हलकेच खुणावे मज कोणी
अंतरी सुरस श्रावण गाणी
मन सुप्त कहाणी एकेरी
व्यापल्या साचल्या आठवणी
प्राजक्त क्षणांची ही वाणी
ओळखी सख्यांची आळवणी
उमले दरवळ कर्पुरी उरी
नि:संग नितळ जणु की पाणी
आकार निराकारात खुळा
भिरभिर घरभर ही चाचपणी
आनंद कधी विरहात भरे
सद्गदीत द्वय हृदय पापणी
……………… अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1469
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वाह
धन्यवाद मिका
In reply to व्वाह by मिसळलेला काव्यप्रेमी
खरं सांगू का,
वेणु,इथून पुढे कविता वाचल्या