✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कायदेशीर दहशदवाद

न
नित्य नुतन यांनी
Fri, 08/23/2013 - 16:11  ·  लेख
लेख
कलम ४९८ अ - कायदेशीर दहशदवाद (Legal Terrorism) परवाच भावाचा फोन आला. त्याच्या मित्राच्या बायकोने त्याच्या मित्रावर ४९८ अ (हुंडाविरोधी कायदा) च्या नावाखाली गुन्हा दाखल केला होता आणि पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता त्या मित्राला, त्याच्या वृद्ध आई वडीलांना आणि भावाला तुरुंगात टाकले. तुरुंगातून बाहेर सोडण्यासाठी पोलिसांनी ७०००० रु ची मागणी केली... मित्राच्या लग्नाला १ महिनाच झालेला होता ... त्यातहि तो आंतरजातीय प्रेमविवाह ... तरीही कुठलेही जातीभेद न मानता दोन्ही घरातील मोठ्यांनी कौतुकाने आणि हौशीने सगळे सोपस्कार केले होते... नवरा बायको दोघं software तज्ञ... पैसे, हुंडा या गोष्टीना कल्पनेतही थारा नव्हता ... मग असे झालेच कसे..???? पण खरी स्टोरी ऐकली आणि प्रचंड संताप झाला ... नवर्या मुलीला साखरपुड्यानंतर साक्षात्कार झाला कि तिचं आता दुसरयाच मुलावर प्रेम बसले आहे .. आणि तरीही वडिलांच्या इज्जतीसाठी तिने पहिल्याच मुलाशी लग्न केले कारण साखरपुडा मोडायचा नव्हता ... पण तिचे ते प्रेम प्रकरण लग्नानंतर चालूच राहिले .. हे जेव्हा सासरच्यांच्या लक्षात आले तेव्हा पुढचा धोका ओळखून मुलीच्या बापाने आधीच मुलीच्या सासरच्यांवर हुंडाबळीच्या खोट्या केसेस टाकल्या आणि इतकेच नाही तर 3० लाख दिलेत तरच केसेस काढू अशी धमकी पण दिली ... आता याला काय म्हणावे ... चोर तो चोर वर शिरजोर... भारतातले हुंडा विरोधी कायदे हे असे exploit होतात कारण ते पूर्णता स्त्रियांच्या बाजूने झुकते माप देतात .. ज्यांना खरी गरज आहे त्यांना असा कायदा आहे.. हे ही माहित नसते... आणि उच्च शिक्षित मुली व त्यांचे पालक या कायद्यांचा असा गैरवापर करतात...आदरणीय सुप्रीम कोर्टाने पण अश्या गैरवापरांची दखल घेऊन या कायद्याला Legal Terrorism असे म्हटले आहे ... जी निष्पाप कुटुंबे अश्या खोट्या केसेना बळी पडून स्वताची जिवाभावाची माणसे गमावतात त्यांना कोणीच वाली नसतो.. परवाच दिल्ली कोर्टात अशाच एका तरुणाने कोर्टाच्या इमारतीतून उडी मारून जीव दिल्याचे ऐकले ... काही महिन्यांपूर्वी बेंगळूर मध्ये हि एका संगणक तज्ञाने अशाच कारणासाठी आत्महत्या केली ... सुरुवातीला वाटले कि अशी माणसे केस लढून आपले निर्दोषत्व सिद्ध का करत नाही. पण भावाच्या मित्राकडून कळले कि हा कायदा इतका मानवताविरोधी आहे .. .कि मुलीच्या सासरच्यांना घरातुन हाकलून अख्खं घर सुद्धा मुलीला देता येण्याची तरतूद यात आहे ... शिवाय केस चालू असे पर्यंत मुलीला खर्चापोटी दर महिना २० - २५ हजार पर्यंत सुद्धा पोटगी देण्याची आज्ञा कोर्ट करु शकते..म्हणजे गुन्हा सिद्ध होण्या आधीच अटक आणि अवास्तव खर्चाच्या ओझ्याने सासरची मंडळी पाणी मागू लागतात... खरच खूपच अविश्वसनीय आणि विदारक सत्य आहे हे .. त्या मुळे आज काल अशा हुंडा बळीच्या बातम्या ऐकल्या की संशयाची सुई प्रथम स्त्री कडेच जाउ लागली आहे ...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32912 वाचन

💬 प्रतिसाद (99)

प्रतिक्रिया

काहीतरी घोटाळा..

चिगो
Mon, 09/09/2013 - 22:32 नवीन
काहीतरी घोटाळा होतोय, संक्षी.. मी भारतातल्या मेघालयातील गारोहील्समधल्या आदिवासी लोकांबद्दल बोलतोय.. तुम्ही मला उसाच्या देशातल्या मिपाकरांशी कन्फ्यूज केलंत का काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

करेक्ट!

संजय क्षीरसागर
Mon, 09/09/2013 - 23:27 नवीन
माझा भूगोल कच्चा आहे. कारण शाळेत मित्रांनी एक फंडा काढला होता : ज्या गावाला जायचं नाही त्याचा पत्ता विचारयाचा नाही.... पण मेघालयात तर बालविवाहाला बंदी हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

बंदी असेल हो..

चिगो
Tue, 09/10/2013 - 15:28 नवीन
पण बघत कोण बसणार? तसेही ७ वर्षापर्यंत शिक्षा असलेले गुन्हे, जर त्यात दोन्ही पक्ष गारो असतील तर हिल कौंसिलच्या कोर्टात जातात, ज्यांचा कारभार माशाल्लाह असतो.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बेवर्ली हिल्स आणि गारो हिल्स मधे हाच फरक आहे बघ!

संजय क्षीरसागर
Tue, 09/10/2013 - 23:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

फरक..

चिगो
Wed, 09/11/2013 - 19:05 नवीन
हा तर आहेच, पण फार महत्त्वाचा नाही.. इतका नसला, तरी बर्यापैकी मोकळेपणा गारो हिल्समध्ये पाहीला आहे.. बाकी बेवर्ली हिल्स आणि गारो हिल्समध्ये लाख फरक आहेत.. दोन्ही बघितल्याने फारच चांगल्याने ठाऊक आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बघ ना, आपण त्यांच्या नकोनको त्या गोष्टी उचलतो

संजय क्षीरसागर
Wed, 09/11/2013 - 22:44 नवीन
आणि ते नेमक्या हव्या त्या गोष्टी उचलतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

फक्त शारीरिक संबंध असतील आणि

नित्य नुतन
गुरुवार, 08/29/2013 - 14:10 नवीन
फक्त शारीरिक संबंध असतील आणि लग्न झालेले नसेल तरीही ते लग्न मानले जावे असाही कुठे तरी निर्णय झाल्याचे वाचल्यासारखे वाटते .. नीट आटवत नाही ...
  • Log in or register to post comments

हो...हे ही वाचलय..

पिलीयन रायडर
गुरुवार, 08/29/2013 - 15:17 नवीन
हो...हे ही वाचलय.. म्हणजे संबंधाना लग्नात कन्वर्ट करता येईल.. पण त्याला बलात्कार म्हणता येणार नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नित्य नुतन

मद्रास हायकोर्टाने बहुधा

llपुण्याचे पेशवेll
Fri, 08/30/2013 - 10:10 नवीन
मद्रास हायकोर्टाने बहुधा निकालात असे म्हटले कोणत्यातरी. की लग्नाचं वचन देऊन शारीरीक संबंध ठेवले आणि काही कारणाने लग्नं होऊ शकले नाही तर ते शारीरीक संबंध म्हणजे बलात्कार किंवा फसवणूक होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नित्य नुतन

शारीरिक संबंध

कपिलमुनी
Fri, 08/30/2013 - 10:53 नवीन
शारीरिक संबंध ठेऊन मुलीने लग्नाला नकार दिला तर तो मुलावर बलात्कार असेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नित्य नुतन

कपिलदेव, आपल्या सारख्या मुनीवरला असा प्रश्न पडावा?

संजय क्षीरसागर
Fri, 08/30/2013 - 11:34 नवीन
शारीरिक संबंध ठेऊन मुलीने लग्नाला नकार दिला तर तो मुलावर बलात्कार असेल का ?
बलात्काराची व्याख्या `वरून खाली' अशी केली गेली आहे. पुरुषाला `वर' म्हणत असले तरी कायद्याच्यादृष्टीनं तो खाली आहे. हा वरवर जरी अन्याय (पक्षी पुरुषावर बलात्कार) असला तरी कायद्याला ते मान्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अवांतर

कपिलमुनी
Fri, 08/30/2013 - 12:49 नवीन
रीटायर झाल्यावर वकीलीची सनद घेउन जनहीत याचिका दाखल करून या सर्वांचा कीस पाडायची फार इच्छा आहे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मुनीवर, कीस पाडायचा कशाला?

संजय क्षीरसागर
Fri, 08/30/2013 - 13:08 नवीन
लग्न हे देण्याघेण्याचं नातं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

लग्नावर नाही ओ

कपिलमुनी
Fri, 08/30/2013 - 14:08 नवीन
काही प्रवृती कायद्याचा गैरवापर करतात..किंवा कायदा प्रत्येक वेळी पुरुषांना दोषी ठरवतो ..जसे वरती चर्चिल्या प्रमाणे फक्त पुरुष दोषी ठरतो ...अशा कायद्यांचा कीस पाडला पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

......फक्त पुरुष दोषी ठरतो!

संजय क्षीरसागर
Sat, 08/31/2013 - 10:52 नवीन
थोर कवि गदिमा लिहून गेले आहेतच; पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा, ...दोष ना कुणाचा. ते तमाम पुरुष जातीला लागू आहे. तरी व्यथित न होता मुनीश्री आपण, कायद्याच्या किसापेक्षा, किसमीस या पर्यायाची निवड करून सुखात आयुष्य व्यतित करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

एक असाच सांगितलेला किस्सा त्याहून भयानक आहे.

सूड
गुरुवार, 08/29/2013 - 16:57 नवीन
लग्नाआधी मुलीचं गावाबाहेरच्या दरवेषांच्या वस्तीतल्या एकाशी प्रेमप्रकरण चालू होतं. लग्न झालं, त्यानंतरही तिचं त्याला भेटायला जाणं चालूच होतं. मुलाला ही गोष्ट कळायच्या आत तिने आणि तिच्या प्रियकराने नवर्‍याला गावाबाहेर बोलवून त्याचा खून केला. खून म्हणजे सरळ शिर धडावेगळं!! वर्षभराने तपास लागला त्यात हे सगळं कळलं. मित्राकडून असं ऐकलंय की या वस्तीतून जायला भले भले घाबरतात, कारण हे लोक छोट्या वादासाठी पण सरळ हाणामारीवर उतरतात.
  • Log in or register to post comments

अशा प्रकारामध्ये

बाप्पू
गुरुवार, 08/29/2013 - 17:05 नवीन
अशा प्रकारामध्ये सत्य असत्य तपसन्याआधिच पोलिस आणि समाज नवरयाला आनि त्यच्या नातेवाइकाना गुन्हेगार समजुन मोकळे होतात... तसेच व्रुत्तपत्रामध्ये पण मुलगा आणि त्याच्या नातेवाइकांची नावे छापुन येतात. (सत्य असत्य तपसन्याआधिच) कारण सर्व कायदे स्त्रियांच्या बाजूने आहेत. पण आता त्यांचा गैर फायदा घेणार्यांचे वाढ्ते प्रमाण चिंताजनक आहे... :(
  • Log in or register to post comments

माझा एक जवळचा मित्र आहे.. खुप

आनन्दिता
गुरुवार, 08/29/2013 - 23:22 नवीन
माझा एक जवळचा मित्र आहे.. खुप चांगला , आणि सालस, ३ वर्षांपुर्वी त्याचं लग्न झालं. टिपिकल अरेंज मॅरेज.. साखरपुडा आणि लग्न यात २-३ महिन्यांचं अंतर... या काळात दोघांचं फोनवर बोलणं ही व्ह्यायचं... लग्न झालं आणि हनिमुन साठी म्हणुन दोघं मनाली वगैरे ला गेले... तर ती हलकट मुलगी तिकडुन परस्पर पळून गेली... फोन करुन चार ओळी बोलली ...की मी अमक्या तमक्या वर प्रेम करते, त्याच्या बरोबरच आयुष्य काढणार आहे.. मी माझ्या घरच्यांसमोर निघुन जाउ शकत नव्हते त्यामुळे लग्न करावं लागलं... हा बिचारा पुर्ण कोलॅप्स होऊन परत आला.. त्यावर ही अशक्य कडी म्हणजे... ती मुलगी ज्याच्यासाठी पळून गेली होती त्याने तुझं लग्न झालंय असं सांगुन हाकलुन दिली, तेव्हा परत सासरीच आली... घटस्पोट द्यायला ही तयार नाही... तिच्या आई-वडीलांना हे सगळं माहीत असुनही त्यांनी जबरदस्तीने तिचं लग्न लावुन दिलं... आणी आता पोरीला नांदवा नाहीतर " हूंड्याची केस टाकतो" अशा धमक्या हि द्यायला सुरुवात केली... माझ्या मित्राची साधीसुधी फॅमिली अगदी होरपळून निघाली... शेवटी आम्हा मित्रांपैकीच काहीजणांनी ओळखीतल्या एका मोठ्या पोलिस ऑफिसरला सर्व सांगुन त्याच्याकरवी त्या सगळ्यांना डोस टाकले.. तुमच्या मुलीची सगळी प्रेमपत्रं, sms रेकॉर्ड्स आमच्या कडे आहेत आणि, तो प्रियकर ही साक्ष देणार आहे बसा आता तुरुंगात अशी हुल ही दिली... आणि कसाबसा काहीही न देता घटस्फोट मिळवला... पण या सगळ्यात माझ्या सज्जन मित्राची प्रचंड वाताहात झालीय...
  • Log in or register to post comments

भीष्म/विचीत्रवीर्य - अंबा -

काळा पहाड
गुरुवार, 08/29/2013 - 23:38 नवीन
भीष्म/विचीत्रवीर्य - अंबा - शाल्व फक्त अंबेचे आई वडील महाभारतात अशा "घाणेरड्या रक्ताचे" नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

भयंकर ... इतक्या उठवळ मुली

नित्य नुतन
Fri, 08/30/2013 - 11:30 नवीन
भयंकर ... इतक्या उठवळ मुली असू शकतात हे कायदे बनवणार्यांच्या लक्षात कसे येत नाही ..आणि सध्याच्या काळात अशांचीच संख्या जास्त आहे... NCW (National Commision of Women) च्या अध्यक्षा कोणीतरी मोघे म्हणून आहेत .. त्यांना एकदा अशा कायद्याच्या गैरवापराबद्दल विचारले असता त्यांनी सरळ हात वर केले ... म्हणाल्या की असा गैरवापर मी तरी पाहिलेला नाही ... एव्हढ्या मोठ्या पदावर डोळे झाकून काम करतात वाटतं ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

हनिमुन साठी म्हणुन दोघं मनाली वगैरे ला गेले

संजय क्षीरसागर
Fri, 08/30/2013 - 13:03 नवीन
तर ती हलकट मुलगी तिकडुन परस्पर पळून गेली....
एवढा मोठा खर्च झाल्यावर (आणि मनालीसारख्या रम्य स्थळी गेल्यावर) निदान हनिमून तरी पूर्ण करायचा होता. अशी धरसोड वृत्ती काय कामाची? >शेवटी आम्हा मित्रांपैकीच काहीजणांनी ओळखीतल्या एका मोठ्या पोलिस ऑफिसरला सर्व सांगुन त्याच्याकरवी त्या सगळ्यांना डोस टाकले.. तुमच्या मुलीची सगळी प्रेमपत्रं, sms रेकॉर्ड्स आमच्या कडे आहेत आणि, तो प्रियकर ही साक्ष देणार आहे बसा आता तुरुंगात अशी हुल ही दिली... आणि कसाबसा काहीही न देता घटस्फोट मिळवला... बेस्ट! तुमच्या मित्राला सांगा अशी मुलगी वेळी-अवेळी, काहीही सोडून गेली असती... झालं ते बरंच झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

माझा मागचा प्रतिसाद का

काळा पहाड
गुरुवार, 08/29/2013 - 23:49 नवीन
माझा मागचा प्रतिसाद का उडवण्यात आला हे कळलं नाही. पण एक करोड? त्याच्या पाव किंमतीत कोणीही सासरचं सारं घर सुपारीवर "निर्मनूष्य" करू शकतो.
  • Log in or register to post comments

आयला, लग्नाच्या पानसुपारीत तुम्ही

संजय क्षीरसागर
गुरुवार, 08/29/2013 - 23:58 नवीन
ही सुपारी कुठून आणली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

जेल मधल्या जेवणापेक्षा बरीच

काळा पहाड
Fri, 08/30/2013 - 00:03 नवीन
जेल मधल्या जेवणापेक्षा बरीच असावी ना? एखादा उद्योग उभा राहू शकेल त्या मुळं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

श्री पहाड, असले उद्योग काय कामाचे ?

संजय क्षीरसागर
Fri, 08/30/2013 - 12:22 नवीन
यापरता सुपारी व्यवस्थित कुटून तीत ज्येष्ठमधपूड, गुंजपत्ता, थंडाई आदी द्रव्ये मिसळून भोजनपश्चात मुखशुद्धीस वापरल्यास घरच्याघरी निद्रालाभ होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

अशा गोष्टी मुळेच मराठी माणूस

काळा पहाड
Fri, 08/30/2013 - 16:25 नवीन
अशा गोष्टी मुळेच मराठी माणूस उदयोगात मागे असतो असे मानले जाते. आम्ही निद्रा घेतली तरी ते युपी बिहार कट्टे वाले आहेत ना आमचे उद्योग बळकवायला. मी तर इकडे एजन्सी काढायचा विचार करत होतो आणि तुम्ही असले झोपा काढायचे सल्ले द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पण मी काय म्हणतो मि. काळा पहाड तुमच्याकडे धडाडी आहे तर

संजय क्षीरसागर
Sat, 08/31/2013 - 00:05 नवीन
एवढी भयंकर रिस्क घेऊन सुपारीचा धंदा करण्यापेक्षा तुम्ही या विषयावर मराठी सिरियल काढावी. आणि एपिसोड लेखनाचे काम इथल्या एकेका सदस्यावर सोपवावे. यात सर्व मराठी माणसांचे हित सामावले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

एक प्रष्ण

अनिरुद्ध प
Fri, 09/06/2013 - 15:30 नवीन
सुपारी कच्ची कि भाजलेली(पक्की) कि मिश्र(कच्चा-पक्का),हे जरा सान्गीतलत तर घरी करुन बघीन म्हण्तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

माझ्या एका चुलत भावाच्या

llपुण्याचे पेशवेll
Fri, 08/30/2013 - 12:16 नवीन
माझ्या एका चुलत भावाच्या बाबतीत अशीच घटना घडली आहे. जुलै महीन्यात लग्नं झाले. लग्नानंतर ८ व्या दिवशी मुलगी पळून गेली दागदागिने घेऊन आणि दुसर्‍या मुलाबरोबर रजिस्टर मॅरेज केले. या लग्नाचे अजून रजिस्ट्रेशन झालेले नसल्याने ते शक्य झाले किंवा काय माहीत नाही पण ८ व्या दिवशी रजिस्ट्रेशन झाले म्हणजे छुपी तयारी आधीपासून चालू होती हे नक्की. बाई ८व्या दिवशी घरातून पळून जाऊन दुसर्‍याबरोबर लग्नं करत्या झाल्या. निराश झालेल्या आमच्या भावाने व त्याच्या आईवडीलानी दुसरीकडे लग्नं करुन जाते तर जाऊदे, घरच्या दबावाखाली लग्नं केलं असेल असे म्हणून नाईलाजाने का होईना मान्यता दिली. परंतु दिलेले दागिने तरी परत दे अशी विनंती केल्यावर तिने ते मला माझ्या नविन लग्नाचे म्हणून भेट म्हणून ठेऊन घेतलेत असे तिने म्हटले. आता पुढे काय झाले ते मला माहीत नाही. कदचित असे विचारणे म्हणजे पण जखमेवर मीठ चोळण्यासारखे असते असे वाट्ले म्हणून विचारले नाही.
  • Log in or register to post comments

परंतु दिलेले दागिने तरी परत दे अशी विनंती केल्यावर

संजय क्षीरसागर
Fri, 08/30/2013 - 13:14 नवीन
तिने ते मला माझ्या नविन लग्नाचे म्हणून भेट म्हणून ठेऊन घेतलेत असे तिने म्हटले.
काय या मुली! अर्थात, आठ दिवस संसार केला म्हणजे तिच्याही काही अपेक्षा असणार. पण धीस इज टू मच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

८ व्या दिवशी रजिस्ट्रेशन झाले

मालोजीराव
Fri, 08/30/2013 - 15:11 नवीन
८ व्या दिवशी रजिस्ट्रेशन झाले म्हणजे छुपी तयारी आधीपासून चालू होती हे नक्की
पुपे ८ व्या दिवशी रजिस्ट्रेशन झाले म्हणजे २२ दिवस अगोदर पासून तयारी होती…म्यारेज रजिस्ट्रार ला ३० दिवस आधी नोटीस द्यावी लागते बहुतेक…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

__/\__

काळा पहाड
Fri, 08/30/2013 - 16:20 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मला वाटतं या केस मध्ये, पहिला

नित्य नुतन
Fri, 08/30/2013 - 17:55 नवीन
मला वाटतं या केस मध्ये, पहिला नवरा तिच्या वर केस टाकू शकतो कारण एक लग्न झालेले असताना तिने दुसरे लग्न केलेले आहे .. लग्नाचे फोटो हा सुद्धा लग्न झाल्याचा पुरावा असतो ... मुलीला चांगलाच धडा शिकवत आला असता ... किमान दागिने तरी परत मिळवता आले असते ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

खरे आहे. त्याला सांगितले आहे

llपुण्याचे पेशवेll
Fri, 08/30/2013 - 18:12 नवीन
खरे आहे. त्याला सांगितले आहे कायदेशीर कारवाई कर म्हणून. पण तो तेव्हा बोलायच्या मनःस्थितीत नव्हता म्हणून मी विषय वाढवला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नित्य नुतन

हे बरे नव्हे

संजय क्षीरसागर
Sat, 08/31/2013 - 11:02 नवीन
मला वाटतं या केस मध्ये, पहिला नवरा तिच्या वर केस टाकू शकतो कारण एक लग्न झालेले असताना तिने दुसरे लग्न केलेले आहे .. लग्नाचे फोटो हा सुद्धा लग्न झाल्याचा पुरावा असतो ... मुलीला चांगलाच धडा शिकवत आला असता ... किमान दागिने तरी परत मिळवता आले असते ...
नाही तर काय. फर्स्ट नवर्‍याला काहीही चूक नसतांना निष्कारण सालंकृत कन्यादान करायला लागलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

०

उद्दाम
गुरुवार, 09/05/2013 - 14:24 नवीन
पण केस केली तरी बाईवर कारवाई होत नाही, असे वाटते. पुरुषाला द्वि भार्या प्रतिबंधक कायदा लागू होतो. त्याने दुसरे लग्न केले तर तो गुन्हा. पण बाई साठी द्विपतीप्रतिबंधक कायदा आस्तित्वात नाही. ( असे वाटते.) त्यामुळे बाई कायदेशीर रीत्या दोघांची बायको म्हणून राहू शकते. आता फार्फार तर त्या पहिल्या बिचार्‍या नवर्‍याला बाईने ब्रीच ऑफ फेथ / काँट्रॅक्ट केले या बेसवर कोर्ट बाईपासून तत्काळ ( म्हणजे अगदी १ दिवसात नव्हे, पण जास्त त्रास न देता) घटस्फोट देऊन मोकळे करेल. पण बाई दुसर्‍याबरोबर नांदते येथपासून ते कोर्ट कज्जा वगैरे सगळे पुरावे नवर्‍यालाच आणावे लागतील. बाईला शिक्षा होणार नाही. बाई स्वेच्छेने गेल्याने त्या दुसर्‍या पुरुषावरही बाईला फूस लावल्याचा गुन्हा दाखल होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पण केस केली तरी बाईवर कारवाई होत नाही, असे वाटते!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 09/05/2013 - 15:14 नवीन
आहो, बाईचं जाऊं द्या, तीची `छुपी तयारी' आधीच झाली होती. दागिने का परस्पर वळते केले? हा मुख्य प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

बाई वर मानहानीचा दावा टाकता

नित्य नुतन
गुरुवार, 09/05/2013 - 15:30 नवीन
बाई वर मानहानीचा दावा टाकता येईल .. शिवाय चोरीचा दावाही टाकता येईल .. द्विभार्या प्रतिबंधक कायदा स्त्रीला पण लागू होतो, शिक्षेचे स्वरूप सारखेच आहे का हे गुगलावे लागेल ..पण वेळेवर केल्या तर बर्याच गोष्टी करता येतात... अर्थात या करता वकिली सल्ला घ्यावा लागेल ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

चोरीचा दावा कसा टाकणार?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 09/05/2013 - 15:38 नवीन
स्त्रीधन कायद्याखाली नवर्‍याची सरकारी इतमामानं वरात निघेल. आणि मानहानी म्हणजे अब्रू नुकसानीचा दावा म्हणायचंय का तुम्हाला? त्यानं दागिन्यांचा आणखीनच लफडा होऊन बसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नित्य नुतन

(नवर्याने)दिलेले दागिने भौ.

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 09/06/2013 - 00:56 नवीन
(नवर्याने)दिलेले दागिने भौ. त्याला स्त्रीधन कायदा लागु होतो ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

०

उद्दाम
Fri, 09/06/2013 - 14:21 नवीन
नवर्‍याने दिलेले दागिनेही बायकोचेच असतात. बायको दागिने घेऊन आठ दिवसात पळाली. आता तुम्ही तिला अजून डिवचलेत तर हा नवरा नपुंसक आहे, आठ दिवसात याने मला काही केले नाही, म्हणून मी पळाले, अशी बाईने बोंब ठोकली तर काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

बास का राव!

संजय क्षीरसागर
Fri, 09/06/2013 - 15:06 नवीन
पण तो तेव्हा बोलायच्या मनःस्थितीत नव्हता म्हणून मी विषय वाढवला नाही.
एकदा त्याची मनःस्थिती ठीक झाली की तो काय वाट्टेल ते करून दाखवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

ती पोरगी,तिचे आईबाप यांच्यावर केस टाका.

बाबा पाटील
Fri, 08/30/2013 - 21:01 नवीन
चौकीला थोडेफार मॅनेज करुन्,त्या पोरीच्या सगळ्या खानदानावर केस टाका,पोरीवर सेक्च्यल हॅरेषमेंट ची टाकता येइल्,पुरावेच उभे करायचे म्हटले तर सगळच करता येत्,फक्त पोरग भक्कम पाहिजे, स्त्री जातीवर कधी अन्याय करु नये,पण त्या स्त्रीत्वाचा फायदा घेउन एखाद घर जर बर्बाद करत असतील तर त्यांना जागेवर आणलच पाहिजे....
  • Log in or register to post comments

बरोबर. फक्त इथे स्त्री ऐवजी

शिल्पा ब
Fri, 08/30/2013 - 23:11 नवीन
बरोबर. फक्त इथे स्त्री ऐवजी 'कोणीही" शब्द चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

+१

आनन्दिता
Sat, 08/31/2013 - 01:33 नवीन
+१ मी वर लिहीलेल्या घटनेत आमच्या मित्रांनी ती पोरगी आणि तिचे हलकट घरचे या सगळ्यांना वाईट्ट रडवलंय... आयुष्यात कुणालाही फसवायच्या आधी ते १०० वेळा विचार करतील..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

कसे, मलाही सांगा, मलाही असे

उद्दाम
Sun, 09/01/2013 - 11:40 नवीन
कसे, मलाही सांगा, मलाही असे करायची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

इतका सुंदर धागा आणि युयुत्सू

उद्दाम
गुरुवार, 09/05/2013 - 14:25 नवीन
इतका सुंदर धागा आणि युयुत्सू का नाहीत ?
  • Log in or register to post comments

माझ्या नात्यातला मुलगा

खटपट्या
Wed, 09/11/2013 - 01:36 नवीन
माझ्या नात्यातला मुलगा रीक्शाचालक होता. त्याचे लग्न महीला पोलीसाबरोबर झाले होते. मुलगी वेगवेगळ्या बन्दोबस्तासाठी बरेच दीवस बाहेर असायची. नवर्‍यापेक्षा पोलीस शिपायान्बरोबर सम्पर्क जास्त येवू लागला. एका शिपायाबरोबर पळून गेली. मुलाने दुसरे लग्न केले आहे. आपल्याच कार्यक्षेत्रातल्या मुला/मुलीबरोबर लग्न करावे का....? नेहमी हे शक्य होईलच असे नाही...
  • Log in or register to post comments

पोलीसांना शिस्त नाही म्हणजे काय?रिक्शाचालकानं आता कुणाकडे पाहवं

संजय क्षीरसागर
Wed, 09/11/2013 - 01:55 नवीन
...असा प्रश्न होताच. पण त्यानं आपली योग्य ती सोय केली हे बरं झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा