Skip to main content

मजेदार कोडी.....

Published on शनीवार, 18/02/2012
आपल्या रोजच्या जीवनात अनेक माणसे भेटतात. असेच माझ्या एका मैत्रिणीची आईने आम्हाला काही जुनी ग्रामीण कोडी सांगितली होती. सोडवा बरे..... १.) हुमान हुमनी नाकात चिमणी. २.) इवलेसे झाड त्याला घुंगरांचा भार. ३.) वरुन चालतो तांगडतिंगा, खालून चालतो धांगडधिंगा, मधल्या नारीचे नाव काय सांगा? तुमच्याकडे असलेली कोडी पण सांगा बरे का.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 79391
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

सोडवा- १. काळ्या रानात उभी तलवार २. कान असून बहिरा ३. डोळे असून आंधळा ४. इवलीशी बकू तिला काजळ कुकू ५. हसता येईना दात वाकडे

In reply to by डॉ.श्रीराम दिवटे

डॉ. दिवटेंनी प्रतिसाद दिला रे SSSSSSSSSSSSSSS धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर धत्तर तत्तर ............ होहोहोहोहो! तेजायला! प्रश्नच आहेत की हे पण! उत्तर नव्हे. :(

In reply to by प्यारे१

हा डॉक्टरांचा प्रतिसाद मीच पहील्यांदा पाहीला होता. परंतु त्यावेळी माझी बोलती बंद झाली होती, कारण मला वाटले मला डोळे आले की काय! म्हणून त्या दिवसापासून डोळ्यांची वेगवेगळी तपासणी करीत होतो..

काळ्या रानात उभी तलवार म्हणजे केसांत मधोमध पाडलेला भांग. डोळे असून आंधळे सिताफळ. इवलीशी बकू तिला काजळ कुकू म्हणजे गुंजा. हसता येईना दात वाकडे म्हणजे तिफन किंवा तीन दातांचा नांगर!

हे ओळखा पाहू...! १)हिच्यासह मला फिरण्याचा छंद...पण लोकांमधे गेलो की बोल्ती बंद...! २)जानवं असुन अवैदिक...! ३)मार्मिक असुनही अवांतर...! ४)खाचेत कार्डं,,,दातात पैसे...!

In reply to by अत्रुप्त आत्मा

हिच्यासह मला फिरण्याचा छंद...पण लोकांमधे गेलो की बोल्ती बंद...!
= बायको!
मार्मिक असुनही अवांतर
वरच्या उत्तराच्या विरुद्द = नवरा! ;)

हिच्यासह मला फिरण्याचा छंद...पण लोकांमधे गेलो की बोल्ती बंद...! गुर्जींची Activa / गाय छाप तंबाकू जानवं असुन अवैदिक...! नाय महित ब्वा मार्मिक असुनही अवांतर...! मिपा ;)

In reply to by प्रचेतस

मा. श्री. स्पाजी कधीपासुनच घा यकु तीला आलेत, आता याबद्दल तुम्हाला काय सांगायचं म्हंजे , परत त्यात त्या क्रोशाच्या धाग्यावर रेवतीआजीनी ओपन ऑफर दिली आहे, त्यात माझी सुद्धा व्यनिमधली ऑफर आहेच अजुन,

आमच्या लहान पणीचे काही - १) एवढीशी डबी त्यात छुन्नक छैय्या , उघडून पहाते तो अगग्गो बय्या २) अक्कर चक्कर मक्कर त्याला अन्नास पन्नास दारं माझं कोडं ओळखेल त्या देईन पुणं सारं

In reply to by चौकटराजा

एवढीशी डबी त्यात छुन्नक छैय्या , उघडून पहाते तो अगग्गो बय्या
सानिकास्वप्निल यांच्या किचनमधला पाकृचा डबा! Smiley

In reply to by अन्नू

१) एवढीशी डबी त्यात छुन्नक छैय्या , उघडून पहाते तो अगग्गो बय्या २) अक्कर चक्कर मक्कर त्याला अन्नास पन्नास दारं माझं कोडं ओळखेल त्या देईन पुणं सारं

डोळे असून आंधळा.....नारळ हुमान हुमनी नाकात चिमणी......तपकीर हे उत्तर असावे बहुतेक