Skip to main content

भाव चलित कुंडली आणि इतर षोडशवर्ग कुंडल्या ....

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 25/06/2014 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
महत्वाची सुचना: ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा.... चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे. त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद!!! चर्चेचा विषय: निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ? लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? उदा: नवमांश कुंडली कशी बघायची ? कृपया विस्तार पूर्वक चर्चा येथे अपेक्षित आहे. धन्यवाद!!!

वाचने 85942
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

In reply to by सरळमार्गी

कैलासवासी असा शब्द न वापरता ... सावरकरांनी योजलेला संपूर्ण ऐहिक शब्द पुढे करतो.आपण दिवंगत म्हणतो..त्याप्रमाणे..अश्या व्यक्तिस मृत्युंगत , संबोधावे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मृत्युंगत हा शब्द जरा उच्चारायला जड्शीळ आहे , बर्‍याच जणांना जोडाक्षरे चे , रुकारा चे उच्चार करण्याचे वांधे आहेत हे मी रोज बघतोय, खोटे वाट्त असेल लोकांना 'पुष्पगुच्छ' हा शब्द म्हणायला सांगा बघा कीती जण पहिल्याच प्रयत्नात न चुकता न अडखळता म्हणू शकतात ते ! पण मी काय म्हणतो, कैलासवासी म्हणायचे का नाही ? नसल्यास दुसरा पर्याय काय यावर एखादा स्प्येशल धागा का नाही काढत !

In reply to by सरळमार्गी

मयत असा शब्द पोलिस रेकॉर्डात वापरतात. आठवा पुलंचे "बापाचे नाव येशा, मयत"

In reply to by सरळमार्गी

मुद्दा काय आणि तुम्ही बोलताय काय? मूळ पेपरबद्दल बोला. त्या पेपरमध्ये तुम्हांला चूक काय वाटतं इतकं सांगा. माझ्या प्रतिसादातलं एक वाक्य उचलून प्रतिसाद फुलवू नका. मूळ मुद्दा पेपरचा, तो सोडून मी दाभोळकरांना कै का म्हटले आणि डॉ का म्हटले नाही इ. चर्चा लक्ष वेधण्यासाठीच आहे कारण मुद्द्याचं बोलण्यासारखं तुमच्याकडे नाहीच. जे बोलायचं ते पेपरबद्दल बोला. कुणाला राजमान्य राजश्री का म्हटलं नाही आणि अमुक का म्हटलं वगैरे मुद्दे बालिश आहेत अन सर्वांत मुख्य म्ह. त्यामुळे तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही. हे इतकं सोपं करूनही समजत नसेल तर इलाज नाही. आणि राहता राहिला तपशीलवार भाकिताचा मुद्दा.. ज्योतिष कितीही डीटेल्ड माहिती देण्याचा दावा करीत असूदे, काही भाकिते तरी हो/नाही या क्याटेगरीत बसतात. तिथे नाणेफेकीपेक्षा जास्ती वारंवारितेने भविष्य अचूकपणे वर्तवण्यात ते अक्षम ठरलेले आहे हे पेपरने सिद्ध केलेय. इतक्या बेसिक लेव्हलवर सुद्धा जर गंडत असेल तर बाकी फाफटपसारा काय कामाचा? 'काही भाकिते चुकतात' बद्दल सांगायचे तर, ९० आणि १० दोघेही १०० पेक्षा कमीच आहेत, पण म्हणून दोन्ही एक असा दावा असेल तर..हॅ हॅ हॅ, चालू द्या.

In reply to by अनुप ढेरे

कुंडली भविष्य जास्तं अचूक असतं का नाडी भविष्य?
कुतुहलापोटी मी नाडी आणि कुंडली द्वारे भविष्य जाणून घेण्याचा उपद्व्याप केलेला आहे. नाडी मधे भविष्य असे काहीच सांगितले गेले नव्हते (माझ्या बाबतीत तरी) नुस्ते मोघम काहीतरी गोलमाल सांगितले होते, जे मला मुळीच पटले नाही. ओळखीच्या झालेल्या ज्योतिषांकडे मी बर्‍याच जणांना घेऊन गेलो, आणि बहुतेक प्रत्येकाने काही ना काही ठीक सांगितले. या सर्व प्रकारात यांत्रिक काटेकोर नियम नसून मुख्यतः अंतःप्रेरणा आणि काही वेगळ्याच (गूढ, अतर्क्य म्हणा हवे तर) पातळीवरून भविष्याची चाहूल लागत असते, असा माझा अनुभव आहे.

In reply to by चित्रगुप्त

"या सर्व प्रकारात यांत्रिक काटेकोर नियम नसून मुख्यतः अंतःप्रेरणा आणि काही वेगळ्याच (गूढ, अतर्क्य म्हणा हवे तर) पातळीवरून भविष्याची चाहूल लागत असते, असा माझा अनुभव आहे." - पूर्णपणे सहमत. त्यामुळेच संख्याशास्त्रीय चाचण्यांचा निष्कर्ष निर्णायक मानणे मला तरी जमणार नाही. बाकी अस्तित्व जगड्व्याळ असणे किंवा 'अस्तित्वात' शक्यता या पातळीवर पराकोटीची अनिश्चितता असणे शक्य असणे वगैरे गोष्टी या संदर्भात 'वाईड बॉल' आहेत. असो.

In reply to by मूकवाचक

म्हणजे गूढ अंतःप्रेरणा असेल तर 'या स्थानात अमुक योग असेल तर माणूस मरतो' छाप नियम आपोआपच रद्द झाले. मग तर १२ भागवाली कुंडली बनवणे अन ज्योतिष वर्तवणे या बाबतीतले ठोकताळे निरुपयोगीच नाहीत तर मुळातच निरर्थक आहेत. त्यामुळे गूढ अंतःप्रेरणा आणि कुंडली इ. वरून ज्योतिष वर्तवणे या दोहोंपैकी एकच गोष्ट खरी आहे असेच म्हटले पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

दोन्ही गोष्टी खर्‍या आहेत. दोन्हीत तथ्यांश आहे. तशी प्रेरणा असलेल्या व्यक्तीला पत्रिकेचा गाईडलाईनसारखा उपयोग होऊ शकतो. मला वाटते या बाबतीतल्या शक्यता नेहेमी एक किंवा शून्य अशा बायनरी स्वरूपाच्या नसतात. हा निव्वळ गणिती प्रकार असता तर आजच्या संगणक युगात सगळे फलादेश संगणकात फीड करून सगळ्या ज्योतिष्यांना बेकार करता आले असते.

In reply to by मूकवाचक

० किंवा १ हे बायनरी नसले म्हणून बरोबर येण्याच्या टक्केवारीला काही महत्त्व आहे की नाही? की १० मार्क आणि ९० मार्क पडलेल्या दोघांनाही १०० पेक्षा कमी म्हणून नापास करणार? बरोबर येण्याची टक्केवारी फक्त पत्रिकाधारे ज्योतिष पाहून काढली असता नाणेफेकीद्वारे येणार्‍या अचूकतेपेक्षा कमी आहे असे त्या पेपरमध्ये सिद्ध केलेले आहे. तुमचा विश्वास नसेल तर करा तसाच एक कंट्रोल्ड एक्स्पेरिमेंट आणि दाखवा रिझल्ट्स. किमान ५०% पेक्षा जास्त वेळेस तुम्ही म्हणता तसे रिझल्ट आले तर आत्ता या क्षणी तुमचं म्हणणं मान्य करतो. एका बाजूचा व्यवस्थित मांडलेला विदा मी सादर केलाय. तुम्हांला ती बाजू पटत नाही तर दुसर्‍या बाजूचा विदा नीट मांडा. इतकेही करण्याची तयारी जर नसेल तर मग आमची मुक्ताफळे बोचायचं काम नाही. निव्वळ गणिती आणि सांख्यिकीय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे जर समजत नसेल तर इलाज नाही. गणिताआत २+२=४ होतात, तर सांख्यिकीत दोन 'जवळ-जवळ' किंवा 'लांब-लांब' वाटणार्‍या गोष्टी खरेच तशा आहेत किंवा नाही याचा निर्णय घ्यायचे शास्त्र आहे. काटेकोरपणा म्हणजे २+२=४ ही व्याख्या अज्ञानमूलक , शास्त्रद्वेष्टी आणि तितकीच हास्यास्पद आहे. तेव्हा निव्वळ 'मला आणि माझ्या ओळखीतल्या काही लोकांना असे अनुभव आलेत म्हणून पत्रिका बरोबर असते' याला आधार नाही. योग्य ती शिस्त पाळून साधारण ५०-१०० लोकांचा विदा जमवा आणि निष्कर्ष सांगा. या प्रयोगात लागेल तितकी सांख्यिकीय मदत मी स्वतः कराञला तयार आहे. ज्योतिषवाल्यांनी ज्योतिषाचा विदा द्यावा, त्याचे सांख्यिकी विश्लेषण आ म्ही करू- अर्थातच सर्वांना विश्वासात घेऊन. तयारी असेल तर बोला, नपेक्षा मुक्ताफळे बोचतात इ.इ. टाहो बंद करा.

In reply to by बॅटमॅन

योग्य ती शिस्त पाळून साधारण ५०-१०० लोकांचा विदा जमवा आणि निष्कर्ष सांगा. या प्रयोगात लागेल तितकी सांख्यिकीय मदत मी स्वतः कराञला तयार आहे. ज्योतिषवाल्यांनी ज्योतिषाचा विदा द्यावा, त्याचे सांख्यिकी विश्लेषण आ म्ही करू- अर्थातच सर्वांना विश्वासात घेऊन. तयारी असेल तर बोला
>>> ह्या आव्हानाला कोणी ज्योतिषी/ ज्योतिषसमर्थक उत्तर देतो का ह्याची वाट पहात आहे :)

In reply to by बॅटमॅन

त्याचे सांख्यिकी विश्लेषण आ म्ही करू- अर्थातच सर्वांना विश्वासात घेऊन
अरे??? तुम्ही कोण? तुम्हाला ज्योतिषाचे ज्ञान नाही, तुम्ही त्यातले तज्ञ नाही मग आमी नै ज्जा... आम्ही तुमच्याशी बोलणारच नै. ज्योतिष हे थोतांड आहे हे सिद्ध करण्याचा हक्क फक्त ज्योतिषविषारदांस आहे. ज्योतिषासमोर बसून त्याच्याशी सांगोपांग चर्चा करून त्याला त्याचे शास्त्र थोतांड आहे हे सिद्ध करून दाखवण्याचा हक्क त्याच्या तोलामोलाच्या ज्योतिषांनाच आहे. उगाच कुठल्या अंनिस/नारळीकर सारख्या ऐर्‍यागैर्‍यांना आम्ही खपवून घेत नाही मग तुमची काय कथा? अरे बापरे, अवांतर झालं वाट्टं... स्वारी हां. ज्योतिष हे शास्त्र असल्याचं किंवा नसल्याचं शास्त्रीय पद्धतीने सिद्ध होत नाही तोवर आमचा बेंबट्या होत रहाणार बहुतेक.

अगदीच बेसिक प्रश्न मला कधीचा पडलेला आहे. जेव्हा कुंडली / पत्रिका बनवली जाते (कुंडली आणि पत्रिकेमधे का फरक आहे हा उपप्रश्न) तेव्हा जन्मवेळेला फार महत्व असतं. माझा प्रश्न असा की ही जन्मवेळ म्हणजे नक्की कोणती? - पुरूषाच्या शुक्राणुचं स्त्रीबीजात रोपण होते ती ? - गर्भधारणा होते ती ? - गर्भाच्या हृदयाचे ठोके सुरू होतात ती ? - प्रसुती वेदना प्रथम सुरू होतात ती ? - गर्भाचं डोकं प्रथम बाहेर येतं ती? - बाळ पूर्ण बाहेर येतं ती? - नाळ कापली जाते ती? - बाळ पहिल्यांदा रडतं ती? - की बाळ जन्माला आलंय असं डॉक्टर / नर्स सांगातात ती? (सिझेरियन झालं असेल तर तत्सम वेगळे प्रश्न) ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच शास्त्रकारांनी लिहून ठेवलं असणार कारण, जर एखादं मिनीट इकडचं तिकडे झालं तर कुंडलीतले ग्रह जागा बदलतात. कोणीतरी प्लीज ह्याचं फायनल उत्तर द्या हो! बरीच वर्षं हा प्रश्न मला छळतोय.

In reply to by मराठे

जन्मवेळ म्हणजे नक्की कोणती? उत्तरः बाळ पूर्ण बाहेर येउन नाळ कापली जाते ती वेळ. परंतु बर्‍याच वेळेला ही नोंद चुकलेली असते असा अनूभव आहे, त्यासाठी अचुक गणित करून "जन्मवेळशुद्धी" करावी लागते.

In reply to by आयुर्हित

जन्मवेळ म्हणजे नक्की कोणती? उत्तरः बाळ पूर्ण बाहेर येउन नाळ कापली जाते ती वेळ.
म्हणजे नाळ कापण्यापूर्वीच्या ग्रहस्थितीचा बालकवर शून्य परिणाम असतो असा अर्थ होतो. थोडक्यात, एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य, केवळ उत्तम ग्रहस्थिती बघून नाळ कापल्यास घडू शकेल असा विद्वत्तापूर्ण दावा आपण केला आहे. त्याहूनही मोठा विनोद म्हणजे, ज्योतिषाच्या दृष्टीनं (तुमच्या मते), अत्यंत महत्त्वाची असलेली ही वेळेची नोंद, बर्‍याच वेळा चुकलेली असते! म्हणजे आईला शुद्ध नसते, नर्सला एक्झॅक्ट वेळेशी घेणं-देणं नसतं, त्यातही तुमच्यासारख्यांचा तीनं सांगितलेल्या वेळेवर विश्वास नसतो म्हणजे मुदलातच घोळ! तसल्या भंपक वेळेच्या नोंदीवर केलेली कुंडली आणि त्यावरनं केलेली भविष्यवाणी म्हणजे ज्योतिषशास्त्र!! त्यावर नामी उपाय काय तर "जन्मवेळशुद्धी"! म्हणजे काय? ज्योतिषाच्या अगाध ज्ञानानं (ज्याचा `ऐन प्रसंगाशी' सुतराम संबंध नाही) ठरवलेली नाळ कापण्याची वेळ! सरळमार्गी म्हणतात ते योग्य आहे, उगीच लुंग्यासुंग्यांशी चर्चा करण्यात अर्थ नाही!

In reply to by संजय क्षीरसागर

बहुत अकुशळ मिळ्ती|स्वामींचे कार्य नाशिती| काही न बोले तयाप्रती| तो बुद्धिमंत|| तेथे नीतिमार्ग बोलता| मूर्ख प्रवर्तती अनर्था| यास्तव जाणोनि होय नेणता| तो बुद्धिमंत||

In reply to by आयुर्हित

बहुत भंपक जमती | भलतेच कार्य करिती | काय बोलावे तयाप्रती | सर्व लुंगीसुंगी || तेथे उघडगोष्ट बोलता | मूर्ख प्रतिवादती अनर्था | यास्तव कळोनि होय नाकळता | तो बुद्धिमंद||

In reply to by आयुर्हित

उत्तरः बाळ पूर्ण बाहेर येउन नाळ कापली जाते ती वेळ
बाकी ज्योतिष समर्थकांचे यावर एकमत आहे का?
अचुक गणित करून "जन्मवेळशुद्धी" करावी लागते.
एकदा वेळ निघुन गेली आणि त्यावेळी अचूक नोंद झाली नाही की It's just manipulation of data जन्मवेळ्शुद्धीने सापडलेली जन्मवेळ ही प्रत्यक्ष जन्मवेळेशी अचूक जुळण्याचे प्रमाण काय?? सर्वात महत्वाच्या अचूक जन्मवेळ नोंदीसाठी ज्योतिषात काय तरतूद आहे ??

या भांडणांच्या नेहमीच्या यशस्वी विषयांसाठी (ज्योतिष - विज्ञान, आस्तिक -नास्तिक, भाजपा - खान्ग्रेस, पुणे -मुंबै इ. इ.) एक मारामार्‍या पेश्शल धागा काढूयात का? म्हणजे मारामार्‍या काय त्या त्या धाग्यावर करा आणि चर्चा शिल्लक राहिलीच तर अशा धाग्यांवर करा!

In reply to by पैसा

पेश्शल इभाग काडून द्या. थितं काय दोरखांड वळायचं त्ये वळू द्या लोकास्नी.

In reply to by पैसा

महत्वाची सुचना:ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे.त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद!!!
पैसा ताई , माझ्या मते सदर लेखकाने वरील वाक्य टाकले नसते .... अन त्याच्या जागी "ज्योतिश ही माझी वैयक्तिक श्रध्दा आहे ,त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही कृपया विषयांतर करु ही विनंती नये" असे टाकले असते तर कदाचित वाद उद्भवला नसता असा एक अंदाज आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही
असल्या चर्चांसाठी व्य. नि. ही सुविधा देण्यात आली आहे. ज्यांची असल्या भंपक गोष्टींवर श्रद्धा आहे त्यांच्याशी, त्या सुविधेमार्फत मनमुराद वार्तालाप केला तर अशी वेळ यणार नाही. Once it is on the Open Forum, one can't claim a privacy protection.

In reply to by प्रसाद गोडबोले

राईचा पर्वत करणारे लोक आहेत आपल्याकडे! तसंही एखादे गोष्ट करू नका म्हटलं की मुद्दाम करायची हे सगळेच सामान्य माणूसप्राणी करतात. असामान्य लोकांची गोष्ट वेगळी! *blum3*

In reply to by प्रसाद गोडबोले

असे टाकले असते तर कदाचित वाद उद्भवला नसता असा एक अंदाज आहे ! नक्की ?! काही विषयांच्या "डि एन ए" मध्येच वाद असतात हे केव्हाच सिद्ध झालंय... =)) ("काही विषयांच्या पाचवीला वाद पुजलेले असतात" हे वाक्य महत्प्रयासानं लिहीण्याचं टाळलं आहे हे ध्यानात आलं असेलच ;) )