Skip to main content

ठपका!

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 26/07/2008 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
'ठिपका' ही सुंदर गजल घेऊन आलेल्या अनिरुद्ध अभ्यंकरांच्या वेशातल्या केशवसुमारांना आम्ही ओळखले मात्र पाठोपाठ विडंबनधर्माला जागणे आले! ;) ठपका! घडायचे ते घडले काही टळले नाही पोहे खाता तुला भेटणे चुकले नाही कळले नाही कशी अधाशी प्लेट संपली चहा कधी मग सुरू जाहला कळले नाही बहीण अचानक तुझी मला सामोरी आली त्या धक्यातुन चित्त कधी सावरले नाही मी ओठांनी निर्धाराने खूप लपवले पण डोळ्यांना माझ्या तेही जमले नाही नको दाखवू ओळख आता सांगत होती तिचे इशारे पण ते मी ओळखले नाही शरमिंदा मी झालो होतो अखेर चुकलो विनवुन तुजला परोपरी हे पटले नाही बदलत गेले भाव कसे मी बघत राहिलो नकार मजला तुझा बदलणे जमले नाही मी जाताना नजर अशी माघारी वळली हाय! कसे ते तुला तरी पण कळले नाही? भाळावरती 'ठपका' घेऊन बसला 'रंग्या' लग्नाचे हे कोडे काही सुटले नाही चतुरंग
लेखनविषय:

वाचने 4087
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

अशी गत झाली का?? :) मस्त. केसुंच्या पावलावर पाऊल. एकदम सह्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आवडले. चहा-पोहे,धक्क्यातून न सावरणे वगैरे लऽय भारी :) ही गझल आहे की कविता हा विचार अजून करतो आहे. विडंबन नक्कीच आहे :) (आस्वादक)बेसनलाडू

एकदम चपखल शब्द..भन्नाट विडंबन.... चतुरंग आणि अनिरुद्ध भाऊ भाऊ तर नाहीत्...... :? "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

नको दाखवू ओळख आता सांगत होती तिचे इशारे पण ते मी ओळखले नाही मस्त रे रंगा...! :)

रंगाशेठ, गजलेच्या पद्धतीने लिहीलेली विडंबन कविता आवडली. गजलेच्या वृत्तात रचलेल्या एकाच विषयावर वर्णनपर उलगडत जाणार्‍या काव्यरचनेला उर्दुत नज़्म असे म्हणतात असे कुठे तरी वाचलंय. बहीण अचानक तुझी मला सामोरी आली त्या धक्यातुन चित्त कधी सावरले नाही चित्तरंजनांचे हे गुपित तुम्हाला कसे हो कळले? ;) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

नज्म बद्दल माहिती नव्हती. ती दिल्याबद्दल धन्यवाद! चित्तरंजनांचे हे गुपित तुम्हाला कसे हो कळले? अहो काका, 'जे न देखे रवी' असल्यामुळे आम्हाला अशी कोणतीही गुपिते माहीत असतात! ;) चतुरंग

नको दाखवू ओळख आता सांगत होती तिचे इशारे पण ते मी ओळखले नाही व्वा सॉलिड.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

रन्गाशेठ !! एक्दम जबरा!!! येउ देत अजुन !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

विडंबन खुप आवडले.. जिथे कमी तिथे आम्ही ..:)