मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है ! : ओशो (अष्टावक्र महागीता)
__________________________________
मन या जीवनातल्या गहनतम पैलूवरचं हे लेखन तुमच्या समोर मांडताना अतिशय आनंद होतो आहे. विषय कसा पुढे न्यावा याची कोणतीही योजना मनात नाही. तुमचे प्रतिसाद आणि प्रश्न लेखनाची दिशा ठरवतील.
अनेकानेक अंगांनी मनाचा सांगोपांग वेध घेण्याचा प्रयत्न या लेखमालेतनं होईल. वेगवेगळ्या सिद्धांचं मनाविषयीचं आकलन, व्यक्तिमत्त्वाची घडण, आपली स्मृती, माइंड-बॉडी को-ऑर्डिनेशन, मनाचा कल आणि व्यक्तिगत कौशल्य, संगीत, खेळ, फ्रॉइड आणि इतर दिग्गज मनोतज्ज्ञांचे विचार, मानवी नातेसंबंध, मनाचं हृदयाशी नातं (भावनिक विश्व : आनंद, नैराश्य, न्यूनगंड, अल्झायमर, आत्महत्या वगैरे), मानसिक धारणा, भक्तिमार्ग आणि इतर आध्यात्मिक मार्गातल्या मनापलीकडे नेणार्या साधना पद्धती आणि सरते शेवटी मनापासून मुक्ती असा लेखनाचा समग्र आवाका असेल.
____________________________
प्रथम मनाचं अत्यंत उघड स्वरूप समजावून घेऊ.
मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते. श्रवण आणि अवलोकन या दोन संवेदनांनी मानवी आकलनाचा जवळजवळ पंचाण्णव टक्के भाग व्यापल्यानं मन 'ऑडिओ- विज्युअल डिवाइस' आहे. इतर तीन संवेदनांनी (स्पर्श, गंध आणि स्वाद) मनाचा अत्यंत नगण्य भाग व्यापलेला आहे.
संवेदना ही मनाची कारक आहे म्हणजे कोणतीही संवेदना मन सक्रिय करते. जेव्हा आपण मनाची प्रक्रिया जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ‘पहिली संवेदना’ हा अत्यंत बेसिक फॅक्टर आहे हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
आजपर्यंत हजारो सिद्धांनी ‘ शांत बसून मनाकडे पाहा’ असा संदेश दिला आहे आणि आजही मनापलीकडे जाण्यासाठी ‘मनाचं तटस्थ अवलोकन’ ही (आध्यात्मिक) जगातली सर्वमान्य साधना मानली जाते. अगदी बुद्धापासून ते जे. कृष्णमूर्तीपर्यंत (इंन्क्लूडिंग ओशो) सर्व ज्ञानमार्गी या साधनेचा पुरस्कार करतात. आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे.
(भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. अर्थात त्याविषयी मी इतक्यात काहीही लिहिणार नाही किंवा त्यासंबंधी प्रश्नही विचारले जाऊ नयेत.)
मनाचं अवलोकन व्यर्थ का आहे हे जाणणं अगत्याचं आहे. कारण मनापासून मुक्ती याचा अर्थ ‘मानसिक प्रक्रियेचं समग्र आकलन’ असा आहे. मुक्त तर आपण ऑलरेडी आहोतच. मनाच्या प्रक्रियेमुळे आपण बंधनात असल्याचा भास होतोय आणि म्हणून मनाची प्रक्रिया जाणणं उपयोगी आहे.
मन हा बायो-कंप्युटर आहे. जशी कंप्युटरची सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी हेड आणि टेल अॅड्रेसेसनं जोडलेली असतात तशी आपल्या स्मृतीतली सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी निगडित असतात. पण कंप्युटरमधला डेटा निर्वैयक्तिक असल्यानं तो सर्वांसाठी एकाच सलग पद्धतीनं रिट्राइव होतो आणि मन हा प्रत्येकाचा व्यक्तिगत बायो-कंप्युटर असल्यानं कुणाची स्मृती कशी सक्रिय होईल आणि त्याला किती दूर नेईल ते सांगता येत नाही.
मन सक्रिय झाल्याबरोबर आपण स्मृती चक्रात अडकून अनेकानेक गतकालीन प्रसंगातून आणि अनुभवातून फिरायला लागतो. हे इतक्या वेगानं घडतं की सुरुवात नक्की कुठून झाली हे लाखातला एखादाच जाणू शकतो.
मनाचं अवलोकन करताना आपण डोळे मिटून शांत बसलेलो असतो आणि या स्मृतीच्या चलत-चित्रपटात इतके गुंतून जातो की अवलोकन कशासाठी करतोय हेच लक्षात राहत नाही. मग मधून केव्हा तरी आपण कुठेही गेलेलो नाही, जागेवरच बसलो आहोत याचं भान येतं. मग थोडा वेळ शांत वाटतं. त्यानंतर कोणत्या तरी संवेदनेनं पुन्हा स्मृती सक्रिय होते मग पुन्हा आपण भोवर्यात सापडतो आणि या कामात बर्याच वेळा झोप लागून जाते. जाग आली की झक मारली आणि वेळ घालवला असं वाटायला लागतं. पण इतक्या थोर लोकांनी सांगितलेली साधना व्यर्थ कशी असेल म्हणून लोक रोजरोज ध्यान करत राहतात. त्यांना ज्याम कंटाळा येतो, यांच्या साधनेमुळे बर्याच वेळा घरचे वैतागतात (कारण साधनाकालात घरात शांतता लागते) पण सांगणार कुणाला? . शेवटी ते गुरुंना विचारतात आणि गुरू सांगतात ‘साधना कमी पडते आहे, जास्त वेळ बसत चला’. अशी साधना जन्मभर केली तरी काही उपयोग होत नाही कारण साधकाला मनापासून मुक्ती मिळत नाही.
मनाचं अवलोकन करायचा प्रश्न नसून त्याची चक्राकार गती जाणणं महत्त्वाचंय. म्हणजे ‘पहिला विचार कुठून सुरू झाला’ हे विचार मालिका सुरू असताना ‘कुठे तरी मध्ये थांबून बॅक ट्रॅक करणं’ ही खरी प्रोसेस आहे.
ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे.
हे काम अत्यंत कौशल्याचं आहे पण आता तुम्हाला प्रक्रिया कळल्यानं ते नुसतं सोपंच नाही तर अत्यंत इंटरेस्टिंग झालंय. ज्या क्षणी तुम्ही पहिला विचार जाणाल त्या क्षणी तुम्हाला कोणत्या संवेदनेनं तुमचा पहिला विचार निर्माण झाला ते कळेल. आणि मी संवेदना ही मनाची कारक आहे असं का म्हटलंय ते लक्षात येईल.
जेव्हा तुम्हाला मनाची ही समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. तुम्ही पुन्हापुन्हा वर्तमानात येऊ लागाल. मनाच्या एका महत्त्वाच्या दालनावर तुमची हुकुमत चालायला लागेल. मनाच्या अनेक प्रभागांपैकी एका व्यापक प्रभागापासनं तुम्ही मुक्ती अनुभवाल. निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल.
________________________________
‘रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ असं मनाचं अत्यंत कलात्मक वर्णन करणार्या काव्यपंक्तीचं श्रेय अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांना विनम्र अर्पण
________________________
पूर्वप्रकाशन : मनोगत
वाचने
47478
प्रतिक्रिया
211
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही सांगीतलेली प्रक्रिया...
In reply to तुम्ही सांगितलेली प्रक्रिया करून तर पाहा, तुम्हाला लगेच कळेल by संजय क्षीरसागर
इट वर्क्स अॅज यु एक्सप्लेन्ड!
In reply to तुम्ही सांगीतलेली प्रक्रिया... by अर्धवटराव
जबरदस्त........... लिखाण आवडलं
म्हणजे शांती फक्त वर्तमानातच असण्यात आहे तर...
In reply to जबरदस्त........... लिखाण आवडलं by चेतन माने
+१००
बॅक ट्रॅक करुन पाहिले तुम्हि
म्हणजे ‘पहिला विचार कुठून
पहिला विचार कुठला ते कसं ठरवायच?
In reply to म्हणजे ‘पहिला विचार कुठून by जे.जे.
च्यामारी
हा राम कुठे असतो?
थोडक्यात देव दिसला असं
In reply to हा राम कुठे असतो? by संजय क्षीरसागर
क्षीरसागरजी सर्वाय प्रथम मी
वाचतोय!
In reply to क्षीरसागरजी सर्वाय प्रथम मी by मदनबाण
बाणराव...
In reply to क्षीरसागरजी सर्वाय प्रथम मी by मदनबाण
तुमच्याशी वर लिंक दिली आहे तिथे सांगोपांग चर्चा केलीये
In reply to बाणराव... by अर्धवटराव
भ्रम...
In reply to तुमच्याशी वर लिंक दिली आहे तिथे सांगोपांग चर्चा केलीये by संजय क्षीरसागर
तिथले (आणि इथले देखील) प्रतिसाद इतके काँटॅडीक्टरी आहेत ?
In reply to भ्रम... by अर्धवटराव
अपेक्षीत प्रतिसाद.
In reply to तिथले (आणि इथले देखील) प्रतिसाद इतके काँटॅडीक्टरी आहेत ? by संजय क्षीरसागर
एकतर तुम्ही काय लिहीताय त्याचा अर्थ तुम्हाला कळत नाहीये किंवा
In reply to अपेक्षीत प्रतिसाद. by अर्धवटराव
असं आहे होय?
In reply to एकतर तुम्ही काय लिहीताय त्याचा अर्थ तुम्हाला कळत नाहीये किंवा by संजय क्षीरसागर
तुमचा कॉम्प्युटर हँग झाला असेल?
In reply to असं आहे होय? by अर्धवटराव
याचा अर्थ...
In reply to तुमचा कॉम्प्युटर हँग झाला असेल? by संजय क्षीरसागर
भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण
In reply to क्षीरसागरजी सर्वाय प्रथम मी by मदनबाण
अरे हो! तुम्हाला वाटेल मी पुन्हा प्रश्न टाळला
In reply to भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण by संजय क्षीरसागर
तुमचे सर्व लेखन आणि प्रतिसाद बॅक ट्रॅक करून
लोकांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स अथवा काय मानसिक ताण वगैरे
In reply to तुमचे सर्व लेखन आणि प्रतिसाद बॅक ट्रॅक करून by लंबूटांग
??
In reply to लोकांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स अथवा काय मानसिक ताण वगैरे by संजय क्षीरसागर
तुम्ही संपादक आहात म्हणून सांगतो
In reply to ?? by कवितानागेश
होय!
In reply to तुम्ही संपादक आहात म्हणून सांगतो by संजय क्षीरसागर
ह्या धाग्यावर खुद्द लेखक
विषय काय आहे म्हणायचा?
In reply to ह्या धाग्यावर खुद्द लेखक by यशोधरा
विषय ना? भुंगा कसा गुणगुणतो
In reply to विषय काय आहे म्हणायचा? by लंबूटांग
नाही हो
In reply to विषय ना? भुंगा कसा गुणगुणतो by यशोधरा
मुळात गुणगुण आहे म्हणूनच ना?
In reply to नाही हो by संजय क्षीरसागर
काय हो.. दोन देशांनी एकमेकांत
In reply to मुळात गुणगुण आहे म्हणूनच ना? by यशोधरा
ए बाबा, ते आमाला काय विचारते?
In reply to काय हो.. दोन देशांनी एकमेकांत by मोदक
अपेक्षित शब्दांचे खेळ
एक राहिलंच
In reply to अपेक्षित शब्दांचे खेळ by लंबूटांग
भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा
तुम्ही कमाल करताय!
In reply to भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा by मदनबाण
पण प्रस्तुत लेख ज्यांच्यासाठी
In reply to तुम्ही कमाल करताय! by संजय क्षीरसागर
तुम्ही कन्क्लूजनला यायची घाई करताय :
In reply to पण प्रस्तुत लेख ज्यांच्यासाठी by कवितानागेश
मी अजापजप या साधनेची फलश्रुती
In reply to तुम्ही कन्क्लूजनला यायची घाई करताय : by संजय क्षीरसागर
तुम्हाला मानवी मनाबद्दल सगळं काही कळतंय...
In reply to मी अजापजप या साधनेची फलश्रुती by कवितानागेश
मनाचे अवलोकन करणं अगदीच
In reply to तुम्हाला मानवी मनाबद्दल सगळं काही कळतंय... by संजय क्षीरसागर
जपामुळे ज्या गोष्टी होतात असं तुम्ही खत्रीपूर्वक लिहिताय ...
In reply to मनाचे अवलोकन करणं अगदीच by कवितानागेश
अजपाजप...
In reply to जपामुळे ज्या गोष्टी होतात असं तुम्ही खत्रीपूर्वक लिहिताय ... by संजय क्षीरसागर
`अजपाजप?'
In reply to अजपाजप... by अर्धवटराव
नामात नाही कारण कोणतही नाम हा
In reply to `अजपाजप?' by संजय क्षीरसागर
अवांतर: तुम्ही कायम हे असे
In reply to नामात नाही कारण कोणतही नाम हा by कवितानागेश
मुलांनो
In reply to अवांतर: तुम्ही कायम हे असे by बॅटमॅन
तोच 'अजपाजप' असतो. अनाहत नाद असतो?
In reply to नामात नाही कारण कोणतही नाम हा by कवितानागेश
बरं...
In reply to `अजपाजप?' by संजय क्षीरसागर
तुमच्या आवाक्या पलिकडे गेलेला
In reply to जपामुळे ज्या गोष्टी होतात असं तुम्ही खत्रीपूर्वक लिहिताय ... by संजय क्षीरसागर
तुम्ही आता माहित नसलेल्या विषयावर लिहीताय!
In reply to तुमच्या आवाक्या पलिकडे गेलेला by कवितानागेश
>> अनाहत नाद म्हणजे वैश्विक शांततेची तुम्हाला झालेली जाणीव.
In reply to तुम्ही आता माहित नसलेल्या विषयावर लिहीताय! by संजय क्षीरसागर
अनाहत
In reply to >> अनाहत नाद म्हणजे वैश्विक शांततेची तुम्हाला झालेली जाणीव. by उन्मेष दिक्षीत
आपणच की
In reply to अनाहत by उन्मेष दिक्षीत
ए गपे!
In reply to आपणच की by अभ्या..
धागा वाचून mind मध्ये mind
आता प्रतिसादांची पण शंभरी
हो ना!
In reply to आता प्रतिसादांची पण शंभरी by प्यारे१
कोण हो..?? कोण ते आयडी..??
In reply to हो ना! by संजय क्षीरसागर
आयडी वेगैरे काही उगवत नाहीत
In reply to हो ना! by संजय क्षीरसागर
घोड्याला पाण्यापर्यंत आणता
जाऊ द्या हो बाणराव
In reply to घोड्याला पाण्यापर्यंत आणता by मदनबाण
चखन्याला शाकाहारी काय आहे?
In reply to जाऊ द्या हो बाणराव by अर्धवटराव
व्हेज भेजा फ्राय
In reply to चखन्याला शाकाहारी काय आहे? by प्यारे१
सगळं रेडी हाए... येताय का...
In reply to जाऊ द्या हो बाणराव by अर्धवटराव
घोड्याला पाण्यापर्यंत आणता येते पण त्याला पाणी पाजता येत नाही!
In reply to घोड्याला पाण्यापर्यंत आणता by मदनबाण