एक चित्र..मायक्रोसॉफ्ट पेंट मध्ये..

स्वप्निल..'s picture
स्वप्निल.. in जनातलं, मनातलं
4 Jul 2008 - 4:41 am

चित्रे काढण्याची खुप हौस..पण आळशी आणि वेळ..एकदा सहजच मायक्रोसॉफ्ट पेंट वर खालील चित्र काढले..
कागदावर काढायचे म्हणजे बराच वेळ पाहीजे..नेहमी डोळ्यांसमोर संगणक..त्यामुळे हा रीकामा उद्योग.. :)

सांगा कसे आले ते??

स्वप्निल..

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

सूर्य's picture

4 Jul 2008 - 6:13 am | सूर्य

चित्र सुंदर आले आहे. मायक्रोसॉफ्ट पेंट मधे कसे काढले ? माउस पेन्सिलसारखा वापरता येतो ? .. चित्र सहीच आहे.

- सूर्य.

टारझन's picture

4 Jul 2008 - 12:22 pm | टारझन

लई भारी रे स्वप्न्या दादा.....
अल्टी ... जबरा.... आपण पण मा.सॉ.पेंट मधे किडे केलेत.पण तिथे पण डाकू वगैरे असले विचित्र प्रकार काढलेत.
तुझा चित्तार बघुन आपण खलास.....
लगे रहो.....
स्वगत : एकदा एक डाकू काढला होता पेंट मधे.. जाम भितीदायक वाटायचा....मला वाट्ट तो तात्यांसारखा दिसे .... ;)

(चित्र)कलाप्रेमी ) कुख


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

स्वप्निल..'s picture

4 Jul 2008 - 1:50 pm | स्वप्निल..

कसे काढले ?
नक्की नाही सांगता येनार्..पण प्रयत्न केल्यास जमेन्..बस माउस पेन्सिल सारखा वापर..किंवा मागे एक आणि वर दुसरा असे रंग वापर..थोड्या प्रयत्नांनी जमेन..

अरे कु. ख.,
दादा वगैरे नको म्हणु..एकदम खुप मोठा झाल्यासारखे वाटते...
स्वप्न्या - चालेल.. :)

स्वप्निल..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2008 - 8:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त काढलंय !!!

विसोबा खेचर's picture

4 Jul 2008 - 8:28 am | विसोबा खेचर

सह्हीच चित्रं काढलं आहे!

विशेष करून बाजूला विसावलेली ती बैलगाडी क्लासच आली आहे...

स्वप्नीलराव, जियो...!

एक विनंती -कृपया आपला लॉगईन आयडी देवनागरीत लिहावा...

तात्या.

स्वप्निल..'s picture

4 Jul 2008 - 1:55 pm | स्वप्निल..

तात्या..

एक विनंती -कृपया आपला लॉगईन आयडी देवनागरीत लिहावा

लिहिला..

मी स्वताच बदलनार होतो..तुम्हाला सांगावे लागले..माफी असावी..

स्वप्निल..

सुचेल तसं's picture

4 Jul 2008 - 8:44 am | सुचेल तसं

स्वप्नील,

इथे मला चित्र दिसत नाहीये...... बर्‍याच वेळा रिफ्रेश करुन पण पाहिलं...

तात्या,
काही सेंटिंग्ज बदलावी लागतील का?

धन्यवाद!!!

-ह्रषिकेश

http://sucheltas.blogspot.com

विसोबा खेचर's picture

4 Jul 2008 - 8:55 am | विसोबा खेचर

खरं तर चित्र दिसायाला काहीच प्रॉब्लेम येऊ नये..मला तर दिसतं आहे.

काही सेंटिंग्ज बदलावी लागतील का?

काय कल्पना नाय बा! नीलकांतला विचारतो...

गैरसोयीबद्दल तूर्तास दिलगिरी व्यक्त करतो साहेब..!

तात्या.

सुचेल तसं's picture

4 Jul 2008 - 9:11 am | सुचेल तसं

तात्या,

ऑफिसमधल्या पीसीवर पहात असल्याने कदाचित प्रॉब्लेम येत असेल. संध्याकाळी घरी जाऊन बघतो; घरच्या पीसीवर दिसेल बहुदा.

आपल्या तत्पर उत्तराबद्दल आभारी आहे.

http://sucheltas.blogspot.com

ध्रुव's picture

4 Jul 2008 - 9:35 am | ध्रुव

ईमेजशॅक या संकेतस्थळाला तुमच्या ऑफीसमधुन भेट देता येते नसेल कदाचित त्यामुळे तुम्हाला चित्र दिसत नसेल.
--
ध्रुव

सुचेल तसं's picture

4 Jul 2008 - 9:42 am | सुचेल तसं

ध्रुव,

खरयं अगदी...ईमेजशॅकला भेट देण्याची परवानगी नाहीये इथे. धन्यवाद.

http://sucheltas.blogspot.com

प्रमोद देव's picture

4 Jul 2008 - 8:58 am | प्रमोद देव

मासॉपें मध्ये काढले नसावे असे वाटण्याइतपत चित्र अस्सल आलंय.
आवडलं! तुमचं हातावरचं नियंत्रण अफलातून आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

भडकमकर मास्तर's picture

4 Jul 2008 - 9:10 am | भडकमकर मास्तर

तुमचं हातावरचं नियंत्रण अफलातून आहे.

हेच म्हणतो..
मी सुद्धा फोटोशॉपमध्ये बरंच काम करतो हौशी पद्धतीने...
त्यामुळं मला कल्पना आहे, त्यासाठी हात चांगला चालावा लागतो... मस्त...
अजूनही अशीच चित्रे येउद्यात...
आणि आम्हालाही ती बैलगाडी आवडली...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भाग्यश्री's picture

4 Jul 2008 - 9:06 am | भाग्यश्री

चित्रं खूपच आवडलं! बैलगाडी आणि मागचे अस्पष्ट डोंगरांची रांग अफलातून!!

http://bhagyashreee.blogspot.com/

सहज's picture

4 Jul 2008 - 9:25 am | सहज

चित्र मस्तच आले आहे.

आता अजुन चित्रे काढा व इथे टाका. त्याचबरोबर संगणकावर चित्र काढायच्या काही क्लुप्त्या, खुबी समजवा व शिकवा.

अवांतर - "वायांग कुलीत" ची आठवण आली.

स्वप्निल..'s picture

4 Jul 2008 - 1:59 pm | स्वप्निल..

आहेत्..टाकतो लवकरच..

कसल्या आल्याय क्लुप्त्या, खुबी ..थोड्या रेघोट्या मारतो..बस्स..
माउस वर नियंत्रन आले कि जमते .. तेच केले..सर्वच चांगली जमतात असे नाही..

स्वप्निल..

अमोल केळकर's picture

4 Jul 2008 - 9:25 am | अमोल केळकर

विशेषतः सुर्य आणी शेकोटीच्या ज्वाळा यांचा रंग मस्त जमलाय.

अमोल
------------------------------------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

ऋचा's picture

4 Jul 2008 - 9:26 am | ऋचा

खुप छान आलय चित्र.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

ध्रुव's picture

4 Jul 2008 - 9:32 am | ध्रुव

चित्र जब्राट जमलं आहे. चित्रातलं झाड, झाडाखालची गाडी तर फा भारी आहे.

--
ध्रुव

मदनबाण's picture

4 Jul 2008 - 9:47 am | मदनबाण

स्वप्नीलजी मस्त आहे तुम्ही काढलेल चित्र..

मदनबाण.....

गिरिजा's picture

4 Jul 2008 - 10:35 am | गिरिजा

काय सुरेख आलय!! पेंट मध्ये काढलेलं अजिबात वाटत नाहीए.. खूप मस्त आलयं!

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

नंदन's picture

4 Jul 2008 - 12:50 pm | नंदन

आहे. चित्र मस्त आलंय. पेंटमध्ये काढल्यासारखं अजिबात वाटत नाही.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ईश्वरी's picture

4 Jul 2008 - 11:42 am | ईश्वरी

फारच सुंदर आले आहे चित्र. माउस वर जबरदस्त कंट्रोल दिसतोय तुमचा. पेंट मध्ये काढलंय असं अजिबात वाटत नाहीये.
ईश्वरी

यशोधरा's picture

4 Jul 2008 - 12:05 pm | यशोधरा

सुरेख जमलय चित्र. आवडलं

स्वप्निल..'s picture

4 Jul 2008 - 1:38 pm | स्वप्निल..

वरील सर्व मंडळींचे आभार...!!!
अजुन एक चित्र आहे..टाकतो लवकरच..

स्वप्निल..

अनिल हटेला's picture

4 Jul 2008 - 3:52 pm | अनिल हटेला

चित्र अर्थात मस्त जमलये........

पण त्यात एक त्रूटी आहे....

त्यात मी कुठाये?

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

स्वप्निल..'s picture

5 Jul 2008 - 8:25 am | स्वप्निल..

आन्या..

त्यात मी कुठाये?

अरे काढनार होतो..पन जागा कमी पडली.... :)

स्वप्निल..

धनंजय's picture

4 Jul 2008 - 5:58 pm | धनंजय

आणि माऊसवरचा तुमचा ताबा तर फारच चांगला असावा.

झकासराव's picture

4 Jul 2008 - 6:34 pm | झकासराव

चित्र आहे राव.
:)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

लिखाळ's picture

4 Jul 2008 - 8:59 pm | लिखाळ

कमाल आहे.. माउस ने इतके उत्तम चित्र !
रंगसंगती आणि मांडणी उत्तम आहे. एका बाजूला सूर्य आणि एकीकडे झाड आणि खाली नाचणारी माणसे..बैलगाडी सरच मस्त !
अभिनंदन..
अजून चित्रे पहायला आवडतील.
--लिखाळ.

सैरंध्री's picture

5 Jul 2008 - 5:55 am | सैरंध्री

अप्रतिम चित्र काढले आहे. आवडले.
-- सैरंध्री

प्रभाकर पेठकर's picture

5 Jul 2008 - 3:26 pm | प्रभाकर पेठकर

'ती' बैलगाडी आहे की तोफ आहे?

बैलगाडीचा जो हौदा असतो तो दिसत नाहीए. मलातरी ती तोफ वाटली.

स्वप्निल..'s picture

6 Jul 2008 - 7:38 am | स्वप्निल..

चाच विचार होता डोक्यात त्यावेळेस..
पण पेंट मध्ये काढले आहे हो ते..

स्वप्निल..

प्रभाकर पेठकर's picture

6 Jul 2008 - 9:31 am | प्रभाकर पेठकर

श्री. स्वप्निल,

खुलाशाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तुमची चुक दाखविण्याचा उद्देश नव्हता तर मला खरोखर ती तोफ वाटली. असो. माझ्या आगाऊपणा बद्दल राग नसावा, ही विनंती.

स्वप्निल..'s picture

6 Jul 2008 - 12:01 pm | स्वप्निल..

तुमचे बरोबर आहे..तोफ वाटणे साहजिक आहे..त्यात राग वगैरे चा प्रश्नच नाही..
आनंदच आहे..एका वेगळ्या द्रुष्टीने चित्र बघितल्याबद्दल..!!

स्वप्निल..

मुक्तसुनीत's picture

6 Jul 2008 - 9:59 am | मुक्तसुनीत

चित्र विलक्षण वाटले. पहिल्यांदा पाहताक्षणी एक क्षण श्वास रोधून धरण्याइतपत.

आणि हो , मला ती कोपर्‍यातली गोष्ट तोफच वाटली. माझ्यापुरती ती तोफच आहे. कल्पना करा , हा कुठल्याशा सैन्याचा बँड आहे. दिवसा घनघोर लढाई झाली आहे. पिछाडीला असलेला हा बँड सूर्य मावळताना युद्धभूमीवर आलाय. आजूबाजूला आपल्या मित्रांना धारातीर्थी पडलेले पाहून, हा बँड , मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून, कलत्या सायंकाळी काही आर्त सूर छेडत आहे..

स्वप्निल..'s picture

6 Jul 2008 - 12:05 pm | स्वप्निल..

मुक्तसुनीत,

आभारी आहे..एका वेगळ्या द्रुष्टीने चित्र बघितल्याबद्दल..आणि मला दाखवल्याबद्दल!!
ही कल्पना माझ्या डोक्यात सुध्धा आली नाही...

स्वप्निल..

लिंबू टिंबू's picture

6 Jul 2008 - 11:41 am | लिंबू टिंबू

स्वप्निलदादा, तू काधलेले चित्ल खूपच शुंदल आले आहे. मला पण शिकव ना!

नंदकुमार's picture

6 Jul 2008 - 2:36 pm | नंदकुमार

अरे वा

अजिंक्य's picture

6 Jul 2008 - 2:56 pm | अजिंक्य

छान चित्र काढलंय.
अजून येऊ दे.

शितल's picture

7 Jul 2008 - 3:56 am | शितल

छान कलर कॉम्बी नेशन घेऊन चित्र काढले आहे.
बैलगाडी तर अगदी मस्त

चतुरंग's picture

8 Jul 2008 - 1:32 am | चतुरंग

उंदरावरचे आपले नियंत्रण हे गणपती खालोखाल असावे! ;)

चतुरंग

स्वप्निल..'s picture

8 Jul 2008 - 5:59 am | स्वप्निल..

हे गणपती खालोखाल असावे!

नाही हो चतुरंग..काहीतरि रेघोट्या मारतो आपल्या..ब्रश साठी वेळ नाही मिळत पाहीजे तेवढा..म्हणुन काहीतरी..

स्वप्निल..

बेसनलाडू's picture

8 Jul 2008 - 1:34 am | बेसनलाडू

आवडले.
(प्रेक्षक)बेसनलाडू

देवदत्त's picture

8 Jul 2008 - 2:09 am | देवदत्त

चांगले चित्र आहे. तुमचा हात चांगलाच बसलेला दिसतोय माऊसवर :)

स्वप्निल..'s picture

8 Jul 2008 - 6:01 am | स्वप्निल..

धनंजय, झकासराव, लिखाळ, सैरंध्री, लिंबू टिंबू , नंदकुमार, अजिंक्य, रवी, शितल, चतुरंग, बेसनलाडू , देवदत्त
आणि इतर सर्वांचा मी आभारी आहे..चित्र एवढं आवडेल हे अपे़क्षीत नव्हते..

स्वप्निल..