✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुन्हा एकदा पाकिस्तान

स
सर्वसाक्षी यांनी
Wed, 01/09/2013 - 14:41  ·  लेख
लेख
पाकिस्तान शत्रु असला, जरी तो आपल्या देशात अतिरेकी पाठवत असला तरीही ते त्या देशाचे राष्ट्रिय धोरण आहे आणि त्याचा संबंध त्या देशातील कलावंत आणि खेळाडु यांच्याशी जोडु नये अशी सहिष्णु व मानवतावादी, कला-क्रिडा प्रोत्साहक भूमिका मांडलेली दिसते. पाकिस्तानी खेळाडुंना इथे येण्यास वा पाकिस्तानी कलाकारांना इथल्या सिने/ करमणुक क्षेत्रात काम करु देण्यास विरोध करणार्‍यांना संकुचित म्हटले जाते. कालची बातमी हादरवणारी आहे. वैमनस्य असलेल्या दोन राष्ट्रात चकमकी घडणे समजण्यासातखे आहे. मात्र रानटीपणे हल्ला करुन सैनिकांचे शिरच्छेद करणे व शिर कापून नेणे हे कसले द्योतक आहे? 'आम्ही काहीही केले तरी तुम्ही आमचे काही वाकडे करु शकणार नाही' हा माज त्यामागे आहे. आणि खरोखरच आपले सरकार निषेध खलिता पाठविण्यापलिकडे काही करणार नाही. उद्या कदाचित 'हे हल्लेखोर आमचे सैनिकच काय नागरीकही नव्हते' असा पवित्रा पाकिस्तान घेईल. मग अशा घटना घडल्यानंतरही आपण' कला आणि क्रिडा क्षेत्रात जात, धर्म, देश वगैरे सीमांची बंधने नसतात' असे गुणगुणत पाकिस्तानी खेळाडुंना निमंत्रित करत राहणार का? इथे खेळायला आलेल्या वा करमणुक क्षेत्रात कमावुन गेलेल्या/ कमावत असलेल्या कितीजणांनी आपल्या देशबांधवासमोर अशा कृत्यांचा निषेध केला आहे? जर त्या कलावंतांना/ खेळाडुंना इथे येणे महत्वाचे वाटत असेल तर त्यांनी अशा कृत्यांचा जाब आपल्या राष्ट्राला का विचारु नये? आणि जर ते असे करत नसतील तरीही आपण त्यांना इथे कडेकोट बंदोबस्तात मिरवणार का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
70028 वाचन

💬 प्रतिसाद (132)

प्रतिक्रिया

खरे आहे ...

छोटा डॉन
Wed, 01/09/2013 - 14:48 नवीन
साक्षीशेठ, तुम्ही म्हणता ते सर्व खरे आहे. पण मुळात आम्ही संकुचित विचारसारणीचे असल्याने आम्ही काहीही म्हटले तरी ते संकुचितच रहात असल्याने आम्ही आपलं गपगुमानं पुढचे क्रिकेट सामने लागत नाहीत तोवर पाकी कलाकारांचे समावेश असलेले रिअ‍ॅलिटी शो बघत आहोत व आपल्या दोस्तीनाम्याचे गोडवे गात आहोत. -छोटा डॉन
  • Log in or register to post comments

पाकिस्तानात (आणि भारतातही?)

ऋषिकेश
Wed, 01/09/2013 - 14:50 नवीन
पाकिस्तानात (आणि भारतातही?) निवडणूका जवळ आल्यात ना!
  • Log in or register to post comments

?

विकास
गुरुवार, 01/10/2013 - 22:11 नवीन
पाकिस्तानात (आणि भारतातही?) निवडणूका जवळ आल्यात ना!
हा प्रतिसाद अंमळ खटकला... निवडणूका जवळ आल्यामुळे सैनिकांचा शिरच्छेद करणे हे मान्य आहे का? हे justification कसे काय होऊ शकते? हे निषेधार्ह वाटत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

हे जस्टिफिकेशन नव्हे अनेक

ऋषिकेश
Fri, 01/11/2013 - 09:54 नवीन
हे जस्टिफिकेशन नव्हे अनेक कारणआंपैकी एक महत्त्वाचे कारण आहे. फक्त मी नाही अनेक वृत्तपत्रांच्या कालच्या अग्रलेखात अनेकांना असेच वाटते आहे. अगदी पाकीस्तानातही थेट नाही तरी याचा निवडणुकांवर होणारा परिणाम अश्या आडमार्गाने हेच सुचवले जात आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अस

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 01/09/2013 - 14:56 नवीन
अस कसं? भारत पाकिस्तान सामने झाले नाहीत तर खेळ वाहिन्या, BCCI, सरकारी धेंड हे पैसे कसे कमवणार? बिचारे दारिद्र रेषेखाली जातील ना!! मग काय ते तुमच्या आमच्या सारख्या शुद्र सामान्य माणसां सारखे रेशनच्या लाइनीत उभे राहणार की काय? काहीतरी आपल तुमचं. त्या तिकडे कोपर्‍यातल्या बॉर्डरवर काय होतय याच्याशी त्यांना काही देण घेण नाहीये, तिथले ते सैनिक काही त्यांचे ग्राहक नाहीत.
  • Log in or register to post comments

१०० % अनुमोदन.

यशोधरा
Wed, 01/09/2013 - 15:38 नवीन
१०० % अनुमोदन. पाकिस्तानला कडी चेतावनी दिल्याची बातमी आलीच आहे. आता पुढे काही ठोस कारवाई करतील अशी आशा करावी का? की ठराविक जमातीचे लांगूलचालन करण्यासाठी, मतांसाठी सैनिकांच्या जिवांची किंम्मत शून्य ठरणार आहे? मागे इथेच मिपावर काही जणांनी सैनिकांचा तो जॉबच आहे, त्यात इतके काय वाटायचे हे म्हटल्याचेही आठवते. :( संताप, संताप झाला आहे जिवाचा!
  • Log in or register to post comments

निषेध

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/09/2013 - 16:22 नवीन
निषेध खलिते तयारच असतात आमच्याकडे, वर फक्त तारीख आणि विषय टाकतो आणि पाकिस्तान ला देतो पाठऊन. ते तिकडे हल्ली पेपर रोल विकत घेत नाहीत त्यामुळे असं ऐकीवात आहे.
  • Log in or register to post comments

पंतप्रधानांना कुठे ह्या

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 01/10/2013 - 09:09 नवीन
पंतप्रधानांना कुठे ह्या भारतात जन्म घेतला असे वाटुन गेले असावे,मला तरी असे वाटते कारण ते नेहमी डोक्याला हात लावुन बसलेले असतात्,बाकी हे कडक शब्दातले खलीते कसे असतात हो, नाही म्हणजे शब्द भिंतीवर कोरुन भिंतच मारुन नाहीना फेकत. (त्यांनी पण आपल्या दुताला कडक शब्दाचा खलिता दिला म्हणे)मागच्या धाग्यात कोणीतरी म्हटले की ,त्यांनी काहीबाहीकेले तरी आपल्या सैनिकांनी सीमेवर काय केले हे पेपरात कधीच छापुन येत नाही,@रणजीत चितळे साहेब तुम्हाला यातले काही माहीत आहे काय्?असल्यास आम्हा सांगा ना.
  • Log in or register to post comments

आपल्या सहिष्णु सरकारने

नानबा
गुरुवार, 01/10/2013 - 09:11 नवीन
आपल्या सहिष्णु सरकारने "investigation" च्या ऑर्डर्स दिल्या आहेतच. कसलं investigation करणार? आपल्या जवानाचं शिर कोण घेऊन गेला आणि त्याचा पाकिस्तानी सरकारने कसा सत्कार केला याचं? अर्थात आपल्या सरकारकडून अजून कसल्या अपेक्षा ठेवायच्या? जिथे आपल्याच देशातल्या मुलीवर अन्याय करणार्‍या आपल्याच देशातल्या गुन्हेगारांना पकडूनसुद्धा त्यांना शिक्षा करण्याची धमक या भ**** च्या गां*** नाही, तिथे बाहेरच्यांबद्दल हे काय उखडणार?
  • Log in or register to post comments

हुतात्मा झालेल्या भारतीय

पाषाणभेद
गुरुवार, 01/10/2013 - 09:48 नवीन
हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांना कडक सलामी. सदर घटना पाहून भारतीय राजकारण्यांचा निषेध करावा तितकाच थोडा आहे. अतिशय नेभळट, षंढ असल्या राज्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया पाहून या बुळ्या भारताकडून पाकिस्तानचे काहीच वाकडे होणार नाही याची खात्री वाटते. मी पाकिस्तान या देशाबद्दलच्या कोणत्याही मिडीयामध्ये येणार्‍या बातम्या वाचणे/ पहाणे/ ऐकणे कधीचेच सोडून दिले आहे.
  • Log in or register to post comments

बाकी या धाग्यावरच्या सगळ्याच

पिंपातला उंदीर
Wed, 05/20/2015 - 21:36 नवीन
बाकी या धाग्यावरच्या सगळ्याच प्रतिक्रिया विनोदी सदरात जमा होऊ शकतील . ५६ इंची पम्प्र आहेत पण परिस्थिती तीच आहे . काय म्हणाव याला ? सध्याचे पम्प्र कसे ? नेभळट का षंढ? का अजून कुणी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

पाकिस्तानात?

उपास
गुरुवार, 01/10/2013 - 10:09 नवीन
तिथे पाकिस्तानात काय म्हणतेय मिडिया? इथे पूर्वी काळे काका पाकिस्तानच्या वृत्तपत्रातले लेख अभ्यासून माहिती द्यायचे असं आठवतय (मी बरेच दिवस बेपत्ता असल्याने अजूनही ते इथे देतात का माहित नाही). हुतात्मा सैनिकांना सलाम - भारतिय नागरीकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो... तुमच्यासाठी..! सरकार काही करतय का याची वाट बघत हात चोळत बसायचं..
  • Log in or register to post comments

संताप संताप फक्त संताप

लीलाधर
गुरुवार, 01/10/2013 - 10:29 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हुतात्मा

चिरोटा
गुरुवार, 01/10/2013 - 10:36 नवीन
हुतात्मा झालेल्या जवानांना सलामी.सहज पाकिस्तानी वृत्तपत्र काय म्हणतात हे पाहिले- भारताने अजून यु.एन.मध्ये तक्रार नोंदवली नाही असे यु.एन.ने म्हंटले आहे. http://dawn.com/2013/01/10/un-says-no-complaint-received-over-kashmir-beheading/ भारत-पाकिस्तान संबंध हे न सुटणारे कोडे आहे.दावूद ईब्राहिमला नंबर एकचा शत्रु म्हणायचे पण त्याच्या मुलीच्या सासर्‍याला जावेद मियॉदादला व्हिसा द्यायचा आणि त्याचे समर्थन करायचे. सध्या निषेध नोंदवत आहेत.आणखी चार दिवसांनी दोघांचे हस्तांदोलन करतानाचे फोटो बघायचे.मग त्यांनी निषेधाचा खलिता पाठवायचा मग ह्यांनी अमन की आशा म्हणायचे.
  • Log in or register to post comments

होय हे असेच चालू राहणार, आपण

समयांत
गुरुवार, 01/10/2013 - 10:40 नवीन
होय हे असेच चालू राहणार, आपण त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

कणाहीन सरकारचा निषेध

नितिन थत्ते
गुरुवार, 01/10/2013 - 11:14 नवीन
हे सरकार नाहीसे केले पाहिजे. लष्कर ए शिवबा झोपा काढीत आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

कालची बातमी हादरवणारी आहे.

मदनबाण
गुरुवार, 01/10/2013 - 11:12 नवीन
कालची बातमी हादरवणारी आहे. वैमनस्य असलेल्या दोन राष्ट्रात चकमकी घडणे समजण्यासातखे आहे. मात्र रानटीपणे हल्ला करुन सैनिकांचे शिरच्छेद करणे व शिर कापून नेणे हे कसले द्योतक आहे? 'आम्ही काहीही केले तरी तुम्ही आमचे काही वाकडे करु शकणार नाही' हा माज त्यामागे आहे. आणि खरोखरच आपले सरकार निषेध खलिता पाठविण्यापलिकडे काही करणार नाही. उद्या कदाचित 'हे हल्लेखोर आमचे सैनिकच काय नागरीकही नव्हते' असा पवित्रा पाकिस्तान घेईल. साक्षीकाका फक्त कालचीच बातमी हादरवणारी नव्हती ! १५ मे १९९९ रोजी ४-जाट रेजिमेंटचे जवान (Captain Kalia & Arjun Ram, Bhanwar Lal Bagaria, Bhika Ram, Moola Ram and Naresh Singh )हे सर्व पाकिस्तान सैन्याच्या कैदेत अडकले. २२ दिवस हे त्यांच्या कैदेत होते,आणि जुन ९ १९९ ला पाकिस्तान लष्कराने त्यांचे मॄतदेह आपल्या सैन्याच्या ताब्यात दिले. त्यांच्या मॄतदेहांचे autopsy रिपोर्ट आल्या नंतर धक्कादायक गोष्टी जगा समोर आल्या !या सर्व जणांना भयानक यातना देउन ठार मारण्यात आले होते.त्यांचे डोळे काढण्याआधी फोडले,त्यांच्या कानात गरम सळ्या घातल्या,संपूर्ण शरीरावर सिगरेटचे चटके देण्यात आले,त्यांचे ओठ कापण्यात आले,जबड्यातले सर्व दात पाडण्यात आले,त्यांचे डोक्या (कवटी) सकट शरीरातली सर्व हाडे मोडली होती.इतर इंद्रियांबरोबर या सर्वांची जनन इंद्रिये सुद्धा या हैवान पाकड्यांनी कापुन टाकली होती.याच बरोबर मेंटल टॉर्चर देखील करुन झाले होते...शेवटी या सर्वांना गोळ्या घालण्यात आल्या ! {जरा या यातनांचा विचार करुन पहा,त्यांना ज्या खोलीत या यातना देण्यात आल्या त्यात यांचे आवाज किती वेळ घुमले असतील याचा देखील विचार करा}ही घटना घडली त्यावेळी कॅप्टन कालिया याचे वय होते फक्त २३ वर्ष ! आज १३ वर्ष होउन सुद्धा त्यांना कारगिल हिरो म्हणण्या पलिकडे आपण काहीही करु शकलो नाही ! :( कालियाचे वडील इतके वर्ष आपल्या मुलासाठी लढा देत आहे,तरी हाती काहीच गवसले नाही. आता ते युएन मधे दाद मागण्याची तयारी करत आहेत. काही दुवे :--- Capt Kalia’s father demands strong action against Pak Capt Saurabh Kalia's father says no hopes from Pakistan Kargil War hero Captain Saurabh Kalia's father approaches UN Saurabh Kalia जाता जाता :--- आपल्या मातॄभूमीसाठी बलिदान देणार्‍या जवांनाना जर आपले सरकार न्याय मिळवुन देउ शकत नसेल आणि देशातील नागरिकांना या बलिदानांचे महत्व कळत नसेल तर मग अशा आणि अनेक जवानांनी देश रक्षणाची सेवा कोणत्या कारणास्तव करावी ? पाकिस्तानच्या ह्या घॄणास्पद अमानविय वर्तनाकडे हिंदुस्थान सरकार गांभिर्याने पाहत नसल्याने याचा हिंदुस्थानी लष्कराच्या मनोबलावर अयोग्य परिणाम होत असुन...पाकिस्तानला बहुधा हेच साधणे अपेक्षित असावे ! असे मला वाटते.:(
  • Log in or register to post comments

सहमत...

गवि
गुरुवार, 01/10/2013 - 11:19 नवीन
सहमत... मात्रः
आज १३ वर्ष होउन सुद्धा त्यांना कारगिल हिरो म्हणण्या पलिकडे आपण काहीही करु शकलो नाही
याच्याशी असहमत. "कारगिल हीरोज" हे नाव वापरुन आदर्श बिल्डिंग उभी केली की.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सहमत आहे

रामपुरी
Sat, 01/12/2013 - 03:15 नवीन
"कारगिल हीरोज" हे नाव वापरुन आदर्श बिल्डिंग उभी केली की.." आरोपीतले २ चचले. हळूहळू सगळे ढगात जाऊन केस आपोआप बंद पडेल. फार नाही फक्त अजून १०-१५ वर्षे थांबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आपल्या मातॄभूमीसाठी बलिदान

पिंपातला उंदीर
Wed, 05/20/2015 - 21:37 नवीन
आपल्या मातॄभूमीसाठी बलिदान देणार्‍या जवांनाना जर आपले सरकार न्याय मिळवुन देउ शकत नसेल आणि देशातील नागरिकांना या बलिदानांचे महत्व कळत नसेल तर मग अशा आणि अनेक जवानांनी देश रक्षणाची सेवा कोणत्या कारणास्तव करावी ? पाकिस्तानच्या ह्या घॄणास्पद अमानविय वर्तनाकडे हिंदुस्थान सरकार गांभिर्याने पाहत नसल्याने याचा हिंदुस्थानी लष्कराच्या मनोबलावर अयोग्य परिणाम होत असुन...पाकिस्तानला बहुधा हेच साधणे अपेक्षित असावे ! असे मला वाटते.:( तुमचे हेच मत अजून पण कायम आहे का हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुमचे हेच मत अजून पण कायम आहे

मदनबाण
Fri, 05/22/2015 - 12:29 नवीन
तुमचे हेच मत अजून पण कायम आहे का हो ? ह्म्म... यापुढे पाकड्यांनी मस्ती केल्यास सध्याचे सरकार कसे रिअ‍ॅक्ट करते ते पाहुन झाल्यावर मतात बदल झाला तर होइल ! आपल्या सौनिकांची होणारी विटंबना आता सहन करण्या पलिकडे आहे हे आपल्या सैन्याने आणि सरकारनेच दाखवुन ध्यावयास हवे नाही का ?

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

आक्रोश

पैसा
गुरुवार, 01/10/2013 - 11:33 नवीन
तुमचा आमचा आक्रोश कोणाच्या कानावर पडणार आहे? Image removed. कभी वो दिन भी आयेगा, कि जब आजाद हम होंगे, ये अपनी ही जमीं होगी, ये अपना आसमां होगा, शहीदों कि चिताओं पर, लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का, यही नामों-निशां होगा.
  • Log in or register to post comments

तुमचा आमचा आक्रोश कोणाच्या कानावर पडणार आहे?,,,,

सलिल २४
Mon, 01/14/2013 - 13:57 नवीन
हे अगदी खरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बनाना रिपब्लिक

श्रीगुरुजी
गुरुवार, 01/10/2013 - 12:33 नवीन
पाकिस्तानने कितीही क्रूर कृत्ये केली, कितीही अतिरेकी हल्ले केले, कितीही बॉम्बस्फोट केले तरिही भारताची प्रतिक्रिया निषेधाचे खलिते पाठविण्याकडे जात नाही. गेल्या २०-२५ वर्षातले ठळ्क प्रसंग आठविले तरी अंगाची लाहीलाही होते. (१) १९९३ मध्ये दाउद इब्राहिम, टायगर मेमन इ. ना पैसा, बॉम्ब, शस्त्रे पुरवुन पाकिस्तान्यांनी मुम्बईत बॉम्बस्फोट घडवून आणून जवळपास ३०० लोक मारले. त्यानंतर या सर्व अतिरेक्यांना आजतगायत पाकिस्तानने राजाश्रय दिलेला आहे. भारताची कारवाई - दाउदला आमच्या ताब्यात द्या अशी २-३ वर्षातून एकदा मागणी करणे. पाकिस्तानचा प्रतिसाद - भारताच्या मागणीला केराची टोपली दाखविणे. (२) कारगिल, द्रास इ. भागात मे १९९९ मध्ये घुसखोरांच्या वेषात सैनिक घुसवून पाकिस्तानने भारताचा भाग बळकाविण्याचा प्रयत्न केला. भारताची कारवाई - हवाई हल्ले करून सीमा न ओलांडता भारताने घुसखोर सैनिकांना हाकलून लावून आपला भाग मुक्त केला. यात भारताला ४०० सैनिकांचे बलिदान द्यावे लागले तर पाकड्याचे अंदाजे १००० सैनिक मेले. (३) याच युद्धात युध्दकैदी म्हणून पकडलेल्या कॅ. सौरभ कालिया व इतर ५ जणांना पाकच्या सैनिकांना अतिशय रानटी व अमानवी पद्धतीने हालकाल करून ठार मारले. भारताची कारवाई - पाकिस्तानला निषेध खलिता पाठविला. पाकिस्तानचा प्रतिसाद - भारताच्या निषेध खलित्याला केराची टोपली दाखविली. (४) डिसेंबर १९९९ मध्ये पाकिस्तानने कट आखून अतिरेक्यांच्या सहाय्याने नेपाळमधून इंडियन एअरलाइन्सचे विमान अपहरण करून अफगाणिस्तानमध्ये नेले. भारताला १६० प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी मसून अझर व इतर २ अतिरेक्यांना सोडावे लागले. हे तीनही अतिरेकी व विमान पळविणारे ५ चाचे पाकिस्तानात सुखरूप आहेत. भारताची कारवाई - पूर्वीचाच निषेध खलिता तारीख-वार बदलून दिला. पाकिस्तानचा प्रतिसाद - भारताच्या निषेध खलित्याला केराची टोपली दाखविली. (५) २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी लष्कराने १० प्रशिक्षित अतिरेक्यांना मुम्बईत पाठवून धुमाकूळ घातला. भारताने त्यातल्या ९ जणांना कंठस्नान घातले व एकाला जिवंत पकडून नुकतेच फाशी दिले. पण त्यापूर्वी तब्बल २०० जणांचा जीव गेला होता. भारताची कारवाई - जुना निषेध खलिता २६ नोव्हेंबर २००८ ही तारीख टाकून दिला व या हल्ल्याचा सूत्रधार सईद हाफिजला आमच्या ताब्यात द्या अशी २-३ वर्षातून एकदा मागणी करणे. पाकिस्तानचा प्रतिसाद - भारताच्या मागणीला व निषेध खलित्याला केराची टोपली दाखविली. (६) ०८ जानेवारी २०१३ - पाकिस्तानी सैन्याने सीमारेषा ओलांडून भारतीय हद्दीत येऊन हल्ला करून २ सैनिकांना मारून त्यांचे शिर कापून नेले. भारताची कारवाई - जुनाच निषेध खलिता ०८ जानेवारी २०१३ ही तारीख टाकून दिला. पाकिस्तानचा प्रतिसाद - भारताच्या निषेध खलित्याला केराची टोपली दाखविली. या ठळ्क घटना आहेत. अशा इतर असंख्य घटना आहेत. प्रत्येकवेळी घटना घडल्यावर भारताची कारवाई व त्या कारवाईवर पाकिस्तानचा प्रतिसाद हा अत्यंत निरर्थक स्वरूपाचा आहे. भारत आपल्याविरूद्ध साधे डोळे सुद्धा वटारू शकत नाही याची पाकिस्तानला खात्री असल्याने पाकिस्तान असे प्रकार करतच राहणार आणि आपण निषेधाचे खलिते पाठविण्यापलिकडे काहीही करणार नाही. "भारत हे एक बनाना (लेचेपेचे) रिपब्लिक आहे" असे काही लोकांचे मत वाचले होते. भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या दुबळ्या प्रतिसादाने हे अनेकवेळा सिद्ध केले आहे.
  • Log in or register to post comments

या ठळ्क घटना आहेत. अशा इतर

पिंपातला उंदीर
Wed, 05/20/2015 - 21:41 नवीन
या ठळ्क घटना आहेत. अशा इतर असंख्य घटना आहेत. प्रत्येकवेळी घटना घडल्यावर भारताची कारवाई व त्या कारवाईवर पाकिस्तानचा प्रतिसाद हा अत्यंत निरर्थक स्वरूपाचा आहे. भारत आपल्याविरूद्ध साधे डोळे सुद्धा वटारू शकत नाही याची पाकिस्तानला खात्री असल्याने पाकिस्तान असे प्रकार करतच राहणार आणि आपण निषेधाचे खलिते पाठविण्यापलिकडे काहीही करणार नाही. "भारत हे एक बनाना (लेचेपेचे) रिपब्लिक आहे" असे काही लोकांचे मत वाचले होते. भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या दुबळ्या प्रतिसादाने हे अनेकवेळा सिद्ध केले आहे. @गुर्जी आता काय म्हणे आहे तुमचे ? मे २०१४ नंतर सीमेवर जीव गमावलेल्या जवानाबद्दल . आणि हो त्याचवेळेस मोदिनी शरीफ यांच्या आईला साडी पाठवल्याबद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आताच बी रामन यांचा लेख वाचला.

श्रीगुरुजी
गुरुवार, 01/10/2013 - 12:57 नवीन
आताच बी रामन यांचा लेख वाचला. असे कितीही प्रकार घडले तरी पाकड्यांशी चर्चा चालूच ठेवावी व उगाच भावनेच्या भरात कारवाई करू नये अशा त्यांचा सल्ला आहे. हे वाचून हसू आले आणि खेदही वाटला. गेली ६५ वर्षे हे चर्चेचे गुर्‍हाळ सुरू आहे. त्यातून आजतगायत काहीही, कणभरसुद्धा सकारात्मक निष्पन्न झालेले नाही. तरीसुद्धा चर्चा सुरूच ठेवायची! मुळात पाकिस्तानला भारताशी सुरळीत संबंध हवे आहेत का याचा कधी आढावा घेतला आहे का? याबाबतीत गेल्या ६५ वर्षांचा काय अनुभव आहे? एवढे होऊनसुद्धा कारवाई न करता शांत बसायचे! का तर म्हणे चर्चेत अडथळा नको. काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवरील एका चर्चेत एक पाकिस्तानप्रेमी (जतीन देसाई) असेच तारे तोडत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानशी भारताने क्रिकेट खेळू नये असे म्हणणारे भारतीय व तालिबानी यांच्यात काहीच फरक नाही. असे म्हणण्यातच त्यांच्या एकंदरीत सारासारविवेकबुद्धीची कल्पना आली. मुम्बईत पाकिस्तानशी सामने होत नसल्याने क्रिकेटरसिक पाकड्यांचा बहारदार खेळ पहायला मुकले आहेत असा यांचा दावा आहेत. बहुसंख्य पाकड्यांना भारताविषयी खूप प्रेम आहे म्हणे. हे असलं पूतनामावशीचं प्रेम काय कामाचं? भारत व पाकिस्तानची संस्कृती समान आहे म्हणे. पाकडे मूर्तीभंजक तर भारतीय मूर्तीपूजक, पाकडे गोभक्षक तर भारतात गोभक्षकांची संख्या खूप कमी, पाकिस्तानमध्ये बहुतेक काळ लष्करशाही तर भारतात त्याच्या उलटे, पाकिस्तान अतिरेक्यांना मदत देणारा व आश्रय देणारा तर भारत त्याच्या उलटा! पाकिस्तानची राज्यघटना इस्लामाधारित तर भारताची राज्यघटना निधर्मी, पाकिस्तानी हा अधिकृत इस्लामी देश तर भारत अधिकृत निधर्मी देश. पाकिस्तान सतत भारतात अतिरेकी हल्ले करत असतो तर भारत फक्त निषेधाचे खलिते पाठवितो. काय डोंबलाचं साम्य आहे या दोन देशात? काय बोलावं अशा माणसापुढे! असे शरीराने भारतात पण मनाने व विचारांनी पाकिस्तानी असलेले अनेक तथाकथित निधर्मांध भारतात आहेत हे भारताचं दुर्दैव!
  • Log in or register to post comments

काही दिवसांपूर्वी

पिंपातला उंदीर
Wed, 05/20/2015 - 21:43 नवीन
काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवरील एका चर्चेत एक पाकिस्तानप्रेमी (जतीन देसाई) असेच तारे तोडत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानशी भारताने क्रिकेट खेळू नये असे म्हणणारे भारतीय व तालिबानी यांच्यात काहीच फरक नाही. असे म्हणण्यातच त्यांच्या एकंदरीत सारासारविवेकबुद्धीची कल्पना आली. मुम्बईत पाकिस्तानशी सामने होत नसल्याने क्रिकेटरसिक पाकड्यांचा बहारदार खेळ पहायला मुकले आहेत असा यांचा दावा आहेत. बहुसंख्य पाकड्यांना भारताविषयी खूप प्रेम आहे म्हणे. हे असलं पूतनामावशीचं प्रेम काय कामाचं? भारत व पाकिस्तानची संस्कृती समान आहे म्हणे. पाकडे मूर्तीभंजक तर भारतीय मूर्तीपूजक, पाकडे गोभक्षक तर भारतात गोभक्षकांची संख्या खूप कमी, पाकिस्तानमध्ये बहुतेक काळ लष्करशाही तर भारतात त्याच्या उलटे, पाकिस्तान अतिरेक्यांना मदत देणारा व आश्रय देणारा तर भारत त्याच्या उलटा! पाकिस्तानची राज्यघटना इस्लामाधारित तर भारताची राज्यघटना निधर्मी, पाकिस्तानी हा अधिकृत इस्लामी देश तर भारत अधिकृत निधर्मी देश. पाकिस्तान सतत भारतात अतिरेकी हल्ले करत असतो तर भारत फक्त निषेधाचे खलिते पाठवितो. काय डोंबलाचं साम्य आहे या दोन देशात? काय बोलावं अशा माणसापुढे! असे शरीराने भारतात पण मनाने व विचारांनी पाकिस्तानी असलेले अनेक तथाकथित निधर्मांध भारतात आहेत हे भारताचं दुर्दैव! गुर्जी आता होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सिरीज बद्दल काय मत आहे तुमचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

जे झाले ते अतिशय भयानक आणि

खबो जाप
गुरुवार, 01/10/2013 - 13:03 नवीन
जे झाले ते अतिशय भयानक आणि निषेधार्त आहेच , पण सगळ्यात दुख हे आहे कि आमच्या पंतप्रधानाच्या किव्हा परराष्ट्र मंत्र्याच्या गां%$# थोडा सुधा दम नाही ती इटलीची बाई आणि तो सो called युथ आईकॉन कुठे गाढवाच्या गां$%$^ गेलेत कोण जाणे, आता बोला ना कुठे गेले तुमचे देश प्रेंम. आपल्या कडे
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=CeGcQkkQYKQ
(लिंक कॉपी पेष्ट करा ) होत असताना आणखी पाकड्यानी त्रास द्यायची गरज काय ? ह्याच्या मध्ये हिंदुनो जागे व्हा म्हटले आहे पण जागे होण्याची गरज सगळ्यांनाच आहे.
  • Log in or register to post comments

मता

ऋषिकेश
गुरुवार, 01/10/2013 - 13:04 नवीन
एक प्रश्न पडतो.. भारत करतोय ते इतक्या जणांना चुकीचे वाटतेय तर भारताने सद्यस्थितीत काय करावे ज्यामुळे हा प्रश्न 'हमखास' आणि 'कायमचा' (किमान पुढील ५० वर्षे) सुटेल असे तुम्ही सुचवाल? (हा प्रश्न कोणा एकाला नसून भारत सरकारच्या सध्याच्या प्रतिसादाने कावलेल्या सगळ्यांनाच आहे)
  • Log in or register to post comments

कमीत कमी पाकीस्तान हे एक शत्रुराष्ट्र आहे

लाल टोपी
गुरुवार, 01/10/2013 - 18:59 नवीन
एवढी तरी जाणीव करून देऊन चर्चेचे त्याच्याशी गु-हाळ थांबवले पाहिजे. खेळ सांस्कृतिक कार्यक्रम हे शत्रुंबरोबर नाहीत आणि आमची काही ताकद आहे हे तरी दाखवले पाहिजे. मोदक साहेबांचे इस्त्राईल वरचे लेख वाचून त्याच्या एक दशांश जरी आपण करु शकलो तर भारतीय असल्याचा अभिमान बाळगावा असं काही केल्यासारखे वाटेल पण हे भारताच्या कोणत्याही पक्षाच्या सरकारच्या आवाक्यात आहे असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

भारताने सद्यस्थितीत काय करावे ?

विकास
Fri, 01/11/2013 - 00:30 नवीन
चेपुवर कोणीतरी टाकलेला उपाय: USA -If u attack us, we will attack u ISRAEL-If u attack us, we will demolish u INDIA - "If u attack us, we will not play Cricket with U .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

पाकिस्तानशी स्ंबंध तोडा

श्रीगुरुजी
गुरुवार, 01/10/2013 - 13:06 नवीन
सद्यपरिस्थितीत पाकिस्तानशी संपूर्ण राजनैतिक संबंध तोडणे, सीमा बंद करणे, दिल्ली-लाहोर रेल्वे-बस इ. बंद करणे, पाकिस्तानी विमानांना भारतीय प्रदेशावरून उडण्यास बंदी घालणे, पाकिस्तानशी सर्व आर्थिक व्यवहार संपूर्ण बंद करणे, पाकिस्तानशी सांस्कृतिक्/क्रीडा इ. संबंध बंद करणे, झेलम/सतलज इ. नदीतून पाणी सोडणे बंद करणे आणि भारतात ठाण मांडून बसलेल्या अदनान सामी, सलमा आगा इ. पाकड्यांना भारतातून हाकलून देणे इ. उपाय करावे असे मला वाटते. त्याचबरोबरीने जगभर पाकिस्तानच्या क्रूर वागणूकीविरूद्ध आवाज उठवून पाकिस्तानला एकटे पाडणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

पहिले सगळे उपाय केल्यानंतर जी

ऋषिकेश
गुरुवार, 01/10/2013 - 13:15 नवीन
पहिले सगळे उपाय केल्यानंतर जी परिस्थिती होती ती भारत-पाकिस्तानात अनेकद आली आहे पण त्यामुळे मुळ प्रश्न सुटला आहे असे वाटत नाही
त्याचबरोबरीने जगभर पाकिस्तानच्या क्रूर वागणूकीविरूद्ध आवाज उठवून पाकिस्तानला एकटे पाडणे आवश्यक आहे.
म्हंजे? त्यासाठी काय करावे? भारत आपली भुमिका जागतिक मंचावर मांडतोच. त्यापलिकडे या प्रश्नाला दोन-देशांप्मधील आपापसातील प्रश्न ही भुमिका बदलून मध्यस्थास मान्य करावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

"पहिले सगळे उपाय केल्यानंतर

श्रीगुरुजी
गुरुवार, 01/10/2013 - 13:23 नवीन
"पहिले सगळे उपाय केल्यानंतर जी परिस्थिती होती ती भारत-पाकिस्तानात अनेकद आली आहे पण त्यामुळे मुळ प्रश्न सुटला आहे असे वाटत नाही" त्याचे कारण असे असे उपाय एकदाच म्हणजे २००२ साली फक्त काही महिने अतिशय मर्यादित स्वरूपात केले होते व त्याचे बरेवाईट परिणाम दिसायच्या आतच ते उपाय थांबविले गेले. पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबध तोडणे, सीमा सील करणे, सीमा ओलांडू पाहणार्‍यांना जागेवरच गोळ्या घालणे व धरणांचे पाणी अडविण्यासारखे उपाय किमान ३-४ वर्षे तरी करणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

सद्यपरिस्थितीत पाकिस्तानशी

पिंपातला उंदीर
Wed, 05/20/2015 - 21:45 नवीन
सद्यपरिस्थितीत पाकिस्तानशी संपूर्ण राजनैतिक संबंध तोडणे, सीमा बंद करणे, दिल्ली-लाहोर रेल्वे-बस इ. बंद करणे, पाकिस्तानी विमानांना भारतीय प्रदेशावरून उडण्यास बंदी घालणे, पाकिस्तानशी सर्व आर्थिक व्यवहार संपूर्ण बंद करणे, पाकिस्तानशी सांस्कृतिक्/क्रीडा इ. संबंध बंद करणे, झेलम/सतलज इ. नदीतून पाणी सोडणे बंद करणे आणि भारतात ठाण मांडून बसलेल्या अदनान सामी, सलमा आगा इ. पाकड्यांना भारतातून हाकलून देणे इ. उपाय करावे असे मला वाटते. मोदी सरकारने या उपाय योजना तातडीने अमलात आणल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काश्मिर व पंजाबमधून

श्रीगुरुजी
गुरुवार, 01/10/2013 - 13:08 नवीन
काश्मिर व पंजाबमधून पाकिस्तानमध्ये वाहणार्‍या नद्यांचे पाणी भारताने अडवून ठेवले तर पाकिस्तान नाक मुठीत धरून शरण येईल. हा अत्यंत प्रभावी उपाय ठरेल.
  • Log in or register to post comments

या उपायाने जगाची सहानुभुती

ऋषिकेश
गुरुवार, 01/10/2013 - 13:13 नवीन
या उपायाने जगाची सहानुभुती आणि पाठींबा आपल्याला आहे तो आपण गमाव असे वाटत नाही का? का त्याची पर्वा करु नये असे वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नेमकी काय सहानुभूती आणि पाठिंबा आहे?

आनन्दा
गुरुवार, 01/10/2013 - 14:29 नवीन
शब्दिक सहानुभूतीपलिकडे जगाने कृती केल्याचे उदाहरण दाखवता का? जग सहानुभूतीवर चालत नाही... आर्थिक/ सामाजिक/ सामरिक हितसंबंधांवर चालते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

पोखरण२

विकास
गुरुवार, 01/10/2013 - 22:16 नवीन
पोखरण२ च्या वेळेस देखील जगाचा पाठींबा गेला अशी बोंब झाली होती. पण पुढचा इतिहास माहीत आहेच. अगदी ज्या अमेरीकेने राळ उठवली, त्याच अमेरीकेने त्यानंतरच्या काळात जास्तच आउटसोरर्सिंग पण केले आणि घनिष्ट राजनैतिक संबंध देखील. तेच अण्वस्त्रांविरोधातल्या जपानने देखील केले होते... वनानी दहतो वन्ही, सखा भवती मारूतः सएव दिपनाशाय कृशे कश्चास्ती सौहृदम्. (भावार्थ: जंगलात लागलेल्या वणव्याला वाढण्यास मदत करणारा वारा, हा लहानसा दिवा मात्र फुंकरेने विझवतो, थोडक्यात दुर्बळाला कोणी मित्र असतो का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

आडवायचे आणि पाकडे बोंबा

खबो जाप
गुरुवार, 01/10/2013 - 13:18 नवीन
आडवायचे आणि पाकडे बोंबा मारायला लागले कि सगळे सोडून द्याचे , असेच करायची तयारी चीन पूर्वेकडे करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

झाल का हो गुर्जी हे गेल्या

पिंपातला उंदीर
Wed, 05/20/2015 - 21:46 नवीन
झाल का हो गुर्जी हे गेल्या वर्षात ? : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कोणत्याही राष्ट्राला

श्रीगुरुजी
गुरुवार, 01/10/2013 - 13:17 नवीन
कोणत्याही राष्ट्राला स्वसंरक्षण करण्याचा हक्क आहे. भारत असे करण्याने जगाची सहानूभूती गमावेल असे वाटत नाही. भारत अतिरेक्यांपासून पोळतो आहे हे सर्व जगाला माहिती आहे व भारताचा प्रतिसाद अत्यंत मिळमिळीत आहे याचीही जगाला कल्पना आहे. हा उपाय करताना अमेरिका, रशिया, इंग्लंड इ. प्रभावी देशांशी बोलूनच त्यांचे मत आपल्याविरूद्ध जाणार नाही याची खात्रीदेखील करून घेणे आवश्यक आहे. परंतु त्यांच्या संमतीने किंवा संमतीशिवाय भारताला असे कठोर उपाय योजावेच लागतील.
  • Log in or register to post comments

घटनेला 'वाजवीपेक्षा अधिक' फुगवण्यात फारासे हशील दिसत नाही.

ऋषिकेश
गुरुवार, 01/10/2013 - 14:17 नवीन
सत्य परिस्थिती माहित नसताना सरकारच्या नावाने त्रागा (जो इतर अनेकदा रास्त असेलही) करणे घाईचे ठरू शकते. केवळ भारतीय इलेक्ट्रॉनिकमिडीयाच्या वार्तांकनावरून मते बनवणे अधिकाधिक धोक्याचे होत चालले आहे असे वाटते. आता बाहेर येत असलेल्या माहितीनूसार घटनाक्रम असा आहे: (संदर्भ : द हिंदु मधील ही बातमी) -- एका भारतीय महिलेच्या पाकव्याप्त काश्मिरमध्ये जायच्या प्रयत्नाने सचेत होऊन भारताने LOC वर गावकर्‍यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी खंदकाचे बांधकाम करून सीजफायर करारातील 'या भोवती कोणतेही बांधकान न करण्याच्या अटीचे' उल्लंघन केले होते. -- त्यावर पाकिस्तानी सैनिक अग्रेसीव झाले आणि त्यांनी काहि वेळा सुचना दिल्या, नंतर लाऊडपीकरवर सुचना देऊन गोळीबार केला. -- त्यानंतर झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने हल्ला केला असे पाकचे म्हणणे आहे तर भारत त्याला नकार देतो पण त्या चकमकीत पाकिस्तानचा एक सैनिक मारला गेला -- त्याला पाकिस्तानच्या सैन्याने उत्तर द्यायचे ठरवले व झालेल्या चकमकीत दोन भारतीय जवान ठार झाले. एका भारतीय लष्करी अधिकार्‍याने म्हटल्याप्रमाणे अश्या चकमकी आणि हल्ले आवेशात होत असतात. भारतीय सैन्याला LOC ओलांडायची आज्ञा नसताना तसा प्रकार कधी होतो तसेच पाकिस्तानी सैनिकआंकडून होते. या घटनेला 'वाजवीपेक्षा अधिक' फुगवण्यात फारासे हशील दिसत नाही. आता या घटनाक्रमावरही आणि त्यातून उद्भवणार्‍या बर्‍याच सार्थ प्रश्नांवरही चर्चा होईलच, पण अश्या घटनेसाठी भारताच्या वाजपेयींपासूनच्या प्रयत्नांना सोडून द्यावे असे वाटत नाही. बाकी चालु दे..
  • Log in or register to post comments

पण मग देहाची विटंबना /

गवि
गुरुवार, 01/10/2013 - 14:31 नवीन
पण मग देहाची विटंबना / मृत्यूपूर्वी छळ हे सर्व विकृत आहेच ना? हे तरी खरं आहे ना? की तेही पाकिस्तानी सैनिक नव्हतेच? कुठेतरी आपल्या लष्कराच्या व्हर्शनवर विश्वास ठेवावा लागेल. अर्थातच त्यावर करण्याचे उपाय हे लष्करप्रमुख आणि राज्यकर्त्यांच्या स्कोपमधे आहेत आणि बर्‍याचशा गोष्टी ते जाणत असतील ज्या त्यांच्या निर्णयप्रक्रियेत अपरिहार्यपणे विचारात घ्याव्या लागत असतील. बर्‍याचशा गोष्टी / खरं चित्र (लार्जर पिक्चर) आपल्यापर्यंत पोचणं शक्यच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

पण मग देहाची विटंबना /

ऋषिकेश
गुरुवार, 01/10/2013 - 15:25 नवीन
पण मग देहाची विटंबना / मृत्यूपूर्वी छळ हे सर्व विकृत आहेच ना? हे तरी खरं आहे ना? की तेही पाकिस्तानी सैनिक नव्हतेच? कुठेतरी आपल्या लष्कराच्या व्हर्शनवर विश्वास ठेवावा लागेल.
होय हे विकृत आहे आणि याचा निषेध योग्य त्या पातळीवर झालाच पाहिजे. इतकेच नाही तर सर्वत्र व्यक्त झालेला उद्वेगही बर्‍याच अंशी सार्थ असला तरी काहिशा भडक वार्तांकनावर आधारित आहे. आणि मग अश्या वार्तांकनाची प्रतिक्रीया जनतेत 'त्या देशाशी संबंध तोडून टाका' अशी झाली तर नवल नाही. दुसरे असे की आपल्या वाजवीपेक्षा अधिक उचललेल्या पावलांचा फायदा घेऊन पाकिस्तान हा प्रश्न आंतरराष्ट्रीय करु पाहणार असेल तर ते किती ताणावे याचाही सरकारला विचार करावा लागेल. आपले सरकार किंवा राजकीय नेते एरवी कसेही असले/नसले तरी अश्या प्रश्नात लष्कर, गुप्तहेर, विविध ज्येष्ठ तज्ज्ञ अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करूनच पावले उचलत असणार यावरही विश्वास ठेवायला हवा (आणि तसा इतिहासही आहे, सरकारे बदलली मार सर्वपक्षीय सरकारने या बाबतीतले धोरण बदललेले नाही हे ही लक्षात घ्यायला हवे). शिवाय इतिहासात बघता आपल्या राजकीय नेत्यांनी युद्धातील देशाच्या पराभवाच्या जबाबदारीपासूनही पळ काढलेला नाही, तेव्हा फक्त राजकीय नेत्यांनाच आनि सरकारला किती झोडपायचे हे ही ज्याने त्याने ठरवावे इतकेच. आणि राजकीय नेतेच नही तर जेव्हा लष्कराचे अधिकार सांगतात की अश्या घटना एरवीही होतात, यावेळी त्यातील विकृतपणाची तक्रार केली आहेच, मात्र त्याहून अधिक ताणायला, त्यावर अधिक प्रखर तेही बोलायला तयार नाहीत त्यातच ते बरेच काही सांगून जातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

"दुसरे असे की आपल्या

श्रीगुरुजी
गुरुवार, 01/10/2013 - 21:03 नवीन
"दुसरे असे की आपल्या वाजवीपेक्षा अधिक उचललेल्या पावलांचा फायदा घेऊन पाकिस्तान हा प्रश्न आंतरराष्ट्रीय करु पाहणार असेल तर ते किती ताणावे याचाही सरकारला विचार करावा लागेल. " हा पाकिस्तान-भारत संबंध हे भारत-पाकिस्तानच्या जन्मापासून म्हणजे जवळपास १९४७ पासूनच आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहेत. त्यामुळे यात नव्याने आंतराराष्ट्रीय होण्यासारखे काहीही नाही. आणि तसे झाले तरी भारताने आंतरराष्ट्रीय दडपण झुगारण्याचे ठरविले पाहिजे किंवा मग पाकडे जे करतील ते निमूटपणे ऐकून घेतले पाहिजे. जर पाकिस्तानशी संबंध तोडणे आततायी किंवा भावनेच्या भरात केलेली कृती वाटत असेल, तर भारताला अजून वेगळ्या कृती करता येतील. (१) शांतता चर्चेचे गुर्‍हाळ सुरू ठेवणे. (२) पाकिस्तानला गाजावाजा न करता जशास तसे उत्तर देणे. म्हणजे सैनिकांना सैनिकांचा वेष न देता इतर वेषात गुपचूप सीमा ओलांडायला लावून सीमेजवळील पाकड्यांच्या ठाण्यावर अधूनमधून हल्ले करून परत येणे. असे हल्ले झाल्यावर ते आम्ही केलेच नाहीत असे सांगून काखा वर करणे. (३) पाकिस्तानमधील फुटिरतावादी संघटनांना (बलुचिस्तान, पख्तुनिस्तान व सिंध प्रांत स्वतंत्र देश करू पाहणार्‍या फुटिरतावादी संघटना) भारताने गुपचुप आर्थिक व शस्त्रास्त्रांची मदत द्यावी. असे करण्याची क्षमता फक्त इंदिरा गांधींमध्येच होती. नरसिंहराव व वाजपेयी हे देखील २००१ पर्यंत अफगाणिस्तानमधील कट्टर तालिबानविरोधी असलेल्या अह्मदशहा मसूद या पंजशीर खोर्‍यातल्या ताजिक नेत्याला शस्त्रे व आर्थिक मदत देत होते. आता पाकिस्तानी फुटिर संघटनांना तशीच मदत करण्याची वेळ आली आहे, जेणेकरून पाकचे विभाजन होण्याची शक्यता वाढेल व पाकिस्तान अंतर्गत भांडणांनी दुबळा होईल. (४) आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण पाकिस्तानी साहसवादाचे बळी आहोत व आपण कसा संयम पाळत आहोत असे कायम सांगत राहून आंतरराष्ट्रीय मत आपल्या बाजूने जरी आले नाही तरी विरूद्ध जाणार नाही यासाठी प्रयत्न करणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

एक गंमत वाटली २,३ भारत करत

ऋषिकेश
Fri, 01/11/2013 - 09:57 नवीन
एक गंमत वाटली २,३ भारत करत असेल तर आपल्याला कसे कळेल? पाकिस्तान तर नेहमी बोलत असते की खलिस्तानी फुटिरवाद्यांना भारत मदत करतो म्हणून. जर हे गुप्त असेल तर ते गुप्तच रहावे नाही का? बाकी, तुमच्या पर्यायांपैकी १ व ४ प्रत्येक सरकार करत असतेच आणि ते योग्य आहेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

थोडीशी चुक आहे.

अमोल खरे
Fri, 01/11/2013 - 10:04 नवीन
थोडीशी चुक आहे. खलिस्तानवाद्यांना पाकिस्तान मदत करतो. भारत सिंध- बलुचिस्तान मधील लोकांना मदत केल्याचा आरोप होतो बहुदा. हा आरोप खरा असेल तर प्रचंड आनंदाची गोष्ट आहे. कोणत्याही पद्धतीने पाकिस्तानला संपवायलाच हवं. सापाला ठेचायलाच लागतं. त्याच्याशी चर्चा करत बसण्यात सेन्स नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

बरोबर. बलुचिस्तान! आभार!

ऋषिकेश
Fri, 01/11/2013 - 10:11 नवीन
बरोबर. बलुचिस्तान! आभार! बाकी "त्याच्याशी चर्चा करत बसण्यात सेन्स नसतो." याबद्दल असहमत.. पण ते असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

केनेडी

क्लिंटन
Fri, 01/11/2013 - 13:08 नवीन
बाकी "त्याच्याशी चर्चा करत बसण्यात सेन्स नसतो." याबद्दल असहमत.. पण ते असो.
+१. याविषयी जॉन केनेडी म्हणाले होते:"Let us not negotiate out of fear but let us not fear to negotiate".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा