अंबरात फिरुनिया उगवतो....
अंबरात फिरुनिया उगवतो, हासरा राजस तारा
परिमळता देहातून गंधित, मोगरमोहर सारा................. || धृ ||
बालपणीचा काळ हरवला, गाव कुसाला सांगा
हिरवाईचा ऋतू परतता, फुलल्या रेशीम बागा
पूर्व दिशेला, भिजवुनि आल्या, कोवळ्या पाऊसधारा ......... || १ ||
स्वप्नांच्या गावात बोलले, बोल मनीचे कोणी
निळ्या बोलक्या.. डोळ्यांमधली, लाजलाजरी गाणी
छेडुनि गे_ला, केस मोकळे, कुठुनी रानचा वारा ..............|| २ ||
काचेच्या पानात अडकली, किरणे रंगीत बाई
तेजाच्या स्पर्शाने फुलली , आंधळी यौवनघाई
विश्वाच्या गर्भाशी घुमला, चैतन्याचा नारा ......................|| ३ ||
अंगण माझे फुलले हसले, तृप्तीने गं न्हाले
हिरवाईचा त्यागुन शालू, मन निळोसे झाले
चाफ्याच्या गंधाने महकला, देहाचा देव्हारा .................... || ४ ||
- संध्या
व्वा..! लयबद्ध...गेय्य...आणी
आत्माजी थँक्स अ लॉट..
सुन्दर..
सुंदर
अस्वस्थामा आणि मिसळलेला
एकच नंबर... सुरेख रचना...
विडंबकांनी तलवारी म्यान
@विडंबकांनी तलवारी म्यान
मी पाडत नै ज्जा. हे थेट
मस्त... अजून येऊ द्यात
धन्यवाद सर्वांचे
मस्तच आहे... आवडली.
मस्त आहे...
अप्रतिम!!!
सर्वांचे आभार