श्री - भाग १

मीता's picture
मीता in जनातलं, मनातलं
8 Dec 2013 - 2:06 am

"श्री आपण नाही भेटू शकत आता कधीच"

"पण का ? मला बोलायचं आहे खूप तुझ्याशी."

"तुझ्या बायकोशी खोटं बोलून येणार आहेस न तू ..मला तेच नकोय.तिला खूप वाईट वाटेल रे. आपण नाही भेटायचं कधीच ..जे काही सुंदर क्षण होते ते तसेच ठेवू या.काय झालं,कसं झालं हे सगळ्या प्रश्नांना आता काही उत्तर नाही . तू सुखात आहेस ,माझ्यासाठी तेच खूप आहे . "

"मीतू तुला एक सांगू ? "

"सांग ना."

"तू तशीच आहे माझ्यासाठी जशी भेटली होतीस पहिल्यांदा .काहीच नाही बदललं. सोडून गेलीस तेव्हा खूप राग आला तुझा. खुप तिरस्कार केला .पण तुझ्या वर प्रेम करणं नाही थांबवू शकलो."

"आपण या विषयावर नको बोलूया आता ."

"मीतू नीट राहशील ना ? मी तुला सांगितलेलं विसरू नकोस .तुझी काळजी घे आणि कधीहि बोलावसं वाटल तर मी आहे ."

श्री .. माझा सर्वस्व होता. आहे अजूनही..नेहेमीच कमी लेखलेल्या मुलीसाठी तो खूप काही होता ..कारण तो एकटाच तिचा होता .

आई च्या दृष्टीनी मी तिचं राग काढायचे हक्काची जागा होते .बाबांच्या दृष्टीनी मी चार चौघात नेण्यासारखी नव्हते कधीच ..सगळ्याच गोष्टीत सुमार असणाऱ्या पोरीला चार चौघात न्यायची त्यांना लाजच वाटायची..सगळ्या गोष्टींची उणीव माझी धाकटी बहिण भरून काढायची ..आणि मग मी माझ्याच कुटुंबात उपरी व्हायचे. खूप कणखर झाले होते हळू हळू. आई रागावली कि डोळ्यातलं पाणी दिसू न देत हसायला शिकले .. निर्लज्ज झाले ..एकटी होतेच पण ते प्रत्येक वेळेला जाणवायला लागलं होतं.

अचानक तू आलास .आणि सगळं काही बदललं ..
(क्रमशः...)

कथालेख

प्रतिक्रिया

पैसा's picture

8 Dec 2013 - 12:28 pm | पैसा

कथा अर्धी राहिली आहे का?

प्यारे१'s picture

8 Dec 2013 - 12:54 pm | प्यारे१

क्ल्जी घेने

सस्नेह's picture

9 Dec 2013 - 4:37 pm | सस्नेह

'त्यां;ची की आमची ?

प्रभाकर पेठकर's picture

8 Dec 2013 - 12:57 pm | प्रभाकर पेठकर

कथेतील (ही कथा आहे असे गृहीत धरल्यास) अनेक टोके (मुद्दे) मोकळेच सोडून दिल्यासारखे वाटून एक वाचक म्हणून वाचनाचा आनंद मिळत नाही.

आई च्या दृष्टीनी मी तिचं राग काढायचे हक्काची जागा होते .बाबांच्या दृष्टीनी मी चार चौघात नेण्यासारखी नव्हते कधीच ..सगळ्याच गोष्टीत सुमार असणाऱ्या पोरीला चार चौघात न्यायची त्यांना लाजच वाटायची.

एक तर हे पटत नाही. आई-वडिलांना आपल्या मुलांची 'लाज' वाटत नाही. इथे अजून बर्‍याच स्पष्टीकरणाची गरज आहे.

"तुझ्या बायकोशी खोटं बोलून येणार आहेस न तू ..मला तेच नकोय.तिला खूप वाईट वाटेल रे. आपण नाही भेटायचं कधीच ..जे काही सुंदर क्षण होते ते तसेच ठेवू या.काय झालं,कसं झालं हे सगळ्या प्रश्नांना आता काही उत्तर नाही . तू सुखात आहेस ,माझ्यासाठी तेच खूप आहे."

एवढा समतोल विचार करू शकणारी मुलगी, आई-वडीलांना 'लाज' वाटावी अशी आहे हा विरोधाभास पचायला कठीण आहे.

खूप कणखर झाले होते हळू हळू. आई रागावली कि डोळ्यातलं पाणी दिसू न देत हसायला शिकले .. निर्लज्ज झाले ..

अचानक तू आलास .आणि सगळं काही बदललं ..

सगळं बदललं म्हणजे काय? कणखर मनाची मुलगी मनाने दुर्बल झाली? की डोळ्यातील पाणी दिसू न देता हसायला शिकलेली मुलगी वरचेवर बारीकसारिक घटनांनी अश्रू ढाळू लागली? नक्की काय झालं? तपशिलाची गरज आहे.

एखाद्या लहान खोलीत जरा दोन-चार पाऊले चालल्यावर लगेच समोर भिंत यावी अशी भावना झाली.

ह्या सर्व त्रूटींमुळे, वरती पैसा ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे कथा अर्धवट राहिल्यासारखी वाटते आहे.

मीता's picture

10 Dec 2013 - 10:13 am | मीता

आई वडिलांना मुलांची लाज वाटते हे मी अनुभवलंय . जेव्हा दोन मुलां पैकी एक जण उजवा असेल तेव्हा तर जास्तचं.समतोल विचार वगैरे फक्त म्हणायला असतं काका .. माणूस कसा आहे हे त्याच्या दिसण्यापेक्षा तो समजून घेतला तर .. पण हे खूप कमी लोकांना कळत . श्री नी मीतू ला समजून घेतलं आणि मीतू बदलली .. social झाली .आपल्यासाठी कोणी आहे ..आपला कोणीतरी विचार करतंय ही भावना खूप महत्वाची असते .श्री साठी कदाचित तेच सगळं असेल म्हणून दोघांची मन जुळली ..

प्रभाकर पेठकर's picture

10 Dec 2013 - 10:42 am | प्रभाकर पेठकर

दोन मुलांमध्ये डावं-उजवं हे असतंच. लहानपणी आपल्याला वेगळी वागणूक मिळते आहे, डावललं जातय, आपण आई-वडिलांना नकोसे आहोत वगैरे भावना मनांत येतातच. पण त्या त्या कच्च्या वयाच्या मानसिक अवस्था असतात. त्या कायमस्वरुपी टिकत नाहीत. त्यांना थारा द्यायचाच नसतो. वैचारिक परिपक्वतेबरोबर त्या मागे पडतात, पडल्या पाहिजेत.

समतोल विचार हे बोलण्यावागण्यातून परावर्तीत होत असतात. आई-वडीलांना मुलाचं/मुलीचं अंतरंग कळून येतं. आई-वडीलांची मतं बदलतात. कथानायिकेच्या बाबतीत ती बदलली नसतील तर आई-वडिलच परिपक्व नाहीत असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. असो. कथेच्या अनुषंगाने लिहीले आहे. वैयक्तिक घेऊ नये, ही विनंती.

श्री आणि मितू जर समजून उमजून एकत्र आले असतील, एक्मेकांच्या प्रेमात असतील (असं मी गृहीत धरतो आहे) तर माशी शिंकली कुठे?

म्हणून म्हंटले आहे कथा फार त्रोटक वाटते आहे. अनेक मुद्दे स्पष्टीकरणाअभावी लोंबकळत पडले आहेत. विषय नीट हाताळला नाही असे म्हणावेसे वाटते. कथेच्या सुरुवातीला 'श्री - भाग पहिला' असे किंवा शेवटी 'क्रमश:' लिहीले असते तर कांही मुद्द्यांचे स्पष्टीकरण त्यातून होईल अशी आशा बाळगून प्रतिसादातून मतप्रदर्शन केले नसते. असो.

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.

विटेकर's picture

8 Dec 2013 - 1:00 pm | विटेकर

पूर्वीवचल्यसार्ल्खे वतत्य

मीता's picture

8 Dec 2013 - 3:37 pm | मीता

भाग २ टाकते लवकरच

प्रभाकर पेठकर's picture

9 Dec 2013 - 4:55 pm | प्रभाकर पेठकर

भाग दुसरा आहे?

मग ह्या कथेला 'श्री - भाग पहिला' असे नांव किंवा कथेच्या शेवटी 'क्रमशः' असे का टाकले नाही? ही वाचकांची दिशाभूल आहे.

ह्या कथेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे किंवा व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचे निरसन न करता कथेच्या पुढच्या भागाकडे वळणे, पर्यायाने आपल्याच वाचकवर्गास फाट्यावर मारणे कितपत समर्थनिय आहे?

मीता's picture

10 Dec 2013 - 9:26 am | मीता

"ह्या कथेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे किंवा व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचे निरसन न करता कथेच्या पुढच्या भागाकडे वळणे, पर्यायाने आपल्याच वाचकवर्गास फाट्यावर मारणे कितपत समर्थनिय आहे? "

असा काही हेतू नव्हता .कथा लिहायला वेळ लागला म्हणून उशीर लागतोय .मला असा वाटलं कि प्रश्नांची उत्तरे दुसर्या भागात मिळतील म्हणून त्याचे निरसन केले नाही .भाग २ असा टाकायचा राहिला त्याबद्दल माफी असावी . पुढच्या वेळे पासून काळजी घेईल .

प्रभाकर पेठकर's picture

10 Dec 2013 - 10:51 am | प्रभाकर पेठकर

>>>असा काही हेतू नव्हता .....मला असा वाटलं कि प्रश्नांची उत्तरे दुसर्या भागात मिळतील म्हणून त्याचे निरसन केले नाही.<<<

असो. निदान प्रतिक्रियांची पोच देणं आणि पुढच्या भागात सर्व उत्तरे मिळतील असा 'निरोप' देणं आवश्यक असतं.

>>>भाग २ असा टाकायचा राहिला त्याबद्दल माफी असावी . पुढच्या वेळे पासून काळजी घेईल.<<<

माफी वगैरे मागायची गरज नाही. तुम्ही मिपावर नव्याने लिखाण करता आहात म्हणून कथा लिखाणातील कांही 'मूलभूत आवश्यकतांचा' उल्लेख केला आहे. राग मानू नये.

मीता's picture

10 Dec 2013 - 10:58 am | मीता

तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.

प्रभाकर पेठकर's picture

10 Dec 2013 - 11:39 am | प्रभाकर पेठकर

>>>>तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.<<<<

हे विधान तिरकस नाही हे गृहीत धरून...... मिपावर सर्वतर्‍हेचं मार्गदर्शन मिळतं.

मीता's picture

10 Dec 2013 - 1:01 pm | मीता

खरच गैरसमज नसावा. लिखाणाला वाचक मिळावा आणि त्यांचा लेखकाला समृध्द करेल असा प्रतिसाद मिळावा हे भाग्य .. (हा प्रतिसाद तिरकस घेऊ नये हि विनंती ..मनापासून लिहिलंय )

गणपा's picture

10 Dec 2013 - 1:17 pm | गणपा

शीर्षकात बदल आणि लेखाच्या शेवटी क्रमशः टाकले आहे.

मीता's picture

10 Dec 2013 - 1:17 pm | मीता

धन्यवाद

विटेकर's picture

10 Dec 2013 - 4:34 pm | विटेकर

गण पा भौ , तुम्ही पण संपादक हाय काय ? मैतीच नव्हतं
आता आपले राजनैतिक संबंध वाढवायला पायजेत ..
आपण तुपण दोस्त बरं का..

प्रभाकर पेठकर's picture

10 Dec 2013 - 1:33 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद. दोन्ही बदल स्वागतार्ह आहेत आणि नोंद घेतली आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2013 - 3:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुस-या भागाच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

9 Dec 2013 - 4:38 pm | सस्नेह

म्हंजे पहिला भाग कळ्ळा तुम्हाला ?

प्यारे१'s picture

9 Dec 2013 - 4:59 pm | प्यारे१

तै असं करु नका.
नव्या लेखक लेखिकांना प्रोत्साहन वगैरे द्या.

भावना कल्लोळ's picture

9 Dec 2013 - 5:09 pm | भावना कल्लोळ

प्यारे भौ,प्रोत्साहन देणे म्हंजी तुम्हासनी एक ग्लास कॉम्प्लैन देण्याइतक सोपे वाटलं कि काय?

प्यारे१'s picture

10 Dec 2013 - 1:36 pm | प्यारे१

आता मी काय केलं?
उगाच टर उड वू नका असंच म्ह्टलंय ना?

श्री. मीताभाऊ लिहा हो तुम्ही.

प्यारेकाकी असच प्रोत्साहन आम्हाला दिल असतात तर आज आम्हीसुध्दा छान छान लिहल असते. :-(
जाऊ दे आता. ;-)

प्यारे१'s picture

10 Dec 2013 - 3:13 pm | प्यारे१

अब्या डब्या,
तुला पण घे दोन किलो प्रोस्ताहन. ;)

अभ्या..'s picture

10 Dec 2013 - 3:25 pm | अभ्या..

थान्क्यू.
.
तुमची सही लैच्च सही.
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात ब्रू पियात. :-D

मीता's picture

10 Dec 2013 - 3:33 pm | मीता

धन्यवाद प्यारे काकी

सस्नेह's picture

10 Dec 2013 - 4:16 pm | सस्नेह

कथा समजली नाही या सत्याला 'टर' असे हिणवल्याबद्दल श्री प्यारे काकी यांचा त्रिवार णिषेध णिषेध णिषेध !

प्यारे१'s picture

10 Dec 2013 - 4:36 pm | प्यारे१

खुलासा : मीता ह्यांनी मागे चिमण्यांच्या फोटो वेळी स्त्री आयडीने धागा टंकला म्हणून प्रतिसाद मिळाले वगैरे छापून स्वतःबद्दल असंशय व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने इथे त्यांना श्री. मीताभाऊ म्हणून म्हटले आहे. त्यांनाच जर खात्री नाही तर इतर वाचकांना कशी असेल बरे? ;)
बाकी स्नेहांकिता तैने म्हटल्याप्रमाणे लिखाण समजलेलं असलंच पाहिजे असा काही नियम नाही.
तसेच प्रा. डॉ. सरांचे धोरण नेहमीच मध्यम मार्गी असल्याने त्यांनी पुढचा भाग टाका असं म्हणून प्रोत्साहन दिलं. 'तशेच' ह्या भागात न समजलेले कथेचे पैलू पुढील भागात समजतील अशा अपेक्षेने पुढचा भाग टाका असं म्हटलं. तुम्ही आमचं म्हणणं न समजून घेता जो त्रिवार निषेध केला आहे त्यापैकी दोन निषेधांना योग्य जागा दाखवण्यात येत आहे. एक ठेवा.
-प्यारेकाका.

भावना कल्लोळ's picture

9 Dec 2013 - 4:51 pm | भावना कल्लोळ

प्रथम मिपावर स्वागत. लेख काल्पनिक कि सत्यवादी हे तुम्हालाच चांगले ठाऊक. कथा असेल तर शब्द अपुरे पडले, कथा अर्धवट वाटते, जाणकार आपले मत देतीलच. एक व्यक्ती म्हणुन आपण जगताना आयुष्याचे निरनिराळे पैलु घेऊन जगत असतो. सगळेच पैलु लोकासमोर येतात असे नाही. सगळ्याच भावना लोकांना माहित असतात असे नाही. शेवटी जग हे आता पर्यंत पाहिलेल्या, जगलेल्या दृष्टिकोनातून समोरच्याला पाहत असतो. मला तरी तुमचा हा लेख कळला म्हणण्यापेक्षा भिडला. प्रत्येक गोष्ट प्रक्टीकॅलि नाही घेता येत. त्या कळायला कदाचित त्या रस्त्यावरून चालावेच लागते.

मीता's picture

10 Dec 2013 - 9:27 am | मीता

धन्यवाद

अनिरुद्ध प's picture

9 Dec 2013 - 5:05 pm | अनिरुद्ध प

सुरुवातिला जी मराठी च्या एका मालिकेच्या जाहिरातितील संवाद लिहीले आहेत असे वाटले,असो पुलेशु

दिपक.कुवेत's picture

9 Dec 2013 - 6:34 pm | दिपक.कुवेत

कथा काळजाला भीडली......लवकर दुसरा भाग टाका

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Dec 2013 - 6:45 pm | राजेंद्र मेहेंदळे

"ही" वाली स्मायली कशी टायपतात हो?

दिपक.कुवेत's picture

9 Dec 2013 - 7:55 pm | दिपक.कुवेत

प्रतिसादाच्या खाली Textual Smileys म्हणून option आहे त्यातनं हवी ती घ्या

रेखा जोशी's picture

9 Dec 2013 - 7:32 pm | रेखा जोशी

लवकर पुढचा भाग टाका.............पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत