✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

टुकारघोडे! (हझल)

ग — गंगाधर मुटे, Sat, 03/10/2012 - 19:48
टुकारघोडे! (हझल)

उगाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे टुकारघोडे हजार आहे

कशी बघा चालते कचेरी, अशी जशी की दुकानदारी
अनाथ सोडून कायद्याला, विधानमंडळ फ़रार आहे

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला
मुरूम गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे

गमावतो ना कधीच संधी सफ़ेद कुत्रा पिसाळलेला
डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे

कुठून आणू नवीन गजरा, दुकान शोधू कुठे नव्याने?
सरून पर्याय सर्व गेले, जुनीच देणी उधार आहे

परंपरा-वंश लाभ ज्यांना, इथे तयांनाच ’अभय’ आहे
फ़िरोजघरचे गिधाड-कुत्रे, नेमून येथे हुशार आहे


                                                     - गंगाधर मुटे
---------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
2496 वाचन

💬 प्रतिसाद (14)

मस्तच

सांजसंध्या
Sat, 03/10/2012 - 19:50 नवीन
मस्तच :)
  • Log in or register to post comments

मस्त रचली आहे.

प्रचेतस
Sat, 03/10/2012 - 19:53 नवीन
मस्त रचली आहे.
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Sat, 03/10/2012 - 19:56 नवीन
मस्त! पण हा हझल काय प्रकार आहे कोणी सांगेल का?
  • Log in or register to post comments

कॉलींग चौकटराजा आजोबा. ए

यकु
Sat, 03/10/2012 - 20:06 नवीन
कॉलींग चौकटराजा आजोबा. ए सांजसध्ये तु पण बोलाव.. म्हणजे ते आजोबा येतील ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मला तर ते (मनाने) तरूणच

सांजसंध्या
Sat, 03/10/2012 - 21:39 नवीन
:D मला तर ते (मनाने) तरूणच वाटतात ब्वॉ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

मनाने सगळेच तरुण असतात!

अन्नू
Sat, 03/10/2012 - 22:02 नवीन
मनाने सगळेच तरुण असतात! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

@मनाने सगळेच तरुण असतात! >>>

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/10/2012 - 22:41 नवीन
@मनाने सगळेच तरुण असतात! >>> Image removed. नेहेले पे देहेला ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

हझल काय प्रकार आहे?

गंगाधर मुटे
Sat, 03/10/2012 - 20:39 नवीन
हास्य गझल म्हणजे हजल. (शिवराळ भाषेतील आणि असंस्कृत शब्द असलेल्या गझलेला सुद्धा हझल म्हणता येईल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

लै भारी..मस्त्..भन्नाट.

पक पक पक
Sat, 03/10/2012 - 20:38 नवीन
लै भारी..मस्त्..भन्नाट. :)
  • Log in or register to post comments

मुटे काका ...एक नंबर हो...

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/10/2012 - 22:57 नवीन
मुटे काका ...एक नंबर हो... मिश्रण Image removed. झकास जमलं आहे :-)
  • Log in or register to post comments

ए ,मी आलो आहे रे ! ( ओक येत आहेत या चालीवर )

चौकटराजा
Sun, 03/11/2012 - 08:32 नवीन
गंगाधर बुवा , लचके उगीच घेउ असला स्वभाव नाही काही तरीच लिहावे तर " भाव " नाही है , सांजसंध्या, आमचे वृत्त गंडले इथे ही असेल. वृती नाही. बुवांची " हझल" मस्त ! मस्त! मस्त ! वाचण्यासाठी मस्ट मस्ट मस्ट ! हटके गजल हसरी गजल हरकती गजल कुठून आणू नवीन गजरा, दुकान शोधू कुठे नव्याने? सरून पर्याय सर्व गेले, जुनीच देणी उधार आहे सामान्य माणसाची हतबल अगतिक अवस्था मोजकेपणे !
  • Log in or register to post comments

गंगाधर राव गुस्ताखी माफ अगर वृत्त गंड जाये !

चौकटराजा
Sun, 03/11/2012 - 14:14 नवीन
लवाजमा भ्रष्ट जमून गेला मिटून डोळे पुढारी आहे कशी आणू शिस्त याच देशी त्यांच्या वरी तर मदार आहे !
  • Log in or register to post comments

झकास

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 03/12/2012 - 11:40 नवीन
मस्त जमलीय.
  • Log in or register to post comments

गमावतो ना कधीच संधी सफ़ेद

गणेशा
Mon, 03/12/2012 - 21:23 नवीन
गमावतो ना कधीच संधी सफ़ेद कुत्रा पिसाळलेला डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे
मस्त एकदम . गझल आवडली.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा