✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

डॉक्टर सगळं ठिक आहे ना?

ड
डॉ. भूषण काळुसकर यांनी
Fri, 05/09/2014 - 12:37  ·  लेख
लेख
काय गम्मत आहे पहा, काही गोष्टी नॉर्मल असणं हा सुद्धा काहींसाठी प्रॉब्लेम असू शकतो!!! परवाची गोष्ट- एका पेशंटच ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल आलं- म्हणजे 120/80. तर पेशंटने चक्क मला शंकेने विचारला-" डॉक्टर सगळं ठिक आहे ना? नाही म्हणजे एवढ नॉर्मल ब्लडप्रेशर माझ कधीच नसत" म्हणजे काहीतरी आजार निघाला, डॉक्टरांनी इंग्रजी मधे उच्चारायला कठीण अस काही नाव सांगितल कि मग आपला जीव भांडयात पडतो."चला एकदाच रोगाच निदान झाल". एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट नॉर्मल आला. तर तो म्हणे- " 5000 रुपये खर्च करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही, सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!" कधी कधी अस वाटत की आपल्याला काहीतरी व्हाव याची जणू पेशंट वाटच बघत असतात. शारिरिक बिघाड किंवा आजार याची ऎकून,वाचून,अनुभवून एवढी सवय होते की त्यात काही वावगं/चूकीच अस वाटत नाही. जस आजूबजूच्या गोंगाटाची इतकी सवय होते की शांतता आपल्याला बेचैन करते. त्यामुळे प्रत्येकाने शांतपणे आपण खरच ’निरोगी’ आहोत का हे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
25043 वाचन

💬 प्रतिसाद (162)

प्रतिक्रिया

होय. आपले शेजारी आहेत.

धन्या
Sat, 05/10/2014 - 14:44 नवीन
होय. आपले शेजारी आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आता मिपाकर झालेत तर घेऊन या

प्रचेतस
Sat, 05/10/2014 - 14:46 नवीन
आता मिपाकर झालेत तर घेऊन या त्यांना कट्ट्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आता मिपाकर झालेत तर घेऊन या त्यांना कट्ट्याला.

मुक्त विहारि
Sat, 05/10/2014 - 15:09 नवीन
छान छान.... इथे आम्ही बाहेर, अन तुम्ही करा कट्टे.... (थांबा...आता इथे पण एक जोरदार कट्टा करतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आमचे कट्टे अगदी दर आठवड्यालाच

प्रचेतस
Sat, 05/10/2014 - 15:18 नवीन
आमचे कट्टे अगदी दर आठवड्यालाच चालू असतात हो. पण जाहिरपणे ते समोर येत नाही इतकेच. *pardon*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अरे हा मुद्दा कळल्याची

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 05/11/2014 - 13:25 नवीन
अरे हा मुद्दा कळल्याची पोचपावती द्या रे कुणीतरी... मुवि, तुम्हीच द्या हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आता मिपाकर झालेत

डॉ. भूषण काळुसकर
Mon, 05/12/2014 - 10:51 नवीन
कटट्यावर यायला नक्किच आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आता मिपाकर झालेत

डॉ. भूषण काळुसकर
Mon, 05/12/2014 - 10:54 नवीन
कटट्यावर यायला नक्किच आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अहो तुमचे शेजारी म्हणजे? आमचे

आनन्दा
Mon, 05/12/2014 - 14:34 नवीन
अहो तुमचे शेजारी म्हणजे? आमचे पण शेजारीच आहेत ते.. जाता जाता माझी आंब्याची झैरात करून जातो. काळुस्करांच्या शेजारीच आंबा विकतो आपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

डॉ साहेब, होमिओपॅथीवर विश्वास

आनन्दा
Mon, 05/12/2014 - 15:28 नवीन
डॉ साहेब, होमिओपॅथीवर विश्वास आहेच, मी तर टायफॉइड/ मलेरियावर पण होमिओपॅथिक ट्रीट्मेंट घेतली आहे. पण होमिओपॅथी ला मोडर्न सायन्सच्या भाषेत सिद्ध करण्यसाठी काय प्रयत्न चालू आहेत (उदा. पिप वगैरे) ते समजून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

.

पोटे
Sat, 05/10/2014 - 14:45 नवीन
मी एम बी बी एस आहे.
  • Log in or register to post comments

अरे वा!

पैसा
Sat, 05/10/2014 - 14:49 नवीन
तुम्ही पण जमेल तेव्हा लिहीत चला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे

हे तुमचे आडनाव आहे की

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 05/11/2014 - 13:21 नवीन
हे तुमचे आडनाव आहे की स्पेशलायझेशन ?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे

मस्तं प्रश्नं!

साती
Sun, 05/11/2014 - 14:16 नवीन
मस्तं प्रष्नं! पण सत्य या विनोदापेक्षा मजेशीर असते. माझ्या मुलांच्या पिडीअ‍ॅट्रीशीयनचे नांव डॉ बच्चा आहे. आमच्या गावात एक नविन सर्जन आलेत. ते नविन असल्याने सध्या हर्निया हायड्रोसील अश्या छोट्या मोठ्या सर्जरीच जास्तं करतात. त्यांच्या आडनावाचं स्पेलिंग बी यु एल एल ए आहे.(मी त्यांना नेहमी त्यांच्या नावाने हाक मारते , आडनाव उच्चारताच येत नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

(No subject)

प्रकाश घाटपांडे
Sun, 05/11/2014 - 14:19 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

ठ्ठो!

प्यारे१
Sun, 05/11/2014 - 14:56 नवीन
ठ्ठो! =)) नवीन जातीव्यवस्था (नि त्यानुसार नावं किंवा उलट) म्हणावी की ही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

मला गुंडा चित्रपटाची आठवण

आदूबाळ
Sun, 05/11/2014 - 15:49 नवीन
:)) मला गुंडा चित्रपटाची आठवण झाली.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

(No subject)

जेनी...
Sun, 05/11/2014 - 16:41 नवीन
*biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

+१

बॅटमॅन
Mon, 05/12/2014 - 19:27 नवीन
खुल्लम खुल्ला नाव घ्यायचीच चोरी की ओ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

शंभार माझा पयला नंबर.

जेपी
Sun, 05/11/2014 - 17:09 नवीन
शंभार माझा पयला नंबर.
  • Log in or register to post comments

एकशे एक

जेनी...
Sun, 05/11/2014 - 17:19 नवीन
एकशे एक माझा दुसरा नंबर .... डॉक्टर काका ... तुम्ही लिहाना प्लासिबो बद्दल ... मला वाचायचयो :(
  • Log in or register to post comments

प्लासिबो बद्दल

डॉ. भूषण काळुसकर
Mon, 05/12/2014 - 11:06 नवीन
लिहिणार आहे, त्या आधी थोडं होमिओपॅथी विषयी पण लिहायच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

9_9_2_5_8_, गाळलेल्या जागी

आनन्दा
Mon, 05/12/2014 - 14:36 नवीन
9_9_2_5_8_, गाळलेल्या जागी योग्य अंक भरल्यास एक फोन नंबर मिळेल , त्यावर फोन करण्याचा प्रयत्न करु नये !
बाकी सगळी दुनिया मुठीत आहे हो तुमच्या!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

काही मूलभूत (बेसिक)

