✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

टुक टुक! आमची महाराणी तुमच्यापेक्षा श्रीमंत!

ह
हुप्प्या यांनी
Mon, 12/02/2013 - 21:53  ·  लेख
लेख
भारताच्या सर्वोच्चपदी विराजमान असणार्‍या महात्यागी, महासाध्वी, महाज्ञानी महाराज्ञी सोनियाजी गांधी ह्या इंग्लंडच्या राणी एलिझाबेथपेक्षाही श्रीमंत असल्याचा निष्कर्ष एका पहाणीत काढला गेला आहे. चला! ह्या निमित्ताने इंग्लंडचे नाक कापले (इटलीकडून उसनवारी करून का होईना!) http://www.loksatta.com/desh-videsh-news/huffpost-report-says-sonia-gandhi-richer-than-elizabeth-ii-285462/ साधी रहाणी आणि उच्च विचारसारणीचा दिव्य संदेश देणार्‍या थोरल्या राणीसाहेबांच्या अल्प संपत्तीची अंदाजे किंमत दोन अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. देशाकरता इतका त्याग करुनही स्वतःची इतकी भरभराट करु शकणार्‍या ह्या देवतासमान विभूतीला आपण आपल्या देशाचा लगाम पुन्हा एकदा दिला तर ती देशाचीही अशीच भरभराट करेल ह्याविषयी मला तरी शंका नाही.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12958 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

ड्वाले खाडकरून उघडले

lakhu risbud
Mon, 12/02/2013 - 22:32 नवीन
कसं काय सापडतं बुवा तुम्हाला असं ? आमाला तर बुवा अच्यर्य वाटुन ऱ्हायले. ड्वाले खाडकरून उघडले पघा ! अजून बी उघड्ल्येल्येच हायेत,मिटायला तयारच न्हाईत.
  • Log in or register to post comments

साधी रहाणी...!!!

बाप्पू
Mon, 12/02/2013 - 22:41 नवीन
साधी रहाणी आणि उच्च विचारसारणी... आणि उच्च बँक balance....
  • Log in or register to post comments

उत्पन्नाचे स्रोत काय आहेत

अधिराज
Mon, 12/02/2013 - 23:26 नवीन
Image removed. उत्पन्नाचे स्रोत काय आहेत म्हणे?
  • Log in or register to post comments

भारत असावा काय?

स्पंदना
Tue, 12/03/2013 - 08:37 नवीन
भारत असावा काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

कशी काय बर?

बाप्पू
Tue, 12/03/2013 - 00:03 नवीन
ना व्यवसाय; ना उद्योग; ना प्रशासकीय पद. तरीही एवढी कमी कशी काय बर?
  • Log in or register to post comments

हे हिमनगाचे टोक असू शकते.

खटपट्या
Tue, 12/03/2013 - 01:12 नवीन
हे हिमनगाचे टोक असू शकते.
  • Log in or register to post comments

गडबड आहे...

विकास
Tue, 12/03/2013 - 02:01 नवीन
सोनीयाजींची संपत्ती किती आहे आणि त्यांनी ती कशी मिळवली, या संदर्भात माझा प्रतिसाद बघू नये... पण काहीतरी गडबड आहे या बातमीत... हफिंग्टन पोस्टच्या मूळ बातमीत सोनीया गांधींचा उल्लेख किमान मला तरी दिसला नाही. पण भारतातील सर्वच माध्यमात ही बातमी हफिंग्टन पोस्टचा उल्लेख करून झळकलेली दिसत आहे. याचा अर्थ हफिंग्टन पोस्टने ती बातमी नंतर बदललेली असावी असे दिसते. आता ती बदलायचे कारण त्यांच्या मूळ बातमीत चूक/खोडसाळपणा होता हे आहे की त्यांच्यावर दबाव आणला गेला आहे, हे सत्य कधी बाहेर येईल असे वाटत नाही. :(
  • Log in or register to post comments

Editor's Note: Sonia Gandhi

विद्युत् बालक
Tue, 12/03/2013 - 02:09 नवीन
Editor's Note: Sonia Gandhi and the former emir of Qatar Hamid bin Khalifa al-Thani has been removed from this list. Gandhi was originally included based on a listing on a third party site which was subsequently called into question. Our editors have been unable to verify the amount, removed the link, and regret any confusion. Sheikh bin Khalifi was succeeded by his son Tamim in 2013. सिब्बल ने फोन मारला असेल लगेच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

ती वेबसाईट...

विकास
Tue, 12/03/2013 - 02:42 नवीन
ती वेबसाईट ही आहे: http://www.celebritynetworth.com/richest-politicians/sonia-gandhi-net-worth/ छ्या! हा धागा वाचून असे गर्वाने भरून आले होते म्हणून सांगतो... पण हफिंग्टनपोस्टने यकदम भ्रमनिरास केला! ;) मलातर वाटते आहे की ही भारताला कमी लेखण्याची कॉन्स्पिरसी असावी... जाउंदेत... डालर आणि पाउंडात श्रीमंत इतरत्र असतीलही, पण काय करायचे आहे असले कागदी श्रीमंत घेऊन? मनाची श्रीमंती फक्त आमच्याच बाईसाहेबांकडे आहे...त्याची सर कुण्णाकुण्णाला येण्णार नाह्ही! म्हणूनच तर अन्नसुरक्षा बिलाच्या नावाने (स्वतःचे नाहीतरी जनतेचे) पैसे मुक्तहस्ताने उधळू शकल्या! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्युत् बालक

.त्याची सर कुण्णाकुण्णाला

मदनबाण
Tue, 12/03/2013 - 08:08 नवीन
.त्याची सर कुण्णाकुण्णाला येण्णार नाह्ही! म्हणूनच तर अन्नसुरक्षा बिलाच्या नावाने (स्वतःचे नाहीतरी जनतेचे) पैसे मुक्तहस्ताने उधळू शकल्या! हॅहॅहॅ... बाई मोठ्या मनाच्या हायेत बघा ! पैका जनतेचा असला तरी काय झाल ? इधळायला देखील मोठ मन आणि काय म्हणतात ते हं अंतरात्मा की आवाज वगरै सुद्धा ऐकु यावा लागतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

गरिबांसाठी जनतेचे का असेना

सचीन
Sat, 12/07/2013 - 10:07 नवीन
गरिबांसाठी जनतेचे का असेना पैसे खर्च केले तर सुरु झाली पोट दुखी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आधळं दळतय कुत्र पिठ खातय...

गब्रिएल
Wed, 12/11/2013 - 23:13 नवीन
आधळं दळतय कुत्र पिठ खातय... पन आंधल्याले कुटे समजतय ! सगला जल्ला येड्याचा बाजार Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

आधळं दळतय कुत्र पिठ खातय...

गब्रिएल
Wed, 12/11/2013 - 23:13 नवीन
आधळं दळतय कुत्र पिठ खातय... पन आंधल्याले कुटे समजतय ! सगला जल्ला येड्याचा बाजार Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

हेच म्हणतो !

विद्युत् बालक
Tue, 12/03/2013 - 02:01 नवीन
हेच म्हणतो ! निवडणूक आयोग आणि प्राप्तीकर विभाग काय बुच मारून बसलेत कि काय? चायला आम्हाला मात्र पेनल्टी आणि ह्यांना मात्र कल्टी ? जय हो सोनियाजी ! अवांतर : "जाणत्या " राजाचे काय मत आहे ह्याबद्दल?
  • Log in or register to post comments

हि बातमी जर खरी असेल तर

सचीन
Sat, 12/07/2013 - 10:10 नवीन
हि बातमी जर खरी असेल तर विरोधी पक्ष का गप्प बसलाय? गप्प बसले कारण त्यांना माहित आहे बातमी खोटी आहे. जर बातमी खरी आहे ह्याची खात्री असूनही ते गप्प बसलेत तर मात्र ते विरोधी पक्षातच बसण्याच्या योग्यतेचे आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्युत् बालक

हे हे

इरसाल
Sat, 12/07/2013 - 11:18 नवीन
सच्ची...................न सच्ची................न !!!(मी सध्या वान्खेडेवर उभारलोय !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

खुलासा झाला आहेच...

अर्धवटराव
Tue, 12/03/2013 - 08:49 नवीन
बातमी खोटी असल्याचा खुलासा झाला आहेच , पण तरिही सोनीया गांधींकडे खच्चुन पैसा असल्यास आश्चर्य वाटायला नको. नेहरु घराणं पिढीजात श्रीमंत आहे...त्यातला काहि वाटा सुनबाईंच्या नावे आला असेलच... आणि अर्थतज्ञांची फौज असेल दिमतीला तर पैसा मल्टीप्लाय होणं काहि अवघड नाहि.
  • Log in or register to post comments

हात तेरे की!

सुनील
Tue, 12/03/2013 - 08:57 नवीन
तवा चांगला तापला होता. मंडळी कणकेचे गोळे लाटतच होते. आणि तुम्ही तव्यावर थंड पाणी ओतलेत :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अगदी

विकास
Tue, 12/03/2013 - 09:30 नवीन
पैसा मल्टीप्लाय होणं काहि अवघड नाहि.
अगदी अगदी... त्यासाठी अर्थतज्ञांची फौज कशाला हवीय हो? इंदीरा विकास पत्र आणि नॅशनल सेव्हिंग सर्तीफिकेट्स मधे, पैसे ठेवले असतील दर पाच/सहा वर्षांनी दुप्पट! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

खोटा प्रचार करण्यासाठी फेकू

ग्रेटथिन्कर
Tue, 12/03/2013 - 09:08 नवीन
खोटा प्रचार करण्यासाठी फेकू आता परदेशी वृत्तपत्रांनाही पैसा द्यायला लागला आहे हेच यातून सिद्ध होते.
  • Log in or register to post comments

हे म्हणजे

विकास
Tue, 12/03/2013 - 09:26 नवीन
हे म्हणजे अगदी सुब्रम्हण्यम स्वामींच्या कॉन्स्पिरसी थिअरीजसारखेच झाले हे वरचे प्रतिसाद पाहीले तर लक्षात येईल... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

कशावरून?

हुप्प्या
Tue, 12/03/2013 - 11:46 नवीन
ंअसेही शक्य आहे की महाराणीजीनी आपले अफाट धन वापरुन मूळ बातमी खोटी असल्याची ष्टोरी बनवली आणि ती यशस्वीरित्या सगळ्यांच्या गळी उतरवली. लगेच आपल्या लाडक्या पक्ष वा नेत्यावर आगपाखड करायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

हुप्प्याजी तुसी ग्रेट हो!

सचीन
Fri, 12/13/2013 - 21:48 नवीन
हुप्प्याजी तुसी ग्रेट हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

अरे ...

ब़जरबट्टू
Tue, 12/03/2013 - 09:13 नवीन
अरे बाबांनो, तुमचा पगार काय ... तुम्ही बोलता काय ... =))
  • Log in or register to post comments

.

उद्दाम
Tue, 12/03/2013 - 09:30 नवीन
छान
  • Log in or register to post comments

मायनेता

विकास
Tue, 12/03/2013 - 09:39 नवीन
मायनेता.इन्फो वर सर्वांची निवडणू़क आयोगास दिलेली माहिती आहे. ती खरी धरल्यास, २००४ साली सोनीयाजींकडे साधारण ८५ लाख रूपये होते जे २००९ मधे १.३ कोटी झाले तर राहूल गांधींकडे अनुक्रमे त्याच काळात आधी ४५ लाख होते ते २.९ कोटी झाले!
  • Log in or register to post comments

१.३ कोटी फक्त? म्हणजे

राजेश घासकडवी
Tue, 12/03/2013 - 10:14 नवीन
१.३ कोटी फक्त? म्हणजे दादरमध्ये फ्लॅट असणारे लोक सोनिया गांधींपेक्षा श्रीमंत आहेत तर! ऐकावं ते नवलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

हिमनगाचे टोक

हुप्प्या
Tue, 12/03/2013 - 11:53 नवीन
हे सगळे आकडे हे म्हणजे ज्या मालमत्तेच्या मालकीचा इन्कार करणे अशक्य आहे त्याची मोजदाद. मला खात्री आहे की कुठल्याही वरच्या नेत्याकडे ह्यापेक्षा कितीतरी जास्त जिचा मागमूस लागू शकणार नाही अशी संपत्ती आहे. किंबहुना अशा मार्गाने मिळवलेली संपत्ती कुणाला सुगावा लागू न देता योग्य स्थळी ठेवणे हे एक अत्यंत प्रगत शास्त्र आहे आणि आपले तमाम वरिष्ठ राजकारणी त्यात पारंगत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

गेल्या ६० वर्षात

नित्य नुतन
Fri, 12/06/2013 - 13:20 नवीन
गेल्या ६० वर्षात पाठ्यपुस्तकातील एक वाक्य बदलले नाही की, भारत हा विकसनशील देश आहे ... पण याच भारतात राहून यांची संपत्ती खरबोंनी वाढली ... हे कसे काय हो ... ---- confused भारतीय
  • Log in or register to post comments

.

उद्दाम
Sat, 12/07/2013 - 13:52 नवीन
शेवटी काय हो, आपण एका 'मता'चे धनी, संपत्तीचा मालक निराळाच !!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नित्य नुतन

खी खी खी ... फारच ब्बा इनोदी

नित्य नुतन
Sat, 12/07/2013 - 15:59 नवीन
खी खी खी ... फारच ब्बा इनोदी तुमचा स्वभाव ... :-) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

देशाकरता इतका त्याग करुनही

सचीन
Sat, 12/07/2013 - 14:45 नवीन
देशाकरता इतका त्याग करुनही स्वतःची इतकी भरभराट करु शकणार्‍या ह्या देवतासमान विभूतीला आपण आपल्या देशाचा लगाम पुन्हा एकदा दिला तर ती देशाचीही अशीच भरभराट करेल ह्याविषयी मला तरी शंका नाही.>>>>> अगदी खरे हुप्प्याजी देशाचा लगाम कॉंग्रेस लाच मिळणार तुम्ही चिंता करू नका
  • Log in or register to post comments

हे त्यांनाही ठाऊक आहे

ग्रेटथिन्कर
Sat, 12/07/2013 - 15:04 नवीन
हे त्यांनाही ठाऊक आहे ,त्यामुळेच ते इथे हीरहीरीने प्रतिसाद टाकत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

आजचा निवडणुकीचा निकाल बघितला काय?

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 12/09/2013 - 20:45 नवीन
>>>देशाचा लगाम कॉंग्रेस लाच मिळणार तुम्ही चिंता करू नका >>>> :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

मी देशात लिवलाय भाऊ. हा

सचीन
Tue, 12/10/2013 - 22:24 नवीन
मी देशात लिवलाय भाऊ. हा राज्यांचा निकाल होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

काय राव काँग्रेसी नेते च २ ०

विद्युत् बालक
Tue, 12/10/2013 - 22:29 नवीन
काय राव काँग्रेसी नेते च २ ० १ ४ ला विरोधी बाकांवर बसायच्या गोष्टी करत आहेत आणि तुम्ही इथे त्यांच्या मनसुब्यांवर पाणी टाकताय ? तुमच्या आशावादी पणाला सलाम ! चालू राहूदे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

कॉंग्रेस ला विरोधी बाकावर

सचीन
Wed, 12/11/2013 - 21:16 नवीन
कॉंग्रेस ला विरोधी बाकावर बसवून काय देशाचे नुकसान करायचेय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्युत् बालक

तुम्हाला कॉग्रेसचा एव्हढा राग का आहे?

अर्धवटराव
Wed, 12/11/2013 - 23:33 नवीन
काँग्रेस अगदी संसदेतुन हद्दपार करायची तुमची इच्छा अत्यंत अवास्तव आणि कोड्यात पाडणारी आहे. लोकशाहीत विरोधीपक्ष अत्यंत महत्वाची भुमीका बजवतात. तुम्ही काँग्रेसला त्याकरताही नालायक ठरवुन त्या पक्षावर फार अन्याय करताहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

विरोधी पक्षात बसण्याची

सचीन
गुरुवार, 12/12/2013 - 09:59 नवीन
विरोधी पक्षात बसण्याची कॉंग्रेसची लायकीच नाही. कॉंग्रेस हा पक्ष सत्तेवरच आला पाहिजे. देशाचे भले करण्याची ताकत असलेला एकाच पक्ष भारतात आहे तो म्हणजे कॉंग्रेस. कॉंग्रेसला विरोध म्हणजे देशाच्या विकासाला विरोध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

काँग्रेसची लायकी काढायचा तुम्हाला काय अधिकार ?

अर्धवटराव
गुरुवार, 12/12/2013 - 10:54 नवीन
काँग्रेसने अनेक दशकं सरकार चालवलं आहे, शिवाय काहि वर्ष विरोधिपक्ष देखील राहिला आहे. त्या पक्षाबद्दल एव्हढं सार्कास्टीकली लिहीण्याचं काहि कारण नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

अर्धवटराव !अर्धवटराव

सचीन
Fri, 12/13/2013 - 21:49 नवीन
अर्धवटराव !अर्धवटराव !अर्धवटराव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आमच्या नावाचा जप करुन काय होणार आहे?

अर्धवटराव
Fri, 12/13/2013 - 22:56 नवीन
आपल्या डोळ्यांवरचा काँग्रेसविरोधी चश्मा काढा. थोडंफार अधिक-ऊणे प्रत्येक पक्षात असतं... पण म्हणुन सरसकट काँग्रेसच्या नावाने बोटं मोडणं योग्य नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

Old Saying

lakhu risbud
Sat, 12/07/2013 - 23:28 नवीन
Old Saying "Never Argue with a fool, they drag you down to their level & beats you with experience !"
  • Log in or register to post comments

Old Saying "Never Argue with

काळा पहाड
Mon, 12/09/2013 - 23:59 नवीन
Old Saying "Never Argue with a fool, they drag you down to their level & beats you with experience !"
एकदम पटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud

काळा पहाड उर्फ BLACK MOUNTAIN

सचीन
Tue, 12/10/2013 - 22:23 नवीन
काळा पहाड उर्फ BLACK MOUNTAIN ह्यांच्याशी सहमत. खाजगी क्षेत्रात आरक्षण आणलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

अर्धवटराव तुसी ग्रेट हो!*lol

सचीन
Sat, 12/14/2013 - 11:06 नवीन
अर्धवटराव तुसी ग्रेट हो!*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा