भारताच्या सर्वोच्चपदी विराजमान असणार्या महात्यागी, महासाध्वी, महाज्ञानी महाराज्ञी सोनियाजी गांधी ह्या इंग्लंडच्या राणी एलिझाबेथपेक्षाही श्रीमंत असल्याचा निष्कर्ष एका पहाणीत काढला गेला आहे. चला! ह्या निमित्ताने इंग्लंडचे नाक कापले (इटलीकडून उसनवारी करून का होईना!)
https://www.loksatta.com/desh-videsh-news/huffpost-report-says-sonia-ga…
साधी रहाणी आणि उच्च विचारसारणीचा दिव्य संदेश देणार्या थोरल्या राणीसाहेबांच्या अल्प संपत्तीची अंदाजे किंमत दोन अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे.
देशाकरता इतका त्याग करुनही स्वतःची इतकी भरभराट करु शकणार्या ह्या देवतासमान विभूतीला आपण आपल्या देशाचा लगाम पुन्हा एकदा दिला तर ती देशाचीही अशीच भरभराट करेल ह्याविषयी मला तरी शंका नाही.
वाचने
13165
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
ड्वाले खाडकरून उघडले
कसं काय सापडतं बुवा तुम्हाला असं ? आमाला तर बुवा अच्यर्य वाटुन ऱ्हायले. ड्वाले खाडकरून उघडले पघा !
अजून बी उघड्ल्येल्येच हायेत,मिटायला तयारच न्हाईत.
साधी रहाणी...!!!
साधी रहाणी आणि उच्च विचारसारणी... आणि उच्च बँक balance....
उत्पन्नाचे स्रोत काय आहेत
भारत असावा काय?
In reply to उत्पन्नाचे स्रोत काय आहेत by अधिराज
भारत असावा काय?
कशी काय बर?
ना व्यवसाय; ना उद्योग; ना प्रशासकीय पद. तरीही एवढी कमी कशी काय बर?
हे हिमनगाचे टोक असू शकते.
हे हिमनगाचे टोक असू शकते.
गडबड आहे...
सोनीयाजींची संपत्ती किती आहे आणि त्यांनी ती कशी मिळवली, या संदर्भात माझा प्रतिसाद बघू नये... पण काहीतरी गडबड आहे या बातमीत...
हफिंग्टन पोस्टच्या मूळ बातमीत सोनीया गांधींचा उल्लेख किमान मला तरी दिसला नाही. पण भारतातील सर्वच माध्यमात ही बातमी हफिंग्टन पोस्टचा उल्लेख करून झळकलेली दिसत आहे. याचा अर्थ हफिंग्टन पोस्टने ती बातमी नंतर बदललेली असावी असे दिसते. आता ती बदलायचे कारण त्यांच्या मूळ बातमीत चूक/खोडसाळपणा होता हे आहे की त्यांच्यावर दबाव आणला गेला आहे, हे सत्य कधी बाहेर येईल असे वाटत नाही. :(
Editor's Note: Sonia Gandhi
In reply to गडबड आहे... by विकास
Editor's Note: Sonia Gandhi and the former emir of Qatar Hamid bin Khalifa al-Thani has been removed from this list. Gandhi was originally included based on a listing on a third party site which was subsequently called into question. Our editors have been unable to verify the amount, removed the link, and regret any confusion. Sheikh bin Khalifi was succeeded by his son Tamim in 2013.सिब्बल ने फोन मारला असेल लगेच !
ती वेबसाईट...
In reply to Editor's Note: Sonia Gandhi by विद्युत् बालक
ती वेबसाईट ही आहे: https://www.celebritynetworth.com/richest-politicians/sonia-gandhi-net-…
छ्या! हा धागा वाचून असे गर्वाने भरून आले होते म्हणून सांगतो... पण हफिंग्टनपोस्टने यकदम भ्रमनिरास केला! ;) मलातर वाटते आहे की ही भारताला कमी लेखण्याची कॉन्स्पिरसी असावी... जाउंदेत... डालर आणि पाउंडात श्रीमंत इतरत्र असतीलही, पण काय करायचे आहे असले कागदी श्रीमंत घेऊन? मनाची श्रीमंती फक्त आमच्याच बाईसाहेबांकडे आहे...त्याची सर कुण्णाकुण्णाला येण्णार नाह्ही! म्हणूनच तर अन्नसुरक्षा बिलाच्या नावाने (स्वतःचे नाहीतरी जनतेचे) पैसे मुक्तहस्ताने उधळू शकल्या! ;)
.त्याची सर कुण्णाकुण्णाला
In reply to ती वेबसाईट... by विकास
.त्याची सर कुण्णाकुण्णाला येण्णार नाह्ही! म्हणूनच तर अन्नसुरक्षा बिलाच्या नावाने (स्वतःचे नाहीतरी जनतेचे) पैसे मुक्तहस्ताने उधळू शकल्या!
हॅहॅहॅ... बाई मोठ्या मनाच्या हायेत बघा ! पैका जनतेचा असला तरी काय झाल ? इधळायला देखील मोठ मन आणि काय म्हणतात ते हं अंतरात्मा की आवाज वगरै सुद्धा ऐकु यावा लागतो. ;)
गरिबांसाठी जनतेचे का असेना
In reply to .त्याची सर कुण्णाकुण्णाला by मदनबाण
गरिबांसाठी जनतेचे का असेना पैसे खर्च केले तर सुरु झाली पोट दुखी.
आधळं दळतय कुत्र पिठ खातय...
In reply to गरिबांसाठी जनतेचे का असेना by सचीन
आधळं दळतय कुत्र पिठ खातय... पन आंधल्याले कुटे समजतय ! सगला जल्ला येड्याचा बाजार चित्र उपलब्ध नाही
आधळं दळतय कुत्र पिठ खातय...
In reply to गरिबांसाठी जनतेचे का असेना by सचीन
आधळं दळतय कुत्र पिठ खातय... पन आंधल्याले कुटे समजतय ! सगला जल्ला येड्याचा बाजार चित्र उपलब्ध नाही
हेच म्हणतो !
हेच म्हणतो !
निवडणूक आयोग आणि प्राप्तीकर विभाग काय बुच मारून बसलेत कि काय? चायला आम्हाला मात्र पेनल्टी आणि ह्यांना मात्र कल्टी ?
जय हो सोनियाजी !
अवांतर : "जाणत्या " राजाचे काय मत आहे ह्याबद्दल?
हि बातमी जर खरी असेल तर
In reply to हेच म्हणतो ! by विद्युत् बालक
हि बातमी जर खरी असेल तर विरोधी पक्ष का गप्प बसलाय? गप्प बसले कारण त्यांना माहित आहे बातमी खोटी आहे. जर बातमी खरी आहे ह्याची खात्री असूनही ते गप्प बसलेत तर मात्र ते विरोधी पक्षातच बसण्याच्या योग्यतेचे आहेत
हे हे
In reply to हि बातमी जर खरी असेल तर by सचीन
सच्ची...................न सच्ची................न !!!(मी सध्या वान्खेडेवर उभारलोय !)
खुलासा झाला आहेच...
बातमी खोटी असल्याचा खुलासा झाला आहेच , पण तरिही सोनीया गांधींकडे खच्चुन पैसा असल्यास आश्चर्य वाटायला नको. नेहरु घराणं पिढीजात श्रीमंत आहे...त्यातला काहि वाटा सुनबाईंच्या नावे आला असेलच... आणि अर्थतज्ञांची फौज असेल दिमतीला तर पैसा मल्टीप्लाय होणं काहि अवघड नाहि.
हात तेरे की!
In reply to खुलासा झाला आहेच... by अर्धवटराव
तवा चांगला तापला होता. मंडळी कणकेचे गोळे लाटतच होते. आणि तुम्ही तव्यावर थंड पाणी ओतलेत :(
अगदी
In reply to खुलासा झाला आहेच... by अर्धवटराव
अगदी अगदी... त्यासाठी अर्थतज्ञांची फौज कशाला हवीय हो? इंदीरा विकास पत्र आणि नॅशनल सेव्हिंग सर्तीफिकेट्स मधे, पैसे ठेवले असतील दर पाच/सहा वर्षांनी दुप्पट! ;)
खोटा प्रचार करण्यासाठी फेकू
खोटा प्रचार करण्यासाठी फेकू आता परदेशी वृत्तपत्रांनाही पैसा द्यायला लागला आहे हेच यातून सिद्ध होते.
हे म्हणजे
In reply to खोटा प्रचार करण्यासाठी फेकू by ग्रेटथिन्कर
हे म्हणजे अगदी सुब्रम्हण्यम स्वामींच्या कॉन्स्पिरसी थिअरीजसारखेच झाले हे वरचे प्रतिसाद पाहीले तर लक्षात येईल... :)
कशावरून?
In reply to खोटा प्रचार करण्यासाठी फेकू by ग्रेटथिन्कर
ंअसेही शक्य आहे की महाराणीजीनी आपले अफाट धन वापरुन मूळ बातमी खोटी असल्याची ष्टोरी बनवली आणि ती यशस्वीरित्या सगळ्यांच्या गळी उतरवली. लगेच आपल्या लाडक्या पक्ष वा नेत्यावर आगपाखड करायची गरज नाही.
हुप्प्याजी तुसी ग्रेट हो!
In reply to कशावरून? by हुप्प्या
हुप्प्याजी तुसी ग्रेट हो!
अरे ...
अरे बाबांनो, तुमचा पगार काय ... तुम्ही बोलता काय ... =))
.
छान
मायनेता
मायनेता.इन्फो वर सर्वांची निवडणू़क आयोगास दिलेली माहिती आहे.
ती खरी धरल्यास, २००४ साली सोनीयाजींकडे साधारण ८५ लाख रूपये होते जे २००९ मधे १.३ कोटी झाले तर राहूल गांधींकडे अनुक्रमे त्याच काळात आधी ४५ लाख होते ते २.९ कोटी झाले!
१.३ कोटी फक्त? म्हणजे
In reply to मायनेता by विकास
१.३ कोटी फक्त? म्हणजे दादरमध्ये फ्लॅट असणारे लोक सोनिया गांधींपेक्षा श्रीमंत आहेत तर! ऐकावं ते नवलच.
हिमनगाचे टोक
In reply to मायनेता by विकास
हे सगळे आकडे हे म्हणजे ज्या मालमत्तेच्या मालकीचा इन्कार करणे अशक्य आहे त्याची मोजदाद. मला खात्री आहे की कुठल्याही वरच्या नेत्याकडे ह्यापेक्षा कितीतरी जास्त जिचा मागमूस लागू शकणार नाही अशी संपत्ती आहे. किंबहुना अशा मार्गाने मिळवलेली संपत्ती कुणाला सुगावा लागू न देता योग्य स्थळी ठेवणे हे एक अत्यंत प्रगत शास्त्र आहे आणि आपले तमाम वरिष्ठ राजकारणी त्यात पारंगत आहेत.
गेल्या ६० वर्षात
गेल्या ६० वर्षात पाठ्यपुस्तकातील एक वाक्य बदलले नाही की, भारत हा विकसनशील देश आहे ... पण याच भारतात राहून यांची संपत्ती खरबोंनी वाढली ... हे कसे काय हो ...
---- confused भारतीय
.
In reply to गेल्या ६० वर्षात by नित्य नुतन
शेवटी काय हो, आपण एका 'मता'चे धनी, संपत्तीचा मालक निराळाच !!!
:)
खी खी खी ... फारच ब्बा इनोदी
In reply to . by उद्दाम
खी खी खी ... फारच ब्बा इनोदी तुमचा स्वभाव ... :-) :-)
देशाकरता इतका त्याग करुनही
देशाकरता इतका त्याग करुनही स्वतःची इतकी भरभराट करु शकणार्या ह्या देवतासमान विभूतीला आपण आपल्या देशाचा लगाम पुन्हा एकदा दिला तर ती देशाचीही अशीच भरभराट करेल ह्याविषयी मला तरी शंका नाही.>>>>>
अगदी खरे हुप्प्याजी देशाचा लगाम कॉंग्रेस लाच मिळणार तुम्ही चिंता करू नका
हे त्यांनाही ठाऊक आहे
In reply to देशाकरता इतका त्याग करुनही by सचीन
हे त्यांनाही ठाऊक आहे ,त्यामुळेच ते इथे हीरहीरीने प्रतिसाद टाकत आहेत.
आजचा निवडणुकीचा निकाल बघितला काय?
In reply to देशाकरता इतका त्याग करुनही by सचीन
>>>देशाचा लगाम कॉंग्रेस लाच मिळणार तुम्ही चिंता करू नका >>>> :)
मी देशात लिवलाय भाऊ. हा
In reply to आजचा निवडणुकीचा निकाल बघितला काय? by राजेंद्र मेहेंदळे
मी देशात लिवलाय भाऊ. हा राज्यांचा निकाल होता.
काय राव काँग्रेसी नेते च २ ०
In reply to मी देशात लिवलाय भाऊ. हा by सचीन
काय राव काँग्रेसी नेते च २ ० १ ४ ला विरोधी बाकांवर बसायच्या गोष्टी करत आहेत आणि तुम्ही इथे त्यांच्या मनसुब्यांवर पाणी टाकताय ?
तुमच्या आशावादी पणाला सलाम !
चालू राहूदे !
कॉंग्रेस ला विरोधी बाकावर
In reply to काय राव काँग्रेसी नेते च २ ० by विद्युत् बालक
कॉंग्रेस ला विरोधी बाकावर बसवून काय देशाचे नुकसान करायचेय?
तुम्हाला कॉग्रेसचा एव्हढा राग का आहे?
In reply to कॉंग्रेस ला विरोधी बाकावर by सचीन
काँग्रेस अगदी संसदेतुन हद्दपार करायची तुमची इच्छा अत्यंत अवास्तव आणि कोड्यात पाडणारी आहे.
लोकशाहीत विरोधीपक्ष अत्यंत महत्वाची भुमीका बजवतात. तुम्ही काँग्रेसला त्याकरताही नालायक ठरवुन त्या पक्षावर फार अन्याय करताहात.
विरोधी पक्षात बसण्याची
In reply to तुम्हाला कॉग्रेसचा एव्हढा राग का आहे? by अर्धवटराव
विरोधी पक्षात बसण्याची कॉंग्रेसची लायकीच नाही. कॉंग्रेस हा पक्ष सत्तेवरच आला पाहिजे. देशाचे भले करण्याची ताकत असलेला एकाच पक्ष भारतात आहे तो म्हणजे कॉंग्रेस. कॉंग्रेसला विरोध म्हणजे देशाच्या विकासाला विरोध.
काँग्रेसची लायकी काढायचा तुम्हाला काय अधिकार ?
In reply to विरोधी पक्षात बसण्याची by सचीन
काँग्रेसने अनेक दशकं सरकार चालवलं आहे, शिवाय काहि वर्ष विरोधिपक्ष देखील राहिला आहे. त्या पक्षाबद्दल एव्हढं सार्कास्टीकली लिहीण्याचं काहि कारण नाहि.
अर्धवटराव !अर्धवटराव
In reply to काँग्रेसची लायकी काढायचा तुम्हाला काय अधिकार ? by अर्धवटराव
अर्धवटराव !अर्धवटराव !अर्धवटराव !
आमच्या नावाचा जप करुन काय होणार आहे?
In reply to अर्धवटराव !अर्धवटराव by सचीन
आपल्या डोळ्यांवरचा काँग्रेसविरोधी चश्मा काढा. थोडंफार अधिक-ऊणे प्रत्येक पक्षात असतं... पण म्हणुन सरसकट काँग्रेसच्या नावाने बोटं मोडणं योग्य नाहि.
Old Saying
Old Saying "Never Argue with a fool, they drag you down to their level & beats you with experience !"
Old Saying "Never Argue with
In reply to Old Saying by lakhu risbud
एकदम पटलं.
काळा पहाड उर्फ BLACK MOUNTAIN
In reply to Old Saying "Never Argue with by काळा पहाड
काळा पहाड उर्फ BLACK MOUNTAIN ह्यांच्याशी सहमत. खाजगी क्षेत्रात आरक्षण आणलेच पाहिजे.
अर्धवटराव तुसी ग्रेट हो!*lol
अर्धवटराव तुसी ग्रेट हो!*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol: