✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तो

अ — अज्ञातकुल, गुरुवार, 03/29/2012 - 12:21
तो पोखरतोय आतून............. उत्खननातून; एकेक कविता बाहेर काढतोय.............. कींमती जगणं आणि जगण्याची किंमत ह्यांची तौलनिक मिमांसा करतोय............... खर्‍या खोट्याची आपल्या परक्याची रुजवात घालून देण्यासाठी आलाय तो.................... आयुष्यभराच्या ओळखीचे; परिचय झालेत त्या निमित्ताने................. मुखवट्यापलिकडचे चेहरे दृष्टीपथात आलेत........... झटताहेत सर्वच कर्तव्यापोटी आपापली कामे सांभाळून.................... कुणी; जणीव करून देताहेत आल्याची; एक उपचार म्हणून................ खरं तर आता कार्य थांबलंय................ उपयुक्तताही संपलीय................. अस्तित्व आहे ते केवळ; कुणाच्यातरी कपाळावरच्या सौभाग्यापुरतं............ मात्र तिळतिळ तुटतोय जीव एका कवितेचा............... जी गर्भात आहे पण जन्म घेऊ शकत नाही........... आता त्याला सोबत फक्त दोघांचीच......... थिजलेल्या डोळ्यांआड; स्पंदनात गुदमरलेल्या कवितेची........... आणि अणुरेणूंशी निखळ तादात्म्य पावलेल्या जिवलग कँसरची........................ ...........................अज्ञात

प्रतिक्रिया द्या
798 वाचन

💬 प्रतिसाद (2)

नेहमी प्रमाणे

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/29/2012 - 12:51 नवीन
नेहमी प्रमाणे अज्ञातकुलोत्पन्न रचना... :-)
  • Log in or register to post comments

आगळीवेगळी श्रद्धांजली..

सांजसंध्या
गुरुवार, 03/29/2012 - 13:36 नवीन
आगळीवेगळी श्रद्धांजली..
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा