✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अनाहिता ठाणे कट्टा

भ
भावना कल्लोळ यांनी
गुरुवार, 12/26/2013 - 14:23  ·  लेख
लेख
नमस्कार, आजच्या ठळक बातम्या ……… तर दिनांक २२ डिसेंबर २०१३ रोजी अतिचर्चित आणि दर वेळे प्रमाणे फाटे न फुटता खूप वेळेपासून गाजत असलेला अनाहिताचा पहिला वाहिला कट्टा हा ठाणे येथील स्वाद उपहारगृहामध्ये नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा का होईना पार पडला. परदेशी वास्तव्यास असलेल्या आमच्या काही मिपा अनाहिता अनाहुतपणे भारतवारी करण्यास आल्या होत्या आणि त्या आपसुकच या आमच्या कट्ट्या मध्ये गवसल्या. या कट्ट्याचे सर्वेसर्वा लिमाउजेट उर्फ माऊ यांनी अनाहितावर धागा काढला आणि बाकी सर्वं अनाहिताना पिंगवले. ज्या ज्या अनाहिता पिंगा घालत घालत कट्ट्यात सामील झाल्या होत्या त्याची नावे पुढील प्रमाणे : सानिकास्वप्नील, सविता ००१, पद्मश्री चित्रे, दुर्गावी, मीच मधुरा, भावनाकल्लोळ, सूर, अजया, लिमाउजेट, दिपालीकिरण. तसेच आपापल्या आयांचे प्रतिनिधित्व करत तीन छोट्या अनाहिता पण या कट्ट्यात सामील झाल्या होत्या. मीच मधुरा यास कडुन स्विनी तर सूर यास कडुन आर्या व फक्त ४ महिनाच्या अनन्या यांनी या कट्ट्यात सामील होत सर्वांत लहान मिपाकर होण्याचा मान मिळवला. तर यांच्या बाललीलांनी कट्ट्याला अधिकच समृद्ध केले. तर कट्ट्याचा वृतांत पुढील प्रमाणे. . काही मुंबईकर व परदेशी वास्तव्यास असणाऱ्या आमच्या काही अनाहीतानी संगनमत करून रविवारचा दिवस कट्ट्यासाठी आखला. त्याप्रमाणे मजल दरमजल करत सर्वं अनाहिता पैकी सगळ्यात पहिली हजेरी अजया यांनी वेळेआधी लावली. पण त्यांनी या वेळेचा सदउपयोग स्वतःला एक छान साडी घेऊन केला आणि लवकर आल्याचा स्वतःलाच स्वतः भुर्दंड पाडून घेतला.हा खर्च त्या उशिरा आलेल्या अनाहिताकडून करून घेणार असल्याचा मानस त्यांनी कट्ट्या दरम्यान बोलून दाखवला हि पण नंतर रंगलेल्या गप्पानी त्यांना याचा विसर पाडला. (हे बाकी आमच्या बायकाचे बाकी बरे असते, गप्पा मध्ये महत्वाचे विसरूनच जातो, असो शेवटी फायदा बाकी अनाहिताचा झाला). मग फोनाफोनी करून सगळ्या नक्की आल्या आहेत न यांची खात्री करून घेण्यात आली. सगळ्याजणी १०-१५ मिनिटांच्या अंतराने इच्छित जागी पोहचल्या. a मग स्वाद मधल्या बेसमेंट मध्ये ठाण मांडण्यात आले. अस्मादिकाना मात्र वसई विरार परिवहन यांच्या रविवारच्या सुस्त सेवेपोटी इच्छित जागी पोहचण्यास १ तासाचा विलंब लागला. पण स्वाद मध्ये जाताच कोणीही खाद्य म्हणुन आपला फडशा पडू नये उशिरा आल्यामुळे म्हणुन दरवाजा उघडून आत शिरताच "समुद्रामध्ये मोती शोधणे सोपे पण हे हॉटेल शोधणे महाकठीण असा शेरा हास्य वदनाने देत शामिल झाले". (काय करणार सगळ्या भुकेलेल्या वाघिणी होत्या न आणि उशिरा आलेली मीच एक म्हणुन हा खटाटोप). पण सगळ्यानी हसत हसत मला अनुमोदन दिले आणि स्थापन्न होताच समोर रुचकर घरगुती जेवणाची चव असलेली स्वादची मर्यादित थाळी ठेवली गेली. a (आमच्यापेक्षा हॉटेल मालकालाच खुप घाई होती म्हणुन आमच्या अन्नपुरवठ्याकडे जास्त लक्ष दिले जात होते, काय करणार बाहेर माणसे ताटकळत उभी होती आणि आम्ही मात्र निवांत पणे गप्पा टप्पा मारत जेवण करत होतो). . तर असे जास्त वैचारिक देवाणघेवाण न करता मस्त पैकी एकमेकांची शाळा घेत जेवण उरकले. जेवणातर गुलाबजाम आणि बासुंदी वर यथेच्छ ताव देत मेजवानी फस्त केली. . तिथे उभ्या असलेल्या (मालक कि मेनेजर?) कोण जाणे याच्या चेहऱ्यावर बायांनो आता खण आणि नारळ हवे तर घेऊन येतो पण या दहा जागा खाली करा ग असे काहीसे भाव पाहुन आम्ही बाहेर पडलो. पण हॉटेल बाहेर येताच एकमेकीचे भ्रमण ध्वनी क्रमांक घेत पुढचा कट्टा हा हॉटेल मध्ये न करता एका अनाहितेच्या घरी करण्याचे ठरवुन एक छानसे समुहचित्र टिपले गेले. मग प्रत्येकजणीने टाटा बाय बाय म्हणत या कट्ट्याची सांगता केली. . या बरोबरच कट्ट्याचा वृतांत संपला, पुन्हा भेटुया नवीन कट्ट्याचा वृतांता सोबत. तो पर्यंत याच कट्ट्याच्या वृतांतावर समाधान माना. नमस्कार. छायाचित्रकार सानिकास्वप्नील/ अजया सोबत वार्ताहर भावनाकल्लोळ ठाणे येथुन.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
इतिहास
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
बातमी
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
24815 वाचन

💬 प्रतिसाद (139)

प्रतिक्रिया

एक शंका एखाद्या शिक्रणछाप

आनन्दिता
Sat, 12/28/2013 - 07:05 नवीन
एक शंका एखाद्या शिक्रणछाप धाग्यावर भारंभार प्रतिसाद देण्यासाठी वेळ खर्ची घालणं हा शहाणपणा की बिनडोकपणा?. -हळु घ्यालच हो ना?. :HAPPY:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हळु घ्यालच हो ना?

टवाळ कार्टा
Sat, 12/28/2013 - 07:44 नवीन
हळु घ्यालच हो ना?
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

आँ.?तुम्ही का लोळताय इथे....

आनन्दिता
Sat, 12/28/2013 - 09:21 नवीन
आँ.?तुम्ही का लोळताय इथे.... उठा पाहु... असं हसु नये...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आमच्या टीचभर प्रतिसादांना

बॅटमॅन
Sun, 12/29/2013 - 23:08 नवीन
आमच्या टीचभर प्रतिसादांना प्रत्युत्तर देण्यात वेळ घालवण्याचा तुमचा शहाणपणा पाहून डोळे पाणावले आहेत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

सोड ना राव... जाउ दे...

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 12/29/2013 - 23:21 नवीन
सोड ना राव... जाउ दे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मस्त मज्जा केली असेच जाणवत

विशाखा राऊत
Fri, 12/27/2013 - 00:54 नवीन
मस्त मज्जा केली असेच जाणवत आहे... धम्माल :)
  • Log in or register to post comments

वा!!

जुइ
Fri, 12/27/2013 - 01:00 नवीन
कट्टा छान झाला अगदी!!
  • Log in or register to post comments

पहिल्या वहिल्या यशस्वी

गणपा
Fri, 12/27/2013 - 01:58 नवीन
पहिल्या वहिल्या यशस्वी कट्ट्या बद्दल समस्त अनाहितांच अभिनंदन आणि कौतुक. उत्तरोत्तर असे कट्टे इतर शहर-गावांत/देशांतही व्हावोत यासाठी शुभेच्छा ! :)
  • Log in or register to post comments

खुप खुप हबिणन्दन ... फोटू

नित्य नुतन
Fri, 12/27/2013 - 12:31 नवीन
खुप खुप हबिणन्दन ... फोटू दिसत नाहीयेत मला ... नाहीतर जाम जळजळ झाली असती .. पुढल्या कट्ट्याला येण्याचा चंग बान्ध्णेत आला हाय
  • Log in or register to post comments

सानिका ताई जर का असा खाउ

युगन्धरा@मिसलपाव
Fri, 12/27/2013 - 12:36 नवीन
सानिका ताई जर का असा खाउ देणार असेल दर वेळि तर पुढचा कट्टा अज्जिबात चुकवणार नाही मी....
  • Log in or register to post comments

हेमे..

सविता००१
Fri, 12/27/2013 - 14:56 नवीन
अग, काहीही काय? लिहि बिंधास तू. प्यारे ने तुला अधिकृत वृत्तांतकार म्हणून पदवी देउन टाकली आहे. त्यामुळे आगे बढो!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

च्यायला हे म्हणजे मनोहर जोशीं

अभ्या..
Fri, 12/27/2013 - 15:07 नवीन
च्यायला हे म्हणजे मनोहर जोशीं साह्यबानी मनसेचा प्रवक्ता मुक्रर केल्यासारखे झाले. ;-) प्यारे ज़रा प्यारसे हं ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

तसं नै, दूध उतू जात होतंच.

प्यारे१
Fri, 12/27/2013 - 15:38 नवीन
तसं नै, दूध उतू जात होतंच. उगा तीन वेळा पाणी फिरवलं रे... ॐ केशवाय नम:, ॐ माधवाय नमः वगैरे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अनाहिता कट्टा म्हणजे शंभरी पाहिजेच!

अनन्न्या
Fri, 12/27/2013 - 16:05 नवीन
हा प्रतिसाद भावनाच्या उत्तम वृत्तांताला शंभरीच्या जवळ नेण्यासाठी!
  • Log in or register to post comments

अगं भावना ,तारे तोडले कोणी तर

अजया
Fri, 12/27/2013 - 16:44 नवीन
अगं भावना ,तारे तोडले कोणी तर इतकं नाय काय मनावर घ्यायचं,आपण अनाहितावर तोडलेल्या तार्यांची कलाक्रुती असा धागा काढु,अस्सल बायकी ;) वाटतं काही लोकांना की तारे फक्त त्यांनीच तोडायचे! ( शतकी धाग्याकडे आमचीही एक आहुती!)
  • Log in or register to post comments

छानच ग.

पद्मश्री चित्रे
Fri, 12/27/2013 - 17:19 नवीन
कट्टा तर छानच झाला आणि वृतान्त सुध्दा तितकाच खुसखुशीत.
  • Log in or register to post comments

हेमे वृत्तांत

सानिकास्वप्निल
Fri, 12/27/2013 - 18:17 नवीन
हेमे वृत्तांत आवडला बरं का सगळ्या अनाहितांना भेटून खूप छान वाटले व कट्ट्याला आलेली मजा एकदम झकास :) अनाहिताचे असेच कट्टे होत राहो अशी शुभेच्छा व्यक्त करते :) (धाग्याचे शतक पूर्ण होण्यास माझा ही हातभार)
  • Log in or register to post comments

एकदम मस्त वृत्तांत

michmadhura
Fri, 12/27/2013 - 18:52 नवीन
एकदम मस्त वृत्तांत हेमा, अगदि आपल्या कट्ट्यासारखा. मिसळपाव मेंबर्स याशिवाय दुसरी कोणतीही ओळख नव्हती आपली, पण असं वाटत होतं की किती वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखतो. खूप छान वाटलं !!
  • Log in or register to post comments

आणि हा १०० वा!!!

यशोधरा
Fri, 12/27/2013 - 18:53 नवीन
आणि हा १०० वा!!!
  • Log in or register to post comments

छान!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 12/27/2013 - 20:47 नवीन
छान! :)
  • Log in or register to post comments

मस्त वृत्तांत तै... खुसखुशीत.

पिशी अबोली
Fri, 12/27/2013 - 23:16 नवीन
मस्त वृत्तांत तै... खुसखुशीत... :)
  • Log in or register to post comments

मस्तच झालेला दिसतोय कट्टा हे

रेवती
Fri, 12/27/2013 - 23:39 नवीन
मस्तच झालेला दिसतोय कट्टा हे साधं वाक्य लिहून मी माझी जळजळ व्यक्त करते. भावनेनी सगळा कल्लोळ उडवून दिलेला आहे. अशीच मजा करत रहा असा आपला मी म्हातारी एका आशीर्वाद देते हां! ;)
  • Log in or register to post comments

मिपावरच्या अनाहिताच्या जाहीर

राजेश घासकडवी
Fri, 12/27/2013 - 23:42 नवीन
मिपावरच्या अनाहिताच्या जाहीर धाग्याची टिंगल करण्याचा मिपाकर पुरुष आयडींचा प्रयत्न पाहून मला एक मिपाकर म्हणून शरम वाटली. या पुरषी टारगटपणाबद्दल शिक्षा म्हणून अनाहिता असा शब्द असलेल्या एकाही धाग्यावर त्यांना प्रतिसाद न देता येण्याची सोय करावी.
  • Log in or register to post comments

या घासूगुर्जींना 'विदा' असा

बॅटमॅन
Sat, 12/28/2013 - 01:57 नवीन
या घासूगुर्जींना 'विदा' असा शब्द असलेल्या कुठल्याही धाग्यावर प्रतिसादबंदी करा रे आधी ;) (टार्गट पुरुष) बट्टमण्ण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हे पाहा बॅटमॅनभाऊ, उगाच विषय

राजेश घासकडवी
Sat, 12/28/2013 - 19:38 नवीन
हे पाहा बॅटमॅनभाऊ, उगाच विषय बदलू नका. तुम्ही मुळात गरज नसताना टीका करून प्रोव्होक केलंत. मग त्यांची प्रमाणाबाहेर प्रतिक्रिया येणारच.. आणि तुमची चूक झाली असं म्हणणारावरच बंदी आणा म्हणताहात. वा रे न्याय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

टीका? आम्ही? प्रत्यक्ष "कट्टा

बॅटमॅन
Sat, 12/28/2013 - 20:17 नवीन
टीका? आम्ही? प्रत्यक्ष "कट्टा" नव्हे तर "वृत्तांत" अंमळ ब्लँड झाला म्हटल्यावर ते समजून घेणे राहूदेच, खांद्यावर चिपांचे दुकानच असल्यागत प्रोव्होक होणे अन त्यावर अजून बोंबा ठोकणे हे कुणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे ते कळालेच आहे. असो. दॅट असाईड, तुमचे 'विदापाणी' बंद केले पाहिजे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मुळात हेतूच वाईट असला की

राजेश घासकडवी
Mon, 12/30/2013 - 00:49 नवीन
मुळात हेतूच वाईट असला की कट्ट्याची टीका न करता वृत्तांताची केली असं पोलिटिकली करेक्ट म्हणता येतं, आणि तरीही त्यातून ते वाईट हेतू दिसतातच ना? तुमचं स्त्रीद्वेष्टेपण, अनाहिताच्या समृद्धीबद्दलची जळजळ अशा साध्या वाटणाऱ्या विधानांतून कितीही झाकली तरी बिनबटणांच्या चड्डीतून खोचलेला शर्ट बाहेर यावा तशी बाहेर लोंबतेच. आणि मग दिसताना दिसतं काय तर या बिचाऱ्या फार न बोलणाऱ्या स्त्रियांनी तुमच्या पुरषी कट्ट्यांवर टीका केल्या. असं काही होऊ नये म्हणूनच मुळात अनाहिताचा स्वतंत्र विभाग बनवावा लागला. आणि त्या थोड्या मोकळ्या होऊन बाहेर यायला लागल्या आहेत तर पुन्हा अशी दगडं मारायची. अशा वागणुकीबद्दल बॅटमॅन यांना आठ दिवसांची बंदी होऊन ती दहा दिवस राबवली जाईल अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बेशिकमध्येच लोच्या

बॅटमॅन
Mon, 12/30/2013 - 01:12 नवीन
तुमचं स्त्रीद्वेष्टेपण, अनाहिताच्या समृद्धीबद्दलची जळजळ अशा साध्या वाटणाऱ्या विधानांतून कितीही झाकली तरी बिनबटणांच्या चड्डीतून खोचलेला शर्ट बाहेर यावा तशी बाहेर लोंबतेच.
बिन बटणाची चड्डी? मुळात चड्डी नामक प्रकाराला बटण असते का? इथे चड्डी नामक शब्दाचा हिंदी अर्थ घेतल्या गेला आहे. बाकी गुर्जींना
अशा वागणुकीबद्दल बॅटमॅन यांना आठ दिवसांची बंदी होऊन ती दहा दिवस राबवली जाईल अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
आपल्या आस्तिकतेची कबुली अशा पेचप्रसंगी द्यावी लागली हे रोचक आहे =)) बाकी आम्ही कशावरही टीका केली की स्त्रीद्वेष्टे अन पुरुषद्वेष्टे प्रतिसाद देणार्‍या/रे समतावादी हे समीकरण ठावकी असल्याने मूगं गिळन्ति सत्वरम् केल्या गेले आहेच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अरे वा

वेल्लाभट
Sat, 12/28/2013 - 08:56 नवीन
छान वर्णन, कल्पनाही छान कट्ट्याची. गुड !
  • Log in or register to post comments

हुम्म

इरसाल
Sat, 12/28/2013 - 10:19 नवीन
माझ्याकडुन एक Image removed. कट्ट्यात काय खाल्ले म्हणे तर डाल्भात लोनचा कोन नाय कोनचा ? ;)
  • Log in or register to post comments

छान व्रुत्तांत!

सुप्रिया
Sat, 12/28/2013 - 11:23 नवीन
मस्त मजा केलेली दिसतेय.
  • Log in or register to post comments

मस्तं.

साती
Sat, 12/28/2013 - 19:14 नवीन
मजा केलीत मुलींनो. पुढच्या कट्ट्याची जागा एखादी निवांत बघून ठेवा. थाली रेस्टॉरंटात मागे लोक वेटिंग आहेत म्हटल्यावर मानेवर खडा ठेवल्यासारखं वाटतं.
  • Log in or register to post comments

पुण्यात सुद्धा झाला आज एक

यशोधरा
Sat, 12/28/2013 - 19:38 नवीन
पुण्यात सुद्धा झाला आज एक कट्टा! :) खूप मजा आली! गप्पा, खादाडी, अजून गप्पा! :)
  • Log in or register to post comments

फोटू?

साती
Sat, 12/28/2013 - 19:41 नवीन
वृत्तांत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हा काय दिलाय वर!

यशोधरा
Sat, 12/28/2013 - 19:48 नवीन
हा काय दिलाय वर! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

यशो … वृतांत टाक लवकर.

भावना कल्लोळ
Sat, 12/28/2013 - 19:51 नवीन
यशो … वृतांत टाक लवकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मजा आली वाचून. बहारदार

कवितानागेश
Sun, 12/29/2013 - 07:44 नवीन
मजा आली वाचून. बहारदार वृत्तांत! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

एकोळी धागावृत्तांत आडौला.

प्यारे१
Sun, 12/29/2013 - 13:10 नवीन
एकोळी धागावृत्तांत आडौला. अत्यंत सूक्ष्म निरीक्षणानं लेखिकेनं सारा अवकाश तिसर्‍या वाक्यात समाविष्ट करुन घेतला आहे. पहिल्या वाक्यात एक गेयता दिसून येते. गेयता आहेच त्याबरोबर वाक्याचा शेवट सुद्धा जीभेवर एक वेगळाच संवादाघात करुन जातो. नंतर आलेलं उद्गारवाचक चिन्ह म्हणजे कट्ट्याच्या यशस्वीतेबद्दल वाटलेला अचंबा च जणू. दुसर वाक्य कट्ट्याचं ठिकाण, खाद्य पदार्थ नि आजूबाजूच्या खुर्च्यांवर असलेली स्थळं ह्याबाबत प्रकाश टाकून 'मजा' ह्या शब्दाद्वारे आपलं समाधान व्यकत करते. दोन गूढगर्भी स्मायल्या आपलं वेगळं अस्तित्व निश्चितच दाखवून देतात. म्हणायचं खूप आहे खरं पण दाखवत नाहीत. थोडा गडबडीत असल्यानं सध्या एवढंच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वृत्तांत

तिमा
Sun, 12/29/2013 - 17:44 नवीन
कट्ट्याचा वृत्तांत वाचून आनंद झाला आणि प्रतिक्रिया वाचून करमणुक जाहली.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा