पुन्हा एकदा पाकिस्तान

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in काथ्याकूट
9 Jan 2013 - 2:41 pm
गाभा: 

पाकिस्तान शत्रु असला, जरी तो आपल्या देशात अतिरेकी पाठवत असला तरीही ते त्या देशाचे राष्ट्रिय धोरण आहे आणि त्याचा संबंध त्या देशातील कलावंत आणि खेळाडु यांच्याशी जोडु नये अशी सहिष्णु व मानवतावादी, कला-क्रिडा प्रोत्साहक भूमिका मांडलेली दिसते. पाकिस्तानी खेळाडुंना इथे येण्यास वा पाकिस्तानी कलाकारांना इथल्या सिने/ करमणुक क्षेत्रात काम करु देण्यास विरोध करणार्‍यांना संकुचित म्हटले जाते.

कालची बातमी हादरवणारी आहे. वैमनस्य असलेल्या दोन राष्ट्रात चकमकी घडणे समजण्यासातखे आहे. मात्र रानटीपणे हल्ला करुन सैनिकांचे शिरच्छेद करणे व शिर कापून नेणे हे कसले द्योतक आहे? 'आम्ही काहीही केले तरी तुम्ही आमचे काही वाकडे करु शकणार नाही' हा माज त्यामागे आहे. आणि खरोखरच आपले सरकार निषेध खलिता पाठविण्यापलिकडे काही करणार नाही. उद्या कदाचित 'हे हल्लेखोर आमचे सैनिकच काय नागरीकही नव्हते' असा पवित्रा पाकिस्तान घेईल.

मग अशा घटना घडल्यानंतरही आपण' कला आणि क्रिडा क्षेत्रात जात, धर्म, देश वगैरे सीमांची बंधने नसतात' असे गुणगुणत पाकिस्तानी खेळाडुंना निमंत्रित करत राहणार का? इथे खेळायला आलेल्या वा करमणुक क्षेत्रात कमावुन गेलेल्या/ कमावत असलेल्या कितीजणांनी आपल्या देशबांधवासमोर अशा कृत्यांचा निषेध केला आहे? जर त्या कलावंतांना/ खेळाडुंना इथे येणे महत्वाचे वाटत असेल तर त्यांनी अशा कृत्यांचा जाब आपल्या राष्ट्राला का विचारु नये? आणि जर ते असे करत नसतील तरीही आपण त्यांना इथे कडेकोट बंदोबस्तात मिरवणार का?

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

9 Jan 2013 - 2:48 pm | छोटा डॉन

साक्षीशेठ, तुम्ही म्हणता ते सर्व खरे आहे.
पण मुळात आम्ही संकुचित विचारसारणीचे असल्याने आम्ही काहीही म्हटले तरी ते संकुचितच रहात असल्याने आम्ही आपलं गपगुमानं पुढचे क्रिकेट सामने लागत नाहीत तोवर पाकी कलाकारांचे समावेश असलेले रिअ‍ॅलिटी शो बघत आहोत व आपल्या दोस्तीनाम्याचे गोडवे गात आहोत.

-छोटा डॉन

पाकिस्तानात (आणि भारतातही?) निवडणूका जवळ आल्यात ना!

विकास's picture

10 Jan 2013 - 10:11 pm | विकास

पाकिस्तानात (आणि भारतातही?) निवडणूका जवळ आल्यात ना!

हा प्रतिसाद अंमळ खटकला... निवडणूका जवळ आल्यामुळे सैनिकांचा शिरच्छेद करणे हे मान्य आहे का? हे justification कसे काय होऊ शकते? हे निषेधार्ह वाटत नाही?

हे जस्टिफिकेशन नव्हे अनेक कारणआंपैकी एक महत्त्वाचे कारण आहे.
फक्त मी नाही अनेक वृत्तपत्रांच्या कालच्या अग्रलेखात अनेकांना असेच वाटते आहे. अगदी पाकीस्तानातही थेट नाही तरी याचा निवडणुकांवर होणारा परिणाम अश्या आडमार्गाने हेच सुचवले जात आहे. असो.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

9 Jan 2013 - 2:56 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अस कसं? भारत पाकिस्तान सामने झाले नाहीत तर खेळ वाहिन्या, BCCI, सरकारी धेंड हे पैसे कसे कमवणार? बिचारे दारिद्र रेषेखाली जातील ना!! मग काय ते तुमच्या आमच्या सारख्या शुद्र सामान्य माणसां सारखे रेशनच्या लाइनीत उभे राहणार की काय? काहीतरी आपल तुमचं. त्या तिकडे कोपर्‍यातल्या बॉर्डरवर काय होतय याच्याशी त्यांना काही देण घेण नाहीये, तिथले ते सैनिक काही त्यांचे ग्राहक नाहीत.

यशोधरा's picture

9 Jan 2013 - 3:38 pm | यशोधरा

१०० % अनुमोदन.

पाकिस्तानला कडी चेतावनी दिल्याची बातमी आलीच आहे. आता पुढे काही ठोस कारवाई करतील अशी आशा करावी का? की ठराविक जमातीचे लांगूलचालन करण्यासाठी, मतांसाठी सैनिकांच्या जिवांची किंम्मत शून्य ठरणार आहे? मागे इथेच मिपावर काही जणांनी सैनिकांचा तो जॉबच आहे, त्यात इतके काय वाटायचे हे म्हटल्याचेही आठवते. :(

संताप, संताप झाला आहे जिवाचा!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jan 2013 - 4:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

निषेध खलिते तयारच असतात आमच्याकडे, वर फक्त तारीख आणि विषय टाकतो आणि पाकिस्तान ला देतो पाठऊन. ते तिकडे हल्ली पेपर रोल विकत घेत नाहीत त्यामुळे असं ऐकीवात आहे.

श्री गावसेना प्रमुख's picture

10 Jan 2013 - 9:09 am | श्री गावसेना प्रमुख

पंतप्रधानांना कुठे ह्या भारतात जन्म घेतला असे वाटुन गेले असावे,मला तरी असे वाटते कारण ते नेहमी डोक्याला हात लावुन बसलेले असतात्,बाकी हे कडक शब्दातले खलीते कसे असतात हो, नाही म्हणजे शब्द भिंतीवर कोरुन भिंतच मारुन नाहीना फेकत. (त्यांनी पण आपल्या दुताला कडक शब्दाचा खलिता दिला म्हणे)मागच्या धाग्यात कोणीतरी म्हटले की ,त्यांनी काहीबाहीकेले तरी आपल्या सैनिकांनी सीमेवर काय केले हे पेपरात कधीच छापुन येत नाही,@रणजीत चितळे साहेब तुम्हाला यातले काही माहीत आहे काय्?असल्यास आम्हा सांगा ना.

आपल्या सहिष्णु सरकारने "investigation" च्या ऑर्डर्स दिल्या आहेतच. कसलं investigation करणार? आपल्या जवानाचं शिर कोण घेऊन गेला आणि त्याचा पाकिस्तानी सरकारने कसा सत्कार केला याचं? अर्थात आपल्या सरकारकडून अजून कसल्या अपेक्षा ठेवायच्या? जिथे आपल्याच देशातल्या मुलीवर अन्याय करणार्‍या आपल्याच देशातल्या गुन्हेगारांना पकडूनसुद्धा त्यांना शिक्षा करण्याची धमक या भ**** च्या गां*** नाही, तिथे बाहेरच्यांबद्दल हे काय उखडणार?

पाषाणभेद's picture

10 Jan 2013 - 9:48 am | पाषाणभेद

हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांना कडक सलामी.

सदर घटना पाहून भारतीय राजकारण्यांचा निषेध करावा तितकाच थोडा आहे. अतिशय नेभळट, षंढ असल्या राज्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया पाहून या बुळ्या भारताकडून पाकिस्तानचे काहीच वाकडे होणार नाही याची खात्री वाटते.

मी पाकिस्तान या देशाबद्दलच्या कोणत्याही मिडीयामध्ये येणार्‍या बातम्या वाचणे/ पहाणे/ ऐकणे कधीचेच सोडून दिले आहे.

पिंपातला उंदीर's picture

20 May 2015 - 9:36 pm | पिंपातला उंदीर

बाकी या धाग्यावरच्या सगळ्याच प्रतिक्रिया विनोदी सदरात जमा होऊ शकतील . ५६ इंची पम्प्र आहेत पण परिस्थिती तीच आहे . काय म्हणाव याला ? सध्याचे पम्प्र कसे ? नेभळट का षंढ? का अजून कुणी ?

उपास's picture

10 Jan 2013 - 10:09 am | उपास

तिथे पाकिस्तानात काय म्हणतेय मिडिया? इथे पूर्वी काळे काका पाकिस्तानच्या वृत्तपत्रातले लेख अभ्यासून माहिती द्यायचे असं आठवतय (मी बरेच दिवस बेपत्ता असल्याने अजूनही ते इथे देतात का माहित नाही).
हुतात्मा सैनिकांना सलाम - भारतिय नागरीकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो... तुमच्यासाठी..!
सरकार काही करतय का याची वाट बघत हात चोळत बसायचं..

लीलाधर's picture

10 Jan 2013 - 10:29 am | लीलाधर

संताप

चिरोटा's picture

10 Jan 2013 - 10:36 am | चिरोटा

हुतात्मा झालेल्या जवानांना सलामी.सहज पाकिस्तानी वृत्तपत्र काय म्हणतात हे पाहिले-
भारताने अजून यु.एन.मध्ये तक्रार नोंदवली नाही असे यु.एन.ने म्हंटले आहे.
http://dawn.com/2013/01/10/un-says-no-complaint-received-over-kashmir-be...
भारत-पाकिस्तान संबंध हे न सुटणारे कोडे आहे.दावूद ईब्राहिमला नंबर एकचा शत्रु म्हणायचे पण त्याच्या मुलीच्या सासर्‍याला जावेद मियॉदादला व्हिसा द्यायचा आणि त्याचे समर्थन करायचे.
सध्या निषेध नोंदवत आहेत.आणखी चार दिवसांनी दोघांचे हस्तांदोलन करतानाचे फोटो बघायचे.मग त्यांनी निषेधाचा खलिता पाठवायचा मग ह्यांनी अमन की आशा म्हणायचे.

होय हे असेच चालू राहणार, आपण त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही.

नितिन थत्ते's picture

10 Jan 2013 - 11:14 am | नितिन थत्ते

हे सरकार नाहीसे केले पाहिजे.

लष्कर ए शिवबा झोपा काढीत आहे काय?

कालची बातमी हादरवणारी आहे. वैमनस्य असलेल्या दोन राष्ट्रात चकमकी घडणे समजण्यासातखे आहे. मात्र रानटीपणे हल्ला करुन सैनिकांचे शिरच्छेद करणे व शिर कापून नेणे हे कसले द्योतक आहे? 'आम्ही काहीही केले तरी तुम्ही आमचे काही वाकडे करु शकणार नाही' हा माज त्यामागे आहे. आणि खरोखरच आपले सरकार निषेध खलिता पाठविण्यापलिकडे काही करणार नाही. उद्या कदाचित 'हे हल्लेखोर आमचे सैनिकच काय नागरीकही नव्हते' असा पवित्रा पाकिस्तान घेईल.
साक्षीकाका फक्त कालचीच बातमी हादरवणारी नव्हती ! १५ मे १९९९ रोजी ४-जाट रेजिमेंटचे जवान (Captain Kalia & Arjun Ram, Bhanwar Lal Bagaria, Bhika Ram, Moola Ram
and Naresh Singh
)हे सर्व पाकिस्तान सैन्याच्या कैदेत अडकले. २२ दिवस हे त्यांच्या कैदेत होते,आणि जुन ९ १९९ ला पाकिस्तान लष्कराने त्यांचे मॄतदेह आपल्या सैन्याच्या ताब्यात दिले.
त्यांच्या मॄतदेहांचे autopsy रिपोर्ट आल्या नंतर धक्कादायक गोष्टी जगा समोर आल्या !या सर्व जणांना भयानक यातना देउन ठार मारण्यात आले होते.त्यांचे डोळे काढण्याआधी फोडले,त्यांच्या कानात गरम सळ्या घातल्या,संपूर्ण शरीरावर सिगरेटचे चटके देण्यात आले,त्यांचे ओठ कापण्यात आले,जबड्यातले सर्व दात पाडण्यात आले,त्यांचे डोक्या (कवटी) सकट शरीरातली सर्व हाडे मोडली होती.इतर इंद्रियांबरोबर या सर्वांची जनन इंद्रिये सुद्धा या हैवान पाकड्यांनी कापुन टाकली होती.याच बरोबर मेंटल टॉर्चर देखील करुन झाले होते...शेवटी या सर्वांना गोळ्या घालण्यात आल्या ! {जरा या
यातनांचा विचार करुन पहा,त्यांना ज्या खोलीत या यातना देण्यात आल्या त्यात यांचे आवाज किती वेळ घुमले असतील याचा देखील विचार करा}ही घटना घडली त्यावेळी कॅप्टन कालिया याचे वय होते फक्त २३ वर्ष !

आज १३ वर्ष होउन सुद्धा त्यांना कारगिल हिरो म्हणण्या पलिकडे आपण काहीही करु शकलो नाही ! :(
कालियाचे वडील इतके वर्ष आपल्या मुलासाठी लढा देत आहे,तरी हाती काहीच गवसले नाही. आता ते युएन मधे दाद मागण्याची तयारी करत आहेत.

काही दुवे :---
Capt Kalia’s father demands strong action against Pak
Capt Saurabh Kalia's father says no hopes from Pakistan
Kargil War hero Captain Saurabh Kalia's father approaches UN
Saurabh Kalia

जाता जाता :--- आपल्या मातॄभूमीसाठी बलिदान देणार्‍या जवांनाना जर आपले सरकार न्याय मिळवुन देउ शकत नसेल आणि देशातील नागरिकांना या बलिदानांचे महत्व कळत नसेल तर मग अशा आणि अनेक जवानांनी देश रक्षणाची सेवा कोणत्या कारणास्तव करावी ? पाकिस्तानच्या ह्या घॄणास्पद अमानविय वर्तनाकडे हिंदुस्थान सरकार गांभिर्याने पाहत नसल्याने याचा हिंदुस्थानी लष्कराच्या मनोबलावर अयोग्य परिणाम होत असुन...पाकिस्तानला बहुधा हेच साधणे अपेक्षित असावे ! असे मला वाटते.:(

गवि's picture

10 Jan 2013 - 11:19 am | गवि

सहमत...

मात्रः

आज १३ वर्ष होउन सुद्धा त्यांना कारगिल हिरो म्हणण्या पलिकडे आपण काहीही करु शकलो नाही

याच्याशी असहमत. "कारगिल हीरोज" हे नाव वापरुन आदर्श बिल्डिंग उभी केली की.. :(

रामपुरी's picture

12 Jan 2013 - 3:15 am | रामपुरी

"कारगिल हीरोज" हे नाव वापरुन आदर्श बिल्डिंग उभी केली की.."
आरोपीतले २ चचले. हळूहळू सगळे ढगात जाऊन केस आपोआप बंद पडेल. फार नाही फक्त अजून १०-१५ वर्षे थांबा.

पिंपातला उंदीर's picture

20 May 2015 - 9:37 pm | पिंपातला उंदीर

आपल्या मातॄभूमीसाठी बलिदान देणार्‍या जवांनाना जर आपले सरकार न्याय मिळवुन देउ शकत नसेल आणि देशातील नागरिकांना या बलिदानांचे महत्व कळत नसेल तर मग अशा आणि अनेक जवानांनी देश रक्षणाची सेवा कोणत्या कारणास्तव करावी ? पाकिस्तानच्या ह्या घॄणास्पद अमानविय वर्तनाकडे हिंदुस्थान सरकार गांभिर्याने पाहत नसल्याने याचा हिंदुस्थानी लष्कराच्या मनोबलावर अयोग्य परिणाम होत असुन...पाकिस्तानला बहुधा हेच साधणे अपेक्षित असावे ! असे मला वाटते.:(

तुमचे हेच मत अजून पण कायम आहे का हो ?

तुमचे हेच मत अजून पण कायम आहे का हो ?
ह्म्म... यापुढे पाकड्यांनी मस्ती केल्यास सध्याचे सरकार कसे रिअ‍ॅक्ट करते ते पाहुन झाल्यावर मतात बदल झाला तर होइल ! आपल्या सौनिकांची होणारी विटंबना आता सहन करण्या पलिकडे आहे हे आपल्या सैन्याने आणि सरकारनेच दाखवुन ध्यावयास हवे नाही का ?

मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi

पैसा's picture

10 Jan 2013 - 11:33 am | पैसा

तुमचा आमचा आक्रोश कोणाच्या कानावर पडणार आहे?

whiteflower

कभी वो दिन भी आयेगा,
कि जब आजाद हम होंगे,
ये अपनी ही जमीं होगी,
ये अपना आसमां होगा,
शहीदों कि चिताओं पर,
लगेंगे हर बरस मेले,
वतन पर मरने वालों का,
यही नामों-निशां होगा.

हे अगदी खरे आहे.

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2013 - 12:33 pm | श्रीगुरुजी

पाकिस्तानने कितीही क्रूर कृत्ये केली, कितीही अतिरेकी हल्ले केले, कितीही बॉम्बस्फोट केले तरिही भारताची प्रतिक्रिया निषेधाचे खलिते पाठविण्याकडे जात नाही. गेल्या २०-२५ वर्षातले ठळ्क प्रसंग आठविले तरी अंगाची लाहीलाही होते.

(१) १९९३ मध्ये दाउद इब्राहिम, टायगर मेमन इ. ना पैसा, बॉम्ब, शस्त्रे पुरवुन पाकिस्तान्यांनी मुम्बईत बॉम्बस्फोट घडवून आणून जवळपास ३०० लोक मारले. त्यानंतर या सर्व अतिरेक्यांना आजतगायत पाकिस्तानने राजाश्रय दिलेला आहे.

भारताची कारवाई - दाउदला आमच्या ताब्यात द्या अशी २-३ वर्षातून एकदा मागणी करणे.
पाकिस्तानचा प्रतिसाद - भारताच्या मागणीला केराची टोपली दाखविणे.

(२) कारगिल, द्रास इ. भागात मे १९९९ मध्ये घुसखोरांच्या वेषात सैनिक घुसवून पाकिस्तानने भारताचा भाग बळकाविण्याचा प्रयत्न केला.

भारताची कारवाई - हवाई हल्ले करून सीमा न ओलांडता भारताने घुसखोर सैनिकांना हाकलून लावून आपला भाग मुक्त केला. यात भारताला ४०० सैनिकांचे बलिदान द्यावे लागले तर पाकड्याचे अंदाजे १००० सैनिक मेले.

(३) याच युद्धात युध्दकैदी म्हणून पकडलेल्या कॅ. सौरभ कालिया व इतर ५ जणांना पाकच्या सैनिकांना अतिशय रानटी व अमानवी पद्धतीने हालकाल करून ठार मारले.

भारताची कारवाई - पाकिस्तानला निषेध खलिता पाठविला.
पाकिस्तानचा प्रतिसाद - भारताच्या निषेध खलित्याला केराची टोपली दाखविली.

(४) डिसेंबर १९९९ मध्ये पाकिस्तानने कट आखून अतिरेक्यांच्या सहाय्याने नेपाळमधून इंडियन एअरलाइन्सचे विमान अपहरण करून अफगाणिस्तानमध्ये नेले. भारताला १६० प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी मसून अझर व इतर २ अतिरेक्यांना सोडावे लागले. हे तीनही अतिरेकी व विमान पळविणारे ५ चाचे पाकिस्तानात सुखरूप आहेत.

भारताची कारवाई - पूर्वीचाच निषेध खलिता तारीख-वार बदलून दिला.
पाकिस्तानचा प्रतिसाद - भारताच्या निषेध खलित्याला केराची टोपली दाखविली.

(५) २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी लष्कराने १० प्रशिक्षित अतिरेक्यांना मुम्बईत पाठवून धुमाकूळ घातला. भारताने त्यातल्या ९ जणांना कंठस्नान घातले व एकाला जिवंत पकडून नुकतेच फाशी दिले. पण त्यापूर्वी तब्बल २०० जणांचा जीव गेला होता.

भारताची कारवाई - जुना निषेध खलिता २६ नोव्हेंबर २००८ ही तारीख टाकून दिला व या हल्ल्याचा सूत्रधार सईद हाफिजला आमच्या ताब्यात द्या अशी २-३ वर्षातून एकदा मागणी करणे.

पाकिस्तानचा प्रतिसाद - भारताच्या मागणीला व निषेध खलित्याला केराची टोपली दाखविली.

(६) ०८ जानेवारी २०१३ - पाकिस्तानी सैन्याने सीमारेषा ओलांडून भारतीय हद्दीत येऊन हल्ला करून २ सैनिकांना मारून त्यांचे शिर कापून नेले.

भारताची कारवाई - जुनाच निषेध खलिता ०८ जानेवारी २०१३ ही तारीख टाकून दिला.
पाकिस्तानचा प्रतिसाद - भारताच्या निषेध खलित्याला केराची टोपली दाखविली.

या ठळ्क घटना आहेत. अशा इतर असंख्य घटना आहेत. प्रत्येकवेळी घटना घडल्यावर भारताची कारवाई व त्या कारवाईवर पाकिस्तानचा प्रतिसाद हा अत्यंत निरर्थक स्वरूपाचा आहे. भारत आपल्याविरूद्ध साधे डोळे सुद्धा वटारू शकत नाही याची पाकिस्तानला खात्री असल्याने पाकिस्तान असे प्रकार करतच राहणार आणि आपण निषेधाचे खलिते पाठविण्यापलिकडे काहीही करणार नाही.

"भारत हे एक बनाना (लेचेपेचे) रिपब्लिक आहे" असे काही लोकांचे मत वाचले होते. भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या दुबळ्या प्रतिसादाने हे अनेकवेळा सिद्ध केले आहे.

पिंपातला उंदीर's picture

20 May 2015 - 9:41 pm | पिंपातला उंदीर

या ठळ्क घटना आहेत. अशा इतर असंख्य घटना आहेत. प्रत्येकवेळी घटना घडल्यावर भारताची कारवाई व त्या कारवाईवर पाकिस्तानचा प्रतिसाद हा अत्यंत निरर्थक स्वरूपाचा आहे. भारत आपल्याविरूद्ध साधे डोळे सुद्धा वटारू शकत नाही याची पाकिस्तानला खात्री असल्याने पाकिस्तान असे प्रकार करतच राहणार आणि आपण निषेधाचे खलिते पाठविण्यापलिकडे काहीही करणार नाही.

"भारत हे एक बनाना (लेचेपेचे) रिपब्लिक आहे" असे काही लोकांचे मत वाचले होते. भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या दुबळ्या प्रतिसादाने हे अनेकवेळा सिद्ध केले आहे.

@गुर्जी आता काय म्हणे आहे तुमचे ? मे २०१४ नंतर सीमेवर जीव गमावलेल्या जवानाबद्दल . आणि हो त्याचवेळेस मोदिनी शरीफ यांच्या आईला साडी पाठवल्याबद्दल

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2013 - 12:57 pm | श्रीगुरुजी

आताच बी रामन यांचा लेख वाचला. असे कितीही प्रकार घडले तरी पाकड्यांशी चर्चा चालूच ठेवावी व उगाच भावनेच्या भरात कारवाई करू नये अशा त्यांचा सल्ला आहे.

हे वाचून हसू आले आणि खेदही वाटला. गेली ६५ वर्षे हे चर्चेचे गुर्‍हाळ सुरू आहे. त्यातून आजतगायत काहीही, कणभरसुद्धा सकारात्मक निष्पन्न झालेले नाही. तरीसुद्धा चर्चा सुरूच ठेवायची! मुळात पाकिस्तानला भारताशी सुरळीत संबंध हवे आहेत का याचा कधी आढावा घेतला आहे का? याबाबतीत गेल्या ६५ वर्षांचा काय अनुभव आहे? एवढे होऊनसुद्धा कारवाई न करता शांत बसायचे! का तर म्हणे चर्चेत अडथळा नको.

काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवरील एका चर्चेत एक पाकिस्तानप्रेमी (जतीन देसाई) असेच तारे तोडत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानशी भारताने क्रिकेट खेळू नये असे म्हणणारे भारतीय व तालिबानी यांच्यात काहीच फरक नाही. असे म्हणण्यातच त्यांच्या एकंदरीत सारासारविवेकबुद्धीची कल्पना आली. मुम्बईत पाकिस्तानशी सामने होत नसल्याने क्रिकेटरसिक पाकड्यांचा बहारदार खेळ पहायला मुकले आहेत असा यांचा दावा आहेत. बहुसंख्य पाकड्यांना भारताविषयी खूप प्रेम आहे म्हणे. हे असलं पूतनामावशीचं प्रेम काय कामाचं? भारत व पाकिस्तानची संस्कृती समान आहे म्हणे. पाकडे मूर्तीभंजक तर भारतीय मूर्तीपूजक, पाकडे गोभक्षक तर भारतात गोभक्षकांची संख्या खूप कमी, पाकिस्तानमध्ये बहुतेक काळ लष्करशाही तर भारतात त्याच्या उलटे, पाकिस्तान अतिरेक्यांना मदत देणारा व आश्रय देणारा तर भारत त्याच्या उलटा! पाकिस्तानची राज्यघटना इस्लामाधारित तर भारताची राज्यघटना निधर्मी, पाकिस्तानी हा अधिकृत इस्लामी देश तर भारत अधिकृत निधर्मी देश. पाकिस्तान सतत भारतात अतिरेकी हल्ले करत असतो तर भारत फक्त निषेधाचे खलिते पाठवितो. काय डोंबलाचं साम्य आहे या दोन देशात?

काय बोलावं अशा माणसापुढे! असे शरीराने भारतात पण मनाने व विचारांनी पाकिस्तानी असलेले अनेक तथाकथित निधर्मांध भारतात आहेत हे भारताचं दुर्दैव!

पिंपातला उंदीर's picture

20 May 2015 - 9:43 pm | पिंपातला उंदीर

काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवरील एका चर्चेत एक पाकिस्तानप्रेमी (जतीन देसाई) असेच तारे तोडत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानशी भारताने क्रिकेट खेळू नये असे म्हणणारे भारतीय व तालिबानी यांच्यात काहीच फरक नाही. असे म्हणण्यातच त्यांच्या एकंदरीत सारासारविवेकबुद्धीची कल्पना आली. मुम्बईत पाकिस्तानशी सामने होत नसल्याने क्रिकेटरसिक पाकड्यांचा बहारदार खेळ पहायला मुकले आहेत असा यांचा दावा आहेत. बहुसंख्य पाकड्यांना भारताविषयी खूप प्रेम आहे म्हणे. हे असलं पूतनामावशीचं प्रेम काय कामाचं? भारत व पाकिस्तानची संस्कृती समान आहे म्हणे. पाकडे मूर्तीभंजक तर भारतीय मूर्तीपूजक, पाकडे गोभक्षक तर भारतात गोभक्षकांची संख्या खूप कमी, पाकिस्तानमध्ये बहुतेक काळ लष्करशाही तर भारतात त्याच्या उलटे, पाकिस्तान अतिरेक्यांना मदत देणारा व आश्रय देणारा तर भारत त्याच्या उलटा! पाकिस्तानची राज्यघटना इस्लामाधारित तर भारताची राज्यघटना निधर्मी, पाकिस्तानी हा अधिकृत इस्लामी देश तर भारत अधिकृत निधर्मी देश. पाकिस्तान सतत भारतात अतिरेकी हल्ले करत असतो तर भारत फक्त निषेधाचे खलिते पाठवितो. काय डोंबलाचं साम्य आहे या दोन देशात?

काय बोलावं अशा माणसापुढे! असे शरीराने भारतात पण मनाने व विचारांनी पाकिस्तानी असलेले अनेक तथाकथित निधर्मांध भारतात आहेत हे भारताचं दुर्दैव!

गुर्जी आता होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सिरीज बद्दल काय मत आहे तुमचे ?

खबो जाप's picture

10 Jan 2013 - 1:03 pm | खबो जाप

जे झाले ते अतिशय भयानक आणि निषेधार्त आहेच , पण सगळ्यात दुख हे आहे कि आमच्या पंतप्रधानाच्या किव्हा परराष्ट्र मंत्र्याच्या गां%$# थोडा सुधा दम नाही
ती इटलीची बाई आणि तो सो called युथ आईकॉन कुठे गाढवाच्या गां$%$^ गेलेत कोण जाणे, आता बोला ना कुठे गेले तुमचे देश प्रेंम.

आपल्या कडे

https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=CeGcQkkQYKQ

(लिंक कॉपी पेष्ट करा ) होत असताना आणखी पाकड्यानी त्रास द्यायची गरज काय ?
ह्याच्या मध्ये हिंदुनो जागे व्हा म्हटले आहे पण जागे होण्याची गरज सगळ्यांनाच आहे.

ऋषिकेश's picture

10 Jan 2013 - 1:04 pm | ऋषिकेश

एक प्रश्न पडतो.. भारत करतोय ते इतक्या जणांना चुकीचे वाटतेय तर भारताने सद्यस्थितीत काय करावे ज्यामुळे हा प्रश्न 'हमखास' आणि 'कायमचा' (किमान पुढील ५० वर्षे) सुटेल असे तुम्ही सुचवाल? (हा प्रश्न कोणा एकाला नसून भारत सरकारच्या सध्याच्या प्रतिसादाने कावलेल्या सगळ्यांनाच आहे)

एवढी तरी जाणीव करून देऊन चर्चेचे त्याच्याशी गु-हाळ थांबवले पाहिजे. खेळ सांस्कृतिक कार्यक्रम हे शत्रुंबरोबर नाहीत आणि आमची काही ताकद आहे हे तरी दाखवले पाहिजे. मोदक साहेबांचे इस्त्राईल वरचे लेख वाचून त्याच्या एक दशांश जरी आपण करु शकलो तर भारतीय असल्याचा अभिमान बाळगावा असं काही केल्यासारखे वाटेल पण हे भारताच्या कोणत्याही पक्षाच्या सरकारच्या आवाक्यात आहे असे वाटत नाही.

चेपुवर कोणीतरी टाकलेला उपाय:

USA -If u attack us, we will attack u
ISRAEL-If u attack us, we will demolish u
INDIA - "If u attack us, we will not play Cricket with U .

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2013 - 1:06 pm | श्रीगुरुजी

सद्यपरिस्थितीत पाकिस्तानशी संपूर्ण राजनैतिक संबंध तोडणे, सीमा बंद करणे, दिल्ली-लाहोर रेल्वे-बस इ. बंद करणे, पाकिस्तानी विमानांना भारतीय प्रदेशावरून उडण्यास बंदी घालणे, पाकिस्तानशी सर्व आर्थिक व्यवहार संपूर्ण बंद करणे, पाकिस्तानशी सांस्कृतिक्/क्रीडा इ. संबंध बंद करणे, झेलम/सतलज इ. नदीतून पाणी सोडणे बंद करणे आणि भारतात ठाण मांडून बसलेल्या अदनान सामी, सलमा आगा इ. पाकड्यांना भारतातून हाकलून देणे इ. उपाय करावे असे मला वाटते.

त्याचबरोबरीने जगभर पाकिस्तानच्या क्रूर वागणूकीविरूद्ध आवाज उठवून पाकिस्तानला एकटे पाडणे आवश्यक आहे.

पहिले सगळे उपाय केल्यानंतर जी परिस्थिती होती ती भारत-पाकिस्तानात अनेकद आली आहे पण त्यामुळे मुळ प्रश्न सुटला आहे असे वाटत नाही

त्याचबरोबरीने जगभर पाकिस्तानच्या क्रूर वागणूकीविरूद्ध आवाज उठवून पाकिस्तानला एकटे पाडणे आवश्यक आहे.

म्हंजे? त्यासाठी काय करावे? भारत आपली भुमिका जागतिक मंचावर मांडतोच. त्यापलिकडे या प्रश्नाला दोन-देशांप्मधील आपापसातील प्रश्न ही भुमिका बदलून मध्यस्थास मान्य करावे का?

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2013 - 1:23 pm | श्रीगुरुजी

"पहिले सगळे उपाय केल्यानंतर जी परिस्थिती होती ती भारत-पाकिस्तानात अनेकद आली आहे पण त्यामुळे मुळ प्रश्न सुटला आहे असे वाटत नाही"

त्याचे कारण असे असे उपाय एकदाच म्हणजे २००२ साली फक्त काही महिने अतिशय मर्यादित स्वरूपात केले होते व त्याचे बरेवाईट परिणाम दिसायच्या आतच ते उपाय थांबविले गेले. पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबध तोडणे, सीमा सील करणे, सीमा ओलांडू पाहणार्‍यांना जागेवरच गोळ्या घालणे व धरणांचे पाणी अडविण्यासारखे उपाय किमान ३-४ वर्षे तरी करणे आवश्यक आहे.

पिंपातला उंदीर's picture

20 May 2015 - 9:45 pm | पिंपातला उंदीर

सद्यपरिस्थितीत पाकिस्तानशी संपूर्ण राजनैतिक संबंध तोडणे, सीमा बंद करणे, दिल्ली-लाहोर रेल्वे-बस इ. बंद करणे, पाकिस्तानी विमानांना भारतीय प्रदेशावरून उडण्यास बंदी घालणे, पाकिस्तानशी सर्व आर्थिक व्यवहार संपूर्ण बंद करणे, पाकिस्तानशी सांस्कृतिक्/क्रीडा इ. संबंध बंद करणे, झेलम/सतलज इ. नदीतून पाणी सोडणे बंद करणे आणि भारतात ठाण मांडून बसलेल्या अदनान सामी, सलमा आगा इ. पाकड्यांना भारतातून हाकलून देणे इ. उपाय करावे असे मला वाटते.

मोदी सरकारने या उपाय योजना तातडीने अमलात आणल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार : )

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2013 - 1:08 pm | श्रीगुरुजी

काश्मिर व पंजाबमधून पाकिस्तानमध्ये वाहणार्‍या नद्यांचे पाणी भारताने अडवून ठेवले तर पाकिस्तान नाक मुठीत धरून शरण येईल. हा अत्यंत प्रभावी उपाय ठरेल.

या उपायाने जगाची सहानुभुती आणि पाठींबा आपल्याला आहे तो आपण गमाव असे वाटत नाही का? का त्याची पर्वा करु नये असे वाटते?

शब्दिक सहानुभूतीपलिकडे जगाने कृती केल्याचे उदाहरण दाखवता का? जग सहानुभूतीवर चालत नाही... आर्थिक/ सामाजिक/ सामरिक हितसंबंधांवर चालते.

विकास's picture

10 Jan 2013 - 10:16 pm | विकास

पोखरण२ च्या वेळेस देखील जगाचा पाठींबा गेला अशी बोंब झाली होती. पण पुढचा इतिहास माहीत आहेच. अगदी ज्या अमेरीकेने राळ उठवली, त्याच अमेरीकेने त्यानंतरच्या काळात जास्तच आउटसोरर्सिंग पण केले आणि घनिष्ट राजनैतिक संबंध देखील. तेच अण्वस्त्रांविरोधातल्या जपानने देखील केले होते...

वनानी दहतो वन्ही, सखा भवती मारूतः सएव दिपनाशाय कृशे कश्चास्ती सौहृदम्.
(भावार्थ: जंगलात लागलेल्या वणव्याला वाढण्यास मदत करणारा वारा, हा लहानसा दिवा मात्र फुंकरेने विझवतो, थोडक्यात दुर्बळाला कोणी मित्र असतो का?)

खबो जाप's picture

10 Jan 2013 - 1:18 pm | खबो जाप

आडवायचे आणि पाकडे बोंबा मारायला लागले कि सगळे सोडून द्याचे , असेच करायची तयारी चीन पूर्वेकडे करत आहे.

पिंपातला उंदीर's picture

20 May 2015 - 9:46 pm | पिंपातला उंदीर

झाल का हो गुर्जी हे गेल्या वर्षात ? : )

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2013 - 1:17 pm | श्रीगुरुजी

कोणत्याही राष्ट्राला स्वसंरक्षण करण्याचा हक्क आहे. भारत असे करण्याने जगाची सहानूभूती गमावेल असे वाटत नाही. भारत अतिरेक्यांपासून पोळतो आहे हे सर्व जगाला माहिती आहे व भारताचा प्रतिसाद अत्यंत मिळमिळीत आहे याचीही जगाला कल्पना आहे. हा उपाय करताना अमेरिका, रशिया, इंग्लंड इ. प्रभावी देशांशी बोलूनच त्यांचे मत आपल्याविरूद्ध जाणार नाही याची खात्रीदेखील करून घेणे आवश्यक आहे. परंतु त्यांच्या संमतीने किंवा संमतीशिवाय भारताला असे कठोर उपाय योजावेच लागतील.

सत्य परिस्थिती माहित नसताना सरकारच्या नावाने त्रागा (जो इतर अनेकदा रास्त असेलही) करणे घाईचे ठरू शकते. केवळ भारतीय इलेक्ट्रॉनिकमिडीयाच्या वार्तांकनावरून मते बनवणे अधिकाधिक धोक्याचे होत चालले आहे असे वाटते.

आता बाहेर येत असलेल्या माहितीनूसार घटनाक्रम असा आहे: (संदर्भ : द हिंदु मधील ही बातमी)
-- एका भारतीय महिलेच्या पाकव्याप्त काश्मिरमध्ये जायच्या प्रयत्नाने सचेत होऊन भारताने LOC वर गावकर्‍यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी खंदकाचे बांधकाम करून सीजफायर करारातील 'या भोवती कोणतेही बांधकान न करण्याच्या अटीचे' उल्लंघन केले होते.
-- त्यावर पाकिस्तानी सैनिक अग्रेसीव झाले आणि त्यांनी काहि वेळा सुचना दिल्या, नंतर लाऊडपीकरवर सुचना देऊन गोळीबार केला.
-- त्यानंतर झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने हल्ला केला असे पाकचे म्हणणे आहे तर भारत त्याला नकार देतो पण त्या चकमकीत पाकिस्तानचा एक सैनिक मारला गेला
-- त्याला पाकिस्तानच्या सैन्याने उत्तर द्यायचे ठरवले व झालेल्या चकमकीत दोन भारतीय जवान ठार झाले.

एका भारतीय लष्करी अधिकार्‍याने म्हटल्याप्रमाणे अश्या चकमकी आणि हल्ले आवेशात होत असतात. भारतीय सैन्याला LOC ओलांडायची आज्ञा नसताना तसा प्रकार कधी होतो तसेच पाकिस्तानी सैनिकआंकडून होते. या घटनेला 'वाजवीपेक्षा अधिक' फुगवण्यात फारासे हशील दिसत नाही.

आता या घटनाक्रमावरही आणि त्यातून उद्भवणार्‍या बर्‍याच सार्थ प्रश्नांवरही चर्चा होईलच, पण अश्या घटनेसाठी भारताच्या वाजपेयींपासूनच्या प्रयत्नांना सोडून द्यावे असे वाटत नाही. बाकी चालु दे..

पण मग देहाची विटंबना / मृत्यूपूर्वी छळ हे सर्व विकृत आहेच ना? हे तरी खरं आहे ना? की तेही पाकिस्तानी सैनिक नव्हतेच? कुठेतरी आपल्या लष्कराच्या व्हर्शनवर विश्वास ठेवावा लागेल. अर्थातच त्यावर करण्याचे उपाय हे लष्करप्रमुख आणि राज्यकर्त्यांच्या स्कोपमधे आहेत आणि बर्‍याचशा गोष्टी ते जाणत असतील ज्या त्यांच्या निर्णयप्रक्रियेत अपरिहार्यपणे विचारात घ्याव्या लागत असतील. बर्‍याचशा गोष्टी / खरं चित्र (लार्जर पिक्चर) आपल्यापर्यंत पोचणं शक्यच नाही.

ऋषिकेश's picture

10 Jan 2013 - 3:25 pm | ऋषिकेश

पण मग देहाची विटंबना / मृत्यूपूर्वी छळ हे सर्व विकृत आहेच ना? हे तरी खरं आहे ना? की तेही पाकिस्तानी सैनिक नव्हतेच? कुठेतरी आपल्या लष्कराच्या व्हर्शनवर विश्वास ठेवावा लागेल.

होय हे विकृत आहे आणि याचा निषेध योग्य त्या पातळीवर झालाच पाहिजे. इतकेच नाही तर सर्वत्र व्यक्त झालेला उद्वेगही बर्‍याच अंशी सार्थ असला तरी काहिशा भडक वार्तांकनावर आधारित आहे. आणि मग अश्या वार्तांकनाची प्रतिक्रीया जनतेत 'त्या देशाशी संबंध तोडून टाका' अशी झाली तर नवल नाही.

दुसरे असे की आपल्या वाजवीपेक्षा अधिक उचललेल्या पावलांचा फायदा घेऊन पाकिस्तान हा प्रश्न आंतरराष्ट्रीय करु पाहणार असेल तर ते किती ताणावे याचाही सरकारला विचार करावा लागेल.

आपले सरकार किंवा राजकीय नेते एरवी कसेही असले/नसले तरी अश्या प्रश्नात लष्कर, गुप्तहेर, विविध ज्येष्ठ तज्ज्ञ अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करूनच पावले उचलत असणार यावरही विश्वास ठेवायला हवा (आणि तसा इतिहासही आहे, सरकारे बदलली मार सर्वपक्षीय सरकारने या बाबतीतले धोरण बदललेले नाही हे ही लक्षात घ्यायला हवे). शिवाय इतिहासात बघता आपल्या राजकीय नेत्यांनी युद्धातील देशाच्या पराभवाच्या जबाबदारीपासूनही पळ काढलेला नाही, तेव्हा फक्त राजकीय नेत्यांनाच आनि सरकारला किती झोडपायचे हे ही ज्याने त्याने ठरवावे इतकेच.

आणि राजकीय नेतेच नही तर जेव्हा लष्कराचे अधिकार सांगतात की अश्या घटना एरवीही होतात, यावेळी त्यातील विकृतपणाची तक्रार केली आहेच, मात्र त्याहून अधिक ताणायला, त्यावर अधिक प्रखर तेही बोलायला तयार नाहीत त्यातच ते बरेच काही सांगून जातात

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2013 - 9:03 pm | श्रीगुरुजी

"दुसरे असे की आपल्या वाजवीपेक्षा अधिक उचललेल्या पावलांचा फायदा घेऊन पाकिस्तान हा प्रश्न आंतरराष्ट्रीय करु पाहणार असेल तर ते किती ताणावे याचाही सरकारला विचार करावा लागेल. "

हा पाकिस्तान-भारत संबंध हे भारत-पाकिस्तानच्या जन्मापासून म्हणजे जवळपास १९४७ पासूनच आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहेत. त्यामुळे यात नव्याने आंतराराष्ट्रीय होण्यासारखे काहीही नाही. आणि तसे झाले तरी भारताने आंतरराष्ट्रीय दडपण झुगारण्याचे ठरविले पाहिजे किंवा मग पाकडे जे करतील ते निमूटपणे ऐकून घेतले पाहिजे.

जर पाकिस्तानशी संबंध तोडणे आततायी किंवा भावनेच्या भरात केलेली कृती वाटत असेल, तर भारताला अजून वेगळ्या कृती करता येतील.

(१) शांतता चर्चेचे गुर्‍हाळ सुरू ठेवणे.
(२) पाकिस्तानला गाजावाजा न करता जशास तसे उत्तर देणे. म्हणजे सैनिकांना सैनिकांचा वेष न देता इतर वेषात गुपचूप सीमा ओलांडायला लावून सीमेजवळील पाकड्यांच्या ठाण्यावर अधूनमधून हल्ले करून परत येणे. असे हल्ले झाल्यावर ते आम्ही केलेच नाहीत असे सांगून काखा वर करणे.
(३) पाकिस्तानमधील फुटिरतावादी संघटनांना (बलुचिस्तान, पख्तुनिस्तान व सिंध प्रांत स्वतंत्र देश करू पाहणार्‍या फुटिरतावादी संघटना) भारताने गुपचुप आर्थिक व शस्त्रास्त्रांची मदत द्यावी. असे करण्याची क्षमता फक्त इंदिरा गांधींमध्येच होती. नरसिंहराव व वाजपेयी हे देखील २००१ पर्यंत अफगाणिस्तानमधील कट्टर तालिबानविरोधी असलेल्या अह्मदशहा मसूद या पंजशीर खोर्‍यातल्या ताजिक नेत्याला शस्त्रे व आर्थिक मदत देत होते. आता पाकिस्तानी फुटिर संघटनांना तशीच मदत करण्याची वेळ आली आहे, जेणेकरून पाकचे विभाजन होण्याची शक्यता वाढेल व पाकिस्तान अंतर्गत भांडणांनी दुबळा होईल.
(४) आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण पाकिस्तानी साहसवादाचे बळी आहोत व आपण कसा संयम पाळत आहोत असे कायम सांगत राहून आंतरराष्ट्रीय मत आपल्या बाजूने जरी आले नाही तरी विरूद्ध जाणार नाही यासाठी प्रयत्न करणे.

ऋषिकेश's picture

11 Jan 2013 - 9:57 am | ऋषिकेश

एक गंमत वाटली २,३ भारत करत असेल तर आपल्याला कसे कळेल? पाकिस्तान तर नेहमी बोलत असते की खलिस्तानी फुटिरवाद्यांना भारत मदत करतो म्हणून. जर हे गुप्त असेल तर ते गुप्तच रहावे नाही का?

बाकी, तुमच्या पर्यायांपैकी १ व ४ प्रत्येक सरकार करत असतेच आणि ते योग्य आहेच

अमोल खरे's picture

11 Jan 2013 - 10:04 am | अमोल खरे

थोडीशी चुक आहे. खलिस्तानवाद्यांना पाकिस्तान मदत करतो. भारत सिंध- बलुचिस्तान मधील लोकांना मदत केल्याचा आरोप होतो बहुदा. हा आरोप खरा असेल तर प्रचंड आनंदाची गोष्ट आहे. कोणत्याही पद्धतीने पाकिस्तानला संपवायलाच हवं. सापाला ठेचायलाच लागतं. त्याच्याशी चर्चा करत बसण्यात सेन्स नसतो.

ऋषिकेश's picture

11 Jan 2013 - 10:11 am | ऋषिकेश

बरोबर. बलुचिस्तान! आभार!
बाकी "त्याच्याशी चर्चा करत बसण्यात सेन्स नसतो." याबद्दल असहमत.. पण ते असो.

क्लिंटन's picture

11 Jan 2013 - 1:08 pm | क्लिंटन

बाकी "त्याच्याशी चर्चा करत बसण्यात सेन्स नसतो." याबद्दल असहमत.. पण ते असो.

+१.
याविषयी जॉन केनेडी म्हणाले होते:"Let us not negotiate out of fear but let us not fear to negotiate".

पिंपातला उंदीर's picture

20 May 2015 - 9:48 pm | पिंपातला उंदीर

जर पाकिस्तानशी संबंध तोडणे आततायी किंवा भावनेच्या भरात केलेली कृती वाटत असेल, तर भारताला अजून वेगळ्या कृती करता येतील.

(१) शांतता चर्चेचे गुर्‍हाळ सुरू ठेवणे.
(२) पाकिस्तानला गाजावाजा न करता जशास तसे उत्तर देणे. म्हणजे सैनिकांना सैनिकांचा वेष न देता इतर वेषात गुपचूप सीमा ओलांडायला लावून सीमेजवळील पाकड्यांच्या ठाण्यावर अधूनमधून हल्ले करून परत येणे. असे हल्ले झाल्यावर ते आम्ही केलेच नाहीत असे सांगून काखा वर करणे.
(३) पाकिस्तानमधील फुटिरतावादी संघटनांना (बलुचिस्तान, पख्तुनिस्तान व सिंध प्रांत स्वतंत्र देश करू पाहणार्‍या फुटिरतावादी संघटना) भारताने गुपचुप आर्थिक व शस्त्रास्त्रांची मदत द्यावी. असे करण्याची क्षमता फक्त इंदिरा गांधींमध्येच होती. नरसिंहराव व वाजपेयी हे देखील २००१ पर्यंत अफगाणिस्तानमधील कट्टर तालिबानविरोधी असलेल्या अह्मदशहा मसूद या पंजशीर खोर्‍यातल्या ताजिक नेत्याला शस्त्रे व आर्थिक मदत देत होते. आता पाकिस्तानी फुटिर संघटनांना तशीच मदत करण्याची वेळ आली आहे, जेणेकरून पाकचे विभाजन होण्याची शक्यता वाढेल व पाकिस्तान अंतर्गत भांडणांनी दुबळा होईल.
(४) आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण पाकिस्तानी साहसवादाचे बळी आहोत व आपण कसा संयम पाळत आहोत असे कायम सांगत राहून आंतरराष्ट्रीय मत आपल्या बाजूने जरी आले नाही तरी विरूद्ध जाणार नाही यासाठी प्रयत्न करणे.

जे बात ! या सगळ्या गोष्टी अमलात आणल्याबद्दल मोदींचे अभिनंदन

अर्धवटराव's picture

20 May 2015 - 10:03 pm | अर्धवटराव

रुलाएगा क्या =)) =))

अविकुमार's picture

10 Jan 2013 - 2:25 pm | अविकुमार

हे वाचा.

http://in.news.yahoo.com/un-observer-group-probe-loc-incident-040002953....

पाकिस्तानने युनोमध्ये भारताविरुद्धच तक्रार केली आहे. चोराच्या ऊलट्या बोंबा. आपण असे गुळमुळीत का वागतो असेच वाटायला लागते कधी कधी. खंबीर पवित्राच नाही कधी. श्या.....

नाना चेंगट's picture

10 Jan 2013 - 3:42 pm | नाना चेंगट

एकेकाचे प्रतिसाद त्याच्या त्याच्या ख्यातीनुसार.

गवि's picture

10 Jan 2013 - 3:53 pm | गवि

अगदी, सर्वच.. ;)

भारतीय इतके "थंड रक्ताचे" कसे ? आपण निषेधाचे तुणतुणे किती दिवस वाजवत बसणार ?नुसत्या बैठका आणि खलिते इतके वर्ष चालु आहेत मग त्याचा परिणाम असा का दिसतो ? अजुन कितीवेळा आपल्या जवानांची अशी विटंबना होत राहणार ?

जाता जाता :---

Defence Minister
हे आमच्या स्वतंत्र देशाचे सध्याचे संरक्षण मंत्री आणि त्यांच्या बरोबर आहेत चीनचे संरक्षण मंत्री जेन लिंग.
लुंगीवाल्या या संरक्षण मंत्र्याची कोणाला धास्ती / जरब तरी वाटेल काय ? अरे संरक्षण मंत्री आहेस ना तू ? मग नुसते पाकिस्तानची ही भ्याड कॄती चिथवणीखोर आहे असे काय सांगत फिरतोस ? सरळ लष्कराला द्या आदेश की मोडा पाकिस्तानच्या नांग्या आणि द्या चांगला धडा... की पुढे कधीही हे पाकडे आमच्या सैनिकांची अशी दुर्गती करण्याचा विचार सुद्धा करु शकणार नाहीत.
पण मी कोणत्या सरकारला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय ? ज्या सरकारचे गॄहमंत्रीच आत्ता पर्यंत झाले-गेले विसरुन जा अशी जपमाळ घेउन फिरतात ! तिथे हा लुंग्या काय दिवे लावणार ?

पिंपातला उंदीर's picture

10 Jan 2013 - 8:02 pm | पिंपातला उंदीर

पुलंच्या एका ललित लेखात लोकल प्रवासात प्रवाशांमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर होणार्‍या चर्चेचे खुमसदार वर्णन केले होते. त्या चर्चेचा शेवट आपण डोंबिवलीकाराणी कल्याण च्या लोकाना आपल्या बोगीत चढू द्यायचे नाही या निर्णयावर होतो. ही प्रतिक्रिया आणि इतर अनेक अतीसंवेदनशील प्रतिक्रिया पाहून त्या लेखाची आठवण होते. ऋषिकेश यांच्या प्रतिक्रिया आवडल्या.

सुनील's picture

10 Jan 2013 - 10:47 pm | सुनील

एकेकाचे प्रतिसाद त्याच्या त्याच्या ख्यातीनुसार.

अगदी!

जुने लेख उचकले तर, बर्‍याच प्रतिक्रियांमध्ये फक्त प्रतिसादकाचे नाव दिसते, खालील प्रतिसाद नाही!

असे का, हे आता उमगले!

दादा कोंडके's picture

10 Jan 2013 - 11:02 pm | दादा कोंडके

हा हा. :D

प्रभाकर पेठकर's picture

10 Jan 2013 - 3:53 pm | प्रभाकर पेठकर

इथे खेळायला आलेल्या वा करमणुक क्षेत्रात कमावुन गेलेल्या/ कमावत असलेल्या कितीजणांनी आपल्या देशबांधवासमोर अशा कृत्यांचा निषेध केला आहे?

हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. हे जो पर्यंत होत नाही तो पर्यंत क्रिडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला भारतात प्रवेशास मज्जाव असलाच पाहिजे.

अरुण मनोहर's picture

10 Jan 2013 - 4:54 pm | अरुण मनोहर

निषेध निषेध!
डार्विनच्या विचारसरणीने प्रेरीत होऊन डार्विनच्या माकडांनी केलेल्या अमानुष कृत्यांचा निषेध!
मिपावरच्या डार्विन तज्ञांचे मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.

मस्त् राम's picture

10 Jan 2013 - 7:43 pm | मस्त् राम

' कला आणि क्रिडा क्षेत्रात जात, धर्म, देश वगैरे सीमांची बंधने नसतात'
अशी प्रतिक्रिया दिल्यावर आपण झटपट पुरोगामी ठरतो ना! आणि आपल्या देशात पुरोगाम्यांची पैदास डासानपेक्षा जास्त झाली आहे.

राजेश घासकडवी's picture

10 Jan 2013 - 9:24 pm | राजेश घासकडवी

मी एक उपाय सुचवतो.
- एक वेबसाइट तयार करा.
- तीवर पाकिस्तानी कलाकार असलेल्या कार्यक्रमांची आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यांची नोंद करा
- ती माहिती भारतीय जनतेत सर्वत्र पसरेल असं पहा
- यासाठी वर्तमानपत्रात जाहिराती देणं, गावोगावी जाऊन सर्वांना ती माहिती मिळेल अशी योजना करणं वगैरे त्यात येईल.
- त्यासाठी अर्थातच मोठी ग्रासरूट ऑर्गनायझेशन तयार करावी लागेल. पण बऱ्याच राजनैतिक पक्षांकडे अशी यंत्रणा आहे. ती वापरायला त्यांना उद्युक्त करा.
- मग ज्यांना पाकिस्तानविरुद्ध राग असेल ते लोक अर्थातच हे कार्यक्रम बघणार नाहीत
- मग पाकिस्तानी कलाकारांना आपोआपच पैसे किंवा आमंत्रणं मिळणार नाहीत

इतकी वर्षं पाकविरोधी आरडाओरडा करणाऱ्या पक्षांनी असे प्रयत्न का केले नाहीत कोण जाणे. पाकिस्तानची मॅच सुरू झाल्यावर लोकसुद्धा येड्यासारखे टीव्ही बंद न करता बघत का बसतात हेही कळत नाही.

इतकी वर्षं पाकविरोधी आरडाओरडा करणाऱ्या पक्षांनी असे प्रयत्न का केले नाहीत कोण जाणे.
हिंदुस्थानी राजकारणार्‍या ओरडाओरडी करणे हाच प्रयत्न वाटत असावा बहुधा !
पाकिस्तानची मॅच सुरू झाल्यावर लोकसुद्धा येड्यासारखे टीव्ही बंद न करता बघत का बसतात हेही कळत नाही.
ठळक केलेला शब्द बहुतेक आपल्या देशातील नागरिकांची मानसिकता दर्शवतो असे वाटते,राष्ट्रप्रेम हे किराणामाल विकणार्‍याच्या दुकानात इतर गोष्टींप्रमाणेच मिळते असा यांचा समज नक्कीच असावा !

तुम्ही स्वतःच का करत नाही अशी वेबसाईट?

रणजित चितळे's picture

10 Jan 2013 - 9:33 pm | रणजित चितळे

सावरकरांच्या भाषेत लिहायचे तर.

सुनील's picture

10 Jan 2013 - 10:45 pm | सुनील

दुर्दैवी घटना.

ह्याची योग्य त्या पातळीवर आणि योग्य त्या प्रमाणात दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा.

अप्रतिम's picture

10 Jan 2013 - 11:15 pm | अप्रतिम

पाकिस्तानी वृत्तपत्र "डॉन"च्या बातमीनुसार भारतीय लष्कराने आज एका पाकिस्तानी जवानाला कंठस्नान घातल्याचे समजतय.
http://dawn.com/2013/01/10/another-pakistani-soldier-killed-by-indian-fo...

आशु जोग's picture

10 Jan 2013 - 11:31 pm | आशु जोग

अकबरुद्दीन ओवेसी आता कुठे आहेत

आता ते निषेध करतील काय

क्लिंटन's picture

11 Jan 2013 - 9:52 am | क्लिंटन

"षंढ" भारत सरकार काहीही करत नाही असे म्हणत असलेल्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की एल.ओ.सी वर it's bullet for bullet अशी परिस्थिती आहे अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये येत आहेत.तसेच भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा एक सैनिक मारला अशा बातम्याही आल्या आहेत.अविनाश धर्माधिकारींच्या कारगीलविषयक भाषणात उल्लेख आहे की एकदा ओढ्यावर पाणी भरायला गेलेल्या दोन भारतीय सैनिकांना पाकिस्तानी सैनिकांनी गोळ्या घालून ठार मारले. त्याच्या नंतरच्या दिवशी असेच पाणी भरायला आलेल्या पाकिस्तानी सैनिकांनाही आपल्या सैनिकांनी गोळ्याच घातल्या.असे प्रकार एल.ओ.सी वर चालत असावेत आणि भारतही जशास तसे असे उत्तर देत आहे हे नक्कीच.

आजच पेपरात बातमी आली आहे की क्वेट्टामध्ये सहा बॉम्बस्फोटांमध्ये शंभरेक लोक मारले गेले आहेत.भारत सरकारचे बलुचिस्तानातील बंडखोरांना समर्थन आहे ही गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे काश्मीरातील दहशतवाद्यांना समर्थन आहे या गोष्टीइतकेच उघडे गुपित आहे.कशावरून या स्फोटांसाठी भारताने मदत केली नसेल?तसे असेल तर भारत सरकारने "हो आम्हीच स्फोटांना मदत केली" असे जाहिरपणे सांगावे अशी अपेक्षा आहे का? २००९ मध्ये इजिप्तमध्ये शर्म-अल-शेख मध्ये मनमोहन सिंह आणि तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान गिलानींची भेट झाली होती.त्यावेळी दोन्ही बाजूंकडून जारी केलेल्या संयुक्त नोटमध्ये २६/११ मुंबई हल्ल्यांचा उल्लेख नव्हता पण बलुचिस्तानचा उल्लेख होता.मनमोहन सिंहांवर त्या कारणाने बरीच टिकाही झाली होती.पण सांगायचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानातील बंडखोरांना भारत सरकार मदत करत आहे हे नक्कीच आहे.

एल.ओ.सी वर जो प्रकार झाला आणि माझ्याच सैनिकांना नृशंस पध्दतीने मारले गेले याचे इतर मिपाकरांइतकेच दु:ख एक भारतीय नागरिक म्हणून मला वाटते.पण भावनेच्या भरात जाऊन वेडीवाकडी विधाने केली जाऊ नयेत असेही नक्कीच वाटते.

विकास's picture

11 Jan 2013 - 7:57 pm | विकास

पण भावनेच्या भरात जाऊन वेडीवाकडी विधाने केली जाऊ नयेत असेही नक्कीच वाटते.

याच्याशी सहमत. अर्थात येथे कोणीही वेडीवाकडी विधाने केली तरी त्याचा परीणाम, कोणे एके काळी "स्टालीनला सज्जड दम..." वगैरे अग्रलेख देणार्‍यांच्या लेखाचा स्टॅलीनवर परीणाम झाला असेल तितकाच होईल असे वाटते. ;)

पण, माझ्या दृष्टीने मुद्दा हा नाही, अथवा भारत सरकार स्ट्रॅटेजिकली काय करते हा देखील नाही. ते करते याची खात्री आहे, त्याची पंतप्रधानांना पण सगळी माहिती असेल का ह्याबाबत कधी कधी शंका वाटते (इतर राजकारण्यांना सोडूनच द्या) तेंव्हा त्या धोरणाचे कर्ते-करवते नक्की कोण-कसे असतात माहीत नाही. (हे वाटायचे अजून एक कारण म्हणजे नक्की सिस्टीम माहीत नाही. तो वेगळा मुद्दा आहे.)

प्रस्तुत घटनेतला महत्वाचा भाग असा आहे की, सैनिकांना नृशंस पद्धतीने मारले गेले आहे. ते देखील एका सार्वभौम राष्ट्राच्या सैनिकांकडून/सैन्याकडून. हे आंतर्राष्ट्रीय करार मोडणारे, रानटी वर्तन आहे. त्या विरोधात आपले राष्ट्र आणि नेतृत्व कसे आवाज करते यातून अनेक संदेश वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. केवळ बलुचिस्तानमधे काड्या करतो अथवा एल ओ सी वर आपण देखील गोळीबार करतो म्हणून आत्ता सौम्य प्रतिक्रीया देणे म्हणजे जणू काही आपण एकतर्फीच किडे करतो आणि ती आपली चूक आहे, असे मान्य करणे झाले, जे अयोग्य आहे. त्याचा सध्याच्या सोशल मेडीयाच्या जगात भारतीय सैन्याच्या मानसिकतेवर देखील परीणाम होऊ शकतो आणि regardless ते (सौम्य प्रतिक्रीया देणे) चुकीचे आहे.

९/११ हल्ला करण्यास, त्या आधी अमेरीका अरबांशी कशी वागली हे कारण होते, ऑपरेशन ब्लु स्टार (आणि शिखांशी/पंजाबशी राजकारण खेळेणे) हे इंदिरा हत्येचे कारण होते, तमिळ टायगर्सना विरोध हे राजीव हत्येचे कारण होते, वगैरे वगैरे... म्हणून यातील प्रत्येक हिंसा ही मान्य करायची का सौम्न्य पणे घेयची?

क्लिंटन's picture

11 Jan 2013 - 11:09 pm | क्लिंटन

केवळ बलुचिस्तानमधे काड्या करतो अथवा एल ओ सी वर आपण देखील गोळीबार करतो म्हणून आत्ता सौम्य प्रतिक्रीया देणे म्हणजे जणू काही आपण एकतर्फीच किडे करतो आणि ती आपली चूक आहे, असे मान्य करणे झाले,

हे समजले नाही.कडक प्रतिक्रिया देण्यापेक्षा काहीतरी कृती करणे अधिक महत्वाचे नाही का?आणि भारत सरकारची शाब्दिक प्रतिक्रिया म्हणाल तर ती कुठे सौम्य असते?"आर या पार की लडाई","सब्र का बांध तुटा","मेरा यहा आना अपने आप मे एक प्रतिक है.इसे दुनियावाले समजे ना समजे, हमारा पडौसी समजे ना समजे, हम विजय का नया अध्याय लिखेंगे" इत्यादी इत्यादी प्रतिक्रिया कुठे सौम्य होत्या?पण जर भारत सरकार बलुचिस्तानातल्या बंडखोरांना मदत करून किंवा अन्य मार्गाने काहीतरी कृती करत असेल तर दरवेळी उच्चरवाने काहीतरी बोलायची गरज आहे असे वाटत नाही. गेल्या पाचेक वर्षात पाकिस्तानात झालेल्या घटनांचे कारण केवळ अमेरिकेचा अफगाणिस्तानवरील हल्ला किंवा इस्लामाबादमधील लाल मशीद प्रकरण असेल आणि त्यात भारताचा अगदी शून्य हात असेल असे वाटत नाही.पण भारत सरकारने वरकरणी सात्विकतेचा आव आणून आपला कार्यभाग उरकला तर त्यात फारसे काही चूक आहे असे वाटत नाही. अगदी १९४७ मध्येही मुस्लिमबहुल गुरदासपूर जिल्हा भारतात ठेवणे, पंजाब-बंगालमधील बहुतेक सगळा हिंदूबहुल भाग भारतात ठेऊन घेऊन "मॉथ इटन पाकिस्तान" देणे,१९७१ मध्ये मुक्तीवाहिनीला स्वतः मदत देणे हे सगळे प्रकार सात्विकतेचा आव आणतच आपण केले होते आणि त्याविषयी पाकिस्तानात किती राग आहे हे तिथल्या वर्तमानपत्रात आणि लेखांमधून समजतेच.सध्या भारत सरकार काय करत आहे त्याचे परिणाम दिसायला कदाचित वेळ लागेल पण जर गेल्या काही वर्षात भारतात दहशतवादाने मारल्या गेलेल्या लोकांच्या अनेक पटीने लोक पाकिस्तानात मारले गेले असतील तर भारत सरकार अगदी काहीच करत नाही हे मला तरी म्हणता येत नाही.

बाकी पाकिस्तानची हिंसा अजिबात मान्य करू नये.एकदा एखाद्याला शत्रू मानले की त्याला कोणतीही दयामाया दाखवू नये असेच मला वाटते.१९४५ मध्ये जपान हा अमेरिकेचा शत्रू होता या एका कारणाने जपानवर अणुबॉम्ब टाकायची कृती मला समर्थनीय वाटते आणि या विषयावर मी अनेकदा अनेकांशी भिडलो आहे.शत्रूचे समूळ उच्चाटन व्हायलाच हवे.उद्या जर पाकिस्तानशी लढाईची वेळ आली तर पाकिस्तानने आपल्यावर पहिल्यांदा अणुबॉम्ब टाकायचा आणि मग आपण त्याला उत्तर द्यायचे असे न करता सुरवातीलाच आपणच त्यांच्यावर ५/१०/५० किंवा जितके लागतील तितके अणुबॉम्ब टाकून पाकिस्तानचे अस्तित्व अगदी कायमचे संपवावे असे मला वाटते.शत्रूविषयी फालतूची मानवता दाखवून (किंवा फाशीच्या शिक्षेला घाबरून किती गुन्हे कमी झाले आहेत असले तद्दन बिनडोक प्रश्न विचारून) आपण किती मोठे मानवतावादी किंवा विचारवंत हे दाखवायची अजिबात हौस मला नाही.पण हे सगळे आताच आपल्याला करता येणार नाही हे उघड आहे.आपली तयारी पूर्ण झालेली नसेल (सर्वच दृष्टीने--सामरिक, आर्थिक,परराष्ट्रनिती इत्यादी) तर असे कोणतेही पाऊल उचलणे आत्मघाताचे ठरेल.आपल्या सरकारने अशी तयारी पूर्ण करायला नक्की काय पावले उचलली आहेत असे प्रश्न जरूर विचारावेत आणि विचारलेच पाहिजेत.पण भारतात काही दहशतवादी हल्ले झाले किंवा परवासारखी काही घटना झाली तर भारत सरकार "षंढ" वगैरे म्हणले जाते.अशी तात्कालिक प्रतिक्रिया येऊन चार दिवसात सगळे विसरून जाण्यापेक्षा ऑनगोईंग बेसिसवर सरकार आपल्या देशाची तयारी "तिथपर्यंत" होण्यासाठी काय करत आहे हे प्रश्न उभे करणे कधीही श्रेयस्कर ठरेल.

विकास's picture

12 Jan 2013 - 12:29 am | विकास

आपली प्रतिक्रीया वाचून आंमळ गोंधळलो आहे. नक्की आपण एकमेकांशी वादच घालतो आहोत का नेटच्या एकाच बाजूने टेनीस खेळतोय हे समजत नाही. ;) तरी देखील काहॉ खुलासे...

प्रतिक्रिया देण्यापेक्षा काहीतरी कृती करणे अधिक महत्वाचे नाही का?

अहो मी प्रतिक्रीया म्हणले आहे, संस्थाळवर प्रतिसाद द्यायचे म्हणलेले नाही. प्रतिक्रीया म्हणजे कृती देखील असते आणि तीच डोक्यात होती. आणि तुम्ही म्हणता तसेच कृती महत्वाची वाटते. त्या ऐवजी "हम उनको उनकी नानी याद दिलाएंगे" वगैरे स्टाईल "सौम्य" प्रतिक्रीया देणे अनेकांना योग्य वाटते ते मला देखील पटत नाहीच.

बाकी पाकिस्तानची हिंसा अजिबात मान्य करू नये.एकदा एखाद्याला शत्रू मानले की त्याला कोणतीही दयामाया दाखवू नये असेच मला वाटते.

+१ पण

त्याला उत्तर द्यायचे असे न करता सुरवातीलाच आपणच त्यांच्यावर ५/१०/५० किंवा जितके लागतील तितके अणुबॉम्ब टाकून पाकिस्तानचे अस्तित्व अगदी कायमचे संपवावे असे मला वाटते.

ह्याला मात्र -१ / असहमत. अणूबाँब हे deterrent आहेत आणि तसेच ते असावेत, पुराणातील ब्रम्हास्त्रासारखे, असे माझे मत आहे. अमेरीकेने रशियावर एक बाँब न टाकता देखील कम्युनिस्ट रशियाला सत्ताभ्रष्ट करण्यात मदत केली. तसेच काही करता येईल. पण ते देखील आपल्या कृतीतून धड दिसते असे वाटत नाही.

पण भारतात काही दहशतवादी हल्ले झाले किंवा परवासारखी काही घटना झाली तर भारत सरकार "षंढ" वगैरे म्हणले जाते.अशी तात्कालिक प्रतिक्रिया येऊन चार दिवसात सगळे विसरून जाण्यापेक्षा ऑनगोईंग बेसिसवर सरकार आपल्या देशाची तयारी "तिथपर्यंत" होण्यासाठी काय करत आहे हे प्रश्न उभे करणे कधीही श्रेयस्कर ठरेल.

मेणबत्त्या विसरलात. ;) अर्थात वरील वाक्याशी सहमतच आणि आधी देखील सहमतच होतो.

क्लिंटन's picture

12 Jan 2013 - 9:59 pm | क्लिंटन

नक्की आपण एकमेकांशी वादच घालतो आहोत का नेटच्या एकाच बाजूने टेनीस खेळतोय हे समजत नाही.

बहुदा नेटच्या एकाच बाजूने टेनिस खेळत आहोत तरीही कधीकधी नेट ओलांडून पलिकडल्या बाजूलाही जात आहोत :)

अणूबाँब हे deterrent आहेत आणि तसेच ते असावेत, पुराणातील ब्रम्हास्त्रासारखे, असे माझे मत आहे.

हो बरोबर. माझ्या मुळच्या प्रतिसादातील "पाकिस्तानशी युध्दाची वेळ आली तर" हा भाग अधोरेखित करायचा राहिला :) . जर युध्दाची वेळ आली तर पाकिस्तान नक्कीच अणुबॉम्बचा प्रयोग करणार आणि मग नंतर आपण कितीही प्रत्युत्तर दिले तरी आपले व्हायचे ते नुकसान झालेलेच असेल.तेव्हा पाकिस्तानला तिथपर्यंत जाऊच न देता त्यांचे आधीच कंबरडे मोडावे असे मला वाटते. सगळेच पाकिस्तानी वाईट नाहीत पण निर्णय घ्यायचे अधिकार घेणारे लष्करी अधिकारी आणि आय.एस.आय वाले वाईट आहेत याविषयी फारसे दुमत नसावे.आणि पाकिस्तानातल्या निरपराधांना शिक्षा होऊ नये म्हणून भारतातल्या निरपराधांचे बळी देणे असला बेगडी मानवतावाद लवकरात लवकर नाहिसा करावा.

अशा वेळी आपल्या हातात काय आहे?सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानशी आपले संबंध कधीच सुधारणार नाहीत असा नकारात्मक दृष्टीकोन नकोच.दुसऱ्या महायुध्दात इंग्लंड आणि जर्मनीमध्ये किंवा अमेरिका आणि जपानमध्ये किती शत्रुत्व होते हे आपल्याला माहितच आहे.पण आज त्याच देशांमध्ये तसे शत्रुत्व आहे का?तसे भारत आणि पाकिस्तानात कधीच होणारच नाही असे नाही.त्या दृष्टीने पाकिस्तानातील शांततावादी लोक असतील त्यांची संख्या वाढावी हे प्रयत्न करणे गरजेचेच आहे.शेवटी भारत हाच जबाबदार देश आहे आणि युध्द आणि अणुबॉम्बचा प्रयोग टाळण्यासाठी जे काही करणे शक्य असेल ते करावे हे म्हणणे मला पटते.अर्थातच कुठेही बोटचेपेपणा नको.जर पाकिस्तानने कोणतीही आगळीक केली तर त्याला तिथल्या तिथे जबरदस्त प्रत्युत्तर द्यायलाच हवे.मध्यंतरी पाकिस्तानचा मंत्री रहमान मलिक भारतात येऊन वाटेल ते बरळून गेला.त्याला ताबडतोब आपण हाकलून का दिले नाही हा प्रश्न मला नक्कीच पडतो.२००९ मध्ये एल.टी.टी.ई विरूध्द युध्द चालू असताना नॉर्वे की स्वीडनचा परराष्ट्रमंत्री खास युरोपीअन स्टाईलमध्ये श्रीलंकेला मानवतेचे डोस पाजायला येणार म्हटल्यावर त्याला त्याची जागा दाखवून द्यायला श्रीलंका सरकारने त्याला कोलंबो विमानतळावरून हाकलून दिले होते.असे आपण का करू शकत नाही?

तेव्हा पाकिस्तानशी युद्धाची वेळ आली तर त्यांच्यावर आधीच आपण अणुबॉम्ब टाकावेत पण तशी वेळ येऊ नये म्हणून जे काही करता येईल ते करावे.मला वाटते माझा मुद्दा मी स्पष्ट केला आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Jan 2013 - 8:06 pm | श्रीगुरुजी

"जर युध्दाची वेळ आली तर पाकिस्तान नक्कीच अणुबॉम्बचा प्रयोग करणार आणि मग नंतर आपण कितीही प्रत्युत्तर दिले तरी आपले व्हायचे ते नुकसान झालेलेच असेल."

हे शक्य नाही. पाकिस्तानने कितीही वल्गना केल्या तरी पाकडे अणुबॉम्बचा वापर करणे अशक्य आहे. चुकुन पाकिस्तानने तसे केले तर आपला संपूर्ण देश भस्मसात होईल याची पाकड्यांना खात्री आहे. किंबहुना जगातला कोणताच देश अणुबॉम्बचा वापर करणे अशक्य आहे.

प्रत्येकवेळी एकच तुणतुणे वाजवले जाते की, "दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्याने भारताने सीमा ओलांडली किंवा पाकड्या सैनिकांवर हल्ला केला तर त्याचे तात्काळ मोठ्या युद्धात परिवर्तन होऊन त्याचे अणुयुद्धात रूपांतर होईल". असे होणार नाही. पाकिस्तानने अनेकवेळा सीमा ओलांडूनसुद्धा भारताने कोणताच कणखर प्रतिसाद दिलेला नाही. भारत फक्त निषेधाचे खलिते पाठवित राहिला. भारताने १-२ वेळा सीमा ओलांडून नजीकच्या ठाण्यांवर जशास तसे हल्ले करून काही ठाणी उद्ध्वस्त केली तर पाकिस्तान प्रतिकार तर सोडाच पण यापुढे सीमा ओलांडताना १०० वेळा विचार करेल. भारतीय लष्करी सामर्थ्यापुढे आपण अजिबात टिकाव धरू शकणार नाही हे पाकड्यांना पूर्ण माहिती आहे व भारताशी पारंपारिक युद्ध करू नये एवढे शहाणपण त्यांच्याकडे आहे. म्हणून सातत्याने अणुबॉम्बची धमकी देऊन भारताला असे छोटे हल्ले करून बोचकारत रहाणे एवढेच ते करू शकतात.

दादा कोंडके's picture

13 Jan 2013 - 8:19 pm | दादा कोंडके

पाकिस्तानने कितीही वल्गना केल्या तरी पाकडे अणुबॉम्बचा वापर करणे अशक्य आहे. चुकुन पाकिस्तानने तसे केले तर आपला संपूर्ण देश भस्मसात होईल याची पाकड्यांना खात्री आहे. किंबहुना जगातला कोणताच देश अणुबॉम्बचा वापर करणे अशक्य आहे.

मानवी बाँब तयार होणार्‍या देशाबद्द्ल असं खात्रीनं म्हणू शकतो?

क्लिंटन's picture

18 Jan 2013 - 1:38 pm | क्लिंटन

पाकिस्तानने कितीही वल्गना केल्या तरी पाकडे अणुबॉम्बचा वापर करणे अशक्य आहे. चुकुन पाकिस्तानने तसे केले तर आपला संपूर्ण देश भस्मसात होईल याची पाकड्यांना खात्री आहे. किंबहुना जगातला कोणताच देश अणुबॉम्बचा वापर करणे अशक्य आहे.

अशी खात्री पाकिस्तानविषयी असती तर १९९९ किंवा २००१/२००२ मध्येच भारताने पाकिस्तानवर हल्ला केला असता.भारताची सामरिक ताकद पाकिस्तानपेक्षा किंचित जास्त आहे (किंचित का कारण आपले सगळे सैन्य पाकिस्तान सीमेवर एकवटलेले नाही तर चीन सीमेवरही आहे).पूर्वीच्या काळी हा फरक आतापेक्षा बराच जास्त होता.पण अणुबॉम्ब बनविल्यास कन्व्हेन्शनल युध्दात आपण कमी पडलो तरी अणुबॉम्ब टाकला तर लष्करी बळातला फरक फार "मॅटर" करणार नाही अशा भूमिकेतूनच पाकिस्तानने अणुबॉम्ब बनविला हे सर्वमान्य आहे.तेव्हा पाकिस्तानचा अणुबॉम्ब हा भारताविरूध्द वापरायलाच केलेला आहे.तो अणुबॉम्ब ते लगेच वापरतील असे नाही पण ते कधीच वापरणार नाहीत हे म्हणणे आत्मवंचना ठरेल.

मी केवळ एक राजकिय विश्लेषक आहे आणि कोणत्याच पक्षाच्या कळपातला नाही.त्यामुळे सर्व पक्षांवर (त्यांच्या चांगल्या-वाईट गोष्टींवर) मी भाष्य करत असतो.त्याच भूमिकेतून म्हणतो की १९९८ मध्ये पोखरण-२ अणुचाचण्या घेणे (आणि नंतर अमेरिकेला आणि इतर महासत्तांना सांभाळून घेणे-- पोखरणनंतर दोन वर्षांच्या आत बिल क्लिंटन भारतात आले होते) ही वाजपेयी सरकारने केलेली खूप चांगली गोष्ट होती पण "नो फर्स्ट युज" हे जाहिर आश्वासन द्यायला नको होते असे मला वाटते.याविषयी मुद्दामून काही न बोलता गुळमुळीत वक्तव्ये करता आली नसती का?कारण अणुबॉम्बचा अजिबात वापर होणार नसेल तर ते इसापनितीतल्या गोष्टीप्रमाणे होईल.बेडकांना वाटत होते की ओंडका त्यांचा राजा आहे म्हणून त्याच्यापासून ते अंतर राखून होते.पण एकदा तो ओंडका काहीही करत नाही हे लक्षात आल्यावर त्याच्यावरच ते उड्या मारायला लागले. आता एकदा "नो फर्स्ट युज" हे जाहिर आश्वासन दिल्यानंतर पाकिस्तानचे त्यांनी आपल्यावर हल्ला करायच्या आधीच कंबरडे मोडणे शक्य होईल का? झाले तर फार चांगले पण तसे न व्हायची शक्यता अधिक.

आणि आपण त्यांच्यावर अणुबॉम्ब टाकल्यास तिथले निरपराध लोक मरतील म्हणून गळे काढत असलेल्या ढोंगी मानवतावाद्यांना योग्य त्या ठिकाणी फाट्यावर मारण्यात येत आहे.

विकास's picture

18 Jan 2013 - 8:42 pm | विकास

भारताने जेंव्हा "नो फर्स्ट युज" चे धोरण जाहीर केले तेंव्हा त्यात केवळ पाकीस्तानचा विचार नव्हता तर चीनच देखील होता. अण्वस्त्र देशांमधे मला वाटते भारत अधिकृत अण्वस्त्रधारी देश होण्या आधी चीनने १९६४ पासूनच "नो फर्स्ट उज" धोरण जाहीर केले आहे. त्या सीमेवर अण्वस्त्रांवरून टेन्शन निर्माण होणे आणि त्यातून तेथे अण्वस्त्रांची स्पर्धा वाढणे हे भारताला नको असावे. त्या शिवाय, तो काळ असा होता की सारे जग (आणि भारतातले "विचारवंत") हे सगळेच विरोधात होते. (भारतातल्या या "विचारवंतांच्या" बॉस्टनमधील पिट्ट्यांनी एम आय टी मधे निषेधाच्या मेणबत्यापण लावल्या होत्या!). त्यामुळे सर्व जगालाच अशी खात्री देणे गरजेचे असावे म्हणून देखील केले असेल. त्या व्यतिरीक्त माझे व्यक्तीगत मत असेच आहे, की ब्रम्हास्त्र हे केवळ अश्वत्थाम्याने उचलले म्हणून अर्जूनाने पण उचलावे असे कृष्णाने सांगितले, तीच भुमिका अण्वस्त्रांबाबत असावी अस मला वाटते. (महाभारतात होते म्हणून नाही, ते केवळ उदाहरण आहे, तुमच्याकडून नाही पण नाहीतर चर्च भलतीकडेच जायची!)

आता एकदा "नो फर्स्ट युज" हे जाहिर आश्वासन दिल्यानंतर पाकिस्तानचे त्यांनी आपल्यावर हल्ला करायच्या आधीच कंबरडे मोडणे शक्य होईल का?

आपण काय करावे आणि काय करू ह्याबद्दल मी लिहीत नाही, पण काय करू शकतो इतकेच सांगतो: इराकयुद्धात (२००२ नंतरच्या नक्की, कदाचीत १९९१च्यापण) अमेरीकेने आंतर्राष्ट्रीय करारात आक्षेपार्ह नसलेली अशी सेकंडरी अण्वस्त्रे वापरली होती.... अधिक नंतर कधीतरी.

क्लिंटन's picture

19 Jan 2013 - 9:58 pm | क्लिंटन

भारताने जेंव्हा "नो फर्स्ट युज" चे धोरण जाहीर केले तेंव्हा त्यात केवळ पाकीस्तानचा विचार नव्हता तर चीनच देखील होता. अण्वस्त्र देशांमधे मला वाटते भारत अधिकृत अण्वस्त्रधारी देश होण्या आधी चीनने १९६४ पासूनच "नो फर्स्ट उज" धोरण जाहीर केले आहे

ठिक आहे पण मग ज्या देशांनी "नो फर्स्ट युज" हे धोरण जाहिर केले आहे त्यांना रेसिप्रोकल म्हणून भारतही त्यांच्याविषयी "नो फर्स्ट युज" हे धोरण अवलंबेल असे जाहिर करता आले नसते का?पोखरण-२ नंतर वाजपेयींनी बिल क्लिंटनना पत्र लिहिले होते आणि त्यात भारताने अणुचाचण्या का केल्या याबद्दल लिहिले होते.त्यात चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे नाव त्यात होते (आणि याबद्दल विरोधी पक्षांनी लोकसभेत गोंधळही घातला होता).तेव्हा पाकिस्तानचीही अणुबॉम्ब बनवायची क्षमता आहे हे आपल्याला आधीपासून माहित होते हे नक्कीच.आणि अणुबॉम्बसाठी पाकिस्तान गवत खाईल अशा स्वरूपाची वक्तव्ये (किंवा अगदी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रांची भारतावर आक्रमण केलेल्यांची नावे- गझनवी,अब्दाली,बाबर इत्यादी) यातून पाकिस्तानचा बॉम्ब हा भारताविरूध्दच असेल/आहे हे आपल्या लक्षात आले नव्हते का? तरीही परत पाकिस्तानविरूध्दही आपण पहिल्यांदा अणुबॉम्ब वापरणार नाही हे का जाहिर केले (विशेषतः पाकिस्तानने "नो फर्स्ट युज" हे धोरण जाहिर केलेले नाही हे माहित असताना) हा प्रश्न आहेच.

अमेरीकेने आंतर्राष्ट्रीय करारात आक्षेपार्ह नसलेली अशी सेकंडरी अण्वस्त्रे वापरली होती

हो बरोबर. अगदी १९९९ च्या कोसोव्हो युध्दातही अमेरिकेने "डिप्लिटेड न्युक्लिअर वेपन्स" वापरली होती.पण माझा मुख्य मुद्दा हा आहे की पाकिस्तानच्या हातात अण्वस्त्रे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत आहे आणि भारताविरूध्द युध्दाची वेळ आली तर ते आपल्याविरूध्द अण्वस्त्र वापरणार हे स्पष्ट आहे. (तसे संकेत २००२ मध्ये मुशर्रफने भारतीय उपखंडाच्या भेटीवर आलेल्या कॉलीन पॉवेल आणि जॅक स्ट्रॉ यांना दिले होते असे आंतरराष्ट्रीय प्रेसमध्ये आले होते आणि त्यामुळेच अमेरिकेने भारताने पाकिस्तानवर हल्ला करू नये म्हणून धावपळ केली होती.) तेव्हा पाकिस्तान पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर करणार असेल आणि मग आपण त्याला प्रत्युत्तर दिले तर पाकिस्तानचे नामोनिशाण वगैरे जरूर मिटेल पण आपले झालेले नुकसान भरून यायला अनेक दशके लागतील त्याचे काय?तेव्हा ती वेळच येऊ नये म्हणून (युध्दच होऊ नये म्हणून शक्य तितके सगळे प्रयत्न) आणि युध्द झाले तर पाकिस्तानच्या आधी आपणच अणुबॉम्ब वापरावा असे मला नक्कीच वाटते. आणि त्यासाठीची आपली आर्थिक्/सामरिक आणि सगळ्याच दृष्टीने पॉवर आहे त्यापेक्षा खूप जास्त वाढवायला हवी.अर्थात एक गोष्ट आता आपल्याला अधिक अनुकूल आहे आणि ती म्हणजे पाकिस्तान हा एक डिसीज आहे या गोष्टीचे अधिक रिअलायझेशन जगात अधिकाधिक प्रमाणात होत आहे (ही परिस्थिती १० वर्षांपूर्वी तितक्या प्रमाणावर नव्हती).

सुबोध खरे's picture

14 Jan 2013 - 1:03 pm | सुबोध खरे

MAD (MUTUALLY ASSURED DESTRUCTION) (खात्रीचा सर्वनाश) अणु युद्धा बद्दलच्या नीति बद्दल असे म्हटले जाते. याच साठी कोणतेही राष्ट्र अणुबॉम्ब मिळवण्यासाठी अविरत प्रयत्न करीत असते. कारण एकदा तुमच्याकडे अणु बोंब असेल तर दुसरे राष्ट्र तुमच्याशी सर्वंकष युद्ध करण्या पूर्वी दहा वेळा विचार करते.पाकिस्तान वर ५-१० अणुबॉम्ब टाकून ते संपवणे हे आपण समजत तितके सोपे नाही. कारण पाकिस्तान कडे सुद्धा ७०-८० अणुबॉम्ब आहेत आणी अशा सर्वनाशी य्द्धात ते त्यातील काही अणुबॉम्ब तरी भारतीय भूमी वर टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करणारच. तेंव्हा low intensitiy warfare (धुमसते युद्ध) हे चालू राहणारच.भारत बलुचिस्तान किंवा मोहाजिर यांना आतून वा बाहेरून मदत करतो हे उघड सत्य आहे.
भारताने अहमदशाह मसूद याच्या उत्तर आघाडीला तालिबान विरुद्ध पूर्ण पाठींबा दिला होता. माझा एक सैन्यातील डॉक्टर मित्र मझार -ए शरीफ येथे भारतीय सैन्याच्या तुकडीत medical aid post madhye रुजू होता. तेंव्हा हे निषेध खलिते वगैरे ठीक आहे आपण पाकिस्तान ला swift and strong military retaliation करणे आवश्यक आहे

श्रीगुरुजी's picture

11 Jan 2013 - 10:26 pm | श्रीगुरुजी

"आजच पेपरात बातमी आली आहे की क्वेट्टामध्ये सहा बॉम्बस्फोटांमध्ये शंभरेक लोक मारले गेले आहेत.भारत सरकारचे बलुचिस्तानातील बंडखोरांना समर्थन आहे ही गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे काश्मीरातील दहशतवाद्यांना समर्थन आहे या गोष्टीइतकेच उघडे गुपित आहे."

हे तितकेसे खरे नाही. बलुचिस्तान चळवळीचा व या बॉम्बस्फोटांचा संबंध नाही. क्वेट्टामधल्या बॉम्बस्फोटात मारले गेलेले बहुतेक सर्वजण शिया होते. पाकिस्तानमध्ये गेली अनेक वर्षे शियांच्या मशिदींवर व त्यांच्या धार्मिक मिरवणुकीवर बॉम्बस्फोट होत आले आहेत. पाकिस्तानमधील सुन्नींमध्ये शियांबद्दल राग आहे. काही सुन्नी शियांना मुसलमानच मानत नाहीत. त्यांना इस्लाममधून बहिष्कृत करावे अशी सुन्नींची मागणी आहे. यापूर्वी झिया उल हक च्या राजवटीत पाकिस्तानमध्ये अहमदिया पंथाच्या मुस्लिमांना अमुस्लिम असे अधिकृतरित्या घोषित केलेले होते. तसेच शियांनाही करावे अशी मागणी आहे. मला या दोन्ही पंथातला फरक नक्की माहित नाही. पण सुन्नी महंमदाला अखेरचा प्रेषित मानतात तर शिया महमंदानंतर अजून कोणतरी प्रेषित येईल असे मानतात. हा त्यांच्यात मुख्य फरक आहे.

भारत बलुची बंडखोरांना मदत करतो अशी अफवा आहे. पण ते प्रत्यक्षात खरे नसावे. नाहीतर इतक्या वर्षात काहीतरी पुरावे किंवा लागेबांधे दिसले असते. भारताने यापूर्वी लिट्टेला (श्रीलंका) शस्त्रे व आर्थिक मदत पुरवुन आपले हात पोळून घेतले होते. अफगाणिस्तानमधील नॉर्दर्न अलायन्सचा धडाडीचा ताजिक नेता अहमदशहा मसूद (याला ९/११ च्या २ दिवस आधी म्हणजे ९ सप्टेंबर २००१ ला तालिबान्यांनी आत्मघातकी ह्ल्लेखोर पाठवून मारले) याला १९९६ व त्यानंतर २००१ व नंतरही उत्तर अफगाण सीमेवरील राष्ट्रांमार्गे भारत शस्त्रात्रे व आर्थिक मदत करत होता कारण तो कट्टर तालिबानविरोधी होता. 'जियो सिंध्'चा नेता अल्ताफ हुसेनने सिंध प्रांत स्वतंत्र करण्यासाठी भारताची मदत मागितली होई. परंतु अजूनपर्यंत भारताने कोणत्याही पाकिस्तानी विभाजनवादी संघटनेला मदत पुरविली नसावी असे वाटते. मदत करत असल्यास किंवा केली असल्यास कधी ना कधी तरी ते बाहेर आले असते.

चिरोटा's picture

11 Jan 2013 - 4:20 pm | चिरोटा

भारत-पाक संबंधांचे हे झेंगाट कधीच कळत नाही.तिकडे वाघा सीमेवर रोज भारत-पाक सैनिक समोरासमोर लेफ्ट-राईट करत असतात ऐटीत.(http://en.wikipedia.org/wiki/Wagah_border_ceremony ). मग सीमेवर दुसरीकडे कुठेतरी चकमक वगैरे होते. त्यात त्यांनी गोळीबाराला सुरुवात केलेली असते आणि ह्यांनी प्रत्युत्तर दिलेले असते.किंवा vice versa. मग ते म्हणतात कश्मीरमध्ये स्वातंत्र्याची गळचेपी होतेय. हे म्हणतात- असले काही नाही.येवून बघा.
हे म्हणतात- दहशतवादी पाठ्वणे थांबवा. ते म्हणतात- तुम्ही अडवा की त्यांना.
काही दिवस जातात मग दोघेही एकमेकांच्या उच्च्युक्ताला बोलवून घेतात,दम भरतात आणि 'निषेध' वगैरे नोंदवतात.परत काही दिवस जातात. मग एके दिवशी सकाळी दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांचे हसत हसत फोटो!! कश्मीर प्रश्न चर्चेनेच सुटेल ह्यावर दोघांचे एकमत होते.

श्रीगुरुजी's picture

13 Jan 2013 - 8:20 pm | श्रीगुरुजी

सर्वात प्रथम हा विचार केला पाहिजे की पाकिस्तानशी संबंध ठेवणे हे भारताच्या हिताचे आहे का? किंवा असे संबंध हितकारक नसले तरी ते अहितकारक आहेत का? जर पाकिस्तानशी संबंध तोडले तर आता आहे त्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती निर्माण होईल का परिस्थिती आहे तशीच राहील का परिस्थिती सुधारेल?

१९४७ पासून गेली ६५-६६ वर्षात असे दिसून आले आहे की, पाकिस्तानशी संबंध ठेवणे हे भारताच्या अजिबात हिताचे नाही किंबहुना भारतासाठी हे संबंध अत्यंत अहितकारक ठरलेले आहेत. केवळ आपली मतपेढी सुरक्षित ठेवण्यासाठी व काश्मिरी मुस्लिमांना व भारतातील तथाकथित निधर्मांधांना खूष ठेवण्यासाठी भारताच्या हिताचा बळी देऊन पाकिस्तानचे चोचले पुरविले जात आहेत. निदान आतातरी जागे होऊन हे संबंध कायमस्वरूपी तोडले पाहिजेत.

पाकिस्तानशी संबंध अपरिहार्य आहेत. ते चांगले किंवा वाईट असतील... पण संबंध न ठेवणे अशक्य आहे.

अर्धवटराव

श्रीगुरुजी's picture

14 Jan 2013 - 12:44 pm | श्रीगुरुजी

यावर जरा सविस्तर लिहाल क?

पाकिस्तानशी संबंध अपरिहार्य का आहेत? अनेकवेळा लाथांचा प्रसाद मिळूनसुद्धा पाकिस्तानशी संबंध टिकवून धरल्याने भारताचा कोणता फायदा होतो? पाकिस्तानशी संबंध तोडले तर भारताचा नक्की काय व किती तोटा होईल?

भारताला सर्वाधिक आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे उच्च तंत्रज्ञान, परकीय चलन, तेल, शस्त्रास्त्रे, कमी पडणारे अन्नधान्य, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा इ. . . .यापैकी कोणत्या गोष्टी पाकिस्तान पुरविते? पाकिस्तानशिवाय जगात इतर कोणताच देश या गोष्टी पुरवु शकणार नाही का?

पाकिस्तानशी संबंध ठेवल्याने आजवर भारताचा काय व किती फायदा झाला? आणि हे संबंध तोडल्याने भारताचा काय व किती तोटा होईल?

अशा नक्की कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे भारताला पाकिस्तानशी संबंध ठेवावेच लागतील? आपण पाकिस्तानवर नक्की कोणत्या गोष्टींवर पूर्णतः किंवा अंशतः अवलंबून आहोत?

निव्वळ व्यापार बघितला तर भारताची पाकिस्तानकडून आयात जास्त व निर्यात कमी आहे. म्हणजे तिथेही असंतुलन आहेत. हा व्यापार मुख्यत्वेकरून रेशीम, कापड व काही अन्नधान्याचे पदार्थ इ. मर्यादित स्वरूपाचा आहे. या सर्व गोष्टी भारताला जगात इतर देशांकडूनसुद्धा मिळू शकतात.

भारताला पाकिस्तानची अजिबात गरज नाही.

खबो जाप's picture

14 Jan 2013 - 3:28 pm | खबो जाप

आहो गुरुजी जरा त्यांच्या भावना समजून घ्या

पाकिस्तानशी संबंध अपरिहार्य आहेत. ते चांगले किंवा वाईट असतील... पण संबंध न ठेवणे अशक्य आहे

ह्याचा अर्थ असा आहे कि शेजारच्या गल्लीतल कुत्र किती जरी चावल तरी कधीतरी सुधारेल म्हणून त्याला रोज बिस्किटे(व्हिसा ), दुध (क्रिकेट ). चपात्या(अमन कि आशा सारखे कार्यक्रम) खायला घालणे.

पाकिस्तानशी आपली सागरी, जमीन, आणि आकाश सरहद्द शेअर होते.आज भारत सिमेवर काहि खुट्टं झालं भारत त्याला मिलटरी आणि डिप्लोमॅटीक लेव्हलला उत्तत द्यायचे प्रयत्न करु शकतो. पाकशी संबंध तोडल्यास प्रत्येक कारणासाठी पाक (आणि आपण सुद्धा) प्रत्येक वेळी आंतरराष्ट्रीय लवादाकडे, युनो कडे जाऊ. मग ते कारण साधं मच्छीमारांनी एकमेकांच्या हद्दीत घुसणं असो, कि नद्यांचे पाणि असो, किंवा पश्चिमेकडुन येणार्‍या - जाणार्‍या हवाईवाहतुकीला पर्मीशन्स असो... काश्मीर प्रश्न तसंही युनोमध्ये दाखल झाला आहे. भारत-पाक संबंध तुटले तर तिथे युनोसारख्या संस्थांची मध्यस्ती एक नवीन डोकेदुखी म्हणुन आपल्याला छळेल.

भारत आशीयाखंडात फार महत्वपूर्ण भुमीका निभवतो (सार्क वगैरे). एक खंड म्हणुन आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आणि पाकिस्तानला कहि ना काहि कॉमन भुमीका घ्यावीच लागते.

पाकिस्तानला अंतर्गत बंडाळीने खिळखिळं करायचं म्हटलं तर भारताला त्यातल्या प्रत्येक फॅक्टरशी संबंध ठेवावे लागतील. अधिकृत संबंधाच्या छायेशिवाय हे धंदे जमणार नाहि.

जगात अनेक शेजारी राष्ट्रांमध्ये वाईट संबंध आहेत. इस्त्राएल आणि अरब राष्ट्रे, उत्तअ-दक्षीण कोरीया, इराण - सौदी अरब (हे अगदी शेजारी नाहित, पण त्यांचं शत्रुत्व जगजाहीर आहे). पण त्यापैकी कुणीच संबंध तोडले नाहित.
असो. यादी खुप लांबलचक आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर असं रुसुबाई सारखं संबंधं तोडुन बसणं एका परिपक्व लोकशाही देशाचे लक्षण नाहि.

सर्वात महत्वाचं... क्रिकेट सामने, कलाकारांचे येणं जाणं वगैरे गोष्टी म्हणजे दोन राष्ट्रांचे संबंध नाहित. आंतरराष्ट्रीय संबंध हि फार खोल, संथ, आणि अत्यंत व्यापक परिमाणांची प्रक्रिया आहे.

अर्धवटराव

दादा कोंडके's picture

14 Jan 2013 - 3:52 pm | दादा कोंडके

पाकिस्तानशी संबंध अपरिहार्य आहेत. ते चांगले किंवा वाईट असतील... पण संबंध न ठेवणे अशक्य आहे.

संबंध चांगले जरी नसतील तरी खूप वाईट नसण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. उद्या भारत-पाक सिमेवर चीनला लश्करी तळ उभे करू दिले तर कितक्याला पडेल?
कुठ्ल्याश्या मराठी सिनेमात ऐकलेल्या म्हणीप्रमाणे पाकिस्तान म्हणजे, 'अवघड जागेचं दुखणं आणि जावई डॉक्टर' अशी अवस्था आहे.

मदनबाण's picture

13 Jan 2013 - 9:35 pm | मदनबाण

मेरे पती का सिर ला के दो...
http://zeenews.india.com/videos/bring-head-of-my-husband_19437.html

हुप्प्या's picture

14 Jan 2013 - 12:51 am | हुप्प्या

इथल्या आणि अन्यही बोटचेप्या, काँग्रेस धार्जिण्या प्रतिक्रिया देणार्‍ंयाना पोटशूळ होईल अशी मोदींची कारवाई
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18009125.cms
पाकच्या शिष्टमंडळाला गुजराथेतून हाकलून दिले.
वज्राहूनही कडक निषेधाचे खलिते पाठवण्यापेक्षा ही एक कृती बरेच काही व्यक्त करते असे मला वाटते.
पण विशिष्ट व्होट बँकेचे गणित मनात घोळवत असणारे केंद्रीय सरकार असे काही करेल असे वाटत नाही.
ते वाचा आणि हेही
http://online3.esakal.com/esakal/20130113/5300226139781097569.htm

पिंपातला उंदीर's picture

14 Jan 2013 - 9:41 am | पिंपातला उंदीर
नितिन थत्ते's picture

14 Jan 2013 - 11:31 am | नितिन थत्ते

मोदींच्या नावे रजनीकांत ष्टाईल जोक सुरू झाले का काय?

दादा कोंडके's picture

14 Jan 2013 - 9:55 pm | दादा कोंडके

कुणा मोदीद्वेष्ट्याचा हा कुटील डाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे सुरवातीला दोन-चार ऑब्विअस अश्या पुड्या सोडून दिल्या की पुढच्या खर्‍या गोष्टीसुद्धा लोकं, 'हॅ, मागच्यावेळेसारखंच काहितरी असेल' म्हणून दुर्लक्ष करतील. :)

विकास's picture

14 Jan 2013 - 9:28 pm | विकास

म.टा.मधे चुकीच्या बातम्या असतात वाटतं!

असो, परत एकदा माध्यमांची उठसुठ बातम्या देऊन चुका दुरूस्त न करण्याची स्टाईल दिसून आली... इंडीया टूडे मधे आजही खालील मथळे असलेल्या दोन्ही बातम्या दिसतातः

Narendra Modi govt asks Pakistani delegation to leave Vibrant Gujarat Summit after tension escalates along LoC (स्त्रोतः Mail Today Bureau)

Pakistani delegates took part in Vibrant Gujarat Global 2013: Modi govt
(स्त्रोतः PTI)

असो.

सलिल २४'s picture

14 Jan 2013 - 1:53 pm | सलिल २४

आपण नागरिक असे संतापतो, अस्वस्थ होतो पण सरकार मात्र? आताच एक पुस्तक हाती आलाय ते वाचतोय. एका सैनिकाची रोजनिशी. ' कारगिल इन साईड स्टोरी'
लेखिका हरिंदर बवेजा.अनुवाद-चंद्रशेखर मुरगुडकर.सैनिकांची अवस्था काही वेगळी नव्हती त्या वेळी.कुणाशी लढतोय,शत्रूकडे काय तयारी आहे,लष्कर कि अतिरेकी काही स्पष्ट होत नव्हत त्यांना.कारगिल विजयाची हि बाजू मला तरी माहित नव्हती.तरी जवान लढतात.आता तर त्यांना त्रिवार त्रिवार मुजरा करावा असे वाटते.दळभद्री सरकारचा तीव्र निषेध.सरकारला काही फरक पडणार नसला तरी.पण साला आपण वांझोटे चिडतो.राजकारण्यांना काही नसत.उगा डोक खराब होत.पण सैन्यासाठी मात्र जीव तुटत राहील.जय जवान.

तेव्हा पाकिस्तानशी युद्धाची वेळ आली तर त्यांच्यावर आधीच आपण अणुबॉम्ब टाकावेत पण तशी वेळ येऊ नये म्हणून जे काही करता येईल ते करावे.मला वाटते माझा मुद्दा मी स्पष्ट केला आहे.
क्लिंटन यांच्या या मुद्द्याशी मी १००% सहमत आहे.
१९९८ मधे पाकिस्तानचे शमशेद अहमद म्हणाले होते की:- "Pakistan's policy implies that it will not only use nuclear weapons in a retaliatory strike, it is also ready to take the lead and use nuclear weapons first to counter Indian conventional aggression.".
सध्या पाकिस्तानकडे ९० ते ११० न्युक्लिअर बॉम्बस आहेत.तसेच पाकिस्तान Non-Proliferation of Nuclear Weapons (NPT) and the Comprehensive Nuclear Test Ban Treaty (CTBT) या दोन्ही करारांमधे बद्ध नाही.
पाकिस्तान फार मोठ्या प्रमाणात आणि वेगात अणवस्त्रे बनवत आहे.येत्या काही वर्षात त्यांच्याकडे १५० ते २०० अणवस्त्रांचा साठा तयार होईल. Alastair Campbell's यांच्या The Burden of Power (Campbell Diarie)मधील नोंदी नुसार फक्त ८ सेकंदात मिसाईल्स सोडण्याची आमची तयारी आहे असे पाकिस्तान मधल्या काही जनरल्सनी सांगितले होते.
सध्या पाकिस्ताना त्यांच्या खुशब ४(Khushab-४)या अणुभट्टीची बांधणी पूर्ण करण्यात जुंपला आहे,ज्यामुळे प्लुटोनियचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येईल.

पाकिस्तानच्या काही न्युक साईट्स :-
पाकिस्तानची काही न्युक साईट्स
खुशब २ आणि खुशब ३ (Khushab २ & Khushab ३)
खुशब २ आणि खुशब ३
(सर्व चित्रे जालावरुन)

संदर्भ :-
Pakistan’s rush for more bombs — why?
Pakistan boasted of nuclear strike on India within eight seconds
Pakistan's nuclear work on fast track

मदनबाण's picture

19 May 2015 - 10:15 am | मदनबाण

ताक :-
Pakistan's fourth nuclear reactor at Khushab now appears operational
सौदी पाकड्यांकडुन अणूबॉम्ब घेणार !
S. Arabia calls in off-the-shelf nuke option with Pakistan – report
चीन+ पाकडे = सायनो पाक न्यूक्लिअर लिंक
China Confirms Pakistan Nuclear Projects
पाकिस्तानची नव्या रिअ‍ॅक्टरची भूक ?
Outcry and fear as Pakistan builds new nuclear reactors in dangerous Karachi
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कोमात कोण?

श्रीगुरुजी's picture

15 Jan 2013 - 10:18 pm | श्रीगुरुजी

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18029046.cms

पाकड्यांनी गेल्या १२ वर्षात आतापर्यंत ३ वेळा पकडलेल्या भारतीय सैनिकांचा शिरच्छेद केलेला आहे. ही धक्कादायक बातमी आज लष्करानेच उघड केली. हे वाचून मन सुन्न झाले आणि पुन्हा एकदा संताप दाटून आला. सौरभ कालिया व इतर ५ जणांचा अमानवी छळ करून मारले ती अजून वेगळीच घटना आहे.

भारताने ह्या बातम्या जगापासून व भारतापासून लपवून ठेवण्यातच धन्यता मानली. जेव्हा पहिल्यांदा ही विकृत घटना घडली तेव्हाच पाकिस्तानविरूद्ध कठोर कारवाई केली असती तर पुढील २ घटना टाळता आल्या असत्या. पण आधीच्या दोन घटनांनंतर भारताने त्या घटना लपवून ठेवण्यात यश मिळविले आणि आताच्या घटनेनंतर पूर्वी किमान १०० वेळा पाठविलेला तोच निषेध खलिता नवीन तारीख टाकून दिला आणि विषय मिटवून टाकला.

यावेळी तर भारताच्या भूमीत घुसून व तिथून २ सैनिक पकडून आणून त्यांचे शिरच्छेद करण्यापर्यंत पाकिस्तानची मजल गेली. आपण पकडलेल्या सैनिकांचे कितीही वेळा शिरच्छेद केले तरी भारत थंडच राहतो हे माहिती असल्यामुळेच पाकिस्तान अशी कृत्ये करत राहतो व भविष्यातही करत राहील.

एकंदरीत स्वत:ची मतपेढी टिकविण्याच्या काही पक्षांच्या किळसवाण्या राजकारणामुळे भारतीय सैनिकांचा अमानवी पद्धतीने जीव जात आहे आणि पाकपुरस्कृत दहशतवादामुळे सामान्य नागरिक बॉम्बस्फोटात मरत आहेत आणि आपण मात्र निर्लज्जपणे शांतता चर्चा, समझोता एक्प्रेस, व्यापार, हॉकी,क्रिकेट व इतर खेळात पाकड्यांना पायघड्या, पाकिस्तानी गायकांचे लाड इ. करून आपल्या कणाहीनतेचे केविलवाणे प्रदर्शन करत आहोत.

नितिन थत्ते's picture

16 Jan 2013 - 3:36 pm | नितिन थत्ते

>>एकंदरीत स्वत:ची मतपेढी टिकविण्याच्या काही पक्षांच्या किळसवाण्या राजकारणामुळे भारतीय सैनिकांचा अमानवी पद्धतीने जीव जात आहे

तीन शिरच्छेदाच्या घटनांपैकी एका घटनेच्या वेळी "मतपेटी टिकवण्याचे किळसवाणे राजकारण" न करणार्‍या पक्षाचे सरकार होते असे ऐकले आहे.

पिंपातला उंदीर's picture

20 May 2015 - 9:20 pm | पिंपातला उंदीर

एकंदरीत स्वत:ची मतपेढी टिकविण्याच्या काही पक्षांच्या किळसवाण्या राजकारणामुळे भारतीय सैनिकांचा अमानवी पद्धतीने जीव जात आहे

गुर्जी मे २०१४ नंतर सीमेवर लई सैनिक मारले गेले हो . त्याबद्दल बोला की थोड . आता कुठल्या पक्षाच्या किळसवाण्या राजकारणामुळे सैनिकांचा जीव जात आहे . सांगा पाहू

'भारतीय जवानांकडून सीमेचे उल्लंघन नाही' http://esakal.com/esakal/20130116/5255041879650501265.htm

मदनबाण's picture

17 Jan 2013 - 10:50 am | मदनबाण

Let's talk it out
"Dialogue between the Indian and Pakistani leadership would be fruitful as Prime Minister Manmohan Singh and the people of India wanted peaceful relations with Pakistan". (SM Krishna-Source The Times Of India Sep 9, 2012, 02.57PM IST)
"For something like this to be blown out of proportion...there is absolutely no questions of ever anyone authorising any beheading or killing of Indian soldiers. It would be absolutely opposite to the peace process.” (Hina Rabbani Khar-Source THE HINDU NEW YORK, January 16, 2013)
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! किंवा अमन की आशा और कायरता की साजिश !
आपण फक्त "हात चोळत" बसतो ?

अवतार's picture

17 Jan 2013 - 3:39 pm | अवतार

भारतात जरी हा प्रश्न नैतिकतेच्या पातळीवर पहिला जात असला तरी पाकिस्तानसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. सत्ताधारी आणि सर्वसामान्य समाज यांचे हितसंबंध वेगवेगळ्या पातळ्यांवर गुंतलेले असतात. आधुनिक राष्ट्रवाद हा अलीकडच्या काळात सामान्य जनतेच्या रेट्यामुळे अस्तित्वात आला आहे. सत्ताधारी वर्ग हा कधीही अशा प्रकारच्या सामाजिक आणि राजकीय सत्तापालटासाठी अनुकूल नव्हता. सत्तेचा केंद्रबिंदू हा काही ठराविक राज्यकर्त्या घराण्यांच्या हातातून पद्धतशीरपणे सामान्य जनतेच्या बाजूला झुकणे हा लोकशाहीचा अर्थ आहे. पाकिस्तानच्या निर्मितीमागील प्रेरणा ह्याच मुळात लोकशाहीवादी नसून सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध राखणे ह्या एकाच हेतूने त्या देशाचा जन्म झाला आहे.
पण अशा राजकारणाचे दूरगामी परिणाम निश्चितच होत असतात. त्याचाच परिणाम म्हणून आज तेथील सत्ताधीशांबद्दल तिथल्या जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. तिथे अंतर्गत विघटनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. अशा वेळी बाहेरच्या शत्रूची भीती दाखवून सत्ताधारी वर्गाचे प्राबल्य पुनर्प्रस्थापित करण्यासाठी त्यांना अशी खेळी करणे भागच आहे.

पण महत्वाचा प्रश्न म्हणजे भारताची प्रतिक्रिया काय असावी. जी काही प्रतिक्रिया असेल ती भारताच्या हिताची असावी पाकिस्तानच्या हिताची नव्हे. दोन देशांमधील युद्ध आणि गल्लीतील मारामारी यात फरक असतो. युद्ध सुरु करणे फारच सोपे असते. पण संपवणे अत्यंत अवघड असते. युद्धाचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिणाम काय होतील याचा विचार अगोदर करावा लागतो. अंतिम विजय हाच युद्धाचा हेतू असावा, प्रतिशोध हा नव्हे.
आज पाकिस्तान आतूनच दुभंगत आहे. अशा वेळी जर भारतीय सैन्याकडून आक्रमक पावले उचलली गेली तर त्याचा परिणाम म्हणून ही विघटनाची प्रक्रिया थांबून तिथल्या सत्ताधीशांना जनतेचा प्रचंड प्रमाणात पाठींबा मिळू शकतो. परिणामी राष्ट्रवादाच्या भावनेने भारलेला एकसंध शक्तिशाली पाकिस्तान निर्माण होऊ शकतो. अशा राष्ट्रीय भावनेने एकवटलेल्या पाकिस्तानचे आव्हान मोडून काढणे ही भारतासाठी कायमची डोकेदुखी होऊ शकते. वार करायचाच असेल तर तो योग्य वेळी आणि योग्य जागी करावा. लष्करप्रमुखांनी नेमके हेच म्हटले आहे.

बोलघेवडा's picture

18 Jan 2013 - 6:55 am | बोलघेवडा

हा सगळा प्रकार मला एकतर्फी वाटतो. म्हणजे अस बघा कि आपले मिडीया आपल्यासमोर भारत अगदीच बापुडवाणा दुबळा असा चित्र उभे करतं. त्यातून अस वाटते कि आपण सतत मार खातो. पाकिस्तान सतत आपली काही तरी कुरापत काढतो. पण खर चित्र काहीतरी वेगळेच असणार आहे असा मला वाटते. आपणही पाकिस्तान पेक्षा थोडे जास्तच "बाराचे" असणार.

नितिन थत्ते's picture

18 Jan 2013 - 12:40 pm | नितिन थत्ते

ह्या:, कायतरीच ब्वॉ तुम्ही बोलता.

१. भारत कध्धी कध्धी आगळीक करत नाही. भारताने गेल्या दहा हजार वर्षात कोणावर आक्रमण केलं नाही हे तुम्ही ढकलपत्रांतून वाचलेलं दिसत नाही.

२. पाकिस्तान नेहमी आपली कुरापत काढत असतो. आणि आपण हातावर हात ठेवून बघतो. हे ही तुम्हाला ठाऊक नाही म्हणजे कमालच्चै. आत्तासुद्धा जेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला केला तेव्हा "तुम्ही मुळ्ळीच गोळ्या चालवायच्या नाहीत" असं पंतप्रधानांनी/सोनिया गांधींनी/संरक्षणमंत्र्यांनी पर्सनली त्या सैनिकांना कळवलं होतं हेही तुम्हाला माहिती नाही?

३. आपले सैन्य इतके बलवान आहे की ते दीड (सेकंदात/मिनिटात/तासात/दिवसात) पाकिस्तानला होत्याचं नव्हतं करून टाकेल. केवळ आपल्या देशात मुसलमान राहतात आणि त्यांना मताधिकार आहे म्हणून आपले षंढ/नाकर्ते/बोटचेपे वगैरे सरकार आपल्या लष्कराला रोखून धरत आहे. मागच्यावेळी कारगिल युद्धात सुद्धा नाही का कितीतरी पाकिस्तानी घुसखोरांना केवळ ५०-६० दिवसांत आपल्या सैन्याने पिटाळून लावलं होतं.

तुम्हाला काहीच माहिती नाही असं वाटतंय. जालावर नवीन दिसता. ;)

या महिन्यात पाकिस्तान कडुन जवळपास ६३ वेळा शस्त्रसंधी चा भंग केला गेला आहे.हिंदूस्थान आणि पाकिस्तान बॉर्डर वरील गावात राहणार्‍या हजारो लोकांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. सांबा सेक्टर हा सगळ्यात जास्त प्रभावित भाग आहे आणि इथुन जवळपास ५ हजार लोक स्थलांतरीत करण्यात आलेले आहेत. तर १ ऑक्टोबर पासुन १६ हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. मला वाटत कारगिल युद्ध झाल्या नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात फायरिंग /शेलिंग आणि लोकांचे स्थलांतर झालेले नाही.
परंतु सध्या चिंतेचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे युद्ध करण्यासाठी दारुगोळाच नाही ! { एव्हढा मोठा देश आणि त्याच्याकडे आत्म संरक्षण करण्यासाठी दारुगोळा नसावा या पेक्षा वाईट अवस्था काय असावी ? }
आता आपले लष्कर प्रमुख जनरल दलबिर सिंग सुहाग आहेत,त्यांच्या आधी जनरल बिक्रम सिंग होते, त्यांनी एक गोष्ट ठळकपणे उघड केली होती, ती म्हणजे आपल्याकडे २० दिवस लढण्यासाठीचा सुद्धा दारुगोळा नाही ! war wastage reserves (WWR) हा ४० दिवसांच्या घनघोर युद्धासाठी आवश्यक असावा असा दंडक असतानाही आपल्या लष्कराची दुरावस्था झालेली आहे आणि हे प्रचंड चिंतेचे कारण आहे.तसेच एयर फोर्सची प्रचंड दुरावस्था झाली आहे. { ३ दिवसांपूर्वीच सुखोइ-३० पुण्यात पडल्याची बातमी तुम्ही वाचलीत असेल} सातत्याने विमाने पडली आहेत आणि वैमानिक जीव गमवत आहे. { मला वाटते वायुदलाची विमाने युद्ध न करता पडण्यात आपल्या देशाने जागतीक रेकॉर्ड बनवला असेल. :( } म्हणजे आपल्याकडे दारुगोळाही नाही, विमानांची संख्याही कमी,पाणबुड्यांचीही संख्या घटली अश्या अवस्थेत जर सध्याची परिस्थीती अजुन चिघळली तर आपण युद्धजन्य परिस्थीचा सामना करण्यास सक्षम आहोत असे म्हणता येइल ?

जाता जाता :- कारगिल युद्धाच्या वेळेला सुद्धा आपल्याला दारुगोळा पुरवठा कमी पडला होता आणि आयत्या वेळी बोफोर्स तोफेचे शेल्स साउथ आफ्रिकेतुन आयात करावे लागले होते, ही प्रकारे आपल्या लष्कराची नाचक्की करणारे होते.आणि या युद्धातुन आपण काहीच धडा घेतला नाही हे खेदाने सांगावे लागते आहे. :(

संदर्भ :-
Army's ammunition won't last 20 days of war
Army running low on ammunition
India not war ready, Army Chief tells Modi
India and Pakistan exchange fire in Kashmir border clashes
India giving befitting reply to Pakistan at border: Army Chief

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
RBI in talks with govt over a Financial Resolution Authority
Modi government cuts through red tape to make working easier in India

नितिन थत्ते's picture

1 Nov 2014 - 7:41 am | नितिन थत्ते

मागील एनडीए सरकारच्या काळातही असाच ओरडा झाला होता. त्यावेळी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी स्वतः मिग २१ ची वारी केली आणि ती सुरक्षित असल्याची ग्वाही वगैरे दिली होती. [त्यानंतर तो ओरडा शमला होता असे आठवते].

पाकिस्तान आणि चीनची मैत्री आपल्याला त्रासदायक ठरत आहे, एकीकडुन पाकिस्तान उध्योग करत आहे तर दुसरी बाजुने चीन !
मध्यंतरी चीनचे राष्ट्रपती Xi Jinping हिंदूस्थानात येउन गेले त्यावेळी चीनी सैन्याकडुन लढाख मधील चुमार मधला प्रश्न गहन झाला होता. { मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी जवळपास १००० पेक्षा चीनी सौन्य हिंदूस्थानात घुसवुन चीन ने दिलेली वाढदिवसाची भेट } चीन ने आपल्या देशाच्या हद्दीत ४०० मीटर आत येउन रस्ते बनवले { जे आपल्या लष्कराने नंतर उध्वस्त केले. } एक डोळा लढाख वर ठेवुन दुसरा डोळा सिक्किम वर रोखला गेला आहे. चीन आणि हिंदूस्थान यांच्या मधे "बफर" असलेल्या तिबेट मधे रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात चीन ने मोठ्या प्रमाणात पैसा ओतला आहे. ते आता सिक्किमच्या अगदी जवळ पोहचले आहे !
China’s expanding rail network in Tibet nears Sikkim
नथुला पास चे महत्व आपल्यासाठी का आहे ? याचे उत्तर वरचा मॅप पाहुन कळते.
http://www.railnews.co.in/wp-content/uploads/2014/08/China-Tibet-Rail-Line.jpg

काही वाचनिय दुवे :-
China plans taking Tibet rail network near Sikkim
Why do the Chinese want a train to Sikkim?
China Inaugurates New Tibet Rail Link Close to Sikkim
India has ignored Tibet for too long
China entered Sikkim during Ladakh face-off
एक जुना रिपोर्ट :- The Impact of Opening up Sikkim’s Nathu-La on China-India Eastern Border Trade

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }

नथुला पास चे महत्व आपल्यासाठी का आहे ? याचे उत्तर वरचा मॅप पाहुन कळते.
हा नथुला पास जून पासुन उघडला जाणार आहे, थॅक्स टू मोदी ? फॉर कैलास-मान सरोवर यात्रा न्यू-रुट.
Nathu La route to Kailash-Mansarovar to open from June: PM Modi
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कोमात कोण?

मदनबाण's picture

19 May 2015 - 10:34 am | मदनबाण

The Tibet story that you should know...

Better Late Than Never: India Finally Beefing up China Frontier
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कोमात कोण?

दक्षीण आशियातील अण्वस्त्रांचा प्रश्न महत्वाचा असला तरीही, १) प्रत्यक्ष अस्तीत्वात नसलेला आकडा हाईप करून दाखवला जातो आहे, २) बातम्या देण्याची वेळ सार्क परिषद आणि ओबामांच्या भारत भेटीत काश्मीर प्रश्ना संबंधात भारतावर दबाव टाकण्यासाठी म्हणून असावी. (भारतीय लोक नुसतीच स्वतःची पाठ थोपाटून घेतात पण आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीत प्रत्यक्षात चीन आणि पाकीस्तान बरेच चतुर प्रकार करताना दिसतात जे दुर्दैवाने सामान्यतः भारतीय लोकांना लक्षातही येत नाहीत) ३) दंगली होतील या भितीने भारताची फाळणी होऊ देणे हीच पहिली आणि मोठी चूक होती. आणि आता तर फाळणीच अधीक समर्थन केल जातय पण अण्वस्त्र अतीरेक्यांच्या हाती पडलीतर किती जिवीत हानी होईल हा एक प्रश्न आणि दुसरे शस्त्रास्त्रांच्या न संपणार्‍या स्पर्धेसाठी किती पैसा डावावर लावला जाईल. पाकिस्तानी जनतेला अरब चीन आणि अमेरीका एकमेकांच्या चढाओढीने पैसा देत रहाणार पण भारताच्या नागरीकांना स्वतःच्या डोक्यावर शासकीय कर्जे घेऊन शस्त्रास्त्र स्पर्धेत उतरावे लागते. असो.

या निमीत्ताने आमची हि छोटी धागा जाहीरात १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश

प्रत्यक्ष अस्तीत्वात नसलेला आकडा हाईप करून दाखवला जातो आहे, २) बातम्या देण्याची वेळ सार्क परिषद आणि ओबामांच्या भारत भेटीत काश्मीर प्रश्ना संबंधात भारतावर दबाव टाकण्यासाठी म्हणून असावी.
अहं अस पाकड्यांच्या बाबतीत म्हणणे चुकीचे ठरेल ! पाकिस्तानकडे १२०-१५० अणवस्त्रे आहेत ही माहिती फार जुनी झाली, त्यात भर टाकण्याचे उध्योग पाकिस्तान करत राहिला त्याचाच परिणाम हा नविन आकडा आहे, तसेच छोट्या आकाराची अणवस्त्रे ही बनवण्यात पाकिस्तान सध्या कार्यरत असल्याचे समजते.
या लेखाच्या पहिल्या पानावर ज्या खुशब ३ प्लुटोनियम रिअ‍ॅक्टरचा चा सॅटॅलाईट फोटो दिला आहे, ती ऑपरेशनल झाल्याच्या बातम्या आहेत, यातुन त्यांना 5.7-7.1 kg of weapon-grade plutonium मिळेल. तसेच IPFM { International Panel on Fissile Materials } नुसार पाकड्यांनी आत्ता पर्यंत 170 kg प्लुटोनियम जमा केले असावे ज्यातुन ३५-४० न्युक्लिअर वेपन्स बनवली जातील { 4-5 kg of plutonium प्रत्येकी एकाला }
पाकिस्तान हे अणवस्त्रांचा ज्वालामुखी बनत चालला आहे आणि अर्थातच आपल्या प्रेमापोटी ते त्यात भर टाकत आहेत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }

खुशब -४ अजुन सुरु झाली नाही, असे त्याच्या कुलिंग टॉवरच्या निर्माण प्रक्रियेवरुन लक्षात येते.
खुशब-४ च्या कंस्ट्रक्शन प्रोग्रेसवर असलेला हा एक रिपोर्ट :- Further Construction Progress on the Fourth Heavy Water Reactor at Khushab Nuclear Site { ISIS Reports -Institute for Science and International Security }
हा या रिपोर्टचा पिडीएफ दुवा :- Further Construction Progress on the Fourth Heavy Water Reactor at
Khushab Nuclear Site

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }

माहितगार's picture

25 Nov 2014 - 5:08 pm | माहितगार

अण्वस्त्र युद्धासाठी डझनभर बनवलीतरी डोक्यावरून पाणी जात असेल ना ? त्यांचा भौगोलीक आकार आणि शहरांची संख्या पाहता त्यांच्यावर वापरण्यासाठी भारताला डझन पुरतील आणि त्या नंतर उरलेली तुम्ही म्हणता ती संख्या वापरण्याच्या स्थितीततरी असतील का ते ? एवढी सव्वाशे किंवा दोनशे ठेऊन पाकींना काय उपयोग होऊ शकेल ते समजले नाही. त्या शिवाय मिसाईल विरोधी क्षेपणास्त्रे दोन्ही देशांकडे असणार म्हणजे अवस्त्रे आपापल्याच आवकाशात फुटण्याची शक्यता वाढू शकते. आपण आकडे देता आहात ते अंदाजे असावेत. आणि आकडे फुगवून सांगीतले जाण्यात पाकीस्तानचे नुकसान काहीच नाही. काश्मीर बद्दल बोलणी करण्याचा भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्या पलिकडे या बातम्यातून काही हशील आहे का ?

दोन्ही देशात अण्वस्त्र स्पर्धा आहे आपण (भारताने) किती आरडा ओरडा केला तरी पाकीस्तानव त्याचा प्रभाव तर होणार नाही, मग आपल्या मतानुसार सद्यस्थितीत पाकीस्तान विरुद्ध भारताकडे उपाय काय राहतो ?

एवढी सव्वाशे किंवा दोनशे ठेऊन पाकींना काय उपयोग होऊ शकेल ते समजले नाही.
ते उपद्रवी आहेत्,आणि उपद्रवी लोक त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाउ शकतात ! ते काळ्या बाजारात याची विक्रीही करु शकतात. संख्येच म्हणाल तर मला वाटत अमेरिकेकडे १७०० च्या आसपास आहेत म्हणे. { नक्की परत एकचा शोधायला हवे जालावर }

काश्मीर बद्दल बोलणी करण्याचा भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्या पलिकडे या बातम्यातून काही हशील आहे का ?
काश्मिर हे फक्त आपल्या कुरापती काढण्यासाठीचे निमित्त आहे,क्षणभर गॄहीत धरुन चालु की काश्मिर पाकिस्तानला मिळाले तरी सुद्धा ते गुण्यागोविंदाने नांदतील का ? अर्थात याचे उत्तर नाही असेच येते, कारण त्यांचा आत्ता पर्यंतच इतिहास !

पाकीस्तानव त्याचा प्रभाव तर होणार नाही, मग आपल्या मतानुसार सद्यस्थितीत पाकीस्तान विरुद्ध भारताकडे उपाय काय राहतो ?
आत्मबल वाढवणे /आर्थीक आणि लष्करी दॄष्ट्या स्वंयपूर्ण होणे... तुम्ही जर पैलवान झालात तर तुमची कळ काढण्याची हिम्मतच कोणी करणार नाही, पण हेच जर तुम्ही काडीपैलवान असाल तर येणारे-जाणारे सुद्धा टपल्या मारुन जातात.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }

माहितगार's picture

25 Nov 2014 - 5:28 pm | माहितगार

आर्थीक आणि लष्करी दॄष्ट्या स्वंयपूर्ण होणे

आर्थीक आणि लष्करी दॄष्ट्या काय व्हावयास हव त्याच्याशी सहमत. पण आर्थीक आणि लष्करी दॄष्ट्या काय व्हावयास हव आणि काय आहे सध्याची यातील दरी दुर्दैवाने बर्‍यापैकी मोठी आहे.

नविन घडामोडी + नविन समिकरणे
India Under Modi to Buy First Heavy Weapons Since 1980s
India to buy first artillery since 1980s
Putin woos Pakistan as India buys US arms

जाता जाता :- “The Modi government is more realistic and pragmatic when it comes to defense acquisitions,” said Amit Cowshish, a distinguished fellow at the Institute for Defence Studies and Analyses in New Delhi. “Earlier, defense procurements used to get stuck for years on flimsy grounds.”

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }

अतूल २०१५'s picture

8 Sep 2017 - 1:00 am | अतूल २०१५

२०१३ मध्ये काँग्रेस होती , आता कोण आहे? मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही , २०१३ मध्ये जे बोलत होते , तेच आता बोला सैनिक तेव्हा पण आपले होते आत्ता पण आपले आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Mein Kabhi Kabhi... :- Chalte Chalte

मदनबाण's picture

7 Jun 2020 - 7:47 pm | मदनबाण

चीनी बाजु :-

आपली बाजु :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Mein Kabhi Kabhi... :- Chalte Chalte

मदनबाण's picture

16 Jun 2020 - 2:26 pm | मदनबाण

भारतीय दुतावासातील दोन कर्मचाऱ्यांना पाकिस्तानात रॉडने माराहाण, भयंकर छळ
एकीकडे चीन दुसरीकडे पाकिस्तान, दोन्ही बाजुने लचके तोडणे चालु !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- What stops India from designating Pakistan a terrorist state and cutting off diplomatic relations with it? :- Brahma Chellaney

दरवर्षी प्रमाणे मोदी यांनी त्यांची दिवाळी सैनिकां बरोबर साजरा केली... नेहमी प्रमाणे फोटो सेशन , व्हिडियो सेशन झाले. पण यावेळी एक मात्र एक गोष्ट वेगळी होती म्हणजे हे सगळं होण्याच्या आधी पासुन म्हणजे ११ ऑक्टोबर पासुन जम्मु-काश्मिर मधील पूंछ मध्ये जी धुमचक्री सुरु झाली ती थांबण्याचे नाव घेत नसुन आपल्या जवानांचे मृतदेह मात्र घरी परत पाठवायला तेव्हा पासुन सुरुच आहे. आपली आर्मी गेले कित्येक वर्ष असे वक्तव्य करत आली आहे की पाकिस्तानशी लढण्याची वेळ आणि जागा आम्ही ठरवु, तेव्हा हा मुहुर्त कधी काढला जातोय याची मी वाट पाहतोय. सर्जिकल स्ट्राईक करुन आपण पाकिस्तानच्या मनात जे भय उत्पन्न केले होते ते तसेच ठेवण्यास ५६ इंची छातीचे पंतप्रधान मोदी आणि आपले लष्कर सपशेल अपयशी ठरवले असुन याची साक्ष पाकिस्ताने केलेल्या या कारवायाच देतात. आपल्या अनेक मुख्य समस्यांचे मूळ पाकिस्तान आहे हे व्यवस्थित ठावुक असताना देखील हे मूळ उपटुन नष्ट करण्यास आपण या दिवसा पर्यंत अपयशी ठरलेलो असुन, आपण केवळ जवानांचे मृतदेह उचलत राहिलो आहोत. कुठे आहे पाकस्तानला कायमच धडा द्यायची इच्छा ? दोन आघाड्यावर लढण्याची तयारी ठेवा म्हणणारे लष्कर एका आघाडी वरच्या शत्रुला अजुन नष्ट किंवा विकलांग करुन ठेवु शकली नाही हे अपयश नव्हे तर अजुन काय ?
या विषयावर अधिक इकडे :-

जाता जाता :- ऑपरेश पाकिस्तान सर्वनाश पाहण्याची इच्छा ठेवुन आहे, ती पूर्ण होणे या जन्मी तरी शक्य होते का ते मात्र ठावूक नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सरहद पर एक फौजी अपना वादा निभा रहा हैं,वो धरती माँ की मोहब्बत का कर्ज चुका रहा हैं।

कपिलमुनी's picture

24 Nov 2021 - 2:50 am | कपिलमुनी

पुढच्या ऑपरेशन साठी यूपी किंवा नॅशनल इलेक्क्शन येईतो थांबा

सुबोध खरे's picture

24 Nov 2021 - 11:28 am | सुबोध खरे

@ मदनबाण

पाकिस्तानचा सर्वनाश म्हणजे काय?

उत्तर कोरिया विरुद्ध एवढे निर्बंध टाकून सुद्धा अमेरिकेने आजतागायत तेथे हल्ला करण्याचे धारिष्ट्य का दाखवलेले नाही?

रशिया आणि नंतर अमेरिका २० वर्षे अफगाणिस्तानात राहून सुद्धा शेवटी माघारी का गेली?

सध्या पाकिस्तान FATF च्या करड्या यादीत कशामुळेआणि कोणामुळे आहे?

बलूच बंडखोरांमुळे मूळ ४७०० कोटी डॉलर्स च्या CPEC ची भांडवली किंमत ६२०० कोटी पर्यंत वाढली आहे ती कुणामुळे?

तुम्ही आपली शस्त्र शक्ती वाढवली कि त्याचा पाकीस्तानवर काय परिणाम होतो?

पाकिस्तानचा भूभाग जोडून घेतला तर तेथल्या लोकसंख्येचे काय करायचे याचा विचार केला आहे का?

पाकिस्तानचा सर्वनाश म्हणजे काय?
माझ्या पुरते म्हणाल तर, आपल्या सैनिकांचे / लोकांचे लोकांचे रक्त सांडण्याची त्यांची क्षमता नष्ट करणे.

उत्तर कोरिया विरुद्ध एवढे निर्बंध टाकून सुद्धा अमेरिकेने आजतागायत तेथे हल्ला करण्याचे धारिष्ट्य का दाखवलेले नाही?
उत्तर कोरिया हा अमेरिकेचा शेजारी नाही, तसेच त्यांचे साऊथ कोरिया मधले बेस त्यांनी इतरत्र हलवले नाही. उत्तर कोरिया पाकिस्तान सारखे उद्योग साऊथ कोरिया बरोबर करत नाही.

रशिया आणि नंतर अमेरिका २० वर्षे अफगाणिस्तानात राहून सुद्धा शेवटी माघारी का गेली?
दोन्ही देशांचा गोरिला वॉर लढण्याचा अनुभव व आणि अभ्यास कमी पडला त्यांच्याकडे नव्हता. अमेरिकेला समुद्रात राहुन हल्ला करण्यात महारत असली तरी ती लँड लॉक अफगाणिस्तान विरोधान वापरता आली नाही. शिवाय या दोन्ही विरोधात पाकिस्तान ने मुजाहिदीनांना सर्व प्रकारचे जमेल ते सहाय्य केले. यात दोन बोक्यांच्या भांडणात लोणी सात्यत्याने पाकिस्तान मिळवत राहिला.

सध्या पाकिस्तान FATF च्या करड्या यादीत कशामुळेआणि कोणामुळे आहे?
खरं पाहिलं तर आत्ता तो काळ्या यादीत असायला हवा होता, तसे झाले असते तर हल्लीच सौदी ने जी नवी भिक त्यांच्या झोळीत टाकली आहे ती सुद्धा टाकता आली नसती.

बलूच बंडखोरांमुळे मूळ ४७०० कोटी डॉलर्स च्या CPEC ची भांडवली किंमत ६२०० कोटी पर्यंत वाढली आहे ती कुणामुळे?
आपल्यामुळे इतके जरी नुकसान होत असेल तर बरी प्रगती करतोय आपण इतकेच सध्या म्हणुया.

तुम्ही आपली शस्त्र शक्ती वाढवली कि त्याचा पाकीस्तानवर काय परिणाम होतो?
तुम्ही काहीही केले तरी पाकिस्तान त्याच्या मूळ उद्देशा पासुन भरकटणार नाही. त्यांना काय वाटेल म्हणुन आपण एकाच सर्जीकल स्ट्राईकवर गप्प बसलो त्याचीच नवी फळे आता मिळताना दिसत आहेत.

पाकिस्तानचा भूभाग जोडून घेतला तर तेथल्या लोकसंख्येचे काय करायचे याचा विचार केला आहे का?
त्यांचा भूभाग जोडुन घेण्याची इच्छा नाही, तशी वेळ येण्याची शक्यता शून्य कारण आपण इतक्या वर्षात जे करु शकलो नाही ना त्याची आपण मानसिकता आपण ठेवुन आहोत. जेव्हा सरकार त्या मानसिकतेत येईल तेव्हा हा प्रश्न विचारात घेण्या सारखा असेल.

जाता जाता :- शत्रुचे आयुष्य कमी केले की तुमचे आयुष्य वाढते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- फौजी भी कमाल के होते हैं,जेब के छोटे बटुए में परिवार, और दिल मे सारा हिंदुस्तान रखते हैं।