आर्सेलर मित्तल मर्जर..

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
9 Jul 2012 - 2:42 am

---२७ जानेवारी २००६ ---

बीप बीप... बीप बीप...

टोरांटो एअरपोर्टच्या टर्मिनल १ मध्ये 'आर्सेलर' या जगातल्या दोन नंबरच्या स्टील कंपनीच्या CEO चा; गाय डॉलेचा मोबाईल वाजला.

अनोळखी नंबर मोबाईल स्क्रीन वर बघून तो गोंधळला. पाच तास पुढे.. लंडनहून तो फोन आला होता.

गाय डॉले : "येस..?"

पलीकडचा आवाज:
"गाय, धिस इस लक्ष्मी मित्तल. आय अ‍ॅम कॉलींग यू अ‍ॅज अ मॅटर ऑफ कर्टसी टू टेल यू दॅट, टूमॉरो; मित्तल स्टील विल बी अनाऊन्सिंग अ‍ॅन ऑफर डिरेक्टली टू यूअर शेअरहोल्डर्स फॉर ऑल द शेअर्स ऑफ आर्सेलर"

क्लिक! (गाय डॉलेने कॉल कट केला.)

लक्ष्मी मित्तल: "आय कांट बीलीव्ह इट.. ही हंग अप ऑन मी.!!!"
(जगातल्या पाचव्या श्रीमंत व्यक्तीला, संभाषण सुरू असताना आपला फोन समोरच्याने बंद करणे हा अनुभव विरळाच असावा!)

आणि एका कॉर्पोरेट वॉर ला सुरूवात झाली...

एका बाजूला होती 'मित्तल स्टील'
लंडन मध्ये मुख्य कार्यालय असलेली जगातली एक नंबरची स्टील कंपनी. भारतीय मालक आणि मॅनेजमेंट टीम मध्ये बहुतांशी भारतीय लोक असल्यामुळे, भारतात एकही कारखाना नसतानाही भारतीयत्वाचा शिक्का बसलेली 'युरोपीयन कंपनी'

दुसरीकडे होती 'आर्सेलर'
लक्झंबर्ग मध्ये मुख्य कार्यालय असलेली जगातली दोन नंबरची स्टील कंपनी. लक्झंबर्ग मध्ये अधिकाधीक रोजगार निर्माण करणारी व अर्थकारणात महत्वाची भूमीका पार पाडणारी सरकारची आवडती कंपनी. लक्झंबर्ग सरकारचे बरेचसे आर्थीक निर्णय स्टील उद्योगावर आणि अपरिहार्यपणे आर्सेलरवर अवलंबून होते.

आर्सेलर मॅनेजमेंट टीम त्यावेळी 'डोफॅस्को' या कॅनडातील स्टील कंपनीला विकत घेण्याचे सोपस्कार पूर्ण करून घरी, लक्झंबर्गला निघाली होती. ही बातमी ऐकून त्यांच्यामध्ये खळबळ माजली.
मित्तल स्टील इतक्या लगेच आर्सेलर विकत घेण्याच्या मागे लागेल हे हे कुणालाच अपेक्षीत नव्हते. लक्ष्मी मित्तलची नजर एक दिवस आर्सेलरवर पडणार याचा सर्वांनाच अंदाज होता.. "पण आत्ता??" मित्तल स्टीलने या आधीचे मर्जर फक्त ३ महिन्यांपूर्वी युक्रेन मधील 'क्रायवोरीझ्स्टाल' बरोबर केले होते; ते ही भरभक्कम ४.८४ बिलीयन डॉलर्सचे. 'क्रायवोरीझ्स्टाल' च्या लिलावात आर्सेलरने कडवी लढत दिली होती पण बाजी मित्तल स्टील ने मारली होती. या मर्जरची हवा शांत होण्या आधीच मित्तल स्टीलची ही चाल सर्वस्वी अनपेक्षीत होती.

'मित्तल आर्सेलर' मर्जरची पाळेमुळे त्याच लिलावात रोवली गेली होती. २५ ऑक्टोबर २००५ ला.

युक्रेन सरकारने 'क्रायवोरीझ्स्टाल' ची राखीव किंमत २ बिलीयन डॉलर्स ठरवली असताना व अपेक्षीत किंमत ३ बिलीयन डॉलर्स असताना, मित्तल स्टीलला 'क्रायवोरीझ्स्टाल' विकत घेण्यासाठी तब्बल ४.८४ बिलीयन डॉलर्स मोजावे लागले होते, तेही ६० ते ६५ बोलींनंतर. 'आर्सेलर' आणि 'स्मार्ट ग्रूप' या दोन कंपन्यांनी लिलावा दरम्यान किंमत सतत वाढवत ठेवली होती.

जर आर्सेलर या लिलावात नसती तर 'क्रायवोरीझ्स्टाल' साठी कमीतकमी १ बिलीयन डॉलर्स कमी मोजावे लागले असते हे 'आदित्य मित्तल' च्या लगेचच लक्षात आले.

