Skip to main content

टुकारघोडे! (हझल)

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 10/03/2012 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
टुकारघोडे! (हझल)

गाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे टुकारघोडे हजार आहे

कशी बघा चालते कचेरी, अशी जशी की दुकानदारी
अनाथ सोडून कायद्याला, विधानमंडळ फ़रार आहे

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला
मुरूम गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे

गमावतो ना कधीच संधी सफ़ेद कुत्रा पिसाळलेला
डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे

कुठून आणू नवीन गजरा, दुकान शोधू कुठे नव्याने?
सरून पर्याय सर्व गेले, जुनीच देणी उधार आहे

परंपरा-वंश लाभ ज्यांना, इथे तयांनाच ’अभय’ आहे
फ़िरोजघरचे गिधाड-कुत्रे, नेमून येथे हुशार आहे


                                                     - गंगाधर मुटे
---------------------------------------------------
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2514
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

मस्त! पण हा हझल काय प्रकार आहे कोणी सांगेल का?

In reply to by पैसा

हास्य गझल म्हणजे हजल. (शिवराळ भाषेतील आणि असंस्कृत शब्द असलेल्या गझलेला सुद्धा हझल म्हणता येईल.)

गंगाधर बुवा , लचके उगीच घेउ असला स्वभाव नाही काही तरीच लिहावे तर " भाव " नाही है , सांजसंध्या, आमचे वृत्त गंडले इथे ही असेल. वृती नाही. बुवांची " हझल" मस्त ! मस्त! मस्त ! वाचण्यासाठी मस्ट मस्ट मस्ट ! हटके गजल हसरी गजल हरकती गजल कुठून आणू नवीन गजरा, दुकान शोधू कुठे नव्याने? सरून पर्याय सर्व गेले, जुनीच देणी उधार आहे सामान्य माणसाची हतबल अगतिक अवस्था मोजकेपणे !

मस्त जमलीय.

गमावतो ना कधीच संधी सफ़ेद कुत्रा पिसाळलेला डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे
मस्त एकदम . गझल आवडली.