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 05/11/2014 - 17:54 नवीन
काही मूलभूत (बेसिक) तत्वांबद्दल थोडे स्पष्टीकरणः १. रुग्णाने सांगीतलेल्या रोगाच्या मूळ तक्रारी (सिंप्टम्स) (जसे, ताप, खोकला, पोटात दुखणे, छातीत दुखणे, इत्यादी) अनेक आजारांत सामायिकपणे असू शकतात. त्यामुळे केवळ सिंप्टम्स वरून मोठ्या रोगाचे निदान करणे शक्य नसते. त्यामुळे त्या रोगांचे निदान करण्यासाठी काही खास तपासण्या करणे आवश्यक असते. अ‍ॅलोपॅथीमध्ये, पेशंटशी त्याच्या तक्रारींसंबद्धी चर्चा (हिस्टरी टेकिंग) आणि त्याची शारिरीक तपासणी (फिजिकल एक्झामिनेशन)केल्यावर बर्‍याचदा जर मोठा आजार असला तर साधारणपणे एकापेक्षा जास्त रोगांची शक्यता वाटू शकते. त्या सर्व शक्यतांच्या यादीला "डिफरेंशियल डायग्नोसिस" असे म्हणतात. या यादीतल्या शक्यता रुग्णात आहेत की नाही हे पाहण्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या (रक्त-लघवी तपासणी, एक्स रे-सीटी-एम आर आय, ई सी जी, डॉप्लर, इ)केल्या जातात. त्या तपासण्यांतल्या काही एखाद्या आजाराची पुष्टी देतात (पॉझिटिव्ह असतात) तर काहींचे निर्णय यादीतल्या इतर एखाद्या शक्यतेला खोडून काढतात (निगेटिव्ह असतात). अश्या तर्‍हेने "डिफरेंशियल डायग्नोसिस" ची यादी लहान होत होत रोगाचे निदान पक्के होते. याचा अर्थ असा की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असणार्‍या या सर्व निकालांच्या बळावरच मोठ्या आजाराचे पक्के निदान होऊ शकते... याचा अर्थ दोन्ही प्रकारच्या तपासण्यांचे महत्व तोलामोलाचेच असते. त्यामुळे एखाद्या तपासणीत आजार सापडला नाही म्हणजे ती तपासणी फुकट गेली असे नाही. याला डायग्नोसिस बाय एक्स्क्लूजन असे म्हणतात आणि रोगनोदान करण्यात ती एक महत्वाची प्रक्रिया असते. २. बर्‍याचदा फार धोकादायक रोगाचा छोटासा संशय आला तरिसुद्धा एखादी तपासणी करणे जरूरीचे समजले जाते. कारण तो रोग प्रथमावस्थेत असतानाच त्यावर प्रतिबंधक उपाय अथवा उपचार केले तर त्यापासून रुग्णाला होणारा धोका कमी होऊ शकतो. उदा. हृदयविकार, डोक्यातल्या रक्तवाहिन्यांचे विकार, मुत्रपिंडांचे आजार, कर्करोग, इ. अश्या तपासणीचा अहवाल (रिपोर्ट) जर पॉझिटिव्ह आला तर त्वरीत उपचार सुरू करणे शक्य होते; आणि जर निगेटिव्ह आला तर मोठ्या आजारासारखी लक्षणे होती पण मोठा आजार नाही हे समजून रुग्णाने खूष व्हायला पाहिजे. वैद्यकीय व्यावसाईकाने जर हा सर्व उलगडा रुग्णाबरोबरच्या चर्चेत करून मग तपासण्या केल्या रुग्णाचा गोंधळ होवून व्यावसाईकांवरचे आरोप कमी होणे शक्य होईल. ३. माझ्या माहितीत असे रुग्ण आहेत की ज्यांना डॉक्टरने, "तुम्हाला जास्त औषधांची गरज नाही" असे सांगून कोणतीही तपासणि न करता केवळ गरज असलेली मोजकी एक ते तीन औषधे लिहून दिली आहेत. आणि त्या रुग्णांची प्रतिक्रिया अशी होती, "५०० रु फी घेतली (जी त्या कन्सल्टंट्सची पूर्वसूचीत तपासणी फी होती), एकपण तपासणी केली नाही आणि पण औषधे पण फक्त (एक-दोन-)तीनच लिहून दिली. फुकटचे ५०० रु खर्च झाले !" यावरून प्रश्न असा आहे की, "डॉक्टरने रोग बरा करण्यासाठी योग्य तेवढीच औषधे लिहून द्यावी की पेशंटच्या मनाचे समाधान होण्याएवढी मोठी यादी द्यावी?" सुज्ञजनांना याचे उत्तर नक्की माहिती असते... पणे तेच सुज्ञ रुग्ण बनले की दर पन्नास रुपयामागे कमीतकमी एका औषधाची भर प्रिस्क्रिप्शनमध्ये पडावी असा विचार करून तसे न झाल्यास डॉक्टरला दुषणे देऊ लागतात. अश्या परिस्थितीत काही डॉ़क्टर जर अनावश्यक (बहुदा व्हिटॅमिन्ससरख्या) औषधांची भर टाकून लांबलचक प्रिस्क्रिप्शन बनवू लागले तर त्यात डॉक्टरांच्या इतकाच रुग्णांचा दोष नाही का? ४. सर्वसाधारणपणे आपण घर बांधताना चांगला आर्किटेक्ट निवडतो, आयकराचे विवरण भरताना सी ए शोधतो, कोर्टात केस करताना योग्य वकील शोधतो... त्यातही साधारण पणे थोडक्यात ज्या विषयाचा सल्ला पाहिजे त्या विषयातील शिक्षण घेतलेला तज्ञ शोधतो. पण अ‍ॅलोपॅथिचे औषध इतर पॅथीची पदवी असलेल्या आणि अ‍ॅलोपॅथिची पदवी नसलेल्या डॉक्टरकडून घेताना बर्‍याच रुग्णाना काही गैर करतो आहे असे वाटत नाही... आणि जनतेला चालते म्हणून सरकारही (हे जनतेनेच निवडलेले प्रतिनिधी असतात) त्यांना न शिकलेल्या विषयांचा व्यवसाय करू देते. याला काय म्हणणार? जे शहाणपण आपण आपल्या घराच्या बांधणीच्या वेळेस, आयकराचे विवरण भरताना किंवा वकिली सल्ला घेताना दाखवतो ते आपल्या स्वास्थ्याचा विचार करताना केव्हा दाखवणार ?
  • Log in or register to post comments

उत्तम!

साती
Sun, 05/11/2014 - 19:06 नवीन
उत्तम प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

प्रतिसाद आवडला

पैसा
Sun, 05/11/2014 - 21:48 नवीन
उत्तम आणि संतुलित प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

छान लेख

डॉ. भूषण काळुसकर
Mon, 05/12/2014 - 12:51 नवीन
आपले पहिले २ मुद्दे अगदी योग्य आहेत, पण या बाबतीत डॉक्टर- पेशंट संवाद अपूर्ण अथवा पारदर्शक नसेल तर नंतर गैरसमज वाढत जातात. मी बर्‍याचदा असं ऎकल किंवा पाहीलं आहे की बरेचदा अनेक डॉक्टर, पेशंटशी अतिशय संतापून वागतात किंवा खूपच कमी बोलतात. त्यामुळे पेशंट विनाकारण दुखावला जातो. याऊलट डॉक्टर- पेशंट सुसंवाद असेल तर त्याचे परिणामही(outcome) चांगले होतात. तिसर्‍या मुद्दाबद्दल- भरपूर औषधे घेतली, इंजेक्सन घेतल, सलाईन लावल की आपण लवकर बरे होतो अशी पेशंटची मानसिकता का होते याचा शोध घेणे गरजेचे आहे. पेशंट मागतात म्हणून इंजेक्शन मधुन फ़क्त स्टराईल वॉटर देणारे काही डॉक्टर मी ऎकलेले आहेत. काही डॉक्टर तर पेशंटने फार किरकिर केली, तर त्याला विश्वासात न घेता परस्पर झोपेच्या गोळ्या लिहून देतात. त्यामुळे हा दोष दोघांचा आहे आणि असं होऊ नये याची जबाबदारी पण दोघांवरही आहे.(एका हाताने कधीही टाळी वाजत नाही). ४ था मुद्दा- माझेही हेच मत आहे की प्रत्येकाने ज्या शास्त्रात पदवी घेतली आहे, त्याचीच प्रॅक्टीस करावी. तसेच आपल्याकडे स्वास्थ्याच्या बाबत फारच उदासीनता आहे, अगदी डॉक्टरांमधे सुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अतिशय आवडला प्रतिसाद. माझ्या

अजया
Tue, 05/13/2014 - 15:35 नवीन
अतिशय आवडला प्रतिसाद. माझ्या बघण्यात तर( गेली पंधरा वर्ष )बरेचसे इतर पॅथीचे डॉक्टर्स अ‍ॅलोपथी ची प्रॅक्टीस त्यांच्याकडे येणार्‍या एम.आर.च्या ऑफर्स आणि त्यांनी सांगितलेल्या त्या त्या आजाराची औषधं वापरुन करतात ;) ( याच्च क्रमाने वाचावे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

एक 'डॉक्टर' म्हणून साजेसा आणि

सूड
Tue, 05/13/2014 - 16:01 नवीन
एक 'डॉक्टर' म्हणून साजेसा आणि संतुलित प्रतिसाद!! *i-m_so_happy*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

पदापर्णातच डॉक्टरांनी शतकी

कानडाऊ योगेशु
Sun, 05/11/2014 - 23:28 नवीन
पदापर्णातच डॉक्टरांनी शतकी मजल मारली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व पदार्पणातच द्विशतकासाठीही शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

धन्यावाद

डॉ. भूषण काळुसकर
Mon, 05/12/2014 - 11:08 नवीन
धन्यावाद!!! मेडन सेंचुरी-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

काळजी करु नका, धागा त्रिशतकी सुद्धा होईल!

संजय क्षीरसागर
Mon, 05/12/2014 - 11:35 नवीन
म्हशीस चालते का हो तुमची होमिओपदी?
यावर तुम्ही म्हटलंय
निश्चितच चालेल कारण माझ्या कडे काही श्वान येतात- पेशंट म्हणून, म्हणजे त्यांचे मालक आणतात त्यांना. त्यांचे आजार होमिओपॅथीने बरे झाले.
या फुलटॉसवर अजून बॅटींग झालेली नाही. आणि
उद्या एम आर आयची फक्तं प्लेट आणून दिली तरी त्यात काय आहे हे छापील रिपोर्टशिवाय मला वाचता आले पाहिजे. ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?
हा मूळ धाग्यालाच धोबीपछाड मारणरा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. भूषण काळुसकर

उद्या एम आर आयची फक्तं प्लेट

आनन्दा
Mon, 05/12/2014 - 14:45 नवीन
उद्या एम आर आयची फक्तं प्लेट आणून दिली तरी त्यात काय आहे हे छापील रिपोर्टशिवाय मला वाचता आले पाहिजे. ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात? हा मूळ धाग्यालाच धोबीपछाड मारणरा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.
माझ्या अल्पमतीप्रमाणे अ‍ॅनोटोमी, फिझिओलोजी, मोडर्न मेडिसीन वगैरे अत्यावश्यक घटक सर्व पॅथींच्या विद्यार्थ्यांना शिकवले जातात. असो, माझी अल्पमती पुरे, आपण सूज्ञ आहातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आणि अजून एक, कालेजात शिकवले

आनन्दा
Mon, 05/12/2014 - 14:47 नवीन
आणि अजून एक, कालेजात शिकवले नाही म्हणजे इतरांना एम आर आय वाचताच येत नसेल का हो? तसे असेल तर मग सर्व धाग्यांवर आपला जो संचार चालू असतो त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

स्वतःच कबूल केल्याने.

साती
Mon, 05/12/2014 - 15:21 नवीन
अल्पमती हे स्वतःच कबूल केल्याने पुढिल प्रतिसाद देण्याचा त्रास वाचला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

धन्यवाद (तो प्रतिसाद तुम्हाला

आनन्दा
Mon, 05/12/2014 - 18:27 नवीन
धन्यवाद (तो प्रतिसाद तुम्हाला नव्हताच.), तसेही माझा वाद होमिओपॅथिक डॉ. ना अ‍ॅलोपॅथिक औषधे देण्याचा अधिकारच नाही असे म्हणणार्‍यांबरोबर आहे. व्यक्तिशः मी देखील होमिओपॅथिक डॉ.नी अ‍ॅलोपॅथिक प्रॅच्तिस करू नये याह मताचा आहे, कारण त्यांना त्यातले सखोल ज्ञान नाही. पण बेसिक मेडिसिन/ मोडेर्न मेडिकल सायन्स त्यांना शिकवलेच जात नाही असे म्हणणे चुकीचे आहे. आणि कोणत्याही विषयातले ज्ञान हा व्यासंगाचा भाग आहे, संक्षींनीच खाली म्हणल्याप्रमाणे. तेव्हा इत्यलम|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

एम आर आय वाचताच येत नसेल का हो?

संजय क्षीरसागर
Mon, 05/12/2014 - 15:28 नवीन
दादा, प्रश्न काळुसकरांनी MIR का करायला सांगितला आणि त्यांना (रिपोर्ट न पाहाता) तो वाचता येतो का (अभ्यासक्रमात नसल्यानं) असा आहे. उत्तर त्यांनी द्यावं अशी अपेक्षा आहे. मी ज्या विषयावर लिहीतो त्याचा सखोल अभ्यास आहे. अनेक ठिकाणी प्रतिसाद असणं हा व्यासंगाचा भाग आहे. आपण माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

MRI

संजय क्षीरसागर
Mon, 05/12/2014 - 15:30 नवीन
म्हणायचंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

*fool*

प्यारे१
Mon, 05/12/2014 - 15:31 नवीन
*fool* *fool* *fool*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

स्वतःचच वर्णन करणारी स्मायली टाकणं हे उत्तर नाही

संजय क्षीरसागर
Mon, 05/12/2014 - 15:38 नवीन
पण सवयीला इलाज नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

असो.

प्यारे१
Mon, 05/12/2014 - 16:15 नवीन
असो. माननीय सखाराम गटणे आठवले होते. ;) अभ्यास, व्यासंग वगैरे ठीक आहे हो पण सामान्यज्ञान कुठं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अभ्यास, व्यासंग वगैरे ठीक आहे

धन्या
Tue, 05/13/2014 - 09:07 नवीन
अभ्यास, व्यासंग वगैरे ठीक आहे हो पण सामान्यज्ञान कुठं आहे?
तुम्ही दैनंदिन भाषेत इंटेलिजन्स कोशंट आणि ईमोशनल इंटेलिजन्स बद्दल तर बोलत नाही ना? तळटीपः माझ्या प्रतिसादाचा रोख कुणा व्यक्तीकडे नसून प्रशांत यांच्या प्रतिसादातील अभ्यास, व्यासंग आणि सामान्यज्ञान या शब्दांच्या अर्थाकडे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

एवढा गहन अर्थ कुठून निघायला!

संजय क्षीरसागर
Tue, 05/13/2014 - 10:29 नवीन
आरत्या बंद पडल्यामुळे `अशांत कावले' आहेत. माझा प्रतिसाद दिसला की काही तरी पिंक टाकायची इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

चला हेतू सफल झाला!

प्यारे१
Tue, 05/13/2014 - 14:03 नवीन
:) चला हेतू सफल झाला! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मी ज्या विषयावर लिहीतो त्याचा

आनन्दा
Mon, 05/12/2014 - 16:15 नवीन
मी ज्या विषयावर लिहीतो त्याचा सखोल अभ्यास आहे. अनेक ठिकाणी प्रतिसाद असणं हा व्यासंगाचा भाग आहे.
त्यातल्या किती गोष्टी तुम्ही अभ्यासक्रमात शिकला आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मुद्दा विषेश ज्ञानाचा (खरं तर प्रोफेशनल क्वालिफिकेशनचा) आहे

संजय क्षीरसागर
Mon, 05/12/2014 - 21:07 नवीन
घंटाचंदांचं मी एकवेळ समजू शकतो, त्यांना कुठेही पिंका टाकायची सवय आहे. तुमच्या बाबतीत तर मला काहीही माहिती नाही. प्रतिसादाच्या निमित्तानं प्रोफाईल आणि लेखनकारकिर्द पाहिली असता विषेशज्ञान कसलं असावं याचीही कल्पना येत नाही. पण विषेशज्ञान आणि व्यासंग यातला फरक कळत असावा अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

हे घ्या - विशेषज्ञान

आनन्दा
Tue, 05/13/2014 - 11:21 नवीन
हे घ्या - विशेषज्ञान काळुस्करसाहेब, काही चुकले असेल तर सुधारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

विशेषज्ञान

डॉ. भूषण काळुसकर
Tue, 05/13/2014 - 11:33 नवीन
आनन्दा- त्या साईट वरती बरच काही आहे, काही केसेसही आहेत, तुला नक्की काय सांगायच आहे ते कळलं नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

सांगण्यासारखं त्यांचाकडे काही नसावं!

संजय क्षीरसागर
Tue, 05/13/2014 - 13:02 नवीन
माझ्या प्रतिसादावर त्यांनी ही पिंक टाकली होती
तसे असेल तर मग सर्व धाग्यांवर आपला जो संचार चालू असतो त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे.
पण विषेशज्ञान (या चर्चेच्या संबधात, Professional Qualification) आणि व्यासंग (Exploration) यात फरक आहे ही स्वतःची चूक लक्षात आल्यावर, त्यांनी अशी मखलाशी (ती सुद्धा चुकीची) करुन :
कोणत्याही विषयातले ज्ञान हा व्यासंगाचा भाग आहे, संक्षींनीच खाली म्हणल्याप्रमाणे.
इत्यलम, .... म्हणजे काढता पाय घेतला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. भूषण काळुसकर

माझ्या अल्पमतीप्रमाणे अ

आनन्दा
Tue, 05/13/2014 - 16:09 नवीन
माझ्या अल्पमतीप्रमाणे अ‍ॅनोटोमी, फिझिओलोजी, मोडर्न मेडिसीन वगैरे अत्यावश्यक घटक सर्व पॅथींच्या विद्यार्थ्यांना शिकवले जातात.
या वाक्याच्या पुराव्यासाठी दिलेली लिंक आहे ती. बी. एच एम एस चा अभ्यासक्रम. आहो संक्षी, बेसिक मेडिसिन, शरीरशास्त्र वगैरे सर्वांनाच शिकवले जाते. अगदी पॅथोलोजी पण. म्हणजेच त्यांना बेसिक मेडिसिनचे प्रोफेशनल क्वलिफिकेशन नाही हा मुद्द संपला. त्याच्या आधारावर जनरल प्रॅक्टिस ते नक्कीच करू शकतात. आणि त्याच आधारावर सध्या त्यांना ती परवानगी आहे. सध्या ज्या प्रश्नावर वाद सुरू आहे त्याची बहुधा तुम्हाला माहिती नसावी. ती पूर्ण टाकण्याईतके त्या विषयाचे ज्ञान मला नाही, कारण मी त्या क्षेत्रात काम करत नाही. पण एव्हढे नक्की सांगू शकतो, की होमिओपॅथिक डॉ. ला एम आर आय प्रिस्क्राइब करण्याचा अधिकारच नाही हे विधान नक्कीच पूर्वग्रहदूषित आहे. सातीतैंचा प्रश्न पूर्ण वेगळा आहे, की ते लोक होमिओपॅथी शिकून अशी प्रॅक्टिस का करतात. तो पूर्णपणे वेगळा विषय आहे, त्याला वर उल्लेखलेल्या वादाचा संदर्भ आहे, म्हणून मी त्यांना तिथे इत्यलम म्हटले, त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही. तुमच्या वाक्याचा फक्त संदर्भ घेतला आहे. तुमचा माझा संवाद यापुढेही चालू राहील. सध्या आंब्यामुळे मला फारसा वेळ नाही, तरी पण वेळ मिळताच तुम्हाला उत्तर दिले जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सातींच्या विचारसरणीचा उलगडा त्यांच्याशी झालेल्या

संजय क्षीरसागर
Tue, 05/13/2014 - 16:39 नवीन
व्य. नि. तून झालेला आहे, तो मी इथे देऊ शकत नाही. तस्मात होमिओपाथनं MRI करायला सागांवा का ? हा (त्यांचा) मुद्दा बाजूला ठेवू. आपला `सं'वाद (माझ्या) व्यासंगाविषयी होता. व्यासंगासाठी विषय अभ्यासक्रमात असण्याची गरज नाही हा खुलासा मी पूर्वीच केला आहे. तस्मात संवाद पूर्ण झालेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा