गाथा 'टायटन' ची - टायटन एज्
गाथा टायटनची - टायटन एज्
Favre-Leuba या जवळपास ३०० वर्षे जुन्या स्विस कंपनीला विकत घेणे या अचाट गोष्टी केवळ २५ वर्षात घडल्या आहेत यावर कोणाचाही सहजासहजी विश्वास बसणार नाही पण या अविश्वसनीय गोष्टींमुळे मनगटी घड्याळांच्या जागतिक बाजारपेठेमध्ये टायटनने आपले व पर्यायाने भारताचे नाव मानाने कोरले आहे.
"घड्याळांच्या विश्वामध्ये परंपरा न लाभलेल्या भारतासारख्या देशामधील एक नवखी कंपनी हे सगळे अल्पावधीत साध्य करते" ही वस्तुस्थिती टायटनच्या यशाला एक विशेष आयाम प्राप्त करून देते.
या घडामोडींमागे एक द्रष्टा माणूस आहे.
झेरसेस देसाई.
ऑक्सफर्डमध्ये शिक्षण सुरू असताना सुट्टीवर भारतात आलेले देसाई (शिक्षण सोडून!) १९६१ साली टाटा ग्रूपमध्ये सहभागी झाले. टाटा केमीकल्स, टाटा इंडस्ट्रीज, इंडीयन हॉटेल्स (ताज) आणि टाटा प्रेस अशा वेगवेगळ्या टाटा कंपन्यांसोबत काम केल्यानंतर १९८५ साली टाटा आणि तमिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन च्या एकत्रीत पुढाकारातून स्थापना झालेल्या टायटन मध्ये त्यांची रवानगी केली गेली, तिथून पुढे १५ वर्षे देसाई आणि टायटन ही नावे एकत्र घेतली गेली.
(झेरसेस देसाई जरी २००२ मध्ये रिटायर झाले असले तरी टायटनच्या आजच्या यशामध्येही त्यांचे योगदान आहे!)
१९८५ साली एका फ्रेंच कंपनीच्या मदतीने टाटांनी घड्याळाच्या क्षेत्रात पाऊल टाकले ते टायटन या नावाने! सुरूवातीला घड्याळाच्या मशीन पासून संपूर्ण घड्याळ तयार करण्यापर्यंत सर्व तंत्रज्ञान फ्रेंच कंपनीने पुरवले. मे १९८७ पासून टायटनने व्यावसायीक उत्पादन सुरू केले व उण्यापुर्या पाच वर्षांमध्ये संपूर्ण तंत्रज्ञान, सर्व बारकावे इत्यंभूत अवगत करून घेवून फ्रेंच तंत्रज्ञानापेक्षा उत्तम प्रतीची घड्याळे आपण बनवू शकतो हा आत्मविश्वास कमावला. यानंतर दोन वर्षे अविरत संशोधन करून टायटन ने आपले स्वतःचे पहिलेवाहिले मशीन (Watch Movement) बनवले. जागतीक मानांकनाच्या सर्व चाचण्या या मशीनने पार पाडल्या. आता टायटन घड्याळे भारतीय प्रमाणवेळ "भारतीय" मशीनने दाखवू लागले. हे साल होते १९९३-१९९४. यादरम्यान आलेली टायटनची घड्याळे जर कोणाला आठवत असतील तर हे सहज लक्षात येईल की ही घड्याळे बटबटीत व आजच्या तुलनेने बेढब असली तरी हळूहळू लोकप्रिय होत होती. एचएमटी व त्या दरम्यानच्या बाकीच्या घड्याळांच्या तुलनेमध्ये टायटनचे नाव अल्पावधीमध्ये वेगाने घोडदौड करत होते.
(१९९३-९४ च्या दरम्यान टाटा ग्रूपने नवीन अध्यक्ष रतन टाटांच्या नेतृत्वाखाली एकसंधतेकडे वाटचाल सुरू केली होती. टाटा ग्रूप अजून एकसंध झाला नसल्याने टायटन च्या डोक्यावर असलेला टाटांचा हात जाहिरातींमधून दिसावा तितका दिसला नव्हता. त्यामुळे "टायटनच्या त्यावेळच्या यशामध्ये टाटा फॅक्टरचा फारसा वाटा नसावा, संपूर्णपणे गुणवत्तेवर व एचएमटीच्या तुलनेमध्ये वेगळे व सुंदर असण्यामुळे टायटनने बाजी मारली असावी" - हा माझा अंदाज आहे!)
घड्याळांच्या विश्वामध्ये काही ठोकताळे आहेत, कित्येक वर्षे यांमध्ये काही बदल झाले नाहीयेत. जगातल्या कोणत्याही क्षेत्रात कितीही सुधारणा झाली व कोणत्याही देशाने कितीही प्रगती केली तरी घड्याळांच्या विश्वामध्ये अंतीम शब्द हा 'स्विस' घड्याळांचा. स्विस डिझाईन्स, स्विस तंत्रज्ञान आणि स्विस दबदबा. या दबदब्याला आजपर्यंत आव्हान मिळालेले नव्हते. जगातली यच्चयावत सर्व घड्याळे स्विस घड्याळांवरून प्रेरीत असतात आणि लेडीज घड्याळे ही जेंट्स घड्याळांची छोटी आवृत्ती असते. हा अलिखीत नियम वर्षानुवर्षे चालत आला होता. टायटनची सुरूवातीची घड्याळे याला अपवाद नव्हती. सुरूवातीची घड्याळे,

स्वित्झर्लंडमधल्या "Fleurier Quality Foundation" या Indipendent Horological Testing Agency कडे ही घड्याळे रवाना केली गेली. अतीउष्ण तापमान, अतीथंड तापमान, तापमानातील अचानक बदल अशा अनेक चाचण्यांसोबत शॉक टेस्ट, बंप टेस्ट, ड्रॉप टेस्ट अशा अनेक चाचण्या यशस्वीपणे पार पाडून टायटन एज् ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले, वापरण्यायोग्यतेच्या प्रमाणपत्रासह टायटन एज् 'वॉटर रेझिस्टंट' आहे असेही प्रमाणपत्र मिळाले. या चाचण्या लीलया पार पाडण्यामागेही टीम टायटनची एक हुषारी कारणीभूत होती. टेस्टसाठी घड्याळे पाठवण्याआधी 'इन हाऊस टेस्टींग सेंटर' मध्ये त्यांची अत्यंत खडतर प्रकारे परिक्षा घेतली गेली होती. आणि त्या परीक्षा यशस्वी पार पाडल्यानंतरच पुढची पाऊले उचलली गेली. वॉल टेस्ट (घड्याळ भिंतीवर फेकून मारणे), फ्लोअर टेस्ट (वेगवेगळ्या दिशेने घड्याळ जमिनीवर पाडणे), पूल टेस्ट (घड्याळ एका स्विमींग पूलमध्ये बुडवून ठेवणे) आणि बेंगलोर-होसूर रोड टेस्ट (गाडीच्या मागच्या शॉक अॅब्सॉर्बरला घड्याळ बांधून बेंगलोर-होसूर मधला २०० किमीचा खड्ड्यांचा रस्ता अनेकदा पार करण्यात आला) या चमत्कारीक टेस्ट करण्यामागे बी.जी द्वारकानाथांचा साधा विचार कारणीभूत होता. एजन्सीमध्ये केल्या जाणार्या टेस्ट्मध्ये "रिअल लाईफ सिच्यूएशन" तयार करता येत नाही.
मजेदार गोष्ट म्हणजे टायटन एज् ने याही चाचण्या व्यवस्थीत पार पाडल्या.
अत्यंत शांतपणे कोणताही गाजावाजा न करता बाजारपेठेमध्ये आलेल्या या "Slimmest Water Resistant Watch" ने भारतातच नव्हे तर जगभरात आपला ठसा उमटवला.
टायटन एज्
टायटन एज् ची दुसरी पिढी..
१७ व्या शतकापासून सुरू असलेल्या या घड्याळांच्या विश्वामध्ये प्रवेश करून, स्थापनेपासून पंचविशी दरम्यान 'जगातली पाचव्या क्रमांकाची घड्याळ उत्पादक कंपनी' ही टायटनने मारलेली मजलही एज् च्या कथेप्रमाणे अचाटच!
पुढील भागात पाहूया टायटनने भेट दिलेली अशीच एक सुंदर कलाकृती..
*****************************************************************
ओमेगा आणि इतर कंपन्यांनी टायटन एज् इतकीच किंवा त्याहूनही स्लिम घड्याळे तयार केली आहेत, परंतु ती घड्याळे वॉटर रेझिस्टंट नाहीयेत आणि ती दैनंदिन वापरायोग्य नाहीयेत.

लेखातली बरीचशी माहिती "Making Breakthrough Innovation Happen" या पुस्तकातून, ही प्रताधिकारीत माहिती लेखामध्ये वापरण्यासाठी दिलेल्या परवानगी बाबत लेखक 'पोरस मुन्शी' यांचे आभार.
पुस्तकातील मूळ लेखाचे सर्व हक्क "EREHWON Innovation Consulting" या कंपनीकडे. EREHWON Innovation Consulting चे श्री राजीव नारंग यांचेही आभार.
सर्व प्रकाशचित्रे अंतर्जालावरून साभार.

प्रतिक्रिया
झकास!!
माहितीपुर्ण लेखन!
मस्त...
सुंदर लेखन !
अप्रतिम लेख!!! आणि
माहितीपूर्ण
झक्कास लेख रे मोदका.
माझ्या दिराने मुलीला असच अगदी
फारच सुंदर लेख मोदक, नविन
मोदकराव
टायटन चे इंडीयन क्लासीकल इंस्ट्रुमेंट्स साँग...क्लासीक :)
आईशप्पथ!!! लैच भारीये हे
अतिशय धन्यवाद, आणि बॅमॅ तुला
खुप छान आणि माहितीपुर्ण लेख..
माझं आवडत घड्याळ ............
सुंदर लेख..
नेहमीप्रमाणेच नितांत सुंदर आणि माहितीपुर्ण लेख... :)
एकच नंबर...
मस्तच लिहिलंय! काही
आता खरेदीच्या यादीमध्ये
Pagination