'ठिपका' ही सुंदर गजल घेऊन आलेल्या अनिरुद्ध अभ्यंकरांच्या वेशातल्या केशवसुमारांना आम्ही ओळखले मात्र पाठोपाठ विडंबनधर्माला जागणे आले! ;)
ठपका!
घडायचे ते घडले काही टळले नाही
पोहे खाता तुला भेटणे चुकले नाही
कळले नाही कशी अधाशी प्लेट संपली
चहा कधी मग सुरू जाहला कळले नाही
बहीण अचानक तुझी मला सामोरी आली
त्या धक्यातुन चित्त कधी सावरले नाही
मी ओठांनी निर्धाराने खूप लपवले
पण डोळ्यांना माझ्या तेही जमले नाही
नको दाखवू ओळख आता सांगत होती
तिचे इशारे पण ते मी ओळखले नाही
शरमिंदा मी झालो होतो अखेर चुकलो
विनवुन तुजला परोपरी हे पटले नाही
बदलत गेले भाव कसे मी बघत राहिलो
नकार मजला तुझा बदलणे जमले नाही
मी जाताना नजर अशी माघारी वळली
हाय! कसे ते तुला तरी पण कळले नाही?
भाळावरती 'ठपका' घेऊन बसला 'रंग्या'
लग्नाचे हे कोडे काही सुटले नाही
चतुरंग
वाचने
4087
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेरे..
छान
सॉलीड
नको दाखवू
मस्त विडंबन
हेच म्हणतो..
In reply to मस्त विडंबन by सहज
नज़्म?
प्रमोदकाका,
In reply to नज़्म? by प्रमोद देव
व्वा..
रन्गाशेठ
प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे मनापासून आभार!
मस्त
विडंबन आवडले.