

कॅमेरा pan होत गेला आणि वृद्ध कृष्णन ( सूर्या शिवकुमार ) केस कापून घरी आल्यावर त्याची बायको मालिनी ( सिमरन बग्गा ) स्वागत करते, आणि नंतर हा अंघोळीला निघून जातो, खोकल्याची उबळ येताना अचानक रक्ताची उलटी होते, त्या आवाजाने सर्वजण धावत येतात आणि घाबरेघुबरे होत डॉक्टरला बोलावतात, सूर्याला (सूर्या शिवकुमार) बोलवायला हव असं त्याच्या वडिलांचा(कृष्णन) विचार असतो , आता काहीही होऊ शकत नाही असं डॉक्टर लोकांनी सांगितल्यावर मालिनीच्या जीवाची होणारी घालमेल अभिनयातून नेटकी साकारली गेली आहे. तिकडे सूर्याला ही दुखद घटना कळवली जाते तेव्हा तो एका मिशनसाठी विमानात बसलेला असतो , वडिलांची आठवण येत असतानाच तो फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि तिथे सुरु होतो एका सुंदर चित्रपटाचा खरा प्रवास !

सूर्या मोठा होत जातो, पहिलंवाहील प्रेम व्यक्त करण्यापूर्वीच त्याला खावा लागलेला मार, नंतर वडिलांनी त्याला दिलेले प्रोत्साहन आणि त्याने परत केलेली मारामारी ही मजेशीरच ! यथावकाश इंजिनियरिंगची परीक्षा पार पडत परत घरी येत असताना त्याची ओळख मेघना ( समीरा रेड्डी ) बरोबर होते, ह्यावेळी त्या दोघांमध्ये होणारी नेत्रपल्लवी चांगलीच रंगलीय , पुढे जाऊन जाऊन तो तिला मागणीच घालतो पण ती भलतीच स्कॉलर असल्याने (आंध्रच्या बोर्डात आली वैग्रे) आणि आमचा हिरो पडला वारकरी त्यामुळे हा थोडा खट्टू होतो. तिला MS करायला कॅलीफोर्नियाला जायचं असत आणि ती जाते देखील , हा आपल्या सदाबहार, जिंदादिल वडलांची परवानगी घेऊन हा पण समुद्र ओलांडण्याचे धाडस करतो, for love . तिथे त्यांची एकदाची भेट होऊन त्यांच्यातले प्रेम फुलत जाते.

तिने एकदा सद्गदित होऊन प्रेमाची कबुली दिल्यावर हा आपल्या आईला CC मध्ये ठेऊन वडिलांना reporting करतो. दुर्दैवाने ती ज्या प्रोजेक्टवर जाते तिथे स्फोट होऊन ती निजधामास गेल्यावर हा तिच्या विरहाने अश्रू ढळत back to pavilion येतो, पण हा सगळा प्रकार टचिंग आहे एवढे नक्की ! पुढे तिच्या आठवणीत तो डिप्रेस होतो तेव्हा त्याच्या आई बाबांची त्याला सावरताना झालेली स्थिती पाहून खरंच त्रास झाला. सक्षम अभिनयाची पोचपावती, अजून काय ? हा मनुष्य मेघनाला विसरू शकत नसल्याने शेवटी ड्रग्सच्या आहारी जातो ! चित्रपटाच्या उत्तरार्धात सूर्याला मिशनवर जा म्हणताना त्याचे वडील पायऱ्या उतरत खाली जातात आणि मागे वळून पाहताना त्यांच्या डोळ्यात पाणी असत तेव्हा सूर्या त्यांच्याकड बावचळून पाहतो असतो तेव्हा " I will be thinking about you" एवढे म्हणत ते निघून जातात तो प्रसंग खरंच डोळ्यात पाणी आणतो. हा व्यसनांच्या आहारी अडकत जात स्वतःचा नाश करून घेतो की अजून काय कलाटणी मिळते की अजून काय होत हे जर पाहायचं असेल तर हा चित्रपट जरूर बघावा.

चित्रपटामध्ये हाणामारीचे प्रसंग बरेच आहेत पण त्यात कुठे अतिरंजितपणा दाखवला नाहीये त्यामुळे तो राडा बघणे नक्कीच सुसह्य आहे. सर्वांचाच दर्जेदार, अप्रतिम अभिनय आणि सुरेख पठकथा व छायाचित्रण ह्य सर्व गोष्टी हा चित्रपट अतिशय समृद्ध बनवतात. हॅरिस जयराज चे श्रवणीय संगीत ह्या चित्रपटाला चार चांद लावून गेलेत , ह्या चित्रपटाने २००८ मधला second most गल्ला कमावला, नॅशनल फिल्म अवॉर्ड , फिल्मफेअर अवॉर्ड, इत्यादी २० पेक्षा अधिक पुरस्कारांची लयलूट ह्या चित्रपटाने केली. गौतम मेनन हा त्याचा दिग्दर्शक , त्याच्या आदल्या वर्षी गेलेल्या वडिलांच्या स्मृतीला अर्पण करत हा चित्रपट त्याने बनवला. ह्या चित्रपटाबद्दल एक वेगळी माहिती म्हणजे खरे तर ह्या चित्रपटामध्ये सुरुवातीला पदुकोनाची दीपिका काम करणार होती, पण नंतर तिने काढता पाय घेतला. असीनची इच्छा होती पण सूर्याने विरोध केला, तिथे समीरा रेड्डीची वर्णी लागली, आणि ती शोभून दिसली, समीराने अपेक्षेपेक्षा छान अभिनय करत सुखद आश्चर्याचा धक्काच दिला. ( हे साउथच्या दिग्दर्शकांचे कसब मानावे लागेल) तथापि जेनेलीयाने शुटींग अर्धवट सोडून दिलं आणि तिच्या जागी आलेल्या दिव्याने संधीच सोन केलं. सूर्याच्या आईचा रोल तब्बूने नाकारल्यावर सिमरनने होकार देत फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये बेस्ट सपोर्टिंग नायिकेवर आपला हक्क सांगितला. थोडक्यात हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा असाच आहे, सूर्याने दोन्ही भूमिकेतला balance खूप सुंदर रित्या सांभाळला आहे, सूर्याच्या वयाच्या प्रत्येक छटा दाखवल्या गेल्यात त्या कुठेच खटकल्या नाहीत एवढे रंगभूषेत तारतम्य दिसले आहे. तरी ह्या चित्रपटासाठी संमिश्र प्रतिसाद आहेत, ज्याची त्याची आवड वैग्रे वैग्रे . वारणम आयीराम म्हणजे हजार हत्ती ! चित्रपट पाहून नावाशी सांगड घालावी जी मी अजून घालतोय. वडील-मुलगा ह्यातील एक छान नाते उलगडून दाखवणारा हा चित्रपट आहे आणि तो आपल्या ९९% अपेक्षा पूर्ण करतो , गौतम मेननचा हा एक मास्टरपीस असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै दिसांनी बोर्डाव येणं केलंत
लै दिसांनी बोर्डाव येणं केलंत देवा पण येंट्री म्हणजे दणका!
चित्रपटाची इन डेप्थ (हांग्गा अस्सं ) ओळख फार आवडली.
असो. शर्मन केंट मध्ये शिकलेला एक सीआयए एजंट आयडी आहे इथे एक - तो पण तुमच्या परभुदेवासारखाच सौदिंडियेन पिच्चरचा फॅन आहे .. फॅन म्हणजे किती हो? कसलाही कितीही गयागुजरा सौदिंडियेन पिच्चर पाहू शकतो तो ;-) कोंचातरी राजू का काजू नावाचा हिरो अमेरिकेत आयटीत जॉब करतो म्हणून तिकडे पब् चालवत असतो, मग त्याची ती माँ त्याला इकडे भारतात नवरी शोधते, मग त्यांचं जमतं, फिसकटतं, मग हा दारु पिऊन तिच्या घरी जातो - भल्या भानगडी तिच्यायला. मी घोरू लागलो होतो मध्येच.
अवांतरः त्या यस्टीतल्या रुमालाचं काय झालं म्हणं पुढं ;-)
धन्यवाद
In reply to लै दिसांनी बोर्डाव येणं केलंत by यकु
सध्या तरी काही नाही हो, गाडी निघून गेली, परत कधी भेट नाही . आता सध्या घरी जाताना म्हातारी माणसं वाट्याला येतात त्यामुळे अस्वस्थ !
सूर्या आणि गौतम मेनन म्हणजे
सूर्या आणि गौतम मेनन म्हणजे अगदी खत्रा कॉम्बिनेशन :)
आता नक्कीच बघणार. भिडेसाहेब, अजुन काही असतील तर नक्की सांगा बर का
(दाक्षिणात्य चित्रपटप्रेमी मंडळ व्हाइस प्रेसिडेंट) अन्या ;)
ऑटोग्राफ
In reply to सूर्या आणि गौतम मेनन म्हणजे by अन्या दातार
हा तमिळ चित्रपट जरूर बघा. मागे एकदा दूरदर्शन वर सबटायटल सहीत बघितला होता. हळूवार आणि ह्रुदय स्पर्शी कथा. याचा तेलूगू रिमेकपण आहे 'रवीतेजा' नी काम केलेला पण 'चेरन' चा तमिळ बेस्ट.
याव्यतिरीक्त मसाला म्हणाल तर
बोम्मारिलू - गेनेलिया, सिद्धार्थ
यमदोंगा - ज्यू. एनटीआर
Happy Days
कोत्त बंगारो लोकम
हे सुद्धा बघाच
(दाक्षिणात्य चित्रपटप्रेमी मंडळ सभासद)अमृत
ये माया चेसावे???? मी तेलुगु
In reply to ऑटोग्राफ by अमृत
ये माया चेसावे????
मी तेलुगु पाहिला. (समन्था चा)
मसाला भेळ!
पण वर्णनावरून चांगली जमली असावी असं वाटतंय. कुठे मिळते शोधूयात!
यूटुबावर मिळून जाईल. मीपण
In reply to मसाला भेळ! by पैसा
यूटुबावर मिळून जाईल. मीपण तिथूनच डालो करतोय.
- पिंगू
विंटरेस्टिंग वाटतोय.. डालो
विंटरेस्टिंग वाटतोय.. डालो करण्यासाठी ठेवला आहे.
- पिंगू
पूर्ण लेख सवडीने वाचतो. पहिला
पूर्ण लेख सवडीने वाचतो. पहिला परिच्छेद वाचून एक प्रश्न पडला. सिनेमा तेलुगु आहे म्हणता आहात, पोस्टर तमिळ मध्ये आहे हो :-)
अरारा
In reply to पूर्ण लेख सवडीने वाचतो. पहिला by विश्वनाथ मेहेंदळे
बरोबरे तुमचं , गफलत झाली, चूक दुरुस्त तर करता येणार नाही. ते तुम्ही तामिळ असंच वाचून घ्या म्हणजे झाल.
सिनेमा तेलुगु आहे म्हणता
In reply to अरारा by अँग्री बर्ड
हाच प्रश्न मलाही पडला होता. :)
+१
In reply to सिनेमा तेलुगु आहे म्हणता by धन्या
मित्रांनो, ज्यांना तेलुगु समजते त्यांनी "सुर्या - सन ऑफ क्रिश्नन्" पाहायला हरकत नाही...
हे दोन्हीही चित्रपट एकच आहेत. वर अन्या दातारांनी म्हटल्याप्रमाणे गौतम मेनन अन सुर्या हे कॉम्बिनेशन झकासच आहे. आवर्जुन बघण्यासारखा चित्रपट.
-(दाक्षिणात्य तर आहेच पण खास करुन गौतम मेनन व सुर्याच्या चित्रपटांचा पंखा) वपाडाव
ओ दाचिपं
In reply to +१ by वपाडाव
आम्ही उगाच व्हाईस प्रेसिडेंटची जागा घेतलीये का? प्रेसिडेंटपदावर तुम्हीच आहात. त्यामुळे फक्त पंखा वगैरे वर राहू नका. ते प्रेसिडेंटचे पद घ्या बघू पटकन!
पदासाठी भांडा
In reply to ओ दाचिपं by अन्या दातार
पण आपल्या जुन्या मालकांना पण ही आवड निर्माण करण्याचं श्रेय जायला हवचं ;)
ती अनुष्का तर फेमसच झालीय आता :)
छान समिक्षण पण हा मूळ तमिळ चित्रपट आहे
याचा तेलुगू डब चित्रपट म्हणजे 'सूर्या - सन ऑफ क्रिष्णन' जो की लेखकानी पाहिला(असावा). या चित्रपटातील गाणी (तेलुगू)खूपच श्रवणीय आहेत. एफएम वर रोज ऐकून पार पाठ झाली होती :-)
अमृत
धन्यु
नक्की पाहिल्या जाईल.
चित्रपटाची ओळख आवडली.
चित्रपटाची ओळख
चित्रपटाची ओळख आवडली.
तुम्हाला प्रत्येक संवाद कसा समजतो?
मी सबटायटल्स वाचून होईतो चित्रं बदलतात आणि काय चाललय ते समजत नाही.
दुसर्या फोटोत त्या बुवाचा नक्षीदार शर्ट छपरी वाटतोय.
वॉव
एका नवीन जगाची ओळख करुन दिलीत. धन्यवाद, चित्रपट पाहीन.