म्हणून..
लेखनप्रकार (Writing Type)
काही नाही रे भेंचोत.. आमचं नुसतं फ्रेंडलीये..
असं सगळ्या गँगला म्हणत म्हणत आणि आतल्या आत मोहरत जे काही केलं तेव्हाही व्हॅलेंटाईन डे येऊन गेले असणार बरेच..
लक्षात आलं नाही.. आमचं कॅलेंडर वेगळंच होतं.. म्हणून..
तेव्हाही सुरुवात झाली होती.. ग्रीटिंग कार्डांची चार्पाच दुकानं फोडायला..
पण फरक पडला नाही.. कारण ग्रीटिंग घ्यायचं नव्हतंच..
ग्रीटिंगबिटिंग कशाला.. भावनांचं प्रदर्शन नुसतं.. म्हणून..
चॉकलेटं.. हार्टशेपची नव्हती..
तिला दिलं होतं मी.. रावळगाव मला वाटतं.. अन तिनंही मला.. कॉफी बाईट..
रॅपर पडून आहे कपाटात खास कप्प्यात.. ठेवून उपयोग नसला तरी फेकायचं कुठे..
म्हणून..
दोन फेब्रुवारींच्यामधे पाऊस येतोच.. तेव्हाही यायचाच..
कानात गप्पकन दडा बसेस्तो भिजलो.. कधीकधी तर चक्क तिच्यासोबतही..
कॉलेज चुकवून.. करियरची कधी शाट पर्वा नव्हती...तिलाही..मलाही..
म्हणून...
त्या वेळच्या त्या घरच्या त्या बागेत लाल गुलाब होता तिज्यायला..वास अजून नाकात..
पण तोडला कधीच नाही.. सगळे आपोआप कोमेजू दिले..
तोडून कशाला कोमेजवायचे.. म्हणून..
शहराच्या नावावरुन अमेरिका की ऑस्ट्रेलिया कळत नसलं तरी कुठेतरी ती आहे..
कुठेतरी आहे तशीच फेसबुकवरही..
पोराचे हॅलोवीन की थँक्सगिव्हिंगचे फोटो अपलोडवत.. मीही टाकलेत मारुति आल्टो घेतली तेव्हाचे..
आली होती तिची फ्रेंड रिक्वेस्टही..
"नॉट नाऊ" क्लिक केलं..
"नेव्हर"चं बटण नव्हतं..
म्हणून..
प्रतिक्रिया
च्यायला गवि, हळवं केलंत राव.
आयला गवि, काय लिहितोयस रे....
+१
+१००००००
वा! गवि खुप छान !! मस्त लिहील
फकस्त आटवन रायलिय !!!!!!!
बोंबला!
काय रे बाबा...
सेम हियर
........................
......................
छान लेख
स्पीचलेस...
आमचं नुसतं फ्रेंडलीये..
आमचं नुसतं फ्रेंडलीये..
__/\__
वाचला तुमचा लेख!!
...................
+१
दिल के अरमांऽऽऽऽऽ आंऽऽऽऽऽसुओं
!!
टोपी काढली आहे...
_/\_
+१
सुंदर
गवि........ आम्हाला खूप
अज्ञानात सुख असते भाऊ. कशाला
हाण्ण!!!
सुंदर !!
लयच भारी राव
जबरा लिहलंय गवि. तसं तर ते
एकच शब्द, रडवलत साहेब
एक नंबर
व्वा!!
गाविंचे विमान व हवाई प्रवास
सुरेख!
जबरदस्त
त्या वेळच्या त्या घरच्या त्या
अरेरे. झाल्या गोष्टीचं वाईट
बढिया..बढिया!!
+१००, कालेजात बाकी लोकांना
पन्नास फक्तराव,
काही नाही रे भेंचोत.. आमचं
गवि, मस्तच लिहिलंय "नॉट नाऊ"
मस्त हो!
कमीतकमी शब्दात भावना
छान लिहीलंय .
मस्तच लिहिलंय!
मस्त!
=)) हा पिंडाकाका पक्का वस्ताद
Pagination