✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सत्तेवर कोण यायला हवे

स
सचीन यांनी
Sat, 11/30/2013 - 22:08  ·  लेख
लेख
देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे. पण कॉंग्रेसचा का? इतर पक्ष का नको असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. देशाला लोकशाहीची ओळख झाली.हि अनमोल लोकशाही जपण्याचे महत्वाचे काम कॉंग्रेसने केले. अफाट लोकसंख्या,हजारो जाती, अनेक भाषा, विविध धर्म ह्या साऱ्या घटकांचा समतोल सावरत कॉंग्रेसने देशाचा डोलारा सावरला. त्याच बरोबर देशाला विकासाच्या वाटेवर आणले. कॉंग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. १८८५ साली स्थापन झालेल्या कॉंग्रेसने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल ह्यासारखे अनेक खंदे स्वातंत्र्य सेनानी देशाला दिले. त्यांच्या आणि अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या अनमोल सहकार्याने देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर महात्माजींनी कॉंग्रेस पक्ष विसर्जित करा असा सल्ला दिला होता. पण देशाला स्वातंत्र्य पर्यंत आणल्यावर असे निर्नायकी अवस्थेत सोडणे चुकीचे होते. कॉंग्रेस जणांनी महात्माजींचा हा सल्ला झुगारला. खुद्द महात्माजींचा सल्ला झुगारून आपल्यात पक्षांतर्गत लोकशाही आहे हे कॉंग्रेस ने सिद्ध केले. १९४८ साली महात्माजींचा निर्घुण खून करण्यात आला त्यानंतर स्वतंत्र भारतात लोकशाहीची ज्योत तेवत ठेवली ती कॉंग्रेसने आज भारतात एकही असे गाव नाही जेथे कॉंग्रेस पक्ष नाही . देशातील सर्वसामान्य, धर्मनिरपेक्ष,गोरगरीब, दलित मागासवर्गीय ह्यांना हा पक्ष आपला वाटतो. आणि कॉंग्रेस च्या नेत्यांनीही ह्या लोकांचा विश्वास तुटू दिला नाही. देश आज जो विकासपथावर आहे त्याचे मुख्य कारण कॉंग्रेसने सत्ता जनतेसाठी राबवली. जाती धर्माच्या नावावर कधीही राजकारण केले नाही. सर्वसामान्य माणूस हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला मग तो कुठल्याही जाती धर्माचा का असेना. आता जी २०१४ ची निवडणूक होत आहे त्यात कॉंग्रेस च सत्तेवर येईल ह्यात शंका नाही मात्र दुर्दैर्वाने कॉंग्रेस सत्तेवर आली नाही तर देशाकडे नेतृत्व करण्यासाठी कुठले पर्याय आहेत जे आपल्या नेतृत्वाने देशाला सावरू शकतील. माझ्या मते कॉंग्रेस चे सरकार आले नाही तर तीन नेते असे आहेत ज्यांच्याकडे देशाचे नेतृत्व आले तरी देशाचा विकास करण्याची आणि देशातील सर्वसामान्यांना बरोबर घेवून जाण्याची त्यांची क्षमता आहे. त्यातील पहिले नाव आहे शरद पवार साहेबांचे.शरद पवार ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात जाणता राजा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राचा आतापर्यंतचा सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रगतीपथावर वाटचाल केली. भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला आणि धडाडीने काम करण्याची क्षमता असलेला नेता. अल्पसंख्यांक, स्त्रिया, शेतकरी ह्यांच्या समस्येची जाण असणारा आणि ते सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारा नेता म्हणजे शरद पवार. शरद पवार जर प्रधानमंत्री झाले तर ते भरीव कामगिरी करू शकतात ती क्षमता त्यांच्यात आहे. दुसरा नेता म्हणजे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्य मंत्री मायावतीजी. त्यांनी उत्तर प्रदेशात जो सोशल इंजीनियरिंगचा प्रयोग करून सत्ता खेचून आणली होती ते आश्चर्यजनक होते. केडर बेस पार्टी म्हणून ब स पा कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.तसेच देशातील दलित व अल्पसंख्याकामध्ये मायावतीजी ह्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. शतकानु शतके सामाजिक विषमतेखाली पिचणाऱ्या समाजाला देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्तेवर आणून दाखवणे हे मायावतींचे ऐतिहासिक कर्तुत्व आहे. जर उत्तर प्रदेशात त्यांचा पक्ष ४० जागा पर्यंत मजल मारू शकला तर त्या सत्ता स्थापन करण्यात महत्वाची भूमिका अदा करू शकतात. तिसरा नेता म्हणजे मुलायम सिंग यादव. जयप्रकाश नारायण सारख्या कर्तुत्ववान नेत्याचा मुशीत तयार झालेला कर्तुत्ववान नेता. नाव मुलायम असले तरी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्यात वाकबगार. ज्यावेळी लोकपाल बिल आणून घटनेचे उल्लंघन करण्याचे प्रयत्न चालू होते तेव्हा मुलायम सिंग आणि लालूप्रसाद यादव हे ह्या बिलाच्या विरोधात ठामपणे उभे राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश विकास करत आहे. मात्र दुर्दैवाने ह्यांच्या पैकी कोणीही सत्तेवर आले नाही तर मात्र देश निर्नायकी अवस्थेपर्यंत पोहोचण्याची स्तिथी आहे भारताचा दुसरा पाकिस्तान होईल अशी साधार भीती वाटते. आज आपण मोकळ्या वातावरणात राहत आहोत. लोकशाहीचे फायदे उपभोगत आहोत. पण नंतर मात्र पाक, अफगाणिस्थान इथे जशे फतवे निघतात तसे फतव्याचे राजकारण होण्याची शक्यता आहे. आधुनिक लोकशाहीत मंगळावर स्वारी करणारा आपला देश पुराणकाळात जाण्याची शक्यता वाटते
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17659 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

>>> शरद पवार हे धर्मनिरपेक्ष

श्रीगुरुजी
Sun, 12/01/2013 - 14:18 नवीन
>>> शरद पवार हे धर्मनिरपेक्ष वृतीचे नेते आहेत. फिदी फिदी फिदी फिदी . . . धर्मनिरपेक्षता म्हणजे अतिरेक्यांना सहानूभूती व पाठिंबा, फर कॅप घालून इफ्तार पार्ट्या झोडणे, मुस्लिमांना आरक्षण, हाज यात्रा व इतर सवलतींची खैरात अशी काहींची व्याख्या असते. >>> ९ खासदारांचे १९० करण्याचा अजेंडा त्यांच्या कडे नाही. कसे करणार? त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर (खरं तर महाराष्ट्रातले काही जिल्हे सोडले तर) कोणी हिंग लावून विचारत नाही.
↩ प्रतिसाद: सचीन

तेरी दिवसाच्या सत्तेसाठी

ग्रेटथिन्कर
Sun, 12/01/2013 - 16:43 नवीन
तेरी दिवसाच्या सत्तेसाठी गुडघ्याला बाशींग बांधणार्याला काय त्याग माहीत सोनियाजींचा... सोनियाजी म्हणजे आपल्या भारताला लाभलेलं एक खंबीर नेतृत्व आहे व त्यांचा वारसा भारताचे लाडके व्यक्तीमत्व राहुलजी यशस्वीपणे चालवत आहेत... विष्णुने जसे सत्य रक्षणार्थ अवतार घेतले तसे गांधी घराणे भारताच्या उद्धारासाठीच आहे. काय त्या त्यागाला परीसीमा आहे की नाही.! असो मी तर माझे मत काँग्रेसच्या खंबीर नेतृत्वालाच देणार....
↩ प्रतिसाद: सचीन

