नाव चालते नावीका रे
नाव चालते नावीका रे .............................
वाराभरली शीडे खुणावी, पैलतीराला निघाया रे ||धॄ||
जन्मभरिची ओझी घेती, दोन किना-या मधे तैरती
रंगमंच हा वाही कुणाचा, पाण्या वरती रे... | १ |
पल्याड जावे हीच आकांक्षा, कुणी मागता तुजला भिक्षा
धीराने तू वल्हवित नेशी, चिंता कसली रे.. | २ |
तरी कशाला चिंता वाहे, कर्मदरिद्री तया म्हणावे
अज्ञान्याला कशी कळावी, ओळख तुझी ही रे | ३ |
नाव चालते नावीका रे ................................
- संध्या
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1921
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वाहवा...! मिटर मधे हिट
व्वाहवा...! मिटर मधे हिट आहे,त्यामुळे चालही मस्त बसेल. :-)
चान चान.
'इंद्रा द टायगर' मधला एस. पी. बालसुब्रमण्यमला गंगेचा किनारा हिंडवणारा चिरंजीवी आठवला एकदम.
हे
हे खुप आवडले:
कविता नीटशी जमल्यासारखी वाटत
कविता नीटशी जमल्यासारखी वाटत नाही.
आधीच्या खूपच चांगल्या होत्या.
+1
In reply to कविता नीटशी जमल्यासारखी वाटत by प्रचेतस
सेम टू सेम !
इथे झालेल्या मागच्या काही गदारोळानंतर सांसं यांनी हाय खाल्ली असावी असा एक अंदाज ;-) म्हणून ठेवणीतल्या कविता आता इथे येत नाहीयेत ;-)
अशाच कविता सोडून गायब होत
अशाच कविता सोडून गायब होत रहा. येक ना येक दिवस तुम्ही मोठ्ठ्या कवयित्री होणार यात शंका नाही..
- प्रो काडीनाथ साळवी
सर्वांचे मनापासून आभार...
सर्वांचे मनापासून आभार...:)
इथली कविता कुठे गेली ? आणखीही
इथली कविता कुठे गेली ? आणखीही काही कविता दिसत नाहीत. टेक्निकल प्रॉब्लेम आहे का हा ?
टेक्निकल प्रॉब्लेम...
In reply to इथली कविता कुठे गेली ? आणखीही by सांजसंध्या
टेक्निकल प्रॉब्लेम होता, आजच त्यावर मिपाचे सर्वेसर्वा नीलकांत यांनी काम पूर्ण केले आहे.
एक दोन दिवसानंतर किंवा त्याहीपूर्वी सदस्यांना सर्व लेखन,प्रतिसाद,व्य.नि. दिसू लागतील.
कविता दृष्य स्वरुपात करुन दिली आहे.
-दिलीप बिरुटे
तत्परतेने दखल घेतल्याबद्दल
In reply to टेक्निकल प्रॉब्लेम... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तत्परतेने दखल घेतल्याबद्दल मनापासून आभार.