कलम ४९८ अ - कायदेशीर दहशदवाद (Legal Terrorism)
परवाच भावाचा फोन आला. त्याच्या मित्राच्या बायकोने त्याच्या मित्रावर ४९८ अ (हुंडाविरोधी कायदा) च्या नावाखाली गुन्हा दाखल केला होता आणि पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता त्या मित्राला, त्याच्या वृद्ध आई वडीलांना आणि भावाला तुरुंगात टाकले. तुरुंगातून बाहेर सोडण्यासाठी पोलिसांनी ७०००० रु ची मागणी केली... मित्राच्या लग्नाला १ महिनाच झालेला होता ... त्यातहि तो आंतरजातीय प्रेमविवाह ... तरीही कुठलेही जातीभेद न मानता दोन्ही घरातील मोठ्यांनी कौतुकाने आणि हौशीने सगळे सोपस्कार केले होते... नवरा बायको दोघं software तज्ञ... पैसे, हुंडा या गोष्टीना कल्पनेतही थारा नव्हता ... मग असे झालेच कसे..????
पण खरी स्टोरी ऐकली आणि प्रचंड संताप झाला ... नवर्या मुलीला साखरपुड्यानंतर साक्षात्कार झाला कि तिचं आता दुसरयाच मुलावर प्रेम बसले आहे .. आणि तरीही वडिलांच्या इज्जतीसाठी तिने पहिल्याच मुलाशी लग्न केले कारण साखरपुडा मोडायचा नव्हता ... पण तिचे ते प्रेम प्रकरण लग्नानंतर चालूच राहिले .. हे जेव्हा सासरच्यांच्या लक्षात आले तेव्हा पुढचा धोका ओळखून मुलीच्या बापाने आधीच मुलीच्या सासरच्यांवर हुंडाबळीच्या खोट्या केसेस टाकल्या आणि इतकेच नाही तर 3० लाख दिलेत तरच केसेस काढू अशी धमकी पण दिली ... आता याला काय म्हणावे ... चोर तो चोर वर शिरजोर...
भारतातले हुंडा विरोधी कायदे हे असे exploit होतात कारण ते पूर्णता स्त्रियांच्या बाजूने झुकते माप देतात .. ज्यांना खरी गरज आहे त्यांना असा कायदा आहे.. हे ही माहित नसते... आणि उच्च शिक्षित मुली व त्यांचे पालक या कायद्यांचा असा गैरवापर करतात...आदरणीय सुप्रीम कोर्टाने पण अश्या गैरवापरांची दखल घेऊन या कायद्याला Legal Terrorism असे म्हटले आहे ... जी निष्पाप कुटुंबे अश्या खोट्या केसेना बळी पडून स्वताची जिवाभावाची माणसे गमावतात त्यांना कोणीच वाली नसतो.. परवाच दिल्ली कोर्टात अशाच एका तरुणाने कोर्टाच्या इमारतीतून उडी मारून जीव दिल्याचे ऐकले ... काही महिन्यांपूर्वी बेंगळूर मध्ये हि एका संगणक तज्ञाने अशाच कारणासाठी आत्महत्या केली ... सुरुवातीला वाटले कि अशी माणसे केस लढून आपले निर्दोषत्व सिद्ध का करत नाही. पण भावाच्या मित्राकडून कळले कि हा कायदा इतका मानवताविरोधी आहे .. .कि मुलीच्या सासरच्यांना घरातुन हाकलून अख्खं घर सुद्धा मुलीला देता येण्याची तरतूद यात आहे ... शिवाय केस चालू असे पर्यंत मुलीला खर्चापोटी दर महिना २० - २५ हजार पर्यंत सुद्धा पोटगी देण्याची आज्ञा कोर्ट करु शकते..म्हणजे गुन्हा सिद्ध होण्या आधीच अटक आणि अवास्तव खर्चाच्या ओझ्याने सासरची मंडळी पाणी मागू लागतात...
खरच खूपच अविश्वसनीय आणि विदारक सत्य आहे हे .. त्या मुळे आज काल अशा हुंडा बळीच्या बातम्या ऐकल्या की संशयाची सुई प्रथम स्त्री कडेच जाउ लागली आहे ...
वाचने
33169
प्रतिक्रिया
99
मिसळपाव
प्रतिक्रिया
हनिमुन साठी म्हणुन दोघं मनाली वगैरे ला गेले
In reply to माझा एक जवळचा मित्र आहे.. खुप by आनन्दिता
माझा मागचा प्रतिसाद का
आयला, लग्नाच्या पानसुपारीत तुम्ही
In reply to माझा मागचा प्रतिसाद का by काळा पहाड
जेल मधल्या जेवणापेक्षा बरीच
In reply to आयला, लग्नाच्या पानसुपारीत तुम्ही by संजय क्षीरसागर
श्री पहाड, असले उद्योग काय कामाचे ?
In reply to जेल मधल्या जेवणापेक्षा बरीच by काळा पहाड
अशा गोष्टी मुळेच मराठी माणूस
In reply to श्री पहाड, असले उद्योग काय कामाचे ? by संजय क्षीरसागर
पण मी काय म्हणतो मि. काळा पहाड तुमच्याकडे धडाडी आहे तर
In reply to अशा गोष्टी मुळेच मराठी माणूस by काळा पहाड
एक प्रष्ण
In reply to श्री पहाड, असले उद्योग काय कामाचे ? by संजय क्षीरसागर
माझ्या एका चुलत भावाच्या
परंतु दिलेले दागिने तरी परत दे अशी विनंती केल्यावर
In reply to माझ्या एका चुलत भावाच्या by llपुण्याचे पेशवेll
८ व्या दिवशी रजिस्ट्रेशन झाले
In reply to माझ्या एका चुलत भावाच्या by llपुण्याचे पेशवेll
__/\__
In reply to माझ्या एका चुलत भावाच्या by llपुण्याचे पेशवेll
मला वाटतं या केस मध्ये, पहिला
In reply to माझ्या एका चुलत भावाच्या by llपुण्याचे पेशवेll
खरे आहे. त्याला सांगितले आहे
In reply to मला वाटतं या केस मध्ये, पहिला by नित्य नुतन
हे बरे नव्हे
In reply to खरे आहे. त्याला सांगितले आहे by llपुण्याचे पेशवेll
०
In reply to हे बरे नव्हे by संजय क्षीरसागर
पण केस केली तरी बाईवर कारवाई होत नाही, असे वाटते!
In reply to ० by उद्दाम
बाई वर मानहानीचा दावा टाकता
In reply to ० by उद्दाम
चोरीचा दावा कसा टाकणार?
In reply to बाई वर मानहानीचा दावा टाकता by नित्य नुतन
(नवर्याने)दिलेले दागिने भौ.
In reply to चोरीचा दावा कसा टाकणार? by संजय क्षीरसागर
०
In reply to (नवर्याने)दिलेले दागिने भौ. by विश्वनाथ मेहेंदळे
बास का राव!
In reply to ० by उद्दाम
ती पोरगी,तिचे आईबाप यांच्यावर केस टाका.
बरोबर. फक्त इथे स्त्री ऐवजी
In reply to ती पोरगी,तिचे आईबाप यांच्यावर केस टाका. by बाबा पाटील
+१
In reply to ती पोरगी,तिचे आईबाप यांच्यावर केस टाका. by बाबा पाटील
कसे, मलाही सांगा, मलाही असे
In reply to +१ by आनन्दिता
इतका सुंदर धागा आणि युयुत्सू
माझ्या नात्यातला मुलगा
पोलीसांना शिस्त नाही म्हणजे काय?रिक्शाचालकानं आता कुणाकडे पाहवं
In reply to माझ्या नात्यातला मुलगा by खटपट्या