Skip to main content

सद्गदीत

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 05/08/2013 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
हलकेच खुणावे मज कोणी अंतरी सुरस श्रावण गाणी मन सुप्त कहाणी एकेरी व्यापल्या साचल्या आठवणी प्राजक्त क्षणांची ही वाणी ओळखी सख्यांची आळवणी उमले दरवळ कर्पुरी उरी नि:संग नितळ जणु की पाणी आकार निराकारात खुळा भिरभिर घरभर ही चाचपणी आनंद कधी विरहात भरे सद्गदीत द्वय हृदय पापणी ……………… अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1469
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

प्राजक्त क्षणांची ही वाणी ओळखी सख्यांची आळवणी उमले दरवळ कर्पुरी उरी नि:संग नितळ जणु की पाणी
हे कडवे फार आवडले.

खरं सांगू का, मन सुप्त कहाणी एकेरी.. इथून पुढे कविता वाचल्या गेलीच नाही... ह्या निरातिशय सुंदर ओळीतच अडकले आहे