तेलगु पिक्चर बघायची हौस दांडगी आहे, शक्यतो जो येईल तो बघितला असे मी करत नाही, कारण त्यातून काहीतरी चांगले निघेल ह्याची वाट बघत धीरोदत्तपणे चित्रपट पाहण्याएवढे patience माझ्याकडे मुळीच नाहीत. माझा कुडाळचा एक प्रभू नावाचा मित्र, फेसबुकवर मला जॉइन आहे, त्याने एकदा बोलता बोलता "वारणम आयीराम" हा तेलगु चित्रपट पाहण्याचे सूचित केले, हा recommend करतोय म्हणजे चांगला असावा असा कयास होता पण नंतर काही कामानिम्मित बघताच आला नाही. नंतर मी पण विसरून गेलो , काही दिवसांनी परत online गेलो तर प्रभू दबाच धरून बसला होता, "अरे पाहिलास काय " हाच त्याच सवाल pop-up होत राहिला, मी गडबडून , हम्म पाहतो आहे, पाहतोय असा reply केल्यावर कुठपर्यंत आलास, ती मेली का ? कुठले गाणे जास्त आवडल ? मी जरा चाचारल्यावर त्याने "साल्या बघ मरे, असो काय करतंय , मेलंस तू , बघ तरी मेल्या " असं केल्यावर मी तिथून पळ काढला. त्यानंतर मी फेसबुकवर ओन्लाईन असण हेच मला अपराधीपणाच वाटू लागलं , कारण जरा हिरवा झेंडा फडकवला काय "बघलस काय रे" असा pop-up झळकायचा, बहुदा तो पण नंतर नाउमेद झाला, आणि pop-up थांबले. मध्यंतरी अभ्यासासाठी रात्रीचा एकटाच क्लास मध्ये जाऊन पूर्ण night मारत असे तेव्हा क्लास ची 2MB ची अनलिमिटेड bandwidth वाया जाताना बघवेना, काय डाऊनलोड करायचं तर मग लगेच हा पिक्चर डोळ्यासमोर आला आणि डाऊनलोड केला, सब टायटल्स मिळवली, ती सिन्क्रो करत चित्रपट पाहू लागलो .
कॅमेरा pan होत गेला आणि वृद्ध कृष्णन ( सूर्या शिवकुमार ) केस कापून घरी आल्यावर त्याची बायको मालिनी ( सिमरन बग्गा ) स्वागत करते, आणि नंतर हा अंघोळीला निघून जातो, खोकल्याची उबळ येताना अचानक रक्ताची उलटी होते, त्या आवाजाने सर्वजण धावत येतात आणि घाबरेघुबरे होत डॉक्टरला बोलावतात, सूर्याला (सूर्या शिवकुमार) बोलवायला हव असं त्याच्या वडिलांचा(कृष्णन) विचार असतो , आता काहीही होऊ शकत नाही असं डॉक्टर लोकांनी सांगितल्यावर मालिनीच्या जीवाची होणारी घालमेल अभिनयातून नेटकी साकारली गेली आहे. तिकडे सूर्याला ही दुखद घटना कळवली जाते तेव्हा तो एका मिशनसाठी विमानात बसलेला असतो , वडिलांची आठवण येत असतानाच तो फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि तिथे सुरु होतो एका सुंदर चित्रपटाचा खरा प्रवास !
सूर्याचे वडील कृष्णन ( इथे सूर्या शिवकुमारचा डबल रोल आहे ! ) यांची छाप सुर्यावर भरपूर असते, सुर्याला एक एक प्रसंग आठवत जातात, ज्यांच्या घरात प्रेमविवाह झालेला असतो अश्या अपत्यांची मुलं सहसा जो प्रश्न विचारतात, " तुम्ही कसे भेटलात? कधी भेटलात? वैग्रे वैग्रे " तोच प्रश्न सूर्याने त्याच्या आईला विचारला, आणि आईने देखील अगदी थोडसं लाजून हसत हसत तो सगळा प्रवास सांगितलान, १९६० च्या जमान्यातला काळ छान दाखवलाय. मालिनीला पाहून कृष्णन तिच्या प्रेमात पडतो आणि सगळ्यांना क्रशबद्दल सांगत फिरतो , ती एकदा रागाने तणतणत गॅदरिंग मध्ये त्याला शोधत असते तर तो मागे येऊन उभा राहतो, एकदम स्मार्ट बॉय ! अर्थात लगेच पुढे एक नरेश अय्यरचे 'मुंधीनम पार्तेने' हे सुंदर गाणे सुरु होते, ह्या गाण्यासाठी उभा करण्यात आलेला retro look खूप छान आहे. पहाटे ४ वाजता क्लास मधून बाहेर पडल्यावर JM रोड वर पिवळ्या लाईटमध्ये न्हात पल्सर चालवत परत रूम वर जाताना हे गाणे ईअरफोन लावून ऐकणे म्हणजे सरसच ! तर ह्या सगळ्यातून पुढे जात असताना कृष्णन-मालिनीचे लग्न होत, त्यांच्या दोन मुलांचे संगोपन सुरु होते, ह्या सगळ्यात मालिनीचा आपल्या नवर्याबद्दलचा विश्वास, आदर, प्रेम हे तिच्या मुद्राभिनायातुनच सुंदररित्या व्यक्त होत राहत.
सूर्या मोठा होत जातो, पहिलंवाहील प्रेम व्यक्त करण्यापूर्वीच त्याला खावा लागलेला मार, नंतर वडिलांनी त्याला दिलेले प्रोत्साहन आणि त्याने परत केलेली मारामारी ही मजेशीरच ! यथावकाश इंजिनियरिंगची परीक्षा पार पडत परत घरी येत असताना त्याची ओळख मेघना ( समीरा रेड्डी ) बरोबर होते, ह्यावेळी त्या दोघांमध्ये होणारी नेत्रपल्लवी चांगलीच रंगलीय , पुढे जाऊन जाऊन तो तिला मागणीच घालतो पण ती भलतीच स्कॉलर असल्याने (आंध्रच्या बोर्डात आली वैग्रे) आणि आमचा हिरो पडला वारकरी त्यामुळे हा थोडा खट्टू होतो. तिला MS करायला कॅलीफोर्नियाला जायचं असत आणि ती जाते देखील , हा आपल्या सदाबहार, जिंदादिल वडलांची परवानगी घेऊन हा पण समुद्र ओलांडण्याचे धाडस करतो, for love . तिथे त्यांची एकदाची भेट होऊन त्यांच्यातले प्रेम फुलत जाते.
तिने एकदा सद्गदित होऊन प्रेमाची कबुली दिल्यावर हा आपल्या आईला CC मध्ये ठेऊन वडिलांना reporting करतो. दुर्दैवाने ती ज्या प्रोजेक्टवर जाते तिथे स्फोट होऊन ती निजधामास गेल्यावर हा तिच्या विरहाने अश्रू ढळत back to pavilion येतो, पण हा सगळा प्रकार टचिंग आहे एवढे नक्की ! पुढे तिच्या आठवणीत तो डिप्रेस होतो तेव्हा त्याच्या आई बाबांची त्याला सावरताना झालेली स्थिती पाहून खरंच त्रास झाला. सक्षम अभिनयाची पोचपावती, अजून काय ? हा मनुष्य मेघनाला विसरू शकत नसल्याने शेवटी ड्रग्सच्या आहारी जातो ! चित्रपटाच्या उत्तरार्धात सूर्याला मिशनवर जा म्हणताना त्याचे वडील पायऱ्या उतरत खाली जातात आणि मागे वळून पाहताना त्यांच्या डोळ्यात पाणी असत तेव्हा सूर्या त्यांच्याकड बावचळून पाहतो असतो तेव्हा " I will be thinking about you" एवढे म्हणत ते निघून जातात तो प्रसंग खरंच डोळ्यात पाणी आणतो. हा व्यसनांच्या आहारी अडकत जात स्वतःचा नाश करून घेतो की अजून काय कलाटणी मिळते की अजून काय होत हे जर पाहायचं असेल तर हा चित्रपट जरूर बघावा.
चित्रपटामध्ये हाणामारीचे प्रसंग बरेच आहेत पण त्यात कुठे अतिरंजितपणा दाखवला नाहीये त्यामुळे तो राडा बघणे नक्कीच सुसह्य आहे. सर्वांचाच दर्जेदार, अप्रतिम अभिनय आणि सुरेख पठकथा व छायाचित्रण ह्य सर्व गोष्टी हा चित्रपट अतिशय समृद्ध बनवतात. हॅरिस जयराज चे श्रवणीय संगीत ह्या चित्रपटाला चार चांद लावून गेलेत , ह्या चित्रपटाने २००८ मधला second most गल्ला कमावला, नॅशनल फिल्म अवॉर्ड , फिल्मफेअर अवॉर्ड, इत्यादी २० पेक्षा अधिक पुरस्कारांची लयलूट ह्या चित्रपटाने केली. गौतम मेनन हा त्याचा दिग्दर्शक , त्याच्या आदल्या वर्षी गेलेल्या वडिलांच्या स्मृतीला अर्पण करत हा चित्रपट त्याने बनवला. ह्या चित्रपटाबद्दल एक वेगळी माहिती म्हणजे खरे तर ह्या चित्रपटामध्ये सुरुवातीला पदुकोनाची दीपिका काम करणार होती, पण नंतर तिने काढता पाय घेतला. असीनची इच्छा होती पण सूर्याने विरोध केला, तिथे समीरा रेड्डीची वर्णी लागली, आणि ती शोभून दिसली, समीराने अपेक्षेपेक्षा छान अभिनय करत सुखद आश्चर्याचा धक्काच दिला. ( हे साउथच्या दिग्दर्शकांचे कसब मानावे लागेल) तथापि जेनेलीयाने शुटींग अर्धवट सोडून दिलं आणि तिच्या जागी आलेल्या दिव्याने संधीच सोन केलं. सूर्याच्या आईचा रोल तब्बूने नाकारल्यावर सिमरनने होकार देत फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये बेस्ट सपोर्टिंग नायिकेवर आपला हक्क सांगितला. थोडक्यात हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा असाच आहे, सूर्याने दोन्ही भूमिकेतला balance खूप सुंदर रित्या सांभाळला आहे, सूर्याच्या वयाच्या प्रत्येक छटा दाखवल्या गेल्यात त्या कुठेच खटकल्या नाहीत एवढे रंगभूषेत तारतम्य दिसले आहे. तरी ह्या चित्रपटासाठी संमिश्र प्रतिसाद आहेत, ज्याची त्याची आवड वैग्रे वैग्रे . वारणम आयीराम म्हणजे हजार हत्ती ! चित्रपट पाहून नावाशी सांगड घालावी जी मी अजून घालतोय. वडील-मुलगा ह्यातील एक छान नाते उलगडून दाखवणारा हा चित्रपट आहे आणि तो आपल्या ९९% अपेक्षा पूर्ण करतो , गौतम मेननचा हा एक मास्टरपीस असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.
याद्या
3900
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै दिसांनी बोर्डाव येणं केलंत
धन्यवाद
In reply to लै दिसांनी बोर्डाव येणं केलंत by यकु
सूर्या आणि गौतम मेनन म्हणजे
ऑटोग्राफ
In reply to सूर्या आणि गौतम मेनन म्हणजे by अन्या दातार
ये माया चेसावे???? मी तेलुगु
In reply to ऑटोग्राफ by अमृत
मसाला भेळ!
यूटुबावर मिळून जाईल. मीपण
In reply to मसाला भेळ! by पैसा
विंटरेस्टिंग वाटतोय.. डालो
पूर्ण लेख सवडीने वाचतो. पहिला
अरारा
In reply to पूर्ण लेख सवडीने वाचतो. पहिला by विश्वनाथ मेहेंदळे
सिनेमा तेलुगु आहे म्हणता
In reply to अरारा by अँग्री बर्ड
+१
In reply to सिनेमा तेलुगु आहे म्हणता by धन्या
ओ दाचिपं
In reply to +१ by वपाडाव
पदासाठी भांडा
In reply to ओ दाचिपं by अन्या दातार
छान समिक्षण पण हा मूळ तमिळ चित्रपट आहे
धन्यु
चित्रपटाची ओळख
वॉव