'आदित्य मित्तल' - लक्ष्मी मित्तलचा मुलगा. फक्त इतकीच ओळख नाही तर व्हार्टन बिझनेस स्कूल मध्ये शिक्षण घेवून, कांही महिने 'क्रेडीत स्वीस' या इन्व्हेस्टमेंट बँकींग फर्म मध्ये नोकरी. २००१ च्या मंदीनंतर मित्तल स्टील ने जगभर केलेल्या बेफाम घोडदौडी मागचा 'ब्रेन'.
केवळ १५ वर्षामध्ये ४७ कंपन्या अ‍ॅक्वायर करणार्‍या मित्तल स्टीलच्या अलीकडील घडामोडींमध्ये शांतपणे पण अत्यंत महत्त्वाची भूमीका बजावणारा मित्तल स्टील चा CFO आणि Head of M&A (Merger & Acquisition)

जगातल्या एक आणि दोन नंबरच्या स्टील कंपन्यांमधील वर्चस्वाच्या खेळात संपूर्ण जगभरचे मार्केट खूपच छोटी जागा ठरणार आणि याचे नुकसान या दोन्ही कंपन्यांनाच होणार याची जाणीव चाणाक्ष मित्तल पितापुत्रांना झाली. प्रचंड वेगाने वाढणार्‍या मित्तल स्टीलचा चढता आलेख तसाच चढता ठेवण्यासाठी हे दोघे प्रयत्नशील होते व सध्याच्या परिस्थीतीत आर्सेलरला आपल्यात सामावून घेणे हाच एकच पर्याय राहिला आहे यावर दोघांचे एकमत झाले.

त्याच आठवड्यात हालचाली सुरू झाल्या.. फ्रेंडली डीलचे प्रयत्न सुरू झाले. जर संपूर्ण मर्जर शक्य नसेल तर मार्केट, प्रॉडक्ट यांमध्ये कुठे एकत्र येणे शक्य आहे का याची चाचपणी मित्तल द्वयी करू लागली. लक्ष्मी मित्तल आणि गाय डॉले यांची एखादी 'मिटींग' होणे शक्य आहे का याची शक्यता आदित्य व टीम अजमावू लागले.
त्याच दरम्यान आदित्य मित्तलने आर्सेलर 'अभ्यासण्यास' सुरूवात केली. आर्सेलर चे मार्केट, फायनान्स, स्ट्रॅटेजीज व प्रोजेक्शन्स कसे आहे व त्याचा मित्तल स्टील ला कसा उपयोग होईल.. नवीन कंपनी तयार झाली तर स्टील उद्योगाच्या जागतीक नकाशावर काय काय बदल होतील असे बरेच पैलू या अभ्यासाला होते.

मित्तल एक ना एक दिवस आर्सेलर कडे रोख वळवणार याची भिती खुद्द आर्सेलर मध्ये सर्वांनाच होती. योग्य प्रत्युत्तर देण्याची तयारी त्यांनीही सुरू केली.

'प्रोजेक्ट टायगर' नावाच्या एक प्रोजेक्टची सुरूवात केली गेली. आर्सेलरची पुढील धोरणे लक्षात घेवून जगातील अत्यंत महत्त्वाच्या कंपन्या विकत घेणे, मार्केट शेअर वाढवत नेणे, कंपनीची बाजारातील किंमत वाढवणे, स्पर्धकांवर नजर ठेवून त्यानुसार आपल्या चाली ठरवणे या उद्देशाने 'प्रोजेक्ट टायगर' सुरू झाला. या सगळ्या मागचे 'टारगेट' होते 'मित्तल स्टील'.
कोणत्याही मार्गाने आर्सेलर ला मित्तल स्टील च्या हातात सापडू न देणे, मित्तल स्टीलची इत्यंभूत माहिती ठेवणे आणि पितापुत्र पुढे नक्की काय करणार याची सर्व माहिती मिळवणे यावर 'प्रोजेक्ट टायगर' ने लक्ष केंद्रीत केले होते.
लक्ष्मी मित्तल म्हणजे "द मून"व 'आदित्य' म्हणजे "अ‍ॅडम"अशी टोपणनावे वापरून हा प्रोजेक्ट अत्यंत गुप्तरीत्या सुरू होता. व आर्सेलर मॅनेजमेंट 'प्रोजेक्ट टायगर टीम' वर खूष होती.

युक्रेन मध्ये अपयशी ठरल्याचा बदला आर्सेलरने 'डोफॅस्को' या कॅनेडीयन कंपनीला अ‍ॅक्वायर करून घेतला आणि आपले स्थान आणखी पक्के केले.

फ्रेंडली बीड साठी लक्ष्मी मित्तल ने केलेले सर्व प्रयत्न फोल ठरले. गाय डॉले शी मध्यस्तांद्वारे बोलणे करून पाहिले. प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न झाला, एकदा गाय डॉले व एका सहकार्‍याला मित्तलनी आपल्या प्रासादतुल्य घरी बोलावूनही बोलते करण्याचा प्रयत्न केला. काहीच निष्पन्न झाले नाही.

कंपनी स्ट्रक्चर, कल्चर वेगवेगळे आहे अशी कारणे देवून आर्सेलरकडून कोणत्याही संभाषणाला पूर्णविराम दिला जात होता.

वरवर सगळे शांत व सुरळीत वाटत होते पण ही वादळापूर्वीची शांतता ठरणार होती.

या परिस्थितीत अचानकपणे मित्तल स्टीलने आर्सेलर विरूध्द 'होस्टाईल बिड' ची घोषणा केली व सारा युरोप ढवळून निघाला...

(क्रमशः)

समाजअर्थकारणराजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

9 Jul 2012 - 2:58 am | श्रीरंग_जोशी

एका वेगळ्याच पण आव्हानात्मक विषयाला या भाषांतराद्वारे हात लावला आहेस मित्रा.

वाचताना कुठेही कृत्रिमपणा जाणवला नाही असे वाटले की मूळ लेखनच मराठीमध्ये करण्यात आले आहे.

पुभाप्र!!

मनोज श्रीनिवास जोशी's picture

9 Jul 2012 - 3:14 am | मनोज श्रीनिवास जोशी

लेख आवडला. पुढचा भाग लवकर येवू द्यात.

मुक्त विहारि's picture

9 Jul 2012 - 4:07 am | मुक्त विहारि

भट्टी चांगली जमली आहे..

किसन शिंदे's picture

9 Jul 2012 - 4:19 am | किसन शिंदे

अनुवाद मस्तच झाला आहे. पुढचा भाग लवकर टाक.

अमितसांगली's picture

9 Jul 2012 - 8:21 am | अमितसांगली

लेख आवडला...पु.भा.प्र...

जेनी...'s picture

9 Jul 2012 - 8:39 am | जेनी...

:)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

9 Jul 2012 - 8:41 am | घाशीराम कोतवाल १.२

लवकर लिहि मित्रा पुढचा भाग
आवडला हा भाग

प्यारे१'s picture

9 Jul 2012 - 9:57 am | प्यारे१

मस्त लिहीतो आहेस... अनुवाद छान जमतोय.
(पूर्ण पुस्तकाचा अनुवाद कर कुणी केला नसेल तर.... लोकांना आवडतं 'असं ' वाचायला ;) )

मन१'s picture

9 Jul 2012 - 10:01 am | मन१

मिळाली व्हरायटी मिळाली. आजवर म आं जा वर विविध विषय होतेच, त्यात एकाची अजून भर पडली. कॉर्पोरेट वॉर आणि कॉर्पोरेट रायव्हलरी.
वाचतो आहे. पुढले अंक लवकर येउ द्यात.

मन१'s picture

9 Jul 2012 - 10:01 am | मन१

मिळाली व्हरायटी मिळाली. आजवर म आं जा वर विविध विषय होतेच, त्यात एकाची अजून भर पडली. कॉर्पोरेट वॉर आणि कॉर्पोरेट रायव्हलरी.
वाचतो आहे. पुढले अंक लवकर येउ द्यात.

५० फक्त's picture

9 Jul 2012 - 10:16 am | ५० फक्त

मस्त रे, मस्त लिहिलं आहेस.

एक चर्चा अशी आहे की या डिलमध्ये काही पातळींवर माहितीची देवाण घेवाण अर्थात अनाधिकृत करण्यासाठी खुप खालच्या पातळ्यांवरुन प्रयत्न केले गेले, त्याबद्दल काही पुसटशी वगैरे माहिती आहे का या पुस्तकात ?

मन१'s picture

9 Jul 2012 - 10:37 am | मन१

त्यात वेगळे असे काही वाटत नाही. दोन देशांत हेरगिरी चालते तशीच औद्योगिक जगतातही चाल्ते. कारण ती आधुनिक "साम्राज्ये" आहेत. मधुर भांडारकरचा "कॉर्पोरेट" त्याच धर्तीवर अंगुलीनिर्देश करणारा होता, फिल्मी होता बराच, पण जे सुचवलय त्यात तथ्यांश नाही असं म्हणता येणार नाही.

मोदक's picture

9 Jul 2012 - 11:29 am | मोदक

>>>खुप खालच्या पातळ्यांवरुन प्रयत्न केले गेले

गाड्यांचे पाठलाग
फोन टॅपींग
बॉडी गार्ड्स

इथे पासून.. जी PR कंपनी मित्तलना सपोर्ट करते तिचा धंदा सरकारने काढून घेणे...
भारत सरकारच्या ऑफिशियल डिनरला, खुद्द मनमोहन सिंग नी लक्ष्मी मित्तलना बोलावले असताना, फ्रेंच सरकारने फोन करून सांगणे की तुम्ही येवू नका..

बर्‍याच.. बर्‍याच गोष्टी घडल्या या डील मध्ये.

शिल्पा ब's picture

9 Jul 2012 - 10:22 am | शिल्पा ब

पुढचे भाग टाकायला कंटाळा करणार असाल तर उगाच अपेक्षा वाढवु नका.

जेनी...'s picture

9 Jul 2012 - 11:42 am | जेनी...

शिल्पिला सहमत . :)

नगरीनिरंजन's picture

9 Jul 2012 - 10:26 am | नगरीनिरंजन

वाचतोय.
स्वैर अनुवाद चांगला केला जात आहे. भाषा कृत्रिम वाटत नाहीय.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jul 2012 - 10:50 am | llपुण्याचे पेशवेll

मोदका,
छान माहीती दिली आहेस. लिहीत रहा वाचतोय.

हरिप्रिया_'s picture

9 Jul 2012 - 11:09 am | हरिप्रिया_

मस्त.. वेगळाच विषय आणि उत्तम लेखन शैली.
पुभाप्र

पांथस्थ's picture

9 Jul 2012 - 11:25 am | पांथस्थ

अनुवाद छान आहे. पण Cold Steel चा मराठी अनुवाद मेहता पब्लिकेशन्स ने प्रकाशीत केला आहे (जर तुम्हाला माहित नसल्यास!)

मोदक's picture

9 Jul 2012 - 11:46 am | मोदक

हो.. माहिती आहे..

पण ते भाषांतर झाले आहे.. मराठी पुस्तक गंडले आहे असे बर्‍याच जणांचे मत आहे.

प्रत्येक इंग्रजी शब्दांला मराठी प्रतिशब्द दिलाच पाहिजे अशा हट्टाने पुस्तक लिहिले आहे असे वाटले मला.

Acquisition, Consolidation, Merger, Take Over या शब्दांना मराठी शब्द असतीलही.. पण हव्या त्या अर्थछटा मिळतील का?

नगरीनिरंजन's picture

9 Jul 2012 - 11:53 am | नगरीनिरंजन

मोदकराव,
ते परवानगीची वगैरे भानगड बघून घ्या एकदा.
बाकी, मेहता पब्लिकेशनच्या अनुवादांबद्दल सहमत आहे.
चेतन भगतच्या "फाईव्ह पॉईंट समवन" चे भाषांतर वाचल्यावर मूळ पुस्तक बरे वाटायला लागले. ;-)
(कदाचित त्यासाठीच मेहता पब्लिशिंगला सुपारी दिली असेल का?)

मोदक's picture

9 Jul 2012 - 11:59 am | मोदक

या लेखासाठी ते पुस्तक, India Today, विकी व तत्कालीन (भारताबाहेरची) वर्तमान पत्रे हे सगळे वापरले आहे.

संमंला विनंती - शेवटची ओळ उडवता येईल का? वरील सर्व माहिती जालावर बर्‍याच ठिकाणी उपलब्ध आहे.

पांथस्थ's picture

9 Jul 2012 - 12:23 pm | पांथस्थ

प्रत्येक इंग्रजी शब्दांला मराठी प्रतिशब्द दिलाच पाहिजे अशा हट्टाने पुस्तक लिहिले आहे असे वाटले मला.

हे जाणवले होते. तुमच्या स्वैर अनुवादाच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा!

Dhananjay Borgaonkar's picture

9 Jul 2012 - 11:27 am | Dhananjay Borgaonkar

वाह्!!छान लेखमाला वाचायला मिळणार.
पुढील लेख लौकर येउद्यात.

आदिजोशी's picture

9 Jul 2012 - 11:33 am | आदिजोशी

पुढचे भाग पटापट टाकावे ही विनंती.

सुरुवात छान!
अजून येऊद्या

जे.पी.मॉर्गन's picture

9 Jul 2012 - 11:43 am | जे.पी.मॉर्गन

झकास सुरुवात एकदम! अगदी शीर्षकापासूनच! पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

जे पी

क्लिंटन's picture

9 Jul 2012 - 12:33 pm | क्लिंटन

उत्तम. माझ्या आवडीच्या विषयावरील लेखाचा पहिला भाग आवडला. पुढील भागांची वाट बघत आहे.

+१
असेच म्हणते
पुढचा भाग वाचण्यास ऊत्सुक

कुंदन's picture

9 Jul 2012 - 12:58 pm | कुंदन

येउ द्या अजुन.

प्रचेतस's picture

9 Jul 2012 - 12:59 pm | प्रचेतस

+१

हर्षद खुस्पे's picture

9 Jul 2012 - 1:09 pm | हर्षद खुस्पे

मस्त लिहिलं आहे

स्मिता.'s picture

9 Jul 2012 - 1:25 pm | स्मिता.

पहिला भाग वाचून खूप छान आणि रोचक असं वाचायला मिळणार आहे याची कल्पना आली आहे, छान लिहिलंय.
अपेक्षा आहे की पुढचे भाग आधीच टंकून तयार असतील ;)

इनिगोय's picture

9 Jul 2012 - 3:37 pm | इनिगोय

स्मिताशी सहमत. मस्त लिहिता आहात, घटनाक्रमातला वेग लेखनातही टिकला, तर मझा येईल.

बॅटमॅन's picture

9 Jul 2012 - 1:27 pm | बॅटमॅन

मस्तच लिहिलंय..पुभाप्र :)

लगे रहो ! (पण दोन भागात वेळ जास्त काढू नको)

रणजित चितळे's picture

9 Jul 2012 - 2:06 pm | रणजित चितळे

छान

एमी's picture

9 Jul 2012 - 2:11 pm | एमी

छान लिहलंय!
पण पूर्ण पुस्तकाचा अनुवाद टंकणार का अशी शंका येतेय...

नाही.. पूर्ण पुस्तक ४०० पानांचे आहे.

फक्त खूप महत्वाच्या घटना टिपणार आहे.

जबर्‍या लिवलय....
हा अनुवाद आहे हे खालच्या प्रतिक्रीयांमुळे कळाले...
नाहितर मला ही स्वतंत्र कलाकृतीच वाटली...
खुपच छान.
पुढचे भाग पटापटा टाका!

टुकुल's picture

10 Jul 2012 - 2:15 am | टुकुल

आधी मला ही वाटल नाही कि हा अनुवाद आहे, जबरा सुरुवात. येवुद्या पुढचे भाग पटापट.

--टुकुल

कवितानागेश's picture

9 Jul 2012 - 3:08 pm | कवितानागेश

पुढे काय झालं?

आर्सेलरचे काय झाले? काय झाले? झाले? झाले? झाले? ;)

चिगो's picture

9 Jul 2012 - 3:31 pm | चिगो

मस्त भट्टी जमलीय..
येऊ द्यात पुढचे भाग पटापट.

अमोल केळकर's picture

9 Jul 2012 - 3:40 pm | अमोल केळकर

मस्त. आज पहिल्यांदा स्टिल लाईन मधे काम करत असल्याबद्दल अभिमान वाटला. :)

अमोल केळकर

सुरेख लेखन...
पुढचा भाग लवकर टंकणे ! :)

पुढचा भाग वाचण्यास उत्सुक

सुमीत भातखंडे's picture

9 Jul 2012 - 5:17 pm | सुमीत भातखंडे

आता पटापट लिहा पुढचे भाग

गणपा's picture

9 Jul 2012 - 5:32 pm | गणपा

वाचतोय आणि वाचलेलं आवडतय.
अधिक वाचायला आवडेल. :)

अस्वस्थामा's picture

9 Jul 2012 - 5:52 pm | अस्वस्थामा

छान आहे लेख.. त्याला भाषांतर म्हणण्यापेक्षा स्वैर अनुवाद म्हणू शकतो.. किंवा स्वतंत्र लिखाण देखील काय हरकत आहे जर तुम्ही इतर संदर्भ वापरत असाल तर...

वाचतीये. पूर्वी बरंच ऐकू आलं होतं या डीलबद्दल.

मराठे's picture

9 Jul 2012 - 9:53 pm | मराठे

फस्क्लास!

पैसा's picture

9 Jul 2012 - 10:28 pm | पैसा

पुढचा भाग कधी?

श्रावण मोडक's picture

9 Jul 2012 - 10:29 pm | श्रावण मोडक

छानच.
पण काळजी घ्या. स्वैर अनुवाददेखील मान्य होत नसतो. त्यावरही स्वामीत्त्वाची बंधने असतात. प्रस्तुत लेखनात तसं काही दिसलं तर कारवाई होऊ शकते. त्यामुळं स्वतंत्र लेखनच झाले पाहिजे. तितके बाह्यसंदर्भ असावेत. त्याची नोंद ठेवा.

आत्मशून्य's picture

9 Jul 2012 - 10:44 pm | आत्मशून्य

मस्त विषय आणी झकास सादरीकरण. पुभाप्र.

अर्धवटराव's picture

9 Jul 2012 - 11:28 pm | अर्धवटराव

आयला, असलं काहितरी इंटरेस्टींग वाचायला भेटलं पाहिजे.

हि मालिका कमीत कमी "क्रमशः" आणि कमित कमी "ब्रेक के बाद" मध्ये पूर्ण केल्यास आमच्यातर्फे मोदक भाऊला २१ मोदकांचा नजराणा :)

अर्धवटराव

मोदक भाऊला २१ मोदकांचा नजराणा
आजकाल त्याला २१ पुरत नाही असे ऐकले आहे. ;)

अर्धवटराव's picture

10 Jul 2012 - 12:28 am | अर्धवटराव

मग एक एक मोदकाचा साईझ ह्हॅ एव्हढा मोठ्ठाला बनवु :D

अर्धवटराव

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Jul 2012 - 2:17 am | निनाद मुक्काम प...

हे युद्ध दोन्ही पक्षांकडून कसे लढले गेले व जगातील अने राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख व व इतर मान्यवर व्यक्ती ह्यात कश्या गुंतल्या होत्या ह्याचे तपशील वार वर्णन कोल्ड स्टील
ह्या पुस्तकात आहे. सदर लेखकाने अनेकांच्या मुलाखती घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
बोर्ड रूम मधील चर्चा सुद्धा रंजक असू शकते हे ह्या पुस्तकावरून समजते.
त्यावेळी मी लंडन मध्ये होतो. आणि हे प्रकरण वृत्तपत्रात गाजत होते.
आर्सेलर ह्या कंपनीत फ्रेंच सरकारचे आर्थिक हित संबंध गुंतल्याने ते सर्वशक्तीनिशी
मित्तल विरुद्ध उभे होते.
फ्रेंचांनी हा अस्मितेचा विषय केला होता.
गंमत म्हणजे युके मधील सर्वात मोठी स्टील कंपनी कोरस मित्तल ह्यांनी नव्हे तर आपल्या टाटा ह्यांनी घेतली. व तिचे अधिग्रहण करतांना विमानच्या दिरंगाई मुळे
विमानतळाला चिटकून असलेल्या आमच्या हॉटेलला रतन टाटा ह्यांचे पाय लागले.
आम्ही भारतीय त्यांची सरबराई करत होतो तर एका गोर्याने कोण आहेत हे असा प्रश्न विचारला, तेव्हा त्याला पेपर वाच. पहिल्या पानावर टाटा नाव दिसेल

पण मित्तल ने ब्लेअर साहेबांना खिशात ठेवले होते.
व ब्लेअर ह्यांच्यावर मित्तल ह्यांना अवैध्य रीत्या मदत करण्याचे बालंट आले होते.
आता ह्या लेखमालेच्या निमित्ताने जुन्या आठवणीना उजाळा मिळेल.

मोदक's picture

11 Jul 2012 - 12:11 am | मोदक

>>>युके मधील सर्वात मोठी स्टील कंपनी कोरस मित्तल ह्यांनी नव्हे तर आपल्या टाटा ह्यांनी घेतली.

ती बातमी ऐकून मी पण थोडा गोंधळलो होतो.. पण नंतर लक्षात आले - "युरोपीयन कमीशनर्स"

बिल गेट्स आणी जॅक वेल्श सारख्यांना जेरीस आणणार्‍या या कमीशनर्स नी बहुदा इकडे मित्तलना फिरकू दिले नसते म्हणून कदाचित टाटांनी बाजी मारली असावी - अर्थात हा माझा अंदाज. त्या डील बद्दल फारसे माहिती नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Jul 2012 - 2:11 am | निनाद मुक्काम प...

टाटाने केलेल्या कोरसच्या अधिग्रहणाची बातमी येथे आहे.
ब्राझिलियन प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत हा विजय त्यांनी मिळवला.
मित्तल ह्यांनी ह्या खेळात भाग घेतला नाही. ह्याची कारणे वेगळी आहेत.
मित्तल प्रामुख्याने अप्रगत देशातील कंपन्या त्या देशातील सरकार व मजूर संघटना
ह्यांना खिशात ठेवून मगच विकत घेतो.

पक्का व्यापारी
ह्याच कारणासाठी अर्सेलर ने मित्तल ह्यांच्या कंपनीच्या मूल्यांशी आमचे जमणे शक्य नाही तेव्हा हा घरोबा नको अशी भूमिका घेतली.
मात्र ह्या देशांनी भांडवलशाही जगभर रुजवली. आता ह्यांच्याच खेळाची सूत्रे वापरून मित्तल ह्यांनी ही कंपनी विकत घेतली.

आणि डायन भी सात घर ....
ही म्हण माहीत असेल
युकेचा वापर मित्तल व्यापारासाठी नाही तर व्यापारातून पैसा युकेत आणण्यासाठी
व गुंवाण्यासाठी करतो कारण परकीय नागरिकांच्या बाहेरून आलेल्या पैशावर कर बसत नाही,, म्हणून मित्तल ह्यांनी आपला भारतीय पासपोर्ट अजून ठेवला आहे. असा एक प्रवाद आहे.
आता ऑलंपिक च्या निमित्ताने आर्सेलर मित्तल मनोरा उभारून लंडन शहरावर स्वतःची कायम स्वरूपी छाप सोडली आहे.

आत्मशून्य's picture

17 Jul 2012 - 10:12 pm | आत्मशून्य

युकेचा वापर मित्तल व्यापारासाठी नाही तर व्यापारातून पैसा युकेत आणण्यासाठी
व गुंवाण्यासाठी करतो कारण परकीय नागरिकांच्या बाहेरून आलेल्या पैशावर कर बसत नाही,, म्हणून मित्तल ह्यांनी आपला भारतीय पासपोर्ट अजून ठेवला आहे. असा एक प्रवाद आहे.

