✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रोफाईल

र — रसप, Wed, 03/28/2012 - 11:44
ती नाहीये.. माहितेय.. पण मला तिच्या प्रोफाईलला फ्रेंड म्हणून ॲड करायचंय ती काहीच बोलणार नाहीये, लिहिणार नाहीये मला माहितेय पण मला तिच्या शांततेला 'लाईक' करायचंय ती येणार नाही.. माहितेय.. पण तरी मला तिला माझ्या आवडत्या ग्रुपमध्ये गुपचूप जोडायचंय ती कुठेच दिसणार नाहीये हेही माहितेय पण मला तिच्या जुन्या फोटोत तिलाच टॅग करायचंय बघू तरी काय होतं.. तेव्हा तिने बोलणं बंद केलं होतं तिच्या अबोल्याने अतोनात छळलं होतं माझ्याकडे बघणंही कटाक्षाने टाळलं होतं अगदी सहजपणे आयुष्यातून गाळलं होतं आता ती मला 'ब्लॉक' तरी नक्कीच करू शकणार नाही प्रोफाईलचे दरवाजे लॉक तरी नक्कीच करू शकणार नाही कारण ती नाहीये.. ..माहितेय.... तिचं नाव, तिचा फोटो... पण प्रोफाईल खरं तर माझी आहे! आणि आता ती राजी आहे.. फेक असली तरी माझी आहे.. ....रसप.... १८ मार्च २०१२ http://www.ranjeetparadkar.com/2012/03/blog-post_18.html

प्रतिक्रिया द्या
1795 वाचन

💬 प्रतिसाद (11)

मिपावर स्वागत. कविता

प्रचेतस
Wed, 03/28/2012 - 11:51 नवीन
मिपावर स्वागत. कविता आवडली. नवकवी आहात. सावधान.
  • Log in or register to post comments

धन्यवाद महोदय !

रसप
Wed, 03/28/2012 - 12:24 नवीन
धन्यवाद महोदय ! मी हे जाणतो... शैले शैले न माणिक्यम् मौक्तिकम् न गजे गजे साधवो न हि सर्वत्र चन्दनम् न वने वने त्यामुळे 'सावधान' आहे.. (आणि 'नवकवी' बनूनही बरेच दिवस झालेत, त्यामुळे सवय आहे!! हाहाहाहाहा!)
  • Log in or register to post comments

रणजित पराडकर स्वागत ( मराठी

सांजसंध्या
Wed, 03/28/2012 - 13:04 नवीन
रणजित पराडकर स्वागत ( मराठी कविता या ऑर्कुटवरच्या ५०००० + सदस्य असलेल्या कम्युनिटीचे संचालक आहेत रसप..)
  • Log in or register to post comments

अवघड आहे, अवांतर

५० फक्त
Wed, 03/28/2012 - 13:29 नवीन
अवघड आहे, अवांतर -साबुदाण्याचे भाव काय चाललेत बाजारात याची चौकशी करा जरा, या आभासी दुनियेतुन बाहेर याल लवकर.
  • Log in or register to post comments

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/28/2012 - 13:33 नवीन
कल्पना आवडली एकदम हो. :) असा एक महाभाग प्रत्यक्ष माहितीत देखील आहे.
  • Log in or register to post comments

कल्पना आवडली

पैसा
Wed, 03/28/2012 - 17:28 नवीन
खरंतर मनातून दु:खी असलेल्या एका जीवाबद्दल आहे. पण कविता छान! आणि हो, मिपावर स्वागत!
  • Log in or register to post comments

आवडल हो.. वण्ण्न्काम्म...

शैलेन्द्र
Wed, 03/28/2012 - 17:39 नवीन
आवडल हो.. वण्ण्न्काम्म...
  • Log in or register to post comments

छान कविता.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/28/2012 - 20:46 नवीन
मिपावर स्वागत आहे. रसप हे रणजीत पराडकर असतील तर भेटून आनंद झाला. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

छान !

हारुन शेख
Wed, 03/28/2012 - 21:05 नवीन
छान ! चे.पु. खरोखर आयुष्यावर प्रभावी झालंय. आजच वाचलं कि कुणा तैवानी बाईने live आत्महत्या केली फेसबुकवर काल ! रामा शिवा गोविंदा ! ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments

झ्याक प्याक ... आवडलं.

जेनी...
Wed, 03/28/2012 - 21:11 नवीन
झ्याक प्याक ... आवडलं.:)
  • Log in or register to post comments

प्रोफाईल

ajay wankhede
Sun, 04/01/2012 - 23:19 नवीन
कविता आवडली.. आशय पण छान
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा