आर्सेलर मित्तल मर्जर..
लेखनप्रकार (Writing Type)
---२७ जानेवारी २००६ ---
बीप बीप... बीप बीप...
टोरांटो एअरपोर्टच्या टर्मिनल १ मध्ये 'आर्सेलर' या जगातल्या दोन नंबरच्या स्टील कंपनीच्या CEO चा; गाय डॉलेचा मोबाईल वाजला.
अनोळखी नंबर मोबाईल स्क्रीन वर बघून तो गोंधळला. पाच तास पुढे.. लंडनहून तो फोन आला होता.
गाय डॉले : "येस..?"
पलीकडचा आवाज:
"गाय, धिस इस लक्ष्मी मित्तल. आय अॅम कॉलींग यू अॅज अ मॅटर ऑफ कर्टसी टू टेल यू दॅट, टूमॉरो; मित्तल स्टील विल बी अनाऊन्सिंग अॅन ऑफर डिरेक्टली टू यूअर शेअरहोल्डर्स फॉर ऑल द शेअर्स ऑफ आर्सेलर"
क्लिक! (गाय डॉलेने कॉल कट केला.)
लक्ष्मी मित्तल: "आय कांट बीलीव्ह इट.. ही हंग अप ऑन मी.!!!"
(जगातल्या पाचव्या श्रीमंत व्यक्तीला, संभाषण सुरू असताना आपला फोन समोरच्याने बंद करणे हा अनुभव विरळाच असावा!)
आणि एका कॉर्पोरेट वॉर ला सुरूवात झाली...
एका बाजूला होती 'मित्तल स्टील'
लंडन मध्ये मुख्य कार्यालय असलेली जगातली एक नंबरची स्टील कंपनी. भारतीय मालक आणि मॅनेजमेंट टीम मध्ये बहुतांशी भारतीय लोक असल्यामुळे, भारतात एकही कारखाना नसतानाही भारतीयत्वाचा शिक्का बसलेली 'युरोपीयन कंपनी'
दुसरीकडे होती 'आर्सेलर'
लक्झंबर्ग मध्ये मुख्य कार्यालय असलेली जगातली दोन नंबरची स्टील कंपनी. लक्झंबर्ग मध्ये अधिकाधीक रोजगार निर्माण करणारी व अर्थकारणात महत्वाची भूमीका पार पाडणारी सरकारची आवडती कंपनी. लक्झंबर्ग सरकारचे बरेचसे आर्थीक निर्णय स्टील उद्योगावर आणि अपरिहार्यपणे आर्सेलरवर अवलंबून होते.
आर्सेलर मॅनेजमेंट टीम त्यावेळी 'डोफॅस्को' या कॅनडातील स्टील कंपनीला विकत घेण्याचे सोपस्कार पूर्ण करून घरी, लक्झंबर्गला निघाली होती. ही बातमी ऐकून त्यांच्यामध्ये खळबळ माजली.
मित्तल स्टील इतक्या लगेच आर्सेलर विकत घेण्याच्या मागे लागेल हे हे कुणालाच अपेक्षीत नव्हते. लक्ष्मी मित्तलची नजर एक दिवस आर्सेलरवर पडणार याचा सर्वांनाच अंदाज होता.. "पण आत्ता??" मित्तल स्टीलने या आधीचे मर्जर फक्त ३ महिन्यांपूर्वी युक्रेन मधील 'क्रायवोरीझ्स्टाल' बरोबर केले होते; ते ही भरभक्कम ४.८४ बिलीयन डॉलर्सचे. 'क्रायवोरीझ्स्टाल' च्या लिलावात आर्सेलरने कडवी लढत दिली होती पण बाजी मित्तल स्टील ने मारली होती. या मर्जरची हवा शांत होण्या आधीच मित्तल स्टीलची ही चाल सर्वस्वी अनपेक्षीत होती.
'मित्तल आर्सेलर' मर्जरची पाळेमुळे त्याच लिलावात रोवली गेली होती. २५ ऑक्टोबर २००५ ला.
युक्रेन सरकारने 'क्रायवोरीझ्स्टाल' ची राखीव किंमत २ बिलीयन डॉलर्स ठरवली असताना व अपेक्षीत किंमत ३ बिलीयन डॉलर्स असताना, मित्तल स्टीलला 'क्रायवोरीझ्स्टाल' विकत घेण्यासाठी तब्बल ४.८४ बिलीयन डॉलर्स मोजावे लागले होते, तेही ६० ते ६५ बोलींनंतर. 'आर्सेलर' आणि 'स्मार्ट ग्रूप' या दोन कंपन्यांनी लिलावा दरम्यान किंमत सतत वाढवत ठेवली होती.
जर आर्सेलर या लिलावात नसती तर 'क्रायवोरीझ्स्टाल' साठी कमीतकमी १ बिलीयन डॉलर्स कमी मोजावे लागले असते हे 'आदित्य मित्तल' च्या लगेचच लक्षात आले.
'आदित्य मित्तल' - लक्ष्मी मित्तलचा मुलगा. फक्त इतकीच ओळख नाही तर व्हार्टन बिझनेस स्कूल मध्ये शिक्षण घेवून, कांही महिने 'क्रेडीत स्वीस' या इन्व्हेस्टमेंट बँकींग फर्म मध्ये नोकरी. २००१ च्या मंदीनंतर मित्तल स्टील ने जगभर केलेल्या बेफाम घोडदौडी मागचा 'ब्रेन'.
केवळ १५ वर्षामध्ये ४७ कंपन्या अॅक्वायर करणार्या मित्तल स्टीलच्या अलीकडील घडामोडींमध्ये शांतपणे पण अत्यंत महत्त्वाची भूमीका बजावणारा मित्तल स्टील चा CFO आणि Head of M&A (Merger & Acquisition)
जगातल्या एक आणि दोन नंबरच्या स्टील कंपन्यांमधील वर्चस्वाच्या खेळात संपूर्ण जगभरचे मार्केट खूपच छोटी जागा ठरणार आणि याचे नुकसान या दोन्ही कंपन्यांनाच होणार याची जाणीव चाणाक्ष मित्तल पितापुत्रांना झाली. प्रचंड वेगाने वाढणार्या मित्तल स्टीलचा चढता आलेख तसाच चढता ठेवण्यासाठी हे दोघे प्रयत्नशील होते व सध्याच्या परिस्थीतीत आर्सेलरला आपल्यात सामावून घेणे हाच एकच पर्याय राहिला आहे यावर दोघांचे एकमत झाले.
त्याच आठवड्यात हालचाली सुरू झाल्या.. फ्रेंडली डीलचे प्रयत्न सुरू झाले. जर संपूर्ण मर्जर शक्य नसेल तर मार्केट, प्रॉडक्ट यांमध्ये कुठे एकत्र येणे शक्य आहे का याची चाचपणी मित्तल द्वयी करू लागली. लक्ष्मी मित्तल आणि गाय डॉले यांची एखादी 'मिटींग' होणे शक्य आहे का याची शक्यता आदित्य व टीम अजमावू लागले.
त्याच दरम्यान आदित्य मित्तलने आर्सेलर 'अभ्यासण्यास' सुरूवात केली. आर्सेलर चे मार्केट, फायनान्स, स्ट्रॅटेजीज व प्रोजेक्शन्स कसे आहे व त्याचा मित्तल स्टील ला कसा उपयोग होईल.. नवीन कंपनी तयार झाली तर स्टील उद्योगाच्या जागतीक नकाशावर काय काय बदल होतील असे बरेच पैलू या अभ्यासाला होते.
मित्तल एक ना एक दिवस आर्सेलर कडे रोख वळवणार याची भिती खुद्द आर्सेलर मध्ये सर्वांनाच होती. योग्य प्रत्युत्तर देण्याची तयारी त्यांनीही सुरू केली.
'प्रोजेक्ट टायगर' नावाच्या एक प्रोजेक्टची सुरूवात केली गेली. आर्सेलरची पुढील धोरणे लक्षात घेवून जगातील अत्यंत महत्त्वाच्या कंपन्या विकत घेणे, मार्केट शेअर वाढवत नेणे, कंपनीची बाजारातील किंमत वाढवणे, स्पर्धकांवर नजर ठेवून त्यानुसार आपल्या चाली ठरवणे या उद्देशाने 'प्रोजेक्ट टायगर' सुरू झाला. या सगळ्या मागचे 'टारगेट' होते 'मित्तल स्टील'.
कोणत्याही मार्गाने आर्सेलर ला मित्तल स्टील च्या हातात सापडू न देणे, मित्तल स्टीलची इत्यंभूत माहिती ठेवणे आणि पितापुत्र पुढे नक्की काय करणार याची सर्व माहिती मिळवणे यावर 'प्रोजेक्ट टायगर' ने लक्ष केंद्रीत केले होते.
लक्ष्मी मित्तल म्हणजे "द मून"व 'आदित्य' म्हणजे "अॅडम"अशी टोपणनावे वापरून हा प्रोजेक्ट अत्यंत गुप्तरीत्या सुरू होता. व आर्सेलर मॅनेजमेंट 'प्रोजेक्ट टायगर टीम' वर खूष होती.
युक्रेन मध्ये अपयशी ठरल्याचा बदला आर्सेलरने 'डोफॅस्को' या कॅनेडीयन कंपनीला अॅक्वायर करून घेतला आणि आपले स्थान आणखी पक्के केले.
फ्रेंडली बीड साठी लक्ष्मी मित्तल ने केलेले सर्व प्रयत्न फोल ठरले. गाय डॉले शी मध्यस्तांद्वारे बोलणे करून पाहिले. प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न झाला, एकदा गाय डॉले व एका सहकार्याला मित्तलनी आपल्या प्रासादतुल्य घरी बोलावूनही बोलते करण्याचा प्रयत्न केला. काहीच निष्पन्न झाले नाही.
कंपनी स्ट्रक्चर, कल्चर वेगवेगळे आहे अशी कारणे देवून आर्सेलरकडून कोणत्याही संभाषणाला पूर्णविराम दिला जात होता.
वरवर सगळे शांत व सुरळीत वाटत होते पण ही वादळापूर्वीची शांतता ठरणार होती.
या परिस्थितीत अचानकपणे मित्तल स्टीलने आर्सेलर विरूध्द 'होस्टाईल बिड' ची घोषणा केली व सारा युरोप ढवळून निघाला...
(क्रमशः)
प्रतिक्रिया
सहीच
आवडला.
लेख मस्त जमला आहे..
जबराट!
चांगला विषय...
(No subject)
लवकर लिहि मित्रा पुढचा
मस्त लिहीतो आहेस... अनुवाद
यस्स....
यस्स....
मस्त रे, मस्त लिहिलं आहेस.
त्यात
ह्म्म..
पुढचे भाग टाकायला कंटाळा
शिल्पिला सहमत .
रोचक
मोदका, छान माहीती दिली आहेस.
मस्त
अनुवाद छान आहे. पण Cold Steel
हो.. माहिती आहे.
मोदकराव, ते परवानगीची वगैरे
परवानगीची भानगड...
प्रत्येक इंग्रजी शब्दांला
वाह्!!छान लेखमाला वाचायला
झक्कास
सुरुवात छान! अजून येऊद्या
जबरी
उत्तम
+१ असेच म्हणते पुढचा भाग
मस्तच लिहिलय
+१
मस्तच लिहिलय
वा! छान
हेच म्हणायचं होतं,
मस्तच लिहिलंय..पुभाप्र
मोदक, अतिशय उत्कंठावर्धक आणि सहज-सोपी शैली आहे
मस्त
छान लिहलंय! पण पूर्ण
नाही.. पूर्ण पुस्तक ४०० पानांचे आहे.
जबर्या लिवलय.... हा अनुवाद
ऐईच बोलताय
पुढे काय झालं?
आर्सेलरचे काय झाले? काय झाले?
सह्हीच..
-
सुरेख लेखन... पुढचा भाग लवकर
पुढचा भाग वाचण्यास उत्सुक
मस्त
वाचतोय आणि वाचलेलं
स्वैर अनुवाद
Pagination