Skip to main content

कायदेशीर दहशदवाद

लेखक नित्य नुतन यांनी शुक्रवार, 23/08/2013 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
कलम ४९८ अ - कायदेशीर दहशदवाद (Legal Terrorism) परवाच भावाचा फोन आला. त्याच्या मित्राच्या बायकोने त्याच्या मित्रावर ४९८ अ (हुंडाविरोधी कायदा) च्या नावाखाली गुन्हा दाखल केला होता आणि पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता त्या मित्राला, त्याच्या वृद्ध आई वडीलांना आणि भावाला तुरुंगात टाकले. तुरुंगातून बाहेर सोडण्यासाठी पोलिसांनी ७०००० रु ची मागणी केली... मित्राच्या लग्नाला १ महिनाच झालेला होता ... त्यातहि तो आंतरजातीय प्रेमविवाह ... तरीही कुठलेही जातीभेद न मानता दोन्ही घरातील मोठ्यांनी कौतुकाने आणि हौशीने सगळे सोपस्कार केले होते... नवरा बायको दोघं software तज्ञ... पैसे, हुंडा या गोष्टीना कल्पनेतही थारा नव्हता ... मग असे झालेच कसे..???? पण खरी स्टोरी ऐकली आणि प्रचंड संताप झाला ... नवर्या मुलीला साखरपुड्यानंतर साक्षात्कार झाला कि तिचं आता दुसरयाच मुलावर प्रेम बसले आहे .. आणि तरीही वडिलांच्या इज्जतीसाठी तिने पहिल्याच मुलाशी लग्न केले कारण साखरपुडा मोडायचा नव्हता ... पण तिचे ते प्रेम प्रकरण लग्नानंतर चालूच राहिले .. हे जेव्हा सासरच्यांच्या लक्षात आले तेव्हा पुढचा धोका ओळखून मुलीच्या बापाने आधीच मुलीच्या सासरच्यांवर हुंडाबळीच्या खोट्या केसेस टाकल्या आणि इतकेच नाही तर 3० लाख दिलेत तरच केसेस काढू अशी धमकी पण दिली ... आता याला काय म्हणावे ... चोर तो चोर वर शिरजोर... भारतातले हुंडा विरोधी कायदे हे असे exploit होतात कारण ते पूर्णता स्त्रियांच्या बाजूने झुकते माप देतात .. ज्यांना खरी गरज आहे त्यांना असा कायदा आहे.. हे ही माहित नसते... आणि उच्च शिक्षित मुली व त्यांचे पालक या कायद्यांचा असा गैरवापर करतात...आदरणीय सुप्रीम कोर्टाने पण अश्या गैरवापरांची दखल घेऊन या कायद्याला Legal Terrorism असे म्हटले आहे ... जी निष्पाप कुटुंबे अश्या खोट्या केसेना बळी पडून स्वताची जिवाभावाची माणसे गमावतात त्यांना कोणीच वाली नसतो.. परवाच दिल्ली कोर्टात अशाच एका तरुणाने कोर्टाच्या इमारतीतून उडी मारून जीव दिल्याचे ऐकले ... काही महिन्यांपूर्वी बेंगळूर मध्ये हि एका संगणक तज्ञाने अशाच कारणासाठी आत्महत्या केली ... सुरुवातीला वाटले कि अशी माणसे केस लढून आपले निर्दोषत्व सिद्ध का करत नाही. पण भावाच्या मित्राकडून कळले कि हा कायदा इतका मानवताविरोधी आहे .. .कि मुलीच्या सासरच्यांना घरातुन हाकलून अख्खं घर सुद्धा मुलीला देता येण्याची तरतूद यात आहे ... शिवाय केस चालू असे पर्यंत मुलीला खर्चापोटी दर महिना २० - २५ हजार पर्यंत सुद्धा पोटगी देण्याची आज्ञा कोर्ट करु शकते..म्हणजे गुन्हा सिद्ध होण्या आधीच अटक आणि अवास्तव खर्चाच्या ओझ्याने सासरची मंडळी पाणी मागू लागतात... खरच खूपच अविश्वसनीय आणि विदारक सत्य आहे हे .. त्या मुळे आज काल अशा हुंडा बळीच्या बातम्या ऐकल्या की संशयाची सुई प्रथम स्त्री कडेच जाउ लागली आहे ...

वाचने 33169
प्रतिक्रिया 99

प्रतिक्रिया

In reply to by आनन्दिता

तर ती हलकट मुलगी तिकडुन परस्पर पळून गेली....
एवढा मोठा खर्च झाल्यावर (आणि मनालीसारख्या रम्य स्थळी गेल्यावर) निदान हनिमून तरी पूर्ण करायचा होता. अशी धरसोड वृत्ती काय कामाची? >शेवटी आम्हा मित्रांपैकीच काहीजणांनी ओळखीतल्या एका मोठ्या पोलिस ऑफिसरला सर्व सांगुन त्याच्याकरवी त्या सगळ्यांना डोस टाकले.. तुमच्या मुलीची सगळी प्रेमपत्रं, sms रेकॉर्ड्स आमच्या कडे आहेत आणि, तो प्रियकर ही साक्ष देणार आहे बसा आता तुरुंगात अशी हुल ही दिली... आणि कसाबसा काहीही न देता घटस्फोट मिळवला... बेस्ट! तुमच्या मित्राला सांगा अशी मुलगी वेळी-अवेळी, काहीही सोडून गेली असती... झालं ते बरंच झालं.

माझा मागचा प्रतिसाद का उडवण्यात आला हे कळलं नाही. पण एक करोड? त्याच्या पाव किंमतीत कोणीही सासरचं सारं घर सुपारीवर "निर्मनूष्य" करू शकतो.

In reply to by संजय क्षीरसागर

जेल मधल्या जेवणापेक्षा बरीच असावी ना? एखादा उद्योग उभा राहू शकेल त्या मुळं.

In reply to by काळा पहाड

यापरता सुपारी व्यवस्थित कुटून तीत ज्येष्ठमधपूड, गुंजपत्ता, थंडाई आदी द्रव्ये मिसळून भोजनपश्चात मुखशुद्धीस वापरल्यास घरच्याघरी निद्रालाभ होईल असे वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

अशा गोष्टी मुळेच मराठी माणूस उदयोगात मागे असतो असे मानले जाते. आम्ही निद्रा घेतली तरी ते युपी बिहार कट्टे वाले आहेत ना आमचे उद्योग बळकवायला. मी तर इकडे एजन्सी काढायचा विचार करत होतो आणि तुम्ही असले झोपा काढायचे सल्ले द्या.

In reply to by काळा पहाड

एवढी भयंकर रिस्क घेऊन सुपारीचा धंदा करण्यापेक्षा तुम्ही या विषयावर मराठी सिरियल काढावी. आणि एपिसोड लेखनाचे काम इथल्या एकेका सदस्यावर सोपवावे. यात सर्व मराठी माणसांचे हित सामावले आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुपारी कच्ची कि भाजलेली(पक्की) कि मिश्र(कच्चा-पक्का),हे जरा सान्गीतलत तर घरी करुन बघीन म्हण्तो.

माझ्या एका चुलत भावाच्या बाबतीत अशीच घटना घडली आहे. जुलै महीन्यात लग्नं झाले. लग्नानंतर ८ व्या दिवशी मुलगी पळून गेली दागदागिने घेऊन आणि दुसर्‍या मुलाबरोबर रजिस्टर मॅरेज केले. या लग्नाचे अजून रजिस्ट्रेशन झालेले नसल्याने ते शक्य झाले किंवा काय माहीत नाही पण ८ व्या दिवशी रजिस्ट्रेशन झाले म्हणजे छुपी तयारी आधीपासून चालू होती हे नक्की. बाई ८व्या दिवशी घरातून पळून जाऊन दुसर्‍याबरोबर लग्नं करत्या झाल्या. निराश झालेल्या आमच्या भावाने व त्याच्या आईवडीलानी दुसरीकडे लग्नं करुन जाते तर जाऊदे, घरच्या दबावाखाली लग्नं केलं असेल असे म्हणून नाईलाजाने का होईना मान्यता दिली. परंतु दिलेले दागिने तरी परत दे अशी विनंती केल्यावर तिने ते मला माझ्या नविन लग्नाचे म्हणून भेट म्हणून ठेऊन घेतलेत असे तिने म्हटले. आता पुढे काय झाले ते मला माहीत नाही. कदचित असे विचारणे म्हणजे पण जखमेवर मीठ चोळण्यासारखे असते असे वाट्ले म्हणून विचारले नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तिने ते मला माझ्या नविन लग्नाचे म्हणून भेट म्हणून ठेऊन घेतलेत असे तिने म्हटले.
काय या मुली! अर्थात, आठ दिवस संसार केला म्हणजे तिच्याही काही अपेक्षा असणार. पण धीस इज टू मच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

८ व्या दिवशी रजिस्ट्रेशन झाले म्हणजे छुपी तयारी आधीपासून चालू होती हे नक्की
पुपे ८ व्या दिवशी रजिस्ट्रेशन झाले म्हणजे २२ दिवस अगोदर पासून तयारी होती…म्यारेज रजिस्ट्रार ला ३० दिवस आधी नोटीस द्यावी लागते बहुतेक…

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मला वाटतं या केस मध्ये, पहिला नवरा तिच्या वर केस टाकू शकतो कारण एक लग्न झालेले असताना तिने दुसरे लग्न केलेले आहे .. लग्नाचे फोटो हा सुद्धा लग्न झाल्याचा पुरावा असतो ... मुलीला चांगलाच धडा शिकवत आला असता ... किमान दागिने तरी परत मिळवता आले असते ...

In reply to by नित्य नुतन

खरे आहे. त्याला सांगितले आहे कायदेशीर कारवाई कर म्हणून. पण तो तेव्हा बोलायच्या मनःस्थितीत नव्हता म्हणून मी विषय वाढवला नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मला वाटतं या केस मध्ये, पहिला नवरा तिच्या वर केस टाकू शकतो कारण एक लग्न झालेले असताना तिने दुसरे लग्न केलेले आहे .. लग्नाचे फोटो हा सुद्धा लग्न झाल्याचा पुरावा असतो ... मुलीला चांगलाच धडा शिकवत आला असता ... किमान दागिने तरी परत मिळवता आले असते ...
नाही तर काय. फर्स्ट नवर्‍याला काहीही चूक नसतांना निष्कारण सालंकृत कन्यादान करायला लागलं.

In reply to by संजय क्षीरसागर

पण केस केली तरी बाईवर कारवाई होत नाही, असे वाटते. पुरुषाला द्वि भार्या प्रतिबंधक कायदा लागू होतो. त्याने दुसरे लग्न केले तर तो गुन्हा. पण बाई साठी द्विपतीप्रतिबंधक कायदा आस्तित्वात नाही. ( असे वाटते.) त्यामुळे बाई कायदेशीर रीत्या दोघांची बायको म्हणून राहू शकते. आता फार्फार तर त्या पहिल्या बिचार्‍या नवर्‍याला बाईने ब्रीच ऑफ फेथ / काँट्रॅक्ट केले या बेसवर कोर्ट बाईपासून तत्काळ ( म्हणजे अगदी १ दिवसात नव्हे, पण जास्त त्रास न देता) घटस्फोट देऊन मोकळे करेल. पण बाई दुसर्‍याबरोबर नांदते येथपासून ते कोर्ट कज्जा वगैरे सगळे पुरावे नवर्‍यालाच आणावे लागतील. बाईला शिक्षा होणार नाही. बाई स्वेच्छेने गेल्याने त्या दुसर्‍या पुरुषावरही बाईला फूस लावल्याचा गुन्हा दाखल होणार नाही.

In reply to by उद्दाम

आहो, बाईचं जाऊं द्या, तीची `छुपी तयारी' आधीच झाली होती. दागिने का परस्पर वळते केले? हा मुख्य प्रश्न आहे.

In reply to by उद्दाम

बाई वर मानहानीचा दावा टाकता येईल .. शिवाय चोरीचा दावाही टाकता येईल .. द्विभार्या प्रतिबंधक कायदा स्त्रीला पण लागू होतो, शिक्षेचे स्वरूप सारखेच आहे का हे गुगलावे लागेल ..पण वेळेवर केल्या तर बर्याच गोष्टी करता येतात... अर्थात या करता वकिली सल्ला घ्यावा लागेल ...

In reply to by नित्य नुतन

स्त्रीधन कायद्याखाली नवर्‍याची सरकारी इतमामानं वरात निघेल. आणि मानहानी म्हणजे अब्रू नुकसानीचा दावा म्हणायचंय का तुम्हाला? त्यानं दागिन्यांचा आणखीनच लफडा होऊन बसेल.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

नवर्‍याने दिलेले दागिनेही बायकोचेच असतात. बायको दागिने घेऊन आठ दिवसात पळाली. आता तुम्ही तिला अजून डिवचलेत तर हा नवरा नपुंसक आहे, आठ दिवसात याने मला काही केले नाही, म्हणून मी पळाले, अशी बाईने बोंब ठोकली तर काय करणार?

In reply to by उद्दाम

पण तो तेव्हा बोलायच्या मनःस्थितीत नव्हता म्हणून मी विषय वाढवला नाही.
एकदा त्याची मनःस्थिती ठीक झाली की तो काय वाट्टेल ते करून दाखवेल.

चौकीला थोडेफार मॅनेज करुन्,त्या पोरीच्या सगळ्या खानदानावर केस टाका,पोरीवर सेक्च्यल हॅरेषमेंट ची टाकता येइल्,पुरावेच उभे करायचे म्हटले तर सगळच करता येत्,फक्त पोरग भक्कम पाहिजे, स्त्री जातीवर कधी अन्याय करु नये,पण त्या स्त्रीत्वाचा फायदा घेउन एखाद घर जर बर्बाद करत असतील तर त्यांना जागेवर आणलच पाहिजे....

In reply to by बाबा पाटील

+१ मी वर लिहीलेल्या घटनेत आमच्या मित्रांनी ती पोरगी आणि तिचे हलकट घरचे या सगळ्यांना वाईट्ट रडवलंय... आयुष्यात कुणालाही फसवायच्या आधी ते १०० वेळा विचार करतील..

माझ्या नात्यातला मुलगा रीक्शाचालक होता. त्याचे लग्न महीला पोलीसाबरोबर झाले होते. मुलगी वेगवेगळ्या बन्दोबस्तासाठी बरेच दीवस बाहेर असायची. नवर्‍यापेक्षा पोलीस शिपायान्बरोबर सम्पर्क जास्त येवू लागला. एका शिपायाबरोबर पळून गेली. मुलाने दुसरे लग्न केले आहे. आपल्याच कार्यक्षेत्रातल्या मुला/मुलीबरोबर लग्न करावे का....? नेहमी हे शक्य होईलच असे नाही...

In reply to by खटपट्या

...असा प्रश्न होताच. पण त्यानं आपली योग्य ती सोय केली हे बरं झालं.