रतिसादावरुन, तुम्हीही लुंगेसुंगे दिसत नाही; तस्मात चर्चा प्रस्ताव ठेवला होता. आपण चर्चेची असमर्थता दर्शवल्यानं, मी तो मागे घेतो.

बिफोर आय क्लोज, आपण म्हटले आहे:

सर्वत्र एक नियम कसोशीनी पाळला जातो तो म्हणजे मूळ धाग्याच्या विषयाला व उद्देशाला धरुनच पुढले सर्व प्रतिसाद असावेत.

माझा प्रतिसाद कुंडली या मुलभूत गोष्टीवरच होता, कारण ती सर्व ज्योतिषशास्त्राचा आत्मा आहे. तिच्याशिवाय ज्योतिषशास्त्राला भविष्याच्या वर्तांकनाची दिशा मिळणं असंभव आहे.

थोडक्यात, ज्या होकायंत्रानं दिशा शोधायची ते गंडलेलं असेल तरी दिशा दाखवेलच, पण ती उत्तर दिशाच असेल याची खात्री नाही. एखादे वेळी आनमान धक्यानं दिशा बरोबर निघेलही पण मग ते शास्त्र नाही. तो फक्त अडल्यानडलेल्या तितक्याच अज्ञानी व्यक्तीनं दिलेला मानसिक दिलासा आहे.

माझ्या इथल्या हितचिंतकांचा रोष पत्करुन, नम्रपणे नमूद करतो की, नामस्मरण ही जशी काल्पनिक देवाची सुटकेसाठी केलेली याचना आहे. त्यानं फक्त पुजारी गब्बर होतात आणि भक्तांचं प्रसंगातून सुटका होणं निव्वळ योगायोग असतो. तद्वत ज्योतिषशास्त्रानं, मोबदला घेणारे ज्योतिषी श्रीमंत होतात. आणि जातकाच्या हाती केवळ, चातकासारखी पावसाची वाट पाहाणं उरतं.

(2) आपला ज्योतिषशास्त्रा वर चर्चा करण्याचा उद्देश चांगला आहे हे मान्य ,पण म्हणून काय दिसेल त्या कोणाही लुंग्यासुग्याला (म्हणजे मी) चर्चेचे प्रस्ताव देत फिरणार का ? ज्याच्याशी चर्चा करायची तो निदान आपल्या बरोबरीचा तरी आहे ह्याची खात्री तरी नको का करुन घ्यायला , श्री आद्य शंकराचार्यांनी सुद्धा वादविवादा साठी तितक्याच तोलामोलाचे श्री मंडणमिश्र बघितले हो, एखाद्या चारघरी भिक्षुकी करुन पोटाची खळगी भरणार्‍या बाळंभटाशी नाही चर्चा करत बसले!

हे खासंच. :)

तुमच्या ऋषीतुल्यांच्या यादीमधील श्री रॉबर्ट स्वबोधा आणि श्री हार्त दी फऊ या दोघांनी मिळून लिहिलेलं Light On Life: An Introduction to the Astrology of India हे पुस्तक वाचलं होतं. पुस्तकांतर्गतच खुप विरोधाभास होता. असो.

श्रीगुरुजी's picture

27 Jun 2014 - 12:56 pm | श्रीगुरुजी

>>> माझ्या इथल्या हितचिंतकांचा रोष पत्करुन, नम्रपणे नमूद करतो की, नामस्मरण ही जशी काल्पनिक देवाची सुटकेसाठी केलेली याचना आहे. त्यानं फक्त पुजारी गब्बर होतात आणि भक्तांचं प्रसंगातून सुटका होणं निव्वळ योगायोग असतो.

दुर्दैवाने हे नमूद करावसं वाटतंय की "नामस्मरण" या विषयी आपले अत्यंत गैरसमज आहेत. तुमच्या वाक्यातील "काल्पनिक देव", "सुटकेसाठी केलेली याचना", "फक्त पुजारी गब्बर होतात", "भक्तांचं प्रसंगातून सुटका होणं" इ. वाक्ये तुमचे नामस्मरणाविषयी मूलभूत अज्ञान अथवा गैरसमज अथवा पूर्वग्रह अथवा तिन्ही दर्शवितात.

नामस्मरण ही कोणत्याही स्वरूपात केलेली याचना नसून, सुटकेसाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी नामस्मरण केले जात नाही. त्याचप्रमाणे नामस्मरण करायला कोणताही पुजारी सांगत नाही किंवा तसा आदेश देत नाही. नामस्मरणामुळे भक्ताची कोणत्याही प्रसंगातून किंवा संकटातून सुटका होत नाही. तसे झाल्यास तो योगायोग असतो. त्याचा नामस्मरणाशी संबंध नसतो, कारण नामस्मरण हे संकटातून सुटण्यासाठी केले जात नाही आणि त्या हेतूने कोणी नामस्मरण केले तरी तशी सुटका होत नाही. "नामस्मरण" या विषयावर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी अत्यंत सोप्या शब्दात विवेचन केले आहे. ते आपण पूर्वग्रह व गैरसमज दूर ठेवून निव्वळ उत्सुकता या भावनेने वाचल्यास आपल्या काही शंका/कुशंका/समज/गैरसमज नक्कीच दूर होतील.

संजय क्षीरसागर's picture

27 Jun 2014 - 1:30 pm | संजय क्षीरसागर

या प्रतिसादापासून, त्या पोस्टवर झालेली आहे. आणि त्यावर समर्पक उत्तरं दिली आहेत. मी इथे आवांतर करु इच्छित नाही.

श्रीगुरुजी's picture

28 Jun 2014 - 2:02 pm | श्रीगुरुजी

>>> नामस्मरणावर प्रदीर्घ चर्चा या प्रतिसादापासून, त्या पोस्टवर झालेली आहे. आणि त्यावर समर्पक उत्तरं दिली आहेत. मी इथे आवांतर करु इच्छित नाही.

तुमची उत्तरे किती "समर्पक" असतात हे केजरीवालांशी संबंधित धाग्यांवर अनेकवेळा दिसून आले आहे. त्यामुळे तुम्ही वर संदर्भ दिलेल्या लिन्कवर जाण्याची गरजच नव्हती. आधीच अंदाज आला होता. परंतु तरीसुद्धा गंमत म्हणून तुम्ही दिलेल्या लिंकवर टिचकी मारल्यानंतर संपूर्ण धागा न दिसता केवळ तुमचा स्वतःचा एकच प्रतिसाद दिसला. तो प्रतिसाद म्हणजे कोणत्यातरी सभासदाने आधी दिलेल्या प्रतिसादाचा प्रतिवाद होता. तुमचा तो प्रतिवाद म्हणजे आधीच्या सभासदाने दिलेल्या एका प्रतिसादातील काही निवडक वाक्ये उचलून प्रत्येक वाक्याला प्रतिवाद म्हणून तुमचे एकच वाक्य होते. तुम्ही प्रतिवाद म्हणून दिलेली स्वत:ची वाक्ये अर्थातच अपेक्षेनुसार निरर्थक होती. अशा वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या ५-६ वाक्यांना तुम्ही "सविस्तर व समर्पक उत्तरे" म्हणत आहात. धन्य आहे!

संजय क्षीरसागर's picture

30 Jun 2014 - 11:15 am | संजय क्षीरसागर

तिथे लिंक दिलेल्या प्रतिसादापासून पुढे चर्चा झाली आहे.

या प्रतिसादापासून, त्या पोस्टवर झालेली आहे

त्यामुळे तुम्ही चर्चा वाचलीच नाही, हे तुमचा खालील प्रतिसाद दर्शवतो:

तुम्ही दिलेल्या लिंकवर टिचकी मारल्यानंतर संपूर्ण धागा न दिसता केवळ तुमचा स्वतःचा एकच प्रतिसाद दिसला.

काही न वाचता सुद्धा, आपण जी स्वैर विचार उधळण केली आहे त्याची कल्पना असल्याने, आपल्याला कितपत समजू शकेल याची शंका होतीच. तस्मात, आपण नामस्मरण करत राहाणे इष्ट.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2014 - 12:59 pm | श्रीगुरुजी

>>> त्यामुळे तुम्ही चर्चा वाचलीच नाही, हे तुमचा खालील प्रतिसाद दर्शवतो:

मी ती संपूर्ण चर्चा वाचलेली आहे. त्यातील तुमचे विनोदी विचारधन व इतरांनी स्पष्टपणे त्यातील फोलपणा दाखवून दिलेले प्रतिसाद देखील वाचलेले आहे. तुम्ही माझ्या याआधीच्या प्रतिसादाला प्रत्युत्तर म्हणून त्याच चर्चेतील एक लिन्क पाठविलीत. त्या लिंकवर टिचकी मारल्यावर फक्त तुमचा एकट्याचाच एकच प्रतिसाद दिसतो. एखाद्या प्रतिसादाला "उत्तर द्या" या लिन्कवर टिचकी मारल्यावर त्या चर्चेतील फक्त तोच प्रतिसाद एका नवीन पानावर उघडतो. तुम्ही या नवीन पानाची लिन्क दिलेली आहे. मूळ धाग्याची लिन्क दिलेली नाही. आपला एकमेव प्रतिसाद म्हणजे चर्चेचे सार आहे, असा तुमचा गोड गैरसमज किंवा स्वतःबद्दल भ्रम असावा. असो.

>>> काही न वाचता सुद्धा, आपण जी स्वैर विचार उधळण केली आहे त्याची कल्पना असल्याने, आपल्याला कितपत समजू शकेल याची शंका होतीच. तस्मात, आपण नामस्मरण करत राहाणे इष्ट.

आधी लिहिल्याप्रमाणे मी संपूर्ण धागा वाचला आहे व त्यातील तुमचे विनोदी प्रतिसाद देखील वाचले आहे. त्यात न समजण्यासारखं काहीच नाही. मला विनोद चांगलाच समजतो. तुमच्या प्रतिसादातील सर्व विनोद मला समजले.

ज्याप्रमाणे तुमचे केजरीवाल व "आम आदमी पक्ष" यांविषयी गोड गैरसमज व भ्रम होते, तद्वत् तुमचे स्वतःविषयी गोड गैरसमज व भ्रम आहेत. ज्याप्रमाणे तुमचे भाजप व मोदींविषयी गैरसमज व पूर्वग्रह होते, तद्वत् तुमचे ज्योतिषशास्त्राविषयी व नामस्मरणाविषयी गैरसमज व पूर्वग्रह आहेत. तथापि निवडणुकपूर्व काळात व नंतर केजरीवालांच्या मर्कटलीलांमुळे तुमचे त्यांच्याविषयीचे गोड गैरसमज दूर होऊन भ्रम दूर झाला. तसेच निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजप व मोदींविषयीचे तुमचे गैरसमज व पूर्वग्रह दूर झाले. अगदी तसेच आताही होईल. काही काळातच तुमचे ज्योतिषशास्त्राविषयीचे व नामस्मरणाविषयीचे गैरसमज व पूर्वग्रह दूर होऊन तुमच्या मनातील अज्ञानरूपी काळोख दूर होऊन तुमच्या मनात ज्ञानाचा प्रकाश पडेल याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

सांगण्यापेक्षा, नामस्मरणावर तुमचा अनुभव, नव्या पोस्टमधे लिहा.

माझं हे विधान आहे : देव हा भ्रम आहे आणि नामस्मरणानं तो गवसेल ही भ्रामक समजूत आहे. (एक कोटी रामनाम वगैरे!). नामस्मरणानं एखाद्याला देव वगैरे दिसायला लागला तर त्याचा भ्रम सघन झाला आहे याचा तो पुरावा ठरतो. थोडक्यात, नामस्मरणाची परिणिती व्यक्ती भ्रमिष्ट होण्यात होते.

आता इथे उगीच केजरीवाल वगैरे बाष्कळ बडबड करण्याऐवजी नाम-महात्म्यावर स्वतंत्र लेख लिहा आणि मी माझं वरचं विधान तिथे सिद्ध करुन दाखवतो.

धन्या's picture

27 Jun 2014 - 5:57 pm | धन्या

माझीही देव, नामस्मरण संदर्भातील मते बरीचशी संक्षींच्या मतांसारखीच आहेत. अर्थात ही माझी मते मागच्या दोन अडीच वर्षांत बनलेली आहेत. त्यामागे माझं या काळात मी केलेलं अफाट वाचन हे कारण आहे.

मात्र अशी मते बनण्याआधी पंचवीस वर्षांहून अधिक काळ "त्याच्या ईच्छेशिवाय पानही हलत नाही" याच मताचा होतो. त्यामुळे मी कुठल्याही मतावर टीका करताना "उचलली बोटे आपटली कीबोर्डवर" असला प्रकार करत नाही.

तुम्ही गोंदवलेकर महाराजांच्या ज्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे ते पुस्तक माझ्याकडे आहे. हार्डबाऊंड बांधणी असलेलं, मुखपृष्ठावर महाराजांचं चित्र असलेलं हे पुस्तक पाहताक्षणी घ्यावसं वाटलं मला. मात्र अजून वाचलेलं नाही. आता जरुर वाचेन.

मात्र या बाबतीतलं एक निरिक्षण असं आहे की जेव्हा देव, धर्म, नामस्मरणाच्या संदर्भात काही प्रश्न विचारला तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अमक्या अध्यायात छान सांगितलंय, समर्थांनी दासबोधात अमक्या दशकाच्या अमक्या समासात हे समजावलं आहे अशीच उत्तरे मिळतात.

सारांश असा की, नामस्मरण या विषयावरचे तुमचे स्वतःचे मत वाचायला आवडेल. :)

मृत्युन्जय's picture

27 Jun 2014 - 1:16 pm | मृत्युन्जय

ज्योतिष हे शास्त्रच आहे. कारणा अचूक भविष्य वर्तवणारे ज्योतिषी पाहिलेले आहेत. पण ज्योतिष्याच्या नावाने थोतांड पसरवणारेच जास्त, बाकी चालु द्या.

श्रीगुरुजी's picture

27 Jun 2014 - 1:18 pm | श्रीगुरुजी

>>> ज्योतिष हे शास्त्रच आहे. कारणा अचूक भविष्य वर्तवणारे ज्योतिषी पाहिलेले आहेत. पण ज्योतिष्याच्या नावाने थोतांड पसरवणारेच जास्त, बाकी चालु द्या.

संपूर्ण सहमत

मार्कस ऑरेलियस's picture

27 Jun 2014 - 1:33 pm | मार्कस ऑरेलियस

शास्त्र ह्या शब्दाची तुमची व्याख्या तरी काय ?

अवांतर : मी ऑफीसच्य डस्टबीन मधे कागदाचा बोळा अचुकपणे फेकु शकतो ५-६ फुटावरुन ! मग बोळाफेकशास्त्राविषयी काही पुस्तके लिहावीत असा मानस आहे !!

आदिजोशी's picture

27 Jun 2014 - 5:25 pm | आदिजोशी

कोणतीही वस्तू कुठूनही फेकली तर ती सभोवतालच्या गोष्टी लक्षात घेता कुठे जाऊन पडेल हे शास्त्राने सांगता येतेच की. जरूर लिहा पुस्तक ह्या विषयावर. लोकांच्या उड्या पडतील (तुमच्यावर नव्हे, पुस्तकावर.)

चित्रगुप्त's picture

28 Jun 2014 - 9:40 pm | चित्रगुप्त

प्राचीन भारतीय साहित्यात ज्या 'शास्त्रां'चा उल्लेख मिळतो, त्यापैकी काही अशी:
कल्पशास्त्र, व्याकरणशास्त्र,निरुक्त, ज्योतिषशास्त्र, छंदशास्त्र, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, गणितशास्त्र, कोक/कामशास्त्र, संगीतशास्त्र वगैरे...
याखेरीज आणखीही असतील, त्यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.
मलासे वाटते शालेय शिक्षणाच्या संदर्भात 'सायन्स' या शब्दाला समानार्थी म्हणून 'शास्त्र' या जुन्या संस्कृत शब्दाची योजना केली गेली, तिथेच गोची झाली, आधुनिक पाश्चात्त्य 'सायन्स' चे निकष या 'शास्त्रां' ना लावणे बरोबर नाही.
अलिकडील एका धाग्यात वात पित्त कफ इ. चाचण्यांद्वारे 'सिद्ध' करता येते का वगैरे चर्चा झाली. याविषयी 'नाडिपरिक्षा' ही खरी चाचणी असते, तिथे रासायनिक चाचण्यांचे प्रयोजन नाही.

मूकवाचक's picture

28 Jun 2014 - 9:43 pm | मूकवाचक

+१

मृत्युन्जय's picture

29 Jun 2014 - 11:57 am | मृत्युन्जय

तुम्ही किती सुंदर आणि नेम धरुन कुंथता यावरही तुम्हाला पुस्तके लिहिता येतील. कशावर काय करावे हा तुमचा प्रश्न आहे. मी स्वानुभावाधारित विधान केलेले आहे. बाकी आपली मर्जी.

मूकवाचक's picture

27 Jun 2014 - 4:16 pm | मूकवाचक

+१

यंदाच्या लोकसभा निवडणूकीचे निकाल किती ज्योतिष्यांचे बरोबर आले?

ज्यांचे भाकीत बरोबर आले ते खरे ज्योतिषी बाकीचे ढोंगी. त्यात आकडेवारी कशाला हवी.:D

चित्रगुप्त's picture

28 Jun 2014 - 9:25 pm | चित्रगुप्त

काही लोकांना भविष्यातील घटना आधी कळू शकतात, याचा मला स्वतःला बरेचदा अनुभव आलेला आहे, आणि लंबकाच्या सहाय्याने मी स्वतः देखील असा भविष्याचा वेध घेऊ शकलेलो आहे.
या अनुभवाविषयी मागे एका धाग्यात लिहिले होते.
बाकी काहीतरी सिद्ध करणे, अमूक एक शास्त्र आहे वा नाही, वगैरे चर्चांपेक्षा खरेच कुतुहल/कळकळ असेल, तर प्रत्यक्ष अनुभव घेणे जास्त श्रेयस्कर, आणि आज ना उद्या असे प्रसंग जीवनात घडून येणारच.

श्रीगुरुजी's picture

28 Jun 2014 - 10:30 pm | श्रीगुरुजी

इथे काही मंडळींचा ज्योतिषावर अजिबात विश्वास नाही असं दिसतंय. एक प्रयोग करता येतील. या मंडळींनी मिपावर काही तज्ज्ञ ज्योतिषांना आपल्या पत्रिका द्याव्यात. त्या ज्योतिषांनी त्या पत्रिकांवरून भूतकाळातील काही घटना अचूक ओळखल्यास ज्योतिषात काहीतरी तथ्य आहे असे मानता येईल.

ज्योतिष जाणणार्‍यांना / या विषयात रुचि असणार्‍यांना इथे अशी वागणूक मिळत असताना, एकतरी तज्ञ ज्योतिर्विद मिपा वर शिल्लक राहीला असेल का ? आणि कोणी चुकुन माकुन रेंगाळत असलाच तर केवळ या अशा काही लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्यांच्या पत्रिका अभ्यासून कशाला उत्तरे देत बसेल? आणि का म्हणून तो आपले श्रम व वेळ ह्यांच्यावर खर्च करेल ? हे म्हणजे सापाला दुध पाजण्यातलाच प्रकार ! आणि असे कोण लागून गेले आहेत हे लोक की यांच्या विश्वास बसण्यावर / न बसण्यावर ज्योतिषशास्त्राचे भवितव्य अवलंबून आहे? नसला त्यांचा विश्वास तर नसुदे काय फरक पडतो?

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि थोर कार्यकर्ते कै. नरेंद्र दाभोळकर आणि मिपाकर प्रकाश घाटपांडे यांनी एक संशोधन प्रबंध लिहिलाय ज्यात अतिशय साध्या सांख्यिकी निकषावर ज्योतिषाला तोलून पाहिले असता नाणेफेकीद्वारे रँडमलि ५०% भाकिते बरोबर येतात त्याहीपेक्षा कमी अ‍ॅक्युरसी असल्याचे आढळले आहे. ही पहा लिंक.

http://www.currentscience.ac.in/Downloads/article_id_096_05_0641_0643_0.pdf

फक्त ३ पानांचा हा प्रबंध आहे. यात नक्की काय चुकले आहे ते कळाले तर ज्योतिषाबद्दल अजून अभ्यास करणे सोपे होईल.

पण जन्तेला ३ पानेही वाचण्यात वेळ घालवायची इच्छा नाही, शिवाय जे ज्योतिषावर टीका करतात त्यांच्यावर संपादक मंडळाचा अपमान करण्याचा अश्लाघ्य आरोप करण्यातच रस आहे. चोर ते चोर शिवाय किती ते शिरजोर!!! अतिशय खेदजनक वृत्ती आहे ही. (हे पर्सनली तुम्हांला उद्देशून नाही हेवेसांनल.)

पण तज्ञ , अभ्यासू ज्योतिर्विदाने केलेली भाकीतें नाणेफेकीच्या कौला पेक्षा जास्त तपशिलवार असतात याचा अनेकांना अनुभव आलाय, या सध्याच्या धाग्यावर सुद्धा काही सभासदांनी असे अनुभव आल्याचे लिहले आहे.

उदाहरणच द्यायचे झाले तर , समजा एक २३ वर्षाचा युवक नुकतेच महाविद्यालयिन शिक्षण संपवून नोकरीच्या शोधात आहे , या परिस्थितीत 'नाणेफेक ' केली तर उत्तर हो / नाही असेच असू शकते ना ? छापा का काटा , हेड ऑर टेल असेच असते ना तुमच्या नाण्यात ?

आता तोच युवक एखाद्या तज्ञ , अभ्यासू (हे दोन्ही शब्द मी ठळक केले आहेत) ज्योतिर्विदा कडे हीच समस्या घेऊन जातो , तेव्हा त्याला 'हो' / नाही हे उत्तर तर मिळेलच त्याशिवाय

 • नोकरी कधी लागेल
 • कोणत्या प्रकाराची असेल
 • कोणत्या क्षेत्रातली असेल
 • नोकरी निमित्त सध्याचे राहण्याचे ठिकाण सोडून दूर जावे लागेल का
 • नोकरी सुखावह असेल का,
 • नोकरीत प्रगतिच्या संधी कितपत आहेत
 • नोकरीत वरिष्ठांशी संबंध कसे राहतील
 • ही मिळालेली नोकरी किती काळ टिकेल
 • नोकरी फार काळ टिकणारी नसेल तर त्याचे कारण काय असू शकेल..
 • नोकरी लाभदायक ठरेल का व्यवसाय
 • कोणत्या क्षेत्रातली नोकरी / व्यवसाय लाभदायक ठरु शकेल
 • नोकरी सांभाळून व्यवसाय करता येईल का
 • आई वडिल, भाऊ बहिण, पत्नी वा अन्य जवळच्या नात्यातल्या व्यक्तीच्या नावावर धंदा केल्यास तो लाभदायक ठरेल का
 • व्यवसायाचे योग असतील तर ते केव्हा
 • व्यवसाय स्वतंत्र करणे लाभदायक ठरेल का भागीदारीतला
 • भागीदारीतला व्यवसायच जर असेल तर भागीदार केव्हा मिळतील, ते कसे असतील
 • व्यवसाया साठी लागणारे कर्ज उपलब्ध होईल का
 • व्यवसाय करतान सरकार दरबार च्या काही अडचणीं येऊ शकतात का
 • नोकरी / व्यवसाया निमित्त परदेश गमनाचे योग आहेत का , असल्यास केव्हा

अशा अनेक अंगाने त्या तरुणास मार्गदर्शन मिळू शकते. आणि हे सर्व एका जन्मकुंड्ली वरून ( अथवा प्रश्नकुंडली) वरुन बघता येते (जीला इथे कचर्‍याचा टोपलीत फेकून दिले आहे! )

नाणेफेकीचा कौल ही इतकी माहीती देऊ शकेल?

'वडा पाव ' पण पोट भरण्याचे काम करतो म्हणून त्याची 'गुजराथी थाळी' / 'फाईव्ह कोर्स' डिनर शी तुलना करायची का?

नोकरीसंदर्भात एव्हढी सारी माहिती ज्योतिषी सांगू शकतात?

तर मग इथे श्रीगुरुजींनी म्ह्टल्याप्रमाणे काही पत्रिकांची नोकरी संदर्भात चाचणी घेता येऊ शकते. घ्यायची का? :)

सरळमार्गी's picture

29 Jun 2014 - 4:42 pm | सरळमार्गी

ज्योतिष जाणणार्‍यांना / या विषयात रुचि असणार्‍यांना इथे अशी वागणूक मिळत असताना, एकतरी तज्ञ ज्योतिर्विद मिपा वर शिल्लक राहीला असेल का ? आणि कोणी चुकुन माकुन रेंगाळत असलाच तर केवळ या अशा काही लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्यांच्या पत्रिका अभ्यासून कशाला उत्तरे देत बसेल? आणि का म्हणून तो आपले श्रम व वेळ ह्यांच्यावर खर्च करेल ? हे म्हणजे सापाला दुध पाजण्यातलाच प्रकार ! आणि असे कोण लागून गेले आहेत हे लोक की यांच्या विश्वास बसण्यावर / न बसण्यावर ज्योतिषशास्त्राचे भवितव्य अवलंबून आहे? नसला त्यांचा विश्वास तर नसुदे काय फरक पडतो? ?

>> नोकरीसंदर्भात एव्हढी सारी माहिती ज्योतिषी सांगू शकतात? >>

हो!

कै ज्योतिंद्र हसबे, कै सुरेश शहासने तसेच श्री सुनिल गोंधळेकर , श्री कनक बोस्नीया यांनी चालवलेले 'केपी झाईन' हे ई माग्याझीन (जे मोफत आहे ), श्री श्री नाथ यांचे अस्ट्रोव्हिजन हे ई माग्याझीन , श्री के. सुब्रमनीयम व श्री के हरिहरन यांनी लिहलेली सुमारे ३० च्यावर पुस्तके आणी ईतर अशी अनेक पुस्तकांमधून अशा प्रश्नांची लिलया उत्तरे दिलेल्या सोडवलेल्या शेकडो केसस्टडीज आहेत. त्या नुसत्या वरवर चाळल्या तरी कळेल.

बाकी श्री राबर्ट स्वबोधांच्या पुस्तकात विसंगती आहेत असे विधान करण्या ईतपत अभ्यास / आवाका असलेल्या व्यक्तीने "नोकरीसंदर्भात एव्हढी सारी माहिती ज्योतिषी सांगू शकतात?" असा प्रश्न करावा याचे नवल वाटले !
'कुछ तो गडबड है दया..."

सरळमार्गी's picture

29 Jun 2014 - 3:19 am | सरळमार्गी

तुमच्या बद्दल आणि थोर कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विषयी नितांत आदर व्यक्त करुनच हे लिहीतो आहे. माझा कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही आणि तसा अर्थ कोणीही कृपया काढू नये ही विनंती:

आपण डॉ. दाभोळकर यांचा उल्लेख करतान यांच्या नावापुढे कै. लावले आहे ते अंधश्रद्धेचे प्रतिक नाही का? कै हे 'कैलासवासी' चे लघुरुप असावे अशी माझी तरी समजूत आहे, त्यात चूक असेल तर मी माझी पुढील सर्व विधाने मागे घ्यायला तयार आहे व बिनशर्त माफीही मागायला तयार आहे.

मनुष्याच्या शरीरात म्हणे आत्मा असतो आणि मनुष्य मृत झाल्यावर तो आत्मा त्याच्या पार्थिव शरीरापासून अलग होतो आणि मग तो 'कैलास' किंवा 'वैकुंठ' वासी होतो ही आम्हा अंधश्रद्ध लोकांची तितकीच अंधश्रद्ध कविकल्पना! हे झाले हिंदू धर्मियांच्यात, बौद्ध / ख्रिश्चन / मुस्लीम धर्मियात सुद्धा काही वेळा ''बुद्धवासी' / 'ख्रिस्त वासी' / 'पैगबर वासी' असे लिहलेले पाहीले आहे

ह्या सगळ्या अंधश्रद्धा नाहीत का? अहो कोणि बघितलाय तो आत्मा, आणी तसा तो असल्यास व्यक्ती मृत झाल्यावर त्या आत्म्याचे नक्की काय होते ? तो आत्मा कैलासाला गेलाय का वैकुंठाला का आणखी कोठे ते कसे ठरवणार, काय पुरावा आहे त्याचा ? मुळात असे कैलास, वैकुंठ वगैरे काही आहे का ? तुम्ही कै.. नामाभिधान वापरले आहेत म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या कडे असायला हवी नाही का? मग कधी सांगता आम्हाला?

मी व्यक्तीशः डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना मानतो, त्यांच्या विचाराचा आदर करतो, त्यांच्या नावा आधी कै. लावण्याला माझा जर सुद्धा आक्षेप नाही , कृपया गैरसमज करुन घेऊ नका. पण ज्यांची हयात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात गेली , ते काम करताना त्यांना हौतात्म्य आले त्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांना तुम्ही त्यांच्या मृत्यू नंतर आमच्या सारख्या अंधश्रद्धांच्या लायनीत उभे केलेले फारसे पटले नाही एव्हढच सांगणे आहे.

मी एक सुचवू का ? जसे लष्करातल्या सेवानिवृत्त अघिकार्‍याच्या नावा नंतर कर्नल (रिटायर्ड) लिहतात तसे काही तरी नामाभिदान एखादि व्यक्ती जी 'आत्मा, कैलास, वैकुंठ ई. गोष्टी न मानणारी होती तिच्या बाबतीत वापरले पाहीजे, बघा पटते का .

आणि दाभो़ळकर साहेब खरोखरिचे डॉक्टर होते तेव्हा त्यांचा उल्लेख करताना तो डॉ. नरेंद्र दाभोळकर असा व्हायला हवा , तो त्यांचा मान आहे (तुम्ही अनावधनाने विसरला आहात म्हणून ही एक नम्र विनंती, )

बाळ सप्रे's picture

29 Jun 2014 - 10:05 am | बाळ सप्रे

मृत व्यक्तिच्या नावामागे "कै" लावण्याविषयीचा विचार एकदम चपलख.. योग्य प्रतिशब्द शोधायला हवा ..

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jun 2014 - 3:35 pm | अत्रुप्त आत्मा

कैलासवासी असा शब्द न वापरता ... सावरकरांनी योजलेला संपूर्ण ऐहिक शब्द पुढे करतो.आपण दिवंगत म्हणतो..त्याप्रमाणे..अश्या व्यक्तिस मृत्युंगत , संबोधावे.

सरळमार्गी's picture

29 Jun 2014 - 4:35 pm | सरळमार्गी

मृत्युंगत हा शब्द जरा उच्चारायला जड्शीळ आहे , बर्‍याच जणांना जोडाक्षरे चे , रुकारा चे उच्चार करण्याचे वांधे आहेत हे मी रोज बघतोय, खोटे वाट्त असेल लोकांना 'पुष्पगुच्छ' हा शब्द म्हणायला सांगा बघा कीती जण पहिल्याच प्रयत्नात न चुकता न अडखळता म्हणू शकतात ते !

पण मी काय म्हणतो, कैलासवासी म्हणायचे का नाही ? नसल्यास दुसरा पर्याय काय यावर एखादा स्प्येशल धागा का नाही काढत !

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Jun 2014 - 12:29 pm | llपुण्याचे पेशवेll

मयत असा शब्द पोलिस रेकॉर्डात वापरतात. आठवा पुलंचे
"बापाचे नाव येशा, मयत"

मुद्दा काय आणि तुम्ही बोलताय काय? मूळ पेपरबद्दल बोला. त्या पेपरमध्ये तुम्हांला चूक काय वाटतं इतकं सांगा. माझ्या प्रतिसादातलं एक वाक्य उचलून प्रतिसाद फुलवू नका. मूळ मुद्दा पेपरचा, तो सोडून मी दाभोळकरांना कै का म्हटले आणि डॉ का म्हटले नाही इ. चर्चा लक्ष वेधण्यासाठीच आहे कारण मुद्द्याचं बोलण्यासारखं तुमच्याकडे नाहीच. जे बोलायचं ते पेपरबद्दल बोला. कुणाला राजमान्य राजश्री का म्हटलं नाही आणि अमुक का म्हटलं वगैरे मुद्दे बालिश आहेत अन सर्वांत मुख्य म्ह. त्यामुळे तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही. हे इतकं सोपं करूनही समजत नसेल तर इलाज नाही.

आणि राहता राहिला तपशीलवार भाकिताचा मुद्दा.. ज्योतिष कितीही डीटेल्ड माहिती देण्याचा दावा करीत असूदे, काही भाकिते तरी हो/नाही या क्याटेगरीत बसतात. तिथे नाणेफेकीपेक्षा जास्ती वारंवारितेने भविष्य अचूकपणे वर्तवण्यात ते अक्षम ठरलेले आहे हे पेपरने सिद्ध केलेय. इतक्या बेसिक लेव्हलवर सुद्धा जर गंडत असेल तर बाकी फाफटपसारा काय कामाचा?

'काही भाकिते चुकतात' बद्दल सांगायचे तर, ९० आणि १० दोघेही १०० पेक्षा कमीच आहेत, पण म्हणून दोन्ही एक असा दावा असेल तर..हॅ हॅ हॅ, चालू द्या.

अनुप ढेरे's picture

29 Jun 2014 - 5:16 pm | अनुप ढेरे

कुंडली भविष्य जास्तं अचूक असतं का नाडी भविष्य?

चित्रगुप्त's picture

29 Jun 2014 - 8:16 pm | चित्रगुप्त

कुंडली भविष्य जास्तं अचूक असतं का नाडी भविष्य?

कुतुहलापोटी मी नाडी आणि कुंडली द्वारे भविष्य जाणून घेण्याचा उपद्व्याप केलेला आहे. नाडी मधे भविष्य असे काहीच सांगितले गेले नव्हते (माझ्या बाबतीत तरी) नुस्ते मोघम काहीतरी गोलमाल सांगितले होते, जे मला मुळीच पटले नाही. ओळखीच्या झालेल्या ज्योतिषांकडे मी बर्‍याच जणांना घेऊन गेलो, आणि बहुतेक प्रत्येकाने काही ना काही ठीक सांगितले. या सर्व प्रकारात यांत्रिक काटेकोर नियम नसून मुख्यतः अंतःप्रेरणा आणि काही वेगळ्याच (गूढ, अतर्क्य म्हणा हवे तर) पातळीवरून भविष्याची चाहूल लागत असते, असा माझा अनुभव आहे.

मूकवाचक's picture

29 Jun 2014 - 8:34 pm | मूकवाचक

"या सर्व प्रकारात यांत्रिक काटेकोर नियम नसून मुख्यतः अंतःप्रेरणा आणि काही वेगळ्याच (गूढ, अतर्क्य म्हणा हवे तर) पातळीवरून भविष्याची चाहूल लागत असते, असा माझा अनुभव आहे."

- पूर्णपणे सहमत. त्यामुळेच संख्याशास्त्रीय चाचण्यांचा निष्कर्ष निर्णायक मानणे मला तरी जमणार नाही. बाकी अस्तित्व जगड्व्याळ असणे किंवा 'अस्तित्वात' शक्यता या पातळीवर पराकोटीची अनिश्चितता असणे शक्य असणे वगैरे गोष्टी या संदर्भात 'वाईड बॉल' आहेत. असो.

बॅटमॅन's picture

29 Jun 2014 - 8:40 pm | बॅटमॅन

म्हणजे गूढ अंतःप्रेरणा असेल तर 'या स्थानात अमुक योग असेल तर माणूस मरतो' छाप नियम आपोआपच रद्द झाले. मग तर १२ भागवाली कुंडली बनवणे अन ज्योतिष वर्तवणे या बाबतीतले ठोकताळे निरुपयोगीच नाहीत तर मुळातच निरर्थक आहेत.

त्यामुळे गूढ अंतःप्रेरणा आणि कुंडली इ. वरून ज्योतिष वर्तवणे या दोहोंपैकी एकच गोष्ट खरी आहे असेच म्हटले पाहिजे.

मूकवाचक's picture

29 Jun 2014 - 8:45 pm | मूकवाचक

दोन्ही गोष्टी खर्‍या आहेत. दोन्हीत तथ्यांश आहे. तशी प्रेरणा असलेल्या व्यक्तीला पत्रिकेचा गाईडलाईनसारखा उपयोग होऊ शकतो. मला वाटते या बाबतीतल्या शक्यता नेहेमी एक किंवा शून्य अशा बायनरी स्वरूपाच्या नसतात.

हा निव्वळ गणिती प्रकार असता तर आजच्या संगणक युगात सगळे फलादेश संगणकात फीड करून सगळ्या ज्योतिष्यांना बेकार करता आले असते.

बॅटमॅन's picture

29 Jun 2014 - 9:18 pm | बॅटमॅन

० किंवा १ हे बायनरी नसले म्हणून बरोबर येण्याच्या टक्केवारीला काही महत्त्व आहे की नाही? की १० मार्क आणि ९० मार्क पडलेल्या दोघांनाही १०० पेक्षा कमी म्हणून नापास करणार? बरोबर येण्याची टक्केवारी फक्त पत्रिकाधारे ज्योतिष पाहून काढली असता नाणेफेकीद्वारे येणार्‍या अचूकतेपेक्षा कमी आहे असे त्या पेपरमध्ये सिद्ध केलेले आहे. तुमचा विश्वास नसेल तर करा तसाच एक कंट्रोल्ड एक्स्पेरिमेंट आणि दाखवा रिझल्ट्स. किमान ५०% पेक्षा जास्त वेळेस तुम्ही म्हणता तसे रिझल्ट आले तर आत्ता या क्षणी तुमचं म्हणणं मान्य करतो. एका बाजूचा व्यवस्थित मांडलेला विदा मी सादर केलाय. तुम्हांला ती बाजू पटत नाही तर दुसर्‍या बाजूचा विदा नीट मांडा. इतकेही करण्याची तयारी जर नसेल तर मग आमची मुक्ताफळे बोचायचं काम नाही.

निव्वळ गणिती आणि सांख्यिकीय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे जर समजत नसेल तर इलाज नाही. गणिताआत २+२=४ होतात, तर सांख्यिकीत दोन 'जवळ-जवळ' किंवा 'लांब-लांब' वाटणार्‍या गोष्टी खरेच तशा आहेत किंवा नाही याचा निर्णय घ्यायचे शास्त्र आहे. काटेकोरपणा म्हणजे २+२=४ ही व्याख्या अज्ञानमूलक , शास्त्रद्वेष्टी आणि तितकीच हास्यास्पद आहे.

तेव्हा निव्वळ 'मला आणि माझ्या ओळखीतल्या काही लोकांना असे अनुभव आलेत म्हणून पत्रिका बरोबर असते' याला आधार नाही. योग्य ती शिस्त पाळून साधारण ५०-१०० लोकांचा विदा जमवा आणि निष्कर्ष सांगा. या प्रयोगात लागेल तितकी सांख्यिकीय मदत मी स्वतः कराञला तयार आहे. ज्योतिषवाल्यांनी ज्योतिषाचा विदा द्यावा, त्याचे सांख्यिकी विश्लेषण आ म्ही करू- अर्थातच सर्वांना विश्वासात घेऊन. तयारी असेल तर बोला, नपेक्षा मुक्ताफळे बोचतात इ.इ. टाहो बंद करा.