✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये......

ज — ज्ञानोबाचे पैजार, Sun, 04/20/2014 - 11:59
प्रेरणा... सांगायलाच पाहिजे का? पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये...... (आजकाल त्या साठी पिठाच्या गिरण्या असतात तिकडे जावे. जात्यावर पिठ काढण्याची परंपरा आता जूनी झाली आहे म्हणून.) (पूर्वी जात्यावर पिठ काढताना बायका ओव्या म्हणायच्या, देवाचे नाव घ्यायच्या. आजकाल पिठाच्या गिरणीत जोरजोरात "गन्नम स्टाईल" लावलेले असते. त्याच तालावर गिरणीवाला धान्य दळत असतो. तोच संस्कार कदाचीत त्या पिठावर होत असेल. पण तरी सुध्दा, उगाच संस्कार वगेरे करण्यासाठी म्हणून, बळेच स्वतःचे कंबरडे मोडून घेउ नये.... पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये ) (एवढे पुरे... आता ही चाल विसरा... आता नवी चाल) पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये किस काढता काढता आपलीच बोटं किसू नये एवढ्याच साठी धुवत नाहीत, ते डोळ्यावरची चिपडे की ताटा भोवतीची रांगोळी, चुकूनसुध्दा त्यांना दिसू नये ताजे वाढा, शिळे वाढा, वा हलवायाकडचे सुध्दा चालेल पण हे अन्नपूर्णे, भरल्या ताटावर, या पोटात मात्र सारखे दूखू नये वृत्तीने असेन किंवा प्रवृत्तीने, कशाने वखवखलेला मी? की माझ्या मनाजोगता एकही पदार्थ, मला जन्मात दिसू नये कुणी आणली असेल अशी वेळ या बुभूक्षीतांवर, की स्वादिष्ट, सकस, सुग्रास अन्नही यांना पूर्णब्रम्ह वाटू नये? सुवासासाठी कोणी कधी, अन्नात अत्तर मिसळते का? तसे चूल पेटवण्या साठी कधी चंदन जाळू नये (माज म्हणून सुध्दा,... चंदन पेटवण्याची जागा वेगळी असते) बाकी सारे विसर "पैजारबुवा", पण एक लक्षात ठेव तू ढलप्या उचकटून काढता काढता, (उगाच) आपले ज्ञान पाजळू नये

प्रतिक्रिया द्या
2566 वाचन

💬 प्रतिसाद (3)

हायला!

पैसा
Sun, 04/20/2014 - 12:10 नवीन
कुटलं तर चालेल का?
  • Log in or register to post comments

हा हा हा..

यसवायजी
Sun, 04/20/2014 - 12:20 नवीन
हा हा हा.. काव्यरसात वाङ्मयशेती राहिली की हो. कवितेत गन्नम स्टाईल 'गॉन व्हायरल' होण्याची पात्रता आहे.
  • Log in or register to post comments

__/\__

प्यारे१
Sun, 04/20/2014 - 15:51 नवीन
__/\__ आता डब्बल मस्तानी (काशीबाईंसह बाजीरावांना = म्हणजे दोघांनाही मस्तानी नावाचे पेय. इतर अपेक्षा करु नयेत. धन्यवाद!) ;) संदर्भ: तुमालाबी म्हायत्ये नि आमालाबी! ;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा