ती नाहीये.. माहितेय..
पण मला तिच्या प्रोफाईलला फ्रेंड म्हणून ॲड करायचंय
ती काहीच बोलणार नाहीये, लिहिणार नाहीये
मला माहितेय
पण मला तिच्या शांततेला 'लाईक' करायचंय
ती येणार नाही.. माहितेय..
पण तरी मला तिला माझ्या आवडत्या ग्रुपमध्ये गुपचूप जोडायचंय
ती कुठेच दिसणार नाहीये
हेही माहितेय
पण मला तिच्या जुन्या फोटोत तिलाच टॅग करायचंय
बघू तरी काय होतं..
तेव्हा तिने बोलणं बंद केलं होतं
तिच्या अबोल्याने अतोनात छळलं होतं
माझ्याकडे बघणंही कटाक्षाने टाळलं होतं
अगदी सहजपणे आयुष्यातून गाळलं होतं
आता ती मला 'ब्लॉक' तरी नक्कीच करू शकणार नाही
प्रोफाईलचे दरवाजे लॉक तरी नक्कीच करू शकणार नाही
कारण ती नाहीये..
..माहितेय....
तिचं नाव, तिचा फोटो...
पण प्रोफाईल खरं तर माझी आहे!
आणि आता ती राजी आहे..
फेक असली तरी माझी आहे..
....रसप....
१८ मार्च २०१२
https://www.ranjeetparadkar.com/2012/03/blog-post_18.html
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावर स्वागत. कविता
मिपावर स्वागत.
कविता आवडली.
नवकवी आहात. सावधान.
धन्यवाद महोदय !
धन्यवाद महोदय !
मी हे जाणतो...
शैले शैले न माणिक्यम्
मौक्तिकम् न गजे गजे
साधवो न हि सर्वत्र
चन्दनम् न वने वने
त्यामुळे 'सावधान' आहे.. (आणि 'नवकवी' बनूनही बरेच दिवस झालेत, त्यामुळे सवय आहे!! हाहाहाहाहा!)
रणजित पराडकर स्वागत ( मराठी
रणजित पराडकर
स्वागत
( मराठी कविता या ऑर्कुटवरच्या ५०००० + सदस्य असलेल्या कम्युनिटीचे संचालक आहेत रसप..)
अवघड आहे, अवांतर
अवघड आहे,
अवांतर -साबुदाण्याचे भाव काय चाललेत बाजारात याची चौकशी करा जरा, या आभासी दुनियेतुन बाहेर याल लवकर.
हा हा हा
कल्पना आवडली एकदम हो. :)
असा एक महाभाग प्रत्यक्ष माहितीत देखील आहे.
कल्पना आवडली
खरंतर मनातून दु:खी असलेल्या एका जीवाबद्दल आहे. पण कविता छान!
आणि हो, मिपावर स्वागत!
आवडल हो.. वण्ण्न्काम्म...
आवडल हो..
वण्ण्न्काम्म...
छान कविता.....
मिपावर स्वागत आहे. रसप हे रणजीत पराडकर असतील तर भेटून आनंद झाला. :)
-दिलीप बिरुटे
छान !
छान ! चे.पु. खरोखर आयुष्यावर प्रभावी झालंय. आजच वाचलं कि कुणा तैवानी बाईने live आत्महत्या केली फेसबुकवर काल ! रामा शिवा गोविंदा !
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
झ्याक प्याक ... आवडलं.
झ्याक प्याक ...
आवडलं.:)
प्रोफाईल
कविता आवडली..
आशय पण छान