✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सत्तेवर कोण यायला हवे

स
सचीन यांनी
Sat, 11/30/2013 - 22:08  ·  लेख
लेख
देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे. पण कॉंग्रेसचा का? इतर पक्ष का नको असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. देशाला लोकशाहीची ओळख झाली.हि अनमोल लोकशाही जपण्याचे महत्वाचे काम कॉंग्रेसने केले. अफाट लोकसंख्या,हजारो जाती, अनेक भाषा, विविध धर्म ह्या साऱ्या घटकांचा समतोल सावरत कॉंग्रेसने देशाचा डोलारा सावरला. त्याच बरोबर देशाला विकासाच्या वाटेवर आणले. कॉंग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. १८८५ साली स्थापन झालेल्या कॉंग्रेसने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल ह्यासारखे अनेक खंदे स्वातंत्र्य सेनानी देशाला दिले. त्यांच्या आणि अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या अनमोल सहकार्याने देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर महात्माजींनी कॉंग्रेस पक्ष विसर्जित करा असा सल्ला दिला होता. पण देशाला स्वातंत्र्य पर्यंत आणल्यावर असे निर्नायकी अवस्थेत सोडणे चुकीचे होते. कॉंग्रेस जणांनी महात्माजींचा हा सल्ला झुगारला. खुद्द महात्माजींचा सल्ला झुगारून आपल्यात पक्षांतर्गत लोकशाही आहे हे कॉंग्रेस ने सिद्ध केले. १९४८ साली महात्माजींचा निर्घुण खून करण्यात आला त्यानंतर स्वतंत्र भारतात लोकशाहीची ज्योत तेवत ठेवली ती कॉंग्रेसने आज भारतात एकही असे गाव नाही जेथे कॉंग्रेस पक्ष नाही . देशातील सर्वसामान्य, धर्मनिरपेक्ष,गोरगरीब, दलित मागासवर्गीय ह्यांना हा पक्ष आपला वाटतो. आणि कॉंग्रेस च्या नेत्यांनीही ह्या लोकांचा विश्वास तुटू दिला नाही. देश आज जो विकासपथावर आहे त्याचे मुख्य कारण कॉंग्रेसने सत्ता जनतेसाठी राबवली. जाती धर्माच्या नावावर कधीही राजकारण केले नाही. सर्वसामान्य माणूस हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला मग तो कुठल्याही जाती धर्माचा का असेना. आता जी २०१४ ची निवडणूक होत आहे त्यात कॉंग्रेस च सत्तेवर येईल ह्यात शंका नाही मात्र दुर्दैर्वाने कॉंग्रेस सत्तेवर आली नाही तर देशाकडे नेतृत्व करण्यासाठी कुठले पर्याय आहेत जे आपल्या नेतृत्वाने देशाला सावरू शकतील. माझ्या मते कॉंग्रेस चे सरकार आले नाही तर तीन नेते असे आहेत ज्यांच्याकडे देशाचे नेतृत्व आले तरी देशाचा विकास करण्याची आणि देशातील सर्वसामान्यांना बरोबर घेवून जाण्याची त्यांची क्षमता आहे. त्यातील पहिले नाव आहे शरद पवार साहेबांचे.शरद पवार ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात जाणता राजा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राचा आतापर्यंतचा सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रगतीपथावर वाटचाल केली. भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला आणि धडाडीने काम करण्याची क्षमता असलेला नेता. अल्पसंख्यांक, स्त्रिया, शेतकरी ह्यांच्या समस्येची जाण असणारा आणि ते सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारा नेता म्हणजे शरद पवार. शरद पवार जर प्रधानमंत्री झाले तर ते भरीव कामगिरी करू शकतात ती क्षमता त्यांच्यात आहे. दुसरा नेता म्हणजे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्य मंत्री मायावतीजी. त्यांनी उत्तर प्रदेशात जो सोशल इंजीनियरिंगचा प्रयोग करून सत्ता खेचून आणली होती ते आश्चर्यजनक होते. केडर बेस पार्टी म्हणून ब स पा कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.तसेच देशातील दलित व अल्पसंख्याकामध्ये मायावतीजी ह्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. शतकानु शतके सामाजिक विषमतेखाली पिचणाऱ्या समाजाला देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्तेवर आणून दाखवणे हे मायावतींचे ऐतिहासिक कर्तुत्व आहे. जर उत्तर प्रदेशात त्यांचा पक्ष ४० जागा पर्यंत मजल मारू शकला तर त्या सत्ता स्थापन करण्यात महत्वाची भूमिका अदा करू शकतात. तिसरा नेता म्हणजे मुलायम सिंग यादव. जयप्रकाश नारायण सारख्या कर्तुत्ववान नेत्याचा मुशीत तयार झालेला कर्तुत्ववान नेता. नाव मुलायम असले तरी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्यात वाकबगार. ज्यावेळी लोकपाल बिल आणून घटनेचे उल्लंघन करण्याचे प्रयत्न चालू होते तेव्हा मुलायम सिंग आणि लालूप्रसाद यादव हे ह्या बिलाच्या विरोधात ठामपणे उभे राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश विकास करत आहे. मात्र दुर्दैवाने ह्यांच्या पैकी कोणीही सत्तेवर आले नाही तर मात्र देश निर्नायकी अवस्थेपर्यंत पोहोचण्याची स्तिथी आहे भारताचा दुसरा पाकिस्तान होईल अशी साधार भीती वाटते. आज आपण मोकळ्या वातावरणात राहत आहोत. लोकशाहीचे फायदे उपभोगत आहोत. पण नंतर मात्र पाक, अफगाणिस्थान इथे जशे फतवे निघतात तसे फतव्याचे राजकारण होण्याची शक्यता आहे. आधुनिक लोकशाहीत मंगळावर स्वारी करणारा आपला देश पुराणकाळात जाण्याची शक्यता वाटते
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17659 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

---^---

विद्युत् बालक
Sat, 11/30/2013 - 22:19 नवीन
=)) . =)) लेख वाचून हसून हसून मेलो मी ! विडंबन आहे असे गृहीत धरतो

. +1 :) :)

उगा काहितरीच
Sat, 11/30/2013 - 22:24 नवीन
. +1 :) :) :) :)
↩ प्रतिसाद: विद्युत् बालक

खरंच काय हो ?

बाप्पू
Sat, 11/30/2013 - 22:24 नवीन
देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे.
खरंच काय हो ? भारताला ६० वर्षे होऊन गेली स्वतंत्र होऊन… आणि काही वर्षांचा अपवाद वगळता देश कौन्ग्रेस वाल्यांकडे च आहे. आणि आजूनही देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही? कधी वेळ मिळाला तर देशाची प्रगती किती वेगाने झालीये ते बघा… हा वेग तुम्हाला बैलगाडी पेक्षा हि कमी आहे वाटत नाही का ?

सचिन राव

विद्युत् बालक
Sat, 11/30/2013 - 22:32 नवीन
सचिन राव तुमच्या लेखाची सालटी निघणार बघा :D

स्मायली

क्लिंटन
Sat, 11/30/2013 - 23:06 नवीन
पोट धरधरून गडाबडा लोळायची स्मायली आहे का हो कोणाकडे?

:)

सोत्रि
Sun, 12/01/2013 - 11:56 नवीन
क्लिंटनभौ, ही चालेल का बघा? Image removed. - (गडबडा लोळणारा) सोकाजी
↩ प्रतिसाद: क्लिंटन

पवार जाणते आहेत हो पण ????????????????

बाबा पाटील
Sat, 11/30/2013 - 23:22 नवीन
साली प्रश्नचिन्हेच संपत नाय राव.......

मुखवटा

सिद्धेश महजन
Sat, 11/30/2013 - 23:34 नवीन
लेख लिहिणार्या या प्रोफाइलचा खरा चेहरा निखिल वागळेचा आहे. १००%.

+१

टायलर डर्डन
Sun, 12/01/2013 - 01:15 नवीन
+१
↩ प्रतिसाद: सिद्धेश महजन

भ्रष्टाचाराचा एकही आरोप

सिद्धेश महजन
Sat, 11/30/2013 - 23:48 नवीन
भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला नेता - शरद पवार? http://lh3.ggpht.com/_OpR8Gexvums/S4Bzjg6AB1I/AAAAAAAAAOg/jAyh3e8nwmQ/s400/ROFL.png

छान लेख.

ग्रेटथिन्कर
Sat, 11/30/2013 - 23:59 नवीन
छान लेख. नेटभगव्यांकडे दुर्लक्ष करा.

हसावे कि रडावे ते कळत नाहीये.

खटपट्या
Sun, 12/01/2013 - 01:04 नवीन
हसावे कि रडावे ते कळत नाहीये. तूर्तास गोंधळलेला….

सत्तेवर कोणाला यायला हवे.........??????????

विनोद१८
Sun, 12/01/2013 - 01:55 नवीन
सचीनभाऊ पायलागू, बाकी तुमच्या कल्पनातीत कल्पनाशक्तिला माझा सलाम..!! एखद्या सुमार सम्पादकालासुध्धा हेवा वाटावा अशी आहे ती, अगदी उर भरुन आले हो माझे. तुमच्या सूर्यप्रकाशाइतक्या तेजस्वी सत्याचे प्रयोग आपण नन्तर पाहू. मला सतत छळणार्‍या एका प्रश्णाला उत्तर दिलेत तर बरे होइल, करण मला वाटते आपला या विषयाचा अभ्यास फारच दान्ड्गा दिसतोय सबब तुमच्याकडून त्याचे उत्तर नक्की मिळेल, माझा प्रश्ण :- " या देशाला गेल्या १००० वर्षात १९४७ पूर्वी व १९४७ नन्तर आजपावेतो सर्वात जास्त कोणी, कसे व किती लुटले ??? परकीयानी की स्वकियानी ???? या देशाला लूटणे हे परकीयान्चे उद्दीष्ट्च होते व तो आपला अधिकारच आहे असे त्यान्ची समजूत होती परन्तु १९४७ नन्तर आलेल्यानी किती लूट केली अगदी कालपरवापर्यन्त ??? " मला पामराला वाटते १९४७ नन्तर आलेल्यानी हे बरोबर काय ?? याचे उत्तर दिलेत तर मला वाटते तुमचे तुम्हालाच उत्तर मिळेल.
सत्तेवर कोणाला यायला हवे.........??????????
ह्या प्रश्णावरूनच लक्षात येते ती तुमच्यासार्ख्यान्ची उडालेली घाबरगुन्डी आणि ढुन्गणाला पाय लाउन पळता थोडी झालेली भुई, नाही का ??? अरे एव्ह्ढी जर झोप उडाली...???? तर ती उडालेली परत येण्यासाठी येथे एखादा धागा टाकायचा होता कुणाचा सल्ला तरी मागायचा होता, अगदी मोफत मिळाला असता, असो. तुर्त इतकेच विनोद१८

(No subject)

शिद
Sun, 12/01/2013 - 02:22 नवीन
=))

आजचा सवाल- सचीनभौची सेंच्युरी

जेपी
Sun, 12/01/2013 - 08:03 नवीन
आजचा सवाल- सचीनभौची सेंच्युरी होणार का ? मी देखील वटवटवाघुळे एक ब्रेक घेतो . कुठेही जाऊ नका , पहात राहा . कायपण फेकमत . चला जगावर भुंकू या .

वटवटवाघुळे

बॅटमॅन
Sun, 12/01/2013 - 16:13 नवीन
वटवटवाघुळे
ओ आमच्या जातीला बोलायचं काम नाय हां!!!! अ‍ॅट्रॉशिटी दाखल करीन बगा ;) साला ### वागळे, नामसाधर्म्यामुळे आमच्या जातीवर लोक घसरतात.
↩ प्रतिसाद: जेपी

लेख आवडला

अपूर्व कात्रे
Sun, 12/01/2013 - 09:47 नवीन
पण लेखन विषय / लेखन प्रकार यात "विडंबन", "विनोद" इत्यादि घालायला विसरलात.

सत्ता येणार ती राहुलजी आणि

ग्रेटथिन्कर
Sun, 12/01/2013 - 09:49 नवीन
सत्ता येणार ती राहुलजी आणि काँग्रेस यांच्या पुरोगामी विचारांची . जातीयवादी आणि फेकू लोकांच्या हातात सत्ता देऊ नका.

तुमच नॉलेज मायनिंग करणारे

विद्युत् बालक
Sun, 12/01/2013 - 11:06 नवीन
तुमच नॉलेज मायनिंग करणारे मशीन स्वतावरच चालवले काय ? तुटलेले दिसतेय स्वाक्षरी बदलली न म्हणून विचारले !
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

ग्रेटथिंकरांची विनोदबुद्धी

वडापाव
Sun, 12/01/2013 - 10:14 नवीन
ग्रेटथिंकरांची विनोदबुद्धी वाखाणण्याजोगी आहे खरी!!! =)) सचीनभौ मला चुकून वाटलं की तुम्ही हे उपरोधानं लिहीलंय की काय!! =))

चायला....खुप दिवसांनी अतिशय

टवाळ कार्टा
Sun, 12/01/2013 - 10:46 नवीन
चायला....खुप दिवसांनी अतिशय उच्च कोटीचा विनोदी लेख वाचायला मिळाला....और आन्दो ;)

कोणी सत्तेवर यावे हे सांगणारे

अन्या दातार
Sun, 12/01/2013 - 10:49 नवीन
कोणी सत्तेवर यावे हे सांगणारे तुम्ही कोण? निवडणुका होणार आहेतच! काँग्रेस आली नाही तर लगेच निष्पक्ष झाल्या नाहीत असे गळे काढू नका. काँग्रेसशिवाय साधारण ८-१० वर्षे तरी देशाने बघितली आहेत. पैकी ५ वर्षे तर खरंच सुस्थितीत बघितली आहेत. सबब, जनतेच्या सूज्ञपणावर विश्वास ठेवायला हरकत नसावी.

नाव मुलायम असले तरी

विद्युत् बालक
Sun, 12/01/2013 - 11:04 नवीन
नाव मुलायम असले तरी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्यात वाकबगार मित्रानो , आपण एक खेळ खेळूया तुमच्या मता प्रमाणे ह्या लेखातील सर्वात इनोदी विधान सांगा !

आम्च्या मताप्रमाने

जेपी
Sun, 12/01/2013 - 11:07 नवीन
आधुनिक लोकशाहीत मंगळावर स्वारी करणारा आपला देश पुराणकाळात जाण्याची शक्यता वाटते

(No subject)

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 12/01/2013 - 11:21 नवीन
Image removed.

काँग्रेसशिवाय साधारण ८-१०

सचीन
Sun, 12/01/2013 - 11:54 नवीन
काँग्रेसशिवाय साधारण ८-१० वर्षे तरी देशाने बघितली आहेत. पैकी ५ वर्षे तर खरंच सुस्थितीत बघितली आहेत. सबब, जनतेच्या सूज्ञपणावर विश्वास ठेवायला हरकत नसावी.>>>>>>>>>>>बरोबर आहे तुमचे ती पाच वर्षे खरच सुस्तीथित गेली होती पण नेते लोकांची. फक्त अपवाद संसदेवर झालेला हल्ला मला वाटते ती देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल कि प्रधानमंत्री नि संरक्षण मंत्री ह्यांना लपून बसावे लागले होते. कंदाहार प्रकरण मंत्री महाशय स्वत अतिरेक्यांना घेऊन त्यांच्या मित्रांकडे सोपवून आले होते.जनतेला असली सुस्तिथी नकोशी वाटलेली असावी म्हणून पुढच्या निवडणुकीत घरी बसवले

फक्त अपवाद संसदेवर झालेला

अन्या दातार
Sun, 12/01/2013 - 12:02 नवीन
फक्त अपवाद संसदेवर झालेला हल्ला मला वाटते ती देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल कि प्रधानमंत्री नि संरक्षण मंत्री ह्यांना लपून बसावे लागले होते.
काँग्रेस सत्तेवर असती तर असे झालेच नसते का?
कंदाहार प्रकरण मंत्री महाशय स्वत अतिरेक्यांना घेऊन त्यांच्या मित्रांकडे सोपवून आले होते.
त्यापूर्वी कोणत्याच अतिरेक्याला सोडले नव्हते का?
↩ प्रतिसाद: सचीन

ज्जे बात!

सोत्रि
Sun, 12/01/2013 - 12:05 नवीन
सचिनभौ प्रतिसादही देत आहे धाग्यावर. मस्त आता जंगी सामना व्ह्यायलाच हवा! खरंय! खरे काय ते कळूनच ह्या डोळ्यावर झापडे लावून, ऑफिसच्या ए.सी. ची गार हवा खाऊन 'भोपळ्यात बी गार' झालेल्या ह्या नव मध्यमवर्गाला. अरे प्रतिसाद काय देताय उपहासानं, लेख पाडलाय वाघानं! सगळ्यांचा एकच दावा, सचिनभौच खरा सिंहाचा छावा!! सचिनभौ होहोदे चर्चा, होऊ दे खर्च!! - (सचिनभौ समर्थक) सोकाजी
↩ प्रतिसाद: सचीन

>>> फक्त अपवाद संसदेवर झालेला

श्रीगुरुजी
Sun, 12/01/2013 - 13:07 नवीन
>>> फक्त अपवाद संसदेवर झालेला हल्ला मला वाटते ती देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल कि प्रधानमंत्री नि संरक्षण मंत्री ह्यांना लपून बसावे लागले होते. हा हल्ला काँग्रेसच्या कारकीर्दीत झाला असता तर नक्कीच पप्पू आणि कुटुंबीय हातात ढालतलवार घेऊन लढायला गेले असते. >>> कंदाहार प्रकरण मंत्री महाशय स्वत अतिरेक्यांना घेऊन त्यांच्या मित्रांकडे सोपवून आले होते.जनतेला असली सुस्तिथी नकोशी वाटलेली असावी म्हणून पुढच्या निवडणुकीत घरी बसवले सप्टेंबर १९९३ मध्ये काश्मिरमध्ये लष्कराने मशिदीला वेढा घालून १०-१२ अतिरेक्यांना कोंडले होते. डिसेंबर १९९३ मधील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून तत्कालीन काँग्रेस सरकारने वेढा उठवून सर्व अतिरेक्यांना हलवा-पुरी, चिकन बिर्याणी (हलाल पध्दतीने केलेली), बिसलेरी जल इ. पदार्थांची मेजवानी देऊन सन्मानाने मानाचे पागोटे देऊन त्यांना सुखरूप पाकिस्तानला जाऊन दिले होते. हातात सापडलेल्या पण तरीही सहीसलामत सोडून दिलेल्या नंतर किती सहस्त्र निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले असतील खुदा जाने. इतर असंख्य पापांप्रमाणेच हे महापापही काँग्रेसचंच. जनतेने या देशद्रोही नालायकांना १९९६, १९९८ व १९९९ अशा लागोपाठ ३ निवडणुकात कंबरड्यात लाथ घालून घरी बसविले होते. २०१४ मध्येही यांच्या पृष्ठभागावर जनता असाच सणसणीत लत्ताप्रहार करणार आहे.
↩ प्रतिसाद: सचीन

सत्ता येणार ती राहुलजी आणि

सचीन
Sun, 12/01/2013 - 12:03 नवीन
सत्ता येणार ती राहुलजी आणि काँग्रेस यांच्या पुरोगामी विचारांची . जातीयवादी आणि फेकू लोकांच्या हातात सत्ता देऊ नका.>>>>> जनता सुज्ञ आहे. देशातील गोरगरीब, दलित, सामान्य माणसे ह्यांचा पक्ष म्हणजे कॉंग्रेस पक्ष. देशातील सर्वधर्मियांचा ज्यांच्यावर विश्वास आहे असे कॉंग्रेस चे नेतृत्व आहे. भारतात कॉंग्रेस पक्ष सोडून असा कोणता पक्ष आहे कि त्यातील एखाद्या नेत्याबद्दल देशातील सर्वधर्मियांना विश्वास वाटतो?

छान, काँग्रेसच योग्य पर्याय

ग्रेटथिन्कर
Sun, 12/01/2013 - 16:20 नवीन
छान, काँग्रेसच योग्य पर्याय वाटतो मला... गोरगरीब दलितांसाठी.
↩ प्रतिसाद: सचीन

कॉंग्रेस ६० वर्षे सत्तेवर

सचीन
Sun, 12/01/2013 - 12:07 नवीन
कॉंग्रेस ६० वर्षे सत्तेवर असताना कधी देशाच्या सर्वोच्च अशा संसदेवर हल्ला झाला का? कोणत्या अतिरेक्याला कॉंग्रेस चे राज्य असताना स्वताच्या शेजारी विमानात बसवून एखाद्या मंत्र्याने त्याच्या साथीदाराकडे नेले का?

>>> कॉंग्रेस ६० वर्षे सत्तेवर

श्रीगुरुजी
Sun, 12/01/2013 - 12:59 नवीन
>>> कॉंग्रेस ६० वर्षे सत्तेवर असताना कधी देशाच्या सर्वोच्च अशा संसदेवर हल्ला झाला का? काँग्रेस सत्तेवर नसताना कधी ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुम्बई स्टॉक एक्सचेंज, एअर इंडिया इमारत, मुम्बईतल्या लोकल्स इ. असंख्य ठिकाणी असंख्य हल्ले झाले होते का? >>> कोणत्या अतिरेक्याला कॉंग्रेस चे राज्य असताना स्वताच्या शेजारी विमानात बसवून एखाद्या मंत्र्याने त्याच्या साथीदाराकडे नेले का? सप्टेंबर १९९३ मध्ये लष्कराने वेढा देऊन कोंडले असताना कोणत्या आणि किती अतिरेक्यांना हलाल चिकन बिर्याणी, हलवापुरी, बिसलेरी जल इ. पदार्थांची मेजवानी देऊन सन्मानाने पाकिस्तानला जाऊन देण्यात आले होते?
↩ प्रतिसाद: सचीन

मला आधी हे सांगा की हा शरद

सुहास..
Sun, 12/01/2013 - 12:13 नवीन
मला आधी हे सांगा की हा शरद पवारसाहेब कोण ?

अ‍ॅलर्ट

पैसा
Sun, 12/01/2013 - 12:20 नवीन
ट्रोल अ‍ॅलर्ट! Image removed.

>>> देशाला कॉंग्रेस शिवाय

श्रीगुरुजी
Sun, 12/01/2013 - 13:23 नवीन
>>> देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे. देशाची वाट लावायला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे. >>> पण कॉंग्रेसचा का? इतर पक्ष का नको असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. आम्हाला नाही असला प्रश्न पडत. देशाची वाट लावण्याचे कौशल्य काँग्रेसइतके दुसर्‍या कोणत्याच पक्षाकडे नाही. >>> २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. देशाला लोकशाहीची ओळख झाली.हि अनमोल लोकशाही जपण्याचे महत्वाचे काम कॉंग्रेसने केले. फिदी फिदी ... >>> अफाट लोकसंख्या,हजारो जाती, अनेक भाषा, विविध धर्म ह्या साऱ्या घटकांचा समतोल सावरत कॉंग्रेसने देशाचा डोलारा सावरला. त्याच बरोबर देशाला विकासाच्या वाटेवर आणले. देशाचा विकास काँग्रेसमुळे झाला नसून काँग्रेस अनेक वर्षे सत्तेवर असूनसुद्धा झालेला आहे. >>> कॉंग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. १८८५ साली स्थापन झालेल्या कॉंग्रेसने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल ह्यासारखे अनेक खंदे स्वातंत्र्य सेनानी देशाला दिले. त्यांच्या आणि अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या अनमोल सहकार्याने देश स्वतंत्र झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद इ. नी अत्यंत हालअपेष्टा सोसल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांनाही जर गाद्यागिरद्या, लोडतक्के, पंखे इ. सुविधा असलेली स्थानबद्धता मिळाली असती तर देश कधीच स्वतंत्र झाला नसता. >>> स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर महात्माजींनी कॉंग्रेस पक्ष विसर्जित करा असा सल्ला दिला होता. पण देशाला स्वातंत्र्य पर्यंत आणल्यावर असे निर्नायकी अवस्थेत सोडणे चुकीचे होते. कॉंग्रेस जणांनी महात्माजींचा हा सल्ला झुगारला. खुद्द महात्माजींचा सल्ला झुगारून आपल्यात पक्षांतर्गत लोकशाही आहे हे कॉंग्रेस ने सिद्ध केले. कसली डोंबलाची लोकशाही? दारूची चटक लागलेला प्रत्यक्ष आपल्या मातापित्यांचे सुद्धा ऐकत नाही. मग सत्तेची चटक लागलेले गांधींचे काय ऐकणार? >>> १९४८ साली महात्माजींचा निर्घुण खून करण्यात आला त्यानंतर स्वतंत्र भारतात लोकशाहीची ज्योत तेवत ठेवली ती कॉंग्रेसने आज भारतात एकही असे गाव नाही जेथे कॉंग्रेस पक्ष नाही . भारतात असे एकही गाव नाही जिथे दारूगुत्ता, भ्रष्टाचारी, गावगुंड नाहीत. >>> देशातील सर्वसामान्य, धर्मनिरपेक्ष,गोरगरीब, दलित मागासवर्गीय ह्यांना हा पक्ष आपला वाटतो. आणि कॉंग्रेस च्या नेत्यांनीही ह्या लोकांचा विश्वास तुटू दिला नाही. देश आज जो विकासपथावर आहे त्याचे मुख्य कारण कॉंग्रेसने सत्ता जनतेसाठी राबवली. जाती धर्माच्या नावावर कधीही राजकारण केले नाही. सर्वसामान्य माणूस हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला मग तो कुठल्याही जाती धर्माचा का असेना. खि खि खि खि ... >>> आता जी २०१४ ची निवडणूक होत आहे त्यात कॉंग्रेस च सत्तेवर येईल ह्यात शंका नाही मात्र दुर्दैर्वाने कॉंग्रेस सत्तेवर आली नाही तर देशाकडे नेतृत्व करण्यासाठी कुठले पर्याय आहेत जे आपल्या नेतृत्वाने देशाला सावरू शकतील. माझ्या मते कॉंग्रेस चे सरकार आले नाही तर तीन नेते असे आहेत ज्यांच्याकडे देशाचे नेतृत्व आले तरी देशाचा विकास करण्याची आणि देशातील सर्वसामान्यांना बरोबर घेवून जाण्याची त्यांची क्षमता आहे. हे ३ नेते म्हणजे दिग्विजय, बेनीप्रसाद वर्मा आणि अमरसिंग >>> त्यातील पहिले नाव आहे शरद पवार साहेबांचे.शरद पवार ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात जाणता राजा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात पूर्वी प्रतिशिवाजी म्हणून ओळखले जाणारे नेते होते. ते जेव्हा काँग्रेसच्या दारात ९ महिने ताटकळत होते, तेव्हा जनतेला खरी ओळख पटली. जाणता राजा ही उपाधी अशीच आहे. >>> महाराष्ट्राचा आतापर्यंतचा सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रगतीपथावर वाटचाल केली. भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला आणि धडाडीने काम करण्याची क्षमता असलेला नेता. अल्पसंख्यांक, स्त्रिया, शेतकरी ह्यांच्या समस्येची जाण असणारा आणि ते सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारा नेता म्हणजे शरद पवार. शरद पवार जर प्रधानमंत्री झाले तर ते भरीव कामगिरी करू शकतात ती क्षमता त्यांच्यात आहे. हसून हसून पोट दुखायला लागलं. >>> दुसरा नेता म्हणजे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्य मंत्री मायावतीजी. त्यांनी उत्तर प्रदेशात जो सोशल इंजीनियरिंगचा प्रयोग करून सत्ता खेचून आणली होती ते आश्चर्यजनक होते. केडर बेस पार्टी म्हणून ब स पा कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.तसेच देशातील दलित व अल्पसंख्याकामध्ये मायावतीजी ह्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. शतकानु शतके सामाजिक विषमतेखाली पिचणाऱ्या समाजाला देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्तेवर आणून दाखवणे हे मायावतींचे ऐतिहासिक कर्तुत्व आहे. जर उत्तर प्रदेशात त्यांचा पक्ष ४० जागा पर्यंत मजल मारू शकला तर त्या सत्ता स्थापन करण्यात महत्वाची भूमिका अदा करू शकतात. मायावती जर पंतप्रधान झाली तर पुढील ५ वर्षात भारतातल्या पानपट्टींच्या ठेल्यांची जेवढी संख्या आहे, त्याच्यापेक्षा जास्त संख्येने तिचे स्वतःचे पुतळे उभारले जातील. >>> तिसरा नेता म्हणजे मुलायम सिंग यादव. जयप्रकाश नारायण सारख्या कर्तुत्ववान नेत्याचा मुशीत तयार झालेला कर्तुत्ववान नेता. नाव मुलायम असले तरी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्यात वाकबगार. ज्यावेळी लोकपाल बिल आणून घटनेचे उल्लंघन करण्याचे प्रयत्न चालू होते तेव्हा मुलायम सिंग आणि लालूप्रसाद यादव हे ह्या बिलाच्या विरोधात ठामपणे उभे राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश विकास करत आहे. आता बास झालं हं. हसून हसून गडाबडा लोळायला लागलोय. >>> मात्र दुर्दैवाने ह्यांच्या पैकी कोणीही सत्तेवर आले नाही तर मात्र देश निर्नायकी अवस्थेपर्यंत पोहोचण्याची स्तिथी आहे भारताचा दुसरा पाकिस्तान होईल अशी साधार भीती वाटते. आज आपण मोकळ्या वातावरणात राहत आहोत. लोकशाहीचे फायदे उपभोगत आहोत. पण नंतर मात्र पाक, अफगाणिस्थान इथे जशे फतवे निघतात तसे फतव्याचे राजकारण होण्याची शक्यता आहे. तुमचं वय किती? तुही इयत्ता कंची? >>> आधुनिक लोकशाहीत मंगळावर स्वारी करणारा आपला देश पुराणकाळात जाण्याची शक्यता वाटते तुमच्या बालबुद्धीचा हेवा वाटतो. असेच लेख लिहीत चला आणि करमणूक करत चला.

गुर्जी साहेब ,

विद्युत् बालक
Sun, 12/01/2013 - 13:29 नवीन
गुर्जी साहेब , कशाला कॉंग्रेसच्या बगल बच्च्यांच्या व नाठाळांच्या नादी लागताय ? रविवारच्या दिवशी मस्त आराम करा झाली तेवढी करमणूक भरपूर झाली
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भाजपच्या सतरंज्या

ग्रेटथिन्कर
Sun, 12/01/2013 - 16:24 नवीन
भाजपच्या सतरंज्या उचलणार्यांना कशाला काय सांगताय
↩ प्रतिसाद: विद्युत् बालक

२०१४ मध्येही यांच्या

सचीन
Sun, 12/01/2013 - 13:24 नवीन
२०१४ मध्येही यांच्या पृष्ठभागावर जनता असाच सणसणीत लत्ताप्रहार करणार आहे.>>>>>>> गेली ११ वर्षे जनता कोणाच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करत आहे ते हि सांगा गुरुजी

>>> गेली ११ वर्षे जनता

श्रीगुरुजी
Sun, 12/01/2013 - 13:27 नवीन
>>> गेली ११ वर्षे जनता कोणाच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करत आहे ते हि सांगा गुरुजी गेली साडेनऊ वर्षे काँग्रेसची टोळी जनतेच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करत आहे आणि तुमच्यासारख्यांना या लाथा गोड वाटत आहेत.

भाजपच्या काळात रामराज्यच होते

ग्रेटथिन्कर
Sun, 12/01/2013 - 16:28 नवीन
भाजपच्या काळात रामराज्यच होते...वाजपेयीला लोक अशानं आळशी होतील असं वाटलं मग ते आपणहून पायउतार झाले.. कित्ती तो त्याग.... हो की नै रे गुर्जी
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सप्टेंबर १९९३ मध्ये लष्कराने

सचीन
Sun, 12/01/2013 - 13:29 नवीन
सप्टेंबर १९९३ मध्ये लष्कराने वेढा देऊन कोंडले असताना कोणत्या आणि किती अतिरेक्यांना हलाल चिकन बिर्याणी, हलवापुरी, बिसलेरी जल इ. पदार्थांची मेजवानी देऊन सन्मानाने पाकिस्तानला जाऊन देण्यात आले होते?>>>> गुरुजी तुमच्या कडेच हे पदार्थ बनवण्याचे कंत्राट दिलेले होते वाटते पदार्थांची नावे अगदी बरोबर सांगताय म्हणून विचारले

तुम्ही बालीश प्रश्न विचारू

श्रीगुरुजी
Sun, 12/01/2013 - 13:33 नवीन
तुम्ही बालीश प्रश्न विचारू नका. नवीन लेख पाडा. तेवढीच सर्वांची फुकट करमणूक.
↩ प्रतिसाद: सचीन

आला का लायनीवर ?

विद्युत् बालक
Sun, 12/01/2013 - 13:35 नवीन
आला का लायनीवर ? उत्तर नसले कि घसरलेच हे वैयक्तिक पातळीवर
↩ प्रतिसाद: सचीन

>>> गुरुजी तुमच्या कडेच हे

श्रीगुरुजी
Sun, 12/01/2013 - 14:13 नवीन
>>> गुरुजी तुमच्या कडेच हे पदार्थ बनवण्याचे कंत्राट दिलेले होते वाटते पदार्थांची नावे अगदी बरोबर सांगताय म्हणून विचारले नाही हो. आम्हाला कसं हे कंत्राट मिळणार! कंत्राटं हिसकावणे आणि त्याद्वारे प्रचंड खादाखादी करणे ही तुमच्या धर्मनिरपेक्ष पक्षाची कामं.
↩ प्रतिसाद: सचीन

कशाला कॉंग्रेसच्या बगल

सचीन
Sun, 12/01/2013 - 13:35 नवीन
कशाला कॉंग्रेसच्या बगल बच्च्यांच्या व नाठाळांच्या नादी लागताय ? रविवारच्या दिवशी मस्त आराम करा झाली तेवढी करमणूक भरपूर झाली>>>> शरद पवारांच्या आजाराविषयी प्रतिसाद दिल्यामुळे नाठाळ कोण आहे हे कळले . जा रविवारचा दिवस आहे बालका खेळत बस

सध्या शरद पवारची अवस्था एक

विद्युत् बालक
Sun, 12/01/2013 - 13:40 नवीन
सध्या शरद पवारची अवस्था एक पाय यु पी ए मध्ये तर दुसरा पाय तिसऱ्या आघाडीत ठेवता ठेवता त्यांच्या पंतप्रधान बनण्याच्या प्रदीर्घ स्वप्नावर मात्र मधल्या मध्ये पाणी पडतेय बघा

डोळे दिपवणारा लेख

बाळराजे
Sun, 12/01/2013 - 13:41 नवीन
*dash1* *DASH* *WALL*

शरद पवार हे धर्मनिरपेक्ष

सचीन
Sun, 12/01/2013 - 13:56 नवीन
शरद पवार हे धर्मनिरपेक्ष वृतीचे नेते आहेत. ९ खासदारांचे १९० करण्याचा अजेंडा त्यांच्या कडे नाही.

धर्मनिरपेक्ष वृतीचे नेते

विद्युत् बालक
Sun, 12/01/2013 - 14:06 नवीन
धर्मनिरपेक्ष वृतीचे नेते म्हणजे काय हो? मुस्लिम नेत्यांच्या मांडीला मांडी लावून इफ्तार पार्टी झोडणे कि गल्लीत कोणी विचारेना व दिल्लीत कोणी भिक घालेना म्हणून परत दिल्लीश्वरांचे बूट पोलिश करणे?
↩ प्रतिसाद: सचीन
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा