Skip to main content

श्री -भाग 2

लेखक मीता
गुरुवार, 19/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आई रागावली कि रूम मध्ये जाऊन दार लावून बेड वर अंग टाकून द्यायचं आणि आपल्याचं डोक्यावर थापटत बसायचं ..मीता च नेहेमीचच होत हे .. अशीच एकदा रूम मध्ये असताना फोन वाजला . श्री चा तिला आलेला पहिला फोन . श्री - नमस्कार .मी श्री बोलतोय .मीता आहे का ? मीता - हो बोलतेय . श्री - मी तुम्ही काढलेलं चित्रं पाहिलं ओर्कुट वर आणि मला ते आवडलं .तुमचा फोन नंबर मिळाला समीर कडून . ते चित्र विकत घ्यायची माझी इच्छा आहे . मीता- तुम्हाला चित्र आवडलं त्याबद्दल Thanks .पण मला चित्र विकायचं नाहीये . असं म्हणून मीतानी फोन ठेवून दिला . "काय कटकट आहे ..सुखानी रडू पण देत नाही " मीता स्वतः: शी बोलली. आणि चित्र होतंच कुठे .ते कधीच फाडून टाकलं होतं. श्री ची ओर्कुट ची request तिनी स्वीकारली होती. हळूहळू त्यांचं chatting सुरु झालं आणि फोन पण. मीता ला श्री बरोबर बोलणं आवडायला लागलं . मीता रहायची ते शहर काही फार मोठं नव्हतं . त्यात श्री च्या आणि तिच्या घराची नावं मोठी होती .श्री बडे बाप का बडा बेटा ही तिची समजूत मात्र पक्की होती . एक दिवस असाच chatting करताना श्री नि विचारलं तिला . "तू चित्र का नाही विकला मला? " तुला द्यायला ते चित्र माझ्याजवळ तरी कुठे आहे आता . " "का ?" "राग आला होता तेव्हा फाडून टाकलं ." श्री काही बोलला नाही बराच वेळ तेव्हा तिलाच वाईट वाटलं. आणि आश्चर्यही वाटलंच.. It was just a drawing . तिला वाईट वाटलं होतं कारण ते तिनी काढलेलं होता.पण श्री ला कशासाठी वाईट वाटतंय . एक दिवस असाच बोलता बोलता श्री नी तिला त्याच्याबद्दल सांगितलं .त्याचा accident . आलेलं अपंगत्व .. त्यामुळे त्याची कधीच पूर्ण न होऊ शकलेली स्वप्न. तरीही जिद्दीनी तो जे काम करत होता त्याबद्दल .. खूप खूप बोलला श्री. आणि मग तो बोलला तिच्याबद्दल जे खूप महत्वाच होत तिच्यासाठी . "मीता ,मला माहितीये तू कुठल्या phase मधून जात आहेस ते . मी पण या सगळ्या phase मधून गेलो आहे. आपला कोणी नाही ..कोणी आईकून घेत नाही हे सगळा वाटत या वयात .पण स्वतःला असं कोंडून घेऊन ,लोकांशी बोलण टाळून प्रश्न सुटत नाही .ते अजून वाढत जातात. तू बोलत नाहीस जास्त ,हसत नाहीस ,कायम त्रासलेली ,चिडलेली असतेस. हे सगळा करून तुला स्वतःला त्रास होतो ना.. तुला असं बघून तुझ्या आई वडिलांना चांगलं वाटत असेल का ? " "ते माझ्याबद्दल कधी विचार करतात ?" "त्यांनी काय करायचा ते तू नको ठरवूस मीतू .तू त्यांच्याबरोबर मनमोकळ बोल . तुला फरक जाणवेल .का नाही बोलत तू ?" "आई आताच बरी झाली आहे Schizophrenia मधून .. मी तिला नाही त्रास देऊ शकत. बाबाना वेळ नसतो .मी कोणाबरोबर बोलू?" मीतू रडवेली झाली होती . "मला सांगशील?" मीतू ला ते नको होत..इतकी वर्ष कोणाला न सांगितलेलं आताच मित्र झालेल्या मुलाला कस सांगायचं . मीतू चे आजोबा राजकारणात असल्याने घरातलं,मनातलं काही बाहेर बोलायचं नाही हे लहानपणापासून मनावर बिंबवल गेलं होतं . मीतू काही बोलत नाही पाहून श्रीचं म्हणाला .."आता नको ..तुला जेव्हा वाटेल तेव्हा सांग .मी आहे नेहेमीचं " क्रमश:
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2192
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

अररारारा फिर हेराफेरी. काय चाललेय ते शेवटपर्यंत न कळु द्यायचा डाव आहे का? म्या तर पास :-(

पहिला भाग परत वाचायला हवा .. त्यात मितुच्या चित्रकलेचा आणि तिच्या आईच्या आजाराचा काही उल्लेख आहे का हे तपासण्यासाठी .. :(