✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्वच्छ मन

M
mohite jeevan यांनी
Sun, 11/10/2013 - 16:05  ·  लेख
लेख
मी आँफीसमधुन घरी जात होतो,पुढे काही आतंरावर ट्राफीक जाम होते,मी माझ्या बाईकचा वेग़ कमी केला आणि माझी बाईक एका फोर व्हीलर ग़ाडी माग़े थाबवली. तेथे प्रत्येकजण त्या ट्राफीक मधुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता,ग़ाडीचा आवाज,लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता.त्यातुनच एक आवाज येत होता,तेथे जवळच्याच एका मशीदीत नमाजचा आवाज येत होता.त्या थांबलेल्या जागेवरच मी विचार केला,'प्रत्येक लोकांचा देव वेग़ळा आसतो,मला ते काय म्हणतात याचा आभ्यास करुन जाणुन घ्यायची इच्छा झाली,'त्यावेळी आनेक विचार मनात येत होते. शेवटी त्या ट्राफीकमधुन मी बाहेर पडलो व त्या विचारात आसल्याने सहजच माझे लक्ष नेहमीच्या मार्गा वरील त्या चर्चवरील क्राँसवर लक्ष ग़ेले. मग़ माझ्या मनात विचार आला,' लोक येशु क्राँसवर आसताना त्याचे स्मरण कसे करु शकतात?कारण येशुतर वेदनेत आसतो,' मनात त्या धर्माचा ही आभ्यास करावयाचा वाटला,मी काही वेळातच घरी आलो.समोरच श्री रामचा फोटो पाहिला आणि समाधान पावलो.कारण मी रामायण भग़वतनेग़ीता वाचली होती, आता मला कुराण,बायबल वाचण्याची इच्छा झाली. बायको माहेरी ग़ेली होती,मी कपडे बदलून,चेहराधुण्यासाठी बेसवाँश कडे ग़ेलो,चेहरा धुण्या अग़ोदर एक नजर चेहरा आरशात पाहीला,आज चेहरा माझा वेग़ळाच दिसत होता. त्या चेहर्यात मला साई बाबा दिसत होते,मग़ मला जाणवले,'हे तर साई बाबाच आहे,ती दाढी ते डोळे सर्व काही मी साई बाबा आसल्याचे सांग़त होते,मग़ मीच डोळे मिटवले व डोके त्या आरशाला टेकवले,' मी विचार करत होतो की,'साई बाबा माझ्यात का आले?,काय तो भ्रम होता की काही कारण होते,' मग़ सग़ळ्यात त्रासदायक प्रश्न होता की,'आसे मला का वाटावे?काय मी भारतातील नविन देव किंवा संत बनणार आहे का?,' मग़ मला वाटु लाग़ले,'भारताची दशा पाहता भारताला एखाद्या संताची ग़रज आहे, काय मी त्यासाठी लायक आहे?,' आणि मी आपले डोळे हाळु हाळु उघडले व आरशात माझा चेहरा पाहु लाग़लो, आता तो साईचा चेहरा दिसत नव्हता.मी चेहरा बेसवाँश मध्ये धुतला व पुन्हा चेहर्याचे निरक्षण केले आणि वाटले आपला चेहरा साई बाबा सारखा तर आहे, डोळे,ओठ,कान व दाढी. मग़ मी साई बाबा विषयी वाचण्यास सुरवात केली,त्यावरुन मनात विचार आला की,साई बाबांचा कोणताही धर्म नव्हता,त्याच्याकडे सर्व धर्माचे लोक येत आसत,आणि त्याच्या दरबारात आजुन ही येतात,ते म्हणत 'सबका मालिक एक है,' रात्री खुप उशीरा मी झोपलो,दुसर्यादिवशी रविवार होता,त्यामुळे काही वाटले नाही. रात्री मला एक स्वप्न पडले,एका घोड्यावर हात फिरवत साई बाबा उभे आहेत,त्याच्या चेहर्यावर हास्य होते. त्यावरुन मला त्याची चुकलेल्या घोडीची कथा आठवली व मला तोच घोडा आसेल वाटले. मी स्वप्नात पाहिले की तो घोडा साई बाबा पासून दुर जात आहे,व तो काही अतंरावर उभा राहुन साईना पाहत आहे. साई बाबा दोन्ही हात पसरुन त्या घोड्याला बोलवत आहेत,पण घोडा त्याना पाहुन ओरडत आहे,मोठ मोठ्याने किंकाळ्या फोडत आहे. पण आचानक वार्याचे वादळ निर्माण होऊ लाग़ते.आता घोडा आणखिन जोरात किंकाळ्या फोडत आसतो. अचानक मला जाणवले की, तेथे कोणि ही साई बाबा नव्हते की,वार्याचे ते वादळ होते.पण त्या घोड्याचा आवाज मात्र येत होता.आचानक मी उठलो व डोळे उघडले,खिडकीतुन त्या घोड्याचा आवाज येत होता.मी खिडकी जवळ ग़ेलो, खिडकीतुन पाहीले, स्वप्नातील त्या साई बाबा जवळील त्या घोड्यासारखा घोडा, त्याचे पाय एका ग़टारीच्या लोखंडी सळीच्या जाळीत आडकलेला होता,त्याच्या पायातुन रक्त वाहत होते, जस जसे घोडा पाय ओढत आसे तस तसे त्याच्या वेदना वाढत होत्या,त्याच्या आवाज माझे ह्रदय हालवुन टाकत होते. मी रोडवर खिडकीतुन पाहिले सकाळी सकाळी काही लोक ये जा करत होते पण त्या घोडयाच्या वेदनेकडे कोणि ही पाहत नव्हते.मी चौथ्या मजल्यावर होतो. मग़ मीच विचार केला की,'मीच त्या घोड्याला बाहेर काढतो,पण नाही,मला तसे करताना कोणि विचारले तर?त्या घोड्याचा मालक आला तर?मी त्या घोड्याला सोडविताना लोक काय म्हणतील?लोकांनी विचारले तर?आणि मी काय सांग़ु?आजकाल कोणि कोणाची मदत करतो का?आजकाल जर एखादा प्रयत्न जर करत आसेल तर त्याच्यामाग़े सुद्धा लोक कारण शोधत आसतात? आसे विचार येऊ लाग़ले,' पण माझ्या डोक्यात विचार आला,साई बाबानी जर आसा विचार केला आसता तर लोकांची मदत केली नसती.मग़ मीच विचार केला,'लोकांची परवा न करता त्या घोड्याला सोडीवले पाहिजे व मी ही नाही ग़ेलो तर त्या लोकांत व माझ्यात काय फरक आसणार.माझ्या मनात एक वादळ निर्माण झाले, मला कधी एकदा त्या घोड्याला सोडवितो आसे वाटु लाग़ले.म्हणुन मी खाली जाण्यासाठी पँट घालु लाग़लो,चप्पल घातले व बाहेर पडणार तेवढ्याच त्या घोड्याचा आवाज बंद झाला. मी खिडकीतुन पाहिले तर खांद्यावर चाबूक आसलेला त्या घोड्याच्या मालकाने त्याला काढले होते.मग़ मला समाधान वाटले. मग़ मी आकाशाकडे पाहिले मला त्या आकाशात साई बाबाचा चेहरा दिसत होता. आणि माझ्या ह्रदयातुन एक आवाज आला ,'तु तुझे मन फक्त स्वच्छ ठेव,बाकी देवावर सोड.' *ओम साई बाबा*
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
23413 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

बॅटमॅना ते ठाउक

दिपक.कुवेत
Tue, 11/12/2013 - 17:58 नवीन
आहे रे. जीवनभौचा घोडा किंकाळी मारतोय म्हणुन आपलं विचारलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दिपक तो घोडावार्याचे

विजुभाऊ
Tue, 11/12/2013 - 18:47 नवीन
दिपक तो घोडा
वार्याचे
आवाज ऐकुन किंकाळतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

विजुभाऊ "घोडावार्याचे"

दिपक.कुवेत
Tue, 11/12/2013 - 19:26 नवीन
घोडा आणि वार्याचे....ह्या मधे जरा स्पेस द्या हो. नको त्या वेलांट्या डोळ्यासमोर येउन हसुन हसुन वेड व्हायला होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

"माझा आवडता पक्षी बदक" हा

मनराव
Tue, 11/12/2013 - 14:45 नवीन
"माझा आवडता पक्षी बदक" हा आंजावर फिरणारा निबंध आठवला......
  • Log in or register to post comments

पैसा वसुल

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 11/12/2013 - 14:48 नवीन
लोक गोविंदाचे चित्रपट का बघायला जातात? त्यामागे काहीतरी लॉजिक असेलच ना? तसेच जीवनभौंच्या कथांचे...
  • Log in or register to post comments

Ase vaatale race laavaal

चिम् चिम् मामा
Tue, 11/12/2013 - 14:58 नवीन
kaay mhanayache aahe raav tumhaalaa? Gaadi...Bike...Ghoda...! Ase vaatale race laavaal aataa.. Pan tirech puncture zale ki ho.
  • Log in or register to post comments

ही कथा जमली नाही

आनन्दा
Tue, 11/12/2013 - 15:30 नवीन
असे वाटते.. बाकी छान लिहिता.. लिहत जावा.
  • Log in or register to post comments

ठीक आहे आनन्दाभौ

mohite jeevan
Tue, 11/12/2013 - 16:46 नवीन
ठीक आहे आनन्दाभौ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

"पृथ्वी गोल आहे, कारण भाऊंचा

शैलेन्द्र
Tue, 11/12/2013 - 17:28 नवीन
"पृथ्वी गोल आहे, कारण भाऊंचा विचार खोल आहे" धन्यवाद जिवनभौ..
  • Log in or register to post comments

जीवन भौंचा पंखा

हरवलेला
Tue, 11/12/2013 - 18:25 नवीन
इतक्या कमी शब्दात "धर्मनिर्पेक्षता" समजावणारा लेखक विरळाच ! संपादकांना एक विनंती : एक नवीन लेखनप्रकार सुरु करा "जीवनकथा"
  • Log in or register to post comments

हरवलेलाभौ धन्यवाद.....

mohite jeevan
Tue, 11/12/2013 - 19:15 नवीन
हरवलेलाभौ धन्यवाद.....
  • Log in or register to post comments

मी घरी जायला निघाले होते.

पिलीयन रायडर
Tue, 11/12/2013 - 19:20 नवीन
मी घरी जायला निघाले होते..बसल्या जागी विचार केला की मि.पा पाहवे. मग मझ्या मनात विचार आला की जीवन भाऊंची कथा वाचावी. मग मी कथा पाहिली. मग माझ्या मनात विचार आला की मी आता प्रतिसांदाचा अभ्यास केला पाहिजे. मग मीच विचार केला की लोक काय म्हणतील. मग मी विचार केला की साईबाबांना काय वाटेल. विचार आला की येशुला वेदना होतील. मग मीच पुन्हा विचार केला.. का मी डोक्याच इत्कं दही करुन घेतलं.. मी बॅग घेऊन चालु लागले...
  • Log in or register to post comments

काय हे पाप?

साती
Tue, 11/12/2013 - 19:32 नवीन
तुला कुराणातील आयता, उद्याचा मोहर्रम, मशीदीतली बांग यांपैकी कशाचीच आठवण झाली नाही? ठेव ती बॅग खाली आणि परत विचार कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

रायडरतै....

दिपक.कुवेत
Tue, 11/12/2013 - 19:31 नवीन
एवढ करुन कथा कळली कि नाहि? संक्षीप्त स्वरुपात.....नेहमी बेसवॉश वर तोंड धुवावे आणि मग चेहरा आरशात पहावा, खाली जाताना नेहमी पँट/चप्पल घालून जावे, येताना-जाताना आजुबाजुला नेहमी कुठला घोडा किंकाळि तर मारतनाहि ना हे पहावे, मारत असेल तर त्या मागचे कारण जाणुन घेउन त्यास (घोड्यास) मदत करणे, नवर्‍याला माहेरी (त्याच्या स्वःताच्या नव्हे) पाठवणे ई. ई.....
  • Log in or register to post comments

कथा न समझल्यास ....... उग़ाच

mohite jeevan
Tue, 11/12/2013 - 20:30 नवीन
कथा न समझल्यास ....... उग़ाच विचार करत बसु नका
  • Log in or register to post comments

ये बेष्ट हय!

प्यारे१
Tue, 11/12/2013 - 21:12 नवीन
ये बेष्ट हय! काय ते तुमचं तुम्ही बघा, नका बघू किंवा कसंही. उगा जीवाला तरास करुन घिऊ नगा! कसं जीवन भो. काडा चंची काडा. फुडच्या 'कथेचा' प्लॉट बनवू. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mohite jeevan

@उग़ाच विचार करत बसु नका>>>

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/12/2013 - 21:17 नवीन
@उग़ाच विचार करत बसु नका>>> खिक्क!!! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mohite jeevan

वशाडी येवो !!

सूड
Tue, 11/12/2013 - 21:29 नवीन
काय्येक कळलं नाय..
  • Log in or register to post comments

वा!!! अप्रतिम!

रामपुरी
Wed, 11/13/2013 - 01:58 नवीन
सामंतकाकांची उणीव भरून काढणारा लेखक अखेर मिपाला लाभलाच म्हणायचा... पु ले प्र (अवांतरः चेसुगुंची उणीव भरून काढणारा लेखक अजून मिळालेला नाही. जन्मालाच आला नसावा बहुधा.)
  • Log in or register to post comments

@जन्मालाच आला नसावा बहुधा>>>

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/13/2013 - 06:38 नवीन
@जन्मालाच आला नसावा बहुधा>>> Image removed. मुळातच चेसुगू ही साहित्य क्षेत्रातील एक भरीव उणीव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

मुळातच चेसुगू ही साहित्य

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 09:18 नवीन
मुळातच चेसुगू ही साहित्य क्षेत्रातील एक भरीव उणीव आहे.
वा!, शब्दांची रांगोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या ह्या...!

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/13/2013 - 12:37 नवीन
ह्या ह्या ह्या...! =)) आणि कधी कधी रांगोळी, हेच शब्द! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

चेतन सुभाष गुगळे असं पूर्ण

प्यारे१
Wed, 11/13/2013 - 12:48 नवीन
चेतन सुभाष गुगळे असं पूर्ण नाव घ्या रे. काय वाटत असेल त्यांना?.... चिंचवडात! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

प्यारे..... तू.......!

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/13/2013 - 14:13 नवीन
=)) प्यारे..... तू.......! Image removed. (पुणे गेट कट्ट्या'ची अठवण झालेला) आत्मू =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कथा बीज चांगले आहे. एखादे

पक्या
Wed, 11/13/2013 - 05:07 नवीन
कथा बीज चांगले आहे. एखादे चांगले कार्य हातून घडत नसेल तरी (म्हणजे ते करण्यात अडचणी येत असल्या उदा. एखाद्याला मदत वगैरे ) निराश होऊ नये. दुसरयाचे भले करण्याचा विचार तरी आपल्या मनात आला हे ही नसे थोडके. नाहीतर हल्ली सगळी कडे असंवेदनशीलताच खूप दिसते. असे काहीसे लेखकाला सांगायचे आहे हे समजले. पण कथा नीट फुलवता आली नाही किंवा शब्दयोजना चांगली झाली नाही. त्यामुळे कथेचा प्रभाव वाचकांवर पडत नाहीये . शुध्दलेखनाकडे लक्ष दिल्यास आपले लिखाण वाचण्यास त्रास होणार नाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद जय महाराष्ट्र

mohite jeevan
Wed, 11/13/2013 - 12:01 नवीन
धन्यवाद जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

त्यांच नांव पक्या आहे!

संजय क्षीरसागर
Wed, 11/13/2013 - 13:52 नवीन
तुम्ही त्यांना डायरेक्ट "जय महाराष्ट्र" केलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mohite jeevan

आरे हो ...धन्यवाद पक्या

mohite jeevan
Wed, 11/13/2013 - 15:30 नवीन
आरे हो ...धन्यवाद पक्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

गोष्टीतला 'किंकाळ्या फोडणारा'

सोत्रि
Wed, 11/13/2013 - 09:42 नवीन
गोष्टीतला 'किंकाळ्या फोडणारा' घोडा वाचून हे आठवले. Image removed. - (मन स्वच्छ करण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

धन्यवाद

mohite jeevan
Wed, 11/13/2013 - 20:03 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

धन्यवाद

चित्रगुप्त
Wed, 11/13/2013 - 22:23 नवीन
धन्यवाद. च्यामारी, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद वाचून मुळात काय प्रतिसाद देणार होतो, तेच विसरलो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mohite jeevan

तु तुझे मन फक्त स्वच्छ ठेव,बाकी देवावर सोड.'

संजय क्षीरसागर
गुरुवार, 11/14/2013 - 00:06 नवीन
हा जीवनभौंचा फंडा आहे. तुम्ही काहीही म्हणा, ते फक्त एकच म्हणणार : धन्यवाद! चलो जीवनभौ, म्हणा पुन्हा एकदा ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

आहो धन्यवाद म्हणायला

mohite jeevan
गुरुवार, 11/14/2013 - 07:03 नवीन
आहो धन्यवाद म्हणायला समोरच्याची ही तशी लायकी लाग़ते........ उग़ाच कोणाला ही म्हणता येत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

चिडू नका हो जीवन भौ.

हरवलेला
गुरुवार, 11/14/2013 - 17:37 नवीन
तुमचं चालू दे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mohite jeevan

चिडने चिडवने ह्या शब्दाशी खुप

mohite jeevan
गुरुवार, 11/14/2013 - 17:54 नवीन
चिडने चिडवने ह्या शब्दाशी खुप संबंध दिसतो तुमचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरवलेला

आता माझा गुन्हा काय?

हरवलेला
गुरुवार, 11/14/2013 - 18:01 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mohite jeevan

चिडु नका हो भौ

mohite jeevan
गुरुवार, 11/14/2013 - 18:10 नवीन
चिडु नका हो भौ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरवलेला

मी कुठे चिडलो ?

हरवलेला
गुरुवार, 11/14/2013 - 18:21 नवीन
सहज विचारलं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mohite jeevan

मन स्वच्छ करण्याच्या

बॅटमॅन
गुरुवार, 11/14/2013 - 03:32 नवीन
मन स्वच्छ करण्याच्या प्रयत्नात असलेला
कुठे बेसवॉशवर का =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

जीवनभौ सारख्या जातिवंत

आनन्दिता
Wed, 11/13/2013 - 21:48 नवीन
जीवनभौ सारख्या जातिवंत लेखकाच्या प्रांजळ लेखकाची जुन्याजाणत्या लोकांनी अशी टर उडवलेली पाहुन एक मिपाकर म्हणून शरम वाटली.
  • Log in or register to post comments

+१

हरवलेला
गुरुवार, 11/14/2013 - 17:24 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

लिहित राहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/14/2013 - 14:46 नवीन
अरे देवा, लेखन वाचायचं राहीलं होतं. रिकामं मन असलं की असे काहीबाही विचार येतात. लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

रिकाम्या मनाला भर घाला डाँ

mohite jeevan
गुरुवार, 11/14/2013 - 16:59 नवीन
रिकाम्या मनाला भर घाला डाँ.साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>डाँ.

प्यारे१
गुरुवार, 11/14/2013 - 17:51 नवीन
>>>डाँ. खिक्क्क्क दिसण्यावर जाऊ नका हो मोहिते आण्णा. डाँ दिसत असले तरी ते प्रा. डॉ. आहेत. ;) ओ डाँ साहेब, बरोबर ना? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mohite jeevan

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/15/2013 - 09:43 नवीन
>>> ओ डाँ साहेब, बरोबर ना? प्रोत्साहान देण्याचं धोरण आडवं येतंय मला. नै तर चांगलं स्वच्छ केलं असतं मन :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पुन्हा पुन्हा वाचावीशी

अधिराज
गुरुवार, 11/14/2013 - 18:00 नवीन
पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटणारी कथा. लवकरच जीवनभौ फॅन क्लब तयार होईल असे वाटत आहे.
  • Log in or register to post comments

च्यायला हेवा वाट्ला हो जिवनभौ

पियुशा
Fri, 11/15/2013 - 13:44 नवीन
च्यायला हेवा वाट्ला हो जिवनभौ तुमचा , आल्या आल्या सेंचुरी गाठली ;) खर खर सांगा कुणाला कुणाला सुपारी दीली ;)
  • Log in or register to post comments

अरे बाप रे........!

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/15/2013 - 13:46 नवीन
अरे बाप रे........! . . . . . . . . अजुनही स्वच्छ झालं नै वाटतं? =))
  • Log in or register to post comments

नाय ब्वॉ नुसत वॉशिंग बेस

पियुशा
Fri, 11/15/2013 - 13:49 नवीन
नाय ब्वॉ नुसत वॉशिंग बेस मध्ये चेहरा धुवुन मन नाय स्वच्छ होत आमच ;)
  • Log in or register to post comments

बेसवॉशमधे नित्य चेहरा धुणारा

चित्रगुप्त
Fri, 11/15/2013 - 19:22 नवीन
बेसवॉशमधे नित्य चेहरा धुणारा: मॉडेल शोबुज खान https://www.facebook.com/InsideGhaziabadConfessions इंग्रजीची ट्यूशन लावण्यासाठी मॉशोखा शी संपर्क करा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा