Skip to main content

भाव चलित कुंडली आणि इतर षोडशवर्ग कुंडल्या ....

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 25/06/2014 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
महत्वाची सुचना: ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा.... चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे. त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद!!! चर्चेचा विषय: निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ? लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? उदा: नवमांश कुंडली कशी बघायची ? कृपया विस्तार पूर्वक चर्चा येथे अपेक्षित आहे. धन्यवाद!!!

वाचने 85942
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....
ज्योतिष हे शास्त्र नाही. बाकी चालू दया.

In reply to by प्रचेतस

यू सी, द व्होल कंट्री ऑफ द सिस्टम इज जक्स्टापोजिशन्ड बाय द हीमोग्लोबीन इन द अ‍ॅट्मोस्फिअर बिकॉज यू आर अ सोफिस्टिकेटेड र्‍हिटोरिसिअन इन-टोक्सिकेटेड बाय द एक्झिब्युरन्स ऑफ युअर ओन व्हर्बोसिटी...

In reply to by धन्या

ज्योतिष हे शास्त्र नाही
>>> आमच्या भावना दुखावल्या :D निमिषराव तुम्ही घाबरु नका , आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ,ही घ्या उत्तरे निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? >> ह्या प्रश्न्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या काली फॉस-६- + कल्के फ्लुऑर-६ + सिलिका-६ तीन तीन गोळ्या एक / दोन वेळा लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? >> ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या काळी फॉस ६, ३० -------------- हया क्षारासारखा दुजा हितचिंतक नाही उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ? >> ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम मूर ३० च्या पाच ग्रेनच्या वडया अर्धा ग्लास पाण्यात टाकून १०—१० मिनिटांनी एकएक चमचा मिश्रण नंतर १५—१५ मिनिटांनी त्सेक चमचा मिश्रण सातत्याने लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? >> ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या Aethusea-------- Fool”s Parsley तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? उदा: नवमांश कुंडली कशी बघायची ? >> ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या Argentnum Nitricum ------ नावाचे एक औषध आहे, साधी औषधे अमाप गुण देतील, सल्ला अवश्य घ्या काली फोस १२ ++ कल्के फ्लुओर १२ आणि फेरम फोस १२ असो. :D

In reply to by प्रसाद गोडबोले

आमच्या भावना दुखावल्या
फारच ब्वा नाजूक तुमच्या भावना. अगदी उठल्या बसल्या* दुखावतात. * हे नेमकं काय आहे सांगायची गरज नसावी. ;)

In reply to by धन्या

धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ... आमच्या होमिऑपॅथी ला शास्त्र मानत नाहीस , ज्योतिष शास्त्राला शास्त्र मानत नाहीस ... थांबतुझ्यावर भानामतीच सोडतो ... हे घे ... ओम फट स्वाहा a

In reply to by प्रसाद गोडबोले

थांबतुझ्यावर भानामतीच सोडतो ... हे घे ...
भानामती करणे हे वाईट कर्म आहे. त्याची चित्रगुप्ताच्या वहीत नोंद होऊन ते तुमच्या संचित कर्मात जमा होईल. अणि योग्य वेळ येताच या संचित कर्माचे क्रियमाण कर्मात रुपांतर होऊन त्याची फळे तुम्हाला भोगावी लागतील. एक लक्षात ठेवा, कर्माचा सिद्धांत कुणालाच सोडत नसतो.

In reply to by धन्या

कर्माच्या सिध्दांताला .... सिध्दांत कर्मेला आम्ही काली फॉसीफोरम ६ ३० देतो ... शाबुदाण्याच्या पवित्र गोळ्यातुन ... मग तो बाधत नाही =))

In reply to by प्रसाद गोडबोले

अरे काय हे, निदान धागाकर्त्याच्या भावनांचा तरी विचार करा. =))

In reply to by प्रसाद गोडबोले

खर्‍या ज्योतिषाचा तोडग्यांवर विश्वास नसतो. त्याच्या दृष्टीने तोडगे हे थोतांड असते. एकदा ग्रहदशेचा फेरा आला की त्या व्यक्तीला तुमच्या शाबुदाण्याच्या पवित्र गोळ्यातुन दिलेले काली फॉसीफोरम ६ ३० ही वाचवू शकणार नाही. च्यायला जे तोडग्यांनी, अंगारे-धुपारे, गंडे-तावित वापरुन किंवा कसलीशी पोथी वाचून बदलता येतं ते प्राक्तन कसलं :D

In reply to by धन्या

>>काली फॉसीफोरम ६ ३० ही कोणती पट्टी म्हणे गाण्याची? पाचेक महिन्यापूर्वी मी पांढरी सहावर सरगम आणि छोटे छोटे अलंकार वाजवत असे, आताशा सराव मोडलाय. ;)

In reply to by धन्या

अरे मुढ बालका तुझा अजुन लक्षात आलेले नाही काली फॉसीफोरम म्हणजे साक्षात आत्मतत्व ! त्याला कसली आलीये ग्रहदशा ? एकदा का ते घेतले की तुम्ही तद्रुपच होवुन जाता ...मग काय मज्जाच मजा ... नैन छिंदन्ति शस्त्राणि नैन दहति पावका: =))

In reply to by प्रसाद गोडबोले

क्षमा असावी महाराज. आमचे ज्ञान महाराष्ट्र शासनाच्या पाठयपुस्तक महामंडळाने छापलेल्या विज्ञानाच्या पुस्तकातील न्युटनच्या नियमांपुरतेच मर्यादीत आहे. नाही म्हणायला अभियांत्रिकीला असताना ओहमच्या नियमाचा अभ्यास केला होता. परंतू काम संगणकाच्या क्षेत्रात करत असल्यामुळे आता तोही विसरलो आहे.

In reply to by S.प्रशांत

ओहम आणि सोहम राहू द्या बाजूला. मला हल्ली "कोहम" हा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर कुठल्या कुंडलीत पाहावे, लग्न कुंडली, भाव चलित कुंडली की नवमांश कुंडली?

In reply to by प्रसाद गोडबोले

काली फॉसीफोरम म्हणजे कलकत्त्याला कालीघाटात मिळणारे औषध ए का =))

In reply to by चित्रगुप्त

पाश्चिमात्य पद्ध्तीप्रमाणे दिलेल्या तारखा आणि राशी यावरुन फक्त सुर्यराशी(सन साइन)विचारात घ्याव्यात, असे वाटते.

In reply to by आयुर्हित

भारतीय वैदिक ज्योतिष हे भारतीय तिथींवरुन पाहिले जाते. तसेच व्यक्तीच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी रास असते ती रास त्या व्यक्तीची जन्म रास समजली जाते. मात्र इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये जे दैनिक/साप्ताहिक/मासिक वगैरे भविष्य येते ते त्यामधल्या राशी या व्यक्तीच्या इंग्रजी महिन्याच्या जन्मतारखेवरुन ठरतात. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिष आणि पश्चिमात्य ज्योतिष यांच्यात सुसुत्रता असण्याची काही शक्यता असते का? तार्किकदृष्टया विचार करता ती तशी नसणार हे उघड आहे. मात्र काही सांगड घालणार्‍या बाबी असतील तर त्या जाणून घेण्यास उत्सुक आहे.

In reply to by धन्या

पश्चिमात्य ज्योतिषात जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय वैदिक ज्योतिषात ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिषात सर्वंकश विचार होतो असे वाटते. फक्त जन्मराशीचा(चंद्रराशीचा)विचार करणे म्हणजे फक्त २१ घटक विचारात घेणे होय. व्रुत्तपत्रे कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा ज्योतिष कोणी आणि कोणता आधार मानून वर्तवले आहे हे महत्वाचे आहे. उदा: बेजान दारुवाला हे सुर्यराशि आधार मानुनच भविष्य वर्तवितात.

In reply to by धन्या

पश्चिमात्य ज्योतिषात जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय वैदिक ज्योतिषात ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिषात सर्वंकश विचार होतो असे वाटते. फक्त जन्मराशीचा(चंद्रराशीचा)विचार करणे म्हणजे फक्त २१ घटक विचारात घेणे होय. व्रुत्तपत्रे कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा ज्योतिष कोणी आणि कोणता आधार मानून वर्तवले आहे हे महत्वाचे आहे. उदा: बेजान दारुवाला हे सुर्यराशि आधार मानुनच भविष्य वर्तवितात.

In reply to by धन्या

पश्चिमात्य ज्योतिषात जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय वैदिक ज्योतिषात ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिषात सर्वंकश विचार होतो असे वाटते. फक्त जन्मराशीचा विचार करणे म्हणजे फक्त २१ घटक विचारात घेणे होय. व्रुत्तपत्रे कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा ज्योतिष कोणी आणि कोणता आधार मानून वर्तवले आहे हे महत्वाचे आहे. उदा: बेजान दारुवाला हे सुर्यराशी आधार मानुनच भविष्य वर्तवितात.

In reply to by आयुर्हित

एकंदरित वैदिक ज्योतिष ३० पट जास्त पॉवरफुल आहे (१०पट जास्त घटक गुणिले ३ प्रतिसाद) :-)

In reply to by बाळ सप्रे

हॅ हॅ हॅ .. साहेबांना माहित नाही अशी गोष्ट नाही बघा जगी.. 'शहाणे करून सोडावे जन' अगदी व्रत आहे हो यांचे.

In reply to by धन्या

तसेच व्यक्तीच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी रास असते ती रास त्या व्यक्तीची जन्म रास नव्हे तर लग्न रास असते आणि चंद्र ज्या राशीत असतो ती जन्म रास समजली जाते साडेसाती किंवा ग्रहदशा ह्या जन्मराशीवरून ठरतात भारतीय पद्धतीत लग्न रस आणि जन्म रास ह्या दोन्हींचे analysis करून भविष्य सांगतात

In reply to by Prajakta२१

धन्यवाद. बरेच दिवस वापरात नसल्यामुळे माझे तेलुगू भाषा आणि ज्योतिष या विषयाचे (शास्त्र नव्हे!) ज्ञान विस्मरणात गेले आहे.

साध्या लग्नकुंडली वरून आणि सध्याची (गोचरि)ग्रहस्थितीवरून भविष्य सांगता आले पाहिजे .केवळ राजयोग आहे म्हणून काही प्रत्येकाच्या गळ्यात माळ घालायला हत्ती फिरत नसतात .इति वराहमिहिर .चांगली ग्रहस्थिती आल्यावर जातकाच्या परिस्थितीनुसार चांगल्या गोष्टी घडतात .याकरिता जातकाने महत्वाकांक्षा ठेवून पुढे प्रगती करण्याचे कष्ट सतत घ्यायला हवेत .दुसऱ्या पायरीवर असेल तर तो चौथ्यावर नेण्याचे काम ग्रह करतील .त्याने कष्ट करून नवव्या पायरीवर गेल्यास तो अकराव्यावर जाईल . बाकी लग्न कुंडलीला भावचलित आणि नवमांशाप्रमाणे करून दशमातल्या डोक्यावरच्या ग्रहाला अष्टमात सरकवणे म्हणजे चण्याच्या पुडीला चपाट करून त्याचे विमान बनवण्याचा अट्टाहास होय .

ज्योतिषावर धागा येणार। काहीजण त्याला शास्त्र मानणार॥ नेहमीची वादावादी होणार। राडा घडणार निश्चित॥ -दैवज्ञ ;)

In reply to by सूड

काहीजण त्याला शास्त्र मानणार॥
शास्त्र मानणे हा चुकीचा शब्दप्रयोग आहे. काहींच्या मते ज्योतिष हे शास्त्र आहे आणि काहींच्या मते नाही. इथे शास्त्र "मानण्याचा" प्रश्नच येत नाही.

डिस्क्लेमर टाकले असताना सुद्धा लोक इथे येउन गोंधळ घालतात.. नाही पटत तर धाग्याकडे दुर्लक्ष करावे. ज्याचा भाव त्याचा देव ! बाकीच्यानी दगड म्हणा किंवा इतर काही.. पण दुसर्‍यांच्या धागास्वातंत्र्याचा आदर करावा

पण दुसर्‍यांच्या धागास्वातंत्र्याचा आदर करावा
तो आहेच. मात्र
ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा.... चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे. त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही.
एकदा धागा टाकल्यावर चर्चा तर होणारच. या संस्थळाचे सदस्य म्हणून तो अधिकार प्रत्येकाला आहे. काही आक्षेपार्ह आढळल्यास संपादक मंडळ लिखाणास कात्री लावतेच की. जर विरोधी मते असणार्‍या लोकांनी मते मांडू नयेत अशी ईच्छा असेल तर "बंदिस्त समूह" असणारीही संकेतस्थळे आहेत. तिकडे आपले समूह बनवून "अहो रुपम अहो ध्वनी"चा घोष करावा.

मुळात कुंडली हा बेसच निराधार असेल, तर मग ती भावचलित असली काय की लग्न कुंडली, सर्वच भाकीते अंदाजपंचे दाहोदरसे ठरणार. जर धाग्यावर चर्चा अपेक्षित असेल, तर ज्यावर इमारत बांधायची तो पाया भक्कम हवा.

In reply to by संजय क्षीरसागर

आपला नसेल पाया भक्कम त्यांचा आहे त्यांना लिहु द्या ना भो...!!! -दिलीप बिरुटे

'मिसळ्पाव' हे संस्थळ ज्योतिषशास्त्र या विषयावर चर्चा करण्यासाठी नाही हे एव्हाना आपल्या लक्षात यायला हवे होते. खास ज्योतिषशास्त्रासाठीचे असे काही नावाजलेले (गंभीर , शिस्तबद्ध ,सुनियंत्रित) चर्चा समुह आस्तित्वात आहेत ('मायबोली' नाही !), ज्या ठिकाणी फक्त ज्योतिषशास्त्र या विषयावरच चर्चा होते, आपले प्रश्न तिथे उपस्थित केल्यास चांगली अभ्यासपूर्ण उत्तरे नक्कीच मिळू शकतील. आपण विचारलेले प्रश्न या संस्थळावर आधिच विचारले गेले आहेत व त्यावर बरीच चर्चाही झालेली आहे , ती जरी वाचली तरी आपले शंका निरसन होईल. ही संस्थळे ईंग्रजी भाषेत आहेत पण आपल्याला ती अडचण भासणार नाही.

In reply to by सरळमार्गी

>>>>'मिसळ्पाव' हे संस्थळ ज्योतिषशास्त्र या विषयावर चर्चा करण्यासाठी नाही असं कै नै हं. मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही. चर्चा करणा-या जाणकारांनी चर्चा करत राहावी. कितीही विरोध होत असला तरी आपल्या विषयाला प्रतिसादाला पुढे न्यायचं. कोण काय म्हणतं आणि का म्हणतं. आपण लिहित राहावे असे वाटते. काही प्रश्नांंची उत्तर देता आली तर द्यावी नै तर आपण एकटेच वाचक आहोत असे समजून लिहित राहावे, असे वाटते. बाकी, लिहिणा-यांची मर्जी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

In reply to by पैसा

+२ पण मी संपादक नाही हं !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही
>>> ह्यावर अत्यंत विनम्रपणे आक्षेप नोंदवत आहे ... परवाच एका धाग्यावर झालेले एका प्रश्नाचे संपादन अत्यंत एकांगी होते असे वाटले (http://www.misalpav.com/comment/590391#comment-590391) टीका करण्याचा उद्देश नाहीये ... फक्त आपले विधान मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही हे पुर्ण सत्य नाही इतकेच नोंदवु इच्छितो ! -----------------------------------------------

प्लीज माझा आयडी डीलीट करु नका ...प्लीज प्लीज प्लीज


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावरील काही सदस्यांना ज्योतिष विषयाचे वावडे आहे. इतकेच नाही तर अशी लोकं ज्योतिषावर कुठलाही धागा आले की अक्षरश: चेकाळतात. विरोधाला विरोध नाही, पण धागा पूर्णपणे हायज्याक केला जातो. इतका की तिथे कुठल्याही प्रकारची चर्चाच होणे शक्य नाही. हे म्हणजे साधारण रोडीजच्या ग्रुप डिस्कशन मध्ये लोकं (किंवा संसदेत खासदार) आरडओरडा करून इतरांना बोलूच देत नाहीत, त्याचे जालिय रूप वाटते.

शिनेर सदस्य धाग्यावर अवांतर करताना आणि एक ज्येष्ठ संपादक धुमाकूळ घालताना बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. *blush*

ज्योतिष हे शास्त्र आहे की नै, श्रद्धा अंधश्रद्धा, विज्ञान, अरे धन्या लिहू द्या रे लिहिणा-यांना. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर लिहिण्याला आक्षेप नाहीच. आक्षेप आहे तो विरोधी मते असणार्‍यांनी आपली मते मांडूच नयेत या पवित्र्याला. कुणीही उठावं आणि केवळ काकतालिय न्यायाने खर्‍या ठरणार्‍या भाकितांना शास्त्र म्हणावे यालाही आमचा विरोध नाही. मात्र ते त्यांचे वैयक्तिक मत असावं. मिसळपावसारख्या मुक्त व्यासपीठावर अशी विधाने केल्यावर त्याला विरोध करुच नये हे म्हणणे पटत नाही. विशेष म्हणजे धागाकर्ते धागा टाकल्यांनतर इकडे फिरकलेच नाहीत. धाग्यावरील आक्षेपांना त्यांनी उत्तर देणे ही तर खुप दुरची गोष्ट झाली.

पूर्वी उधृत केलेले माझेच वाक्य पुन्हा लिहीतो "आपला तो संतुलित विचार आणि दुसर्‍याचा तो अतिरेक असतो". @ निमिष,मला जोतिषात काही गती नाही. काही काही ज्योतिषी अचूक भविष्य वर्तवताना पाहीले आहेत. सनातन प्रभातमधे छापून आलेले एका गोपालकृष्णन किंवा तत्सम ज्योतिषाचे अंदाज ९५ % ठरल्याचे या इलेक्शनला अनुभवले. त्याबद्दल कुतुहल मात्र वाटते.

ज्योतिष हे शास्त्र नाही
ज्योतिष हे शास्त्र आहे. ज्योतिषी खोटे आहेत . बाकी चालू दे . as usual

स.मं.चा एक्स्लुझीव अधिकार आहे, तसाच धोरणाच्या मर्यादेत राहून चर्चा करण्याचा प्रत्येक सदस्याला अधिकार आहे. नाही तर एकमार्गी मतं रेटणार्‍या चर्चांचा उपयोग तो काय?
आपला नसेल पाया भक्कम त्यांचा आहे
तोच तर चर्चा विषय आहे. त्यांना पाया भक्कम आहे हे दाखवून देऊ द्या.
काही प्रश्नांंची उत्तर देता आली तर द्यावी नै तर आपण एकटेच वाचक आहोत असे समजून लिहित राहावे
मग डायरी आणि संकेतस्थळात फरक काय? योग्य प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत तर उगीच रेटून लिहीण्यात काय अर्थ आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

>>> योग्य प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत तर उगीच रेटून लिहीण्यात काय अर्थ आहे? हे असंच लिहायचंय का @@@ प्रश्नांची योग्य उत्तरं देता आली नाहीत तर उगीच रेटून लिहीण्यात काय अर्थ आहे? @@@ असं लिहायचंय?

>>> निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? बहुसंख्य ज्योतिषी राशी कुंडली बघूनच भविष्य सांगतात. >>> उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ? १२ व्या स्थानाचे >>> लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? अर्थातच राशी कुंडली >>> तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? नक्की माहिती नाही.

In reply to by श्रीगुरुजी

>>> निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? >>>बहुसंख्य ज्योतिषी राशी कुंडली बघूनच भविष्य सांगतात. ग्रहांचे अंश हे ग्रहांचे स्थान ठरवतात जर चलित कुंडलीत ग्रह एक घर मागे पुढे होत असेल तर चलित कुंडलीत त्याचे जे घर आहे ते लक्षात घ्यावे लागते. पण नुसतेच चलित कि नवमाश, राशी चंद्र असे चालत नाही तर प्रश्नानुसार कुंडली बघतात असा अनुभव आहे. पण >>>बहुसंख्य ज्योतिषी राशी कुंडली बघूनच भविष्य सांगतात. हे हि तितकेच खरे. >>> लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? >>>>अर्थातच राशी कुंडली मुळात कुंडली एकच असते पण त्याची मांडणी वेगवेगळ्या प्रकारे असल्याने ज्योतिषाने स्वकष्टार्जित तारतम्य वापरून फलादेश द्यायचा असतो पण सामन्यतः शिष्य, वाचन आणि गुरूने जेवढे सांगितले तेव्हढेच डोके चालवतात आणि गोंधळ होतो. >>> तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? >>>>नक्की माहिती नाही. पास. तुम्ही जर ज्योतिषाचा अभ्यास करत असाल तर मुळात तुमचा ज्योतिषी म्हणून त्या विषयाबाबत काय दृष्टीकोन आहे तेही मांडा म्हणजे उदा. "गुरु हा अर्थ कारणाचा कारक आहे" असे बरेच ज्योतिषी सांगतात ह्या वाक्याचा तुम्ही काय अर्थ लावता? किंवा एखादे तत्सम वाक्य तुम्ही उलगडून सांगा ज्याने माझ्या ज्ञानात ही भर पडेल.

>>>> मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही. बिरुटे साहेब मिपा ला वावडे नसेल हो पण मिपाकरा^ना बर्‍याच विषयाची आलर्जी आहे त्याचे काय? >>> चर्चा करणा-या जाणकारांनी चर्चा करत राहावी. कितीही विरोध होत असला तरी आपल्या विषयाला प्रतिसादाला पुढे न्यायचं. कोण काय म्हणतं आणि का म्हणतं. आपण लिहित राहावे असे वाटते. का म्हणून? जर चेष्टा ,कुचेष्टा, टिंगल, ट्वाळीच होणार असेल तरी ही ? एखाद्याने माहीती मिळवण्यासाठी व अनावश्यक प्रतिसादां बद्द्ल डिस्क्लेमर टाकून धागा काढला तरीही त्याची काय गत होते ते दिसतेय, मी म्हणत असलेल्या संस्थळावर संपादक मंडळाचे कडक नियंत्रण असते त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जात नाहीत. तसे इथे का होऊ शकत नाही?

In reply to by सरळमार्गी

परा या सदस्यानं म्हटलं होतं की संकेतस्थळावरचं लेखन हे खिडकीत बसण्यासारखं आहे, मग कुणी शुकशुक केलं तर तक्रार करण्यात अर्थ नाही. बाय द वे, लेखकानं किंवा कुणीही कुंडली, आणि भविष्यकालीन घटनांचं वर्तांकन यातला कार्यकारण नि:संदिग्धपणे दाखवून द्यावा. कोणतंही वैज्ञानिक सत्य सिद्ध करायला : १) निर्वैयक्तिकता २) स्थल-काल निरपेक्षितता आणि ३) वारंवारिता हे तीन निकष आहेत. वैज्ञानिक निकषांवर जर तुम्ही कार्यकारण सिद्ध करु शकलात तर असल्या लेखनाला काही अर्थ आहे. आणि आय चॅलेंज यू, ओन धिस फोरम, तुम्ही कुंडली आणि भविष्यकालीन घटनांचं वर्तांकन यातला कार्यकारणभाव वैज्ञानिक सत्यतेच्या निकषांवर सिद्ध करु शकत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

कोणतंही वैज्ञानिक सत्य सिद्ध करायला : १) निर्वैयक्तिकता २) स्थल-काल निरपेक्षितता आणि ३) वारंवारिता हे तीन निकष आहेत. वैज्ञानिक निकषांवर जर तुम्ही कार्यकारण सिद्ध करु शकलात तर असल्या लेखनाला काही अर्थ आहे.
वैज्ञानिक सत्याची कसोटी इतक्या स्पष्ट आणि सोप्या शब्दांत मांडण्यासाठी धन्यवाद.

In reply to by धन्या

हे वैज्ञानीक कसोटीचं सत्य आहे. आणि त्यात एक अत्यंत (सर्वात?) महत्वाचा क्लॉज म्हणजे "इन गिव्हन कंडीशन्स". हा एक क्लॉज सत्याची कसोट्यांपासुन फारकत करतो. वैज्ञानीक सत्य असं कसोट्यांवर तोलण्याइतपत पंगू नाहि. असो.

का म्हणून? जर चेष्टा ,कुचेष्टा, टिंगल, ट्वाळीच होणार असेल तरी ही ? एखाद्याने माहीती मिळवण्यासाठी व अनावश्यक प्रतिसादां बद्द्ल डिस्क्लेमर टाकून धागा काढला तरीही त्याची काय गत होते ते दिसतेय, मी म्हणत असलेल्या संस्थळावर संपादक मंडळाचे कडक नियंत्रण असते त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जात नाहीत. तसे इथे का होऊ शकत नाही?
exactly . संपादकांच नियंत्रण नसल्यामुळे (किवा संपादक ) पक्षपात करतात ह्याचं चांगला उदाहरण माझ्याकडे आहे. आणि बर्याच लोकांना इथे कुठलीही गोष्ट समजून घेण्यात किवा चर्चा करण्यात रस नसून स्वताच्या अर्धवट , तोकड्या माहितीच्या आधारे किवा आपल्या अर्धवट अकलेच्या आधारे फक्त चेष्टा ,कुचेष्टा, टिंगल, ट्वाळीच करण्यात रस आहे.

>>> निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? भारतात प्रामुख्याने क्षेत्र कुंडली (लग्न कुंडली) प्रचलित आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भावचलित कुंडली तयार करण्या साठी लागणारी भावसाधनाची कोष्टके सहजासहजी उपलब्ध नसणे, अशी कोष्टकें उपलब्ध नसल्यास बरीच आकडेमोड करावी लागते, ती करणे बर्‍याच जणांना जमत नाही. मात्र आज संगणकाच्या मदतीने ही गणिते सहज सोपी झाली आहेत. राशीचक्राचे १२ भाग पाडून त्यांना १,, १२ भावात बसवणे या साठी सुमारे ३० पेक्षा जास्त पद्धती उपलब्ध आहेत. त्यापैकी ‘प्लॅसिड्स’ ही प्रणाली जास्त लोकप्रिय आहे, के.पी. मध्ये ‘प्लॅसिड्स’ प्रकाराने बनवलेली भावचलित कुंड्ली वापरतात. कृष्णमुर्तीनी (के.पी. चे जनक) ‘प्लॅसिड्स’ पद्धत स्विकारली कारण त्यावेळेला फक्त याच ‘प्लॅसिड्स’ पद्धतीची भावसाधन कोष्ट्के बाजारात सहजासहजी उपलब्ध होती (अशी कोष्ट्कें उपलब्ध असणे हेच ‘प्लॅसिड्स’ च्या लोकप्रिततेचे कारण आहे). कृष्णमुर्तीना आणखी काही वर्षांचे आयुर्मान लाभले असते तर त्यांनी निश्चितच दुसरी एखादी भावसाधन प्रणाली अवलंबली असती ( बहुदा ‘कोश’ ही जर्मन ज्योतिर्विदांनी तयार केलेली प्रणाली ) किंवा त्यांनी स्वत:च एखादी नविन प्रणाली निर्माण केली असती. कोणती कुंडली वापरायची हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे कोणती कुंडली वापरायची ते ज्या त्या ज्योतिर्विदाने स्वत:च्या अनुभवाच्या आधाराने ठरवावे. माझ्या मते भावचलित कुंडली वापरायची असेल तर महान गणिती ‘श्रीपती’ यांनी सुचवलेल्या पद्धतीने तयार केलेली भावचलित कुंडली वापरावी. ही वापरताना भावाच्या मध्या जवळचे ग्रह त्याच भावात व भावाच्या आरंभी वा शेवटी 5 अंशात असलेले ग्रह क्रमश: अलिकडच्या / पलिकडच्या भावात आहेत असे समजावे. हा नियम के.पी. मध्ये ही काही जण वापरतात. >>> लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? चंद्र एका राशीत साधारणपणे अडिच दिवस असतो, म्हणजेच एखाद्या संपूर्ण दिवसात तो एकाच राशीत असणार (चंद्र ज्या दिवशी राशी बदलेल तो दिवस अपवाद्) म्हणजेच त्या दिवशी जन्मलेल्या सर्व बालकांची राशी कुंडली एका सारखी असणार , कारण त्या दिवसभरात बाकीचे सर्व ग्रह ही एकाच राशीत व त्याच अंशात असणार.(दुसरा एखादा ग्रह नेमका त्याच दिवशी राशी बदलत असेल तर तो दिवस अपवाद्) मग अशा राशी कुंडली वरुन वर्तवलेले भविष्य ही एक सारखेच असणार, प्रत्यक्षात तसे आढळत नाही. याउलट जन्मलग्न साधारण पणे दर दोन तासाने बदलते म्हणजेच प्रत्येक दिवसात 12 जन्मकुंडल्या शक्य असतात, दिवसभरासाठी ची एकच एक राशी कुडली पेक्षा ही प्रत्येक 2 तासाची एक वेगळी कुंडली हि परिस्थिती बरी आहे. पण तरीही त्या दोन तासाच्या कालावधीत जन्मलेल्या बालकांच्या कुंडल्या एकच राहणार पर्यायाने अशा कुंडली वरुन वर्तवलेले भविष्य ही एक सारखेच असणार, प्रत्यक्षात तसे आढळत नाही. त्याला उत्तर म्हणून कृष्णमुर्तीनी (के.पी. चे जनक) ‘सब’ ची कल्पना मांडून 360 अंशाच्या राशीचक्राचे 249 भाग केले , या ‘सब’ मुळे साधारण पणे दिड दोन मिनीटांच्या फरकाने जन्माला येणार्‍या बालकांच्या पत्रिका वेगळ्या होतात. एव्हढे करुन ही सुक्ष्मता येत नाही हे लक्षात आल्यावर श्री एस पी खुल्लर यांनी कृष्णमुर्तीनी सुचवलेल्या ‘सब’ चे पुन्हा 9 भाग केले , त्यामुळे साधारण पणे काही सेकंदांच्या फरकाने जन्माला येणार्‍या बालकांच्या पत्रिका वेगळ्या होतात. अर्थात श्री एस पी खुल्लर आणि कृष्णमुर्ती यांनी सुचवलेल्या या पद्धतींचा अवलंब करताना जातकाची जन्मवेळ ही तितकीच अचूक असायला हवी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. >>> तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? या ‘भाग कुंडल्या ‘ एक प्रकारचे ‘हारमोनिक' चार्ट्स आहेत. अशी प्रत्येक कुंडली जातकाच्या आयुष्याचा एखाद्या विषिष्ठ अंगाचाच विचार करण्यासाठी असते उदा: विवाह, संतान, आयुर्दाय , आरोग्य, धन, व्यवसाय, गतजन्म, पुढचा जन्म ई. या भाग कुंडल्या सखोल अभ्यास करण्याच्या हेतूने बनवलेल्या सुपर स्पेशॅलिटी ‘कुंडल्या आहेत. जसा फरक साधा जनरल डॉकटर आणि गायनॅकोलऑजीस्ट, ईएंटी सर्जन यांच्यात असतो तसाच फरक जन्मलग्न कुंडली व भाग कुंड्ल्यांत असतो. या कुंडल्या बनवताना राशीचे 2,3,4.9 , 12 , 16, 32 असे करत 60, 120 व त्याही पलीकडे जाऊन सुक्ष्म भाग केले जातात. नाडि भविष्य कथनात 1/60 व 1/120 पद्ध्तीच्या पत्रिका वापरल्या गेल्याचे आढळते. याही पद्धतींचा अवलंब करताना जातकाची जन्मवेळ ही तितकीच अचूक असायला हवी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. उदा: नवमांश पत्रिका वापरायची असेल तर जातकाच्या जन्मवेळेतील चूक 13 मीनीटंपेक्षा जास्त असता कामा नये , अन्यथा नवमांश बदलेल व पर्यायाने नवमांश कुंडली बदलेल. पण गंमत अशी की या मर्यादेचाच खुबिने उपयोग करुन घेऊन जातकची जन्मवेळ बरोबर आहे का ते ठरवता येते व चुक दुरुस्त करता येते. अर्थात हे कोणा येरा गबाळ्याचे (कुडमुड्या चे ) काम नाही हे ओघानेच आले. दोन व्यक्ती एक सारख्या नसतात, अगदि जुळ्या मुलांत सुद्धा फरक असतो, मग त्यांच्या जन्मकुंडल्याही वेगळ्याच असायला हव्यात ना? त्यासाठीच तर हे एव्हढे सुक्ष्म गणित करावे लागते. पण हे एव्हढे सगळे गणिती व्याप करणे सगळ्यांनाच शक्य होते असे नाही.