✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्त्री पुरुष समानता म्हणजे काय?

स
सोत्रि यांनी
Tue, 03/13/2012 - 04:00  ·  लेख
लेख
स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमके काय? हा प्रश्न फार दिवसा झाले पडला आहे. अदितीच्या ह्या लेखामुळे त्यावर जरा विचार करून उत्तर शोधून काढावेच असे वाटते. ह्या बाबतीत मला असे वाटते किंबहूना आजवरचे माझे मत असे की पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्री
  • आर्थिकदृष्ट्या परावलंबी असते
  • शिक्षणापासून वंचित राहते
  • सत्तेत किंवा अधिकारामध्ये तिला वाटा नसतो
  • चूल आणि मूल ह्या संकल्पनेत तिला जखडून टाकले गेले असते (हे समाजातील तळागाळापासून एलिट असे सर्व थर गृहीत धरून व्यक्त केलेले मत आहे)
तर, तिला शिक्षण मिळून ती आर्थिकदृष्ट्या स्वाबलंबी होऊन तिला सत्तेत किंवा अधिकारामध्ये वाव मिळायला हवा ही झाली स्त्री मुक्ती आणि त्यासाठी ‘सर्व पातळीवर समान संधी’ मिळणे म्हणजेच शिक्षण, करियर, सत्तेत (अधिकारात) वाटा ह्यामध्ये स्त्री पुरूष असा लिंगभेद न होता समान संधी मिळणे म्हणजे स्त्री पुरुष समानता. त्या अनुषंगाने आंतरजालावर जरा शोध घेतला तर फार काही हाती लागले नाही. खरंच हे जरा विस्मयकारकच होते. पण जे काही थोडे बहुत वाचायला मिळाले, काही चर्चा वाचायला मिळाल्या तेथेही मुळात स्त्री पुरुष समानता म्हणजे काय हेच स्पष्ट नाही. एके ठिकाणी स्त्रिया कुंकू लावतात पुरूष नाही, पुरुषाला फक्त मिस्टर असे संबोधन तर स्त्रियांना मिस आणि मिसेस असे वैवाहिक स्टेटस असलेले संबोधन असे काहीसे मत मांडून समानता आणि (अ)समानता असा उहापोह केला होता. हे वाचून हसू तर आलेच पण कीवही आली. सांख्यिकीच्या आधारे ही समानता मोजण्याचा प्रयत्न वर उल्लेखलेल्या अदिती ह्यांच्या लेखात झाला आहे. ज्या ज्या गोष्टी पुरूष करू शकतात त्या त्या स्त्रियांनी करणे म्हणजे समानता का? किंवा मग तसे नसेल तर निदान ज्या गोष्टी स्त्रिया करू शकतात त्यात त्यांची संख्या पुरुषांएवढी(च) हवी का? म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का? ही स्त्री पुरुष समानता नेमकी काय हा विचार करता करता ‘दिमाग का दही’ का काय म्हणतात तसे झाले आणि अचानक एक छान लेख वाचायला मिळाला (हिंदीत आहे). ह्यात म्हटले आहे की स्त्री पुरूष हे अर्धनारीश्वर (शीव-पार्वती) असून ते एकमेकांना पूरक आहेत आणि समानता म्हणजे एकमेकांना Complement करणं आणि निर्भेळ सहजीवन अनुभवणं. मला हे एकदम भावले आणि पटले. साधक-बाधक चर्चा होऊन ह्याचे उत्तर इथे मिळेल असे वाटते ब्वॉ.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
127826 वाचन

💬 प्रतिसाद (247)

प्रतिक्रिया

निरीक्षणांपेक्षा

Nile
गुरुवार, 03/15/2012 - 22:04 नवीन
वरील संवादात निरीक्षणांवरून अनूवाद काढण्यापेक्षा जनुकीय(जेनेटीकली) असे गुण ट्रान्सफर होतात का यावर चर्चा केल्यास जास्त उपयोगी होईल. दोन व्यक्ती वेगवेगळ्या वैयक्तिक निरीक्षणांवरुन वेगवेगळे तर्क काढत असतील तर त्याचा काही उपयोग नाही. मुलींची भातुकली सारख्या गोष्टींची आवड किंवा मुलांची गाड्या वगैरे सारखी आवड जनुकांद्वारे निर्माण झालेली असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 03/15/2012 - 23:24 नवीन
अगदी सहमत आहे. दोन नाही, निदान २०० बालकांचे सांपल घेऊन त्याचा अभ्यास करावा लागेल वगैरे विधानं त्याच संदर्भात केली आहेत. जनुकीय संदर्भात कोणते क्रोमोझोम्स रेसेसिव्ह आहेत आणि कोणते डॉमिनंट वगैरे अभ्यास करावा लागेल. असं काही करता येईल का नाही याबद्दल, मर्यादित वाचनानंतर माझं मत "सध्यातरी कठीण आहे" असं आहे. त्यापेक्षा अनेक स्त्री-पुरुषांचं, बालकांचं निरीक्षण होत आहे, पण कशासाठी होत आहे हे न सांगता निरीक्षण केल्यास अगदी जनुकीय अभ्यासाएवढी नाही पण बरीच विश्वासार्ह (विश्वासु किंवा विश्वासू नव्हे, विश्वासू हा शब्द सजीवांसाठी वापरतात; निर्जीव गोष्टी विश्वासार्ह असतात) माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

तुम्हाला स्त्रीमुक्ती

शिल्पा ब
गुरुवार, 03/15/2012 - 22:48 नवीन
तुम्हाला स्त्रीमुक्ती वाल्यांचे ओक किंवा युयुत्सु म्हणावं का असं विचारावंसं वाटतयं. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

जरूर

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 03/15/2012 - 23:43 नवीन
जरूर विचार. मिपावर थोडी व्यावहारिक अडचण येऊ शकते; तुझे-माझे प्रतिसाद इथे संपादित होतील की नाही माहित नाही. पण समुद्रात अडचणीचे वाटणारे लेख, प्रतिसाद आणि प्रश्न संपादित होत नाहीत. विचारण्याच्या आधीच उत्तर देते. मला असं वाटत नाही. कारण माझं 'एकला चालो रे' नाहीये. "स्त्रियांना कड्याकुलपात, बुरख्यांआड बंदीस्त करा" असं इथेही कोणीही म्हणणार नाही. इथे आणि ऐसीअक्षरे दोन्ही संस्थळांवर माझ्या विचारांप्रमाणेच विचार असणारे लोकंही दिसताहेत. तू धनंजय, Pearl, Nile, पिलियन रायडर इत्यादींचे प्रतिसाद वाचले नाहीस का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अर्थातच. पण हा किंवा तुझा

शिल्पा ब
Fri, 03/16/2012 - 02:10 नवीन
अर्थातच. पण हा किंवा तुझा धागा उगाच म्हणुन काढलाय असही नाही अन म्हणुनच मला तुझ्यापेक्षा पर्लचे प्रतिसाद जास्त संतुलित वाटले. तु त्रागा करुन उपप्रतिसाद देते आहेस असं जाणवलं म्हणुन वरचा प्रतिसाद. मला पेठकरांचा प्रतिसादसुद्धा आवडला. सगळेच स्त्रीविरोधी म्हणता येणार नाहीत...खास करुन भारतात अन त्यातही उत्तर भारत (युपी, बिहार, झारखंड इ.) सोडला तर इतर ठीकाणी. दुसरं म्हणजे कीतीही नोकरी केली किंवा इतर ठीकाणी कर्तुत्व दाखवले तरी जोपर्यंत घरात स्त्रीला मानाने वागवलं जात नाही तोपर्यंत बाहेरच्यांनी कसं वागावं याचा विचार करण्यात अर्थ नाही. त्यासाठी आपल्या लेकराला समान वागणुक देण्याचं शिकवलं तरच फरक पडेल. अजुन एक - वरती बरेच प्रतिसाद आहेत तरीही - नुसती वेशभुषा बदलुन खट काही फरक पडणार नाही.. सार्वजनिकरीत्या जेव्हा कोणी एखादीचं लक्ष नसताना किंवा असतानाही घाणेरडेपणाने बोलताना किंवा हात लावताना तुम्ही बघता त्यावेळी काय करता? किंवा त्या स्त्रीने प्रतिकार केला तर तुम्ही काय करता? अगदी प्रत्येकवेळी नाही जमणार पण कधीतरी का होईना जमेलच. मी स्वतः प्रतिकार करते अन मदतही करते. अन गंमत म्हणजे माझ्या मदतीला सुद्धा फक्त मीच असते हा मुंबईतला अनुभव आहे जिथे मी २२-२३ वर्ष घालवली. नुसते लेख पाडुन काहीही होणार नाही. कृती महत्वाची. नाहीतर इथे मारे बाजीराव अन वेळ आली की शेपुट घालुन पसार. असो. इथे लिहीणारे जरी धाग्या धाग्यांवर स्त्रीदेहाबद्दल वाट्टेल ते लिहित असले तरी अशावेळी आम्ही अगदी सज्जन असंच लिहिणार म्हणुनच घरातुनच आई बापाने आदर्श ठेवणं हे अतिमहत्वाचं आहे...कारण मुलं त्यांचच बघुन शिकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>>आपल्या लेकराला समान वागणुक

Pearl
Fri, 03/16/2012 - 09:27 नवीन
>>आपल्या लेकराला समान वागणुक देण्याचं शिकवलं तरच फरक पडेल.>> +१ >>सार्वजनिकरीत्या जेव्हा कोणी एखादीचं लक्ष नसताना किंवा असतानाही घाणेरडेपणाने बोलताना किंवा हात लावताना तुम्ही बघता त्यावेळी काय करता? किंवा त्या स्त्रीने प्रतिकार केला तर तुम्ही काय करता? अगदी प्रत्येकवेळी नाही जमणार पण कधीतरी का होईना जमेलच. मी स्वतः प्रतिकार करते अन मदतही करते >> त्याबद्दल तुमचं खरचं मनापासून अभिनंदन. खरच खूप गट्स लागतात असं वागायला. >>नुसते लेख पाडुन काहीही होणार नाही. कृती महत्वाची.>> लेखही महत्वाचे आहेत. नक्कीच. आणि कृतीही महत्वाची आहे. >>घरातुनच आई बापाने आदर्श ठेवणं हे अतिमहत्वाचं आहे...कारण मुलं त्यांचच बघुन शिकतात. >> +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

नैसर्गिक असमानता..

प्रभाकर पेठकर
Fri, 03/16/2012 - 11:43 नवीन
अदिती, अशा अनेक छोट्यामोठ्या गोष्टींमधून स्टीरीओटाईप्सचा भडीमार लहान मुलांवर होतो. 'भडीमार' हा शब्द फारच सर्वसाधारण आणि गुळगुळीत अर्थाने वापरला जातो आहे. एखाद्या गोष्टीचा एखाद्यावर अविरत किंवा अविश्रांत मारा होतो त्याला भडीमार करणे असे म्हणतात. जसे, गुन्हेगाराकडून गुन्ह्याची कबुली मिळविण्यासाठी पोलीस प्रश्नांचा भडीमार करतात. त्या प्रकारे घरात मुलांवर चुकीच्या संस्कारांचा भडीमार कधीच होत नाही. अशा पद्धतीने व्यक्तीमत्त्वे घडविणे शक्य असते तर सर्वाचीच मुले कर्तृत्ववाने, सज्जन, सरळमार्गी वगैरे झाली असती. मुलांना 'वाढविणे' ही समस्याच उरली नसती. हं! 'बायकांसारखा रडतोस काय तू मुलगा आहेस नं!' हे वाक्य जरूर ऐकू येतं. पण, पुरुषांपेक्षा बायका जास्त संवेदनशील असतात त्यामुळे पुरुषांपेक्षा लहानसहान दु:खात, अपमानात, संकटात रडण्यासारख्या गोष्टी त्यांच्याकडून होत असतात. हे वास्तव तर मान्य असावं? भविष्यात, मोठेपणी येणारी संकटं, दु:ख, अपमान ह्याने खचून न जाता खंबिरपणे त्याला सामोरे जाणे, कुटुंबातील इतरांना आधार देणे ह्यासाठी कोणाला तरी एकाला 'तयार' करावेच लागते. नैसर्गिकरित्या स्त्रिया जास्त संवेदनशील, परिणामी संकटांचा सामना करताना बिचकतात. (आता लगेच कणखर बायकांची १०० उदाहरणे नकोत. परिस्थितीनुरुप {घरात आधार देणारा पुरुष नसला किंवा तोच फुसका असेल तर} बायकाही कणखर होतात. पण, अशा बायकांचे प्रमाण अगदी अत्यल्प असते.) जेंव्हा एखादी स्त्री संकटाचा सामना एकटी, कुणा पुरुषाच्या मदतीशिवाय, आधाराशिवाय करते तेंव्हा तिचे सर्वत्र कौतुक होते. पण पुरुषाने सामना केला तर कौतुक होत नाही कारण पुरुषाकडून तशी स्वाभाविक अपेक्षाच असते. म्हणूनच मुलांना जास्त कणखर बनविण्याचा प्रयत्न केला जातो. कोणीच कणखर नसेल आणि सगळे कुटुंब हातपाय गाळून बसले तर कसे व्हावे? संसारात स्त्री आणि पुरुष दोघेही मनाने कणखर असतील तर सोन्याहून पिवळे. पण संवेदनशील, कोमल मनाच्या मुलीला बळेच कणखर बनवायचा प्रत्यत्न करणे म्हणजे तिच्यावर अन्याय आणि भावनिक अत्याचारच होईल. स्वेच्छेने ती तशी बनलीच तर, ' तू मुलगी आहेस, रड.' असे कोणी म्हणत नाही. मुलेही हळुवार मनाची असतात. (जशा स्त्रिया कणखर असू शकतात). कवी ग्रेस ह्यांची आई गेल्यावर केलेल्या कवितेत त्यांनी म्हंटले आहे, 'अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे' ह्या वाक्यातील त्यांचा भावनिक हळूवारपणा अंगावर काटा आणतो. तर, 'मेरी झांशी नही दूँगी म्हणणारी' झांशीची राणी मनाचा कणखरपणाच दाखवते. "ही सगळी बायकी कामं" असं सरळच बोलण्याचा जमाना शहरांमधून हद्दपार झाला असेल, होतो आहे. बौद्धीक कौशल्याच्या बाबतीत स्त्री-पुरुष भेदभाव करण्याचा जमाना मागे पडतो आहे. पडलाच पाहिजे. पण, शारीरीक स्नायुंच्या ताकदीच्या बाबतीत फरक हा राहणारच. तोही, जादूची कांडी फिरवून, स्त्रियांचे स्नायु पुरुषांप्रमाणे बलवान झाले तर नैसर्गिक वेगळेपणाच हरवून बसेल आणि स्त्रिपुरुष आकर्षणातली स्वाभाविकता नाहीशी होईल. घरी फर्निचर बनवणारा सुतार स्त्री बोलली तर दुर्लक्ष करतो आणि पुरुषाने सांगितलं तरच ऐकतो हे मी माझ्या लहानपणापासून पहात आले आहे. मी दोन घरांचे डिझाइनिंग, फर्निशिंग सर्व स्वतः केले. अर्थात, सुताराची मदत घेऊन. माझ्या पत्नीकडे कलात्मक दृष्टीकोन (अ‍ॅस्थेटीक सेन्स) कमी आहे तरीही माझा सुतार घरातल्या प्रत्येक फर्निचरच्या निर्माणात 'मेमसाहेबांचा' विचार जरूर घेतो. मी ही शक्यतो अडकाठी करीत नाही. दुसर्‍यांच्या उदाहरणांना १-२ मुलांचे असे म्हणून सांखिकी विदा कमी असल्याची ओरड करताना स्वतः मात्र फक्त स्वतः चा अनुभव कथन करून तिच चुक करते आहेस. जगभरातील स्त्रिपुरुष समानतेवर चर्चा करताना २०० हे सँपलही 'दर्यामे खसखस आहे' पण ते तुला चालते आहे. जगभरातील स्त्रिपुरुष समानतेवर भाष्य करण्याइतका विदा आपल्या कोणाजवळच्याही वैयक्तीक अनुभवात नाही. त्यामुळे चर्चाच खुंटेल. जो तो स्वतःच्या अनुभवातीलच उदाहरणे देणार आणि त्यांनाच प्रातिनिधिक समजणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

एखाद्या गोष्टीचा एखाद्यावर

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 03/17/2012 - 04:22 नवीन
एखाद्या गोष्टीचा एखाद्यावर अविरत किंवा अविश्रांत मारा होतो त्याला भडीमार करणे असे म्हणतात
एक्झॅ़टली. ती गोष्ट subtle (मराठी शब्द?) असो (उदा: आईचे, वडलांचे कोणाचेही स्नेही, नातेवाईक घरी आले की आई उठून चहा-पाणी पहाणार, बाबा पाहुण्यांशी गप्पा मारत बसणार.) वा भडक (उदा: "बायकांसारखं रडू नकोस", अशा प्रकाराने लहान मुलांना "समजावणे".). माझा भडीमाराचा मुद्दा आहे तो या subtle गोष्टींच्या बाबतीत आहे.
पुरुषांपेक्षा बायका जास्त संवेदनशील असतात त्यामुळे पुरुषांपेक्षा लहानसहान दु:खात, अपमानात, संकटात रडण्यासारख्या गोष्टी त्यांच्याकडून होत असतात.
यातल्या अधोरेखित विधानावर आक्षेप. या विधानाला पुष्टी (न?) देणारी मानसशास्त्र संशोधकांची मतं मला अधिक ग्राह्य वाटतात. त्यातून रडणे म्हणजेच्च कमकुवतपणाचे लक्षण यावरही आक्षेप. अप्रिय गोष्ट घडल्यास हमरीतुमरीवर उतरणे, धक्काबुक्की, शिवीगाळ इत्यादी प्रतिक्रियाही मनाचा निदान तेवढ्यापुरता कमकुवतपणाच दाखवतात; ज्या गोष्टी प्रामुख्याने पुरूष करतात. (रडणं असू देत वा शिवीगाळ/धक्काबुक्की करणे, यांपैकी कोणत्याही प्रकाराने भावना व्यक्त न करण्यातूनच मनाचा खंबीरपणा दिसतो यावरही माझा १००% विश्वास नाही*.) भावना व्यक्त करण्याची पद्धत शारीरिक क्षमतेवरून (अपवाद वगळता) ठरत असावी, हे विधान मला मान्य आहे; पण संवेदनशीलता शारीरिक बळावर अवलंबून असते हे मला मान्य नाही. माझं आधीचं वाक्यही निदान १०० पटीने सांपल साईझ वाढवावा लागेल असं आहे; २०० बालकांचा अभ्यास करून ठोस निष्कर्ष काढता येतील असं नाही. (टीव्ही शोजच्या टीआरपीसाठी साधारणतः काही हजार लोकांचा सर्व्हे घेतात. वास्तविक भारतात टीव्ही पहाणारे लाखो लोक असतील.) इतर काही व्यक्तिगत अनुभव हे उदाहरणं म्हणून दिलेले होते; 1. बाहेरच्या व्यक्तींचा (क्वचितच भेटणारे काके-मामेही नाही, अगदी बाहेरचे) मुलांवर फार परिणाम होत नाही, पण घरातल्या मोठ्यांच्या वागण्याचा होतो आणि 2. स्टीरीओटायपिंग करणारे प्रसंग भडीमारासारखेच अंगावर कोसळत असतात हे सांगण्यासाठी. *अतिशय जवळची प्रिय व्यक्ती निवर्तल्यावर रडणं ही स्त्री-पुरूषांची होणारी अतिशय स्वाभाविक होणारी प्रतिक्रिया आहे. पण त्यानंतर दहा दिवसांनीही व्यवहाराचा विचार सोडून रडतच बसणं हा कमकुवतपणा आहे. एकेकाळी, विशेषतः काही समाजांमधे, विधवांना इतर काहीच गती नसल्यामुळे सतत रडण्याशिवाय फारसा पर्यायच नसे. त्यांच्यावर तसं आयुष्य लादलंही जात असे. एखाद्याशी तीव्र मतभेद झाल्यास राग येणं, त्यातून धुसफूस, धक्काबुक्की, शिवीगाळ करून व्यक्त होणं हे ही उत्क्रांतीमधून आल्यामुळे एक प्रकारे नैसर्गिकच आहे. पण दहा दिवसांनीही संवाद साधण्याऐवजी डोक्यात राख घालून घेणं हा ही कमकुवतपणाच आहे. सेल्फ-पिटी किंवा आत्मदया हा ही एक मनाच्या कमकुवतपणाचा प्रकार. आर्थिक परिस्थिती, शारीरिक अडचणी, ही कारणं तर समजतातच पण निष्कारण असणारी आत्मदया हा पण मानसविकारतज्ञांना हाताळावा लागणारा प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

असमानता....

प्रभाकर पेठकर
Sat, 03/17/2012 - 15:39 नवीन
अदिती, मला वाईट वाटते की मी चर्चेमध्ये तुला माझा मुद्दा पटवून देऊ शकलो नाही. ( की तुला पटवुनच घ्यायचा नाहीए? तसे असेल तर मी माझी शक्ती वाया घालविणे हे अत्यंत मूर्खपणाचे ठरेल.) तरीपण हे शेवटचे..... एक्झॅ़टली. ती गोष्ट subtle (मराठी शब्द?) असो (उदा: आईचे, वडलांचे कोणाचेही स्नेही, नातेवाईक घरी आले की आई उठून चहा-पाणी पहाणार, बाबा पाहुण्यांशी गप्पा मारत बसणार.) वा भडक (उदा: "बायकांसारखं रडू नकोस", अशा प्रकाराने लहान मुलांना "समजावणे".). माझा भडीमाराचा मुद्दा आहे तो या subtle गोष्टींच्या बाबतीत आहे. आजकालच्या काळात नुसते चहा पाणीच नाही तर पुरुष पोहे सुद्धा करतात. तेंव्हा बायका एखाद्या वाहिनीवरील सिरियलच्या किंवा साड्यांच्या सेलच्या गप्पा मारत बसतात. 'आमचे हे नं, पोहे फार सुंदर करतात.' असे एखादे वाक्य टाकले की काम भागते. जाताना घरची स्त्री पाहुण्या स्त्रीला कुंकू लावते. पाहुण्या पुरुषाला टिळा का लावित नाही? असमानता का अधोरेखित करते? 'बायकांसारखे रडू नकोस' वर भाष्य करून झाले आहे. तेंव्हा त्यावर आता काही लिहीत नाही. ह्याला मी 'भडीमार' म्हणत नाही, मानत नाही. असेलच तर खालील गोष्टी का नाहीत?? स्री दाक्षिण्याची अपेक्षा, स्त्रियांनी वेगळा खास असा मान अपेक्षिणं. वादावादी कितीही विकोपाला गेली तरी स्त्रीवर हात न उचलणं. स्रियांसाठी वेगळी रांग पाहणं, पुरुषांच्या रांगेत आजारी, वृद्ध कितीही ताटकळत उभे असले तरी त्यांच्यापेक्षा शारीरिक पातळीवर सशक्त असणार्‍या तरूण स्त्रियांना फक्त ती स्त्री आहे म्हणून खास वेगळ्या रांगेने पुढे जाउ देणं. समानतेच्या जमान्यात स्त्रियांसाठी रेल्वेत वेगळे डबे असणं आणि ते असूनही काही स्त्रियांनी पुरुषांच्या डब्यातून प्रवास करणं, पण स्रियांच्या डब्यातून सहकुटुंब सहपरिवार प्रवास करायलाही पुरुषांना परवानगी नसणं, पुरुषांच्या दाढीच्या रेझरच्या आणि अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीत स्त्रियांचा सहभाग, पुरुषांना आकर्षित करणार्‍या अंग प्रत्यंगाचे खुलेआम प्रदर्शन करणे, त्यावर कुणाही स्त्रिमुक्ती किंवा असमानतेवर आरडाओरडा करणार्‍या संस्थांनी भाष्य न करणे, अशा मॉडेल्सना, 'ह्या तुमच्या वागण्याने 'असमानता' अधोरिखित होते आहे' हे का समजाविले जात नाही, अशा जाहिरातींवर, देह प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी सरकार-दरबारी का लावुन धरली जात नाही. अशा अनेक, अनेक, अनेक, अनेक गोष्टींचा भडीमार पुरुषांच्या डोळ्यांवर, मनावर होत राहतो आणि स्त्री आणि पुरुष वेगळे आहेत हेच जन्मभर मनावर बिंबविले जाते. त्यावर का कोणी भाष्य करीत नाही. फक्त घरचा पुरुष मुलांवर चुकीच्या संस्कारांचा भडीमार करतो आणि बाहेरच्या जगात स्त्री जो 'असमानतेचा' भडीमार करीत असते तिला कधी तू दोष देणार? स्त्रियांच्या ह्या असमानतेचा आग्रह धरण्याच्या भूमिकेबद्दल तुझे मानसशास्त्र संशोधक काय म्हणतात हेही जाणून घ्यायला आवडेल मला. यातल्या अधोरेखित विधानावर आक्षेप. या विधानाला पुष्टी (न?) देणारी मानसशास्त्र संशोधकांची मतं मला अधिक ग्राह्य वाटतात. तसे असेल तर चर्चेच्या मुळ विषयावरच मानसशास्त्र संशोधकांची मते विचारात घेऊन आपले मत बनवावे. उगाच आम्हा गावंढळांची मते विचारून वेळेचा आणि विचारांचा अपव्यय कशासाठी? त्यातून रडणे म्हणजेच्च कमकुवतपणाचे लक्षण यावरही आक्षेप. मनाने सशक्त माणसेही हाताळता न येणार्‍या दु:खद भावनांनी तात्पुरती हतबल/विव्हळ होऊन अश्रू ढाळतात. पण तुलनेने लवकर सावरतात आणि समस्येच्या, दु:खाच्या निराकरणावर उपाय शोधण्याच्या मागे लागतात. मनाने कमकुवत माणसे लवकर सावरत नाहीत. किंबहुना, खुपदा, ह्या दु:खावर, समस्येवर काही उपायच नाही असा मनाचा ग्रह करून घेऊन हातपाय गाळून बसतात. अप्रिय गोष्ट घडल्यास हमरीतुमरीवर उतरणे, धक्काबुक्की, शिवीगाळ इत्यादी प्रतिक्रियाही मनाचा निदान तेवढ्यापुरता कमकुवतपणाच दाखवतात; हा मनाच्या कमकुवतपणापेक्षा बौद्धीक कमकुवत पणा आहे असे नाही वाटत? आता, तुझी मानसशास्त्र संशोधक काहीही म्हणोत. माझ्या आजवरच्या आयुष्यातील अनुभवांवरून/ निरिक्षणांवरून मी माझी मते बनविली आहेत. ती तुला पटावीच असा माझा आग्रह नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कुंकू लावणं हीच मुळात असमानता

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 03/17/2012 - 23:39 नवीन
कुंकू लावणं हीच मुळात असमानता आहे. विधवेला, घटस्फोटीतेला ते लावत नाहीत त्यामधे ती अतिशय क्रूर पद्धतीने अधोरेखित होते.
मानसशास्त्र संशोधक काहीही म्हणोत
मग थांबू या. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

रत्नागिरीजवळच्या

पैसा
Sun, 03/18/2012 - 06:49 नवीन
एका खेड्यात एका अशिक्षित आजीच्या तोंडून ३५ वर्षांपूर्वी मी हे ऐकलं होतं, " कुंकू आपण लग्न व्हायचा आधीपासून लावतो, मग कुंकू लावायला नवरा असला नसला काय फरक पडतो?" आता आसपास पाहते, तर कोणी असा भेदभाव करताना मला कधी दिसलं नाही. अगदी ख्रिश्चन आणि मुस्लिम बायकाना पण हळदीकुंकवाला बोलवून कुंकू लावतात. कमॉन यार! मला तरी १०० तले ९०/९५ लोक चांगलेच भेटतात. तुलाच हे खवट लोक तेही पुणे आणि ठाणे अशा ठिकाणी, कुठून भेटतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कमॉन यार! मला तरी १०० तले

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 03/18/2012 - 22:50 नवीन
कमॉन यार! मला तरी १०० तले ९०/९५ लोक चांगलेच भेटतात. तुलाच हे खवट लोक तेही पुणे आणि ठाणे अशा ठिकाणी, कुठून भेटतात?
प्रश्न चष्म्याचा आहे पैसा ताई.. आपण ज्या रंगाचा चष्मा घालू त्या रंगाची दुनिया दिसते. मग कुणी माहेरवाशीण म्हटले तरी त्यात खवचटपणाच दिसतो (ह्याला साधारण दोन वर्षांपूर्वीच्या चर्चेचा संदर्भ आहे) असो, पण म्हणून चष्मा न काढता दुनियेला नावे ठेऊ नयेत. सगळ्या वाईट गोष्टी भिंगातून पहिल्या तर मोठ्याच दिसणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

प्रतिसाद व्यक्तिगत असल्यामुळे

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/20/2012 - 02:48 नवीन
प्रतिसाद व्यक्तिगत असल्यामुळे उत्तर जाहीर देण्याची इच्छा नाही. --- अधिक विचारान्ती काही उदाहरणंच (विवेचन नव्हे!) लिहीण्याची इच्छा झाली आहे. प्रति-प्रतिसाद न देण्याबद्दल पैसाचे आभार. मला भेटलेली माणसं वाईट नाहीत; यांतले अनेक लोक गोड आहेत. पण ती माणसं व्यवस्थेची बळी आहेत; इतर क्षेत्रांत क्वचित नामांकितही आहेत पण या बाबतीत विचार न करणारी आहेत. माझ्या नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमधे भरपूर शॉव्हनिस्ट आहेत. आणि यातल्या बहुतेकांकडे माझं शक्यतोवर जाणं-येणं आहे. विधवेला कुंकू लावू नको म्हणणारी काकू आहे. "लग्नानंतर ते तुझं नाव काय ठेवणार" असं मला विचारणारी मावशी आहे. आई-वडलांनी मागे ठेवलेल्या प्रॉपर्टीवर मला मालक न समजता माहेरवाशीण (अर्थात यात थोडा भाग व्यक्तीगत आयुष्यावर आक्रमणाचाही आहे.) समजणारी शेजारची बाई आहे. "बाकी तुझं करियर वगैरे ठीक आहे, पण घरच्या पाहुण्यांचं आगतस्वागत नीट व्हायलाच हवं" असं म्हणणारे मित्र+काका आहेत. यांच्यात झालेला एक चांगला बदल म्हणजे आता माझ्या वयाच्या मुलगी-सून-मैत्रिणीकडून त्यांच्या अशा अपेक्षा नाहीत. पण आजही त्या घरी गेलं की काकूच सतत स्वयंपाकघरात असते आणि आम्ही कोणी टोकतो तेव्हाच काका भाज्या निवडायला बसतात. "आडनाव बदललं की कटकट नसते म्हणूनतरी बदल" असं म्हणणारे तर असंख्य नातेवाईक, सहकारी आणि ओळखीचे आहेत. "सेन्सिबल मुलगी मिळाली तरच लग्न करेन" असं म्हणणार्‍या एका मित्राला भेटलेल्या सगळ्या सेन्सिबल मुली ह्याचा पगार कमी म्हणून नाही म्हणतात. (इथेही मौजेचा भाग असा की इतर पुरूषांच्याच डॉमिनंट वागण्यामुळे ह्याला त्रास होतो.) वयाने मोठ्या मुलीशी लग्न करणार म्हणून मुलाला टाकणारे आई-वडील माहित आहेत. (मुलाला त्याचा फरक पडत नाही हा भाग निराळा!) किंवा याच कारणास्तव आईवडलांशी खोटं बोलणारे काही मित्र-मैत्रिणी आहेत. --- मला हे लोकं का दिसतात? कारण शॉव्हनिझम आणि इतर गोष्टी यांची गल्लत मी करत नाही. शॉव्हनिझमचा विचार करताना मी इतर चष्मे काढून ठेवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हो, हे क्रूर वगैरे असेल,

रेवती
Sun, 03/18/2012 - 20:46 नवीन
हो, हे क्रूर वगैरे असेल, म्हणजे आहेच पण परिस्थिती बदलतिये ही आनंदाची बातमी नाकारून चालणार नाही. हैद्राबादला हळदीकुंकवाला एक विधवा आजी "याल का?" असे मी विचारताच आनंदाने तयार झाल्या होत्या, नंतर तर सवाष्ण म्हणूनही सुनेबरोबर जेवायला आल्या. त्यावेळी त्यांचे वय ७० वगैरे असेल. एका खेड्यातून पुण्यात आलेल्या आईच्या मैत्रिणीचा नवरा अचानक निवर्तल्यावर तीन लहान मुलांना वाढवताना 'सोय' म्हणून का होईना त्या बाईंनी कुंकू, मंगळसूत्र यांचा त्याग केला नाही आणि त्यांच्या कोल्हापूरजवळच्या छोट्या खेड्यातल्या नातेवाईकांनी अगदी जिव्हारी वगैरे लागेल अशी टीकाही केली नाही (केली तरी त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? ;) ). आता मुलींची लग्नं झालीत आणि दोन्ही आंतरजातीय लग्नं यांनीच अगदी ठरवून करून दिलीत. सगळा भारत अस्साच बदलायला हवा हा आग्रह मी आत्ता धरणार नाही पण परिस्थिती बदलतीये आणि सुदैवाने बदललेल्या परिस्थिचा फायदा होणार्‍या अनेक मुलींमध्ये मीही आहे याचा आनंद होतो. त्यात माझे कर्तृत्व किती? फारसे नाही. आता मी यातून काय शिकायचे/धडा घ्यायचा वगैरे गोष्टी आहेतच.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत. मी आजपर्यंत कुंकू न

कवितानागेश
Mon, 03/19/2012 - 11:50 नवीन
सहमत. मी आजपर्यंत कुंकू न लावणारी विधवा बाई पाहिली नाहीये. ( अपवादः आजी. पण ती १९१३ च्या बॅचमधली होती) शिवाय कुंकू, गंध लावणरे आणि हौसेनी कान टोचणारे पुरुष देखिल पाहिलेत. स्वगतः दोघांचेही कुणीतरी 'कान टोचणे' हीच ती समनता असेल का बरे???? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

+१

रम्या
Fri, 03/16/2012 - 11:40 नवीन
+१, माझ्या लडक्या पुतणीला लहानपणापासून पुष्कळ मोकळ्या वातवारणात वाढवलं. खेळणी म्हणून पुष्कळ गाड्या आणून दिल्या. पण तिच्या आवडत्या मात्र बाहूल्या, भांडीकुंडी ! आम्हीतरी काही वेगळी वागणुक दिल्याचं आठवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

स्त्री पुरुष समानता वगैरे

किचेन
Tue, 03/13/2012 - 13:11 नवीन
स्त्री पुरुष समानता वगैरे मूर्खपणा आहे.जस काही अन्याय वगैरे फक्त स्त्रियांवरच होतो.ज्यांना ज्यांना अस वाटतंय न त्यांनी एकदा पुरुषांच्या जोड्यात पाय घालून बघा.अगदी लहानपणापासूनच त्यांना आपल्या अडचणी भावना केवळ पुरुष आहे म्हणून गाठोड्यात बांधून ठेवाव्या लागतात.मुलींना मोफत शिक्षण आणि मुलांना? महाविद्यालयीन अडमिशन बद्दलही तेच...पुढे जाऊन जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा नोकरी नसलेल्या किवा अगदी टुकार पगार असलेल्या मुलींची देखील मुलाला तिच्याहून दहापट अधिक पगार हवा असतो.बसमध्ये काय गरज आरक्षण करण्याची?वृध्द आणि अपंगांच्या जागेवरही तरुण बसलेले असतातच न.राहिली गोष्ट गर्भवती स्त्रियांची किवा ज्यांच्या कडेवर मुल आहे अशा स्त्रियांची.त्यांना बसायला पुरुष जागा करून देतात...पण स्त्रिया नाही.अनेकदा पुरुषही बस मध्ये तान्हा बाळाला कडेवर घेऊन येतात पण त्यांना कोणी जागा देत नाही.अगदी प्रामाणिकपणे मीही दिली नव्हती.उलट त्यालाच मी घेते बाळाला म्हणून ते बाल पूर्णवेळ माझ्याकडे ठेवाल होत.घरी दमून भागून पुरुष घरी आला कि त्याला दिवस कशा दगदगीत गेला असेल याचा विचार न करता तुमच्याशी लग्न करून मी काय काय गमावलं याची यादी दिली जाते.स्त्रिया स्वतःच्या दुखाची जाहिरात करून दुसर्या स्तीयांची आणि पुशांचीही सहानभूती मिळवण्यात यशस्वी झाल्यात. हि समानता वगैरे फक्त मूर्खपणा आहे.आम्ही नौ महिने पोटात बाल ठेवतो.आणि डिलीवरी पेन सहन करतो म्हणून आम्ही खूप महान हे सांगण्याचा हा एक स्टुपिड मार्ग आहे.
  • Log in or register to post comments

आहाहा... कैलास जीवनच्या

गवि
Tue, 03/13/2012 - 13:15 नवीन
आहाहा... कैलास जीवनच्या जाहिरातीत काशाच्या वाटीने थकल्याभागल्या आजोबांचे पायाचे तळवे चोळणारी आजी दाखवली आहे.. त्यावेळच्या आजोबांच्या चेहर्‍यासारखे भाव समस्त पुरुषांच्या तोंडावर आले असावेत हा प्रतिसाद वाचून.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

+१००

नगरीनिरंजन
Tue, 03/13/2012 - 13:48 नवीन
किचेनतै, पावलांचा फोटो पाठवणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

प्रतिसाद वाचुन डॉले खरच

गणपा
Tue, 03/13/2012 - 13:22 नवीन
प्रतिसाद वाचुन डॉले खरच पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

+१

सुहास झेले
Tue, 03/13/2012 - 16:11 नवीन
खरंय ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१

स्पा
Tue, 03/13/2012 - 13:24 नवीन
हेच आणि असेच म्हणतो :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

(No subject)

प्रचेतस
Tue, 03/13/2012 - 13:29 नवीन
:bigsmile: :bigsmile: :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आधि गवि आणि गणपाशी बाडिस

सोत्रि
Tue, 03/13/2012 - 14:19 नवीन
आधि गवि आणि गणपाशी बाडिस होतो. :)
स्त्री पुरुष समानता वगैरे मूर्खपणा आहे.
हे विधान जरा अ‍ॅग्रेसिव्ह वाटते आहे. जशी तुम्ही दुसरी बाजू मांडलीत तसेच मकी, बिका, सन्जोपरावांच्या प्रतिसादांचा विचार करता तो मूर्खपणा आहे असे अजिबात नसावे. - (शहाणा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

असू दे हो थोडावेळ.. थांबा हो

गवि
Tue, 03/13/2012 - 14:22 नवीन
असू दे हो थोडावेळ.. थांबा हो जरा सोत्रि... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

किचेनतै, कुणीतरी दुसरी बाजु

५० फक्त
Tue, 03/13/2012 - 14:27 नवीन
किचेनतै, कुणीतरी दुसरी बाजु घेणं अतिशय गरजेचं होतं, ती घेतल्याबद्दल धन्यवाद. अर्थात तुमच्या व्यवसायामधला अनुभव पाहता या मताला विशेष महत्व आहे हे निश्चित. अर्थात ही दुसरी बाजु मांडताना थोडासा एकटोकीपणा आला आहे, पण चर्चेसाठी ते आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

पन्नासशी-शंभर टक्के सहमत ...

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/13/2012 - 15:56 नवीन
पन्नासशी-शंभर टक्के सहमत ... :-) @राहिली गोष्ट गर्भवती स्त्रियांची किवा ज्यांच्या कडेवर मुल आहे अशा स्त्रियांची.त्यांना बसायला पुरुष जागा करून देतात...पण स्त्रिया नाही.अनेकदा पुरुषही बस मध्ये तान्हा बाळाला कडेवर घेऊन येतात पण त्यांना कोणी जागा देत नाही.अगदी प्रामाणिकपणे मीही दिली नव्हती.उलट त्यालाच मी घेते बाळाला म्हणून ते बाल पूर्णवेळ माझ्याकडे ठेवाल होत.>>> आणी किच्चुतैच्या या नम्र कथनाला सलाम ---^---
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

+१

छोटा डॉन
Tue, 03/13/2012 - 14:27 नवीन
सहमत आहे. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

किचन बैचा यीजय

अन्नू
Tue, 03/13/2012 - 15:22 नवीन
किचन बैचा यीजय असो...! द्रौपदीची इज्जत वाचीवणार्‍या किसनासारख्याच धाऊन आलात बगा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

ताई तुमचे अतिरेकी प्रतिसाद

पिलीयन रायडर
Tue, 03/13/2012 - 15:58 नवीन
ताई तुमचे अतिरेकी प्रतिसाद पुर्वीही वाचले आहेत... तरी आपले अमुल्य मत स्त्री भ्रुण हत्या, मुलींची शाळेतुन वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती, बलात्काराचे वाढते प्रमाण, हुंडाबळी, घरात निर्णय स्वातंत्र्य नसणे, कंपन्यामध्ये मोठ्या पदांवर नगण्य (०.५ %) इ अनेक " मुर्ख" विषयांवर द्यावे... कसय ना ताई... स्त्री - पुरुष समानता म्हणताना पुरुषांना काही दु:ख नाहीच असं कोणी म्हणत्च नाहीये हो... पण मी वर उल्लेखलेल्या बर्याच गंभीर समस्या स्त्री च्या बाबतीत दिसतात... त्यांच काय? जगात मुर्ख, कजाग, भांड्खोर बाई आणि वरील समस्या समजु शकणारे पुरुष नाहीतच असं कोणी म्हणलच नाहीये.. पण स्त्री म्हणुन भेडसावणार्या समस्या सहन करणार्या बायका आणि त्याची जाणिव अजिबात नसणारे पुरुष थोडे जास्त आहेत हो...
मुलींना मोफत शिक्षण आणि मुलांना?
मुलगी म्हणजे खर्च असं सोप्प समीकरण लावुन मुलींना अगदी पुरुन टाकणारे, कचर्यात टाकणारे पालक आहेत हे तुम्हाला माहित नाही काय? असे लोक मुलींवर शिक्षणाचा खर्च करतील का?? ~`^
जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा नोकरी नसलेल्या किवा अगदी टुकार पगार असलेल्या मुलींची देखील मुलाला तिच्याहून दहापट अधिक पगार हवा असतो
किती ते जनरलाय्जेशन?? किती मुलं आपल्या पेक्षा जास्त पगार असणार्या मुलीला स्विकारायला तयार असतात? किती पालक असे आहेत जे "मुलगी लग्ना नंतर नोकरी सोडणार नाही" असं ठणकावुन सांगु शकतात? किती मुलिंना वडिल खरच १/२ हिस्सा देतात मालमत्तेतला? किती मुली बुद्धी असुन परवानगी नाही म्हणुन शिकत नाहित??
बसमध्ये काय गरज आरक्षण करण्याची?
मासिक धर्म ज्यात अनेक मुली बराच त्रास सहन करतात.. अशा वेळी गर्दी मध्ये पुरुषांचे स्पर्श आणि धक्के सहन करण्या पेक्षा त्यांना हकाची जागा मिळु नये का?? तुमच्या महिती साठी मी कधीही जागे साठी भांडत नाही आणि गरजु पुरुषाला जागाही करुन देते...
हि समानता वगैरे फक्त मूर्खपणा आहे.आम्ही नौ महिने पोटात बाल ठेवतो.आणि डिलीवरी पेन सहन करतो म्हणून आम्ही खूप महान हे सांगण्याचा हा एक स्टुपिड मार्ग आहे.
खर तर तुमच्या ह्या वाक्या नंतर प्रतिक्रिया देण्याची इच्छा मेली होती....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

उत्तम प्रतिसाद

राजेश घासकडवी
Tue, 03/13/2012 - 21:39 नवीन
भ्रुण हत्या, मुलींची शाळेतुन वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती, बलात्काराचे वाढते प्रमाण, हुंडाबळी, घरात निर्णय स्वातंत्र्य नसणे, कंपन्यामध्ये मोठ्या पदांवर नगण्य (०.५ %)
किती मुलिंना वडिल खरच १/२ हिस्सा देतात मालमत्तेतला? किती मुली बुद्धी असुन परवानगी नाही म्हणुन शिकत नाहित??
स्त्री-पुरुष समानतेच्या चर्चेत विषमता म्हणजे खरोखर काय हे सांगणारा एकमेव प्रतिसाद. वरचे मुद्दे सोडून उंची, बसमध्ये जागा, पेताडगिरी वगैरे मुद्दे मांडलेले पाहून गंमत वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

+१ पिलियनच्या मताशी पूर्णत

जाई.
Tue, 03/13/2012 - 23:56 नवीन
+१ पिलियनच्या मताशी पूर्णत सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

+१

Pearl
Fri, 03/16/2012 - 07:18 नवीन
पिलीयन रायडर यांच्याशी +१ <<ताई तुमचे अतिरेकी प्रतिसाद पुर्वीही वाचले आहेत..<< याला तर एक्सक्लुसिव +१. आणि खरचं आपले अमुल्य मत स्त्री भ्रुण हत्या, मुलींची शाळेतुन वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती, बलात्काराचे वाढते प्रमाण, हुंडाबळी याविषयी द्यावे. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

१.सरकारने गर्भलिंग चाचणीवर

किचेन
Sat, 03/17/2012 - 17:28 नवीन
१.सरकारने गर्भलिंग चाचणीवर बंदी घालूनही गर्भलिंग निदान केले जाते आणि त्यात अनेक मुलींचा बळी जातो हि अतिशय लांच्छनास्पद गोष्ट आहे. २.वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती हि ग्रामीण भागात जास्त असते.ग्रामीण भागात मुळातच पुस्तक वाचल्यान पोट भरणार नाहीये हे तत्वाद्यान असत.अनेक शाळांमध्ये मुलं आणि मुली फक्त हजेरीलाच असतात.नंतर हळूच पळून जाऊन मुल, मुली गुर राखायला, शेतीच्या कामाला घरच्यांना मदत करतात.त्यामुळे मुलांचही शिक्षण थांबत आणि मुलींचाही. ३.शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते. ४. एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात. ५. मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. प्रत्येकवेळेस मुलांकडे वंशाचा दिवा म्हणून बघितले जात नाही.जसा जसा मुलगा मोठा होतो तसं तसं ह्या वंशाच्या दिव्यच रुपांतर म्हतार्पांच्या काठीत होत.बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत. बसमध्ये उभ्या/बसलेल्या प्रत्येक बाईला मासिक धर्म असतोच का हो?एखादे वृध्द आजोबा जर उभे असतील तर तुम्ही त्यांना बसायला जागा करून द्याल कि स्वतःचा मासिक धर्म साम्बालात बसाल?बर हाच मासिक धर्माचं कौतुक करत बसलात तर उच्चपदस्थ व्हायची स्वप्न कधीच प्रत्यक्षात येणार नाहीत.ह्या चार दिवसात घरी बाजूला बसवलं तर तो अन्याय आणि बसमध्ये बसूला बसण्यासाठी तर आम्ही सदा रेडी असतो. (मी कराटे खेळायचे.आणि ह्यामध्ये माझा मासिक धर्म कधीही मध्ये आला नाही.माझाच नाही तर माझ्याबारोर्च्या इतर मुलींनाही कधी मासिक धर्म म्हण्जे कटकट वगैरे वाटला नाही.) शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

१.सरकारने गर्भलिंग चाचणीवर

किचेन
Sat, 03/17/2012 - 17:28 नवीन
१.सरकारने गर्भलिंग चाचणीवर बंदी घालूनही गर्भलिंग निदान केले जाते आणि त्यात अनेक मुलींचा बळी जातो हि अतिशय लांच्छनास्पद गोष्ट आहे. २.वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती हि ग्रामीण भागात जास्त असते.ग्रामीण भागात मुळातच पुस्तक वाचल्यान पोट भरणार नाहीये हे तत्वाद्यान असत.अनेक शाळांमध्ये मुलं आणि मुली फक्त हजेरीलाच असतात.नंतर हळूच पळून जाऊन मुल, मुली गुर राखायला, शेतीच्या कामाला घरच्यांना मदत करतात.त्यामुळे मुलांचही शिक्षण थांबत आणि मुलींचाही. ३.शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते. ४. एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात. ५. मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. प्रत्येकवेळेस मुलांकडे वंशाचा दिवा म्हणून बघितले जात नाही.जसा जसा मुलगा मोठा होतो तसं तसं ह्या वंशाच्या दिव्यच रुपांतर म्हतार्पांच्या काठीत होत.बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत. बसमध्ये उभ्या/बसलेल्या प्रत्येक बाईला मासिक धर्म असतोच का हो?एखादे वृध्द आजोबा जर उभे असतील तर तुम्ही त्यांना बसायला जागा करून द्याल कि स्वतःचा मासिक धर्म साम्बालात बसाल?बर हाच मासिक धर्माचं कौतुक करत बसलात तर उच्चपदस्थ व्हायची स्वप्न कधीच प्रत्यक्षात येणार नाहीत.ह्या चार दिवसात घरी बाजूला बसवलं तर तो अन्याय आणि बसमध्ये बसूला बसण्यासाठी तर आम्ही सदा रेडी असतो. (मी कराटे खेळायचे.आणि ह्यामध्ये माझा मासिक धर्म कधीही मध्ये आला नाही.माझाच नाही तर माझ्याबारोर्च्या इतर मुलींनाही कधी मासिक धर्म म्हण्जे कटकट वगैरे वाटला नाही.) शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

कधीपासून याच मुद्द्यांवर

कवितानागेश
Sat, 03/17/2012 - 19:04 नवीन
कधीपासून याच मुद्द्यांवर लिहायचे होते, पण ...... फक्त एकच टिप्पणी करतेय... अनेक घरांमधून दिसणारी गोष्ट आहे. जेंव्हा एखाद्या घरात मुलीला 'परकी' होनार म्हणून कमीपणाची वागणूक आणि मुलाला मात्र 'आपला सांभाळ' करणार म्हणून 'प्रेमाची' वागणूक मिळते तेंव्हा तिथे दोन्हीकडेही 'अर्थकारण'च असते. मुलाला काही 'निरपेक्ष प्रेम' वगरै मिळालेले नसते. त्याच्यापुढची आव्हाने वेगळी असतात. थोडक्यात मुलीला डायरेक्ट एरंडेल आणि मुलाला मात्र शुगर कोटेड जुलाबाची गोळी इतकाच फरक असतो! मूळ मुद्दा हा आहे, की माणसे प्रेमाची, वात्सल्याची नैसर्गिक अंतःप्रेरणा विसरून अती-भौतिक होतात, तेंव्हा वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन हे असे तट पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

किचेन ताई तुमची मते चांगलीच

मनीषा
Sun, 03/18/2012 - 01:08 नवीन
किचेन ताई तुमची मते चांगलीच जहाल आहेत.
शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते.
करिअर करण्याची मुभा असते, म्हणजे तो त्यांचा हक्क नसतो का?
एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात.
माझ्या पहाण्यात अशी काही उदाहरणे आहेत की बहीणीने स्वतः अविवाहीत राहून घर सावरले. जेव्हा घरावर एखादी आपत्ती येते तेव्हा घरातील प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा मुकाबला करतात. त्यात मुलगा, मुलगी असा भेद नसतो.
मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.
हे जरी खरे असले तरी तडजोड करायची वेळ आली तर ती स्त्रीलाच करावी लागते.
प्रत्येकवेळेस मुलांकडे वंशाचा दिवा म्हणून बघितले जात नाही.जसा जसा मुलगा मोठा होतो तसं तसं ह्या वंशाच्या दिव्यच रुपांतर म्हतार्पांच्या काठीत होत.बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत.
या मुद्द्याचा तुम्हीच विचार करा. म्हणजे त्यातला विरोधाभास कळेल. मुलीचे लग्न झाले की तिचा माहेरशी संबध कारणपरत्वे असतो. तसेच मुलीच्या सासरी आई वडिल सारखे सारखे जाऊ शकत नाही कारण लगेच त्यांना "लेकीकडे जाईन, तुपरोटी खाईन, धष्ट पुष्ट होईन ..." इत्यदि कथा + टोमणे ऐकवले जातात. पण हेच आईवडिल स्वतःच्या मुलाकडून आणि सुनेकडून फक्त सेवा घेत नाहीत तर त्याच्या संसाराला सर्वोतोपरी मदत करतात. काही लेकुरवाळे आजीआजोबा माझ्या माहीतीमधे आहेत जे आपले वय, दुखणी विसरून नातवंडांचे संगोपन करतात, घरच्या सर्व जबाबदार्‍या पार पाडतात. आणि निवृत्तीच्या वयात देखील घरातील कामे करत नाही म्हणून मुलाची आणि सुनेची बोलणी (काही जण) ऐकून घेतात. मुलीप्रमाणेच मुलाच्याही शिक्षणाला, लग्नाला खर्च येतोच. मग त्या मुलाने आईवडिलांसाठी काही केले तर त्याची एव्हढी जाहिरात करण्याचे काय कारण ? राहता राहीला प्रश्न ५०-५० करण्याचा. बहीणीने मागीतले तर तिला लालची म्हणता, आणि त्याच भावाच्या पत्नीने तिच्या वडिलांच्या संपत्तीतून मागीतले तर तो मात्र तिचा हक्क?
(मी कराटे खेळायचे.आणि ह्यामध्ये माझा मासिक धर्म कधीही मध्ये आला नाही.माझाच नाही तर माझ्याबारोर्च्या इतर मुलींनाही कधी मासिक धर्म म्हण्जे कटकट वगैरे वाटला नाही.)
असा मुद्दा मांडताना तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता आहात. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात हे तुम्हाला सांगायला हवे असे नाही. तुम्हाला त्रास झाला नाही/होत नाही म्हणजे इतरांना तो होत नसेलच असे नाही ना? आणि या व्यतिरिक्त इतरही कारणे आहेत. गर्दीमधे ,प्रवास करताना स्त्रियांना (भारतात) अनेक त्रास होतात. त्याचा अगदी शब्दशः उल्लेख करायची जरूरी नाही. त्यामुळे अशा तर्‍हेचे आरक्षण जर स्त्रियांसाठी असेल तर ते योग्यच आहे. फक्त यात स्त्रियांनी थोडे तारतम्य दाखवायला हवे. प्रत्येक ठिकाणी केवळ अधिकार गाजवू नये.
शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.
हे लाखमोलाचे वाक्य आहे. पण हे फक्त स्त्रियांनी बोलून उपयोगी नाही तर पुरूषाना देखीत ते कळले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

किचेन ताई तुमची मते चांगलीच

५० फक्त
Sun, 03/18/2012 - 10:27 नवीन
किचेन ताई तुमची मते चांगलीच जहाल आहेत. +१००, आणि ती व्यावसायिक अनुभवातुन आलेली आहेत, त्यामुळे जास्त महत्वाची. (संदर्भ. मा. किचेनतैंचे प्रोफाईल) शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते. करिअर करण्याची मुभा असते, म्हणजे तो त्यांचा हक्क नसतो का? - प्रश्न विचारताना एक अतिशय महत्वाचा शब्द गाळलात तुम्ही ' आवडीच्या' , हेच मुलांबद्दल ही होते. - घराची परिस्थिती सांभाळण्यासाठी करियर करणे आणि आवडीच्या क्षेत्रात करीयर करणे यात फरक आहे, मनुष्यजन्म एकदाच मिळतो अशी माझी तरी समजुन आहे. एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात. माझ्या पहाण्यात अशी काही उदाहरणे आहेत की बहीणीने स्वतः अविवाहीत राहून घर सावरले. जेव्हा घरावर एखादी आपत्ती येते तेव्हा घरातील प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा मुकाबला करतात. त्यात मुलगा, मुलगी असा भेद नसतो. मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. हे जरी खरे असले तरी तडजोड करायची वेळ आली तर ती स्त्रीलाच करावी लागते. - आता आपल्या क्षेत्रात मोठ्या पदावर जाण्यासाठी पुरुषांना काय तडजोडी कराव्या लागतात यावर एक लेख लिहावा लागेल असं वाटतंय. प्रत्येकवेळेस ...करण्याचे काय कारण ?(बराच भाग गाळला आहे, उगा मेगाबायटी प्रतिसाद व्हायला नको) राहता राहीला प्रश्न ५०-५० करण्याचा. बहीणीने मागीतले तर तिला लालची म्हणता, आणि त्याच भावाच्या पत्नीने तिच्या वडिलांच्या संपत्तीतून मागीतले तर तो मात्र तिचा हक्क? - मुलगी, सासर, माहेर, पगार आणि खर्च यावर एक वेगळी चर्चा इथं झाली आहे आधी. आणि वर लिमाउजेटनी लिहिलंय तसं, या समानतेच्या ओढाताणीत 'थोडक्यात मुलीला डायरेक्ट एरंडेल आणि मुलाला मात्र शुगर कोटेड जुलाबाची गोळी इतकाच फरक असतो! - हे आपण विसरुनच जातो. मूळ मुद्दा हा आहे, की माणसे प्रेमाची, वात्सल्याची नैसर्गिक अंतःप्रेरणा विसरून अती-भौतिक होतात, तेंव्हा वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन हे असे तट पडतात.' + १००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

किचेन ताई तुमची मते चांगलीच

मनीषा
Sun, 03/18/2012 - 13:00 नवीन
किचेन ताई तुमची मते चांगलीच जहाल आहेत. +१००, आणि ती व्यावसायिक अनुभवातुन आलेली आहेत, त्यामुळे जास्त महत्वाची. (संदर्भ. मा. किचेनतैंचे प्रोफाईल)
विवाह जुळवण्याच्या व्यवसाय ....... ...... ........ !!! असो. २. माझा आक्षेप मुभा म्हणजे परवानगी या शब्दाला होता. तिने आवडीच्या किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करावे की न करावे या साठी तिला इतरांची परवानगी कशासाठी हवी. मनुष्यजन्म एकदाच मिळतो अशी माझी देखील समजूत आहे. पण हे ही माहीती आहे की प्रत्येकाला आपल्याला हवं तेच करायला मिळते असे नाही. पण त्यातही स्त्रियांना करायला लागणार्‍या तडजोडीचे प्रमाण खूपच जास्त आहे. ३..... ४.
आता आपल्या क्षेत्रात मोठ्या पदावर जाण्यासाठी पुरुषांना काय तडजोडी कराव्या लागतात यावर एक लेख लिहावा लागेल असं वाटतंय.
मी व्यावसायिक तडजोडीबद्दल बोलत नाहीये. ५०-जी ... तुम्ही माझीच वाक्ये तुमच्या प्रतिसादात कॉपी-पेस्ट केली आहेत. आणि त्यावर तुमची मते फारच संक्षिप्त दिली आहेत. नीटसे काही कळले नाही, की तुम्हाला नक्की म्हणायचे काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

५० जी कृपया थोडे विस्कटून सांगाल का

Pearl
Mon, 03/19/2012 - 00:43 नवीन
>>५०-जी ... तुमची मते फारच संक्षिप्त दिली आहेत. नीटसे काही कळले नाही, की तुम्हाला नक्की म्हणायचे काय आहे?>> +१ प्रतिसादावरून तुम्हाला काय म्हणायचे आहे ते खरचं कळत नाहिये. थोडे विस्कटून सांगाल का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

१. मी तर म्हणतो, निदान

५० फक्त
Mon, 03/19/2012 - 08:50 नवीन
१. मी तर म्हणतो, निदान मुलींना परवानगी मागावी लागते म्हणजे एक पर्याय उपलब्ध तरी आहे, एक जर - तर चं स्टेटमेंट तरी आहे, पण मुलांना हा पर्यायच नाही, शिक्षण झालं की लगेच किंवा ते अर्धवट सोडुन सुद्धा संसाराची, मग तो कुणाचाही असो, कारण रुढार्थानं लग्न झाल्याशिवाय स्वताचा संसार नसतो, मग वडिलांने जे काही निर्माण करुन ठेवलं आहे, मग ती मुलं असोत किंवा कर्ज याची जबाबदारी घ्यावीच लागते, हा अन्याय नाही का ? एखादी गोष्ट करायची किंवा करायची नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसणं हा अन्यायच ना ? मुलीनं नोकरी नाही केली तर घरकाम करेल अन लग्न करुन जाईल तिच्या घरी हा राजमार्ग आहे, पण मुलाला हा / किंवा असा कोणताही पर्याय उपलब्धच नाही असं का ? २. मी व्यावसायिक तडजोडीबद्दल बोलत नाहीये. - मग सासरच्या घरात जी काही मोठी पदं असतात ती एकतर वय वाढल्यानं मिळतात किंवा घरातल्या जबाबदा-या व्यवस्थित पार पाडल्यानं मिळतात, उगा लग्न करुन सासरी आलात की त्या घरातलं सगळ्यात महत्वाचं पद, अधिकाराचं पद, निर्णय घेणारं पद मला लगेच मिळावं हा अट्टाहास कशासाठी ? आणि कराव्या लागल्या यासाठी तडजोडी तर काय हरकत आहे ? मागच्याच आठवड्यातले उदाहरण, सासु नोकरी करु देत नाही म्हणुन सुनेने आयब्रो करण्याच्या निमित्ताने तिचा खुन केला, केली तडजोड खुन करुन तुरुंगात जाण्याच?, आता तुरुंगातुन नोकरी करायला जाउ देत नाहीत म्हणुन जेलरचा खुन करणार ? मा. पिलियन रायडर यांचे 'माझ्या मते विवाह हे तर स्त्री -शोषणाचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.. ' हे मत, विमे म्हणतात तसं ' ते एक केवळ blanket स्टेटमेंट आहे , जसं की माजलेली विवाहसंस्था वगैरे ' की याबाबत काही अनुभव आहे, हे समजले म्हणजे त्यावर पुढे चर्चा करता येईल. याबाबत विमेंशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

किचेन ताई तुमची मते चांगलीच

पिलीयन रायडर
Sun, 03/18/2012 - 21:02 नवीन
किचेन ताई तुमची मते चांगलीच जहाल आहेत. +१००, आणि ती व्यावसायिक अनुभवातुन आलेली आहेत, त्यामुळे जास्त महत्वाची. (संदर्भ. मा. किचेनतैंचे प्रोफाईल)
हे वाक्य बर्‍याचदा वाचलय म्हणुन... ह्याच ताईनी मागे एकदा "ईंजिनिअर" मुलींबद्दल पण मत व्यक्त केले होते.. आता तेव्हा आमच्या सारख्या "पुरुष्प्रधान" मेकॅनिकल मध्ये काम करणार्या मुलींनी मत मांडले होते तेव्हा नाही कुणि आमचे प्रोफाईल ग्रुहित धरले... उलट, माझ्या मते विवाह हे तर स्त्री -शोषणाचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.. किचेन ह्यांना जास्त जाणीव हवी...आणि बोलण्याचे तारतम्य सुद्धा.... (दुवा: ताईंची शब्दकमले: मुर्खपणा..स्टुपिडिटि...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

पिलियन ताई मीही इंजीनियाच आहे

किचेन
Sun, 03/18/2012 - 22:20 नवीन
पिलियन ताई मीही इंजीनियाच आहे .हा व्यवसाय सुरु करण्याआधी मी एका कंपनीमध्ये तपासणी अभियंता होते.पूर्ण कंपनीत एकटीच मुलगी.पण मला कुठेही मुल माझी टिंगल करतायत किवा मदत करत नाही, दुय्यम लेखतात, एकात पडतात असा अनुभव आला नाही.त्यामुळेच मी पुरुषांच्या विरोधात नाही.तिथेच मुलगा होण्याचे तोटे कळायला सुरुवात झाली.नंतर वधू वर सूचक केंद्रात आणखीन अनेक तोटे कळले.निदान आठवड्यातून एकदा तरी देवाला मी मुलगा नाही म्हणून धन्यवाद बोलायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पिलियन ताई मीही इंजीनियाच आहे

पियुशा
Mon, 03/19/2012 - 10:59 नवीन
पिलियन ताई मीही इंजीनियाच आहे .हा व्यवसाय सुरु करण्याआधी मी एका कंपनीमध्ये तपासणी अभियंता होते.पूर्ण कंपनीत एकटीच मुलगी.पण मला कुठेही मुल माझी टिंगल करतायत किवा मदत करत नाही, दुय्यम लेखतात, एकात पडतात असा अनुभव आला नाही.त्यामुळेच मी पुरुषांच्या विरोधात नाही.तिथेच मुलगा होण्याचे तोटे कळायला सुरुवात झाली.नंतर वधू वर सूचक केंद्रात आणखीन अनेक तोटे कळले.निदान आठवड्यातून एकदा तरी देवाला मी मुलगा नाही म्हणून धन्यवाद बोलायचे. अग काय हे किचन तै ? मी सुद्धा एका कंपनीमध्ये तपासणी अभियंता आहे ,मागे ही तु एकदा असच म्हणाली होती एका धाग्यावर की, म्याकेनिकल फिल्ड मधल्या मुलीना "अप्रन " घालायची लाज वाटते,हाताला ऑइल ,ग्रीस,बर , लागुन हात खराब होउ नयेत म्हनुन मुली फार काळजी घेतात वैगेरे वैगेर ..... मला एक कळत नाही ति एक स्त्री असौन नेहमी विरोधी पार्टीची च का साइड घेते ? तुला मुलाचीच बाजु नेहमी योग्य वाट्ते अग जशी परिस्थिती तसे प्रत्येकाचे वेगवेगळॅ अनुभव असतात ,समस्त स्त्री - पुरुषाना एकाच पारड्यात कस तोलणार? केवळ मुलगा आहे म्हणुण तो आपल्या आइ-वडिलाची म्हातरपणाची काठी आहे अन तो शेवट्पर्यन्त साम्भाळेल याची काहीच शाश्वती नाही ,उलट एका घरात राहुन सुद्धा म्हातार्या आइच्या सुष्रुसेसाठी कामवाली बाइ ठॅवलेली मी रोज पाहते आहे ,त्या उलट वडील नाहित अन तीनही बहिणी आहेत म्हणूण नोकरी करणार्या ,अन घर साम्भाळ्नार्या मुलीही मी रोज पाहते " स्त्री - पुरुष समानता वैगेरे वैगेर कोणत्या मापद्ण्डाने तोलन्याची मुळात गरजच काय ? प्रत्येकाचे आयुष्य हे वेगवेगळ अण अनुभव वेगवेगळॅ जगण्याची धड्पड वेगवेगळि , इथे समाजातल्या काही वर्गाला दोन वेळ्च्या जेवणाची भ्रान्त पड्ली आहे ,असे वर्गातले स्त्री - पुरुष कसलाही भेदभाव अथवा समानता न ठॅवता कम्बर कसुन काम करतात हे रोज पाहतोच की आपण :) " एकुणच काय प्रत्येकाचे जगण्याचे निकष हे ज्या त्या कुटुम्बाच्या (आर्थिक्,सामाजिक,भावनिक)परिस्थीतीवर अवलम्बुन असतात स्त्री-पुरुष समानतेवर अथवा भिन्नतेवर नाही :) अजुन काय बोलणार या मुद्द्यावर? असो........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

मी जेव्हा तपासणी अभियंता

किचेन
Mon, 03/19/2012 - 15:49 नवीन
मी जेव्हा तपासणी अभियंता म्हणून काम करत होते तेव्हा मुलांनी मला खरच खूप मदत केली.जेव्हा जड जोब वरच्या मजल्यावर न्यायचे असायचे तेव्हा मुल मला मदत करायची.मीही त्यांना .आमचे सगळ्यांचेच कपडे ग्रीस आणि धूळ वगैरेनी भरलेले असायचे.हात धुवायला आमच्या कंपनीत रीन साबण वापरायचे.पण कोणाची तक्रार नव्हती.ती सुरु झाली ती दुसरी एक मुलगी आल्यावर.याव उचलणार नाही, त्याला हात लावणार नाही,रीन्ने हात धुणार नाही,तुझा जोब तू ने कि वर मी का तुला मदत करू? वगैरे सुरु झाल,मी फक्त टेबलवर पी सी बी तपासणार अस सुरु झाल..साहजिकच जी मुल तिला मदत करत होती त्यांनी तिला मदत करण्यात फार उत्साह दाखवला नाही.तिने वारीस्थांकडे जाऊन फक्त टेबलवर काम करण्याची परवानगी मागितली.ती तिला मिळाली हि.कारण ती मुलगी होती. पिलियन तै, पियुषा ततुम्हि दोघि इंजिनियर आहात.तुझ्याबरोबर काम करण्यार्या ,तुझ्या वयाच्या मुलांबरोबर तू एकदा स्वतःला कमपेअर करून बघ.तुझ्या मित्रांपैकी एक असेल तर उत्तमच.निदान आपले वडील, किवा भाऊ, नवरा, दीर यांच्या बरोबर पण स्वतःला कम्पेअर कर. माझी खात्री आहे त्यानंतर तूला जाणीव होईल कि पुरुषाचा जन्म सोपा नाही. मी आधी बोलल्याप्रमाणे निदान एकदा तरी पुरुषाच्या चपलेत पाय घालून बघा.जेवढ वाटत तेवढ सोप नाहीये. मी स्त्री आहे म्हणून मी स्त्रियांचीच बाजू घेतली पाहिजे ..ये बात कूच हजम नही हुई.आणि जेव्हा दिसतंय कि पुरुषांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय, अशा अडचणी ज्या माझ्यावर आल्या तर मी किवा आपल्यापैकी अनेक स्त्रिया त्यांना तोंड देण्याऐवजी तोंड फिरवून निघून जाईल, तेव्हा मी स्त्रियांचीच बाजू घेईल अशी अपेक्षा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

पिलियन तै, पियुषा ततुम्हि

पियुशा
Mon, 03/19/2012 - 16:43 नवीन
पिलियन तै, पियुषा ततुम्हि दोघि इंजिनियर आहात.तुझ्याबरोबर काम करण्यार्या ,तुझ्या वयाच्या मुलांबरोबर तू एकदा स्वतःला कमपेअर करून बघ.तुझ्या मित्रांपैकी एक असेल तर उत्तमच. अस्स असेल तर मग मी त्या मुलापेक्षा नक्कीच १०० % आउट पूट देत असेल निश्चित एक सान्गते आमच्याकडे १०० % इन्स्पेक्शन आहे नो एक्स्क्युज , तरीही मुल जॉब चेक करण्यात जो आळशीपणा दाखव्तात तो मी रोजच पाहते आहे भलेही तो माझा मित्र का असेना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

उलट, माझ्या मते विवाह हे तर

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 03/18/2012 - 22:58 नवीन
उलट, माझ्या मते विवाह हे तर स्त्री -शोषणाचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे
बाकीचे मुद्दे राहूदेत, त्यावर बरीच चर्चा झाली आहे. या तुमच्या मौलिक मतावर अजून जाणून घेणे आवडेल. एक धागाच काढा ना तुम्ही. स्वगत :- टोकाची मते मांडून आपण आपलीच गोची करतो हे लोकांच्या का लक्षात येत नाही ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हे कसं चुक ते तुम्ही का नाही

शिल्पा ब
Sun, 03/18/2012 - 22:59 नवीन
हे कसं चुक ते तुम्ही का नाही पटवुन देत? प्रतिवाद तुम्ही करताय म्हणुन विचारलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

यात प्रतिवाद कुठे दिसला

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 03/19/2012 - 00:06 नवीन
यात प्रतिवाद कुठे दिसला तुम्हाला ?? मुळात प्रतिवाद करायला त्यांनी "वाद" कुठे केलाय. मुद्दे मांडलेच नाहीत या बाबतीत. ते एक केवळ blanket स्टेटमेंट आहे. अशा प्रत्येक blanket स्टेटमेंटचा प्रतिवाद करायला वेळ/शक्ती/कुवत/इच्छा/हौस नाही माझ्याकडे. त्यांना त्यांचे मुद्दे सप्रमाण मांडू देत, मग बोलू ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

विमे...

पिलीयन रायडर
Mon, 03/19/2012 - 12:32 नवीन
एवढं माझ्या मताला मौलीक वगैरे म्हणल्य बद्दल धन्यवाद... कसय ना काका/दादा... (मला तुमचे वय माहीत नाही) मुलगी जन्मली की पहिला विचार काय असतो... आता हिच्या लग्नाचे पैसे?? मुलगी वयात आली की दाखवण्याचे कार्यक्रम्..त्यात मुलीला नकाराचा दुय्यम अधिकार... तिला बघितलं जाणार ते रंग्-रुप ह्या वरुन.. तिने नोकरी करायची की नाहि हे पण मुलगा ठरवणार.. तिला घरकाम आलं पाहिजे ( काही ठिकाणी चालुन दाखव..सुइत दोरा ओवुन दाखव..हे प्रकार पण होतात).. काळ्या मुलीम्ची तर वाट लागते ह्या प्रकारात.. सतत नकार पचवुन ह्या मुली निराश झालेल्या असतात... आप्ल्याकडे सर्व साधारणपणे लग्न मुलीकडचे करुन देतात.. वर पुन्हा हुंडा (लाखात), सोनं (तोळे -किलोत), जमल्यास फ्लॅट, गाडी वगैरे मुली कडचे मुलाला देतात... किमान लग्न तरी लावुन देतातच.. त्यात मग मान्-पान आलंच.. मान हा वरपक्षाला असतो.. ते जे म्हणतील ते आणि तसं होतं.. लग्ना नंतर पण भरपुर काही नाटकं असतात्..पहिला सण.. बाळांतपण.. सगळं काही मुलीचा बाप करतो..प्रत्येक वेळेस आहेर... कधी कधी पैशाची मागणी सुरुच रहाते.. त्यातुन मग मारहाण्..जाळुन टाकणे.. दुसरे लग्न लावण्याची धमकी... सासुरवास.. मुलगी लग्न करते..आपलं घर -नाव सगळं मागे सोडते.. बापचा पैसा सासरी आणते.. "म्हातार पणाची काठी आणि वंशाचा दिवा" बनु शकत नाही.. म्हण्जे माहेरी तिचा काय "फायदा"?? उलट आई-वडिल जन्माची मानहानी आणि खर्च ह्या एका लग्नात पहातात.. आता मला सांगा काय चुकीचं लिहिला मी?? हे सगळे प्रकार नसते तर झाल्या असत्या मुली नकोशा?? आता असं म्हणु नका की मुलींनिच हिम्मत दाखवली पाहिजे नाही तर काही होउ शकत नाही... ज्या मुली शिकतात्..ज्यांच्या घरात वर सांगितलेली परिस्थिती नसते त्या मुलिंच्या बाबतीत हे होतंच नाही हो... त्या होउ देतच नाहित.. पण एखाद्या खेड्यातल्या बिहार्,राजस्थान मधल्या मुलीला फार अवघड आहे हे चक्र मोडणं... अणि हो.. एका मोठ्या प्रतिसादातिल वाक्ये चिवडुन चिवडुन एका ओळीला पकडुन प्रतिसाद देण्या पेक्षा तुमचा स्वतःच म्हणण काय हे ह्या सगळ्या विषयावर हे जाणुन घ्यायला आवडेल.. या धाग्यावर कुठे दिले असल्यास लिंक द्यावी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा