Skip to main content

नाव चालते नावीका रे

लेखक सांजसंध्या यांनी सोमवार, 23/04/2012 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
नाव चालते नावीका रे नाव चालते नावीका रे ............................. वाराभरली शीडे खुणावी, पैलतीराला निघाया रे ||धॄ|| जन्मभरिची ओझी घेती, दोन किना-या मधे तैरती रंगमंच हा वाही कुणाचा, पाण्या वरती रे... | १ | पल्याड जावे हीच आकांक्षा, कुणी मागता तुजला भिक्षा धीराने तू वल्हवित नेशी, चिंता कसली रे.. | २ | तरी कशाला चिंता वाहे, कर्मदरिद्री तया म्हणावे अज्ञान्याला कशी कळावी, ओळख तुझी ही रे | ३ | नाव चालते नावीका रे ................................ - संध्या
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1903
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

'इंद्रा द टायगर' मधला एस. पी. बालसुब्रमण्यमला गंगेचा किनारा हिंडवणारा चिरंजीवी आठवला एकदम.

हे खुप आवडले:
जन्मभरिची ओझी घेती, दोन किना-या मधे तैरती रंगमंच हा वाही कुणाचा, पाण्या वरती रे...

In reply to by प्रचेतस

सेम टू सेम ! इथे झालेल्या मागच्या काही गदारोळानंतर सांसं यांनी हाय खाल्ली असावी असा एक अंदाज ;-) म्हणून ठेवणीतल्या कविता आता इथे येत नाहीयेत ;-)

अशाच कविता सोडून गायब होत रहा. येक ना येक दिवस तुम्ही मोठ्ठ्या कवयित्री होणार यात शंका नाही.. - प्रो काडीनाथ साळवी

In reply to by सांजसंध्या

टेक्निकल प्रॉब्लेम होता, आजच त्यावर मिपाचे सर्वेसर्वा नीलकांत यांनी काम पूर्ण केले आहे. एक दोन दिवसानंतर किंवा त्याहीपूर्वी सदस्यांना सर्व लेखन,प्रतिसाद,व्य.नि. दिसू लागतील. कविता दृष्य स्वरुपात करुन दिली आहे. -दिलीप बिरुटे