कधी वेळ मिळाला तर देशाची

सचीन
Sun, 12/01/2013 - 14:03 नवीन
कधी वेळ मिळाला तर देशाची प्रगती किती वेगाने झालीये ते बघा… हा वेग तुम्हाला बैलगाडी पेक्षा हि कमी आहे वाटत नाही का ?>>>>>>> देशाची प्रगती अत्यंत वेगाने सुरु आहे देश मंगळावर जावून पोहोचलाय.युवा पिढी इंटर नेटच्या दुनियेत वावरत आहे WHATS UP KAY NI FACEBOOK KAY.दिवाळीला बाजारात गेले तर कुठेही जा कपड्यांच्या दुकानात जा कि इलेक्ट्रोनिक्स च्या दुकानात कि हॉटेलात तुडुंब गर्दी . लोकांची खर्च करण्याची क्षमत अफाट वाढलीय .बाप्पू तुम्हीच सांगा काँगेसच्या राज्यात गेल्या १० वर्षात तुमची प्रगती झालीय कि अधोगती . तुम्हाला उत्तर मिळेल

>>> काँगेसच्या राज्यात गेल्या

श्रीगुरुजी
Sun, 12/01/2013 - 14:23 नवीन
>>> काँगेसच्या राज्यात गेल्या १० वर्षात तुमची प्रगती झालीय कि अधोगती अर्थात अधोगतीच. आणि हे कोणाच्याही अगदी सहज लक्षात येईल (काही अपवाद वगळता).
↩ प्रतिसाद: सचीन

बालका धर्मनिरपेक्ष नेता तो

सचीन
Sun, 12/01/2013 - 14:12 नवीन
बालका धर्मनिरपेक्ष नेता तो असतो जो देशातील सर्व धर्मियांना मान देतो जो इफ्तार पार्ट्याही झोडतो नि दिवाळीचा आनंदही लुटतो नि ख्रिसमसला हि शुभेच्छा देतो जो देशाच्या नागरिकांना धर्माच्या दृष्टीने न बघता एक भारतीय समजतो.

बरोबर, या देशावर मुस्लिम

ग्रेटथिन्कर
Sun, 12/01/2013 - 19:19 नवीन
बरोबर, या देशावर मुस्लिम ख्रिस्ती बौद्ध बांधवांचा हिंदूच्या इतकाच हक्क आहे. किंबहूना हिंदूनी आपल्या या बांधवांच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे. हिंदूच्या विकासाबरोबरच ख्रिस्ती आणि मुस्लिमांच्या विकासाला प्राधान्य देणार्या पक्षालाच येणार्या इलेक्शनमध्ये निवडून द्या.
↩ प्रतिसाद: सचीन

मला एकच प्रश्न पडतो आहे~

अत्रुप्त आत्मा
Sun, 12/01/2013 - 14:14 नवीन
मला एकच प्रश्न पडतो आहे~"माणुस स्व खुशीनी अंधत्व ,नेमकं का आणी कशासाठी स्विकारत असावा?" :)

>>> मला एकच प्रश्न पडतो आहे~

श्रीगुरुजी
Sun, 12/01/2013 - 14:20 नवीन
>>> मला एकच प्रश्न पडतो आहे~"माणुस स्व खुशीनी अंधत्व ,नेमकं का आणी कशासाठी स्विकारत असावा?" स्वखुशीनी अंधत्व की उपजत बावळटपणा?
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सचिन राव बहुतेक पवारांच्या

विद्युत् बालक
Sun, 12/01/2013 - 14:22 नवीन
सचिन राव बहुतेक पवारांच्या मुशीतून घडले असावेत
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सदर लेखन हे ,उपजत बावळटपणा

अत्रुप्त आत्मा
Sun, 12/01/2013 - 14:29 नवीन
सदर लेखन हे ,उपजत बावळटपणा वाटत नाही..ज्या पद्धतिनी लेखक उपप्रतिसाद देतोय,ते पहाता तर नक्कीच नाही!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

निशःब्द

तिमा
Sun, 12/01/2013 - 14:22 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. सध्या एवढेच पुरे!

तिमा ताई !

विद्युत् बालक
Sun, 12/01/2013 - 14:31 नवीन
तिमा ताई ! तुमची पहिली स्मायली काय करतेय नक्की?
↩ प्रतिसाद: तिमा

खाली

तिमा
Sun, 12/01/2013 - 14:41 नवीन
स्मायलीच्या खाली 'worthy' असं लिहिलंय. काय करतीये कोण जाणे. - ति(लोत्त)मा ताई Image removed.
↩ प्रतिसाद: विद्युत् बालक

आजकाल पुरुष असून स्त्रियान

विद्युत् बालक
Sun, 12/01/2013 - 19:07 नवीन
आजकाल पुरुष असून स्त्रियान सारखे नाव धारण करण्याचे प्रमाण वाढले आहे :D
↩ प्रतिसाद: तिमा

विद्युत बालक साहेब,

बॅटमॅन
Sun, 12/01/2013 - 19:23 नवीन
तिमा = शॉर्ट फॉर्म ऑफ तिरशिंगराव माणूसघाणे.
↩ प्रतिसाद: विद्युत् बालक

आयला

विद्युत् बालक
Sun, 12/01/2013 - 19:25 नवीन
आयला =)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तिमा ताई =)) =))

बॅटमॅन
Sun, 12/01/2013 - 18:56 नवीन
तिमा ताई =)) =)) =)) =)) =))
↩ प्रतिसाद: विद्युत् बालक

अर्थात अधोगतीच. आणि हे

सचीन
Sun, 12/01/2013 - 14:28 नवीन
अर्थात अधोगतीच. आणि हे कोणाच्याही अगदी सहज लक्षात येईल (काही अपवाद वगळता) हा प्रश्न मी बाप्पुना विचारला होता उत्तर तुम्ही दिलेय कि बाप्पुंची अधोगती झालीय हा काय प्रकार आहे? गुरुजी पोट हल्ली तुमचे जास्त दुखतेय जास्त हसू नका. कंत्राट घेतले नव्हते तर काय मेजवानीला होतात का? पदार्थांची नाव अचूक सांगताय

>>> हा प्रश्न मी बाप्पुना

श्रीगुरुजी
Sun, 12/01/2013 - 14:35 नवीन
>>> हा प्रश्न मी बाप्पुना विचारला होता उत्तर तुम्ही दिलेय कि बाप्पुंची अधोगती झालीय हा काय प्रकार आहे? अधोगती कोणाची झालीय ते लेख वाचल्यावर लगेच लक्षात आलं. >>> गुरुजी पोट हल्ली तुमचे जास्त दुखतेय जास्त हसू नका. मग तुम्ही लेखन आणि प्रतिसाद थांबवा. नाहीतर आम्हाला हसू आवरणार नाही. >>> कंत्राट घेतले नव्हते तर काय मेजवानीला होतात का? पदार्थांची नाव अचूक सांगताय अहो, या अतिरेक्यांना सहीसलामत सुखरूप सोडून दिल्याची लाजिरवाणी आणि देशद्रोही घटना काँग्रेसवाल्यांनी आपण मोठा पराक्रम केल्याच्या थाटात जगजाहीर केली होती (निवडणुकीत 'त्यांची' मतं हवी होती ना). त्यामुळे आम्हालाच काय पण सगळ्या जगाला हा 'मेजवानीचा पराक्रम' कळून भारताची नाचक्की झाली होती.
↩ प्रतिसाद: सचीन

शांतीयात्रा काढण्याच्या मुर्ख

ग्रेटथिन्कर
Sun, 12/01/2013 - 19:24 नवीन
शांतीयात्रा काढण्याच्या मुर्ख लोकांच्या नादात कारगिलमध्ये आपले सातशे जवान मारले गेले... हा वाजपेयींचा पराक्रम जगजाहीरच आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

टिपर्‍या!

प्यारे१
Sun, 12/01/2013 - 14:34 नवीन
टिपर्‍या! दांडिया!! गरबा!!!

सन्मानाने मानाचे पागोटे देऊन

सचीन
Sun, 12/01/2013 - 14:41 नवीन
सन्मानाने मानाचे पागोटे देऊन त्यांना सुखरूप पाकिस्तानला जाऊन दिले होते. >>>>> गुरुजी मेजवानीचे जावून द्या पागोट्याचे कंत्राट तरी तुमच्याकडे होते का?

काय मुद्दाम करताय का उपजतच

श्रीगुरुजी
Sun, 12/01/2013 - 14:44 नवीन
काय मुद्दाम करताय का उपजतच काहीतरी कमी आहे? कंत्राटं, कंत्राटातला भ्रष्टाचार इ. काँग्रेसवाल्यांची कामं. आमचा असल्या कामांशी व काँग्रेसशी दुरूनही संबंध नाही.
↩ प्रतिसाद: सचीन

>>> गुरुजी मेजवानीचे जावून

श्रीगुरुजी
Sun, 12/01/2013 - 14:47 नवीन
>>> गुरुजी मेजवानीचे जावून द्या पागोट्याचे कंत्राट तरी तुमच्याकडे होते का? मुख्य म्हणजे कधी पागोटं घालणे, कधी फर कॅप, कधी गांधी टोपी, कधी फेल्ट हॅट तर कधी टापशी गुंडाळणे (आणि त्याखाली भ्रष्टाचार लपविणे) ही काँग्रेससारख्या निधर्मी पक्षाची कामं. आमचा याच्याशी संबंध नाही.
↩ प्रतिसाद: सचीन

नाही गुप्तहेरा सारखी सारी

सचीन
Sun, 12/01/2013 - 14:50 नवीन
नाही गुप्तहेरा सारखी सारी माहिती देताय .मेजवानीला काय काय पदार्थ होते ते सांग्रसंगीत सांगताय, पागोटे दिले ते सांगताय म्हणून आपली एक शंका दुसरे काही नाही. तुम्ही गुरुजी आम्ही ढ पोर. तुमच्यापुढे आम्ही म्हणजे वाडग्या समोर वाटी......

>>> तुम्ही गुरुजी आम्ही ढ पोर

श्रीगुरुजी
Sun, 12/01/2013 - 14:52 नवीन
>>> तुम्ही गुरुजी आम्ही ढ पोर. तुमच्यापुढे आम्ही म्हणजे वाडग्या समोर वाटी...... एवढं मात्र खरं बोललात.

आयला, सचीन ....72 झाले हं,

जोशी 'ले'
Sun, 12/01/2013 - 18:07 नवीन
आयला, सचीन ....72 झाले हं, आता आऊट :-)

यांचे राज्य येणार ...

चौकटराजा
Sun, 12/01/2013 - 18:09 नवीन
पंतप्रधान - सुशील कुमार शिंदे. ( जातीय अडचण नाही ) कायदा मंत्री- सचिन सावंत माहिती व प्रसिद्धी- कुमार केतकर हुसेन दलवाई- कोणतं खातं द्यावं बरं ? नबाब मलिक- हुसेन दलवाईंचे राज्यमंत्री जितेन्द्र आव्हाड- जातीय सलोखा मंत्री नारायण राणे- रसायन उदयोग.

अंधश्रद्धा!!!!!

वडापाव
Sun, 12/01/2013 - 19:10 नवीन
:P

एक मात्र खरे

सचिन कुलकर्णी
Sun, 12/01/2013 - 19:25 नवीन
की निवडणुका कश्या जिंकाव्यात याचे गणित कॉंग्रेसला चांगलेच अवगत आहे.

जनता बुद्धू नाहीये कॉंग्रेसने

सचीन
Sun, 12/01/2013 - 19:33 नवीन
जनता बुद्धू नाहीये कॉंग्रेसने विकास केला नसता तर त्यांना जनतेने कधीच घरी बसवले असते. जसे अवघ्या ५ वर्षात भाजपला बसवले.
↩ प्रतिसाद: सचिन कुलकर्णी

वाचनमात्र

संपादक मंडळ
Sun, 12/01/2013 - 19:34 नवीन
या धाग्यावर कोणतीही सकारात्मक चर्चा न झाल्याने धागा वाचनमात्र करत आहोत.
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा