Skip to main content

सद्गदीत

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 05/08/2013 20:10 या दिवशी प्रकाशित केले.

हलकेच खुणावे मज कोणी
अंतरी सुरस श्रावण गाणी
मन सुप्त कहाणी एकेरी
व्यापल्या साचल्या आठवणी

प्राजक्त क्षणांची ही वाणी
ओळखी सख्यांची आळवणी
उमले दरवळ कर्पुरी उरी
नि:संग नितळ जणु की पाणी

आकार निराकारात खुळा
भिरभिर घरभर ही चाचपणी
आनंद कधी विरहात भरे
सद्गदीत द्वय हृदय पापणी

……………… अज्ञात

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1483
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

प्राजक्त क्षणांची ही वाणी
ओळखी सख्यांची आळवणी
उमले दरवळ कर्पुरी उरी
नि:संग नितळ जणु की पाणी

हे कडवे फार आवडले.


खरं सांगू का,
मन सुप्त कहाणी एकेरी.. इथून पुढे कविता वाचल्या गेलीच नाही... ह्या निरातिशय सुंदर ओळीतच अडकले आहे