वाह! क्या बात है.

अवांतरः- बाहेरचा नागरीक युकेत न जाताही तिथे पैसा "सेव" करु शकतो का ?

चित्रगुप्त's picture

10 Jul 2012 - 2:33 am | चित्रगुप्त

या विषयात अगदी शून्य माहिती असलेल्या मला खूपच रोचक वाटला हा धागा.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
तसेच ही बडी व्यापारी मडळी एकंदरीत आपणा सर्वसामान्यांच्या जीवनावर कसे आणि काय काय परिणाम घडवत असतात, हेही लिहावे.

सुंदर लेख. पुढे वाचण्यास उत्सुक

सुंदर लेख. पुढे वाचण्यास उत्सुक

मराठमोळा's picture

10 Jul 2012 - 5:50 am | मराठमोळा

एक वेगळाच लेख आणि तितकाच रोचक.. शैलीदेखील मस्तच.
क्रमशः का बुवा.. :(

मी_आहे_ना's picture

10 Jul 2012 - 9:24 am | मी_आहे_ना

मोदकशेठ, सुंदर शब्दांत सोपी मांडणी, धन्यवाद... पु.भा.प्र. हे वे.सां.न.ल.

मृत्युन्जय's picture

10 Jul 2012 - 10:23 am | मृत्युन्जय

छान लिहिले आहेस रे मोदका. परत एकदा वाचले आत्ता :)

रमताराम's picture

10 Jul 2012 - 10:58 am | रमताराम

मराठीतून अशा विषयांवरचं लेखन फार क्वचितच वाचायला मिळतं, येन्जॉयिंग.

अवांतरः एक शंका आहे. मित्तल नि आर्सेलर चा क्रम उलट असावा असे अंधुकसे आठवते. आर्सेलर प्रथम क्रमांकाची नि मित्तल स्टील दुसर्‍या क्रमांकाची कंपनी होती. त्यामुळेही हा 'छोट्या माशाने मोठ्या माशाला गिळण्याचा' प्रयत्न अधिक खळबळजनक ठरला होता बहुधा. खात्री नाही (कदाचित अल्काटेल-ल्यूसेंट मर्जरशी मी गल्लत करत असेन.) त्यानंतर आर्सेलरनेही मित्तल चे टेक ओवर करण्याचा काउंटर-ऑफेन्सिव देखील खेळला होता बहुतेक.

दुसरे असे की लक्ष्मी मित्तल यांचा फोन नं गाय डॉलेंना 'अननोन' असणे जरा अविश्वसनीय वाटते. समसमा प्रतिस्पर्धी असलेल्या व्यक्तीचा नंबर पूर्ण अपरिचित असणे म्हणजे, कुछ जम्या नही. :)

मित्तल स्टील आणि आर्सेलर यांचे क्रमांक हा वादाचा विषय होवू शकतो. मित्तल जर प्रॉडक्शन क्वांटीटीने नंबर १ असतील तर आर्सेलर प्रोडक्ट ने आघाडीवर होते.. पण प्रॉडक्शनच्या आधारावर मित्तल ना नंबर एक समजले जात होते..

आर्सेलर मित्तल मर्जर नंतर तर नवीन कंपनीचे उत्पादन ११० मिलीयन टन आणि दोन नंबरच्या निप्पॉन स्टील चे ३२ मिलीयन टन इतका फरक पडला.

>>>मित्तल नि आर्सेलर चा क्रम उलट असावा असे अंधुकसे आठवते

उलटाच आहे. अगदी शेवटच्या क्षणी कांही अटींमुळे "आर्सेलर-मित्तल" असे झाले.. मित्तल ना मान्य करावे लागले.

>>>लक्ष्मी मित्तल यांचा फोन नं गाय डॉलेंना 'अननोन' असणे जरा अविश्वसनीय वाटते

तो फोन मित्तलनी ऑफीसमधून केला होता - लँडलाईनवरून.

दुसरे असे की, ह्या लेव्हलचे लोक बाहेरील देशात फिरताना बर्‍याचदा Temporary Cell वापरतात. फोन टॅपींग वगैरे टाळण्यासाठी हे फोन त्यांच्या विश्वसनीय ठिकाणाहून Rout केलेले असतात.

स्पा's picture

10 Jul 2012 - 11:58 am | स्पा

वाचतोय

अक्षया's picture

10 Jul 2012 - 12:46 pm | अक्षया

नविन विषय आणि छान लेखन शैली..:)
पुढचा भागाचा प्रतीक्षेत ..

वेगळा विषय अन मांडणीही छान. येऊद्या..

झकासराव's picture

10 Jul 2012 - 2:20 pm | झकासराव

जबरदस्त आहे :)

स्वप्निल घायाळ's picture

10 Jul 2012 - 3:03 pm | स्वप्निल घायाळ

मोदक एक नंबर लेख आहे !!!
पुढचा लेखाची वाट भगतोय

सुनील's picture

11 Jul 2012 - 12:51 am | सुनील

वाचनीय लेख. पुढील भाग लवकर टाका.

आणि हो, श्रामोंनी दिलेला इशाराही लक्षात ठेवा.

अवांतर -
अगदी शेवटच्या क्षणी कांही अटींमुळे "आर्सेलर-मित्तल" असे झाले.. मित्तल ना मान्य करावे लागले.
मर्जर झाल्यानंतर नव्या एकत्रीत कंपनीचे नाव काय असावे हे केवळ कुठली कंपनी मोठी होती ह्यावर ठरत नाही. त्याचे निकष वेगवेगळे असून ते त्या त्या परिस्थितीनुसार ठरतात.

उदाहरणार्थ नॉर्वेस्ट बँकेने जेव्हा वेल्स फार्गो विकत घेतली, त्यानंतर नव्या एकत्रीत बँकेचे नाव वेल्स फार्गो असेच ठेवण्यात आले. नॉर्वेस्ट हे नावच अस्तंगत झाले.

भारतात कोलॅबोरेशन करून आलेल्या बहुतेक सगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या जोडनावात भारतीय कंपनीचे नाव पहिले असते. उदा. मारुती-सुझुकी, गोदरेज-जीई अप्लायन्सेसस (नंतर काडिमोड) इ.

ह्या लेव्हलचे लोक बाहेरील देशात फिरताना बर्‍याचदा Temporary Cell वापरतात. फोन टॅपींग वगैरे टाळण्यासाठी
रजत गुप्ता आणि राजरत्नम यांनीदेखिल temporary cells वापरले असते तर?

मोदक's picture

11 Jul 2012 - 2:54 am | मोदक

>>>श्रामोंनी दिलेला इशाराही लक्षात ठेवा.

ह्म्म.. म्हणूनच पुढचे भाग तितकेसे जमतील असे नाही. बरेच प्रसंग टाळून नेमके तेच लिहावे लागणार आहे. :-(

>>>मर्जर झाल्यानंतर नव्या एकत्रीत कंपनीचे नाव काय असावे हे केवळ कुठली कंपनी मोठी होती ह्यावर ठरत नाही. त्याचे निकष वेगवेगळे असून ते त्या त्या परिस्थितीनुसार ठरतात.

बरोबर.. पण या केस मध्ये मित्तल आर्सेलर हे सुरुवातीला ठरले होते. अगदी शेवटी शेवटी "आर्सेलर-मित्तल" असे झाले.. मित्तल ना मान्य करावे लागले.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Jul 2012 - 3:04 am | निनाद मुक्काम प...

एक मह्त्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रकरणात अमेरिकेची भूमिका अमेरिकेतील मोठी स्टील कंपनी हि मित्तल ह्यांच्या मालकीची होती. व मित्तल ह्यांचे अमेरिकन राजकीय नेत्यांशी चांगले सबंध असल्यामुळे बुश साहेबांनी शिष्टाई केली. आता युद्धे रणांगणावर कमी व बोर्ड रूम मध्ये लढली जातात.

एका कंपनीचे अधिग्रहण त्याहून छोटी कंपनी ज्या खुबीने करते त्याला तोड नाही. ह्या डील्स मुळे जगातील इतर बलाढ्य स्टील कंपन्यांनी जसे पोस्को ने मित्तल ह्यांची वक्र दृष्टी आपल्या कंपनीवर पडू नये म्हणून आधीच अनेक करोड डॉलर ओतून वित्तीय संस्थांच्या मदतीने आगाऊ उपाययोजना केल्या. एवढा मीत्तल ह्यांचा दरारा वाढला. मित्तल हे जिवंत दंतकथा बनले.

मी ग्लोबल सिटीजन आहे. व माझी कंपनी एक जागतिक कंपनी आहे. तेव्हा भारतीयांकडून अधिग्रहण वगैरे बातम्यांमध्ये काहीच अर्थ नाही असे मित्तल ह्यांनी केले. ह्यात मी ग्लोबल .. हे वाक्य मी अनेकदा अनेकांच्या तोंडावर मारतो.

एक मह्त्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रकरणात अमेरिकेची भूमिका अमेरिकेतील सर्वात मोठी स्टील कंपनी हि मित्तल ह्यांच्या मालकीची होती. व मित्तल ह्यांचे अमेरिकन राजकीय नेत्यांशी चांगले सबंध असल्यामुळे बुश साहेबांनी शिष्टाई केली. जगाला शस्त्रे विकण्यावरून अमेरीका व फ्रेंच सरकारमध्ये अधून मधून रा डे होतात. आणि ब्लेअर तर मीत्तल ह्यांचे हरकामे होते.