Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एस. डी. - लताची सर्वोत्कृष्ट पाच गाणी

न
नंदन यांनी
Sun, 11/04/2007 - 06:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10949 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

स
सहज Sun, 11/04/2007 - 06:42 नवीन

वाह

गाणी छान आहेत. आजवर असे लेख नुस्ते गाण्याचे नाव व शब्द असलेले पाहीले. यु ट्युब की जय हो! नंदनमहाराज की जय हो!! मजा आली..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/04/2007 - 06:59 नवीन

मिसळपावचं सार्थक झालं!

ऐन दिवाळी तोंडावर आली असताना आमच्या नंदनशेठचा इतका सुंदर लेख मिसळपाववर यावा हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल..! नंदनशेठ, आत्ता जरा कामाच्या गडबडीत आहे, नंतर सवडीने विस्तृत प्रतिसाद टाकेन! तूर्तास, 'मिसळपावचं सार्थक झालं, धन्य झालो!' एवढंच अगदी मनापासून लिहितो... आपला (दिदीचा भक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 11/04/2007 - 09:49 नवीन

छान लेख!

नंदन लेख मस्त झालाय. गाण्यांची निवडही छान आहे. दुसरे गाणे मात्र(अपवाद) खास नाही वाटले. तसेच "जाये तो जाये कहां" तलतचेच जास्त आवडते.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sun, 11/04/2007 - 21:39 नवीन

उत्तम

गाण्यांची निवड उत्तमच आहे, पण अजूनही गाणी आवडण्यासारखी आहेत. एक माझे आवडते .. चुकले चुकले, कारण वरचे गाणे लताचे नाही . आता अजून एक लताचे..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/07/2007 - 08:37 नवीन

नंदनशेठ,

तुझा लेख जरा सवडीने वाचतो असं म्हटलं होतं, आज जरा सवड मिळाली. तू असं म्हटलं आहेस, कारण या गाण्यांच्या सांगीतिक बाजूबद्दल काही लिहावे एवढा माझा वकूब नाही. परंतु, विशेषतः 'लूट कर मेरा जहाँ' च्या वरच्या पट्टीनंतर येणारा 'छुप' चा होतोय-न होतोय असा हळुवार उच्चार आजा चल दे कहीं दूर म्हणताना 'आजा' वरचा गोड हेलकावा वरील वाक्ये वाचून तुझा वकूब नाही असं मला तरी वाटत नाही! :) कारण गाणं खूप बारकाईने आणि 'दिल लगाके' ऐकल्याशिवाय असले बारकावे टिपता येत नाहीत! असो.. असो. थोडं अवांतर म्हणजे, माझ्या आजोबांच्या वेळची मुंबई कशी होती हेही या गाण्यातून दिसतं हा हे गाणं आवडण्यामागचा अजून एक छोटासा भाग :). क्या बात है....:) रात्री श्रीकृष्णाच्या भेटीच्या आसेने श्यामरंगी वस्त्रे लेवून निघालेल्या राधेसारखी अभिसारिका नायिका. तिची उत्सुकता आणि तगमग; संकोच आणि मोह यांच्यामध्ये सापडून होणारी द्विधा मनःस्थिती आणि अशावेळी अवचितपणे ढगांतून डोकावून तिचा गौरवर्ण उजळवून टाकणारा, तिला पेचात टाकणारा चंद्र. मग कृतक कोपाने 'तोहे राहू लागे बैरी' म्हणणारी 'बंदिनी' कल्याणी. तीन-चार मिनिटांच्या वेळात वेगवेगळ्या विभ्रमांनी उभी करणारी नूतन; खरंच 'समर्थ' अभिनेत्री. वा नंदनशेठ! अरे सायबा तुझं किती कौतूक करू?! :) किती सुरेख लिहिलं आहेस! क्या बात है... इथे मिसळपाववर तुझ्या आवडत्या गाण्यांवरचे अजूनही असेच लेख लिही, अगदी भरभरून! तुझा, तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/07/2007 - 08:58 नवीन

अगदी सहमत

खरंच, साहित्याच्या क्षेत्रातली आपली नजर नंदनरावांनी संगीताच्या क्षेत्रात जशीच्या तशी आणली आहे. खरच, कौतुकास्पद आहे. लता आणि मदन मोहन ह्या कॉंबिनेशनबद्दल असेच काहीतरी मिसळपावावर यावे, ही सदीच्छा. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विकास Wed, 11/07/2007 - 17:44 नवीन

छान लेख + माझी आवडती गाणी

नंदनराव, लेख आणि कल्पना छान आहे. पटकन सुचलेली गाणी खाली देतो. (एकाचा उल्लेख आपण केला आहेच). यू ट्यूबवर न मिळालेली आणि या संदर्भातील अजून दोन गाणी - चुपके चुपके चल रे कुरवैय्या आणि जैसे राधाने माला जपी शाम की (हे गाणे एम्बेड करायची व्यवस्था काढून टाकली आहे).
  • Log in or register to post comments
ई
ईत्यादि गुरुवार, 11/08/2007 - 06:28 नवीन

सकाळ धन्य झाली

अत्यन्त सुन्दर लेख आणि पुरवणी. ईत्यादि
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 11/08/2007 - 08:27 नवीन

आभार

येथे प्रतिक्रिया देऊन अथवा व्य. नि. पाठवून लेख आवडल्याचे कळवणार्‍या मंडळींचे मनःपूर्वक आभार. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 11/08/2007 - 09:36 नवीन

ऑफेनबाख?

"तुम ना जाने" मध्ये सुरुवातीला वेगवेगळे गाण्यांचे सांगीतिक तुकडे आहेत. पैकी ०:३६ = -३:१२ ला ऑफेनबाख च्या "बार्कारोल" गाण्याची धुन आहे. ती धुन कधी हिंदी चित्रपटात वापरली गेली आहे काय? बाकी नंदन यांची गाण्याची निवड मस्तच.
  • Log in or register to post comments
न
नाना चेंगट Sun, 06/03/2012 - 16:15 नवीन

बरेच दिवसांत नंदनचा लेख

बरेच दिवसांत नंदनचा लेख बोर्डावर दिसला नाही. :) म्हणून जुनाच वर काढून नंदनचा लेख बोर्डावर पाहिल्याची हौस भागवून घेत आहे ;)
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 06/03/2012 - 17:15 नवीन

नवीन

इतका चांगला लेख लिहिणार्‍या नंदन यांनी २०१२ मधे परत एखादा लेख लिहावा अशी मी विनंती करतो. 'पवन दिवानी' हे गाणंही मला खिळवून ठेवतं.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 02/21/2023 - 09:54 नवीन

जुने ते सोने

जुने जुने सोने खणून वर आणणे
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Tue, 02/21/2023 - 13:13 नवीन

एस डी ची साठच्या अगोदरच्या दशकातील

गाणी चालींच्या दृष्टीने उत्कृष्ठ असायची पण बोजड पण असायची. बुझ दिल, देवदास ची गाणी उदाहरणदाखल आठवून पहा. साठ नंतर आर डी वडिलांना ऑर्केस्ट्रेशन मध्ये मदत करू लागला आणि चमत्कार झाला. अगोदरच अफलातून असणाऱ्या चालींना आर डी च्या कल्पक ऑर्केस्ट्राची साथ मिळाली आणि त्या गाण्यांनी अनुभूतीची एक नविनच पातळी गाठली. तलाश मधलं हे https://youtu.be/pOxoXpsTPeY गाणं उदाहरणदाखल ऐकून बघा.
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 02/22/2023 - 07:07 नवीन

नंदनशेठ

गाणी उत्कृष्टच आहेत तुम्ही निवडलेली. पण तुमच्या वर्तुळातल्या लताद्वेष्ट्या मंडळींना काय वाटत असेल असल्या लेखांनी ?
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 02/23/2023 - 13:51 नवीन

आखिर क्यों?

ह्या चित्रपटातील हे गाणं हा कदाचित एक पर्याय संभवू शकतो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
N
nutanm Sat, 02/25/2023 - 09:30 नवीन

अ

नंदन यांचा लेख छान त्यात फैली हुई ये सपनोंकी सर्वोत्कृष्ट. मी आताच ४ दा हे गाणे ऐकले. नूतन माझे नाव जिच्यावरून ठेवले ती तर माझी आवडती सुंदर नटी तिच्या चेहर्याची नस नी नस बोलत असते अभिनय करताना , तुलना केल्याशिवाय रहावत नाही पण स्मिता पाटीलचे जसे डेोळे खूप काही सांगायचे व तेच जास्त अभिनय करायचे तशी नूतनच्या चेहर्याची नस नी नस बोलते असे माझे मत.
  • Log in or register to post comments
N
nutanm Sat, 02/25/2023 - 09:36 नवीन

नूतन खरेच समर्थ नावा

नूतन खरेच समर्थ नावा प्रमाणेच समर्थ अभिनेत्री होती.
  • Log in or register to post comments
N
nutanm Sat, 02/25/2023 - 09:37 नवीन

नंदन यांच्या उपमी छान.

नंदन यांच्या उपमी छान.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा