बदकांचे फोटो . . .

हुकुमीएक्का's picture
हुकुमीएक्का in कलादालन
5 Dec 2012 - 12:07 am

आजच मी आणि 'चौकटराजा' साहेब पवना डॅम ला फिरायला गेलो होतो. . . तेथील हे फोटो आहेत . . . आपल्या सर्व मि. पा. करांच्या आधीच्या सुचना वाचूनच नवीन लेखन करीत आहे . . .

.

.

.

.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

गणपा's picture

5 Dec 2012 - 12:48 am | गणपा

फोटो छान आलेत.

एक सामान्य मिपाकर म्हणून फुकाचा सल्ला देत आहे. (मानायलाच हवा असा आग्रह नाही.)
अति तेथे माती हे लक्षात असु द्या. दिवसा गणिक धागे काढत राहिलात तर आज जे डोक्यावर घेतात तेच उद्या टोमणे मारायला कमी करणार नाहीत. तेव्हा जरा दमानं घ्या.
जरा इतरांचं ही लेखन वाचा त्यावर आपले अभिप्राय नोंदवा.

जेनी...'s picture

5 Dec 2012 - 3:08 am | जेनी...

गम्पा काकाचा सल्ला बहुमोलाचा हाय हुक्कु हाय हुक्कु हाय हाय =))
मी पण बर्‍याचदा मिपाकरांच्या डोक्यावरुन पाडली गेलिय :-/
पण तरिहि पून्हा उठुन जोमाने त्यांच्या डोक्यावर मिर्‍या वाटायचं काम करते :)
असो ,
हा आमचा एक परिवार आहे . थट्टा मस्करी सोबत भावुक हळवे बोलहि तुम्हाला इथेच
वाचायला मिळतिल . तेव्हा स्वताहाबद्दलचं स्वताहा बनवलेलं मत आमच्या नजरेतुन
पारखुन घ्यायची संधी सोडु नका :)
आता अवांतर : मला २ रा फोटो आवडला . :)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2012 - 7:23 am | अत्रुप्त आत्मा

@तेव्हा स्वताहाबद्दलचं स्वताहा बनवलेलं मत आमच्या नजरेतुन
पारखुन घ्यायची संधी सोडु नका>>> =)) बालिका बाजारउठवेकर =))

जे अवांतर ते इथे मुद्द्याचे बनत आहे,
जे अवांतर ते इथे गुद्द्याचे बनत आहे,
जे अवांतर ते इथे सध्याचे बनत आहे,
जे अवांतर ते इथे खाद्याचे बनत आहे

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2012 - 8:06 pm | अत्रुप्त आत्मा

@अव्वा-अंतर->>>वाहव्वा...! प्यारे जी ,आपल्या प्रतिभेला फुट लेली सुधारणावादाची पालवी वट वृक्षात रुपांतरित होवो,,,हीच त्या वट वृक्षाचे पानंही स्व-इच्छेशिवाय हलू न देणार्‍या जगन्नियंत्याकडे प्रार्थना

प्यारे१'s picture

5 Dec 2012 - 10:37 pm | प्यारे१

कसचं कस्चं.... आपल्यासारख्या थोरामोठ्यांचे आशिर्वाद म्हणून हे असलं सुचायला लागलंय... ;)

२रा व ३रा आवडले. ३रा जास्त आवडला.

दादा कोंडके's picture

5 Dec 2012 - 1:35 am | दादा कोंडके

आपल्या सर्व मि. पा. करांच्या आधीच्या सुचना वाचूनच नवीन लेखन करीत आहे . . .

लेखन कुठं आहे?

लंबूटांग's picture

5 Dec 2012 - 3:50 am | लंबूटांग

EXIF data दिल्यास माझ्यासारख्या नवशिक्यांना खूप मदत होईल.

तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते आहे.

हुकुमीएक्का's picture

5 Dec 2012 - 10:28 pm | हुकुमीएक्का

कॅमेरा - फुजीफिल्म .
शटर स्पीड - १/४००
अ‍ॅपरचर - ५.६
फोकल लेन्थ - ४८ एम एम
एक्सपोजर - १/८००
आय. एस. ओ - २००
मॅन्युअल मोड . . .
---------------------------------------------------------------

लंबूटांग's picture

5 Dec 2012 - 11:03 pm | लंबूटांग

हा EXIF data सर्व फोटोंना लागू होतो का?

हुकुमीएक्का's picture

6 Dec 2012 - 12:33 am | हुकुमीएक्का

मी फोटो क्र. २ साठीच EXIF data दिला आहे. आपल्याला सर्व फोटोंचा हवा आहे का ??

हुकुमीएक्का's picture

6 Dec 2012 - 12:33 am | हुकुमीएक्का

मी फोटो क्र. २ साठीचा EXIF data दिला आहे. आपल्याला सर्व फोटोंचा हवा आहे का ??

लीलाधर's picture

5 Dec 2012 - 9:25 am | लीलाधर

मला आधी वाटले की मोदकाचे फोटो की काय ? धागा ओपन करुन पाहीला तर आतमध्ये

बदकांचे फोटो

;) :) :-P :-D

वपाडाव's picture

5 Dec 2012 - 12:44 pm | वपाडाव

बदकही 'मादक' दिसत असावेत काय?

स्पंदना's picture

6 Dec 2012 - 5:25 am | स्पंदना

नजर नजर वपा नजर!
कोणाला कोण मादक दिसत हे ज्याच्या त्याच्या नजरेवर अवलंबुन असत.

श्री गावसेना प्रमुख's picture

5 Dec 2012 - 9:28 am | श्री गावसेना प्रमुख

सर्वच्या सर्व फोटुक चान आलेत
कधी न बघीतलेले ,अती तेथे माती अन मातीतच सोन शोधा सापडुनच जाइल १००%


झेब्रा क्रॉसींग प्रेमी मी

लीलाधर's picture

5 Dec 2012 - 9:39 am | लीलाधर

खुप छान आलेत... मस्तच :)

परिकथेतील राजकुमार's picture

5 Dec 2012 - 9:44 am | परिकथेतील राजकुमार

बदक असे दिसते होय !

स्पा's picture

5 Dec 2012 - 10:31 am | स्पा

मस्त आलेत फोटो
अजून येऊन द्यात

ऋषिकेश's picture

5 Dec 2012 - 9:50 am | ऋषिकेश

२ व ३ आवडले. ३ र्‍या फोटोचे EXIF द्याल का?
३ व ४ मध्ये काही पोस्ट प्रोसेसिंग केलंय का?

हुकुमीएक्का's picture

5 Dec 2012 - 10:34 pm | हुकुमीएक्का

३रा फोटो . . .
कॅमेरा - फुजीफिल्म .
शटर स्पीड - १/१०००
अ‍ॅपरचर - एफ/५.३
फोकल लेन्थ - ३३ एम एम
एक्सपोजर - १/१०००
आय. एस. ओ - २००
मॅन्युअल मोड . . .
........................
४ था फोटो थोडा under-expose होता . . म्हणून फोटोशॉप मध्ये ब्राइटनेस अ‍ॅडजेस्टमेंट केली आहे . . .

बद्काची पिल्ले जाम क्यूट आहेत :)

बद्काची पिल्ले जाम क्यूट आहेत
ट्विटीशी सहमत ! :)

कवितानागेश's picture

5 Dec 2012 - 2:01 pm | कवितानागेश

+१
अवांतरः आता इथे 'नविन लेखन' शोधणे आले. ;)

सस्नेह's picture

5 Dec 2012 - 1:20 pm | सस्नेह

फोटोंविषयी बोलायचे तर दुसरा फक्त ओके आहे. इतर फोटोंची फ्रेम चुकलेली आहे.
अवांतर : देखण्या वस्तूंचे फोटो देखणेच येणार. सामान्य वस्तूंचे देखणे फोटो पहावयास मिळ्तील काय ?

pavanaa dam
श्री हुकमीएक्क्का हे नवे असल्याने उत्साही पणे धागे झोडीत आहेत. ते ही हळू हळू मिपाच्या लायनीला येतील .( अर्थात याची काळजी यथास्थित घेणारे " सजग " आयडी ती घेतीलच )
दरम्यान जरा आगाउपणा करून मी टाकत आहे त्याच दिवशी तिथेच काढलेला हा पॅनोरामिक पवना जलाशय प्लस तुंगी व तिकोना !

मस्त. यावरून आठवलं तुंगीवरून उतरल्यानंतर परतीच्या प्रवासाला वाहन मिळवण्यासाठी किती हाल झाल्ते ते :)

प्रचेतस's picture

5 Dec 2012 - 6:41 pm | प्रचेतस

तुंगी नव्हे. तुंग उर्फ वितंडगड.
तुंगी म्हणजे कलावंतीणीचा महाल. हा आहे भिमाशंकराच्या नागफणी टोकाच्या पायथ्याला पदरगडाच्या बाजूला.

चाणक्य's picture

5 Dec 2012 - 7:16 pm | चाणक्य

बाकी ईथल्या जलाशयाचा निळसर रंग खरच सही दिसतो.

चौकटराजा's picture

6 Dec 2012 - 6:45 am | चौकटराजा

वल्ली राव धन्यवाद या दुरूस्तीसाठी !

अर्र गलतीसे मिष्टेक होगया, कलावंतिणीच्या महालाला तुंगी म्हंतात ते माहितीच नै. मांगी-तुंगी म्हणतात त्यांपैकी आहे का हा?

प्रचेतस's picture

6 Dec 2012 - 1:01 pm | प्रचेतस

नाही.

मांगी तुंगी नाशिक जिल्ह्यात, पार गुजरातच्या सीमेवर.

विकास's picture

5 Dec 2012 - 6:04 pm | विकास

तिसर्‍या फोटोवरूनच, "बदकांची माळ फुले अजूनी सागरात..." हे गाणे स्फुरले असावे. ;)

अभ्या..'s picture

6 Dec 2012 - 2:11 am | अभ्या..

मस्त मस्त.
छान फोटो बदकाचे.
बदक ज्यातून आलेय ते निळे निळे पाणी तर मस्तच.
राजासाबांचे 'आगाऊ' पणे टाकलेला पॅनोरॉमिक व्ह्यु सगळ्यात भारी.

पहिल्या फोटोत बदकाच्या डोळ्यातले भाव पाहून अं. ह. झालो. बाकी फोटोंच्या बाबतीत काही कमेंट करण्याइतकं आपलं ज्ञान नाही. लोकांना हे असं कस्काय जमतं याबद्दल नेहमीच कौतुक वाटत आलं आहे. आपला हिरमोड होईल अशा कमेंटींकडे सरळ दुर्लक्ष करा. आपल्याकडून फटुग्राफीचे आठवड्याला किमान सात धागे येतील (यापेक्षा जास्त टाकले तर आनंदच आहे) ही आशा बाळगून माझे (शब्द मोजा प्लीज)शब्द संपवतो.

जय हिंद जय महाराष्ट्र.

जेनी...'s picture

6 Dec 2012 - 9:32 am | जेनी...

सहमत .
हुक्का आठवड्यातुन जवळपास सात ते आठ धागे वेगवेगळ्या विषयावरच्या फोटोवर
यावेत ही माझीहि सुप्त पावलेली पण लूप्त पावन्या आधी बोलुन दाखवलेली इच्छा आहे .
तरि तुम्ही यावर जरुर विचार कराल अशी अपेक्षा\आशा आहे .
एवढं बोलुन मीहि माझे दोन(च) शब्द संपवित आहे.

जय हिंद जय महाराष्ट्र :)

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2012 - 12:29 pm | परिकथेतील राजकुमार

विविध प्राणी, पक्षी, फुले ह्यांच्याबरोबरच अध्ये मध्ये तुमचे फोटो पण टाकत चला. डिस्क्व्हरी, नॅट जीओ बरोबर अ‍ॅनिमल प्लॅनेट पण बंद करता येईल म्हणजे.

मालोजीराव's picture

6 Dec 2012 - 12:38 pm | मालोजीराव

फ्याशन टीवी पण बंद करा जमला तर ;)

ती सोय होती पुर्वी बंद झाली, असो.

>>>> लूप्त पावन्या आधी बोलुन दाखवलेली इच्छा आहे
हा लुप्त 'पावना' मजी कोन त्येचा इचार करतुया....
:)

जेनी...'s picture

6 Dec 2012 - 7:14 pm | जेनी...

इश्श्श्य ..... काहिहि हं :-/

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2012 - 11:09 pm | अत्रुप्त आत्मा

@हा लुप्त 'पावना' मजी कोन त्येचा इचार करतुया....>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif