एका पक्ष्याचे प्रकाशचित्र

लिखाळ's picture
लिखाळ in जनातलं, मनातलं
27 Jul 2008 - 3:42 pm

नमस्कार !
मागच्या नोव्हेंबर मध्ये महाबळेश्वर येथे फिरायला गेलो असता एका तारेवर छान पक्षी दिसला. बर्‍यापैकी लहान होता पण उन्हात असल्याने त्याचा फोटो काढायचा मोह आवरला नाही. कसा वाटला ते सांगा.

कॅमेरा निकॉन कूलपिक्स एस ४. १०पट झूमचा.
पक्षी फार लांब असल्याने चित्र स्पष्ट असले तरी आकाराने लहान झाले आहे.
फोकल लेंग्थ ६३ मी मी
ऍपरचर १/४
शटर १/१७०
आयएसओ ५०

पक्षी थ्रश या प्रकारातील असावा असे वाटते. कोणाला माहित असेल तर कृपया सांगावे.

-- (पक्षीमित्र) लिखाळ.

मौजमजाप्रतिक्रियाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

27 Jul 2008 - 4:00 pm | मदनबाण

मस्तच टिपलाय तुम्ही,,लांब असुन सुद्दा पक्षी अगदी स्पष्ट दिसतो आहे..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jul 2008 - 4:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो लै भारी आला आहे. झुमची फॅसीलिटी लै भारी दिसते राव तुमच्या कॅमेर्‍यात.
वीजेच्या तारेवर बसलेल्या चिमणीची याद आली. ( पक्षी कोणता आहे. )

विसोबा खेचर's picture

27 Jul 2008 - 5:12 pm | विसोबा खेचर

अहो लिखाळराव, ही तर चक्क चिमणी आहे, पण छान आहे! :)

मनस्वी's picture

28 Jul 2008 - 11:02 am | मनस्वी

मलापण चिमणीच वाटतीये. छान आलाय फोटो!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

मैत्र's picture

27 Jul 2008 - 7:34 pm | मैत्र

लिखाळ राव... एस ४ ची इतकी माहिती कशी मिळाली.. माझ्या कडे एल १० आहे... पण त्यात इतके सेटिंग्ज (मराठी शब्द ? ) नाहीत...
कसे सेट करायचे ?

फटू's picture

27 Jul 2008 - 11:27 pm | फटू

खुप सुंदर घेतलं आहे प्रकाशचित्र...

(फोटोबरोबरच तो फोटो ज्या कॅमेर्‍यातून घेतला त्या कॅमेर्‍याची टेक्निकल माहिती का बरे देत असावेत :? )
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

लिखाळ's picture

28 Jul 2008 - 1:11 am | लिखाळ

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
मैत्र,
आपण काढलेल्या फोटोवर राईट्क्लिक करुन त्याच्या 'प्रॉपरटीस' पाहिल्या की जी माहिती दिसते ती मी दिली आहे. कॅमेरा संपूर्ण ऑटो आहे. त्यामुळे फोकस, शटरस्पीड आणि ऍपरचर हे सर्व त्याचे तो ठरवतो आणि ती माहिती आपण फक्त पाहतो. इतकेच. (अश्या कॅमेर्‍याकडून पाहिजे ती गोष्ट कशी करुन घ्यायची ते अनुभावाने आणि निरनिराळ्या युक्त्या वापरुन जमू लागते.)

सतीश गावडे,
फोटोखालची माहिती ही कॅमेर्‍याची नसून फोटो ज्या परिमाणांवर काढला त्याची माहिती माहिती असते. डेप्थ ऑफ फिल्ड आणि इतर गोष्टी त्यामुळे ठरतात. जाणकार मग त्या परिमाणांच्या योग्य वापराच्या शक्यतेबद्दल अनेकदा सुचवण्या देतात, तसेच कॅमेर्‍याच्या परिणामकारकतेवर सुद्धा प्रकाश पडतो, चर्चा करता येते. इत्यादी..त्यामुळे अशी माहिती देतात.

--लिखाळ.

गुंडोपंत's picture

28 Jul 2008 - 3:51 am | गुंडोपंत

मस्त रे लिखाळा!!
अजूनही पाखरे टिपतोस तर... ;)

आपला
गुंडोपंत

ध्रुव's picture

28 Jul 2008 - 2:03 pm | ध्रुव

सुरेख टिपला आहेस.
नॉईज जास्त वटत आहे. बाकी झकास :)
--
ध्रुव