✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एकात एक...

ग
गवि यांनी
Wed, 03/07/2012 - 18:05  ·  लेख
लेख
भात लावायचाच ना भांड्यात.. मूठभर डाळ त्यातच टाकू.. होऊन जाईल एकात एक.. भेकरटाप्रमाणे चहाच्या कपावर धरलेलं ओलंगिच्च बिस्कीट.. लपलपत पत्तकन चहात पडण्याची वाट पाहताना पुन्हा चटका मिळणार म्हणून शहारलेलं.. ते पडल्यानंतरही इकडे पेपरात रुतलेली बुबुळं तिथेच भिरभिरत राहतात.. चहासोबत पेपरही संपवू.. होऊन जाईल एकात एक.. आईची एकसष्ट पूर्ण झाली.. विधीबिधीवर विश्वास नाही पण सगळ्यांना बोलवायला हवंय एकदा....गेट टुगेदर.. रविवार बघून एकदाच एकत्र..बाहेरच कुठेतरी थाळी घालू सगळ्यांना..थाळी म्हणजे फिक्स बिल.. नव्या फ्लॅटची पार्टी, गाडीचीही मागताहेत साले कधीचे... आणि एकसष्टीपण.. होऊन जाईल एकात एक.. बायकोसोबत एरवी एकांत कुठला मिळायला... गणपतिपुळ्याला जाऊ.. समुद्राकाठी रिसॉर्ट...व्हरांड्यात बियरमधून दिसणारा सोनेरी समुद्र..अन डोळ्यांना थंडावा.. दगदगीतून अनवाईंड व्हायला हवं...स्वतःला शोधायला हवं.. ....देऊळही आहे.. जोडीने दर्शनही करु.. होऊन जाईल एकात एक.. पैसा.. बायकोपोरं..कामधंदा..मरातब.... लाँग ड्राईव्हज, वीकेंड गेटवेज.. पॉवर पॉईंट अन कॉन्फरन्सेस.. वर्क लाईफ बॅलन्स.. इंटरपर्सनल इफेक्टिव्हनेस.. आर्ट ऑफ लिव्हिंग... प्लेझर ऑफ गिव्हिंग.. आहारनियंत्रण.. योगासनं.. डूईंग डिफरंट थिंग्ज...आणि डूईंग थिंग्ज डिफरंटली.. उपवास आणि श्वासोच्छवास.. या सर्वांच्या गजबजाटात जगणंही उरकू ...हसत हसत.. लाफ्टर थेरपी.. होऊन जाईल.. एकात एक..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
जीवनमान
राहणी
भूगोल
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
15098 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

क्यालेंडर + ऑर्गनायझर + एम पी

विजुभाऊ
गुरुवार, 03/08/2012 - 19:46 नवीन
क्यालेंडर + ऑर्गनायझर + एम पी ३ प्लेयर + एफ एम रेडियो +इंटरनेट ब्राउजर + क्यामेरा + पेन ड्राईव्ह + ब्याटरी = अलार्म घड्याळ + एस एम एस + एम एम एस + व्हिडीऑ प्लेअर + फोन. चालायच. होऊन जातं एकात एक
  • Log in or register to post comments

मल्टी टास्कींगचा जमाना आहे.

मराठे
गुरुवार, 03/08/2012 - 22:06 नवीन
मल्टी टास्कींगचा जमाना आहे. वेळ कमी काम जास्त. त्यामुळे 'एकात एक' चालायचंच. कधी तरी मात्र एकच एक गोष्ट करावी पूर्ण मन लाऊन आणि ती करण्याचाच आनंद अनुभवावा.
  • Log in or register to post comments

( मी आधीदेखील म्हणलो होतो

मृत्युन्जय
Fri, 03/09/2012 - 13:08 नवीन
( मी आधीदेखील म्हणलो होतो आणि परत म्हणतो गवि म्हणजे मिपाचे एक फाईंड आहेत :) )
  • Log in or register to post comments

कुणातरी वैलचुलीचा

चौकटराजा
Fri, 03/09/2012 - 16:21 नवीन
अरे माझ्या दोस्तानो ! ( माझा कंपू बनला नसला म्हणून काय झाले ? ) इथे कुणीतरी वैलचुलीचा फोटु टाकता का ? ती एकात एक चे जुन्या जमान्यातले उदाहरण आहे !
  • Log in or register to post comments

कुणातरी वैलचुलीचा

चौकटराजा
Fri, 03/09/2012 - 16:22 नवीन
अरे माझ्या दोस्तानो ! ( माझा कंपू बनला नसला म्हणून काय झाले ? ) इथे कुणीतरी वैलचुलीचा फोटु टाकता का ? ती एकात एक चे जुन्या जमान्यातले उदाहरण आहे !
  • Log in or register to post comments

कुणातरी वैलचुलीचा

चौकटराजा
Fri, 03/09/2012 - 16:24 नवीन
अरे माझ्या दोस्तानो ! ( माझा कंपू बनला नसला म्हणून काय झाले ? ) इथे कुणीतरी वैलचुलीचा फोटु टाकता का ? ती एकात एक चे जुन्या जमान्यातले उदाहरण आहे !
  • Log in or register to post comments

छान . फारच छान.

स्पंदना
Sun, 03/11/2012 - 11:30 नवीन
छान . फारच छान.
  • Log in or register to post comments

गवि साहेब

रघु सावंत
Sun, 03/11/2012 - 21:19 नवीन
गवि घरण्याला साजेसे लेखन केलतं असे सारेजण म्हणत आलेत . मी हे प्रथमच तुमचं लिखाण वाचतोय. माझी प्रतिक्रीया म्हणाल तर ती संसारिक माणसाची प्रतिमा असावी असे वाटते.एकच सुट्टी कामं अनेक .एकच मनं पण कल्पना अनेक .तुमचं इतरही लेखन मी वेळातवेळ काढुन वाचेन .प्रथम तुमच्या बद्दल मी रामदास काकां कडून माहिती घेईन सवड काढून भेट घेईनचं रघू सावंत
  • Log in or register to post comments

कमीत कमी शब्दात बरेच काही

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 03/12/2012 - 00:05 नवीन
कमीत कमी शब्दात बरेच काही सांगायचे तुमचे कसब लाजवाब आहे. बऱ्याच दिवसात आपले बोलणे झाले नव्हते. म्हटले इथेच प्रतिसाद देऊन टाकू. होऊन जाईल एकात एक !!! :-)
  • Log in or register to post comments

भारीच!

साती
Tue, 03/13/2012 - 02:21 नवीन
भारीच आहे हे. भेकरट की भेरकट?
  • Log in or register to post comments

पैसा..

यकु
Tue, 03/13/2012 - 05:55 नवीन
पैसा.. बायकोपोरं..कामधंदा..मरातब.... लाँग ड्राईव्हज, वीकेंड गेटवेज.. पॉवर पॉईंट अन कॉन्फरन्सेस.. वर्क लाईफ बॅलन्स.. इंटरपर्सनल इफेक्टिव्हनेस.. आर्ट ऑफ लिव्हिंग... प्लेझर ऑफ गिव्हिंग.. आहारनियंत्रण.. योगासनं.. डूईंग डिफरंट थिंग्ज...आणि डूईंग थिंग्ज डिफरंटली.. उपवास आणि श्वासोच्छवास.. या सर्वांच्या गजबजाटात जगणंही उरकू ...हसत हसत.. लाफ्टर थेरपी.. होऊन जाईल.. एकात एक..
कळस आहे! ______/\______!! शेवटी एकाचा दोन, अर्थात क्रॅक झालो. ;-)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा